Nagpur Municipal Corporation

जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर

News

  

भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी – आयुक्त अश्विन मुदगल

-  मनपा आयुक्तांनी घेतला दीक्षाभूमी येथील पूर्वतयारीचा आढावा
 
नागपूर, ता. 24: दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यानिमित्त जगभरातून येणा-या भाविकांसाठी नियोजन केल्याप्रमाणे सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, तसेच कोणाचीही गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यावी असे निर्देश मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिले. रविवारी (ता. 24) मनपा आयुक्तांनी दीक्षाभूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन सोहळ्यानिमित्त मनपातर्फे उपलब्ध करुन देण्यात येणा-या सोयी सुविधांचा आढावा घेतला.
 
अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, स्मारक समितीचे विश्वस्त डॉ. सुधीर फुलझेले, विलास गजघाटे, कार्यकारी अभियंता संजय गायकवाड, प्रदीप राजगिरे, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजीव जयस्वाल, डी.डी.जांभूळकर, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (वैद्यकीय) डॉ. अनिल चिव्हाणे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, लक्ष्मीनगर झोन सहायक आय़ुक्त सुवर्णा दखने, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, डॉ. अनमोल टेंभूर्णे, उपअभियंता राजेश रहाटे, उद्यान निरीक्षक अमोल चोरपगार, उपअभियंता रविंद्र मुळे, सिध्दार्थ म्हैसकर यांची उपस्थिती होती.
 
भाविकांसाठी मनपाच्या जलप्रदाय विभागातर्फे पाण्याची व्यवस्था करण्यात येते. तसेच याठिकाणी उभारण्यात येणा-या शौचालय व स्नानगृहाकरिता पाणी पुरवठा करण्यात येतो. पिण्याकरिता स्वच्छ पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी अस्थायी नळ उभारण्यात येतात. परिसरातील सफाई करिता मनपाच्या स्वास्थ विभागाअंतर्गत (स्वच्छता) केली जाते. यासोबतच लोककर्म विभागाअंतर्गत शामियाने उभारणे, बॅरीकेटीग, अस्थायी शौचालय व स्नानगृहे आणि अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ मनपा नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहे. याठिकाणी अतिरिक्त 64 सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. परिसरातील स्वच्छतेबाबत विशेष काळजी घ्यावी, तसेच प्रकाश व्यवस्था योग्यपद्धतीने करावी असे निर्देशही आयुक्तांनी दिले.
 
मनपाच्या विद्युत विभागाअंतर्गत प्रखर दिवे, पथदिवे, हॅलोजन आणि उभारण्यात येणारे शामियाने, आणि वापरात असलेल्या परिसरातील विद्युत पुरवठ्याचे काम कऱण्यात येत आहे. परिसरात जनरेटरची व्यवस्था करण्यात येणार आहे. अग्निशमन विभागातर्फे आगीचे बंब दीक्षाभूमी परिसरातील पोलिस नियंत्रण कक्षाजवळ 24 तास तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय आरोग्य विभागातर्फे एम्बुलेन्स 24 तास तैनात करण्यात येणार आहे. या सर्व पूर्वतयारीचा आढावा मनपा आय़ुक्तांनी घेतला. नियोजनबद्ध पद्धतीने आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी असे निर्देश आय़ुक्तांनी दिले.

 

  

इक्विसिटीतर्फे आपत्ती व्यस्थापन कार्यशाळा

नागपूर, 23 सप्टेंबर; युरोपियन युनिअनच्या सहयोगाने नागपूर महानगर पालिकेकरीता अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेद्वारे संचालित इक्विसिटीतर्फे महानगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन शनिवारी (दि.23) राष्ट्रीय नागरी सुरक्षा महाविद्यालय येथे करण्यात आले. कार्यशाळेचे उदघाटन उपायुक्त रवींद्र देवतळे यांच्या हस्ते झाले. प्रामुख्याने राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाचे संचालक जी. एस. सैनी, उपसंचालक राजेश चौधरी, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, अखिल भारतीय स्थानिक स्वराज संस्थेचे विभागीय संचालक जयंत पाठक उपस्थित होते.
 
कार्यशाळेतील "आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत" विविध आपत्ती परिस्थितीबद्दल माहिती घेऊन आपली जबाबदारी आणि कर्तव्य सहज पद्धतीने पूर्ण करण्याबद्दल माहिती देण्यात आली. यामध्ये नागपुरातील विविध याआपत्तीबद्दल अभ्यासपूर्ण सादरीकरण करण्यात आले. वातावरण आणि हवामानानुसार विविध आपत्ती अभ्यासिका सादर करण्यात आली. पहिल्या सत्रात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सौरभ कुमार यांनी आपत्ती व्यवस्थापन या विषयावर माहिती दिली. दुसऱ्यासत्रात आपत्ती तयारी या विषयावर डॉ. अरुणा गजभिये यांनी प्रकाश टाकला. तिसऱ्या सत्रात राष्ट्रीय नागरी सुरक्षा महाविद्यालयाचे उपसंचालक आर. एस. चौधरी यांनी इमरजंसी रिस्पॉन्स विषयावर माहिती दिली. कार्यशाळेत राष्ट्रीय नागरी सुरक्षा महाविद्यालयाचे संचालक जी. एस. सैनी यांनी जबाबदारी आणि कार्यपद्धत या विषयावर मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक आणि संचालन जयंत पाठक यांनी केले. यावेळी अग्निशमन, आरोग्य, पाणी व्यवस्थापन व जनसंपर्क विभागाच्या अधिका-यांची उपस्थिती होती.

 

  

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते २२ ला कविवर्य सुरेश भट सभागृहाचे लोकार्पण

नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा : महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षमतेचे प्रेक्षागृह
 
नागपूर,ता. २० : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने रेशीमबाग येथे निर्मित वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेले आणि नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारे कविवर्य सुरेश भट सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण २२ सप्टेंबर रोजी दुपारी ४.१५ वाजता राष्ट्रपती मा. राम नाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे.
 
कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे राज्यपाल चे.विद्यासागर राव राहतील. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक, महामार्ग, जहाजबांधणी,जलस्त्रोत, नदी विकास व गंगा शुद्धीकरण मंत्री नितीन गडकरी, राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहील.
 
रसिकांसाठी पद्‌मश्री पद्‌मजा फेणाणी यांच्या कार्यक्रमाची भेट
 
कविवर्य सुरेश भट सभागृह लोकार्पण सोहळ्यानंतर नागपूर महानगरपालिकेच्या वतीने रसिकांना पहिलावहिला सांस्कृतिक नजराणा गायिका पद्‌मश्री पद्‌मजा फेणाणी यांच्या कार्यक्रमाच्या रूपाने मिळणार आहे. लोकार्पण सोहळ्यानंतर सायंकाळी ७ वाजता ‘केव्हा तरी पहाटे...’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कविवर्य सुरेश भट यांच्या काव्य आणि गझल गायनाचा तसेच त्यांच्या खास पत्रांचा स्मृतिगंध गायिका पद्‌मजा फेणाणी-जोगळेकर ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून उलगडतील. सदर कार्यक्रमासाठी समोरच्या रांगेतील १०० खुर्च्या राखीव राहतील. नागपूरकर रसिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य असून रसिकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अश्विन मुदगल यांनी केले आहे.
 
रेशीमबाग मैदानावर थेट प्रक्षेपण
 
कार्यक्रमस्थळ असलेल्या सभागृहाची आसन क्षमता दोन हजार असल्याने अनेक नागरिकांना सभागृह उद्घाटनाचे वेळी आत उपस्थित राहता येणार नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांना मा. राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण होणाऱ्या कविवर्य सुरेश भट सभागृहाचा लोकार्पण सोहळा अनुभवता यावा यासाठी रेशीमबाग मैदानावर एलईडीद्वारे थेट प्रक्षेपणाची व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे तीन हजार नागरिकांना एकाच वेळी हा सोहळा अनुभवता येणार आहे. या व्यतिरिक्त नागपूर शहरातील चौकाचौकात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत लावण्यात आलेल्या व्हिङीओ स्क्रीनवरही (व्हीएमएस) कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होणार आहे.
 
फेसबुक लाईव्ह
 
नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत फेसबुक पेजवरही लोकार्पण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल. यामुळे नागपूरसह देशभरातील लोकांना हा सोहळा ‘लाईव्ह’ अनुभवता येणार आहे. फेसबुक लॉग इन करून @nmcngp अथवा Nagpur Municipal Corporation या अधिकृत पेजवर हा सोहळा बघता येईल. रेशीमबाग मैदानावरील थेट प्रक्षेपण, स्मार्ट सिटी स्क्रीनवरील थेट प्रक्षेपण आणि फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागपूरकरांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी आणि आयुक्त अश्विन मुदगल यांनी केले आहे.
 
कविवर्य सुरेश भट सभागृह : वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना
 
नागपूर शहरातील मध्य, पूर्व व दक्षिण नागपुरातील जनतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेले कविवर्य सुरेश भट सभागृह वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. १९८८ प्रेक्षकक्षमता असलेले हे सांस्कृतिक सभागृह महाराष्ट्रातील मनपाच्या मालकीचे सर्वाधिक प्रेक्षक क्षमता असलेले सभागृह आहे. दिवंगत कवी सुरेश भट हे नागपूरचा गौरव आहे. त्यांच्या नावाने तयार झालेल्या या सभागृहाच्या रूपाने त्यांच्या स्मृति चिरकाल राहणार आहेत.
 
सुमारे ७५ कोटी खर्चून तयार झालेल्या सभागृहाचे भूखंड क्षेत्रफळ १२२१५.९५ चौ.मी. इतके आहे.त्यापैकी ९७९४.०२ इतक्या चौ.मी. क्षेत्रफळावर सभागृहाचे बांधकाम आहे. इमारतीची उंची ३० मीटर आहे. सभागृह परिसरात तळघर व तळमजल्यावर सुमारे २०० कार, ६०० स्कूटर आणि ६०० सायकल इतकी मोठी वाहनतळ व्यवस्था आहे. व्ही.आय.पीं.साठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था आहे.
 
१९८८ प्रेक्षक क्षमता असलेल्या या प्रेक्षागृहात आयोजकांच्या सोयीनुसार कमीअधिक आसन व्यवस्था ठेवता येईल. कमीत कमी १३०० आसनक्षमता, १५७८ आणि १९८८ अशी आसनव्यवस्था ठेवता येईल.विशेष म्हणजे दिव्यांगांना स्वतंत्र जागा सभागृहात उपलब्ध करून देण्यात आली आहे.
 
सभागृहाती भव्य रंगमंच हे सभागृहाचे आकर्षण आहे. २५ मी. बाय १५ मी. असा एकूण ३७५ चौ.मी.क्षेत्रफळाचा रंगमंच लक्ष वेधून घेतो. इतकीच जागा बॅक स्टेजला आहे. रंगमंचाच्या बाजूला आठ ग्रीन रुम्स आणि दोन व्ही.आय.पी. रुम्स आहेत.
 
तळघरापासून ते तिसऱ्या मजल्यापर्यंत जाण्यासाठी प्रत्येकी २० व्यक्ती क्षमतेच्या दोन लिफ्ट आहेत.सभागृहाचा दर्शनी हॉल १२.१५ मीटर उंच व ३६.५० बाय ४१.१५ मी. आकाराचा आहे. संपूर्ण सभागृह आणि इमारत वातानुकुलित आहे. सभागृहात BOSE या जगविख्यात कंपनीची ध्वनियंत्रणा बसविण्यात आलेली आहे. सभागृहातील रंगमंचावरील प्रकाशव्यवस्था स्वयंचलित असून CANARA या नामांकित कंपनीद्वारे उभारण्यात आली आहे. सभागृह व परिसरात सर्वत्र एलईडी दिवे लावण्यात आलेले आहेत.
 
प्रत्येक मजल्यावर स्त्री-पुरुषांकरिता स्वतंत्र प्रसाधनगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक मजल्यावर ॲक्वा गार्डसह वॉटर कुलरचीही व्यवस्था उपलब्ध आहे.
 
विजेसाठी ८०० के.व्ही. क्षमतेचे सबस्टेशन उभारण्यात आले आहे. याशिवाय पर्यायी व्यवस्था म्हणून २५० केव्हीए क्षमतेचे दोन जनरेटर संच उपलब्ध आहेत. सभागृहाच्या तळमजल्यावर उपाहारगृहाकरिता १४८५ चौ.मी. जागा उपलब्ध करण्यात आलेली आहे तसेच प्रत्येक मजल्यावर कॅफेटेरियाची व्यवस्था आहे.सभागृह परिसराचे सौंदर्य खुलविण्यासाठी ५०० चौ.मी. ची आकर्षक लॅण्डस्केपींग तयार करण्यात आलेली आहे. लॅन्डस्केपचा भाग वगळून ५२०० चौ.मी. क्षेत्रामध्ये सीमेंट ब्लॉक पेव्हींग करण्यात आले आहे. श्री.अशोक मोखा हे या प्रकल्पाचे वास्तुशास्त्रज्ञ असून वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून ही वास्तू ओळखली जाणार आहे.
 
अपारंपरिक ऊर्जेचा होणार वापर
 
सभागृह व परिसरातील विद्युत वापराकरिता परंपरागत विद्युत व्यवस्थेचा वापर कमी व्हावा याकरिता सभागृहाच्या छतावर ७७० सोलर पॅनल उभारून २०० केव्हीए पीक (Peak) क्षमता असलेले अपारंपरिक ऊर्जेचे स्त्रोत उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे साधारणत: दर दिवशी ५० किलोवॅट ऊर्जा सोलर सिस्टीमद्वारे वापरून उर्वरीत वीज वितरण कंपनीच्या ग्रीड मध्ये नेट मीटरींगद्वारे उपलब्ध होईल. त्यामुळे सभागृहाचा विद्युत खर्च कमी होण्यास मदत होणार आहे.
 
कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित पत्रपरिषदेत महापौर नंदा जिचकार यांनी ही माहिती दिली. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त अश्विन मुदगल, स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, माजी महापौर प्रवीण दटके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, भाजपच्या मनपातील प्रतोद दिव्या धुरडे, नगरसेवक निशांत गांधी, वास्तुविशारद अशोक मोखा उपस्थित होते. 

 

  

रसिकांसाठी पद्‌मश्री पद्‌मजा फेणाणी यांच्या कार्यक्रमाची भेट

कविवर्य सुरेश भट सभागृह लोकार्पण सोहळ्यानंतर नागपूर महानगरपालिकेच्या वतीने रसिकांना पहिलावहिला सांस्कृतिक नजराणा गायिका पद्‌मश्री पद्‌मजा फेणाणी यांच्या कार्यक्रमाच्या रूपाने मिळणार आहे. लोकार्पण सोहळ्यानंतर सायंकाळी ७ वाजता ‘केव्हा तरी पहाटे...’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कविवर्य सुरेश भट यांच्या काव्य आणि गझल गायनाचा तसेच त्यांच्या खास पत्रांचा स्मृतिगंध गायिका पद्‌मजा फेणाणी-जोगळेकर ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून उलगडतील. सदर कार्यक्रमासाठी समोरच्या रांगेतील १०० खुर्च्या राखीव राहतील. नागपूरकर रसिकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य असून रसिकांनी त्याचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अश्विन मुदगल यांनी केले आहे.

 

  

फटाके विक्रेत्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊ !

अग्निशमन समिती सभापती ॲड. संजय बालपांडे यांनी दिले आश्वासन
 
नागपूर,ता.१६. किरकोळ फटाके विक्रेत्यांचे नुकसान होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात येईल, असे आश्वासन नागपूर महानगरपालिकेचे अग्निशमन विशेष समितीचे सभापती  ॲड संजय बालपांडे यांनी दिले. किरकोळ फटाका विक्रेत्यांना तात्काळ परवाने देण्यासाठी शनिवारी (ता.१६) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात घेण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासमवेत प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, सहप्रमुख अग्निशमन अधिकारी बी.पी.चंदनखेडे, अग्निशमन विभागाचे सर्व स्थानक अधिकारी, किरकोळ फटाका विक्रेता असोसिएशनचे प्रतिनिधी विरेंद्र शाहू प्रामुख्याने उपस्थित होते.
 
पुढे बोलताना श्री. बालपांडे म्हणाले, फटाक्याचे दुकान लागणे ही आमचीपण इच्छा आहे. परंतु कायद्याप्रमाणे जे योग्य असेल तोच निर्णय घेण्यात येईल. अधिका-यांच्या बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेऊ, असेही बोलपांडे यांनी सांगितले. विक्रेत्यांनी आपला नोंदणी अर्ज भरावा आणि  अर्जाचे शुल्कही भरावे. महानगरपालिकेचे अग्निशमन अधिकारी व कर्मचारी निरिक्षण करतील व नंतरच दुकानाला ना हरकत प्रमाणप्रत्र द्यायचे की नाही ते ठरवतील असे बालपांडे यांनी बैठकीत सांगितले.
 
निवासी क्षेत्रात फटाक्याचे दुकान लावता येणार नाही असा उच्च न्यायालयाचा आदेश आहे. हा आदेश स्थायी फटाक्यांच्या दुकानांसाठी आहे. किरकोळ व अस्थायी स्वरूपात ज्यांचे दुकान आहे, त्यांच्यासाठी तो नियम लागू होत नाही, असे किरकोळ फटाका विक्रेता असोसिएशनचे प्रतिनिधी विरेंद्र शाहू यांनी सांगितले. जर किरकोळ फटाका विक्रेत्यांना जर परवाना मिळाले नाही तर त्यांचे नुकसान होईल, असेही शाहू बोलताना म्हणाले. काही दुकानदार परवाने न घेता हे रस्त्यावर फटाके विक्रीसाठी बसतात त्यामुळे अपघाताची शक्यता जास्त प्रमाणात असते. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती फटाका विक्रेता प्रतिनिधींनी केली. त्यावर सभापती बालपांडे बोलताना म्हणाले, जे अनधिकृतपणे फटाके विक्री करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. विक्रेत्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊ. यातूनच विक्रेत्यांसाठी त्यांच्याच फायद्याचा चांगला मार्ग काढु. यासाठी विक्रेत्यांचा सहभाग आवश्यक आहे, असेही सभापती बालपांडे बोलताना म्हणाले.

 

 

स्वच्छता हाच खरा सेवाधर्म : महापौर नंदा जिचकार

‘स्वच्छता हीच सेवा’ अभियानाचा ई-शुभारंभ : पंधरवाड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन
 
नागपूर,ता.१४ : जेथे स्वच्छता असे तेथे आरोग्य वसे, हे ब्रीद लक्षात ठेवून आपल्या शहराच्या स्वच्छतेसाठी प्रत्येक नागरिकाने आता पुढाकार घ्यायला हवा. शहरात स्वच्छता राहिली तर शहराचे आरोग्य सुदृढ राहील. त्यामुळे स्वच्छता हाच खरा सेवाधर्म समजून स्वच्छतेच्या दिशेने पाऊल टाकायला हवे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
   
केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात 'स्वच्छता हीच सेवा' मोहीम १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा ई-शुभारंभ शुक्रवार (ता.१५) ला मनपा मुख्यालयात महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते, आयुक्त अश्विन मुदगल यांच्या उपस्थितीत करण्यात आला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. महापौर नंदा जिचकार पुढे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वच्छ भारत’ अभियानाची मुहूर्तमेढ तीन वर्षांपूर्वी रोवली. या अभियानाअंतर्गत तीन वर्षात देशभरात अभियानांतर्गत व्यापक जनजागृती आणि कृती झाली. पुढील पंधरवाड्यात ‘स्वच्छता हीच सेवा’ हा कार्यक्रम आखण्यात आला असून यामध्ये नागरिकांनी आणि समाजातील प्रत्येक घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
 
आयुक्त अश्विन मुदगल यांनीही या अभियानाचे महत्त्व सांगितले. नागपूर शहराला स्वच्छतेच्या बाबतीत देशातील पहिल्या पाच क्रमांकात आणण्याचा संकल्प या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण करू या. समाजातील प्रत्येक घटकाचा यात सहभाग असेल तर हे सहज शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
या मोहिमेअंतर्गत सेवा दिवस, समग्र स्वच्छता दिवस, सर्वत्र स्वच्छता दिवस, श्रेष्ठ स्वच्छता दिवस साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत शहरातील विविध घटकातील समुदायांना एकत्रित करून त्यांना श्रमदानात सहभागी करून घेणे, शहरातील हॉस्पीटल, उद्याने, पुतळे व स्मारक यांची स्वच्छता करणे तसेच शहरातील ऐतिहासिक ठिकाणांची व प्रसिद्घ स्थळांची स्वच्छता करणे आदी कार्यक्रम अंतर्भूत असल्याची माहिती आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार यांनी यावेळी दिली.
 
कार्यक्रमाला नगरसेवक मनोज सांगोळे, जितेंद्र घोडेस्वार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, उपायुक्त रवींद्र देवतळे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस उपस्थित होते.  
 
दहा झोनमध्ये ‘स्वच्छता’ कार्यक्रमाने शुभारंभ
 
नागपूर महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या दहाही झोनमध्ये झोन मुख्यालय परिसरात स्वच्छता कार्यक्रम राबवून ‘स्वच्छता हीच सेवा’ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी झोन सहायक आयुक्तांसह तेथील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सेवा दिवस, समग्र स्वच्छता दिवस, सर्वत्र स्वच्छता दिवस, श्रेष्ठ स्वच्छता दिवस या अंतर्गत झोनस्तरावरही कार्यक्रम होणार आहेत.

 

 

'स्वच्छता हीच सेवा' मोहिमेचा १५ ला शुभारंभ

१५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान मनपा राबविणार स्वच्छतेचे उपक्रम
 
नागपूर,ता.१४ : केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात'स्वच्छता हीच सेवा' मोहीम १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ शुक्रवार (ता.१५) ला मनपा मुख्यालयात महापौर नंदा जिचकार व आयुक्त अश्विन मुदगल यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
 
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारताची संकल्पना साकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘स्वच्छ भारत’ साकारण्यासाठी व्यापक जनचळवळ उभारण्याचे आवाहन करीत ‘स्वच्छ भारत अभियान’ ही चळवळ २ ऑक्टोबर २०१४ पासून सुरू केली.या चळवळीस तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या अनुषंगाने या अभियानाअंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे‘स्वच्छता हीच सेवा’ अंतर्गत एक राष्ट्रव्यापी मोहीम १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान राबविण्यात येणार आहे.
 
या मोहिमेअंतर्गत सेवा दिवस, समग्र स्वच्छता दिवस, सर्वत्र स्वच्छता दिवस, श्रेष्ठ स्वच्छता दिवस साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत शहरातील विविध घटकातील समुदायांना एकत्रित करून त्यांना श्रमदानात सहभागी करून घेणे, शहरातील हॉस्पीटल, उद्याने, पुतळे व स्मारक यांची स्वच्छता करणे तसेच शहरातील ऐतिहासिक ठिकाणांची व प्रसिद्घ स्थळांची स्वच्छता करणे आदी कार्यक्रम अंतर्भूत आहेत. या मोहिमेत नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.
 
मनपा मुख्यालयात शुक्रवार १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मोहिमेचा शुभारंभ महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते होईल. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त अश्विन मुदगल, बसपा पक्ष नेते मोहम्मद जमाल, राकाँचे पक्ष नेते दुनेश्वर पेठे, आरोग्य समिती सभापती मनोज चापले, आरोग्य समितीचे सर्व सदस्य, पदाधिकारी, सर्व नगरसेवक, अधिकारी, सहायक आयुक्त आदी उपस्थित राहतील.  
 
असा असणार मोहिमेचा कार्यक्रम
 
१५ सप्टेंबर - स्वच्छता हीच सेवा या मोहिमेचा शुभारंभ
१७ सप्टेंबर - सकाळी १० ते दुपारी १२ वाजेपर्यंत श्रमदान करून सेवा दिवस साजरा करणे.
२४ सप्टेंबर - समाजातील सर्व घटकांना श्रमदानात सहभागी करून घेऊन समग्र स्वच्छता करणे.
२५ सप्टेंबर - शहरातील हॉस्पीटल, उद्याने, पुतळे व स्मारके, बस थांबे, तलाव आणि स्वच्छतागृहांची व्यापक प्रमाणात सफाई करून सर्वत्र स्वच्छता करणे.
१ ऑक्टोबर - शहरातील प्रसिद्ध स्थळांच्या ठिकाणी व्यापक श्रेष्ठ स्वच्छता मोहीम राबविणे.

 

 

नवरात्र उत्सवासाठी ३८ बसेसच्या दररोज २७८ फेऱ्या

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ९५ बसेस दररोज करणार ७३० फेऱ्या
 
परिवहन सभापती बंटी कुकडे यांनी दिली माहिती
 
नागपूर, ता. १३ : नवरात्रनिमित्त लाखोंच्या संख्येत भाविक कोराडी येथील मंदिरात दर्शनासाठी जात असतात. त्यांच्या सुविधेसाठी ३८ बसेसची व्यवस्था कऱण्यात आली आहे. या बसेस दर दिवशी २७८ फेऱ्या करणार आहे. तसेच दीक्षाभूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ९५ बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या बसेस विविध मार्गावर दर दिवशी ७३० फेऱ्या करणार आहेत,  अशी माहिती परिवहन समिती सभापती बंटी (जितेंद्र) कुकडे यांनी दिली. विशेष म्हणजे नवरात्री पर्वावर फक्त महिलांसाठी विशेष बससेवा सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत
 
२ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त “स्वच्छ भारत अभियाना” अंतर्गत शहरातील ‘आपली बस’च्या १५८ स्टॉपची सर्व चालक, वाहक यांच्या श्रमदानातून स्वच्छता करण्यात येईल. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येईल. २ ऑक्टोबरपासून “अटल बिहारी वाजपेयी ज्येष्ठ नागरिक योजने”ची सुरुवात करण्यात येणार असून ज्येष्ठ नागरिकांना तिकीट दरात ५० टक्के सवलत देण्यात येईल.
 
तिकीट दर “राऊंड ऑफ”
 
बस तिकीट काढत असताना चिल्लर नसल्यामुळे नागरिकांना वाहकाकडून उर्वरित पैसे देण्यात येत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारीनंतर अनेक मार्गावर कारवाईची धडक मोहीमही राबवून संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांची ही अडचण कायमची सोडविण्यासाठी तिकीट दर “राऊंड ऑफ” करण्याच्या मानस परिवहन विभागाचा आहे. (उदा. ११ रुपये प्रवासी भाडे असलेल्या तिकीटाकरिता नागरिकांना १० रुपये द्यावे लागतील तर ९ रुपये तिकीटदर असलेल्या तिकीटासाठी नागरिकांना १० रुपये द्यावे लागतील) नागरिकांनी तिकीट घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन सभापती बंटी कुकडे यांनी केले आहे. वाहकाकडून चिल्लर देण्यास टाळाटाळ होत असल्यास त्याची तक्रार परिवहन तक्रार निवारण केंद्र ०७१२-२७७९०९९ येथे संपर्क साधावा.
 
त्याचप्रमाणे मनपा आरोग्य विभागातील जे ऐवजदार कर्मचारी, परिवहन विभागात काम कऱण्यास उत्सुक आहे त्यांनादेखिल प्रशिक्षण देवून त्यांचेमार्फत बस सेवा सुरु करण्याचा मानस असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली.

 

 

स्वच्छता आणि सुरक्षेला प्राधान्य द्या : महापौर नंदा जिचकार

दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिन तयारीसंदर्भात आढावा बैठक
 
नागपूर,ता. १३ : नागपुरातील पवित्र दीक्षाभूमीवर होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा नागपूरची ओळख जगभरात करून देणारा सोहळा आहे. या सोहळ्यात देशभरातून येणाऱ्या भाविकांची योग्य व्यवस्था करण्यासंदर्भात तत्पर राहावे. दीक्षाभूमी परिसराची स्वच्छता आणि सुरक्षेला प्राधान्य द्या. कुठलीही अनुचित घटना होणार नाही याची काळजी घ्या, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
 
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर होणाऱ्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या व्यवस्थेसंदर्भात आढावा घेण्यासाठी नागपूर महानगर पालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
महापौर नंदा जिचकार यांच्यासह उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्ता पक्ष नेता संदीप जोशी, आयुक्त अश्विन मुदगल, स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती संजय बंगाले, दुर्बल घटक समितीचे सभापती महेंद्र धनविजय, भाजपच्या मनपातील प्रतोद दिव्या धुरडे, धरमपेठ झोन सभापती रुपा राय, स्थायी समितीचे सदस्य नगरसेवक मनोज सांगोळे, अतिरिक्त आयुक्त आर. झेड. सिद्दीकी, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, मुख्य अभियंता विजय बनगीरवार उपस्थित होते.
 
महापौर नंदा जिचकार,  आयुक्त अश्विन मुदगल आणि पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांकडून दीक्षाभूमीवरील तयारीचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यासाठी आय.टी.आय., जेल परिसर, माता कचेरी, दीक्षाभूमी यासह इतर ठिकाणी ७१० शौचालये, ७० स्नानगृहांची व्यवस्था करण्यात येत आहे. आयटीआय येथे सुमारे सात हजार चौरस फुटाचा पेंडाल टाकण्यात येत असून तेथे भाविकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येईल. आरोग्य विभागाची टीम २९ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर पर्यंत २४ तास नागरिकांच्या सेवेत तत्पर असेल. २४ तास पाण्याची व्यवस्था करण्यासाठी काही ठिकाणी सुमारे २२० तात्पुरते नळ बसविण्यात येणार आहेत. ज्या-ज्या ठिकाणी भोजनदान आहे तेथे आणि प्याऊसाठी टँकरने पाणी पुरविण्यात येणार आहे. काही ठिकाणी नळ असलेल्या पीव्हीसीच्या टाक्यात उभारण्यात येणार आहेत. दीक्षाभूमीपर्यंत येण्यासाठी नागरिकांनी मनपाची ‘आपली बस’ सेवा देणार आहेत. दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस अशा सुमारे ५० ‘आपली बस’ भाविकांच्या सेवेत राहणार आहेत. दीक्षाभूमी परिसरात पूरक प्रकाश व्यवस्था करण्यात येणार आहे. सुमारे २२५ ते २५० फ्लड लाईट, १० जनरेटर आणि वेळोवेळी पोलिस विभागाकडून देण्यात येणाऱ्या सूचना भाविकांपर्यंत पोहोचण्यासाठी साऊंडची व्यवस्था प्रकाश विभागातर्फे करण्यात येणार आहे. सीसीटीव्हीची व्यवस्था यापूर्वीच झालेली आहे. दीक्षाभूमीकडे येणाऱ्या रस्त्यांवरील खड्डे आठ दिवसांत बुजविण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अग्निशमन विभाग पोलिसांच्या सहकार्याने आपत्ती निवारण कक्ष उभारणार आहे. पोर्टेबल फायर एक्स्टिंग्युशर आणि व्हॉलेंटियरसुद्धा ठिकठिकाणी कार्यरत राहणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी अधीक्षक अभियंता दीपक सोनटक्के, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, कार्यकारी अभियंता (वाहतूक) डी.डी. जांभुळकर, कार्यकारी अभियंता (विद्युत) एस.बी. जैस्वाल, कार्यकारी अभियंता (हॉटमिक्स प्लान्ट) राजेश भूतकर, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, विकास अभियंता सतीश नेरळ, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे, धंतोली झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर आदी उपस्थित होते.
 
स्वच्छतेची काळजी घ्या : संदीप जाधव
 
धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी तयार करण्यात येणाऱ्या तात्पुरत्या स्वरूपातील शौचालयातील मलब्याची कार्यक्रमानंतर तातडीने विल्हेवाट लावण्याची सूचना सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना केली. पाऊस येण्याची शक्यता लक्षात घेता शाळा, खासगी जागा, शासकीय जागा, समाजभवन आदी पर्यायी जागांच्या व्यवस्थेचे नियोजन करण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
 
रस्ते तातडीने खुले करावे : आयुक्त अश्विन मुदगल
 
दीक्षाभूमीकडे येणाऱ्या सेंट्रल बाजार रोडवरील फुटपाथचे काम, महाराजबागकडून कल्पना बिल्डिंगकडून येणाऱ्या रस्त्याची देखभाल दुरुस्ती करून तातडीने हे रस्ते दुहेरी वाहतुकीसाठी खुले करावे. रहाटे कॉलनी ते अजनी स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यासंदर्भात मेट्रोला पत्र देऊन तातडीने त्याचे सपाटीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पावसाची शक्यता लक्षात घेऊन शासकीय इमारती, मनपाच्या आणि खासगी शाळांची माहिती घेऊन त्या ताब्यात घेण्याचे निर्देशही त्यांनी सहायक आयुक्तांना दिले. अतिरिक्त मोबाईल शौचालय, प्रत्येक दिवशी परिसराची स्वच्छता होईल त्याची काळजी, आरोग्य व्यवस्था तत्पर ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. नागरिकांना सोयीचे व्हावे यासाठी दिशादर्शक फलक लावण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

 

 

शहरातील सर्व दहनघाटांचे सौंदर्यीकरण तातडीने करा : मनोज चापले

वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीच्या आढावा बैठकीत दिले निर्देश
 
नागपूर, ता.१३ : शहरातील सर्व दहनघाटांचे सौंदर्यीकरण तातडीने करावे, त्याचप्रमाणे तेथे कायमस्वरूपी स्वच्छतेच्या देखरेखेची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांनी दिले आहेत.
 
बुधवारी (ता.१३) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात पार पडलेल्या वैद्यकीय सेवा व आरोग्य समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला उपसभापती प्रमोद कौरती, समिती सदस्य लखन येरावार, विजय चुटेले, सदस्या विशाखा बांते, भावना लोणारे, आशा नेहरू, वंदना चांदेकर, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ. अनिल चिव्हाने, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे, मनपाच्या दहाही झोनचे झोनल अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
 
बैठकीत पुढे बोलताना मनोज चापले म्हणाले, नागपूर महानगरपालिकेच्या अख्यत्यारित येणारे शहरातील १४ घाटांवर देखरेख व नियंत्रण हे आरोग्य विभागाचे आहे. परंतु त्याचे सौंदर्यीकरणाचे नियंत्रण हे संबंधित झोन मार्फत होते. घाटांचे सौदर्यीकरणाचे काम हे आरोग्य समितीद्वारे करण्यात यावे असे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. दहनघाटाची डागडुजी करण्यात यावी, तसेच सर्व झोनमार्फत घाटांच्या सौंदर्यीकरणाबाबतचा अहवाल पुढील बैठकीत द्यावा, असे आदेश सभापती चापले यांनी दिले. दहन घाटांच्या सभोवताल संरक्षक भिंत व प्रवेशद्वार लावण्यात यावे, सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात, असेही आदेश सभापती मनोज चापले यांनी दिले.
 
बैठकीमध्ये मागील महिन्यात झालेल्या सभेच्या कार्यवाहीला मंजुरी देण्यात आली. नागपूर शहरात वाढत्या संसर्गजन्य रोग, डेंग्यु, व कीटकजन्य रोगांवर उपाययोजना करण्याबाबत चर्चा झाली. स्वाईन फ्ल्यूची लक्षणे असलेले १४ रूग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या रोगाबाबत जनजागृतीही सुरू असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. चिव्हाने यांनी दिली. सर्व शाळांमध्ये जनजागृती फलक, सार्वजनिक ठिकाणी बॅनर, होर्डींग्स लावण्यात यावे, असे आदेश चापले यांनी दिले. शहरात यापाठोपाठच मलेरियाचे चार व डेंग्यूचे चार रूग्ण आढळले आहे. मलेरिया, फायलेरियामार्फत जनजागृती सुरू असून शहारतील ३४ हजार ६०० झोपडपट्टीच्या घरतपासणी झाल्या आहेत. ज्यांच्या घरांमध्ये रोगास कारणीभूत जंतू आढळून आले आहेत, त्यांना नोटीस बजावण्यात आली असल्याची माहिती हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे यांनी दिली. मोकळ्या जागेवर पाणी साचलेले असल्यास त्या जागा मालकांना नोटीस बजावून कारवाई करण्याचे आदेश चापले यांनी दिले.
 
मनपातील सर्व दवाखाने, हॉस्पीटल यांच्यावर संबंधित झोनचे नियंत्रण न राहता ते आरोग्य समितीच्या अख्यत्यारित यावे यासाठीचा पाठविलेला प्रस्ताव आयुक्त अश्विन मुदगल यांनी मान्य केला आहे. या अंतर्गत शहरातील मनपाच्या पाच दवाखान्यांची  बांधकाम व डागडुजी करण्यासंबंधीचा प्रस्ताव डॉ. चिव्हाने यांनी समितीसमोर सादर केला. सभापती मनोज चापले यांनी प्रस्ताव मान्य करून बांधकाम करण्याचे आदेश दिले. यानंतर हॉस्पीटल व दवाखाना यांच्यावरील देखरेख, निविदा ही आरोग्य समितीद्वारे करण्यात येईल अशी घोषणा सभापती चापले यांनी केली. मोकाट कुत्र्यांवर त्वरित उपयायोजना करण्यात याव्या, असे आदेशही चापले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
 
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारताची संकल्पना साकारण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त ‘स्वच्छ भारत’ साकारण्यासाठी व्यापक जनचळवळ उभारण्याचे आवाहन करीत ‘स्वच्छ भारत अभियान’ ही चळवळ २ ऑक्टोबर २०१४ पासून सुरू केली आहे. या चळवळीस तीन वर्षे पूर्ण होत असल्याच्या अनुषंगाने या अभियानाअंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे ‘स्वच्छता हीच सेवा’ या विषयावर एक राष्ट्रव्यापी मोहीम १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या दरम्यान राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने यासंदर्भातील पाठविलेल्या अध्यादेशाचे वाचन अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर यांनी केले.

 

 

राष्ट्रपतींच्या दौऱ्याचा मनपा आयुक्तांनी घेतला आढावा

नागपूर,ता. १३ : महामहीम राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद यांच्या २२ सप्टेंबर रोजीच्या संभाव्य दौऱ्याच्या तयारीसंदर्भात मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांनी बुधवार (ता. १३ सप्टेंबर) रोजी मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील सभागृहात आढावा घेतला.
 
महामहीम राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद हे दौऱ्यात मनपाच्या कविवर्य सुरेश भट सांस्कृतिक सभागृहाचे लोकार्पण करणार आहेत. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमांच्या जबाबदारीचे वाटप यावेळी अधिकाऱ्यांना करण्यात आले. राष्ट्रपती यांच्या दौऱ्यादरम्यान प्रोटोकॉलनुसार व्यवस्था आणि इतर व्यवस्थेचा आयुक्त अश्विन मुदगल यांनी आढावा घेतला. महामहीम राष्ट्रपतींचा ताफा ज्या मार्गावरून जाणार आहे त्या मार्गावरील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात, मार्गातील खड्डे बुजविण्यासंदर्भात आणि आवश्यक तेथे रस्त्याचे नवीनीकरण करण्याचे आदेश आयुक्त मुदगल यांनी दिलेत.
 
कार्यक्रम स्थळी पाण्याची व्यवस्था, पार्किंगची व्यवस्था, सभागृहाच्या बाहेर रेशीमबाग मैदानावर नागरिकांच्या बैठकीची व्यवस्था, कार्यक्रमाच्या प्रक्षेपणाची व्यवस्था, सभागृहाच्या आतमधील संपूर्ण व्यवस्था, अतिविशिष्ट आणि विशिष्ट व्यक्तींच्या पासेसची व्यवस्था आदींचाही आढावा आयुक्त श्री. मुदगल यांनी घेतला.
 
जबाबदारी दिलेल्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले काम जबाबदारीने पार पाडावे आणि कविवर्य सुरेश भट सभागृह लोकार्पणाचा कार्यक्रम संस्मरणीय करावा, असे आवाहनही आयुक्त अश्विन मुदगल यांनी केले.
 
बैठकीला अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा निगम सचिव हरिश दुबे, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता (विद्युत) एस.बी. जैस्वाल, कार्यकारी अभियंता (वाहतूक) डी.डी. जांभूळकर, कार्यकारी अभियंता (स्लम) सतीश नेरळ, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, कार्यकारी अभियंता राजेश भूतकर, मोती कुकरेजा, के.एल. सोनकुसरे, आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ. अनिल चिव्हाणे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, स्थावर अधिकारी आर. एस. भुते, झोन सहायक आयुक्त राजू भिवगडे, राजेश कराडे, सुभाष जयदेव, हरिश राऊत, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस उपस्थित होते.

 

 

जैविक विविधता व्यवस्थापन समितीच्या सभापतीपदी दिव्या धुरडे अविरोध

नागपूर, ता. 12 सप्टेंबरः जैविक विविधता व्यवस्थापन समितीच्या सभापतींची निवड प्रक्रीया आज (ता. 12 सप्टेंबर) रोजी पार पडली. पीठासीन अधिकारी महापौर नंदा जिचकार होत्या. त्यांनी समितीच्या सभापतीपदी दिव्या धुरडे यांची निवड झाल्याची घोषणा केली. 
  
नामनिर्देशन अर्ज सादर करण्याच्या वेळेत दिव्या धुरडे यांनी निगम सचिव हरिश दुबे यांच्याकडे अर्ज सादर केला. सूचक निशांत गांधी तर अनुमोदक सोनाली कडू होत्या. जैविक विविधता व्यवस्थापन समिती सभापतीपदी दिव्या धुरडे यांचे एकमेव नामनिर्देशन अर्ज निगम सचिव यांच्याकडे प्राप्त झाला. नामनिर्देशन अर्ज मागे घेण्यासाठी दिलेला अवधी संपल्यानंतर पीठासीन अधिकारी महापौर नंदा जिचकार यांनी जैविक विविधता व्यवस्थापन समिती सभापतीपदी दिव्या धुरडे यांची निवड झाल्याची घोषणा केली व तुळशीचे रोपटे देऊन त्यांचे अभिनंदन केले. यानंतर अनिश्चित काळासाठी पीठासीन अधिकारी यांनी सभा स्थगित केली. 
 
समिती सदस्यांमध्ये नगरसेविका सुषमा चौधरी, निशांत गांधी, सोनाली कडू, आशा उईके, वैशाली नारनवरे यांचा समावेश आहे. यावेळी निगमसचिव हरिश दुबे, उद्यान अधिक्षक सुधीर माटे यांची उपस्थिती होती.

 

 

फुटबॉल प्रचाररॅलीचे महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते उद्घाटन

नागपूर,ता.१२. महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण विभाग व क्रीडा विभागाच्यावतीने आयोजित फुटबॉल या खेळाचा प्रचार व्हावा यासाठी फुटबॉल प्रचार रॅलीचे आयोजन मंगळवारी (ता.१२) ला वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयात करण्यात आले होते. यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी फुटबॉल ला किक मारून रॅलीचे उद्घाटन केले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालिका डॉ. अंजली राहटगावकर, रॅलीच्या संयोजिका पदव्युत्तर शारीरिक शिक्षण विभागाच्या विभागप्रमुख डॉ.माधवी मार्डीकर प्रामुख्याने उपस्थित होत्या.
 
फुटबॉल या खेळाचा प्रचार महाराष्ट्रभर व्हावा यासाठी शासनाच्या क्रीडा विभागाद्वारे प्रचार मोहिम सुरू करण्यात आली आहे. १५ तारखेला महाराष्ट्र मिशन मिलीयन या कार्यक्रमाची जनजागृती व्हावी यासाठी या प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये विदर्भातील तीन शासकीय महाविद्यालयांच्या विद्यार्थांचा सहभाग होता. ही रॅलीचा प्रारंभ वसंतराव नाईक शासकीय कला व समाज महाविद्यालयातून झाला. व्हेरायटी चौक, महाराजबाग चौक मार्गे ही रॅली शासकीय विज्ञान महाविद्यालयात आली. येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये वसंतराव नाईक शासकीय कला व समाज महाविद्यालय,विज्ञान संस्था, न्यायसहायक विज्ञान संस्थेचे विद्यार्थी सहभागी होते. रॅलीमध्ये न्यायसहायक विज्ञान संस्थेचे संचालक डॉ.जयराम खोब्रागडे, वंसतराव नाईक कला व समाज महाविद्यालयाचे संचालक डॉ. सुनेत्रा पाटील, विज्ञान संस्थेचे संचालक डॉ.आत्राम तसेच शासकीय महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षक, क्रीडाविभागाचे प्रमुख उपस्थित होते. 

 

 

विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी क्रीडा संकूल सज्ज

विदर्भातील पहिल्या सिंथेटिक ट्रॅकची महापौर नंदा जिचकार यांनी केली पहाणी
 
नागपूर,ता.११. विभागीय क्रिडा स्पर्धेसाठी मानकापूर येथील क्रीडा संकूल सज्ज झाले आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या विदर्भातील पहिल्या अद्ययावत सिंथेटिक ट्रकची पाहणी महापौर नंदा जिचकार यांनी सोमवारी (ता.१) ला केली. यावेळी त्यांच्यासमवेत क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, महाराष्ट्र शासनाचे क्रीडा विभागाचे उपसंचालक सुभाष रेवतकर, नागपूर ॲथलॅटिक्स असोसिएशनच्या सदस्या अर्चना किट्टेवार प्रामुख्याने उपस्थित होते.
 
विभागीय ॲथलॅटिक्स स्पर्धा १६,१७ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी हा ट्रॅक तयार झालेला असून विदर्भातील पहिला सिंथेटिक अद्ययावत ट्रॅक तयार करण्यात आलेला आहे. हा ट्रॅक उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असून लवकरात लवकर याचे उद्घाटन करण्यात यावे, अशी विनंती रेवतकर यांनी महापौर नंदा जिचकार यांना केली. त्यावर महापौरांनी मुख्यमंत्र्यांशी बोलुन तारीख ठरवू, असे आश्वासन दिले. या ठिकाणी पॅव्हेलियनही तयार करण्यात येणार आहे. त्या बांधकामाचीदेखील पाहणी महापौरांनी केली.
 
असा आहे नवा ॲथलेटिक्स ट्रॅक
 
मानकापूर येथे नव्याने तयार करण्यात आलेला ॲथलेटिक्स ट्रॅक हा संपूर्ण सिंथेटिक असून पुण्याच्या बालेवाडी स्टेडियमच्या धरतीवर बनविण्यात आला आहे. येथे नव्या अद्ययावत विद्युत सुविधा असणार असून फ्लड लाईटची व्यवस्था असणार आहे. त्यामध्ये जमिनीत आत पाण्याचे स्प्रिंकल लावण्यात आले असून जेणेकरून पाणी ट्रॅकवर साचणार नाही याची देखील काळजी घेण्यात आली आहे.

 

 

विद्यार्थांनो! आपले शरीर निरोगी ठेवा- महापौर नंदा जिचकार यांचा मनपाच्या विद्यार्थांना सल्ला

दंत चिकित्सा तपासणी व उपचार शिबिराचे उद्घाटन
 
नागपूर,ता.११. विद्यार्थांनो आपले शरीर निरोगी ठेवा, आपल्या दाताची काळजी घ्या, असा सल्ला महापौर नंदा जिचकार यांनी मनपाच्या शाळेतील विद्यार्थांना दिला. नागपूर महानगरपालिका व शासकीय दंत महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दंत चिकिस्ता तपासणी व उपचार शिबिराचे उद्घाटन सोमवार (ता.११) जयताळा माध्यमिक शाळेत झाले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
 
यावेळी व्यासपीठावर शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील,नगरसेविका उज्ज्वला बनकर, प्रणिता शहाणे, शासकीय दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.सिंधु गणवीर, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, मुख्याधापक सुनील खनगन, प्राथमिक विभागाच्या प्रभारी मुख्याधापिका कल्पना बुधे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
 
पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, आपल्या शरीराची काळजी घेणे आवश्यक आहे. त्याने शरीर सदृढ राहते, विद्यार्थांनी वाईट सवयी लावू नये. जेणेकरून आपले दात व शरीर खराब होईल.शालेय शिक्षणाबरोबरच योगासन, व्यायाम याची सवय विद्यार्थांनी अंगी जोपासावी असा सल्लाही महापौरांनी विद्यार्थांना दिला.
 
दंत महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.गणवीर यांनी महाविद्यालयाचे उपक्रम व अभियानाबाबत माहिती दिली. शासकीय दंत महाविद्यालयाचे हे सुवर्ण वर्ष असल्याने महाविद्यालयाद्वारे अनेक उपक्रम राबविले जाणार आहे, त्याचाच एक भाग म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ मुख अभिनाअंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थांचे दंत व मुख आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे.फक्त तपासणी नसून त्याचे निदान शोधून त्यावर मोफत उपचारही विद्यार्थांना देण्यात येणार असल्याची माहिती डॉ.गणवीर यांनी दिली. प्रत्येत महिन्याच्या मंगळवारी दंत महाविद्यालयाची मोबाईल व्हॅन मनपातील शाळेत दाखल होणार आहे. विद्यार्थांच्या दाताची व मुखाची तपासणी करून त्यावर उपचारदेखील लगेच करण्यात येणार आहे.
 
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.  मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याधापक सुनील खनगन यांनी केले. शाळेच्या विद्यार्थांनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे संचालन वनिता त-हाने यांनी तर आभार अरूणा गावंडे यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
 
यावेळी शाळेतील शिक्षकवृंद, दंत महाविद्यालयातील शिक्षक वृंद व विद्यार्थी, तसेच महानगर पालिकेच्या लक्ष्मीनगर झोनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

 

आयुक्तांनी केली प्रभाग दोनची पाहणी- नगरसेवकांनी दाखविलेल्या समस्याची घेतली गंभीर दखल

स्वच्छता, रस्ते, अतिक्रमणासंदर्भात दिलेल्या निर्देशांचा घेणार १५ दिवसांनी आढावा
 
नागपूर, ता. ९ : आशीनगर झोन अंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्र. दोनमधील समस्यांची मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांनी शनिवारी (ता.९) पाहणी केली. नगरसेवकांनी दाखविलेल्या समस्यांची गंभीर दखल घेत त्या तातडीने सोडविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. सदर समस्या सुटल्या की नाही याची पाहणी ते १५ दिवसांनी करणाऱ आहेत.
   
आयुक्त अश्विन मुदगल यांच्यासोबत विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, झोन सभापती भाग्यश्री कानतोड़े, नगरसेवक मनोज सांगोळे, दिनेश यादव, जितेंद्र घोडेस्वार, नगरसेविका भावना लोणारे स्नेहा निकोसे, मनपाचे अधीक्षक अभियंता दीपक सोनटक्के, कार्यकारी अभियंता राजेश भूतकर, सहायक आयुक्त विजय हुमणे, उपअभियंता विजय कडू, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, झोनल आरोग्य अधिकारी धनराज रंगारी, उपअभियंता अनिल नागदिवे, ओसीडब्ल्यूचे डेलीगेट रत्नाकर पंचभाई, संतोष लोणारे, राकेश निकोसे उपस्थित होते. 
 
या दौऱ्यात आयुक्तांनी प्रामुख्याने गडर लाइन, त्यातून रस्त्यावर येणारे पाणी, अतिक्रमणामुळे चोक झालेल्या नाल्या, रस्त्यावरील खड्डे, वाहन पार्किंग मुळे बंद झालेले रस्ते, कार्यादेश निघूनही काम न सुरू झालेल्या सीमेंट रस्त्याचे लोकेशन, बंद असलेले पथदिवे आदींची पाहणी केली. ग्रामीण पोलिस मुख्यालयाजवळील पाटणकर चौक येथे मटन मार्केटचे अतिक्रमण आहे. त्यांनी नाल्या बंद केल्याने आजुबाजुच्या खाली प्लॉटवर पाणी साचले होते. अतिक्रमण तातडीने काढून पाण्याचा निचरा करण्याचे निर्देश आयुक्त मुदगल यांनी दिले. आर्मर टावर ते रिंग रोड सीमेंट रोडचे काम अद्याप सुरू झाले नाही. काम सुरू करण्यात तांत्रिक अडचण असेल तर तातडीने खड्डे बुजविण्याचे निर्देश त्यांनी दिले. काच फॅक्टरी, नारी बस स्टॉप, रमाई नगर डब्ल्यूसीएल रोड परिसरात उभ्या असणाऱ्या जड़ वाहनांमुळे नागरिकांना प्रचंड त्रास होतो. वाहन चालक अरेरावी करतात. यासंदर्भात नागरिकांनी तक्रार करताच आयुक्त अश्विन मुदगल यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनिद्वारे प्रकरणाचे गांभीर्य सांगितले. प्रारंभी संबंधित वाहन मालकांना समजावून सांगा. नसेल समजत तर पोलिसात तक्रार करा, असे निर्देश श्री. मुदगल यांनी सहायक आयुक्त हुमणे यांना दिले. रमाई नगर ते डब्ल्यूसीएल रोड, कामगार नगर ते बुधवार बाजार रोड आदी ठिकाणी साचलेले पाणी जेसीबीद्वारे वळविण्याचे निर्देश त्यांनी झोनल आरोग्य अधिकारी रंगारी यांना दिले. 
 
म्हाडा कॉलनी ते गुरुनानक कॉलेज तसेच कामगार नगर येथील रस्ता नागपूर सुधार प्रन्यासने काही महिन्यापूर्वीच तयार केला. मात्र त्या रस्त्यावर मोठमोठे खड्ढे झाले असल्याचे नगरसेवकांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. आयुक्त मुदगल यांनी नासुप्रचे श्री. गुज्जलवार यांना याबाबत भ्रमणध्वनिद्वारे माहिती देऊन आवश्यक ती कार्यवाही करण्यासंदर्भात चर्चा केली.
 
म्हाडा कॉलनीजवळील रस्त्यावर वारंवार पाणी साचत असल्यामुळे रस्ता खराब होतो. त्यावर स्थायी उपाय म्हणून ट्रंक लाइनचे काम तातडीने करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. 
 
खुल्या भूखंड मालकांना देणार नोटीस
 
प्रभाग क्र. दोन मधील अनेक रिक्त भूखंडावर घाणीचे साम्राज्य आहे. अनेक दिवसांपासून पाणी साचले असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याला धोका होऊ शकतो ही भीती व्यक्त करीत आयुक्त मुदगल यांनी अशा भूखंड मालकांना तातडीने नोटीस बजावण्याचे निर्देश दिले. प्रतिसाद मिळाला नाही तर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

 

 

महानगरपालिका व जेसीसतर्फे 2500 बांधकाम मजुरांचे लसिकरण-  जेसीस नागपूर गोंडवाना झोन 9चे सहकार्य

नागपूर, ता. 9 सप्टेंबरः नागपूर महानगरपालिका व जेसीस नागपूर गोंडवाना झोन 9 यांच्या संयुक्त विद्यमाने 7 ते 9 सप्टेंबर दरम्यान सुमारे 2 हजार 500 बांधकाम क्षेत्रातील कार्यरत मजुरांना टीटनेसचे लसिकरण कऱण्यात आले. तीन दिवसीय उपक्रमाचे समारोप आज (ता. 9) सप्टेंबर रोजी प्रतापनगर चौक येथे महापौर नंदा जिचकार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी मनपातर्फे नोडल अधिकारी सुनिल घुरडे, नगरसेविका पल्लवी शामकुळे, मिनाक्षी तेलगोटे, वैद्यकीय अधिकारी विजय जोशी, डॉ. मंजुशा मठपती, जेसीआय झोन 9 चे अध्यक्ष सीए स्वास्तिक जैन, माजी अध्यक्ष नितीन ठक्कर, जेसीआय़ नागपूर गोंडवाना अध्यक्ष कविता दुरुगकर, विक प्रेसिडेंट वृंदेश धर्माधिकारी, प्रकल्प संचालक संजय गुलकरी, प्रकल्प समन्वयक प्रबोध देशपांडे, जेसीआय विक सचिव अर्पण काटकवार यांची उपस्थिती होती.
 
उपक्रमादरम्य़ान शहरातील विविध भागात असलेल्या बांधकाम मजुरांच्या ठिय्यावर जाऊन त्यांचे लसिकरण करण्यात आले. तसेच त्यांच्या आरोग्याची तपासणी कऱण्यात आली. यामध्ये गजानननगर, जरीपटका, महाल, मानेवाडा, प्रतापनगर, पंचशील चौक, भांडे प्लॉट आणि प्रतापनगर येथील ठिय्यावर मजुरांचे लसिकऱण करण्यात आले. सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन विविध घटकांची काळजी घेणे, आणि त्यांच्यासाठी उपक्रमाचे आयोजन करणे ही अभिनंदनाची बाब आहे. प्रत्येक सामाजिक संस्थेने पुढाकार घेऊन उपक्रम राबविल्यास निरोगी आणि स्वास्थ समाज साकारणे सहज शक्य असल्याचे सांगून जेसीसचे कौतुक केले. 

 

 

"आपली बस"च्या ताफ्यात आणखी 5 ग्रीन बस दाखल- रेल्वे स्थानक ते विमानतळ सेवा होणार सुरू

नागपूर, ता. 8 सप्टेंबर: शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि आरामदायी परिवहन सेवा देण्याच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या मनपाच्या आपली बस सेवेच्या ताफ्यात आज (ता. 8) रोजी आणखील 5 ग्रीन बस दाखल झाल्या असल्याची माहिती परिवहन समिती सभापती बंटी (जितेंद्र) कुकडे यांनी दिली. सध्या शहरातील विविध मार्गावर 5 ग्रीन बस सुरू आहे. तसेच शहरातील इतर मार्गावरही ग्रीन बस सेवा सुरू करण्यात याव्या अशी नागरिकांची मागणी आहे. नागरिकांना दर्जेदार दळणवळण व्यस्था उपलब्ध करून देत असताना प्रदूषण नियंत्रणही आपली जबाबदारी लक्षात घेता ग्रीन बस सुरू करण्यात येत आहे. आपली बस अंतर्गत 5 बस  सुरू असून आज आलेल्या 5 बस गृहीत धरून 10 बसेस नागपूरकरांच्या सेवेत उपलब्ध झाल्या आहेत. तसेच या महिन्याच्या शेवट पर्यंत आणखी 10 ग्रीन बस शहरात दाखल होणार आहे. तसेच उर्वरित बसेस प्रेत्येक महिन्यात 15 बसेस या प्रमाणे आपली बस च्या ताफ्यात दाखल होणार आहे. रेल्वे स्थानक ते विमानतळ, रेल्वे स्थानक ते शहरातील प्रमुख ठिकाण, विमानतळ ते शहरातील प्रमुख ठिकाणा जोडण्यात येणार आहे.
 
ठळक वैशिष्ट्ये
-    संपूर्ण वातानुकुलीत बस
 
-    प्रदूषण विरहीत ग्रीन फ्युल
 
-    रिअर इंजिन (जर्क फ्री प्रवास)
 
-    स्वयंचतिल गीअर
 
-    लो फ्लोअर बॉडी
 
-    सीसीटिव्ही कॅमेरा
 
-    एयर सस्पेंशन
 
-    जीपीएस स्टॉर डिस्प्ले
 
-    व्हेईकल ट्रॉकिंग सिस्टीम

 

 

पीओपी मूर्तींवरील प्रक्रियेतून तयार होणार ‘सायकल ट्रॅक’

नीरीच्या पुढाकारातून प्रकल्पाचा शुभारंभ : खताचीही निर्मिती होणार
 
नागपूर,ता. ६ : जनजागृतीनंतरही होणाऱ्या पीओपी मूर्तींवर आता नीरीने तोडगा काढला आहे. मूर्ती विसर्जन करण्यात येणाऱ्या पाण्यात रसायने मिळवून त्यातून तयार होणाऱ्या लगद्यापासून सायकल ट्रॅक तयार करण्याची संकल्पना ‘नीरी’ने मांडली आहे. या संकल्पनेचा शुभारंभ बुधवारी (ता. ६) सक्करदरा विसर्जन स्थळावर करण्यात आला.
 
यावेळी नीरीचे वैज्ञानिक डॉ. कृष्णा खैरनागर, नगरसेवक पिंटू झलके, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, नेहरूनगर झोनचे सहायक आयुक्त राजेश कराडे, हनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे, लकडगंजचे सहायक आयुक्त सुभाष जयदेव, धरमपेठचे झोनल अधिकारी टेंबेकर, उपअभियंता सचिन रक्षमवार उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सक्करदरा तलाव परिसरात मनपातर्फे तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावातील पाण्यात अमोनियम बायकार्बोनेट मिसळवून या प्रकल्पाचा शुभारंभ केला.
 
अशी राहील प्रक्रिया
 
पाण्यामध्ये अमोनियम बायकार्बोनेट मिसळल्यानंतर त्यात पीओपी मूर्ती पूर्णत: विरघळते. त्यातून कॅल्शियम कार्बोनेट आणि अमोनियम सल्फेट असे दोन रसायने तयार होतात. कॅल्शियम कार्बोनेटचा उपयोग बांधकामात होतो तर अमोनियम सल्फेटचा उपयोग खत म्हणून करता येतो.
 
नीरी परिसरात होणार ‘सायकल ट्रॅक’
 
कॅल्शियम कार्बोनेटचा वापर करून नीरी परिसरात सायकल ट्रॅक तयार करण्यात येणार आहे. नीरीच्या मुख्य द्वारापासून वसंतनगरमार्गे दीक्षाभूमीपर्यंत हा सायकल ट्रॅक राहील. तर अमोनियम सल्फेटचा उपयोग खत म्हणून नीरी परिसरात असलेल्या झाडांसाठी करण्यात येणार आहे. नीरीचे संचालक डॉ. राकेशकुमार यांच्या मार्गदर्शनात हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

 

 

नेटीझन्सने केले मनपाच्या ‘मोरया’ ॲपचे स्वागत

नागपूर,ता. ६ : इको फ्रेंडली गणेशोत्सवांतर्गत जलप्रदूषण टाळण्यासाठी मनपाने शहरात सुमारे १९७ ठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती. भक्तांना हे तलाव शोधणे सोयीचे व्हावे यासाठी मेघे ग्रुप ऑफ इंस्टिट्युशनस्‌ अंतर्गत असलेल्या नगर विकास संस्थेच्या सहकार्याने नागपूर महानगरपालिकेने तयार केलेल्या ‘मोरया’ ह्या ॲन्ड्रॉईड ॲपला नेटीझन्सनी पसंती दर्शवित त्याचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे.
 
नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत फेसबुक पेजवर नागपूरकरांसाठी संबंधित ॲपसंदर्भात विस्तृत माहिती देण्यात आली होती. ह्या ॲपचा वर्तमानपत्राच्या माध्यमातूनही प्रचार-प्रसार करण्यात आला होता. हजारो नागपूरकरांनी ॲप डाऊनलोड करून विसर्जन स्थळांची माहिती घेतली आणि इतरांनाही ती पुरविली.
 
‘मोरया’ ॲपवर आणि मनपाच्या अधिकृत फेसबुक पेजवर नागरिकांनी प्रतिक्रिया देत ॲपच्या उपयुक्ततेची मुक्तकंठाने प्रशंसा केली. या ॲपच्या माध्यमातून मनपाने लोकांना ‘कनेक्ट’ केल्याची प्रतिक्रिया अक्षता भोसले हिने व्यक्त केली. भक्तांना मदत करणाऱ्या या ॲपच्या निर्मितीबद्दल हरिश गाडबैल, शिवानी पारस्कर यांनी नागपूर महानगरपालिकेचे आभार मानले आहे. ऐश्वर्या इंगले, क्षितीज माटे, प्रांजळ तळवेकर, मयूरेश नामपल्लीवार आदींनी ‘मोरया’ ॲपची स्तुती करत नागपूरकरांचे आणि ॲप निर्मिती करणाऱ्यांचे आभार मानले आहे.
 
महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते ‘मोरया’ ॲपचे लोकार्पण करण्यात आले होते. मेघे ग्रुप ऑफ इंस्टिट्युशनस्‌ अंतर्गत असलेल्या नगर विकास संस्थेच्या आतूर नामपल्लीवार, कृणाल नामपल्लीवार,सागर भगत या विद्यार्थ्यांनी संस्थेचे सीईओ डॉ, शेखर भोले, सहायक प्रा. रोहित हिमते यांच्या मार्गदर्शनात तयार केले आहे.
 

 

अतिरिक्त आयुक्त कुंभारे यांनी घेतली पीसीपीएनडीटीची आढावा बैठक
 
नागपूर,ता.५. नागपूर महानगरपालिकेच्या गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्रे (लिंग ‍निवड प्रतिबंध) अधिनियम (पीसीपीएनडीटी) दक्षता समितीची आढावा बैठक समितीचे सह अध्यक्ष व  अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी शुक्रवार (ता.१) ला मनपा मुख्यालयातील  छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील सभागृहात घेतली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल चिव्हाने, नोडल अधिकारी डॉ.भावना सोनकुसळे, आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार, आयएमए नागपूर विभागाच्या अध्यक्षा डॉ.वैशाली खंडाईत, सदस्य डॉ.चैतन्य शेंबेकर, पीसीपीएनडीटीच्या सदस्या डॉ.वर्षा ढवळे, ॲड.सुरेखा बोरकूटे, वैशाली वाघमारे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
बैठकीत नोडल अधिकारी डॉ.भावना सोनकुसळे यांनी मागील बैठकीचे इतिवृत्त वाचून दाखवले. नागपूर शहरातील सोनोग्राफी मशीन्स बाबत माहिती दिली. शहरात ५४० फक्शन्ल मशीन्स, १५ नॉन फक्शन्ल मशीन्स, आणि बंद स्वरूपातील अश्या २३ मशीन्स कार्यान्वित आहे. मशीन्सची नोंदणी करणे अत्यावश्क आहे. बंद स्वरूपातील मशीन्स पुन्हा कश्या सुरू करता येईल या दृष्टीने प्रयत्न व्हयला हवा अश्या सूचना अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी दिल्या.
राधाकृष्ण हॉस्पीटलने सोनोग्राफी मशीन्स कार्यान्वित केली. त्याची नोंदणी करणे कायद्याने आवश्यक आहे. ती नोंदणी अद्यापही झाली नसल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ.भावना सोनकुसळे यांनी दिली.नोटीस दिल्यानंतरही दबाब आणण्याचा प्रयत्न राधाकृष्ण हस्पीटल द्वारे होत असल्याची माहिती त्यांनी दिली. नियमानूसारच कारवाई करण्यात यावी. त्याची चौकशी करून तातडीने निर्णय घेण्याचे आदेश रवींद्र कुंभारे यांनी दिले. 

 

 

कुष्ठ रुग्ण शोध मोहिम कार्यक्रमाला महापौरांनी दाखविली हिरवी झेंडी-    घरोघरी पोहोचणार आशा व स्वयंसेवक
 
नागपूर, ता. 5 सप्टेंबरः नागरिकांना कुष्ठरोग व त्यामुळे येणा-या विकलांगतेपासून दूर ठेवून याबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री प्रगती योजनेअंतर्गत नागपूर महानगरपालिका व राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाअंतर्गत कुष्ठ रुग्ण शोध मोहिमेला सुरुवात झाली आहे. 5 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान राबविण्यात येणा-या मोहीमेला महापौर नंदा जिचकार यांनी हिरवी झेंडी दाखविली. प्रामुख्याने अपर आयुक्त रविंद्र कुंभारे, आरोग्य सेवा उपसंचालक (नागपूर विभाग) डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. हेमंत निंबाळकर, मनपा आरोग्य अधिकारी अनिल चिव्हाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, वैद्यकिय अधिकारी (कुष्ठरोग विभाग) डॉ. संजय मानेकर, डॉ. अनुपमा रेवाळे, डॉ. अनंत हजारे, डॉ. भोजराज मडके, डॉ. हेमलता वर्मा, डॉ. फातेमा शाफिया उपस्थित होते.
   
या कार्यक्रमाअंतर्गत एक प्रशिक्षक पुरुष व एक महिला असे दोन जणांचे 424 चमू स्लम भागातील घरोघरी जाऊन 60 टक्के शारिरीक तपासणी करणार आहे. यामध्ये एखाद्या नागरिकाच्या शरिरावर कुष्ठरोगाचे लक्षण आढळ्यास त्याला रेफर स्लीप देऊन रुग्णालयाला पाठविण्यात येईल. या संशयित रुग्णाची स्क्रीनींग रुग्णालयात करण्यात येईल. यामध्ये कुष्ठरोग आढल्यास रुग्णाला निशुल्क औषध आणि उपचार सेवा मिळेल. या 424 चमूवर मनपाच्या 110 एएनएम नेतृत्व करणार आहे. कुष्ठरोगमुक्त समाज साकारण्याच्या उद्देशाने दरवर्षी हा कार्यक्रम राबविण्यात येतो. दरवर्षी सुमारे 250 नवीन रुग्ण शोधण्यात येतात. कुष्ठरोगाचे लक्षण आढल्यास प्राथमिक टप्प्यात यावर उपचार करणे सहज शक्य आहे. शिवाय सुरुवातीला असंसर्ग असलेला हा प्रकार वेळीच उपचार मिळाले नसल्यास संसर्गजन्य होतो, नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी. लक्षण आढळ्यास थेट शासकीय रुग्णालयात तपासणी करुन घ्यावी तसेच तपासणीसाठी घरोघरी येणा-या चमूला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी केले.
 
लक्षणे दिसल्यास तपासणी करा
 
-    कुष्ठरोग अनुवंशिक नाही
 
-    शरीरावर फिक्कट किंवा लालसर डाग / चट्टा तसेच त्या डागावर संवेदना नाही, असा डाग /चट्टा कुष्ठरोग असु शकतो.
 
-    चेतातंतु जाड / दुख-या व त्यांनी पुरवठा केलेल्या भागात संवेदना नाही, अशी लक्षणे असल्यास कुष्ठरोग असु शकतो.
 
-    तेलकट, जाडसर, लालसर व सुजलेली त्वचा, कुष्ठरोग असु शकतो
 
-    मोहीम कालावधीत संदर्भित केलेल्या व्यक्तींनी जवळच्या शासकीय / निमशासकीय दवाखान्यात जावुन तपासणी करावी.

     

 

 

राधाकृष्णन्‌ सारखा आदर्श अंगी बाळगा - महापौर नंदा जिचकार

मनपाच्या तीन शिक्षकांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’
 
उल्लेखनीय कामगिरीबद्दल १२ शिक्षकांचा गौरव
 
नागपूर,ता.५ : शिक्षकांनी सर्वपल्ली राधाकृष्णन्‌ यांचा आदर्श आचरणात आणावा. त्यांच्यासारखे आपले चरित्र असावे याचा प्रयत्न करावा. आपल्या आचरणातूनच विद्यार्थ्यांवर संस्कार घडतात व विद्यार्थी घडत असतो, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
 
महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे शिक्षक दिन समारंभ मंगळवारी (ता.५) विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक सभागृहात पार पाडला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर शिक्षक परिषदेचे आमदार नागो गाणार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले, धरमपेठ झोन सभापती रूपा राय, मनपातील भाजपच्या प्रतोद दिव्या धुरडे, शिक्षण समिती सदस्य राजेंद्र सोनकुसरे, उज्ज्वला बनकर, प्रमिला मंथरानी,  , नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेश गवरे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
पुढे बोलताना महापौर म्हणाल्या, महानगरपालिकेच्या विद्यार्थांना घडविण्यात मनपाच्या शिक्षकांचे योगदान शंभर टक्के आहे. त्याबद्दल मी त्यांचे प्रथम कौतुक करते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडविताना शालेय शिक्षणाबरोबरच त्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. आज मनपाच्या शाळांची अवस्था बिकट आहे. त्याचा दर्जा सुधारण्यात शिक्षकांची भूमिका ही महत्त्वाची आहे. महानगरपालिकेचे नाव कसे उंचावेल यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजे. मनपाच्या शाळांचे नाव देशातील पहिल्या १० शाळांमध्ये यावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न आहे. ते स्वप्न नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न मनपाचे शिक्षक करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
शिक्षक परिषदेचे आमदार नागो गाणार म्हणाले, मी मनपाच्या शाळेमुळेच घडलो. माझी ओळख निर्माण करून देण्यात मनपाच्या शाळेचे योगदान मोलाचे आहे. शिक्षण विभागाच्या झालेल्या दुर्देशेवर नुसतीच चर्चा न करता त्याला कसे सुधारता येईल यासाठी प्रयत्न करा, असा सल्ला त्यांनी यावेळी बोलताना दिला. सध्या खासगी शाळेचे वाढते प्रस्थ हे आपल्यासमोरील आव्हान आहे. त्या आव्हांनाना पेलत शिक्षकांनी आपले कर्तव्य पार पाडत आपल्यावरची जबाबदारी निष्ठेने पार पाडावी. असे केल्यास मनपाच्या शाळांचे स्थान नक्कीच उंचावेल असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांनी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने घेतलेले कष्ट हे खरंच दखल घेण्याजोगे आहे. मनपाच्या शाळांचे नाव उंचावण्याचे सामर्थ्य त्यांच्यात असल्याचे सांगितले.
 
शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्रसंगी मनपाच्या संजयनगर हिंदी माध्यामिक शाळेचे सुधाकर आमधरे, मनिषा मोगलेवार, अशोक चौधरी यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल १२ शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. सन् २०१६-२०१७ या शैक्षणिक सत्रात सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. ३१ जुलै २०१७ ला राजू डोनारकर यांच्याकडे आग लागली होती. तेव्हा दुर्गा नगर माध्यामिक शाळेचा विद्यार्थी अविनाश शेंडे याने धाडस दाखवून त्या घरातील इलेक्ट्रीक स्वीच व सिलेंडरचे कॉक बंद केले. आत अडकलेल्या ३ महिलांना सुखरूप बाहेर काढले. या त्याच्या धाडसाबद्दल त्याचा सत्कार महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आला.
 
प्रारंभी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे सुरवात झाली. मान्यवरांचे स्वागत शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, सहायक शिक्षणाधिकारी कुसूम चापलेकर, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, सौ. देशकर यांनी केले. यावेळी मनापातील शाळेच्या विद्यार्थांनी गणपती अथर्वशीर्ष व स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाचे संचालन मधु आव्हाड यांनी केले. आभार क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
     

 

गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव सज्ज

महापौर, आयुक्तांनी केली विसर्जन स्थळांची पाहणी : श्रीमंत भोसल्यांचा परंपरागत मानाचा गणपती कृत्रिम तलावात विसर्जित
 
नागपूर,ता.४ : गणेश विसर्जनासाठीची तयारी पूर्ण झाली असून महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे.  गणेश विसर्जनासाठी सज्ज असलेल्या शहरातील कृत्रिम तलाव आणि विसर्जन कुंडाची पाहणी आणि विसर्जन तयारीचा आढावा घेण्यासाठी महापौर नंदा जिचकार, दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, आयुक्त अश्विन मुदगल यांनी सोमवारी (ता. ४) दौरा केला.
 
याप्रसंगी त्यांच्यासमवेत मनपातील भाजपच्या प्रतोद दिव्या धुरडे, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले, उपसभापती प्रमोद कौरती, धंतोली झोन सभापती प्रमोद चिखले, नगरसेविका हर्षदा साबळे, नगरसेवक सुनील हिरणवार, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, कार्यकारी अभियंता अनिरूद्ध चौंगजकर प्रामुख्याने उपस्थित होते.
 
महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, आयुक्त अश्विन मुदगल यांनी सक्करदरा तलावाची पाहणी केली.यावेळी दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे, झोन सहायक आयुक्त राजेश कराडे, हनुमाननगर झोन सहायक आयुक्त राजू भिवगडे उपस्थित होते. सक्करदरा तलावात एकही गणपती विसर्जित होणार नाही याची काळजी घ्यावी.कृत्रिम तलाव भरल्यानंतर त्यातील गाळ लगेच काढण्यात यावा, असे आदेश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.सक्करदरा तलावाच्या परिसरात २० कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. नेहरूनगर झोनमध्ये ६० कृत्रिम तलावांची व्यवस्था केली असल्याची माहिती झोन सहायक आयुक्त राजेश कराडे यांनी दिली. ठिकठिकाणी सूचना फलक लावण्यात यावे, तसेच विद्युत व्यवस्थाही सज्ज करण्यात यावी, असे आदेश आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिले. सक्करदरा, गांधीबाग तलावाच्या संपूर्ण बाजुनी टिनाचे अस्थायी कुंपन लावण्यात आले आहे. जेणेकरून तलावात कोणतेही गणपती विसर्जित होणार नाही. तलावाचे पाणी दुषित होणार नाही व पर्यावरणाचे रक्षण होईल याची दक्षता घेण्यात येत आहे.
गांधीसागर तलावाची पाहणी करताना धंतोली झोन सभापती प्रमोद चिखले, धंतोली झोन सहायक आयुक्त गणेश राठोड माजी नगरसेवक मनोज साबळे उपस्थित होते. येथील कृत्रिम स्थायी तलावाचे मान्यवरांनी कौतुक केले. नागपूरचे श्रीमंत राजे भोसले यांचा परंपरागत असलेला मानाचा गणपती गांधीसागर येथील कृत्रिम तलावातच विसर्जित करण्यात आला.
 
यानंतर उपमहापौर दीपराज पार्डीकर व आयुक्त अश्विन मुदगल यांनी फुटाळा तलावाची पाहणी केली. यावेळी धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे उपस्थित होते. फुटाळा तलावातील विसर्जनाचा भाग स्वच्छ करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून ते विसर्जनापूर्वी पूर्ण होईल, अशी माहिती सहायक आयुक्त मोरोणे यांनी दिली. फुटाळा तलावात एकही लहान मूर्ती विसर्जित होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात यावी. जे जबरदस्तीने विसर्जन करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी द्या, असे आदेश आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिले. यावेळी ग्रीन व्हिजीलचे कौस्तव चॅटर्जी, सुरभी जयस्वाल उपस्थित होते. अंबाझरी तलावाची पाहणी करताना तेथील यानंतर मान्यवरांनी सोनेगाव तलावाची पाहणी करून गणेश विसर्जन व्यवस्थेचा आढावा घेतला.
 
गणेश विसर्जनासाठी नागपूर महानगर पालिकेने नागपूर शहरात ठिकठिकाणी १९७ कृत्रिम तलाव उभारले आहे.विसर्जन तलावाजवळ कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्वयंसेवी संस्थाचे स्वयंसेवक सज्ज केले आहे. विदर्भ सर्पमित्र मंडळ व रिव्हॉन या संस्थेचे ४० जलतरणपटू फुटाळा तलाव व गांधीसागर तलाव येथे कार्यरत आहेत. याशिवाय नागपूर महानगर पालिकेच्या स्वच्छता विभागाचे एक हजार कर्मचारी व अग्निशमन विभागाचे २०० कर्मचारी अहोरात्र काम करणार आहेत. विसर्जन स्थळी रूग्णवाहिका व डॉक्टरची व्यवस्थाही राहणार आहे. ठिकठिकाणी निर्माल्येकुंड व मोबाईल विसर्जन व्हॅनही ठेवण्याचे आदेश आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांनी दिले आहे. अंबाझरी तलावाची पाहणी केल्यानंतर मान्यवरांनी स्वामी विवेकानंद स्मारकाला भेट दिली. तेथील स्वच्छेतेचा व सुरक्षेचा आढावा घेतला.

 

 

मनपाच्या शाळा सुधारण्यात शिक्षकांची भूमिका मोलाची -महापौर नंदा जिचकार

नागपूर महानगरपालिका शिक्षक संघाचे अनेक मागण्यांचे निवेदन
 
नागपूर,ता.१. नागपूर महानगर पालिकेच्या शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी मनपा शिक्षकांची मोलाची भूमिका आहे.त्यासाठी त्यांना लागणारी सर्व प्रकारची मदत करण्यासाठी प्रशासन तयार आहे. त्यांनी आपले काम जबाबदारीने पार पाडावे असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले आहे.नागपूर महानगर पालिका शिक्षक संघाच्यावतीने विद्यार्थी,पालकांच्या, शिक्षकांच्या हिताच्या मागण्या देण्यासाठी शिक्षक संघाच्या प्रतिनिधीसोबत बैठकीप्रसंगी ते बोलत होते.
 
याप्रसंगी नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार माजी महापौर अनिल सोले, शिक्षक मतदार संघाचे आमदार नागो गाणार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, मनपातील भाजपच्या प्रतोद दिव्या धुरडे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, सहायक शिक्षणाधिकारी कुसूम चाफलेकर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मदन गाडगे, मनपा शिक्षक संघाचे अध्यक्ष राजेश गवरे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
पुढे बोलताना महापौर म्हणाल्या, सेवा निवृत्त शिक्षकांची थकबाकी रक्कम लवकरात लवकर देण्यात यावी असे आदेश त्यांनी संबंधित अधिका-यांना दिले. प्रत्येक शालांत विभागाची ज्येष्ठता यादी ही स्वतंत्रपणे करावी ही यादी सुधारीत करून शिक्षणाधिका-यांनी तपासून ती प्रकाशित करावी असे आदेशही महापौर नंदा जिचकार यांनी दिले. शासनाच्या योजना राबविण्याचा प्रयत्न करा, अशा सूचना त्यांनी अधिका-यांना दिल्या. शिक्षकांच्या सहकार्यानेच मनपाच्या शाळांना चांगले दिवस दिसतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शाळा निरीक्षकांना दिलेल्या जबाबदारी त्यांच्याकडून करून घ्यावा, व त्यांना अतिरिक्त कामे देऊ नये असे आदेश त्यांनी दिले. बंद झालेल्या बालवाडी नव्याने सुरू करण्यात याव्या असेही त्या बोलताना म्हणाल्या.
 
मनपामध्ये २४ वर्ष सेवा करणा-या प्राथमिक व माध्यामिक शिक्षकांना निवड श्रेणी लागु करण्याबाबत मागणी शिक्षक संघाच्यावतीने करण्यात आली. त्यावर बोलताना महापौर म्हणाल्या, शासनाच्या निर्णयानूसार १ जुन १९८६ नंतर पदभरती झालेल्या शिक्षकांना त्याच्या पदानूसार, शिक्षणानूसार निवड श्रेणी लागु करण्यात यावी, यात कला व शारीरिक शिक्षकांचा सहभाग असायला हवा, असे आदेश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. शिक्षण विभागाच्या पदभरती व पदोन्नतीच्या मागणीवर बोलताना अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी शासनाचा आकृतीबंध तयार झाला आहे.त्यानूसारच पदभरती व पदोन्नती करू असे आश्वासन त्यांनी दिले. बैठकीला शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच शिक्षक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

५ ते २० सप्टेंबर दरम्यान मनपाची कुष्ठरोग शोध मोहीम

नागपूर, ता.१ : महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे ५ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान कुष्ठरोग शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या कुष्ठरोग शोध मोहीम समन्वय समितीची आढावा बैठक शुक्रवार (ता.१) रोजी मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतील सभागृहात पार पडली.
 
बैठकीला अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, नोडल अधिकारी डॉ.भावना सोनकुसळे, आरोग्य सेवा कुष्ठरोग नागपूर विभागाच्या सहायक संचालक डॉ.माध्यमा चहांदे, नागपूर कुष्ठरोग पथकाच्या पर्यवेक्षक डॉ. संजय मानेकर, डॉ.मडके, डॉ. अनुपमा रेवाळे, डॉ.ख्वाजा, डॉ. विजय जोशी उपस्थित होते.
 
पंतप्रधान प्रगती योजनेअंतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे दिनांक ५ ते २० सप्टेंबर या कालावधीत आशा व स्वयंसेवकांची चमू मनपा व नागपूर कार्यक्षेत्रातील स्लम भागात प्रत्यक्ष घरोघरी जाऊन तपासणी करून सर्वेक्षण करणार आहे. या मोहिमेचे संनियंत्रण व पर्यवेक्षण आरोग्य विभाग मनपा व पर्यवेक्षीय नागरी कुष्ठरोग पथक करणार असल्याची माहिती सहायक संचलाक माध्यमा चहांदे यांनी दिली. या मोहिमेचे सूक्ष्म नियोजन व अंमलबजावणी प्रभावीपणे राबविण्यात येण्यासाठी बैठकीत चर्चा करण्यात आली.
 
नागपूर शहरातील स्लमची लोकसंख्या ७ लाख ५८ हजार इतकी असून आशा व स्वयंसेवक यांची चमु रोज २५ घरी जाऊन प्रत्येक नागरिकांची तपासणी करणार आहे. तपासणीमध्ये जर कोणी रूग्ण आढळला तर त्याच्यावर त्वरित उपाययोजना मनपा व शासनाद्वारे करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
 
यासंदर्भाती डॉक्टर्सना, आशा व स्वयंसेवकांना दिले जाणारे प्रशिक्षण वर्ग पूर्ण झाले आहेत. कुठलीही मदत लागली तर मनपा प्रशासन सज्ज आहे. मोहिमेत कोणतीही अडचण येणार नाही याची विशेष काळजी घ्यावी व मोहीम कशी यशस्वी होईल, याकडे लक्ष देण्यात यावे, असे आदेश अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी दिले.

 

 

महिला व बालकल्याण समितीतर्फे विदर्भस्तरीय महिला उद्योजिका मेळावा

नागपूर, ता. ३१ : नागपुरातील महिलांसोबतच विदर्भातील महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने नागपूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने विदर्भस्तरीय महिला उद्योजिका मेळाव्याचे आयोजन जानेवारी २०१८ मध्ये करण्यात येणार आहे. यासाठी महिला व बालकल्याण समितीतर्फे आयोजनाच्या सहकार्यासाठी आणि निधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने शासनाला पत्र देण्यात येणार असल्याचा निर्णय महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत आज (ता. ३१ ऑगस्ट) रोजी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
अध्यक्षस्थानी महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे होत्या. यावेळी प्रामुख्याने उपसभापती श्रद्धा पाठक, तारा (लक्ष्मी) यादव, दिव्या धुरडे, परिणिता फुके, वंदना भगत, साक्षी राऊत, वैशाली नारनवरे यांच्यासह समाजकल्याण विभागातील अधिका-यांची उपस्थिती होती.
 
शहराच्या ह्दयस्थळी महिला उद्योजिका मेळाव्याचे आयोजन करण्याचा समितीचा मानस असून यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मेळाव्यात महिलांसाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आदींचे आयोजन करण्यात येणार आहे. नियोजनबद्ध पद्धतीने आयोजन व्हावे यासाठी आवश्यक पूर्व तयारीबद्दलचा आढावा बैठकीत घेण्यात आला.

 

 

सेवानिवृत्तीनिमित्त मनपातील २२ कर्मचाऱ्यांचा सत्कार

नागपूर,ता. ३१ : नागपूर महानगरपालिकेत विविध विभागात कार्यरत २२ कर्मचारी गुरुवारी (३१ ऑगस्ट) सेवानिवृत्त झाले. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात आयोजित कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला.
 
यावेळी निगम अधीक्षक राजन काळे, मनपा कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष राजेश हाथीबेड, सहायक अधीक्षक दत्तात्रय डहाके, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर उपस्थित होते. निगम अधीक्षक राजेश काळे यांनी यावेळी सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आणि मनपाला दिलेल्या नि:स्वार्थ सेवेबद्दल आभार मानले. सेवानिवृत्तीच्या वेळी त्यांना त्यांचे धनादेश देण्याची मनपाने सुरू केलेल्या परंपरेचा त्यांनी गौरवोल्लेख केला. मनपा कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष राजेश हाथीबेड यांनीही यावेळी अधिकारी, कर्मचाऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व २२ कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ, तुळशी रोपटे, स्मृतिचिन्ह आणि धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. निवृत्त झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये राजस्व निरीक्षक एस.पी. पोहरे, कर संग्राहक एन. एम. बाभूळकर, मुख्याध्यापक श्रीमती सुनंदा गहलोद यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले.

 

 

गांधीसागर तलाव येथे स्थायी कृत्रिम विसर्जन कुंडाचे लोकार्पण

पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने मनपाचे पाऊल
 
नागपूर, ता. ३१ ऑगस्ट : स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त शहर साकारण्यासाठी तसेच पर्यावरणाच्या संरक्षणासाठी मनपातर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे. याअंतर्गत मूर्ती विसर्जनासाठी गांधीसागर तलाव येथे स्थायी कृत्रिम कुंडाची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचे लोकार्पण आज (ता. ३१ऑगस्ट) गांधीसागर तलाव येथे महापौर नंदा जिचकार यांच्याहस्ते व आमदार विकास कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी सत्तापक्षनेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके, ज्येष्ठ नगरसेवक व माजी सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, धंतोली झोनचे सभापती प्रमोद चिखले, माजी स्थायी समिती अध्यक्ष बंडू राऊत,नगरसेविका उज्ज्वला शर्मा, विजय चुटेले, लता काटगाये, हर्षला साबळे, धंतोली झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, नद्या व सरोवरे विभाग उपअभियंता मो. इजराईल उपस्थित होते.
 
दरवर्षी मूर्तीविसर्जनासाठी सर्वाधिक भाविक गांधीसागर तलाव येथे येत असल्याने येथे स्थायी स्वरुपात टॅंकची निर्मिती कऱण्यात आली आहे. पुजेचे साहित्य आणि निर्माल्य गोळा कऱण्यासाठी देखिल याठिकाणी निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहे. यासोबतच कृत्रिम तलाव देखिल गांधीसागर तलावाच्या शेजारी उभारण्यात आले आहे. भाविकांनी स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त शहर साकारण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापौरांनी केले.

 

 

गणेश विसर्जनसाठी मनपा प्रशासन सज्ज ॲण्डरॉईड ॲप ‘मोरया’ द्वारे शोधा जवळचे विसर्जन केंद्र

नागपूर,ता. ३१ : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला नागपूरकरांचा मिळत असलेला उदंड प्रतिसाद बघता यंदा मनपा प्रशासनाने कृत्रिम तलावांच्या संख्येत वाढ केली आहे. ५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या दृष्टीने महानगरपालिका प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले आहे. विशेष म्हणजे यंदाच्या गणेश विसर्जनासाठी मनपासुद्धा ‘हायटेक’ झाली असून नागरिकांना जवळचे विसर्जन कुंड शोधण्यासाठी ‘मोरया’ नावाचे ॲन्रॉईड ॲप तयार केले असून गुरुवार ३१ ऑगस्टपासून ते नागरिकांच्या सेवेत दाखल करण्यात आले आहे,
   
गेल्या काही वर्षांपासून नागपूर महानगरपालिका प्रशासन स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेत आहे. यावर्षी नागपूरकर या संकल्पनेला उदंड प्रतिसाद देत आहेत. कुठल्याही नैसर्गिक तलावात गणेश विसर्जन करू नये, असे आवाहन महानगरपालिकेतर्फे यापूर्वीच करण्यात आले आहे. सोनेगाव तलाव आणि सक्करदरा तलावांमध्ये गणेश विसर्जन करण्यास पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे.
नागपूर महानगरपालिकेने शहरातील दहाही झोनमध्ये जागोजागी कृत्रिम तलाव आणि विसर्जन कुंडांची व्यवस्था केली आहे. मागील वर्षी शहरात १५० विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली होती. ही संख्या वाढून यावर्षी १८४ करण्यात आली आहे. १४ ठिकाणी अजून मागणी असून त्याची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.
 
गणेश विसर्जनासाठी दहा झोनअंतर्गत ठेवण्यात आलेल्या विसर्जन कुंडांमध्ये ६० कुंड सेंट्रींगचे आहेत. ८३ आणि वाढीव १४ असे ९७ कुंड रबरचे आहेत. जमिनीत खड्डे तयार करून ३६ विसर्जन कुंड तयार करण्यात आले आहेत तर पाच विसर्जन कुंड स्थायी स्वरूपाचे तयार करण्यात आले आहेत. लक्ष्मी नगर झोन अंतर्गत सोनेगाव तलाव आणि अजनीचौक येथे प्रत्येकी एक, हनुमाननगर झोन अंतर्गत बिंझाणी महाविद्यालयाच्या मैदानात एक, गांधीसागर तलाव येथे एक तसेच मंगळवारी झोन अंतर्गत पोलिस लाईन टाकळी येथे एक अशी 5 स्थायी स्वरूपाची विसर्जन कुंड आहेत.
 
ॲण्डरॉईड ॲप ‘मोरया’
 
ही सर्व विसर्जन कुंडे कुठे आहेत, आपल्या घराजवळ कुठले विसर्जन कुंड आहेत, त्याचे लोकेशन काय आहे याची इत्यंभूत माहिती देणारे ‘मोरया’ नामक ॲन्रॉईड ॲप नागपूर महानगर पालिकेने नागपूरकरांच्या सेवेत गुरुवार ३१ ऑगस्टपासून सादर केले. महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते या ॲपचे लोकार्पण करण्यात आले. मेघे ग्रुप ऑफ इंस्टिट्युशनस्‌ अंतर्गत असलेल्या नगर विकास संस्थेच्या आतूर नामपल्लीवार, कृणाल नामपल्लीवार, सागर भगत या विद्यार्थ्यांनी संस्थेचे सीईओ डॉ, शेखर भोले, सहायक प्रा. रोहित हिमते यांच्या मार्गदर्शनात तयार केले आहे.
 
१४ हजारांवर मूर्तींचे विसर्जन
 
मनपाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक मोहिमेला पसंती देत आतापर्यंत १४ हजार ५०० वर लहान-मोठ्या मूर्तींचे विसर्जन नागपूरकरांनी कृत्रिम विसर्जन कुंडात केले आहे. यामध्ये विसर्जनासाठी 4 फिरत्या वाहनांची व्यवस्था धरमपेठ झोन अंतर्गत करण्यात आली आहे.
स्वयंसेवी संस्थांचा पुढाकार
 
विसर्जन स्थळी शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक नागपूर महानगरपालिकेसोबत नागरिकांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. प्रत्येक विसर्जन स्थळी सदर स्वयंसेवक नागरिकांना कृत्रिम विसर्जन कुंडात मूर्ती विसर्जन करण्यासाठी मार्गदर्शन करीत आहेत. निर्माल्य कुंडातच निर्माल्य टाकण्यासाठी नागरिकांना विनंती करीत आहेत. रात्रंदिवस हे शेकडो स्वयंसेवक विसर्जन काळात विसर्जन स्थळांवर हजर असतील. तसेच गणेशोत्सवानिमित्त गणेश मंडळात व विसर्जन स्थळी स्वच्छ भारत अभियान जनजागृती आणि डेंग्यु व किटकजन्य आजारांबद्दल जनजागृती करण्यात करण्यात आली.
 
निर्माल्य कलशातच निर्माल्य टाकावे
 
गणेशमूर्तींचे विसर्जन झाल्यानंतर निर्माल्य विसर्जन स्थळी ठेवण्यात आलेल्या निर्माल्य कुंडातच टाकण्याचे आवाहन नागपूर महानगर पालिकेतर्फे करण्यात आले आहे. तसेच चार फिरत्या निर्माल्य संकलन रथाद्वारे शहरातील मोठ्या गणेश मंड़ळातील निर्माल्य गोळा करण्यात येत आहे.

 

 

नागरिकांची गैरसोय होँणार नाही याची दखल  घ्या – कार्यकारी महापौर दीपराज पार्डी कर ओसीडब्लुच्या अधिका-यांना दिले निर्देश

पाईपलाईनचा व्हॉल्व फुटल्याने पाणीपुरवठा खंडीत, नागरिकांची तारांबळ
 
नागपूर,ता.28.  नागरिकांना कुठलाही प्रकारचा त्रास होणार नाही याची दखल घ्यावी, भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी प्रशासनाने दक्षता बाळगावी असे आदेश कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिले.
 
कन्हान येथून येणा-या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचा व्हॉल्व फुटल्याने उत्तर नागपूर व मध्य नागपूरच्या नागरिकांचा पाणी पुरवठा खंडीत झाला. नागरिकांची ऐन गणेशोत्सवादरम्यान झालेली गैरसोय बघता कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी ऑटोमोटिव्ह चौकात घटनास्थळी भेट दिली. व नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासमवेत नगरसेविका यशश्री नंदनवार, शकुंतला पारवे, नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार, राजु चांदेकर आदी उपस्थित होते.
    
ऑटोमोटिव्ह चौकातील पाईपलाईन ही जुनी झाल्याने ती दुरूस्ती करण्याचे काम सुरू होते. परंतु त्या दुरूस्ती दरम्यानच  मुख्य पाईपलाईनला धक्का लागल्याने पाईपलाईनचा व्हॉल्व फुटला, त्यामुळे उत्तर नागपूर मधील व मध्य नागपूरचा काही भागात पाणी पुरवठा खंडीत झाला.  16 तास उलटूनही पाणी पुरवठा सुरू न झाल्याने कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी संताप व्यक्त केला व अधिका-यांना खडेबोल सुनावले. ओसीडब्लुचा करार रद्द करावा अशी मागणीही त्यांनी यावेळी बोलताना केली.  या सर्वाला प्रशासनाला जवाबदार घोषीत धरले आहे. यापुढे अशी कुठलीच प्रकारची घटना घटनार नाही याची विशेष खबरदारी घ्या, असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.

 

 

नदीचे प्रवाह अडवून बांध तयार करा : दीपराज पार्डीकर

आयुक्तांसह केली कन्हान जलशुद्घीकरण केंद्राची पाहणी
 
नागपूर,ता.२४ : कन्हान नदीचा प्रवाह अडवून बांध तयार करा म्हणजे पाण्याचा संचय होईल, असे निर्देश कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिले. गुरूवारी (ता.२४) मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांच्यासह कन्हान येथील जलशुद्धीकरण केंद्राची त्यांनी पाहणी केली.
 
याप्रसंगी त्यांच्यासमवेत परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले, जलप्रदाय समिती सभापती राजेश घोडपागे, हनुमाननगर झोन सभापती भगवान मेंढे, नगरसेवक पिंटु झलके, मनोज सांगोळे, कार्यकारी अभियंता संजय गायकवाड उपस्थित होते.
यावेळी कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर व आयुक्त अश्विन मुदगल यांनी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करत तेथील कामकाजाचा आढावा घेतला. 
 
नदीच्या प्रवाहात बांध तयार करण्यात यावे. जेणेकरून पाण्याचा संचय होईल व भविष्यातील पाणी टंचाई थांबविण्यासाठी त्याचा उपयोग होईल. नदीच्या आसपास असलेल्या दगडाने बांध तयार करा. तात्पुरती सोय होईल, अशी व्यवस्था तयार करा असे निर्देश कार्यकारी महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
कन्हान जलशुद्धीकरण केंद्रात सद्यस्थितीत २०८ एमएलडी पाण्याचे शुद्धीकरण करणे सुरू असून या जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता एकूण २४० एमएलडी इतकी आहे. उन्हाळ्यात पाण्याची क्षमता २२० एमएलडी इतकी असते, अशी माहिती कार्यकारी अभियंता संजय गायकवाड यांनी दिली. मनपाच्या दीर्घकालिन योजनेत बांध तयार करण्याबाबत प्रस्ताव तयार करा, असे आदेश दीपराज पार्डीकर यांनी दिले. जलशुद्धीकरण केंद्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा व नागरिकांना पाणी शुद्धस्वरूपात मिळेल याची विशेष काळजी घेण्यात यावी, असे निर्देश आयुक्त अश्विन मुदगल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. 

 

  

हेरिटेज संवर्धन समितीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा

नागपूर,ता.२३ : शहरातील कस्तुरचंद पार्कचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेता त्याचे पुनरूत्थान व सौंदर्यींकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी नागपूर यांचकडून प्रस्ताव देखील प्राप्त झाला आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने कस्तुरचंद पार्क मैदान हे स्वतंत्रता दिवस, गणतंत्र दिवस, महाराष्ट्र दिन याव्यतिरिक्त इतर हंगामी कार्यक्रमाला परवानगीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार हेरिटेज समितीने घ्यावे, असे आदेश दिले आहे.
 
शहरातील वास्तु जतन करण्याच्या उद्देशाने गठित करण्यात आलेल्या हेरिटेज संवर्धन समितीची बैठक महानगरपालिकेच्या मुख्यालयातील आयुक्त सभागृहात नीरीचे माजी संचालक डॉ.तपन चक्रवर्ती यांच्या अध्यतेखाली घेण्यात आली. हेरिटेज संवर्धन समितीचे अध्यक्ष व निवृत्त सनदी अधिकारी अरूण पाटणकर हे वैद्यकीय कारणास्तव रजेवर असल्यामुळे समितीचे सदस्य डॉ.तपन चक्रवर्ती यांनी बैठकीचे अध्यक्ष स्थान भूषवावे असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. या बैठकीला स्ट्रक्चरल अभियंता पी.एस.पाटणकर, एल.ए.डी.च्या प्राचार्या उज्ज्वला चक्रदेव, सदस्य डॉ.शुभा जोहरी, प्रसिद्ध वास्तुविशारद अशोक मोखा, नागपूर वास्तु संग्राहलयाचे क्युरेटर डॉ.विराग सोनटक्के, नगररचना विभागाच्या सहायक संचालक सुप्रिया थूल, नगररचनाकार प्र.प्र. सोनारे उपस्थित होते.
 
बैठकीत सर्वोच्च न्यायालयात आदेशान्वये हेरिटेज संवर्धन समितीने महाराष्ट्र राजपत्रात व दैनिक वर्तमानपत्रात सूचना प्रसिद्ध करून ४९ वास्तुंबाबत नागरिकांकडून आक्षेप मागविले होते. तसेच कस्तुरचंद पार्कचे पुनरूत्थान अथवा सौंदर्यीकरणाच्या कामांना मान्यता देणे आदी विषयांवर चर्चा  करण्यात आली.
          
उक्तप्रमाणे प्राप्त झालेल्या एकूण १४ आक्षेपांवर निर्णय घेण्याकरिता प्राचार्य श्रीमती उज्ज्वला चक्रदेव यांच्या अध्यक्षतेखाली स्ट्रक्चरल अभियंता पी.एस.पाटणकर, डॉ.शुभा जोहरी, वास्तुविशारद अशोक मोखा अशी तीन सदस्यीय उपसमिती गठीत करण्यात आली. उपसमितीने नागरिकांच्या आक्षेपांवर निर्णय घेण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या.
          
कस्तुरचंद पार्कवर विविध संस्थांनी  प्रदर्शनीकरिता जागा उपलब्ध करून देण्याकरिता अर्ज सादर केले होते. तसेच विजयादशमीला कस्तुरचंद पार्कवर रावण दहनासाठी परवानगी मागितली होती. परंतु हेरिटेज संवर्धन समितीने दोन्ही प्रस्ताव बैठकीत नामंजूर केले.
          
कस्तुरचंद पार्क सौदर्यीकरणाच्या दृष्टीने नागरिकांकरिता करण्यात येणाऱ्या सोयीसुविधा आणि राष्ट्रध्वज उभारण्याकरिता परिघीय सौंदर्यीकरण प्रकल्प संकल्पनेबाबतचे सादरीकरण स्लाईड शोच्या माध्यमातून करण्यात आले. या संदर्भात विकासात्मक निर्णय घेण्याची जबाबदारी उपसमितीकडे सोपविण्यात आली. तसेच कस्तुरचंद पार्कच्या बाहेर असलेला पुतळा आतील भागात स्थानांतरीत न करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

 

 

नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या

कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांचे निर्देश : परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांच्यासह वर्कशॉप पाहणी दौरा
 
नागपूर,ता.२३. नागरिकांच्या सोयींसाठी ‘आपली बस’ कार्यान्वित केली आहे. नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात यावी, असे निर्देश कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिले. नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाच्या वर्कशॉपच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत परिवहन समिती सभापती बंटी कुकडे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप प्रामुख्याने उपस्थित होते.
 
पटवर्धन मैदान येथील वर्कशॉपमध्ये पाहणीप्रसंगी संपूर्ण वर्कशॉपचा आढावा मान्यवरांनी घेतला. तेथील स्टोअर रूम, ऑईल रूम व दुरूस्तीसाठी आलेल्या बसेसची पाहणी केली. पटवर्धन मैदानात पावसाचे पाणी साचून तेथे चिखल तयार होत असल्याने बसेसला बाहेर काढण्यात व आत आणण्यात अडचण जाते त्यामुळे मैदान समतल करण्याचे प्राकलन तयार कऱण्याचे निर्देश उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पटवर्धन मैदानातील वर्कशॉपचे छप्पर वाढविण्यात यावे, असे आदेश परिवहन सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी दिले. नव्याने तयार झालेल्या स्वयंचलित बस स्वच्छता यंत्राची पाहणी मान्यवरांनी केली. याप्रसंगी आर.के.सिटी. बस सर्व्हिसेसचे अधिकारी उपस्थित होते.
 
हिंगणा येथील बस वर्कशॉपमध्ये १४ नादुरूस्त बसेस पैकी आठ बसेस दुरूस्त झाल्या असून चार बसेस दुरूस्त करण्याचे काम प्रगतीपथावर असल्याची माहिती प्रशासनाने दिली. त्या बसेस तातडीने दुरूस्त करून मार्गस्थ करण्याचे निर्देश कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी दिले. तेथे कार्यरत असलेल्या एसआय़एस या संस्थेद्वारे  १८ बसेस वाहकांमुळे मार्गस्थ झाल्या नाही, असे आढळून आले. करारात ठरल्याप्रमाणे कारवाई करण्याचे निर्देश परिवहन सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी दिले.

 

 

गणेशोत्सवासाठी मनपा प्रशासन सज्ज

आयुक्त अश्विन मुदगल यांनी घेतला झोननिहाय आढावा
 
नागपूर, ता.२२ : गणेशोत्सवासाठी महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले असून मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांनी गणेश विसर्जनासंबधीचा झोननिहाय आढावा मंगळवारी (ता.२२) रोजी मनपा मुख्यालयातील आयुक्त कार्यालयात घेतला.
        
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त आर.झेड.सिद्धीकी, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता (जलकर्म) संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, कार्यकारी अभियंता नरेश बोरकर, कार्यकारी अभियंता सतीश नेरळ, स्थावर अधिकारी आर.एस. भुते, कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी.जांभूळकर, कार्यकारी अभियंता मोती कुकरेजा, कार्यकारी अभियंता अनिरूद्ध चौंगजकर, कार्यकारी अभियंता के.एल. सोनकुसरे, व मनपाचे सर्व झोन सहायक आयुक्त उपस्थित होते.
 
प्रारंभी आयुक्तांनी झोन सहायक आयुक्तांमार्फत सर्व झोनचा कृत्रिम तलावासंबंधीचा आढावा घेतला. गणेश विसर्जनस्थळाजवळील व मार्गातील खड्डे गणेश विसर्जनापूर्वी बुजविण्यात यावे, असे निर्देश दिले. वर्दळीच्य़ा ठिकाणी गणेशोत्सवातील महत्त्वाचे ठिकाण तसेच रस्त्यांतील खड्डे हे त्वरित बुजविण्यात यावे, असे आदेश झोन सहायक आयुक्तांना दिले. कृत्रिम तलावांची संख्या व लागणाऱ्या टँकरची संख्या ही जलप्रदाय विभागाला कळविण्यात यावी. कृत्रिम तलावांची संख्या जर वाढवायची असेल तर त्यासाठी आवश्यक जागा शोधा व तेथे खड्डा करून कृत्रिम तलाव तयार करावा, असे आदेश झोन सहायक आयुक्तांना दिले. विसर्जन मार्गात एकही खड्डा राहणार नाही याची विशेष काळजी घेण्यात यावी. सर्व मार्गातील खड्डे बुजले की नाही याची मुख्य अभियंता विजय बनगिरवार यांनी पाहणी करावी, असे आदेश दिले. मुख्य मार्ग (गणपती रोड, चितार ओळ, सी.ए.रोड ) यासारख्या मार्गातील खड्डेसुद्धा तातडीने बुजविण्यात यावे. विसर्जनस्थळी सूचना फलक लावण्यात यावे. याव्यतिरिक्त मोबाईल व्हॅन प्रत्येक झोनमार्फत कार्यान्वित करण्यात यावी, असे निर्देशही आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिले. सर्व नागरिकांना सोयीचे होईल अश्याच ठिकाणी खड्डा खणून विसर्जन तलाव तयार करण्यात यावा. तलावाला संरक्षक कडे बांधावे, असे आदेशदेखील आयुक्त मुदगल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

 

 

 

गणेशमूर्ती विक्रेत्यांना नोंदणी करणे बंधनकारक

नागपूर,ता.२२. नागपुरात पर्यावरणपूरक व्हावा यासाठी मनपा प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे. पर्यावरणपुरक गणेश मूर्तीची नागरिकांची मागणी असते. नागरिकांची कुठल्याहीप्रकारे फसवणूक होणार नाही याकरीता मनपाप्रशासनाने मूर्ती विक्रेत्यांना उपविधीनूसार नोंदणी करण्याचे आदेश दिले आहे.  
 
गणेशोत्सव जवळ येत आहे. गणेश मूर्ती विक्रेत्यांना आता नागपूर महानगरपालिकेच्या संबंधित झोनमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे.  मूर्ती विक्री व भंडार (स्टॉक) ठेवण्याकरिता महानगरपालिकेच्या झोनमधून परवाना घेणे आवश्यक आहे. पीओपीच्या मूर्तींच्या मागे लाल खूण लावणे अत्यावश्यक आहे. तसेच येथे पीओपीची मूर्ती मिळते, या मूर्तींच्या विसर्जन कृत्रिम तलावातच करावे असे सूचना फलक लावावे असे आदेशही मूर्ती विक्रेत्यांना दिले आहे. या उपविधीची योग्यरित्या अंमलबजावणी करण्यासाठी झोन सहायक आयुक्तांना निर्देशित करण्यात आले आहे.

 

 

कंत्राटदारांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात येईल  

नागपूर,ता.३० : कंत्राटदारांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात येईल, असे आश्वासन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
केंद्र सरकारने १ जुलैपासून जीएसटी लागू केली. जीएसटी लागू झाल्यानंतर शासकीय कंत्राटात वाढ करण्यासाठी कंत्राटदार असोसिएशनच्या वतीने मागणीचे निवेदन महापौरांना देण्यात आले होते. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
       
यावेळी आयुक्त अश्विन मुदगल, स्थपात्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले, माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मदन गाडगे, मुख्य अभियंता विजय बनगीरवार, अधीक्षक अभियंता दीपक सोनटक्के, कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष विजय नायडु, मनपातील सिव्हील कंत्राटदार, हॉटमिक्स कंत्राटदार प्रामुख्याने उपस्थित होते.
 
पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, महाराष्ट्र शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार महापालिकेच्या कंत्राटदाराने केलेल्या झोननिहाय कामाचे १ जुलै पूर्वीचे देयके व्हॅटनुसार काढण्यात येईल व १ जुलैनंतरचे देयक हे जीएसटीप्रमाणे काढण्यात येईल. शासकीय परिपत्रकानुसार योग्य निर्णय घेण्यात येईल. कंत्राटदाराचे हित लक्षात घेऊनच योग्य निर्णय घेण्यात येईल. कंत्राटदारांनी निश्चिंत राहावे. रस्त्यांची कामे नियमित करावीत, अशी सूचना देखिल कंत्राटदारांना केली.
 
शिष्टमंडळाशी बोलताना आयुक्त अश्विन मुदगल म्हणाले, मध्यप्रदेश व तेलंगणा राज्य सरकारने कंत्राटात पाच टक्के वाढ केली आहे. महाराष्ट्र शासनाने मुंबई महापालिका वगळता महाराष्ट्र महापालिका कायद्यांतर्गत जर काही नवे परिपत्रक काढले तर लवकरच कळविण्यात येईल. १ जुलैपूर्वी कंत्राटदाराने केलेल्या कामाची देयके झोनमध्ये जमा करावीत. १० सप्टेंबर २०१७ पूर्वी जमा करून रेकॉर्डवर जीएसटीच्या नव्या नियमानुसार घेतल्यास त्याचा भार मनपाच्या तिजोरीवर पडणार नाही. त्यामुळे सर्व कार्यकारी अभियंत्यांनी सदर देयके तपासून मुख्य कार्यालयातील मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्याकडे सादर करावीत, असे निर्देश दिले. 

 

 

शोक संदेश

नागपूर,ता.१८ : राष्ट्रसेविका समितीच्या तृतीय संचालिका वंदनीय उषाताई चाटी यांनी समितीसाठी केलेले योगदान हे अतुलनीय आहे. त्यांच्या निधनाने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राष्ट्रनिर्माणाची कास धरणाऱ्या आणि त्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या उषाताई चाटी यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
 
-नंदा जिचकार
महापौर, नागपूर.   

 

१४ ऑगस्टला ‘वंदेमातरम्‌’ अंतिम स्पर्धा

मनपाचे आयोजन : प्राथमिक फेरीत १२ संघांची निवड
 
नागपूर,ता. ११ : नागपूर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित ‘वंदेमातरम्‌’ महापौर चषक समूहगान स्पर्धेची अंतिम फेरी १४ ऑगस्ट रोजी विदर्भ साहित्य संघाच्या सांस्कृतिक संकुलात १२ संघांमध्ये रंगणार आहे.
 
सदर स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा शुभारंभ ९ ऑगस्ट रोजी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते झाला. ९ ते ११ ऑगस्टदरम्यान विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात चाललेल्या ‘वंदेमातरम्‌’ प्राथमिक फेरीत ११० शाळांच्या संघांनी भाग घेतला होता. यात मनपाच्या २८ शाळांचा समावेश होता. यातून १२ संघांची निवड करण्यात आली. गट एक (वर्ग ९ ते १०) मध्ये भारतीय विद्या भवन श्रीकृष्णनगर, मॉडर्न स्कूल कोराडी, मुंडले इंग्लीश स्कूल साऊथ अंबाझरी रोड, बॅ. शेषराव वानखेडे माध्यमिक मनपा विद्यालय नागपूर यांचा समावेश आहे. गट दोन (वर्ग ६ ते ८) मध्ये भवन्स विद्या मंदिर त्रिमूर्तीनगर, साऊथ पॉईंट ओंकारनगर, स्कूल ऑफ स्कॉलर्स अत्रे ले-आऊट, विवेकानंद नगर माध्यमिक मनपा नागपूर तर गट तीन (वर्ग १ ते ५) मध्ये स्कूल ऑफ स्कॉलर्स अत्रे ले-आऊट, दुर्गानगर मराठी प्राथमिक शाळा मनपा नागपूर, साऊथ पॉईंट हनुमाननगर, भारतीय विद्या भवन्स सिव्हील लाईन्स नागपूर या १२ संघांचा समावेश आहे.
 
१४ ला अंतिम स्पर्धा
स्पर्धेची अंतिम फेरीला १४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता विदर्भ साहित्य संघ सांस्कृतिक संकुल येथे सुरुवात होईल. पारितोषिक वितरण सोहळा दुपारी १.३० वाजता होईल. अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, आयुक्त अश्विन मुदगल, अपर आयुक्त डॉ. आर. झेड. सिद्दीकी, शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, बसपाचे पक्षनेता शेख मोहम्मद जमाल, शिवसेनेचे पक्षनेते किशोर कुमेरिया, राकाँचे पक्षनेता दुनेश्वर पेठे, धरमपेठ झोन सभापती रुपा राय, ज्येष्ठ नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेविका उज्ज्वला शर्मा उपस्थित राहतील. कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन मनपाचे उपायुक्त रवींद्र देवतळे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी केले आहे. 

 

 

अवैधरीत्या नळ कनेक्शन जोडणाऱ्या ग्राहकांवर होणार गुन्हे दाखल

- चल संपत्ती, मालमत्तांची होणार जप्ती
 
-अभय योजनेअंतर्गत कार्य न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही कारवाईचा बडगा
 
नागपूर,ता. ८ : सवलतीची योजना जाहीर करूनही कर भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या थकबाकीदारांच्या चल मालमत्तेवर टाच येणार आहे. ११ ऑगस्टपासून कार, मोटारसायकल, टीव्ही, फ्रीज, सोफा आदी चल संपत्ती आणि त्यानंतर कायद्यानुसार अचल संपत्ती जप्त करण्याचे आदेश महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिले. इतकेच नव्हे तर नळ कनेक्शन कापलेल्या थकबाकीदारांनी पुन्हा ते जोडले असेल अशा थकबाकीदारांवर पुढील तीन दिवसांत गुन्हे नोंदविण्यात यावे, असे आदेशही त्यांनी झोनल अधिकारी आणि ओसीडब्ल्यू अधिकाऱ्यांना दिले.
 
थकीत मालमत्ता कर आणि पाणी कर असणाऱ्या ग्राहकांसाठी नागपूर महानगरपालिकेने १७ जुलै ते १० ऑगस्ट या काळात ‘अभय योजना’ जाहीर केली आहे. प्रारंभी या योजनेचा कालावधी ७ ऑगस्टपर्यंत होता. यानंतर योजनेला तीन दिवसाची मुदतवाढ देण्यात आली. दरम्यान योजनेतील कालावधीत झोननिहाय वसुलीचे उद्दिष्ट काय होते, किती टक्के वसुली करण्यात आली, कमी वसुलीची कारणे काय आणि कुठल्या कर्मचाऱ्यांनी योजनाकाळात कर्तव्यात हलगर्जीपणा केला, यासंदर्भात मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 
 
बैठकीला महापौर नंदा जिचकार, सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त अश्विन मुदगल, माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, नगरसेविका दिव्या धुरडे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त आयुक्त डॉ. रिजवान सिद्दीकी, उपायुक्त रवींद्र देवतळे, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम, ओसीडब्ल्यूचे राहुल कुळकर्णी उपस्थित होते.
सदर बैठकीत महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अश्विन मुदगल यांनी अभय योजनेअंतर्गत मागील २० दिवसांत करण्यात आलेल्या करवसुलीचा झोननिहाय आढावा घेतला. ज्या थकबाकीदारांनी योजनेत सहभागी न होता अजूनही थकबाकी ठेवली आहे अशा थकबाकीदारांवर सर्व प्रकारची कायदेशीर कार्यवाही करण्याचे निर्देश महापौर आणि आयुक्तांनी दिले. अभय योजनेदरम्यान कर्तव्यात कुचराई करणाऱ्या कर निरीक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांची यादी तातडीने सर्व सहायक आयुक्तांनी आयुक्तांकडे सोपवावी. त्यांना तातडीने कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांच्यावर निलंबनाची आणि वेतनवाढ थांबविण्याची कार्यवाही करण्याचे आदेश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
 
बैठकीला सर्व झोनचे सहायक आयुक्त सर्वश्री महेश मोरोणे, आर. पी. भिवगडे, जी. एम. राठोड, राजेश कराडे, अशोक पाटील, पी. एल. वऱ्हाडे, सुभाष जयदेव, विजय हुमने, हरिश राऊत, झोनचे जलप्रदायचे डेलिगेट उपस्थित होते.
 
धनादेश अनादरप्रकरणीही होणार कारवाई
मालमत्ता योजनेअंतर्गत कर रक्कम चुकविण्यासाठी दिलेल्या धनादेशापैकी ज्या ग्राहकांचे धनादेश अनादरित झाले त्यांच्यावरही नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
 
अवैधरीत्या नळ कनेक्शन जोडणाऱ्यांवर होणार गुन्हे दाखल
मागील अभय योजनेत ज्या ग्राहकांनी पाणी कराची रक्कम भरली नाही, अशा ग्राहकांचे नळ कनेक्शन ओसीडब्ल्यूने कापले होते. मात्र, हे कापलेले कनेक्शन ग्राहकांनी अवैधरीत्या जोडले. अशा ग्राहकांची यादी ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी महापौर आणि आयुक्तांपुढे सादर केली. या ग्राहकांवर तातडीने मनपाचे डेलिगेट आणि ओसीडब्ल्यूच्या झोनल अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे एफआयआर दाखल करण्याचे आदेश महापौर आणि आयुक्तांनी दिले.
 
११ पासून सुरू होणार नळजोडणी कापण्याची मोहीम
१० ऑगस्ट रोजी ‘अभय योजने’चा अखेरचा दिवस आहे. योजना संपेपर्यंतही थकीत पाणी कर न भरणाऱ्या ग्राहकांचे नळ कनेक्शन कापण्याची मोहीम हाती घेण्याचे आदेश यावेळी आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिले.

 

 

शहर निरोगी राहील याची विशेष काळजी घ्या - मनोज चापले

वैद्यकीय सेवा व आरोग्य समितीच्या आढावा बैठकीत दिले निर्देश
 
नागपूर,ता.८. नागपूर शहरात रोगराई पसरणार नाही, शहर निरोगी राहील याची विशेष काळजी घेण्यात यावी असे निर्देश सभापती मनोज चापले यांनी दिले. वैद्यकीय सेवा व आरोग्य समितिच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी समिती सदस्य लखन येरावार, विजय चुटेले, सदस्या भावना लोणारे, आशा नेहरू उईके, वंदना राजु चांदेकर, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता)डॉ.प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (एस.एम.) डॉ.अनिल चिव्हाने, हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे, डॉ.विजय जोशी,  उपस्थित होते.
        
झोनल अधिकारींना वाहन मिळण्याबाबत सादर केलेला अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचेआदेश सभापतींनी यावेळी बैठकीत दिले. गणपती विसर्जन हे कुत्रिम तलावातच करावे,झोन निहाय आवश्यक कुत्रिम तलावांची माहिती सभापती मनोज चापले यांनी झोनल अधिका-यांना मार्फत घेतली.मोठ्या गणपतीच्या मुर्त्या ह्या फुटाळा तलावात विसर्जित होत असल्याने त्यात पाण्याची उपलब्धता किती आहे याचा आढावा घेण्यात यावा असे आदेश त्यांनी यावेळी अधिका-यांना दिले. शुक्रवार तलाव,सक्करदरा तलाव, नाईक तलाव यांच्या सभोवताल संरक्षक कडे बांधण्यात येणार असल्याची माहिती झोनल अधिकारींनी सभापतींना दिली.
        
संसर्गजन्य, डेंग्यु, व किटकजन्य रोगावर उपाययोजना करण्याबाबत चर्चा करताना डेंग्युची तपासणी घरोघरी जाऊन करणे शक्य नाही, त्यासाठी महाल व सदर याठिकाणी त्याची व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती डॉ.अनिल चिव्हाने यांनी दिली. डेंग्युच्या रूग्णांची तपासणी करावी व त्यांना योग्य उपचार देण्याचे निर्देश सभापती चापले यांनी दिले. गणेशोत्सवात जनजागृती फलक लावण्यात यावे व ते फलक झोननिहाय वितरित करण्यात यावे असे निर्देश चापले यांनी दिले.
 
हिवताप व हत्तीरोग विभागाचा कामकाजाचा आढावा घेतला. त्याबाबत विभागाच्या अधिकारी जयश्री थोटे यांनी विभागाद्वारे घेण्यात आलेल्या रात्रकालीन सर्वेक्षण शिबिर, जनजागृती मोहिम, नियमित रूग्णांची होणारी तपासणी याबाबत माहिती सादर केली. हा रोग कायमचा नष्ट करण्यात यावा यासाठी विभागाद्वारे विशेष प्रयत्न करावे असे निर्देशित केले.
 
नागपूर महानगरपालिकेचे हॉस्पीटलची देखरेख व देखभाल ही झोनमार्फत व्हावी, त्याची डागडुजी करण्यात यावी अशी सूचनाही सभापती चापले यांनी केली. सार्वजनिक व सामूदायिक शौचालयासंदर्भातील आढावा यावेळी सभापतींनी घेतला. कनक रिसोर्सेसच्या संदर्भात झोनअंतर्गत फिरणा-या कचरागाडींचा आढावाही सभापती चापले यांनी घेतला.

 

 

पाणी संदर्भातील समस्या तातडीने सोडवा : संदीप जाधव

स्थायी समितींनी दिले अधिका-यांना निर्देश
 
नागपूर, ता. ८ ऑगस्टः शहरातील विविध भागात असलेल्या पाण्यासंबंधित समस्या तातडीने सोडविण्यात याव्या, तसेच डेलिगेट्सने दर २-३ दिवसांत लोकप्रतिनीधींची भेट घ्यावी, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव यांनी दिले. 
 
मंगळवारी (८ ऑगस्ट) मनपा मुख्यालयात स्थायी समिती सदस्य व ओसीडब्लू अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रामुख्याने स्थायी समिती सदस्य मनोज सांगोळे, संगीता गि-हे, भाग्यश्री कानतोडे, हरीष ग्वालबंशी, जितेंद्र घोडेस्वार, सरला नायक, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड यांच्यासह सर्व झोनच्या डेलिगेट्सची उपस्थिती होती.
 
शहरातील अनेक भागात पाण्याची पाईपलाईन असूनही टॅंकरने पाणी पुरवठा कऱण्यात येत असल्याचे लोकप्रतिनिधींनी ओसीडब्लू अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. अनेक ठिकाणी पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही खोदलेल्या खड्ड्यांची दुरुस्ती करण्यात आली नसल्याची तक्रार सदस्यांनी केली. शहरातील अऩेक भागात पाण्याचा दबाव कमी असल्याने नागरिकांना पाणी मिळत नसल्याचे सांगितले. या सदस्यांनी मांडलेल्या समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यात यावा असे निर्देश यावेळी स्थायी समिती सभापतींनी दिले.

 

 

मालमत्ता व पाणी कर अभय योजनेला तीन दिवस मुदतवाढ 

योजनेचा कालावधी आता १० ऑगस्टपर्यंत : थकीत कर भरण्याचे आवाहन
 
नागपूर, ता. ७   :  मालमत्ता कर आणि पाणी कर थकीत असलेल्या नागरिकांसाठी मनपाने जाहीर केलेल्या अभय योजनेला आता तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. थकबाकीदारांना आता १० ऑग़स्टपर्यंत थकीत कर रकमेचा भरणा करता येईल. या तीन दिवसांत नागरिकांनी मोठ्या संख्येने या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अश्विन मुदगल यांनी केले आहे.
 
मालमत्ता कर अभय योजनेअंतर्गत मालमत्ता धारकांना थकीत करातील दंडाची रक्कम ९०%  माफ केली जात आहे. थकित पाणी बिलावरील विलंब शुल्क किंवा दंडाची रक्कम १००% माफ करण्यात येत आहे. नागरिकांनी भविष्यात आपल्या मालमत्तेवरील जप्ती टाळण्यासाठी व नळ जोडणी खंडीत करण्याची कारवाई टाळण्यासाठी पुढील तीन दिवसात आपले थकीत कर भरावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे.
 
अशी जाणून घ्या आपली थकीत रक्कम
 
आपल्या पाणी कराची थकीत रक्कम जाणून घेण्यासाठी नागरिकांना  www.ocwindia.com  आणि मालमत्ता कर थकबाकी जाणून घेण्यासाठी www.nmcnagpur.gov.in  या संकेतस्थळावर भेट देता येईल. तसेच  SMS  द्वारे जाणून घेण्यासाठी NMCWTR<space><आपल्या पाणीबिलावरील कॉन्ट्रॅक्ट अकाउंट नं.> किंवा NMCPRT<space><आपल्या कर पावतीवरील इंडेक्स नं.> ५६१६१ या क्रमांकावर पाठविता येईल. अधिक माहितीकरिता १८००-२६६-९८९९ य़ा टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
 
७ ऑगस्टला आठ कोटींवर वसुली
७ ऑगस्टला सायंकाळी ६.१५ वाजेपर्यंत मालमत्ता कर थकबाकीदारांनी ५ कोटी ७३ लाख ८५ हजार ९४८ रुपये इतकी रक्कम जमा केली. पाणी करापोटी थकबाकीदारांनी २ कोटी ८० लाख १८ हजार ९२ रुपयांचा भरणा केला. नोकरदार वर्गाची समस्या लक्षात घेत त्यांच्या मागणीपोटी या योजनेला तीन दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे. या तीन दिवसादरम्यान जप्ती व लिलावाची कारवाई सुरू राहणार असून थकबाकीदारांना थकीत रक्कम भरण्याची संधी देण्यात येत आहे.

 

 

सेंट्रल एव्हेन्यू रोड मार्गे *बर्डी ते दिघोरी 'आपली बस' सेवेला सुरुवात

- नागरिकांनी मानले परिवहन सभापतींचे आभार
 
नागपूर, ता. ६ ऑगस्टः सेंट्रल एव्हेन्यू रोड परिसरातील नागरिकांना कामानिमित्त नियमित दिघोरीपर्यंत जावे लागते. मात्र आपली बस सेवा उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत होती. नागरिकांची ही गरज लक्षात घेता नागरिकांच्या मागणीवर तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन परिवहन सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी दिले होते. आपले आश्वासन पूर्ण करत आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते आणि परिवहन सभापती बंटी कुकडे  यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. ६ ऑगस्ट) सेंट्रल एव्हेन्यू रोड मार्गे बर्डी ते दिघोरी बस सेवेला प्रजापती चौक येथे हिरवी झेंडी दाखविली. यावेळी प्रामुख्याने नगरसेविका मनिषा धावडे, नंदराज सोनी, प्रशांत रतन, महेंद्र कटारिया, मनोज अग्रवाल, विनोद कोचर, अशोक सावरकर, कमलेश नागपाल, श्याम बजाज, सुनील डहाके, आशिष धावडे यांच्यासह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.
   
सेंट्रल एव्हेन्यू मार्गे जाणारी 'आपली बस' बर्डी ते दिघोरी गांधीबाग, प्रजापती चौक, डे-टु-डे चौक,खरबी चौक मार्गाने जाईल. बर्डी येथून पहिली बस सकाळी ५.४५ वाजता सुटेल तर शेवटची बस रात्री ९.४० ला राहील. तसेच दिघोरी वरुन पहिली बस सकाळी ६.३० वाजता राहणार असून शेवटची बस रात्री ९.५५ वाजता सुटेल. या मार्गावर बसच्या दररोज जाणे आणि येणे ३०-३० फे-या असणार आहे. नागरिकांची गैरसोय लक्षात घेता तातडीने बस सेवा सुरू करुन नागरिकांच्या गरजेच्या वेळेनुसार वेळापत्रक तयार केल्याबद्दल नागरिकांनी परिवहन सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांचे आभार मानले. नागरिकांना दर्जेदार वाहतूक सेवा देण्यासाठी आपण कटिबद्ध असून नागरिकांनी 'आपली बस' संबंधित काही समस्या असल्यास संपर्क साधावा आणि 'आपली बस'चा वापर करावा, असे आवाहनही यावेळी सभापतींनी केले.

 

 

परिसर स्वच्छ ठेवून शहर निरोगी ठेवा : महापौर नंदा जिचकार

कीटकजन्य आजार जनजागरणासाठी विद्यार्थ्यांना दिली शपथ : १६० शाळांत कार्यक्रम
 
नागपूर,ता. ५ : शिक्षकांनी शाळांमधून विद्यार्थ्यांवर स्वच्चछतेचे संस्कार रुजवावे. विद्यार्थ्यांनीही परिसराच्या स्वच्छतेची पर्यायाने शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी पार पाडावी. परिसरात पाणी साचून राहणार नाही, याची काळजी घ्यावी. डेंग्यू डासांच्या अळ्यांच्या निर्मितीचे केंद्र असणारे साचलेले पाणी दिसेल तेथे स्वच्छ करावे. साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडावे. परिसर स्वच्छ ठेवून शहर निरोगी ठेवण्यास हातभार लावा, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले. 
 
कीटकजन्य आजारासाठी पारेषण काळ असलेल्या या काळात किटकांची निर्मितीच होऊ नये यासाठी जनजागरण करण्याच्या दृष्टीने शनिवारी (ता. ५) शहरातील सुमारे १६० शाळांसह मनपा आणि राज्य शासनाच्या कार्यालयात शपथ घेण्यात आली. लक्ष्मीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या प्रतापनगर माध्यमिक शाळेत महापौर नंदा जिचकार यांनी कीटकजन्य आजाराचा समूळ नायनाट करण्याची शपथ विद्यार्थ्यांना दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
 
यावेळी मंचावर हिवताप व हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे, हिवताप निरीक्षक ओमप्रकाश सोमकुंवर, प्रतापनगर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. प्रकाश शुक्ला, सचिव श्याम कायंदे, मुख्याध्यापिका मंजूश्री टिल्लू, प्रभात खडतकर उपस्थित होते.  
 
प्रारंभी हिवताप व हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे यांनी प्रास्ताविकातून कीटकजन्य रोगाबद्दल माहिती दिली. डासांची उत्पत्ती कशी होते, याबाबत माहिती दिली. साचलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या तयार होतात. यातून डासांची निर्मिती होते. त्यामुळे अशा प्रकारच्या अळ्याच निर्माण होऊ नये, यासाठी काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
 
संचालन शिक्षक विजय वानखेडे यांनी केले. आभार नंदिनी सावसाकडे यांनी मानले. कार्यक्रमाला हिवताप व हत्तीरोग विभागाचे विनय साखरे, सुनील बनकर, महेंद्र वासनिक यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
१६० शाळांतील विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
 
शहरातील विविध भागातील सुमारे १६० शाळांतील विद्यार्थ्यांना संबंधित परिसरातील नगरसेवकांनी शपथ दिली. उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, बसपा पक्ष नेते मोहम्मद जमाल यांच्यासह सर्व पदाधिकारी या मोहिमेत सहभागी झाले होते.
 

 

शाळाशाळांमधून घेतली जाणार शनिवारी कीटकजन्य आजार निर्मूलनाची शपथ

नागपूर,ता. ४ : सध्या कीटकजन्य आजारासाठी पारेषण काळ सुरू आहे. अशा किटकांची निर्मितीच होऊ नये यासाठी जनजागरण करण्याच्या दृष्टीने शनिवारी (ता. ५) शहरातील सुमारे १६० शाळांसह मनपा आणि राज्य शासनाच्या कार्यालयात शपथ घेण्यात येणार आहे.
 
महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, सत्तापक्ष नेते यांच्यासह संपूर्ण नगरसेवक हे संबंधित प्रभागातील शाळांमध्ये ही शपथ देणार आहेत. महापौर नंदा जिचकार लक्ष्मीनगर झोनअंतर्गत येणाऱ्या राणा प्रतापनगर शाळेत शपथ देतील. उपमहापौर दीपराज पार्डीकर सतरंजीपुरा झोनअंतर्गत येणाऱ्या कुंदनलाल गुप्ता शाळा, बिनाकी येथे, स्थायी समिती सभापती संदीप जाधव मंगळवारी झोनअंतर्गत येणाऱ्या अल अमीन शाळेत, सत्तापक्ष नेते संदीप जोशी हे लक्ष्मीनगर झोनअंतर्गत येणाऱ्या आर. एस. मुंडले विद्यालयात तर विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे नेहरूनगर झोनअंतर्गत येणाऱ्या ज्ञान विकास विद्यालय नंदनवन या शाळेत विद्यार्थ्यांना शपथ देतील. शहरातील अन्य प्रभागामधील शाळांत त्या-त्या भागातील नगरसेवक शपथ देतील.

 

 

गठई कामगारांचा दुकान वाटपाचा प्रश्न १५ दिवसांत निकाली काढा

आढावा बैठकीत दिले महापौरांनी निर्देश : झोननिहाय घेतला आढावा
 
नागपूर,ता. ३ : गठई कामगारांच्या उपजीविकेसाठी शासनाने १९९५ मध्ये दुकान वाटपासंदर्भात शासनादेश काढला. दुकानांसाठी अर्ज आल्यानंतरही संबंधित झोन कार्यालयाकडून आणि मनपा प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची प्रक्रिया संथ आहे. दुकान वाटपाचा प्रश्न पुढील १५ दिवसांत निकाली काढा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
 
नागपूर शहरात गठई कामगारांना देण्यात येणाऱ्या दुकान वाटपासंदर्भात स्थायी समिती सभापती संदीप जाधव यांनी आढावा बैठकीचे आयोजन मनपा मुख्यालयातील पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात केले होते. यावेळी त्या बोलत होत्या. बैठकीला स्थायी समिती सभापती संदीप जाधव, बसपा पक्ष नेते मोहम्मद जमाल, नगरसेवक लखन येरावार, उपायुक्त रवींद्र देवतळे, सहायक आयुक्त (कर व कर आकारणी) मिलिंद मेश्राम, स्थावर अधिकारी आर. एस. भुते, चर्मकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष भैय्यासाहेब बिघाणे उपस्थित होते.
 
महापौर नंदा जिचकार यांनी प्रारंभी संत रविदास आश्रय योजनेअंतर्गत गठई कामगारांना वाटप करण्यात येणाऱ्या दुकान वाटपाच्या सद्यस्थितीचा झोननिहाय आढावा घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून जे अर्ज आले आहेत, त्यावर कार्यवाही करण्यात उशीर का होत आहे, याची माहिती घेतली.
 
चर्मकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष भैय्यासाहेब बिघाणे यांनी झोनमधून योग्य माहिती मिळत नसल्याचे सांगितले. अर्जाच्या स्थितीसंदर्भात झोन मधून माहिती मिळण्यासाठी प्रत्येक झोनमध्ये एक-एक समन्वय अधिकारी नियुक्त करण्यात यावा, जेणेकरुन त्यांच्याकडून योग्य माहिती मिळेल, अशी सूचना मांडली. यावर स्थायी समिती सभापती यांनी झोनच्या सहायक आयुक्तांना तशी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. गठई कामगार हॉकर्स झोनमध्ये यायला नको. त्यांना हॉकर्सची नोंदणी बंधनकारक करण्यात येऊ नये, अशाही सूचना दिल्या. यावर आयुक्तांसोबत चर्चा करून तातडीने मार्ग काढण्यात यावा आणि गठई कामगारांचा प्रश्न तातडीने सोडविण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
 
बैठकीला झोनचे सहायक आयुक्त सर्वश्री गणेश राठोड, सुभाष जयदेव, राजू भिवगडे, हरिश राऊत, झोनचे उपअभियंता रवींद्र मुळे, कृष्णकुमार हेडाऊ, सहायक बाजार अधीक्षक नंदकुमार भोवते, चर्मकार सेवा संघाचे पंजाबराव सोनेकर, प्रा. डॉ. अशोक थोटे, भाऊराव तांडेकर, विजय चवरे, शाम सोनेकर, हरिचंद तांडे, रमेश सटवे, श्रावण चवडे, महादेव बोडखे व अन्य प्रतिनिधी उपस्थित होते. 

 

 

४ ऑगस्टला शहीद भीम स्मृती दिन

नागपूर,ता. ३ : मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळावे याकरिता झालेल्या नामांतर आंदोलनात शहीद झालेल्या भीमसैनिकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १० नंबर पूल येथे शहीद भीम सैनिक स्मृति स्मारक उभारण्यात आले आहे. ४ ऑगस्ट रोजी शहीद भीम स्मृती सैनिक दिवसाचे औचित्य साधून सकाळी ९.३० वाजता महापौर नंदा जिचकार, स्थायी समिती सभापती संदीप जाधव हे शहीद स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करतील.  
 

 

कविवर्य सुरेश भट सभागृहामुळे नागपूरच्या सांस्कृतिक वैभवात भर : महापौर

महापौर, आयुक्त, स्थायी समिती सभापतींनी केली सुरेश भट सभागृहाची पाहणी
 
नागपूर,ता. ३ : नागपुरातील अद्ययावत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, पूर्णपणे सौर ऊर्जेवर संचालित कविवर्य सुरेश भट सभागृहाचे कार्य अंतिम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसांत उद्‌घाटन होणार असलेल्या या सभागृहाच्या अंतिम टप्प्यातील कामांची पाहणी महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव आणि आयुक्त अश्विन मुदगल यांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यांसह संयुक्तपणे केली.
 
यावेळी माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे, मनपाचे मुख्य अभियंता विजय बनगीरवार, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, उपअभियंता गभने, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर आदी उपस्थित होते.
 
कविवर्य सुरेश भट सभागृह हे महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रेक्षक क्षमता असलेले सभागृह आहे. दोन हजार आसनक्षमता, २०० चार चाकी वाहनांची पार्किंग, सौर ऊर्जेवर संचालित अद्ययावत प्रकाश व्यवस्था, अत्याधुनिक ध्वनिव्यवस्था हे या सभागृहाचे मुख्य आकर्षण आहे. सभागृहाचे काम अंतिम टप्प्यात असून अखेरचा हात सभागृहावर फिरविला जात आहे.
 
याप्रसंगी बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, कविवर्य सुरेश भट सभागृह हे नागपूरची नवी ओळख निर्माण करणारे ठरेल. मध्य भारतातील अत्याधुनिक सांस्कृतिक सभागृह म्हणून ते नावारूपास येईल, यात शंका नाही. यामुळे नागपूरच्या सांस्कृतिक वैभवात भर पडणार असल्याचेही त्या म्हणाल्या. सभागृहाचे संपूर्ण काम आटोपल्यानंतर पुढील काही दिवसातच सभागृहाचे लोकार्पण करण्यात येईल, अशी माहितीही यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी दिली.
 
आयुक्त अश्विन मुदगल यांनी यावेळी कंत्राटदाराला काही सूचना केल्यात. अगदी बारिक-सारिक बाबींकडे कंत्राटदाराने लक्ष द्यावे. शिल्लक कार्य तातडीने पूर्ण करावे, अशा सूचना त्यांनी केल्या. यावेळी महापौर, आयुक्त आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी सभागृहाची आसनव्यवस्था, प्रकाश व्यवस्था, दिव्यांगासाठी सभागृहात प्रवेश करण्यासाठी असलेली विशेष व्यवस्था, एक हजार, दीड हजार आणि दोन हजार आसन क्षमता कार्यक्रमानुसार करता येईल, अशी व्यवस्था, वाहनतळ व्यवस्था, व्हीआयपी पार्किंग व्यवस्था, सभागृहाच्या प्रवेशद्वारानंतरच्या सभागृहात लावलेला २४ फूट व्यासाचा अत्याधुनिक पंखा, स्वच्छतागृहे, ॲम्पी थिएटर आदींची माहिती घेतली. आंतरसज्जेचे काम करणारे सुपर कंस्ट्रक्शनचे सुरेश पटेल व सभागृहाच्या कामावर देखरेख ठेवणारे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

 

 

मनपाद्वारे क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन

नागपूर, ता. ३ : नागपूर महानगरपालिकेद्वारे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात त्यांच्या प्रतिमेला महापौर नंदा जिचकार यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले.
 
याप्रसंगी स्थायी समिती सभापती संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, उपायुक्त रवींद्र देवतळे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, निगम सचिव हरिश दुबे, माजी नगरसेवक मनोज साबळे, विलास फडणवीस, श्रीकांत देशपांडे, राजू भांडारकर, आरती पांडे, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डनवीस, दिलीप तांदळे उपस्थित होते.

 

 

शहरातील स्वच्छतेला प्राधान्य द्या : महापौर नंदा जिचकार

नागपूर, ता.२ : शहर स्वच्छ ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे त्या दष्टीने त्वरित उपाययोजना करा. शहरातील स्वच्छतेला प्राधान्य द्या, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी प्रशासनाला दिले.
 
नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील नागरिकांकरिता सुलभ शौचालयांची स्वच्छता, देखभाल करण्यासाठी नेमण्यात आलेल्या एजंसीमार्फत करण्यात आलेल्या कार्यवाही व त्यावर येणारा खर्च यासंबंधीचा आढावा मंगळवारी (ता. २) महापौरांनी घेतला. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, आयुक्त अश्विन मुदगल, माजी महापौर प्रवीण दटके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, मुख्य अभियंता विजय बनगीरवार, अधीक्षक अभियंता दीपक सोनटक्के, कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी. जांभूळकर, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार प्रामुख्याने उपस्थित होते.
 
नागपूर शहरात ६३ ठिकाणी सुलभ शौचालये असून विविध एजंसीजला त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम देण्यात आले आहे. सद्यस्थितीत १३ महिला प्रसाधन गृहे व ३७ पुरुष प्रसाधन गृहांचे कामे सुरू असून ते लवकरात लवकर पूर्ण होणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता डी.डी. जांभूळकर यांनी दिली.
 
महापौर नंदा जिचकार यांनी ठिकठिकाणी महिला स्वच्छतागृहे उभारण्यास प्राधान्य द्या. बाजार भागात ते असायलाच हवे, याची काळजी घ्या. जेथे स्वच्छतागृहे उभारण्यासाठी जागेची अडचण येत आहे तेथे स्थानिक नगरसेवकांची मदत घेण्यात यावी, असे आदेश दिले. निर्माणाधीन असलेली नवीन शौचालये अद्ययावत असावीत याकडेही अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, असेही त्या म्हणाल्या. या कामात स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांना सुचविले. स्वच्छता ॲप डाऊनलोड करण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
 
बैठकीला झोन सहायक आयुक्त महेश मोरोणे, राजेश कराडे, राजु भिवगडे, अशोक पाटील, प्रकाश वराडे, विजय हुमने, सुभाष जयदेव, हरिश राऊत, कार्यकारी अभियंता डी.डी. जांभूळकर, संजय जैस्वाल, मोती कुकरेजा, सी.जी. धकाते, अनिरूद्ध चौगंजकर, कांतीकुमार सोनकुसरे, राजेश भूतकर, स्थावर अधिकारी आर.एस. भुते उपस्थित होते.
 

 

गणेशोत्सवासाठी महानगरपालिका प्रशासन सज्ज

महापौरांनी घेतला गणेश विसर्जन पूर्वतयारीचा आढावा
 
नागपूर,ता.२ : गणेशोत्सवासाठी नागपूर महानगरपालिका प्रशासन सज्ज आहे. विसर्जन शांततेत व्हावे, पर्यावरणपूरक असावे यासाठी मनपाची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजीही मनपा घेईल, असे महापौर नंदा जिचकार म्हणाल्या.
 
गणेश विसर्जन पूर्वतयारीचा आढावा महापौर नंदा जिचकार यांनी घेतला. याप्रसंगी उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त अश्विन मुदगल, माजी महापौर प्रवीण दटके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, नगरसेवक पिंटू झलके, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, मुख्य अभियंता विजय बनगीरवार, अधीक्षक अभियंता दीपक सोनटक्के, पोलिस सहायक आयुक्त (वाहतूक) जयेश भांडारकर, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, प्रामुख्याने उपस्थित होते.
          
यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी पी.ओ.पी मूर्तीसंदर्भात दिलेल्या निर्देशांचे पालन करण्याचे आदेश दिले. सार्वजनिक मंडळाला परवानगी सोयीची व्हावी यासाठीची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात यावी व एक खिडकी परवाना सुविधा सुरू करण्यात यावी, असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. घरगुती गणपती विसर्जनाकरिता कृत्रिम तलाव जागोजागी सुरू करण्यात यावे यासाठी काही उपाययोजना कराव्या, शुक्रवारी तलाव व सक्करदरा तलाव येथे मोठ्या प्रमाणात लहान मूर्तींचे विसर्जन होत असल्याने तेथे कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्याचे आदेश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. उत्तर नागपूरमध्ये असलेल्या नाईक तलाव येथेसुद्धा कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्याचे आदेश उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी अधिकाऱ्यांना दिले.
 
रस्त्यावरील पथदिवे, विसर्जनस्थळी सूचना फलक व विद्युत व्यवस्था विसर्जनापूर्वी कार्यान्वित करण्यात यावी असे आदेश महापौरांनी यावेळी दिले. रस्त्यांची डागडुजी करण्यात यावी, त्याचप्रमाणे विसर्जन मार्गातील वाढलेल्या झाडांच्या फांद्या या कापण्यात यावा, असे आदेश महापौरांनी दिले. मार्गातील अतिक्रमण हे त्वरित काढण्यात यावे असे निर्देश महापौरांनी दिले. स्वयंसेवी संघटनांचा सहभाग यात प्रामुख्याने घेण्यात यावा व झोन अतंर्गत येणाऱ्या स्वयंसेवी संघटनांशी सहायक आयुक्तांनी संपर्क साधावा असे आदेश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. सामाजिक जनजागृती करणारे फलक गणेशोत्सवाच्या ठिकाणी लावण्याचे आवाहन त्यांनी सर्व मंडळांना केले असून सामाजिक जनजागृतीचा एक विषय घेऊन त्यावर सजावट करण्यात यावी, अशी सूचना त्यांनी यावेळी केली. नागरिकांना गणेशोत्सवादरम्यान वाहतुकीचा त्रास होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी असे आदेश पोलिस विभागाला केले.
 
घरगुती मूर्तींचे विसर्जन तलावात होणार नाही यासाठी शुक्रवार, सक्करदरा, सोनेगाव तलावाला सिलिंग बांधण्यात यावे, असे आदेश आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिले.  
 
बैठकीला झोन सहायक आयुक्त महेश मोरोणे, राजेश कराडे, राजु भिवगडे, अशोक पाटील, प्रकाश वराडे, विजय हुमने, सुभाष जयदेव, हरिश राऊत, कार्यकारी अभियंता डी.डी. जांभूळकर, संजय जैस्वाल, मोती कुकरेजा, सी.जी. धकाते, अनिरूद्ध चौगंजकर, डॉ.अनिल चिव्हाणे, डॉ.विजय जोशी, कांतीकुमार सोनकुसरे, राजेश भूतकर, स्थावर अधिकारी आर.एस. भुते, नासुप्रचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

 

फुटबॉलच्या माध्यमातून तयार होतेय आंतरराष्ट्रीय खेळाडू : महापौर नंदा जिचकार

फुटबॉल सामन्यांचे थाटात उद्‌घाटन : मनपा-आई फाऊंडेशनचे आयोजन
 
नागपूर, ता. १ : फुटबॉल हा सर्व खेळांचा राजा आहे. १३ वर्षापूर्वी आई फाऊंडेशनने ‘झोपडपट्टी फुटबॉल स्पर्धे’च्या रूपात लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होत असल्याचे गौरवोद्‌गार महापौर नंदा जिचकार यांनी काढले.
 
नागपूर महानगरपालिका आणि आई कुसूम सहारे फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक रेशीमबाग मैदानावर आयोजित फुटबॉल सामन्याच्या उद्‌घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, बसपाचे मनपातील पक्षनेते मोहम्मद जमाल, क्रीडा सभापती व आई फाऊंडेशनचे अध्यक्ष नागेश सहारे, क्रीडा समिती उपसभापती प्रमोद तभाने, हनुमाननगर झोन सभापती भगवान मेंढे, नेहरूनगर झोन सभापती रेखा साकोरे, सतरंजीपुरा झोन सभापती संजय चावरे, माजी उपमहापौर नगरसेवक सतीश होले, नगरसेविका उषा पायलट, शीतल कामडे, नेहा वाघमारे, विरंका भिवगडे, स्नेहल बिहारे, मधुसूदन मुळे, शरद गोंडाणे, महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेचे सचिव शरद सूर्यवंशी प्रामुख्याने उपस्थित होते.
 
प्रारंभी महापौर नंदा जिचकार यांनी फीत कापून आणि फुटबॉलला ‘कीक’ मारून स्पर्धेचे उद्‌घाटन केले. त्यानंतर महापौर नंदा जिचकार व सर्व प्रमुख पाहुण्यांनी खेळाडूंची ओळख करून देत गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.
 
प्रास्ताविकात क्रीडा सभापती नागेश सहारे यांनी फुटबॉल स्पर्धेमागची पार्श्वभूमी सांगितली. आई फाऊंडेशन मागील अनेक वर्षांपासून क्रीडा संस्कृती रुजवत आहे. यावर्षी महानगरपालिकेने या कार्याला बळ दिले आहे. संपूर्ण नागपुरात क्रीडाविषयक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, बसपाचे पक्ष नेते मोहम्मद जमाल आणि महाराष्ट्र ॲथेलेटिक्स संघटनेचे सचिव शरद सूर्यवंशी यांनी स्पर्धेला आणि खेळाडूंना आपल्या मार्गदर्शनातून शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी महापौर व अन्य मान्यवरांनी वृक्षारोपण केले.
 
संचालन मनपाचे क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी यांनी केले. आभार क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने यांनी मानले. स्पर्धेचे संपूर्ण नियोजन आई फाऊंडेशनचे ॲडविन ॲन्थोनी आणि त्यांचे सहकारी सांभाळीत आहेत.
 
पहिल्या सामन्यात नवरंग क्रीडा मंडळ विजयी
उद्‌घाटनपर पहिला सामना लकी स्टार मोमीनपुरा आणि नवरंग क्रीडा मंडळ, अजनी यांच्यात रंगला. हा सामना नवरंग क्रीडा मंडळाने ०-१ ने खिशात घातला. नवरंग क्रीडा मंडळाचा खेळाडू विनू पॉल याने ५२ व्या मिनिटाला गोल करीत सामना वळविला.
 
बुधवारी चार सामने
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता. २) चार सामने होतील. पहिला सामना एटू एजीडब्ल्यू बालाजीनगर विरुद्ध टाईम फॅसिलिटी चंद्रमणीनगर, दुसरा सामना दीप वारिअर्स अजनी विरुद्ध युनीटी क्लब मोतीबाग, तिसरा सामना एचएफटी हनुमाननगर विरुद्ध सोनझारी वारिअर्स बिडीपेठ तर चौथा सामना जुलिएट इलेव्हन कौशल्यानगर विरुद्ध गोंड बॉईज नवीन बस्ती सदर यांच्यामध्ये होईल.

 

 

पथदिवे दुरुस्तीचे कार्य तातडीने पूर्ण करा : महापौर नंदा जिचकार

महापौरांनी घेतला एलईडी पथदिवे कार्याचा आढावा
 
नागपूर, ता. १ : मार्गावरील पथदिवे बंद असल्यास नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. अंधारामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विद्युत विभागाने पथदिवे दुरुस्तीचे कार्य तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
  
मंगळवारी (ता. १ ऑगस्ट) मनपा मुख्यालयात एलईडी पथदिवे, सोलर वॉटर हिटर आणि सिग्नल संबंधित कामांचा आढावा महापौरांनी घेतला. यावेळी सत्तापक्ष नेते संदीप जोशी, अग्नीशमन व विद्युत विशेष समिती सभापती ॲड. संजय बालपांडे, धरमपेठ झोन सभापती रुपा राय, अपर आयुक्त डॉ. आर.झेड. सिद्धीकी, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, वित्त व लेखा अधिकारी मदन गाडगे यांच्यासह सर्व झोनल अधिकारी आणि कंत्राटदार उपस्थित होते.
 
बैठकीत महापौरांनी बंद असलेल्या पथदिव्यांचा झोननिहाय आढावा घेतला. तसेच बंद असलेले पथदिवे दुरुस्तीच्या कार्याचा आढावा घेऊन दुरुस्ती कार्य तातडीने पूर्ण कऱण्याचे निर्देश दिलेत. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात सुरू असलेल्या एलईडी पथदिवे लावण्याच्या पहिल्या टप्प्यात  २०५२ पथदिवे लावण्यात आले असल्याची माहिती कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल यांनी दिली. एलईडी पथदिवे कार्यात कंत्रटदारांना येणाऱ्या समस्या यावेळी महापौरांनी जाणून घेतल्या. तसेच कार्याची गती वाढवावी, अशा सूचना दिल्या.
 
शहरातील बंद असलेल्या वाहतूक सिग्नलमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सिग्नल दुरुस्तीकडे प्राधान्याने लक्ष देण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदाराला सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी दिल्या. पुढील आढावा बैठकीत प्रगती अहवाल सादर करावा, असे निर्देश यावेळी महापौरांनी दिले.

 

 

शिकस्त इमारतीसंदर्भात तातडीने अहवाल सादर करा : महापौर नंदा जिचकार

स्थापत्य व प्रकल्प आढावा बैठकीत सहायक आयुक्तांना दिले निर्देश
 
नागपूर,ता.१ : शिकस्त इमारतीसंदर्भात तातडीने अहवाल सादर करा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी सर्व झोनच्या सहायक आयुक्तांना दिले. पावसाळा सुरू झाल्याने शहरातील शिकस्त इमारतीचा आढावा महापौरांनी मंगळवारी (ता.१) मनपा मुख्यालयात डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात पार पडलेल्या स्थापत्य व प्रकल्प आढावा बैठकीत घेतला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
 
यावेळी बैठकीला स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले, उपसभापती अभय गोटेकर, समिती सदस्य शेख मोहम्मद जमाल मोहम्मद इब्राहीम, सदस्या विद्या कन्हेरे, पल्लवी श्यामकुळे, रश्मी धुर्वे, मुख्य अभियंता विजय बनगिरवार, नगररचना विभागाच्या सहायक संचालक सुप्रिया थूल, कार्यकारी अभियंता दिलीप जामगडे, डी.डी.जांभूळकर, अनिरूद्ध चौंगजकर, सतीश नेरळ, घनश्याम कुकरेजा, धंतोली झोन सहायक आयुक्त गणेश राठोड, सतरंजीपुरा झोन सहायक आयुक्त प्रकाश वराडे, लकडगंज झोन सहायक आयुक्त सुभाष जयदेव, आसीनगर झोनचे सहायक आयुक्त विजय हुमने, मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त हरिश राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.
 
नागपूर शहरातील शिकस्त झालेल्या इमारतींचा झोनअतंर्गत आढावा महापौरांनी घेतला. धंतोली झोनमध्ये १३ जीर्ण इमारती असून त्या सर्वांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यापैकी २ इमारतींवर कारवाईदेखील करण्यात आली. गांधीबाग झोनमध्ये ५९ घरांवर कारवाई करण्यात आली आहे. लकडगंज झोनमध्ये दोन शिकस्त इमारत असून त्या दोन्ही इमारतींवर कारवाई करण्यात आली. सतरंजीपुरा झोनमध्ये दोन शिकस्त इमारती असून दोन्ही इमारतींवर कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी झोनमध्ये २१ शिकस्त इमारती असून त्यापैकी २१ इमारतींवर कारवाई करण्यात आली. उर्वरित सात पैकी एका इमारतींवरील कारवाईचे काम प्रलंबित आहे तर सहा इमारतींचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे, अशी माहिती संबंधितझोन सहायक आयुक्तांनी महापौरांना दिली.
शहरामध्ये वाढत्या साथीच्या रोगाचे प्रमाण लक्षात घेता अर्धवट स्थितीत असलेल्या बांधकाम इमारतीमध्ये पावसाचे पाणी साचते त्यामुळे तेथे मच्छरांचा प्रादुर्भाव होतो. अशा इमारतींवर होणारा कारवाईचा आढावा घेतला असता कलम ५३ व ५४ अन्वये त्यावर कारवाई करण्याचा अधिकार झोन आयुक्तांना असल्याने अशा इमारतींचा शोध घेऊन त्याची माहिती सादर करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी झोन आयुक्तांना दिले.
 
महाराष्ट्र शासनाने २०१३ मध्ये महानगर अधिनियम अतंर्गत कलम २६५ (अ) अन्वये मनपाने केलेल्या बांधकामाच्या अंकेक्षणाची माहिती प्रशासनाला विचारली असता प्रशासनाने तीन आठवड्याचा अवधी मागितला. त्यावर महापौरांनी संमती दाखवत तीन आठवड्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
 
महाराष्ट्र शासनाने २०१३ मध्ये महानगर अधिनियम अतंर्गत कलम २६५ (अ) अन्वये मनपाने नियुक्त केलेल्या ११ स्टक्चरल डिझायनर्स यांना झोनअंतर्गत शिकस्त इमारतींना भेट देऊन त्याचे अंकेक्षण अहवाल तपासण्याचे आदेशसुद्धा महापौरांनी दिले.

 

 

मनपातील ४६ कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल सत्कार

नागपूर,ता. ३१ : नागपूर महानगर पालिकेच्या सेवेतून विविध पदावरून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सोमवारी (ता. ३१) मनपातील पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.
 
सत्कार समारंभाला निगम अधीक्षक राजन काळे, पेन्शन विभागाचे सहायक अधीक्षक दत्तात्रय डहाके, सहायक अधीक्षक प्रवीण आंबटकर, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, मनपा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजेश हाथीबेड, सचिव डोमाजी भडंग उपस्थित होते.
 
यावेळी बोलताना निगम अधीक्षक राजन काळे म्हणाले, केलेल्या कामाचे समाधान आज सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे. आयुष्यभर प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात सेवानिवृत्तीचा क्षण महत्त्वाचा असतो. हा क्षण अविस्मरणीय करण्याचा प्रयत्न आम्ही या सत्काराच्या निमित्ताने करीत असतो. सर्व कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्तीनंतरचा काळसुद्धा सेवाभावी कार्य करण्यात जाईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
मनपा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजेश हाथीबेड आणि सचिव डोमाजी भडंग यांनी सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शुभेच्छा देत मनपातील त्यांच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल अभिनंदन केले.
 
यावेळी सर्व कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. लोककर्म विभागाचे शाखा अभियंता के. एन. गोरले, जलप्रदाय विभागाचे शाखा अभियंता बी. एस. कुसुंबे, सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ लिपिक व्ही.सी. धनविजय, आर.जी. भोसले, स्थानिक संस्था कर विभागातील कनिष्ठ निरीक्षक आर. एम. नागपुरे, मुख्याध्यापिका मालती शर्मा, श्रीमती माया कडवी, श्रीमती नुजहत जलील साज यांच्यासह ४६ कर्मचाऱ्यांचा सत्कारमूर्तींमध्ये समावेश होता.
 
सेवानिवृत्तीबद्दल झालेल्या सत्कारानंतर सत्कारमूर्तींनी नागपूर महानगरपालिकेप्रति कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले. आभार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजेश हाथीबेड यांनी मानले. 
 
 

 

सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी : महापौर नंदा जिचकार
 
शहीद सफाई सैनिक दिनानिमित्त महापौर व आयुक्तांच्या हस्ते ५० गुणवंत कर्मचाऱ्यांचा सत्कार
 
नागपूर, ता. ३१  : स्वच्छ व सुंदर शहर साकारण्यात सफाई कर्मचाऱ्यांचे मोठा योगदान आहे. शहराची स्वच्छता सफाई कर्मचाऱ्यांवर अवलंबून आहे. कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य पार पाडावे. यासोबतच आपल्या आरोग्याची काळजी प्राधान्याने घ्यावी. व्यसनांपासून दूर रहावे. आपल्या कार्याची पावती नक्कीच आपल्याला मिळेल, असे मार्गदर्शन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
 
शहीद सफाई सैनिक दिनानिमित्त सोमवारी (ता. ३१) मनपा मुख्यालय, सिव्हील लाईन येथे ५० गुणवंत कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार होत्या. यावेळी विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, महिला व बाल कल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, मनपा आयुक्त अश्विन मुदगल, नगरसेविका वंदना चांदेकर, विरंका भिवगडे, रश्मी धुर्वे, रुतिका मेश्राम, नगरसेवक विजय चुटेले, लखन येरावार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, मनपा राष्ट्रीय कर्मचारी युनीयनचे कार्याध्यक्ष राजेश हातीबेड तसेच दहाही झोनचे झोनल अधिकारी, स्वास्थ निरीक्षक व सफाई कामगार मोठ्या संख्येत उपस्थित होते.
 
यावेळी मनपा आयुक्त अश्विन मुदगल म्हणाले,  शहीद सफाई सैनिक दिनानिमित्त  शहराच्या स्वच्छतेसाठी दिवसरात्र झटणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येत आहे, ही कौतुकाची बाब आहे. मा. पंतप्रधानाच्या स्वच्छ भारत अभियानाला यशस्वी करण्यात सफाई कामगारांचा खारीचा वाटा आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडल्यास स्वच्छ नागपूर साकारणे सहज शक्य असल्याचे सांगत आय़ुक्तांनी गुणवंत सफाई कर्मचा-यांचे अभिनंदन केले.
 
यावेळी शहीद सफाई सैनिक दिनानिमित्त मुंबई येथील मंत्रालय ते नागपूरचा प्रवास सायकलवर पूर्ण करुन सोमवारी नागपुरात दाखल झालेल्या चौघांचाही सत्कार महापौरांच्या हस्ते कार्यक्रमादरम्यान करण्यात आले.

 

 

दिव्यांगांसाठी आरक्षित गाळ्यांची सोडत

नागपूर,ता. ३१ : दिव्यांगाना महानगरपालिकेच्या वतीने व्यवसायासाठी बाजार परिसरात दुकाने देण्यात यावे, ही मागणी सोमवारी सत्यात उतरली. महानगरपालिकेच्या बाजार विभागाअंतर्गत रिक्त असलेल्या दुकानांसाठी सोमवारी सोडत काढण्यात आली. तीन दिव्यांगांना दुकाने तर दोघांना ओटे वाटप करण्यासाठी ही सोडत होती.
 
उपायुक्त रवींद्र देवतळे यांनी ही प्रक्रिया पार पाडली. यावेळी नगरसेवक दिनेश यादव उपस्थित होते. प्रारंभी दुकान वाटपासंदर्भात दिव्यांगांच्या प्रतिनिधींनी चर्चा केली. उपायुक्त रवींद्र देवतळे म्हणाले, दिव्यांग संघटनांसोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर दुकान आणि ओटे वाटपांसंदर्भात धोरण ठरविण्यात आले. त्यानुसार सध्या रिक्त असलेल्या दुकान आणि ओट्यांमध्ये तीन टक्के आरक्षित करण्यात आले. या तीन टक्क्यानुसार तीन दुकाने आणि दोन ओट्यांसाठी सोडत काढण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. यानंतर मनपातर्फे तयार करण्यात येत असलेल्या हॉकर्स झोनमध्येही दिव्यांगांना ते ज्या झोनमधील रहिवासी आहेत, त्या भागात त्यांना जागा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहितीही श्री. देवतळे यांनी दिली.
 
यानंतर काढण्यात आलेल्या सोडतीत विजय बाबूराव मेंढे, रवी प्यारेलाल चुटेले आणि गजानन डोमकावळे यांचे नाव दुकानासाठी तर अमर नगरवाडीया आणि उदय मिसाळ यांचे नाव ओट्यासाठी जाहीर करण्यात आले. मनपाने पुढाकार घेऊन दिव्यांगांसाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून ही प्रक्रिया सुरू केल्याबद्दल उपस्थित सर्व दिव्यांग बांधवांना मनपा प्रशासनाचे आभार मानले.

 

 

गणेश विसर्जनापूर्वी कृत्रिम तलावांचे बांधकाम पूर्ण करा - आयुक्त अश्विन मुदगल

मनपा आय़ुक्तांनी घेतला गणेश विसर्जन पूर्वतयारीचा आढावा
 
नागपूर, ता. २९ : पर्यावरणा संवर्धनाबद्दल नागरिकांमध्ये जनजागृती वाढली आहे. कृत्रिम तलावांमध्ये गणेश विसर्जनाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे. हे लक्षात घेता शहरातील तलावांमध्ये बांधण्यात येणाऱ्या विसर्जनासाठीच्या कृत्रिम तलावांचे बांधकाम गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करा. शहरातील विविध परिसरातील मूर्ती विसर्जनाचे प्रमाण लक्षात घेता कृत्रिम तलावांच्या  संख्येत आवश्यकतेनुसार वाढ करा, असे निर्देश महानगरपालिकेचे आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिले.
 
शहरातील विविध तलावांजवळ गणेश विसर्जनासाठी मनपा व पोलिस विभागातर्फे करण्यात येणाऱ्या पूर्व तयारीचा आढावा मनपा आय़ुक्तांनी शनिवारी (ता. 29 जुलै) घेतला. विसर्जनाच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सोयी सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश यावेळी आयुक्तांनी दिलेत.
 
शनिवारी आय़ुक्तांनी गांधीसागर, सक्करदरा, सोनेगाव, अंबाझरी, फुटाळा तलाव येथील सोयीसुविधांचा आढावा घेतला. यावेळी उपायुक्त जयंत दांडेगावकर, पोलिस उपायुक्त (विशेष शाखा) नीलेश भरणे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, पशुचिकित्सा अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले, सहायक आयुक्त गणेश राठोड, महेश मोरोणे, राजेश कराडे, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, नगरसेविका हर्षला साबळे यांची उपस्थिती होती.
 
गेल्यावर्षी कृत्रिम तलावांचा झालेला उपयोग, नागरिकांचा मिळालेला प्रतिसाद आणि आलेल्या समस्यांबद्दल यावेळी आयुक्तांनी माहिती जाणून घेतली. तसेच परिसरातील नागरिकांनाही याबद्दल विचारपूस केली. नागरिकांनीही कृत्रिम तलावाचा विसर्जनासाठी वापर करावा, असे आवाहन आयुक्त अश्विन मुदगल यांनी केले. पाहणी दरम्यान तलाव येत असलेल्या हद्दीतील पोलिस ठाण्याच्या ठाणेदारांचीही यावेळी उपस्थिती होती.

 

 

प्रत्येकाने आयुष्यभर विद्यार्थी राहावे – डॉ. रामनाथ सोनवणे

-  पहिल्या घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळेचे उद्घाटन
 
नागपूर, ता. 28 जुलैः कुठल्याही सेवेत कार्यरत असताना आपल्या क्षेत्राशी संबंधीत वेळोवेळी येणारे नवीन कायदे आणि नियमांबद्दल स्वतःला “अपडेट” ठेवणे ही सवय प्रत्येकाने अंगीकारण्याची गरज आहे. सतत नवीन काही शिकण्याची चिकाटी असल्यास आपली जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडता येईल, असे मार्गदर्शन स्मार्ट सिटी प्रकल्प(नागपूर) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांनी केले. इक्विसीटीतर्फे स्वच्छता निरीक्षकांसाठी “घनकचरा व्यवस्थापन नियम 2016” नियमांबद्दल माहिती देण्यासाठी पहिल्या कार्यशाळेचे आयोजन दिक्षाभूमी येथील सभागृहात कऱण्यात आले होते. 
     
कार्यशाळेचे उद्घाटन स्मार्ट सिटी प्रकल्प (नागपूर)चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांच्याहस्ते झाले. यावेळी अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, सहायक आय़ुक्त महेश धामेचा, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गर्व्हमेंट (एआयआयएलएसजी)चे संचालक (टेक.) पाशिम तेहरी, एआयआयएलएसजी नागपूर केंद्र संचालक जयंत पाठक, इक्विसिटी प्रकल्प समन्वयक डॉ. अम्रिता आनंद यांची उपस्थिती होती.
 
इक्विसिटीतर्फे विविध अधिकारी आणि कर्मचा-यांसाठी 10 कार्यशाळांचे आय़ोजन करण्यात आले असून याची सुरुवात आज झाली. कार्यशाळेत घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार प्रशासकिय जबाबदारी आणि कार्य, तसेच नागरिक आणि संस्था यांच्या जबाबदा-या आदींबद्दल माहिती वेस्ट मॅनेजमेंट रिसर्च केंद्राच्या (डब्लूएमआरसी) मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. स्नेहा पालनिटकर यांनी दिली. 

 

 

मनपा तर्फे पर्यावरण संरक्षण व शाश्वत विकास या विषयावर चर्चासत्राचे आयोजन

नागपूर,ता.२९. नागपूर महानगरपालिका व ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जलवायु कार्यक्रमअंतर्गत मनपाच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर माध्यामिक व कनिष्ठमहाविद्यालयात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, प्राचार्या रजनी देशकर, ग्रीन डे नेटवर्कचे प्रबंधक नवनील दास, ग्रीनव्हिजीलचे कौस्तभ चॅटर्जी प्रामुख्याने उपस्थित होते.
 
यावेळी नवनील दास यांनी पीपीटीच्या माध्यमातून विद्यार्थांना पर्यावरण संवर्धन व संरक्षण आणि शाश्वत विकास या विषयाचे प्राथमिक माहिती दिली. कार्बन उस्तर्जनचे प्रमाण कसे कमी करता येईल, त्यावर उपाय व त्याप्रयत्नांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पर्यावरण विषयावर प्रश्नमंजूषा आयोजित करण्यात आली होती. पाच विजयी विद्यार्थांना ग्रीनडे नेटवर्कच्यावतीने भेटवस्तु देण्यात आली. पर्यावरण संरक्षणाबाबत आपण जागरूक राहणे गरजेचे असून त्यासाठी स्वच्छता ठेवणे हे अत्यावश्यक आहे. आपले घर, आपलापरिसर, आपली शाळा ही कशी स्वच्छ राहील यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी केले.
 
संपूर्ण जगामध्ये २२ एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो. ग्रीन डे नेटवर्क ही संस्था जगातील १९५ देशांमध्ये पर्यावरण विषयावर काम करते. यासंस्थेचे मुख्यालय वाशिंग्टन येथे आहे. भारतात कोलकता येथे या संस्थेचे मुख्यालय आहे. या संस्थेने भारतातील २७ शहरांचे सर्वेक्षण करून जे शहर पर्यावरण क्षेत्रातउल्लेखनीय कामगिरी करणा-या अश्या १२ शहरांना पुरस्कार प्रदान केला आहे. त्यामध्ये नागपूर एक शहर असल्याची माहिती ग्रीन व्हिजीलचे संस्थापक कोस्तभ चॅटर्जी यांनीदिली.
 
प्रारंभी दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. मान्यवरांचे स्वागत प्रचार्या रजनी देशकर यांनी केले. संचालन वंदना दांडेकर व आभारप्रदर्शन जार्ज टेरेसा यांनी केले. याचर्चासत्रात मनपाच्या ६ शाळांनी सहभाग घेतला.
 
कार्यक्रमाला शाळा निरीक्षक सुषमा बावनकर, प्रिती बंडेवार, संजय पुंड,मंगला डाहारे, ग्रीन व्हिजीलचे  सुरभी जयस्वाल, कल्याणी वैद्य, मेहूल कोसरकर, शाळेतील शिक्षक वविद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

 

सार्वजनिक मंडळांच्या मूर्तींचे विसर्जनाची स्वतंत्र व्यवस्था करा - मनपा आयुक्त अश्विन मुदगल

- पोलिस आयुक्त कार्यालयात पूर्वतयारी आढावा बैठक
 
नागपूर, ता. 27 जुलैः नागरिकांच्या सोयीनुसार आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने तलावांमध्ये सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन नेमून दिलेल्या ठिकाणी करावी, तसेच घरगुती विसर्जनासाठी कृत्रिम तलावाचे उपयोग करण्यासाठी आवश्यक पूर्व  तयारी करावी, असे निर्देश महानगरपालिका आय़ुक्त अश्विन मुदगल यांनी दिले. पोलिस आयुक्त कार्यालयात आयोजित गणेशोत्सव पूर्व तयारी आढावा बैठकीचे आय़ोजन गुरुवारी (ता. 27 जुलै) करण्यात आले होते. प्रामुख्याने पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, अतिरिक्त मनपा आयुक्त रविंद्र कुंभारे, पोलिस उपायुक्त (वाहतुक) रविंद्र सिंग परदेसी, पोलिस वाहतुक विभागाच्या झोनचे पोलिस निरीक्षक, मनपा कार्यकारी अभियंता (वाहतुक) दामोदर जांभुळकर, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, डॉ. गजेंद्र महाले, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय ) सं.श. गायकवाड,मनपा सर्व झोनचे सहायक आय़ुक्त, मनपा जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर आदींची उपस्थिती होती.
 
गणेशोत्सवात मिरवणूकीचा मार्ग निश्चित करण्यात आला असून या मार्गावरील देखभाल दुरुस्तीचे कार्य गणेशोत्सवापूर्वीच पूर्ण करावे अशा सूचना मनपा आय़ुक्तांनी दिल्या. भाविकांच्या सोयीसाठी मूर्ती विसर्जनस्थळी सूचना फलक लावण्यात यावे, अशा सूचनाही देण्यात आल्या. सार्वजनिक गणेश मंडळांना सोयीचे व्हावे यासाठी एक खिडकी परवानही सुविधा झोनन स्तरावर देण्यासाठीही पूर्वतायारी करण्यात यावी असे निर्देश मनपा आय़ुक्तांनी दिले. शहरात विविध ठिकाणी सुरु असलेल्या विकास कामांमुळे वाहतुकीला येणा-या अडथळ्याबद्दलची माहिती पोलिस विभागाच्या अधिका-यांनी दिली. बैठकीत शहरातील नादुरुस्त सिग्नल, अतिक्रमण, तसेच विविध विकासकामामुळे खोदलेल्या फुटपाथ बद्दलचा आढावा पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेश आणि मनपा आय़ुक्त अश्विन मुदगल यांनी घेतला. नागरिकांना सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी मनपाच्या प्रत्येक प्रयत्नात पोलिस विभागाचे सहकार्य राहणार असल्याची ग्वाही यावेळी पोलिस आय़ुक्तांनी दिली.

 

 

शाळांची दशा व दिशा बदलविण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची - सभापती प्रा.दिलीप दिवे

पुनर्रचित अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक प्रशिक्षण वर्गाला आकस्मिक भेट
 
नागपूर,ता.२७.जुलै-  नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे व त्यांच्या भविष्याला नव दिशा मिळावी याकरिता  शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे असे प्रतिपादन मनपा शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे यांनी केले. साने गुरूजी उर्दू शाळेत सुरूअसलेल्या इयत्ता ७ वी च्या पुनर्रचित अभ्यासक्रम पाठ्यपुस्तक प्रशिक्षण वर्गाला आकस्मिक भेट प्रसंगी ते बोलत होते.यावेळी त्यांच्यासमवेत उपसभापती स्नेहल बिहारे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, सहायक शिक्षणाधिकारी मीना गुप्ताउपस्थित होते.
 
पुढे बोलताना सभापती दिवे म्हणाले, भविष्यात प्रत्येक कार्य घरी बसून करता येणार आहे तेव्हा अश्या प्रशिक्षणाचीआवश्यकता आहे. स्वताःच्या विद्यार्थांच्या भवितव्याबद्दल जागरूक राहण्याचे आवाहन त्यांनी शिक्षकांना केले. मनपाच्याकिमान १० शाळा अश्या तयार करा ज्या नागपुरातील शाळांच्या स्पर्धेत उतरेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याप्रशिक्षणवर्गाचा लाभ सर्व विद्यार्थांपर्यंत पोहचविण्याचा आदेश सभापतींनी दिला. उपसभापती स्नेहल बिहारे यांनी महानगरपालिकेच्याविद्यार्थांचा शैक्षणिक दर्जा शिक्षकांनी उंचविण्याची अपेक्षा व्यक्त केली. शिक्षकांनी जुनी मानसिकता बदलवून नव्या बदलांनासामोरे जाण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी केले.
 
कार्यक्रमाला सर्व शिक्षा अभियानाचे सहायक कार्यक्रम अधिकारी धनलाल चौलीवार, प्रशिक्षण प्रमुख संध्या पवार, प्रशिक्षणसमन्वयक राजेंद्र घाईत, संजय भाटी, शेषराव उपरे, शुभांगी वाघमारे उपस्थित होते.

 

 

स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत अधिकाधिक प्रसाधनगृहे देणार - आयुक्त अश्विन मुदगल

जपानी गार्डन येथे प्रसाधनगृहाचे उद्घाटन
 
नागपूर,ता-२७जुलै.  नागपूर महानगरपालिका व रोटरी कल्ब यांच्या संयुक्त विद्यमाने नागपूर शहरातील जपानी गार्डन येथेप्रसाधनगृहाचे उद्घाटन महापालिकेचे आयुक्त अश्विन मुदगल यांच्या हस्ते करण्यात आले.
 
याप्रसंगी नगरसेविका शिल्पा धोटे, नगरसेविका प्रगती पाटील, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त उपायुक्त जयंतदांडेगावकर, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे, मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त हरिश राऊत, कार्यकारीअभियंता डी.डी.जांभूळकर, रोटरीचे अध्यक्ष प्रमोद जवांगिया, सचिव पियुष फत्तेपुरिया प्रामुख्याने उपस्थित होते.
 
नागपूर शहरात ५० सार्वजनिक प्रसाधनगृह तयार करण्याचे महानगरपालिकेने ठरविलेले आहे. नागपूर शहर स्मार्ट सिटीच्यादृष्टीने अग्रेसर होत आहे. स्वच्छ भारत या मोहिमेअंतर्गत शहर स्वच्छ राहावे याकरिता काही जागी स्वच्छतागृह प्रसाधन गृहतयार करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिली. या सर्व स्वच्छतागृह व प्रसाधनगृहाचीदेखभाल महापालिकेद्वारे नेमणूक करण्यात आलेल्या एजेंसीला देण्यात येणार आहे. शहरात तयार केलेले प्रसाधनगृह हेगुगल मॅप वर दिसणार असून त्याद्वारे या प्रसाधनगृहाचा शोध नागरिकांना घेता येणार आहे. या प्रसाधनगृहांना फिडबॅकचीसोयही करण्यात आली असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. या मोहिमेअंतर्गत शहरातील प्रतिष्ठीत संस्थांनी व संघटनांनीपुढाकार घ्यावा असे आवाहन यावेळी श्री.मुदगल यांनी केले.
 
कार्यक्रमाला धरमपेठ झोनचे डी.पी.टेंबेकर, रोटरी कल्बचे माजी अध्यक्ष विजयश्री खानोरकर, संजय मोहता, रवी अग्रवाल,नरेश जैन उपस्थित होते.

 

 

 

दहीबाजार उड्डण पुलाला शहीद बाबूलाल बैरागी यांचे नाव द्या

नगरसेवक धम्मपाल मेश्राम यांनी दिले महापौरांना निवेदन
 
नागपूर, ता. २६ :* नागपूर महानगर पालिकेतर्फे प्रभाग क्र. २१ अंतर्गत येणाऱ्या नवीन इतवारी येथे बांधण्यात आलेल्या दही बाजार उड़ाण पुलाला शहीद बाबूलाल बैरागी यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक धम्मपाल मेश्राम यांनी केली आहे.
 
या आशयाचे निवेदन महापौर नंदा जिचकार यांच्याकडे त्यांनी सोपविले. निवेदनात नमूद केल्यानुसार, शहीद बाबूलाल बैरागी यांनी सन १९४२ स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला होता. १४ ऑगस्ट १९४२ रोजी याच रस्त्यावर इंग्रजांच्या गोलीबारात ते शहीद झाले. त्यांच्या स्मृती नव्या पिढीला प्रेरणादायी ठराव्या यासाठी परिसरातील नागरिकांची अनेक दिवसांपासूनची मागणी होती. नगरसेवक धम्मपाल मेश्राम यांनी नागरिकांची ही मागणी महापौरांपर्यंत पोचविली. नागरिकांच्या भावनांचा मान ठेवून पुलाचे नामकरण शहीद बाबूलाल बैरागी उड़ानपूल करण्यात यावे अशी आग्रहाची विनंती श्री. मेश्राम यांनी केली.
 
निवेदनाची दखल घेत जनभावनेचा आदर आम्ही नक्की करू, असे आश्वासन महापौर नंदा जिचकार यांनी नगरसेवक मेश्राम यांना दिले.

 

 

भविष्यातील आजार रोखण्यासाठी नियमीत लसीकरण 

आवश्यक : सभापती मनोज चापले
 
सामुदायिक औषधोपचार मोहिमेचा शुभारंभ
 
नागपूर,ता.२६ : भविष्यातील आजार टाळण्यासाठी रोगप्रतिबंधक लस टोचणे आवश्यक आहे. नियमित लसीकरण करणे गरजेचे आहे. होणाऱ्या आजाराची आतापासूनचकाळजी घ्यावी, असे प्रतिपादन वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांनी केले.
 
नागपूर महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाअंतर्गत नागपूर शहरातील स्लम भागात २६ ते ३० जुलै या कालावधीत मनपाअंतर्गत येणाऱ्या दहाही झोनमध्ये सामुदायिक औषधोपचार  मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा शुभारंभ बुधवारी (ता. २६) हनुमाननगर झोनअंतर्गत येणाऱ्या गायत्री नगर वस्तीतून करण्यात आला.याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी समाजसेवक प्रशांत कामडे, हिवताप व हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
पुढे बोलताना श्री. चापले म्हणाले, नागरिकांना कुठलाही आजार होणार नाही यासाठी नागपूर महानगरपालिकेचा आरोग्य विभाग प्रयत्नरत असतो. कोणताही आजार नहोण्यासाठी रोग प्रतिबंधक लस व औषधे आरोग्य विभाग पुरवित असतो. आपले घर व आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी असून परिसरात कुठलाहीकचरा होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
 
प्रशांत कामडे म्हणाले, नागरिकांनी आपली सामाजिक बांधिलकी समजून हत्तीरोग नियंत्रण एक दिवसीय उपचारास सहकार्य केल्यास हत्तीरोग या आजारावर नियंत्रण होवूनआरोग्य संपन्न होईल.
 
या सामुदायिक औषधोपचार मोहिमेअंतर्गत नागपूर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघरी जाऊन डी.ई.सी. व अलबेंडाझ़ॉल या गोळ्यांचे वाटप करणारअसल्याची माहिती हिवताप व हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे यांनी दिली. या गोळ्यांचे सेवन करून सामुदायिक औषधोपचार मोहिमेस सहकार्य करा, असे आवाहन त्यांनीकेले.
 
कार्यक्रमाला हनुमाननगर झोनचे विभागीय स्वास्थ निरीक्षक सत्यवान मेश्राम, अनिल दवंडे, अरूण येनुरकर, मनपामधील आरोग्य विभागाचे कर्मचारी,परिसरातील नागरिकउपस्थित होते.

 

 

सार्वजनिक वाहतुकीत स्वच्छतेला प्राधान्य : आ. कृष्णा खोपडे

स्वयंचलित ‘बस स्वच्छता यंत्रा’चे उद्‌घाटन
 
नागपूर, ता.२५ : नागपूर शहर आता बदलत आहे. ‘स्मार्ट शहरा’च्या दिशेने वाटचाल करणाऱ्या नागपूर शहरातील सार्वजनिक वाहतूकही आता ‘स्मार्ट’ होत आहे. शहर बसमध्ये स्वच्छतेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात येत आहे. त्यासाठीच आता स्वयंचलित बस स्वच्छता यंत्र सेवेत दाखल झाले असून यामुळे ‘आपली बस स्वच्छ बस’ असे म्हणणे वावगे ठरणार नाही, असे प्रतिपादन आमदार कृष्णा खोपडे यांनी केले.
 
परिवहन विभाग व आर.के.सिटी बस ऑपरेटर यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या स्वयंचलित बस सफाई यंत्राच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी परिवहन समिती सभापती बंटी कुकडे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना सभापती बंटी कुकडे म्हणाले, नागपूर शहरातील प्रत्येक नागरिकासाठी सार्वजनिक वाहतूक सोयीची करू. ‘आपली बस’ ही अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज असेल. इतकेच नव्हे तर प्रत्येक बसच्या स्वच्छतेकडेही विशेष लक्ष असेल. नागरिकांना खऱ्या अर्थाने ही बस आपली हक्काची बस वाटायला हवी, असेही ते म्हणाले.
         
कार्यक्रमाला आर.के.सिटी.बस ऑपरेटर्सचे व्यवस्थापकीय संचालक नीलमनी गुप्ता, संचालक मनोहरलाल कथेरिया, परिवहन विभागाचे योगेश लुंगे, संजय मोहले, प्रवीण सरोदे, आदित्य छाजेड, सी.पी.तिवारी, दीपक मगर, परिवहन विभागाचे कर्मचारी व ऑपरेटर्स उपस्थित होते.

 

 

महिला व बाल कल्याण समितीतर्फे वृक्षारोपण

नागपूर,ता.२५. नागपूर महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अंबाझरी येथील सुदाम नगरी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी महिला व बाल कल्याण समिती सभपाती वर्षा ठाकरे, उपसभापती श्रद्धा पाठक, उपायुक्त व समाज कल्याण अधिकारी डॉ.रंजना लाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
        
महिला व बाल कल्याण समितीने ठरविलेल्याप्रमाणे नागपूर शहरात वृक्षारोपण सुरू केले असून त्या झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी स्थानिक महिला बचत गटाकडे सोपविण्यात आली असल्याची माहिती सभापती वर्षा ठाकरे यांनी दिली.
        
कार्यक्रमाला समाजकल्याण विभागाचे चंद्रशेखर पाचोडे, विकास बागडे, धरमपेठ झोनचे विभागीय आरोग्य अधिकारी घोडसकर, तसेच मनपाचे अधिकारी उपस्थित होते.

 

 

हत्तीरोग दुरीकरणासाठी सामुदायिक

औषधोपचार मोहिमेचा शुभारंभ २६ ला
 
नागपूर,ता. २६ : नागपूर महानगरपालिकेच्या हिवताप व हत्तीरोग विभागाअंतर्गत नागपूर शहरातील स्लम भागात २६ ते ३० जुलै या कालावधीत मनपाअंतर्गत येणाऱ्या दहाही झोनमध्ये सामुदायिक औषधोपचार  मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा शुभारंभ बुधवारी (ता. २६) सकाळी ९.३० वाजता मनपा मुख्य कार्यालयातून होणार आहे.  
 
या मोहिमेकरिता शहरातील स्लम वस्त्यांच्या निवड करण्यात आली असून नऊ लाख लोकांना गोळ्या वाटण्यात येणार आहे. या मोहिमेकरिता ६१६ गोळ्या वाटप कर्मचारी आणि ५३ पर्यवेक्षक नियुक्त राहतील. विभागातील संपूर्ण कर्मचारी, आरोग्य विभागातील कर्मचारी, अंगणवाडी सेवाका, स्वयंसेवक, आरोग्य सेविका, सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक आदींच्या सहकार्यातून सदर कार्यक्रम राबविण्यात येत आहे. गोळ्या वाटप करताना दोन वर्षाखालील बालके, गंभीर आजार असणारे, गरोदर माता यांना त्यातून वगळण्यात आले आहे. जनतेने या मोहिमेचा लाभ घेऊन गोळ्यांचे सेवन करावे आणि निरोगी राहावे, असे आवाहन हिवताप व हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे यांनी केले आहे.

 

 

पर्यवरणाचा समतोल राखण्यास वृक्षारोपण काळाची गरज : संदीप जाधव

मुख्यमंत्र्यांच्या वाढसिवसानिमित्त  मनपातर्फे मेकोसाबाग येथे वृक्षारोपण
 
नागपूर, ता. २३: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी (ता. २३) मनपातर्फे मेकोसाबाग शाळा परिसरातील भव्य पटांगणात स्थायी समिती सभापती संदीप जाधव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. 
 
यावेळी विविध प्रजातीची ५० वृक्ष शाळा परिसरात लावण्यात आली. याप्रसंगी बोलताना सभापती संदीप जाधव म्हणाले, वृक्षारोपनानंतर वृक्ष संवर्धन करणे ही विद्यार्थी आणि शिक्षकांची जबाबदारी आहे. पर्यावरणाचा समतोल राखणे ही काळाची गरज आहे. वृक्षलागवड ही आपली जबाबदारी आणि वृक्ष संवर्धन हे आपले कर्तव्य समजावे, असेही ते म्हणाले. 
 
यावेळी बबली मेश्राम, मेकोसाबाग विद्यालयाचे मुख्याध्यापक गायकवाड़, मेथोडीक चर्चचे जिल्हा समन्वयक आर. एन. सिंह, शिक्षक आणि परिसरातील गणमान्य व्यक्ती उपस्थित होते.

 

 

शेतकरी समृद्धी, मुख्यमंत्र्यांच्या दीर्घायुरोग्यासाठी भाजयुमोने केला महामृत्युंजय जप

नागपूर, ता. २३* : भारतीय जनता युवा मोर्चा दक्षिण-पच्छिम मतदारसंघातर्फे  शेतकऱ्यांच्या सुखसमृद्धीसाठी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दीर्घायुरोग्यासाठी श्री महामृत्युंजय जप आणि हवन कार्यक्रमाचे आयोजन हिंगणा मार्गावरील श्री शिव मंदिर येथे करण्यात आले होते. 
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमाला महापौर नंदा जिचकार, मनपा सत्ता पक्ष नेते संदीप जोशी, शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे, नगरसेवक प्रमोद तभाणे, नगरसेवक किशोर वानखेडे, नगरसेविका श्रीमती कडू, नगरसेविका मीनाक्षी  तेलगोटे, पल्लवी शामकुळे,   भाजपचे दक्षिण-पच्चिम विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष रमेश भंडारी,भाजयुमोच्या शहर अध्यक्षा शिवणी दाणी उपस्थित होत्या. यावेळी उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यानी शेतकऱ्यांच्या सुख समृद्धीसाठी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दीर्घायुरोग्यासाठी कामना केली. 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दक्षिण-पच्चिम विधानसभा क्षेत्राचे भाजयुमोचे अध्यक्ष पारेन्द्र पटले, महामंत्री मंगेश झाड़े, विनोद दाढे अनुप सवाईतुल, विक्रम उम्बरकर, संपर्क प्रमुख हितेश घुई, हर्षल तिजारे आदींनी योगदान दिले.

 

 

कर न भरणाऱ्यांविरुद्ध वॉरंट जारी करा

सभापती संदीप जाधव : अभय योजनेचा घेतला आढावा
 
नागपूर,ता. २१ : जे करदाते आपला थकीत मालमत्ता व पाणी कर भरणार नाही त्यांच्या विरूध्द वॉरंट जारी करा, असे निर्देश स्थायी समिती सभापती संदीप जाधव यांनी दिले.  
 
नागपूर महानगरपालिकेद्वारे थकीत कर धारकांसाठी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. १७ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान कराची रक्कम भरणाऱ्या ग्राहकांना मालमत्ता कराच्या दंडाची रक्कम ९० टक्के आणि पाणी कर दंडाची रक्कम १०० टक्के माफ करण्यात येत आहे. या योजनेचा आढावा झोन सहायक आय़ुक्तांमार्फत शुक्रवारी (ता.२१) सभापतींनी घेतला. यावेळी स्थायी समिती सदस्या संगीता गिऱ्हे, गीता मुळे, उषा पायलट, दुर्गा हत्तीठेले, भाग्यश्री कानतोडे, नेहा वाघमारे, सरला नायक, मनिषा कोठे, लता काडगाये, सरीता कावरे, जयश्री वाडीभस्मे, जितेंद्र घोडेस्वार, मनोज सांगोळे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अधीक्षक अभियंता दीपक सोनटक्के, कार्यकारी अभियंता संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी.जांभूळकर, कर अधीक्षक श्रीकांत वैद्य प्रामुख्याने उपस्थित होते.
     
पुढे बोलताना संदीप जाधव म्हणाले, शतप्रतिशत कर वसुली हे महानगरपालिकेचे उद्दिष्ट आहे. शंभर टक्क्यापेक्षा कमी करवसुली खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. जे कर्मचारी कामात हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत सभापती संदीप जाधव यांनी दिले. जे मालमत्ता कर थकीतदार आहेत त्यांच्या मालमत्तेचा लिलाव करा, असे आदेशही त्यांनी यावेळी बोलताना दिले. यावेळी झोन सहायक आयुक्तांमार्फत कर वसुलीचा आढावा त्यांनी यावेळी घेतला.

 

 

मनपाच्या शाळांचा शैक्षणिक स्तर वाढविण्यासाठी तज्ज्ञ समिती

दहा दिवसांत सर्वेक्षण अहवाल सादर करा : शिक्षण समिती सभापती प्रा. दिलिप दिवे यांचे निर्देश
 
नागपूर, ता. २१ : नागपूर महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, तसेच शाळांची पटसंख्या वाढावी या उद्देशाने मनपाच्या सर्व शाळांचे ३६ प्रश्नी सर्वेक्षण शाळा निरीक्षकांनी करुन दहा दिवसात आपला अहवाल सादर करावा, असे निर्देश शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी दिले.
 
शुक्रवारी (ता. २१) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिक्षण समिती सदस्य नगरसेवक विजय झलके, राजेंद्र सोनकुसरे, उज्ज्वला बनकर, दर्शनी धवड, इब्राहिम अहमद, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, सहायक शिक्षण अधिकारी (प्राथमिक) मीना गुप्ता, सहायक शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कुसुम चाफलेकर, सहायक कार्यक्रम अधिकारी (सर्व शिक्षा अभियान) धनलाल चौलीवार यांच्यासह सर्व दहाही झोनच्या शाळा निरीक्षकांची उपस्थिती होती.
 
मनपा शाळेतील ७० टक्के विद्यार्थ्यांचे आधार कार्ड आणि बॅंक खाते उघडले आहे. शिवाय १० टक्के विद्यार्थ्यांचे आधार कार्ड आणि बॅंक खात्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती शाळा निरीक्षकांनी शिक्षण सभापतींना दिली. बैठकीत शालेय पोषण आहार सुरू ठेवण्याबाबत माहितीही देण्यात आली. आतापर्यंत ५५८ मनपा शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत  ‘आपली बस’ च्या पासेस देण्यात आल्या आहेत. शाळा व झोनस्तरीय विद्यार्थ्यांच्या पट नोंदणीचा आढावाही निरीक्षकांनी सादर केला.
 
सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार
मनपा शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे आधार कार्ड काढणे आणि त्यांचे बॅंक खाते काढण्याच्या कामाला गती देऊन येत्या दहा दिवसांत पूर्ण करा असे निर्देशही यावेळी शिक्षण सभापतींनी दिले. शिवाय सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निरीक्षकाचा सत्कार करण्यात येणार असल्याचेही यावेळी शिक्षण सभापतींनी सांगितले.

 

 

उपमहापौर दीपराज पार्डीकर यांचा सत्कार

नागपूर,ता.१९. उपमहापौर दीपराज पार्डीकर यांचा कुन्दनलाल गुप्ता नगर उर्दू माध्यामिक शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी सतरंजीपूरा झोन सभापती संजय चावरे प्रामुख्याने उपस्थित होते. शाल,श्रीफळ, व सन्मानपत्र असे सत्काराचे स्वरूप असून शाळेचे मुख्याधापक शकील अख्तर, प्राथमिक विभागाच्या मुख्याधापिका मुमताज बेगम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
       
शाळेत नव्याने तयार करण्यात आलेल्या डिजीटल वर्गात स्क्रीनचे उद्घाटन यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. शाळा परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
       
कार्यक्रमाला पठान सर, खतोजा बाई, नफोसा, शबाना अफरोज, सायका अर्शी, अंजुम आरा, निकहत परवीन, तोहरा परवीन, शाईस्ता परवीन, कनीज फातिमा, इकबाल यावेळी उपस्थित होते.

 

 

कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीने विचार करू

कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाला महापौरांनी दिले आश्वासन
 
नागपूर,ता. १९ : कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत आम्ही गंभीर आहोत. त्यांच्या प्रलंबित मागण्यांचा नागपूर महानगरपालिका प्रशासन सहानुभूतीने विचार करेल. जे नियमात बसते त्यावर प्रशासनाशी चर्चा करून तातडीने निर्णय घेण्यात येईल. अडचणीच्या प्रश्नांबाबत कायदेशीर बाबी तपासून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन महापौर नंदा जिचकार यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळाला दिले.
   
सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळावी, एमएसआयटी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना मुदतवाढ देण्यात यावी, महागाई भत्त्याची थकबाकी मिळावी, मनपातील कार्यरत वर्ग ४ व वर्ग ३ मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांची तसेच शिक्षित सफाई कर्मचाऱ्यांची पदोन्नती करण्यात यावी, लाड कमेटीच्या शिफारशी अंतर्गत प्रलंबित प्रकरणावर योग्य निर्णय घेण्यात यावा, मृतक ऐवजदारांच्या वारसदारांना ऐवजी कार्ड मिळावे, सन २००५ नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना डीसीपीएसची माहिती मिळावी या आणि इतर मागण्यांवर चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय नागपूर कार्पोरेशन एम्प्लॉईज असोशिएशनचे शिष्टमंडळ कार्याध्यक्ष राजेश हाथीबेड, महासचिव डोमाजी भडंग आणि सचिव नितीन झाडे यांच्या नेतृत्वात महापौर नंदा जिचकार यांना भेटले. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त अश्विन मुदगल, शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, माजी सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, माजी महापौर प्रवीण दटके, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, सुनील हिरणवार, नगरसेवक विक्की कुकरेजा, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, मुख्य वित्त व लेखाधिकारी मदन गाडगे, सहायक आयुक्त महेश धामेचा, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार उपस्थित होते.
 
शिष्टमंडळाने आपल्या मागण्या विस्तृतपणे सांगितल्या. सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी टप्प्याटप्प्याने देण्यात यावी, ५९ महिन्याच्या महागाई भत्त्याची थकबाकीही लवकरात लवकर देण्यात यावी अशी मागणी केली. लाड समितीच्या शिफारसीनुसार प्रलंबित प्रकरणांपैकी दर महिन्यात ५० प्रकरणे मार्गी लावू, असे आश्वासन सभागृहाने दिल्याचे शिष्टमंडळाने सांगितले. मात्र, मार्च महिन्यापासून यादीच लागली नाही, ही बाब कार्याध्यक्ष राजेश हाथीबेड यांनी लक्षात आणून दिली. त्यावर महापौर नंदा जिचकार, आयुक्त अश्विन मुदगल यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली. प्रकरणे मार्गी लावताना येणाऱ्या अडचणींवर तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन महापौरांनी दिले. डीसीपीएस मध्ये जमा होणाऱ्या रकमेचा तपशील कर्मचाऱ्यांना कळत नाही. त्यामुळे आता यापुढे कर्मचाऱ्यांना पावती देण्यात येईल, अशी माहिती मुख्य लेखाधिकारी मदन गाडगे यांनी दिली. सन २०१२ नंतर मृतक ऐवजदारांच्या वारसदारांना ऐवजी कार्ड मिळत नाही. सर्वोच्च न्यायालयातील एका प्रकरणामुळे सदर कार्ड देणे बंद आहे. याबाबत शासनाकडे पाठपुरावा सुरू असून लवकरच निर्णय होईल, असे आश्वासन महापौर नंदा जिचकार ह्यांनी दिले.
 
महेश वैद्य नामक एका कर्मचाऱ्यांना कुठलीही चूक नसताना बडतर्फ करण्यात आले. ही बाब शिष्टमंडळाने लक्षात आणून दिली. निर्दोषत्वाचे सर्व पुरावे दिले असतानाही अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नसल्याचेही शिष्टमंडळाने सांगितले. या प्रकरणी अभ्यास करून त्यावर निर्णय देण्यात येईल, असे आश्वासनही महापौरांनी दिले.
 
शिष्टमंडळात असोशिएशनचे कोषाध्यक्ष ओंकार लाखे, संघटन मंत्री रितेश काशीकर, सदस्य प्रमोद बारई, विशाल शेवारे, गजानन जाधव, मिनाताई नकवाल, पुष्पाताई बुटे, संजय बागडे, नितीन खरे यांच्यासह अन्य सदस्यांचा समावेश होता. 
 

 

एम्प्रेस मॉलसह इतर मोठ्या बकायाधारकांच्या घरासमोर नगारे वाजवून गांधीगिरी

‘मालमत्ता व पाणी कर अभय योजने’चा लाभ घ्या आणि कारवाई टाळण्याचे आवाहन
 
नागपूर, ता.१८ :  थकीत मालमत्ता आणि पाणी कर असणाऱ्या ग्राहकांसाठी मनपाने अभय योजना आणली आहे. १७ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा लाभ घ्या, थकीत कर भरा आणि मालमत्तेवरील जप्तीची कारवाई टाळा, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
शहरातील लाखो नागरिक मालमत्ता व पाणी कर वेळेत भरून शहराच्या विकासात आपले योगदा देतात. मात्र, काही निवडक व्यावसायिक प्रतिष्ठाने आणि नागरिकांकडे कोट्यवधींची कर थकबाकी आहे. अशा कुंभकर्णी झोपेत असणाऱ्या थकबाकीदारांना जागे करण्यासाठी मनपातर्फे गांधीगिरीचा मार्ग स्वीकारण्यात आला असून मनपाच्या दहा झोनमधील ‘टॉप टेन’ थकबाकीदारांच्या प्रतिष्ठानांपुढे आणि घरांपुढे नगारे वाजविण्यात आले.
 
याअंतर्गत मंगळवार १८ जुलै रोजी गांधीसागरजवळील एम्प्रेस मॉल येथे धंतोली झोनचे सभापती प्रमोद चिखले, माजी सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, जलप्रदाय समिती सभापती राजेश घोडपागे, दुर्बल घटक विशेष समिती सभापती महेंद्र धनविजय यांच्या नेतृत्वात एम्प्रेस मॉल मुख्य प्रवेशद्वारासमोर नगारा वाजवून बकाया असलेली रक्कम भरण्याबाबत आवाहन करण्यात आले.
 
यावेळी महिला व बालकल्याण समिती उपसभापती श्रद्धा पाठक, विधी समितीच्या सभापती ॲड. मिनाक्षी तेलगोटे, नगरसेवक विजय चुटेले, नगरसेविका वंदना यंगटवार, सरला नायक, पल्लवी शामकुळे, सोनाली कडू, माजी नगरसेविका रश्मी फडणवीस, मंगलाबेन पटेल, वर्षा मेहर, शाम चांदेकर, विजय रेहपांडे, दीपांशू लिंगायत, राहूल खंगार, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, मनपा टॅक्स विभागाचे कर निरीक्षक विजय थूल, सुभाष बैसाल, जलप्रदाय विभागाचे डेलिगेट एस.डी. तारे, कविता इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी १२ वाजता नगारे वाजविण्यात आले. एम्प्रेस मॉल प्रतिनिधी यांना पुष्पगुच्छ देण्यात आले आणि योजनेचा लाभ घेत आपली पाटी कोरी करा आणि शहराच्या विकासात योगदान द्या, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
 
आसीनगर झोन
आसीनगर झोनअंतर्गत येणाऱ्या वॉर्ड क्र.५४ मधील नारायण जयराम लवात्रे यांच्या घरासमोर गांधीगिरी करण्यात आली. त्यांच्या घरासमोर नगारा वाजवून त्यांना पुष्पगुच्छ देण्यात आले. त्यांच्याकडे दोन लाख ६६ हजार मालमत्ता कर सन २००६ पासून थकीत आहे. या कारवाईत आसीनगर झोन सभापती भाग्यश्री कानतोडे, बसपाचे पक्ष नेते शेख मोहम्मद जमाल, नगरसेविका भावना लोणारे, नेहा निकोसे, नसीम बानो खान, वंदना चांदेकर, वैशाली नारनवरे, विरंका भिवगडे, मंगला लांजेवार, नगरसेवक दिनेश यादव, मनोज सांगोळे, परसराम मानवटकर, गोपीचंद कुमरे, जितेंद्र घोडेस्वार, मो. ईब्राहीम तौफिक अहमद, संदीप सहारे, झोनचे सहायक आयुक्त विजय हुमणे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. 
 
लक्ष्मीनगर झोन
लक्ष्मीनगर झोन अंतर्गत येणाऱ्या ‘सरदारजीकी रसोई’  येथे लक्ष्मीनगर झोनचे सभापती प्रकाश भोयर यांच्या नेतृत्वात नगारा वादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या प्रतिष्ठानासमोर बॅनर लावण्यात आले. प्रतिष्ठानचे शटर बंद असल्यामुळे प्रवेशद्वारासमोर पुष्पगुच्छ ठेवण्यात आले.  य़ा प्रतिष्ठानाकडे ५६ लाख २२ हजार रुपयांची थकबाकी आहे. यावेळी विधी समिती सभापती ॲड. मिनाक्षी तेलगोटे, नगरसेवक लहुकुमार बेहते, नगरसेविका पल्लवी शामकुळे, सोनाली कडू, विशाखा मोहोड, जयश्री वाडीभस्मे यांची उपस्थिती होती.
 
धरमपेठ झोन
धरमपेठ झोनअंतर्गत येणाऱ्या भगवाघर लेआऊट येथील कंट्रीवाईड व्हॅकेशन आणि हिबिस्कस हॉटेल यांच्या प्रतिष्ठानासमोर नगारे वाजविण्यात आले. कंट्रीवाईड व्हॅकेशन यांच्याकडे १७ लाख रुपयांचा कर थकीत आहे. यापैकी पाच लाखांचा डी.डी. मालमत्ता मालकाने आज अधिकाऱ्यांकडे सोपविला. उर्वरीत रक्कम २५ तारखेपर्यंत भरण्याचे आश्वासन त्यांनी दिले.  हिबिस्कस हॉटेल यांच्याकडे १४.५० लाखांचा कर थकीत आहे. ही रक्कम २४ जुलैपर्यंत भरणार असल्याचे आश्वासन मालमत्ताधारकाने दिले. या कारवाईच्या वेळी स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेवक प्रमोद कौरती, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, परिणिता फुके, प्रगती पाटील, रुतिका मसराम, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे उपस्थित होते.

 

 

गठई कामगारांना लवकरच मिळणार हक्काचे पट्टे

स्थायी समिती अध्यक्षांनी घेतला आढावा
 
नागपूर, ता. १८ :  स्थायी पट्टे मिळावे यासाठी शहरातील गठई कामगारांनी अनेक वर्षांपासून अर्ज केला आहे. मात्र त्यांना पट्टे देण्यात आले नाही. यासंबंधीचा आढावा स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव यांनी घेतला.
 
यावेळी नगरसेवक धर्मपाल मेश्राम, चर्मकार सेवा संघाचे अध्यक्ष भैय्यालाल बिघाने यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. गठई कामगार मनपाने ठरविलेले दर भरण्यास तयार आहे. मात्र अनेक वर्षांपासून अर्ज करुनही पट्टे देण्यात आले नाही, अशी तक्रार संघटना पदाधिकाऱ्यांनी केली. यावर झोननिहाय प्राप्त झालेल्या अर्जांची सविस्तर माहिती ३ ऑगस्ट रोजी बैठकीत सादर करावी आणि गठई कामगारांचा प्रश्न मार्गी काढावा, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्षांनी दिले. अनेक वर्षांपासून प्रलंबित समस्येकडे लक्ष देऊन सोडविण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल संघटना पदाधिकारी आणि गठई कामगारांनी पुष्पगुच्छ देऊन स्थायी समिती अध्यक्षांचे आभार मानले.

 

 

कामाच्या दर्जात सुधारणा करा

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या आढावा बैठकीत महापौरांनी दिले एल.ॲण्ड.टी ला निर्देश
 
नागपूर, ता.१८ : नागपूर शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत एल..ॲण्ड टी. मार्फत सुरू असलेल्या कामांची वारंवार तक्रार येत आहे. कामाचा दर्जा सुधारण्यात यावा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी एल.ॲण्ड टी च्या अधिकाऱ्यांना दिले.
 
याप्रसंगी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, भाजपाच्या प्रतोद दिव्या धुरडे, आयुक्त अश्विन मुदगल, स्मार्ट सिटीचे प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, मुख्य अभियंता विजय बनगीरवार, अधीक्षक अभियंता दीपक सोनटक्के प्रामुख्याने उपस्थित होते.
 
‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत शहरांमध्ये स्मार्ट वाहतूक व्यवस्था आणि गुन्हेगारी नियंत्रणासाठी विविध ठिकाणी कॅमेरा एल.ॲण्ड टी. कंपनी मार्फत लावण्यात येत आहे. अनेक ठिकाणी हे कॅमेरा कार्यान्वित झाले असून या योजनेअंतर्गत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा आढावा महापौरांनी घेतला. एल.ॲण्ड टी कंपनी मार्फत सुरू असलेल्या कामात शहरात बसविण्यात आलेल्या किओस्क डिझाईन, जंक्शन बॉक्सचा दर्जा सुधारण्यात यावा, तसेच वाहतुकीसाठी अडथळा निर्माण करणाऱ्या जागेत किओस्क, जंक्शन बॉक्स बसविण्यात आले आहे ते त्वरित काढावे, असेही निर्देशही महापौरांनी दिले.
 
बैठकीच्या सुरवातीला परिवहन विभागाची माहिती परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी सादरीकरणाद्वारे महापौर व आयुक्तांना दिली. विभागाला कामात येणाऱ्या अडचणींची माहितीही त्यांनी दिली. अडचणी त्वरित सोडविण्याचे निर्देश आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिले.
          
बैठकीला कार्यकारी अभियंता दिलीप जामगडे, उपअभियंता राजेश दुपारे, एल. ॲण्ड टी. चे अजय रामटेके व अन्य अधिकारी उपस्थित होते.  

 

 

मनीषनगर ते बर्डी बससेवेला शुभारंभ

सभापती अविनाश ठाकरे यांनी दाखविली हिरवी झेंडी
 
नागपूर,ता. १८ : नागपूर महानगरपालिका परिवहन समितीद्वारे नागपूर शहरातील मनीषनगर ते बर्डी या मार्गावर नव्याने बस सेवा सुरू करण्यात आली. मंगळवारी (ता.१८) या बससेवेला कर व कर आकारणी विशेष समिती सभापती अविनाश ठाकरे यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. याप्रसंगी नगरसेविका जयश्री वाडीभस्मे, विशाखा मोहोड, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप उपस्थित होते.
 
बर्डी ते न्यू मनीषनगर करिता सकाळी ६.०० ते रात्री ९.४५ वाजेपर्यंत एकूण २० फेऱ्या व न्यू मनीषनगर ते बर्डीकरिता सकाळी ६.४५ ते रात्री ९.३५ वाजेपर्यंत एकूण २० फेऱ्या अश्या ४० फेऱ्यांची वाहतूक सुरू करण्यात येत आहे. या मार्गावरील तिकीटचे दर प्रत्येकी व्यक्ती १६ रूपये असून विद्यार्थ्यांकरिता तिकीटांचे दर रूपये ८ राहील. ह्या बसचा मार्ग मुंजे चौक - छत्रपती चौक - बोरकुटे लेआऊट - न्यू मनिषनगर टी पॉईंट - शामनगर - महाजन आटा चक्की असा राहील.
          
या मार्गावरील बसेसची मागणी सातत्याने नागरिकांकडून विशेषतः ज्येष्ठ नागरिकांकडून  होत होती. त्यामुळे परिवहन समिती सभपती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी पुढाकार घेऊन ही बस सेवा तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले. ही बस नागरिकांसाठी सोयीची ठरेल, असा विश्वास अविनाश ठाकरे यांनी व्यक्त केला. बसेसचा शुभारंभ झाल्यामुळेही स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
 
कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष गुणवंतराव कामडी, सचिव अ.भा.फाळके, रामकृपाल तिवारी, विकास नगराळे, अशोक कातुरे, विश्वनाथ बेले, नरेंद्र आष्टनकर यांच्यासह परिवहन समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

 

पोषक क्रीडा वातावरण तयार करण्यासाठी मनपा कटिबद्ध

क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांची माहिती : लवकरच मनपाचे नवे क्रीडा धोरण
 
नागपूर,ता. १८ : नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील विविध क्रीडा स्पर्धांतील खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर जावे यासाठी शहरातील सर्व क्रीडा संघटनांच्या सहकार्याने क्रीडा वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. विशेषकरून मनपाच्या शाळांतील विद्यार्थ्यांमधून चांगले खेळाडू तयार करण्यात येईल. क्रीडा संघटनांना आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची मनपाची तयारी असून त्यादृष्टीने आखणी करण्यात येईल, असा विश्वास मनपाचे क्रीडा सभापती नागेश सहारे यांनी क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दिला.
 
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने नागपूर शहरात खेळविषयक चांगले वातावरण करण्याच्या दृष्टीने आणि नागपुरातून चांगले खेळाडू तयार व्हावे ही संकल्पना केंद्रस्थानी ठेवून नागपूर शहरातील विविध क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन मंगळवार १८ जुलै मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला सभापती नागेश सहारे यांच्यासह उपसभापती प्रमोद तभाने, क्रीडा समितीचे सदस्य आणि सतरंजीपुरा झोन सभापती संजय चावरे, समितीचे सदस्य नगरसेवक दिनेश यादव, नगरसेविका विरंका भिवगडे, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, जितेंद्र गायकवाड, संजय भुरे उपस्थित होते.
 
सभापती नागेश सहारे यांनी त्यांच्या सभापतीकाळात मनपाच्या वतीने तयार करण्यात येणाऱ्या क्रीडा धोरणाची माहिती दिली. ते म्हणाले, नागपुरातील प्रत्येक क्रीडा संघटना चांगले खेळाडू तयार करण्यासाठी प्रयत्नरत आहेत. परंतु आर्थिक अडचणींचा सामना या संघटनांना करावा लागतो. संघटनांना आणि खेळाडूंना पाहिजे तसे प्रोत्साहन मिळत नाही. यासाठीच क्रीडा संघटनांच्या अडचणी जाणून घेतल्या. यापुढे क्रीडा क्षेत्राला वाव मिळावा, मनपाच्या शाळांतून आणि नागपूर शहरातून चांगले खेळाडू तयार व्हावे, हे उद्दिष्ट समोर ठेवून नवे धोरण क्रीडा समिती तयार करीत आहे. क्रीडा संघटनांच्या सूचनांचा यात समावेश करण्यात येईल. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणाऱ्या क्रीडापटूंचा गौरव करण्यात येईल. शालेय क्रीडा स्पर्धा मनपाच्या माध्यमातून राबविण्याचे नियोजन आहे. त्यासाठी संघटनांचे सहकार्य अपेक्षित आहे. नागपुरातून चमकणाऱ्या क्रीडापटूंना नोकरीत सामावून घेण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
 
प्रारंभी बैठकीला उपस्थित क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना येणाऱ्या अडचणी कथन केल्या आणि क्रीडा धोरण तयार करण्यासाठी सूचना केल्या. मनपातर्फे ‘खेल महोत्सव’ घेण्यात यावा, मोठी मैदाने केवळ खेळांसाठीच आरक्षित असावी, दिव्यांगांसाठी वेगळ्या खेळ स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे, हॉकीच्या टर्फसाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात यावे, रामनगरातील टेनिस कोर्टसाठी मुलभूत सुविधा देण्यात याव्या, स्केटींग रिंक वर सुविधा देण्यात याव्या, झोननिहाय क्रीडा संकुल उभारण्यात यावे, यशवंत स्टेडियम व अन्य ठिकाणी असलेल्या मनपाच्या सभागृहांचा उपयोग खेळाडूंसाठी व्हावा, मनपाने मैदानी खेळांना प्रोत्साहन द्यावे, चांगल्या खेळाडूंचे पालकत्व मनपाने घ्यावे, क्रीडा संघटनांना मनपाने कार्यालये उपलब्ध करुन द्यावेत, क्रीडा संकुलांमध्ये जीमची व्यवस्था करण्यात यावी, मनपाच्या मैदानांवरील अतिक्रमणे हटविण्यात यावे, वॉर्डनिहाय मैदाने तयार करण्यात यावी, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकणाऱ्या खेळाडूंना शिष्यवृत्ती देण्यात यावी, क्रीडा प्रशिक्षकांना प्रोत्साहन अनुदान देण्यात यावे, उत्तर नागपुरात क्रीडा प्रोत्साहनासाठी विशेष लक्ष देण्यात यावे आदी सूचना पदाधिकाऱ्यांनी केल्या. समिती सदस्य नगरसेवक दिनेश यादव यांनी दिव्यांगांसाठी मनपा करणार असलेल्या क्रीडा कार्याची माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र एथलेटिक्स असोशिएशनचे सचिव शरद सूर्यवंशी, नागपूर डिस्ट्रिक्ट हॅण्डबॉल असोशिएशनचे डॉ. सुनील भोतमांगे, एस.टी. भोतमांगे, नागपूर डिस्ट्रिक्ट ॲमॅचर सायकल पोलो असोशिएशनचे गजानन बुरडे, पॅरा एथेलेटिक असोशिएशनच ऑफ महाराष्ट्रचे प्रवीण उघडे, नागपूर डिस्ट्रिक्ट ॲमॅचर एथलेटिक असोशिएशनचे डॉ. संभाजी भोसले, नागपूर फेंसींग असोशिएशनचे मो. शोएब, नागपूर डिस्ट्रिक्ट बॅडमिंटन असोशिएशनचे मंगेश काशीकर, नागपूर जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेचे सुनील हांडे, नागपूर जिल्हा हौशी कबड्डी असोशिएशनचे सुनील चिंतलवार, विदर्भ हॉकी असोशिएशनचे राधेश्याम सारडा यांच्यासह ४० संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.  
 
दहाही झोनमध्ये किमान एका मैदानाचा विकास
पदाधिकाऱ्यांकडून आलेल्या सूचनांचे स्वागत करीत उपसभापती प्रमोद तभाने यांनी काही सूचनांवर तात्काळ अंमल करण्यात येईल, असे आश्वासन दिले. प्रत्येक झोनमधील किमान एक मैदान पहिल्या टप्प्यात संपूर्ण क्रीडा प्रकाराच्या दृष्टीने विकसित करण्यात येईल. मनपा शाळांतील मुलांना कराटेचे प्रशिक्षण देण्यात येईल आणि क्रीडा संघटनांची माहिती मनपाच्या वेबसाईटवर टाकण्यात येईल, अशी माहिती श्री. तभाने यांनी दिली.
 
हॉकी टर्फसाठी करणार पाठपुरावा
हॉकी हा राष्ट्रीय खेळ असून त्याच्या विकासासाठी मनपाच्या वतीने शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, असा विश्वास क्रीडा सभापती नागेश सहारे यांनी हॉकी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला.

 

 

‘अभय योजना’ काळातील कार्यावर कर्मचाऱ्यांचे मूल्यांकन

आयुक्तांनी दिला इशारा : १०० टक्के करवसुलीचे उद्दिष्ट
 
नागपूर, ता. १७ : थकीत मालमत्ता आणि पाणी कर असणाऱ्या ग्राहकांसाठी मनपाने जी ‘अभय योजना’ आणली आहे ती केवळ ग्राहकांसाठीच नाही तर मनपाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठीही परीक्षा आहे. केवळ आठ तास कामाची मानसिकता त्यागा. कर वसुलीसाठी २४ तास काम करायचे आहे. या योजनेदरम्यान कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाच्या आधारावर त्यांच्या कामाचे मूल्यमापन केले जाईल. ‘काम नहीं तो दाम नही’, अशा शब्दात मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांनी मंगळवारी झोनमधील कर्मचाऱ्यांना सूचना देत इशारा दिला.
 
थकीत मालमत्ता आणि पाणी कर वसुलीसाठी १७ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या ‘अभय योजने’संदर्भात मागील पाच दिवसांपासून स्थायी समिती सभापती संदीप जाधव, आयुक्त अश्विन मुदगल आणि जलप्रदाय समितीचे सभापती राजेश घोडपागे हे झोननिहाय बैठका घेत असून योजनेच्या माध्यमातून १०० टक्के करवसुली करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याअंतर्गत मंगळवार १७ जुलै रोजी मंगळवारी आणि आसीनगर झोन येथे बैठक घेण्यात आली. मंगळवारी झोन येथील बैठकीत आयुक्त अश्विन मुदगल बोलत होते. यावेळी स्थायी समिती सभापती संदीप जाधव, झोन सभापती सुषमा चौधरी, नगरसेविका संगीता गिऱ्हे, अर्चना पाठक, रश्मी धुर्वे, नगरसेवक संजय बुरेवार, नरेंद्र वालदे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, सहायक आयुक्त (कर व कर आकारणी) मिलिंद मेश्राम, झोनचे सहायक आयुक्त हरिश राऊत, सहायक अधीक्षक महेंद्र जनबंधू उपस्थित होते.
 
आयुक्त अश्विन मुदगल म्हणाले, या योजनेअंतर्गत कर रक्कम कमी करण्याचा प्रकार कुणीही करू नये. तसे आढळल्यास त्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येईल. आपण कर्मचारी आहोत. आपले कर्तव्य आपण योग्यपणे पार पाडलेच पाहिजे. नोकरी कच्ची आहे, पक्की नाही याचे भान सर्वांनी ठेवावे. अभय योजना ही महत्त्वकांक्षी आहे. या योजनेदरम्यान कुठलाही निष्काळजीपणा, हलगर्जीपणा चालणार नाही. तसे आढळल्यास गंभीर दखल घेतली जाईल, असा इशारा आयुक्तांनी दिला.
 
स्थायी समिती सभापती संदीप जाधव म्हणाले, योजनेचा कालावधी मोठा आहे. जे करदाते एकाच दिवशी पूर्ण रक्कम भरू शकत नसेल तर दररोज टप्प्याटप्प्यात रक्कम भरता येईल. ह्या सवलतीचा लाभ घेऊन आपली पाटी कोरी करा, असे आवाहन त्यांनी केले. ‘अभय योजने’च्या यशस्वीतेसाठी आयुक्त स्वत: सर्व ठिकाणी फिरत आहे. असे करणारे श्री. मुदगल हे पहिले आयुक्त आहे, अशा शब्दात आयुक्तांचे त्यांनी कौतुक केले.
शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करणाऱ्या ‘सायबर टेक’ कंपनीबद्दल अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून बैठकीत उपस्थित असलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यालाही श्री. जाधव यांनी चांगलेच खडसावले. यापुढे तक्रारी आल्या तर कंत्राटाबाबत पुनर्विचार करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
 
आसीनगर झोनच्या बैठकीत जलप्रदाय समितीचे सभापती राजेश घोडपागे, झोन सभापती भाग्यश्री कानतोडे, नगरसेविका नेहा निकोसे, भावना लोणारे, नगरसेवक दिनेश यादव, मनोज सांगोळे, परसराम मानवटकर, महेंद्र धनविजय, सहायक आयुक्त (कर व कर आकारणी) मिलिंद मेश्राम, झोनचे सहायक आयुक्त विजय हुमने आदी उपस्थित होते.
 
यावेळी जलप्रदाय समितीचे सभापती राजेश घोडपागे म्हणाले, अभय योजनेच्या यशस्वीतेसाठी मनपाने सर्व तयारी केली आहे. सत्तापक्ष, विरोधी पक्ष असा भेद न ठेवता सारेच जण कामाला लागले आहे. पदाधिकारी, नगरसेवक स्वत: यासाठी प्रयत्नरत आहे. त्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी याचे गांभीर्य ओळखून कामाला लागायला हवे, असे ते म्हणाले.
 
दोन्ही बैठकीत प्रारंभी सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली. ग्राहकांना कराची माहिती वेबसाईट आणि टोल फ्री क्रमांकावरून घेता येईल. ज्या मिळकतीकरिता महानगरपालिकेचे वैध नळ कनेक्शन असून संपत्ती करामध्ये आम पाणीकरसुद्धा आकारण्यात येत आहे अशा मिळकतीची यादी संबंधित झोन सहायक आयुक्तांना देण्यात आलेली आहे. सदरहू यादीतील माहिती मिळकतदारांनी जलप्रदाय विभाग मनपाचे पाणी कराचे देयक, पाणी कर जमा केल्याची पावतीच्या आधारे उक्त मिळकतीचे, मिळकतकराचे पुनर्निधारण करून अयोग्य आम पाणी कर रद्द करून शिल्लक थकीत रक्कम मालमत्ता कर अभय योजनेअंतर्ग़त वसूल करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्याकरिता प्रत्येक झोन कार्यालयात सहायत केंद्र निर्माण करून नागरिकांना सेवा देण्याचे व कोणताही नागरिक मालमत्ता कर अभय योजनेचा लाभ घेतल्याशिवाय परत जाणार नाही ह्याबाबत दक्षता बाळगण्याचे निर्देश त्यांनी दिले. योजनाकाळात सुटीच्या दिवशीही कर संकलन केंद्र सुरू राहिल, असेही त्यांनी सांगितले.  बैठकीला संबंधित झोनचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
 

 

‘हायटेक रथ’ करणार योजनेची जनजागृती

नागपूर, ता. १७ : महानगरपालिकेतर्फे सोमवारपासून सुरू करण्यात आलेल्या ‘मालमत्ता व पाणी कर अभय योजना २०१७’ ची जनजागृती करण्यासाठी विशेषत्त्वाने तयार करण्यात आलेल्या ‘हायटेक जनजागृती रथा’ला सोमवारी (ता. १७) महापौर नंदा जिचकार यांनी हिरवी झेंडी दाखविली.
 
यावेळी स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव, मनपा आयुक्त अश्विन मुदगल, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम, सहायक आय़ुक्त महेश धामेचा, सहायक आयुक्त सर्वश्री सुवर्णा दखणे, महेश मोरोणे, आर.पी. भिवगडे, गणेश राठोड, राजेश कराडे, अशोक पाटील, प्रकाश वराडे, सुभाष जयदेव, विजय हुमणे, हरिष राऊत, कर अधिक्षक श्रीकांत वैद्य यांची उपस्थिती होती. सदर रथाच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक भागात जाऊन योजनेविषयी माहिती देण्यात येणार आहे.

 

 

मनपा शाळांना क्रीडा क्षेत्रात झेप घेण्यासाठी लवकरच नवा ‘अजेंडा’

क्रीडा समितीच्या बैठकीत सभापती नागेश सहारे यांची माहिती
 
नागपूर, ता. १७ : नागपूर महानगरपालिकेच्या शाळांत शिकणारे विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात अग्रक्रमावर राहण्यासाठी शारीरिक शिक्षण शिक्षकांची आणि तज्ज्ञांची मते क्रीडा समिती घेत आहे. या सर्वांच्या सहकार्याने लवकरच नवा ‘अजेंडा’ आणण्यात येईल आणि मनपाच्या शाळेतील विद्यार्थी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर जातील, यादृष्टीने प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती मनपाच्या क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे यांनी दिली.
 
यासंदर्भातील मते जाणून घेण्यासाठी सोमवारी (ता. १७) मनपा शाळेतील मुख्याध्यापक आणि शारीरिक शिक्षण शिक्षकांच्या बैठकीचे आयोजन मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात क्रीडा समितीच्या वतीने करण्यात आले होते. या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला सभापती नागेश सहारे यांच्यासह सत्तापक्ष नेते संदीप जोशी, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, सतरंजीपुरा झोन सभापती संजय चावरे, नगरसेवक सुनील हिरणवार, प्रदीप पोहाणे, दिनेश यादव, नगरसेविका नेहा वाघमारे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, सहायक शिक्षणाधिकारी कुसूम चाफलेकर उपस्थित होते.
 
मनपा शाळांमध्ये क्रीडा विभाग आहे. प्रत्येक शाळांमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षकही आहेत. असे असतानाही चांगले खेळाडू तयार करण्यात काय अडचणी येतातहेत आणि मनपा शाळांतील विद्यार्थी विविध क्रीडा प्रकारात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचतील या दृष्टीने काय करता येईल, याबाबत उपस्थित मुख्याध्यापक आणि शारीरिक शिक्षण शिक्षकांकडून सूचना मागविण्यात आल्या. मनपाच्या अनेक शाळांना मैदाने नाहीत. जिथे मैदान आहेत त्या मैदानांचे सपाटीकरण नाही, जिथे उत्कृष्ट मैदान आहे त्या शाळांत शारीरिक शिक्षण शिक्षक नाहीत. त्यामुळे मनपा शाळांतील क्रीडा विभागाचा आलेख उंचावायचा असेल तर मुलभूत सोयी असणे गरजेचे आहे, असे शारीरिक शिक्षण शिक्षकांनी सुचविले. ज्या शाळांना मैदाने नाहीत त्या शाळांमध्ये कॅरम, बुद्धीबळ अशा खेळांसाठी चांगले प्रशिक्षक उपलब्ध करून दिल्यास किमान इनडोअर गेममध्ये विद्यार्थ्यांना निपुण करता येईल, अशीही सूचना शिक्षकांनी केली.
 
सत्तापक्ष नेते संदीप जोशी म्हणाले, शिक्षकांनी मनावर घेतले तर सर्व काही शक्य आहे. आता मरगळ झटका आणि शिक्षण समिती सभापतींच्या स्वप्नाला आकार द्या, असे आवाहन केले. सभापती नागेश सहारे म्हणाले, शिक्षण विभागाच्या सहकार्याने आता मनपाच्या प्रत्येक शाळांतील विद्यार्थ्यांना शिक्षण आणि क्रीडा प्रकारात तयार करण्याचे कार्य हाती घेण्यात येत आहे. मनपाच्या शाळांची गुणवत्ता वाढली तर विद्यार्थ्यांची संख्या आपोआप वाढेल. सर्वांच्या सहकार्याने हे शक्य आहे. यासाठीच आपल्याकडून सूचना आमंत्रित केल्या आहेत. सर्व सूचनांची योग्य दखल घेऊन एक ‘कॉमन अजेंडा’ बनविण्यात येईल. महापालिका क्षेत्रात असलेल्या सर्व शाळांसाठी शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन आणि क्रीडा क्षेत्रात गुणवत्ता वाढीसाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
 
‘महापौर चषका’त सर्व शाळांचा सहभाग आवश्यक
‘महापौर चषका’अंतर्गत ‘वंदेमातरम्‌’ची स्पर्धा घेण्यात येते. यामध्ये मागील वर्षी मनपा शाळांचा सहभाग हा अत्यल्प होता याबद्दल शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी नाराजी व्यक्त केली. यावर्षी सर्वच शाळांचा सहभाग अपेक्षित असून ज्या मनपाच्या शाळा यामध्ये सहभागी होणार नाही, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा श्री. दिवे यांनी दिला.
 
वार्षिक कॅलेंडर आणि स्पोर्टस्‌ स्कूल
क्रीडा सभापती नागेश सहारे यांनी क्रीडा विभागाची गुणवत्ता वाढीसाठी मागविलेल्या सूचनांमध्ये एका शारीरिक शिक्षण शिक्षकाने स्पोर्टस्‌ स्कूलची संकल्पना मांडली. पिंपरी-चिंचवड येथे अशी शाळा सुरू असून त्या धर्तीवर नागपुरातील यशवंत स्टेडियममध्ये अशी शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला. अन्य एका शिक्षकाने क्रीडा आणि शिक्षण विभागाचे वर्षभराचे कॅलेंडर तयार करण्याची सूचना मांडली. या दोन्ही सूचनांचे क्रीडा सभापती नागेश सहारे यांनी स्वागत केले.
 
मंगळवारी क्रीडा संस्था पदाधिकाऱ्यांची बैठक
नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरात नियोजित क्रीडा स्पर्धा आयोजनाच्या दृष्टीकोनातील शहरातील विविध क्रीडा संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे अभिमत घेण्यासाठी क्रीडा सभापती नागेश सहारे यांनी मंगळवार १८ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति स्थायी समिती सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बैठकीला शहरातील क्रीडा असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. सहारे यांनी केले आहे.

 

 

नारा ओमनगर शिवगरी ले-आऊट ते बर्डी व भिलगाव कामठी रोड मार्गे बर्डी बस सेवेचा शुभारंभ

परिवहन सभापती बंटी कुकडे यांनी दाखविली हिरवी झेंडी
 
नागपूर,ता. १५ : नागपूर महानगरपालिका परिवहन समितीद्वारे नागपूर शहरात विविध मार्गावर नव्या बस सेवेला सुरुवात करण्यात आली. परिवहन सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, दुर्बल घटक समिती सभापती महेंद्र धनविजय यांनी हिरवी झेंडी दाखवून बस सेवेला प्रारंभ केला.
 
बर्डी ते ओमनगर (मार्गे गड्डीगोदाम, इंदोरा चौक, अमरज्योती नगर, शिवगिरी नगर) या बसेसचा शुभारंभ ओमनगर नारा फाटा येथे करण्यात आला. याप्रसंगी मंगळवारी झोन सभापती सुषमा चौधरी, नगरसेवक बबली मेश्राम, नगरसेविका प्रितम मंथरानी, संजय चौधरी, परिवहन विभागाचे वाहतूक व्यवस्थापक सुकीर सोनटक्के, रामराव मातकर, सुनील पशीन, कुशाल डोईफोडे, प्रतिक हमरे, तरूण सिंग, हेमराज तळेकर, अशोक पाराशर, सुनिता महल्ले, जगदीश वंजानी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
          
बर्डी ते भिलगाव (मार्गे इंदोरा चौक, कामठी रोड) या बसेसचा शुभारंभ भिलगाव येथे करण्यात आला. याप्रसंगी परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांनी कु. लावण्या माकडे या लहान मुलीच्या हस्ते बस ला हिरवी झेंडी दाखवली. याप्रसंगी भिलगावचे सरंपच मोहन माकडे, मनोज जिभकाटे, जगदीश कुकडे, गुणवंत माकडे, अरविंद पोटभरे, भीमराज माकडे उपस्थित होते.       
 
या मार्गावरील बसेसची मागणी सातत्याने नागरिकांकडून होत असल्याने परिवहन समिती सभपाती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी पुढाकार घेऊन या बसेस सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. ही बस नागरिकांसाठी सोयीची ठरेल असा विश्वास परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांनी व्यक्त केला. बसेसचा शुभारंभ झाल्यामुळेही स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

 

 

शंभर टक्के कर वसूली हेच मनपाचे उद्दीष्ट !

नेहरूनगर व लकडगंज झोन येथील थकीत कर वसूलीचा घेतला आढावा
 
नागपूर, ता. १४ : थकीत मालमत्ता आणि पाणी कर असणाऱ्या ग्राहकांसाठी मनपाने ‘अभय योजना’ आणली आहे. १७ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा लाभ घ्या. थकीत कर भरा आणि मालमत्तेवरील जप्तीची कारवाई टाळा, असे आवाहन करीत कामात हलगर्जीपणा करणा-या कर निरिक्षकांना आयुक्त अश्विन मुदगल यांनी शंभर टक्के वसूली हेच महानगरपालिकेचे उद्दीष्टे आहे.
 
नागपूर महानगरपालिकेद्वारे थकीत मालमत्ता कर व पाणी कर वसुलीसाठी ‘अभय योजना’१७ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त अश्विन मुदगल, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, जलप्रदाय समिती सभापती राजेश घोडपागे, कर आकारणी व कर संकलन विशेष समिती उपसभापती यशश्री नंदनवार  सहायक आयुक्त मिलींद मेश्राम, कार्यकारी अभियंता संजय गायकवाड यांनी शनिवारी (ता. १५) नेहरूनगर व लकडगंज झोन येथे आढावा बैठक घेतली. नेहरूनगर झोन येथील बैठकीत झोन सभापती रेखा साकोरे, क्रिडा समिती सभापती नागेश सहारे, नगरसेविका संगीता चकोले, वंदना भूरे, मनिषा कोठे, झोन सहायक आय़ुक्त राजेश कराडे उपस्थित होते. लकडगंज झोन येथील बैठकीत झोन सभापती दीपक वाडीभस्मे, नगरसेविका मनिषा अतकरे, सरिता कावरे, मनिषा कोठे, शेषराव गोतमारे, अनिल गेंडरे, सहायक आयुक्त सुभाष जयदेव उपस्थित होते.
 
आयुक्त अश्विन मुदगल यांनी दोन्ही झोनच्या कर वसूलीचा आढावा घेतला. १०० टक्के पेक्षा कमी कर वसूली खपवून घेणार नाही असा इशारा दिला. ७ ऑगस्ट नंतर जे थकीत कर दाते आहे त्यांची मालमत्ता लिलावात काढा असे आदेश त्यांनी यावेळी अधिका-यांना दिले. तसेच ज्या करदात्यांचे चेक अनादरित झाले त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश यावेळी आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे ३१ ऑक्टोबर पर्यंत आपली ५० टक्के थकीत रक्कम वसूल करण्यात आली पाहिजे असे आदेश कर निरिक्षकांना दिले. प्रत्येक आठवड्याचा अहवाल सहायक आयुक्तांमार्फत माझ्याकेडे पोहचवा असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
       
स्थायी समिती सभापती संदीप जाधव म्हणाले, ‘अभय योजना’ ही नागरिकांच्या सोयीसाठी आहे. मालमत्ता करावरील दंडाच्या रकमेवर ९० टक्के तर थकीत पाणी करावरील दंडाच्या रकमेवर १०० टक्के सवलत या योजनेअंतर्गत देण्यात येत आहे. नागरिकांनी आपली जबाबदारी समजून कराचा भरणा करावा. कर्मचाऱ्यांनीही नागरिकांना विश्वासात घेऊन या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना उद्युक्त करावे, असे निर्देश त्यांनी दिले. जो नागरिक ७ ऑगस्ट पर्यंत पाणी कर भरणार नाही त्यांचे नळाचे कनेक्शन कापावे असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
 
तत्त्पूर्वी सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी ‘अभय योजने’बद्दलची माहिती दिली. १०० टक्के वसुली हे उद्दिष्ट ठेवून या योजना यशस्वी करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

 

 

मनपाच्या शाळा सुधारण्यासाठी कसून प्रयत्न करा - महापौर नंदा जिचकार

शिक्षण समितीच्या आढावा बैठकीत शाळा निरिक्षकांना दिले निर्देश
 
नागपूर,ता.१५. नागपूर महानगरपालिकेच्या शाळा सुधारण्यासाठी कसून प्रयत्न करावे, शाळेचा दर्जा वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करा असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी मनपाच्या शाळा निरिक्षकांना दिले. शिक्षण समितीच्या विशेष आढावा बैठकीप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, उपसभापती स्नेहल बिहारे, प्रतोद दिव्या धुरडे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, ज्येष्ठ नगसेवक सुनील अग्रवाल, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार प्रामुख्याने उपस्थित होत्या.
        
पुढे बोलताना महापौर म्हणाल्या, मनपाच्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या दिवेंसदिवस कमी होत आहे.ही चिंतेची बाब असून त्यावर काय उपाययोजना करता येईल या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायला हवे.शाळेत उशीरा येणा-या व अनुपस्थित राहणा-या शिक्षकांचा पगार कापा असा दम शिक्षकांना द्या असे आदेश त्यांनी यावेळी अधिका-यांना दिले. त्याचप्रमाणे शाळा निरिक्षकाने आपली व्हिजीट बूक दरवेळी शिक्षणाधिका-यामार्फत मला सादर करावे असे आदेश त्यांनी दिले. मनपाच्या शाळेत बालवाडी व प्राथमिकच्या विद्यार्थांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण कसे सुरू करता येईल यावर विचार करा असे निर्देशही दिले. शाळेमध्ये अतिक्रमण झाल्याचे ज्या शाळा निरिक्षकांनी अधिका-यांना कळवले नाही त्या निरिक्षकांवर कार्यवाही करण्याचे आदेश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. शाळेच्या अभ्यासक्रमात बदल झाल्याने शिक्षकांनी युआरसीचे प्रशिक्षण घेणे सक्तीचे असल्याचेही महापौर  बोलताना म्हणाल्या.
        
महानगरपालिकेच्या शाळेत राबविण्यात येणा-या बालवाडी प्रकल्पांचा, मनपाच्या शाळेच्या इमारतींचा रखरखाव, गणवेश वाटप, सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत पुरविण्यात येणा-या सुखसुविधा व करण्यात आलेल्या कामांचा आढावा यावेळी महापौरांनी घेतला.
        
ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी बोलताना म्हणाले, शिक्षण विभागाचे अपग्रेडेशन व्हायचे असेल तर १ ते ४ च्या वर्गांचे पुनर्जीवन करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करा, असे आदेश त्यांनी यावेळी दिले. महानगरपालिकेच्या जागेवर चालणा-या अंगणवाडीच्या विद्यार्थांना मनपाच्या शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी त्यांना कसे उद्युक्त करता येईल यावर विचार करायला पाहिजे असेही ते बोलताना म्हणाले.
बैठकीला अतिरिक्त शिक्षणाधिकारी कुसूम चाफलेकर, क्रिडा निरिक्षक नरेश चौधरी, सर्व झोनचे शाळा निरिक्षक, व सर्व शिक्षण अभियानाचे अधिकारी उपस्थित होते.

 

 

विविध मार्गावरील बस सेवेला प्रारंभ

परिवहन सभापती बंटी कुकडे यांनी दाखविली हिरवी झेंडी
 
नागपूर,ता. १५ : नागपूर महानगरपालिका परिवहन समितीद्वारे नागपूर शहरात विविध मार्गावर नव्या बस सेवेला सुरुवात करण्यात आली. परिवहन सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, दुर्बल घटक समिती सभापती महेंद्र धनविजय यांनी हिरवी झेंडी दाखवून बस सेवेला प्रारंभ केला.
   
बर्डी ते ओमनगर (मार्गे गड्डीगोदाम, इंदोरा चौक, अमरज्योती नगर, शिवगिरी नगर) या बसेसचा शुभारंभ ओमनगर नारा फाटा येथे करण्यात आला. याप्रसंगी मंगळवारी झोन सभापती सुषमा चौधरी, नगरसेवक बबली मेश्राम, नगरसेविका प्रितम मंथरानी, संजय चौधरी, परिवहन विभागाचे वाहतूक व्यवस्थापक सुकीर सोनटक्के, रामराव मातकर, सुनील पशीन, कुशाल डोईफोडे, प्रतिक हमरे, तरूण सिंग, हेमराज तळेकर, अशोक पाराशर, सुनिता महल्ले, जगदीश वंजानी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
          
बर्डी ते भिलगाव (मार्गे इंदोरा चौक, कामठी रोड) या बसेसचा शुभारंभ भिलगाव येथे करण्यात आला. याप्रसंगी परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांनी कु. लावण्या माकडे या लहान मुलीच्या हस्ते बस ला हिरवी झेंडी दाखवली.याप्रसंगी भिलगावचे सरंपच मोहन माकडे, मनोज जिभकाटे, जगदीश कुकडे, गुणवंत माकडे, अरविंद पोटभरे, भीमराज माकडे उपस्थित होते.
    
या मार्गावरील बसेसची मागणी सातत्याने नागरिकांकडून होत असल्याने परिवहन समिती सभपाती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी पुढाकार घेऊन या बसेस सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. ही बस नागरिकांसाठी सोयीची ठरेल असा विश्वास परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांनी व्यक्त केला. बसेसचा शुभारंभ झाल्यामुळेही स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

 

 

थकीत कर भरा आणि जप्तीची कारवाई टाळा  : महापौर नंदा जिचकार

17 जुलै ते 7 ऑगस्ट : मालमत्ता व पाणी कर अभय योजना 2017
 
नागपूर, ता. 15  :  मालमत्ता कर आणि पाणी कर थकीत असलेले नागरिक आणि काही संस्थांच्या मागणीवरुन थकबाकीदारांना आपली पाटी कोरी करता यावी यासाठी स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव यांनी अंतिम मालमत्ता व पाणी कर अभय योजना 2017 सादर केली असून या योजनेला मंजुरी मिळाली आहे. याअंतर्गत येत्या 17 जुलै ते 7 ऑगस्ट 2017 दरम्यान नागरिकांना आपले थकीत मालमत्ता कर आणि पाणी कर भरुन या योजनेचा लाभ घेता येईल.
 
मालमत्ता कर अभय योजनेअंतर्गत मालमत्ता धारकांना आपल्या थकीत करातील दंडाची रक्कम 90%  माफ केली जाईल. तसेच थकित पाणी बिलावरील विलंब शुल्क किंवा दंडाच्या रक्कम 100 % माफ करण्यात येणार आहे. नागरिकांनी भविष्यात आपल्या मालमत्तेवरील जप्ती टाळण्यासाठी व नळ जोडणी खंडीत करण्याची कारवाई टाळण्यासाठी आपले थकीत कर भरावे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी शनिवारी (ता. 15 जुलै) आयोजित पत्रकार परिषदेत केले.
 
यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती संजय बंगाले, नगरसेवक महेंद्र धनविजय, दिव्या धुरडे उपस्थित होते.
 
महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, शहराच्या विकासात योगदान देणे ही प्रत्येक नागरिकाची नैतिक जबाबदारी आहे. नागरिकांच्या व काही स्वयंसेवी संस्थांच्या मागणीवरुन आपली पाटी कोरी करण्यासाठी ही शेवटची योजना सादर करण्यात आली आहे. या योजनेच्या कालावधीत टप्प्या-टप्प्यातदेखिल किंवा दररोजदेखिल थकबाकी रक्कम भरता येईल. मात्र योजना संपुष्टात आल्यानंतर मालमत्ता कर थकबाकीदारांच्या मालमत्तेवर थेट जप्तीची कारवाई करण्यात येईल व मालमत्तेचा लिलाव करुन थकबाकी वसूल करण्यात येईल. पाणी कर थकीत असलेल्यांची नळ जोडणी खंडीत कऱण्यात येणार आहे.
 
सर्वाधिक वसूली करणाऱ्या झोनला 51 हजार रुपये
या योजनेअंतर्गत वसुलीचे उद्दिष्ट गाठणाऱ्या झोनला (मालमत्ता  व पाणी कर प्रत्येकासाठी वेगळे पुरस्कार) 51 हजार रुपये पुरस्कार देण्यात येईल. सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता (इंसेंटिव्ह) देण्यात येईल. तसेच कामचुकार अधिकाऱ्यांना कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
 
8 ऑगस्टला “टॉप 10” मालमत्ता जप्त करणार
17 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान या योजनेचा लाभ न घेता, थकबाकीदारांनी कर न भरल्यास शहरातील“टॉप 10” थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यात येतील. यांचा लिलाव करुन थकबाकी वसूल करण्यात येणार आहे. योजनेच्या कालावधीनंतर पाणी बिल थकीत असणा-यांची नळ जोडणी खंडीत करण्यात येईल. यासाठी 50 चमू थकबाकीदारांचे दररोज सुमारे 1000 नळ कनेक्शन खंडीत करणार आहे.
 
अशी जाणून घ्या आपली थकीत रक्कम
आपल्या पाणी कराची थकीत रक्कम जाणून घेण्यासाठी नागरिकांना  www.ocwindia.com  किंवाwww.nmcnagpur.gov.in  या संकेतस्थळावर भेट देता येईल. तसेच  SMS  द्वारे जाणून घेण्यासाठीNMCWTR<space><आपल्या पाणीबिलावरील कॉन्ट्रॅक्ट अकाउंट नं.> किंवा NMCPRT<space><आपल्या कर पावतीवरील इंडेक्स नं.> 56161 या क्रमांकावर पाठविता येईल. अधिक माहितीकरिता 1800-266-9899 य़ा टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
 
जनजागृती कार्यक्रम
थकबाकीदारांना माहिती कॉल्सद्वारे देण्यात येत आहे. तसेच झोन निहाय थकबाकीदारांचा डेटा सोमवारपासून नगरसेवकांकडे उपलब्ध होणार आहे. शहरात ठिकठिकाणी होर्डिंग्स आणि 6*6 चे बॅनर्स लावण्यात येत आहेत. रेडियो केबल चॅनेल्सवरही जाहीराती देण्यात येत आहे. सोबतच बसेसवर माहितीचे बॅनर्स लावण्यात आले आहे. नागरिकांना या योजनेची माहिती व्हावी यासाठी सुमारे 3 लाख पत्रके वितरीत करण्यात आले आहे.

 

 

गर्भलिंगदान रोखण्यसाठी प्रसुतीरोग तज्ज्ञांची भूमिका महतत्वाची - महापौर नंदा जिचकार

पीसीपीएनडीटीच्या कार्यशाळेचे उद्घाटन
 
नागपूर, ता.१४ : गर्भलिंगदान रोखण्यासाठी प्रसूतीरोग तज्ज्ञ (ग्यायनॉलोजिस्ट)ची भूमिका महत्वाची आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले. नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाअंतर्गत पीसीपीएनडीटीच्या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभपती मनोज चापले, उपसभापती प्रमोद कौरती, मेयो हॉस्पीटलचे डॉ.नावाडे, पीसीपीएनडीचे डॉ.चैतन्य शेंबेकर, आयएमएच्या सदस्या डॉ.वर्षा ढवळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल चिव्हाणे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, नोडल अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, आजच्या विज्ञान युगात मुलांबरोबरच मुलीसुद्धा सर्व क्षेत्रात पुढे जाताना आपल्याला दिसत आहे. मुलांचे प्रत्येक क्षेत्र हे मुलीने काबीज केले असून मुलींच्या क्षेत्रात मुले फारसे दिसत नाही. सध्याच्या स्थितीत वाढत्या स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी व त्यावर कायमचा प्रतिबंध घालण्यासाठी डॉक्टरांची भूमिका महत्त्वाची आहे. डॉक्टरांचा व्यवसाय हा फक्त व्यवसाय नसून ती एक सामाजिक जबाबदारी आहे. आपल्या येथे मिळालेले ज्ञान समाजात सर्वत्र पोहचवा. असेही त्या यावेळी म्हणाल्या.
 
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. कार्यशाळेत पीसीपीएनडीटीबद्दलची माहिती प्रास्ताविकातून नोडल अधिकारी डॉ.भावना सोनकुसळे यांनी दिली. आयएमएच्या सदस्या डॉ. वर्षा ढवळे यांनी पीसीपीएनडीटीच्या कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन डॉ.बकूल पांडे यांनी केले. आभार डॉ.मिनाक्षी माने यांनी मानले.

 

 

मनपाद्वारे १५ ला विविध मार्गावरील बसेसचा शुभारंभ आज

नागपूर,ता.१४ : नागपूर महानगरपालिकेद्वारा परिवहन समितीमार्फत शहरातील विविध मार्गावरील बसेसचा शुभारंभ शनिवारी होत आहे. 
या कार्यक्रमाला परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप प्रामुख्याने उपस्थित राहतील.
 
बर्डी ते ओमनगर मार्गे (गड्डीगोदाम, इंदोरा चौक), बर्डी ते नवीन म्हाडा कॉलनी (मार्गे गड्डीगोदाम चौक रमाई नगर), बर्डी ते भीलगाव (मार्गे इंदोरा, कामठी), बर्डी ते मनिषनगर (मार्गे मुंजे चौक, छत्रपती चौक) या मार्गावरील बसेसचा शुभारंभ होणार आहे.
 
या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन परिवहन समिती सभापती बंटी कुकडे आणि परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी केले आहे.

 

 

मनपाच्या योजनांची ई-रिक्षाद्वारे “स्मार्ट” जनजागृती - धरमपेठ झोनला ई-रिक्षा सुपूर्दः प्रदूषणमुक्त आणि पैश्यांची बचत

नागपूर, ता. 14 जुलैः नागपूर महानगरपालिकेच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने धरमपेठ झोनने ई-रिक्षा खरेदी केला असून "पब्लीक अनाऊंसमेंट सिस्टीम"द्वारे मनपाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
 
स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव यांनी या ई-रिक्षाला हिरवी झेंडी दाखवली.  यावेळी प्रामुख्याने सत्तापक्षनेते संदीप जोशी, मनपा आयुक्त अश्विन मुदगल, जलप्रदाय समिती सभापती राजेश घोडपागे, महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, धरमपेठ झोन सभापती रुपा राय, अतिरिक्त आय़ुक्त रवींद्र कुंभारे, नगरसेविका परिणीता फुके, अमर बागडे, कमलेश चौधरी, उज्वला शर्मा, रुतिका मसराम, प्रमोद कौरती, सुनील हिरणवार, सहायक आय़ुक्त (कर) मिलिंद मेश्राम, धरमपेठ झोनचे सहायक आय़ुक्त महेश मोरोणे, धरमपेठ झोनचे अधिकारी व कर्मचा-यांची उपस्थिती होती.
 
मनपाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनजागृतीकरिता आजवर वापरण्यात येणा-या ऑटोवर मोठ्याप्रमाणावर खर्च होत होते. शिवाय याद्वारे प्रदूषणही होत होते. झोनचे सहायक आय़ुक्त महेश मोरोणे यांनी ई-रिक्षाची संकल्पना झोन सभापती रुपा राय यांच्याकडे मांडली. या संकल्पनेला प्रतिसाद देत,  सभापती रुपा राय यांनी आपल्या स्वच्छा निधीतून ई-रिक्षा साठी निधी मंजुर केला.  झोनकडे स्वतःचे ई-रिक्षा आल्याने याद्वारे प्रदूषणमुक्त आणि अल्प खर्चात मनपाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवता येणार आहेत. ई-रिक्षा एकवेळा पूर्ण चार्ज केल्यावर 8 तास उपयोगात येतो. तसेच झोनच्या कर्मचा-यांनाही देखिल एखादी तक्रार सोडविण्यासाठी जायचे असल्यास चार कर्मचारी यामध्ये बसून जाऊ शकतात अशी व्यवस्था आहे. अशा प्रकारे बहुउपयोगी “ई-रिक्षा” द्वारे स्मार्ट पद्धतीने धरमपेठ झोन मनपाच्या योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविणार आहे. ई-सेवा पुरविणारे नवीन अद्ययावत केंद्रदेखिल मनपाचे धरमपेठ झोनमध्ये सुरु झाले होते, हे विशेष. या अद्ययावत केंद्राचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले होते.
 
अभय योजना जनजागृतीसाठी उपयुक्त
17 जुलै ते 7 ऑगस्ट 2017 दरम्यान मनपातर्फे राबविण्यात येणा-या अभय़ योजनेची जनजागृती करण्यासाठी हे ई-रिक्षा उपयुक्त ठरणार असून याद्वारे प्रदूषणमुक्त आणि कमी खर्चात अभियानाची जनजागृती करण्यात येईल हे विशेष.

 

 

कामगिरी दाखवा नाहीतर घरी जा!

कामात हलगर्जीपणा करणा-या कर निरिक्षकांना आयुक्तांनी खडसावले
 
नागपूर, ता. १४ : थकीत मालमत्ता आणि पाणी कर असणाऱ्या ग्राहकांसाठी मनपाने ‘अभय योजना’ आणली आहे. १७ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा लाभ घ्या. थकीत कर भरा आणि मालमत्तेवरील जप्तीची कारवाई टाळा, असे आवाहन करीत कामात हलगर्जीपणा करणा-या कर निरिक्षकांना आयुक्त अश्विन मुदगल यांनी कामगिरी दाखवा नाहीतर घरी जा अशा स्पष्ट शब्दात खडसावले.
 
नागपूर महानगरपालिकेद्वारे थकीत मालमत्ता कर व पाणी कर वसुलीसाठी ‘अभय योजना’ १७ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त अश्विन मुदगल, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, जलप्रदाय समिती सभापती राजेश घोडपागे व अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, सहायक आयुक्त मिलींद मेश्राम, कार्यकारी अभियंता संजय गायकवाड यांनी शुक्रवारी (ता. १४) लक्ष्मीनगर व धरमपेठ झोन येथे आढावा बैठक घेतली. लक्ष्मीनगर झोन येथील बैठकीत झोन सभापती प्रकाश भोयर, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, नगरसेवक प्रमोद तभाने, झोन सहायक आयुक्त सुवर्णा दखने उपस्थित होते. धरमपेठ झोन येथे झोन सभापती रूपा राय, नगरसेविका वर्षा ठाकरे, परिणीता फुके, उज्ज्वला शर्मा, ऋतिका मसराम, नगरसेवक अमर बागडे, सुनील हिरणवार, कमलेश चौधरी, प्रमोद कौरती, झोन सहायक आयुक्त महेश मोरोणे उपस्थित होते.
 
आयुक्त अश्विन मुदगल यांनी दोन्ही झोनच्या कर वसुलीचा आढावा घेतला. १०० टक्के पेक्षा कमी कर वसुली खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला. ७ ऑगस्ट नंतर जे थकीत कर दाते आहे त्यांची मालमत्ता लिलावात काढा असे आदेश त्यांनी यावेळी अधिका-यांना दिले.  ज्या करदात्यांचे चेक अनादरित झाले त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश यावेळी आयुक्तांनी दिले. त्याचप्रमाणे ३१ ऑक्टोबर पर्यंत आपली ५० टक्के थकीत रक्कम वसूल करण्यात आली पाहिजे असे आदेश कर निरिक्षकांना दिले. प्रत्येक आठवड्याचा अहवाल सहायक आयुक्तांमार्फत माझ्याकेडे पोहचवा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
 
स्थायी समिती सभापती संदीप जाधव म्हणाले, ‘अभय योजना’ ही नागरिकांच्या सोयीसाठी आहे. मालमत्ता करावरील दंडाच्या रकमेवर ९० टक्के तर थकीत पाणी करावरील दंडाच्या रकमेवर १०० टक्के सवलत या योजनेअंतर्गत देण्यात येत आहे. नागरिकांनी आपली जबाबदारी समजून कराचा भरणा करावा. कर्मचाऱ्यांनीही नागरिकांना विश्वासात घेऊन या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना उद्युक्त करावे, असे निर्देश त्यांनी दिले. जो नागरिक ७ ऑगस्ट पर्यंत पाणी कर भरणार नाही त्यांचे नळाचे कनेक्शन कापावे असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
 
अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी अधिकाऱ्यांना या महत्त्वाकांक्षी योजनेचा प्रचार-प्रसार करण्याचे आदेश दिले.
 
तत्त्पूर्वी सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी ‘अभय योजने’बद्दलची माहिती दिली. १०० टक्के वसुली हे उद्दिष्ट ठेवून या योजना यशस्वी करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

 

 

उद्यानातील स्वच्छतागृहांची दिवसातून दोन वेळा सफाई करा

स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले यांचे निर्देश
 
नागपूर, ता. १३ : नागपूर शहरातील उद्यानांमध्ये दररोज सकाळ-संध्याकाळी हजारो नागरिक येतात. मात्र, तेथे असणाऱ्या स्वच्छतागृहासंदर्भात सर्वाधिक तक्रारी आहेत. आरोग्य विभागाकडे त्याच्या स्वच्छतेची जबाबदारी असली तरी उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी समन्वय ठेवून दररोज स्वच्छतागृहांची स्वच्छता करायलाच हवी. यासंदर्भात आरोग्य विभागाच्या झोनल अधिकाऱ्यांना तातडीने पत्र देऊन त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती संजय बंगाले यांनी उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
 
नागपूर शहरातील उद्यानांमध्ये होत असलेल्या स्थापत्यविषयक कामांचा आणि उद्यान देखभालीचा आढावा घेण्यासाठी मनपाच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला सभापती संजय बंगाले यांच्यासह सदस्य पल्लवी श्यामकुळे, रश्मी धुर्वे, शेख मोहम्मद जमाल, उद्यान अधीक्षक सुधीर माटे, कनिष्ठ अभियंता पी.आर. बांते, उद्यान निरीक्षक अमोल चौरपगार, अनंता नागमोते आणि श्री. शेंडे उपस्थित होते.
 
सभापती संजय बंगाले यांनी उद्यानातील स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसंदर्भात नाराजी व्यक्त करीत नागरिकांच्या आणि नगरसेवकांच्या तक्रारींचा हवाला दिला. उद्यानांमध्ये फिरायला येणाऱ्यांमध्ये सुमारे ७५ टक्के संख्या ज्येष्ठ नागरिकांची असते. त्यातील बहुतांश व्यक्ती स्वच्छतागृहांचा वापर करतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, हे आपले कर्तव्य आहे. सकाळी आणि संध्याकाळी नागरिक उद्यानात येत असेल तर दुपारी आणि सकाळी ६ वाजता स्वच्छतागृहांची स्वच्छता व्हायलाच हवी. उद्यान विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यावर स्वत: लक्ष केंद्रीत करण्याच्याही सूचना त्यांनी केल्या. स्वच्छ भारत अभियानांतर्गत आता स्वच्छ उद्यान ही संकल्पना राबवायला हवी. मोठ्या उद्यानांमध्ये कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प सुरू केल्यास उद्यानातील झाडांना त्याचा उपयोग होईल, असेही श्री. बंगाले यांनी सुचविले. उद्यानातील नादुरुस्त खेळण्यांकडेही उद्यान विभाग कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी सूचना त्यांनी केली.
 
उद्यान अधीक्षक सुधीर माटे यांनी उद्यान विभागाची संपूर्ण माहिती सभापती व सदस्यांना दिली. उद्यान विभागातील उद्यान निरिक्षकाच्या पाच पैकी तीन जागा रिक्त आहेत. यासंदर्भात आयुक्तांच्या परवानगीने प्रस्ताव पाठविला असून लवकरच त्याची प्रक्रिया सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. अनुकंपामध्ये भरती करण्यात आलेल्या १० कर्मचाऱ्यांना झोननिहाय निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. ते वेळोवेळी उद्यानाचे निरीक्षण करतात. ज्या उद्यानांत स्वच्छतागृहे नाहीत तेथे बायोडायजेस्टर टॉयलेट देण्यासंदभारतील प्रस्ताव असून लवकरच ती व्यवस्था होईल. कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्पासंदर्भात महिला व बालकल्याण समितीची मदत घेण्यात येत असून त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. काही उद्यानांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर महिला बचत गटांना हा कंत्राट देण्यात येणार आहे. त्यांनी तयार केलेले कंपोस्ट खत संबंधित कंत्राटदाराला विक्री करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. याप्रसंगी समितीच्या अन्य सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निरसन अधिकाऱ्यांनी केले.

 

 

मनपा क्रीडा सभापतींनी केली तुकडोजी महाराज क्रीडा संकुलाची पाहणी

नागपूर, ता. १४ : नागपूर महानगरपालिकेद्वारा संचालित गणेशपेठ येथील तुकडोजी महाराज क्रीडा संकुलाची (निडहॅम पार्क) पाहणी मनपाचे क्रीडा सभापती नागेश सहारे आणि उपसभापती प्रमोद तभाने यांनी केली.
 
या संकुलात जलतरण तलाव जिन्मॅशियम हॉल, स्केटींग रिंक, बॅडमिंटन हॉल आहे. हे संकुल मनपा स्वत: चालविण्याचा विचार करीत असून त्यासंदर्भात महासभेच्या निर्णयान्वये काही दिशानिर्देशन देण्यात आले होते. यासंदर्भातील पुढील कार्यवाही करण्याचे अधिकार क्रीडा विभागाला देण्यात आले. याच अनुषंगाने श्री. सहारे यांनी तुकडोजी महाराज क्रीडा संकुलाला भेट  दिली. मनपाच्या वतीने सदर क्रीडा संकुल चालविण्यात येणार असेल तर त्यात काही दुरुस्त्या कराव्या लागतील. स्केटींग रिंकला मोठे करणे आणि जलतरण तलावामध्ये काही दुरुस्त्या त्यांनी सुचविल्या.
 
या भेटीप्रसंगी मनपा क्रीडा व सांस्कृतिक विभागाचे क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, कर्मचारी जितेंद्र गायकवाड, संजय मेश्राम, श्याम थोरात, रवी पाटील, अशीष पाटील, संदीप माने, छोटे खान, चेतन चिवंडे, कमलेश वानखेडे उपस्थित होते.

 

 

थकीत कर भरा जप्तीची कारवाई टाळा

स्थायी समिती सभापती संदीप जाधव यांचे आवाहन
 
नागपूर, ता. १३ : थकीत मालमत्ता आणि पाणी कर असणाऱ्या ग्राहकांसाठी मनपाने ‘अभय योजना’ आणली आहे. १७ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा लाभ घ्या. थकीत कर भरा आणि मालमत्तेवरील जप्तीची कारवाई टाळा, असे आवाहन झोन आढावा बैठकीच्या माध्यमातून स्थायी समिती सभापती संदीप जाधव यांनी केले.
 
नागपूर महानगरपालिकेद्वारे थकीत मालमत्ता कर व पाणी कर वसुलीसाठी ‘अभय योजना’ १७ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर स्थायी समिती सभापती संदीप जाधव, जलप्रदाय समिती सभापती राजेश घोडपागे व अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी गुरुवारी (ता. १३) गांधीबाग झोन आणि सतरंजीपुरा झोन येथे आढावा बैठक घेतली. गांधीबाग झोन येथील बैठकीत झोन सभापती सुमेधा देशपांडे, अग्निशमन समिती सभापती ॲड. संजय बालपांडे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, नगरसेवक भुट्टो जुल्फेकार अहमद, बंटी शेळके, नगरसेविका श्रद्धा पाठक, नेहा वाघमारे, अन्सारी सैय्यदा बेगम मो. निजामुद्दीन, निजान मुमताज मो. इरफान अन्सारी, आशा नेहरू उईके (आयशा), सहायक आयुक्त (कर आकारणी) मिलिंद मेश्राम, झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील उपस्थित होते. सतरंजीपुरा झोन येथे झोन सभापती संजय चावरे, नगरसेवक संजय महाजन, नितीन साठवणे, नगरसेविका आभा पांडे, झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे उपस्थित होते.
 
स्थायी समिती सभापती संदीप जाधव म्हणाले, ‘अभय योजना’ ही नागरिकांच्या सोयीसाठी आहे. मालमत्ता करावरील दंडाच्या रकमेवर ९० टक्के तर थकीत पाणी करावरील दंडाच्या रकमेवर १०० टक्के सवलत या योजनेअंतर्गत देण्यात येत आहे. नागरिकांनी आपली जबाबदारी समजून कराचा भरणा करावा. कर्मचाऱ्यांनीही नागरिकांना विश्वासात घेऊन या योजनेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना उद्युक्त करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी अधिकाऱ्यांना या महत्त्वाकांक्षी योजनेचा प्रचार-प्रसार योग्यरीतीने आणि प्रभावीपणे करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.
 
गांधीबाग झोन भागात हिंदी भाषिक रहिवासी अधिक असल्याने या भागात प्रचार साहित्य हिंदीत असेल तर त्याचा फायदा होईल, अशी सूचना नगरसेवक भुट्टो जुल्फेकार अहमद यांनी केली. या सूचनेचे सभापतींनी स्वागत केले आणि प्रचार साहित्य हिंदीत प्रकाशित करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.
तत्त्पूर्वी सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी ‘अभय योजने’बद्दलची माहिती दिली. १०० टक्के वसुली हे उद्दिष्ट ठेवून या योजना यशस्वी करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

 

 

उद्यानातील स्वच्छतागृहांची दिवसातून दोन वेळा सफाई करा

स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले यांचे निर्देश
 
नागपूर, ता. १३ : नागपूर शहरातील उद्यानांमध्ये दररोज सकाळ-संध्याकाळी हजारो नागरिक येतात. मात्र, तेथे असणाऱ्या स्वच्छतागृहासंदर्भात सर्वाधिक तक्रारी आहेत. आरोग्य विभागाकडे त्याच्या स्वच्छतेची जबाबदारी असली तरी उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी समन्वय ठेवून दररोज स्वच्छतागृहांची स्वच्छता करायलाच हवी. यासंदर्भात आरोग्य विभागाच्या झोनल अधिकाऱ्यांना तातडीने पत्र देऊन त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती संजय बंगाले यांनी उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
 
नागपूर शहरातील उद्यानांमध्ये होत असलेल्या स्थापत्यविषयक कामांचा आणि उद्यान देखभालीचा आढावा घेण्यासाठी मनपाच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला सभापती संजय बंगाले यांच्यासह सदस्य पल्लवी श्यामकुळे, रश्मी धुर्वे, शेख मोहम्मद जमला मो. इब्राहीम, उद्यान अधीक्षक सुधीर माटे, कनिष्ठ अभियनता पी.आर. बांते, उद्यान निरीक्षक अमोल चोरपगार, अनंता नागमोते आणि श्री. शेंडे उपस्थित होते.
 
सभापती संजय बंगाले यांनी उद्यानातील स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसंदर्भात नाराजी व्यक्त करीत नागरिकांच्या आणि नगरसेवकांच्या तक्रारींचा हवाला दिला. उद्यानांमध्ये फिरायला येणाऱ्यांमध्ये सुमारे ७५ टक्के संख्या ज्येष्ठ नागरिकांची असते. त्यातील बहुतांश व्यक्ती स्वच्छतागृहांचा वापर करतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे, हे आपले कर्तव्य आहे. सकाळी आणि संध्याकाळी नागरिक उद्यानात येत असेल तर दुपारी आणि सकाळी ६ वाजता स्वच्छतागृहांची स्वच्छता व्हायलाच हवी. उद्यान विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यावर स्वत: लक्ष केंद्रीत करण्याच्याही सूचना त्यांनी केल्या. स्वच्छ भारत अभियानांतर्गत आता स्वच्छ उद्यान ही संकल्पना राबवायला हवी. मोठ्या उद्यानांमध्ये कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प सुरू केल्यास उद्यानातील झाडांना त्याचा उपयोग होईल, असेही श्री. बंगाले यांनी सुचविले. उद्यानातील नादुरुस्त खेळण्यांकडेही उद्यान विभाग कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी सूचना त्यांनी केली.
 
उद्यान अधीक्षक सुधीर माटे यांनी उद्यान विभागाची संपूर्ण माहिती सभापती व सदस्यांना दिली. उद्यान विभागातील कर्मचारी कमी झाले असून सुमारे ७७ कर्मचारी इतरत्र हलविण्यात आले आहेत. उद्यान निरिक्षकाच्याही पाच पैकी तीन जागा रिक्त आहेत. यासंदर्भात आयुक्तांच्या परवानगीने प्रस्ताव पाठविला असून लवकरच त्याची प्रक्रिया सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. अनुकंपामध्ये भरती करण्यात आलेल्या १० कर्मचाऱ्यांना झोननिहाय निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. ते वेळोवेळी उद्यानाचे निरीक्षण करतात. उद्यान देखरेखीचा कंत्राट खासगी कंपनीला देण्यात आला असून त्यांचे काम असमाधानकारक असल्याची माहितीही श्री. माटे यांनी दिली. ज्या उद्यानांत स्वच्छतागृहे नाहीत तेथे बायोडायजेस्टर टॉयलेट देण्यासंदभारतील प्रस्ताव असून लवकरच ती व्यवस्था होईल. कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्पासंदर्भात महिला व बालकल्याण समितीची मदत घेण्यात येत असून त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. काही उद्यानांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर महिला बचत गटांना हा कंत्राट देण्यात येणार आहे. त्यांनी तयार केलेले कंपोस्ट खत संबंधित कंत्राटदाराला विक्री करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
 
याप्रसंगी समितीच्या अन्य सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे निरसन अधिकाऱ्यांनी केले.

 

 

शतप्रतिशत कर वसुली हेच मनपाचे उद्दिष्ट

स्थायी समिती सभापती व आयुक्तांनी घेतला हनुमाननगर झोन व धंतोली झोनचा आढावा
 
नागपूर,ता.१२ : नागपूर महानगरपालिकेद्वारे थकीत मालमत्ता कर व पाणी कर वसुलीसाठी ‘अभय योजना’ १७ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर स्थायी समिती सभापती संदीप जाधव व आयुक्त अश्विन मुदगल यांनी हनुमाननगर व धंतोली झोन येथे बुधवारी (ता.१२) आढावा बैठक घेतली. शतप्रतिशत कर वसुली हेच मनपाचे उद्दिष्ट असून अभय योजनेअंतर्ग १०० टक्के वसुलीवर भर द्या, असे निर्देश स्थायी समिती सभापती संदीप जाधव यांनी दिले.  
 
याप्रसंगी जलप्रदाय समिती सभपती राजेश घोडपागे, हनुमाननगर झोन सभापती भगवान मेंढे, नगरसेवक रवींद्र भोयर, दीपक चौधरी, राजेंद्र सोनकुसरे, नागेश मानकर, नगरसेविका रूपाली ठाकूर, स्वाती आखतकर, उषा पायलट, मंगला खेकरे, कल्पना कुंभलकर, सहायक आयुक्त (कर विभाग) मिलींद मेश्राम, सहायक आयुक्त राजू भिवगडे, कार्यकारी अभियंता संजय गायकवाड आदी उपस्थित होते.
        
प्रारंभी हनुमाननगर झोन सहायक आयुक्त राजू भिवगडे यांनी झोनमार्फत येणाऱ्या करांची प्राप्ती व थकबाकी याबाबत माहिती दिली. स्थायी समिती सभापती संदीप जाधव यांनी मनपातर्फे जाहीर करण्यात आलेल्या ‘अभय योजने’ची माहिती दिली. १०० टक्के मालमत्ता कर व पाणी कर वसूल करण्यावर भर द्या. जे  कर भरणार नाही त्यांची मालमत्ता जप्त करा अथवा लिलाव करा, असे निर्देश यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. जे कर्मचारी कामात हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.  
        
या अभय योजनेमार्फत थकीत मालमत्ता करावरील दंडाच्या रकमेवर ९० टक्के सवलत देण्यात आली आहे.  थकीत पाणी करावरील दंडाच्या १०० टक्के सवलत देण्यात येत आहे. ही योजना १७ जुलै ते ७ ऑगस्ट या दरम्यान राबविण्यात येणार असल्याची माहिती सभापती संदीप जाधव यांनी दिली. ज्या मोकळ्या भूखंडावर कचरा जमा झाला आहे त्या भूखंडमालकांना नोटीस देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
 
...तर थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करुन लिलाव करु : अश्विन मुदगल
संबंधित झोन सहायक आय़ुक्त व राजस्व निरिक्षकांनी कर थकबाकीदारांशी थेट संपर्क करुन, त्यांना मालमत्ता कर अभय योजना योजनेचा लाभ देऊन त्यांची पाटी कोरी करावी, १७ जुलै ते ७ ऑगस्ट २०१७ पर्यंत राबविण्यात येणाऱ्या योजनेनंतरही कर न भरणाऱ्यांच्या मालमत्ता जप्त करुन लिलावाची कारवाई आठ दिवसांत करावी. यामध्ये अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा खपवून घेण्यात येणार नाही, अशी ताकीद मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिली. मनपाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या मालमत्ता कर अभय योजना आणि पाणी बिलासाठी  ‘वन टाईम सेटलमेंट’ योजनेचा झोननिहाय आढावा घेण्यासाठी धंतोली झोन येथे बुधवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रामुख्याने स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव, स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती राजेश घोडपागे, धंतोली झोन सभापती प्रमोद चिखले, सहायक आय़ुक्त (कर) मिलिंद मेश्राम, सहायक आय़ुक्त गणेश राठोड, नगरसेविका वंदना भगत, विशाखा बांते, जयश्री वाडीभस्मे, लता काडगाये, भारती बुंदे, विशाखा मोहोड, हर्षला साबळे यांची उपस्थिती होती.
 
तातडीने तक्रार करा
कर आकारणी पद्धतीत पारदर्शकता येण्याकरिता शहरातील इमारती व जमिनींबाबतची पूर्ण माहिती प्राप्त करण्यासाठी सायबरटेक या कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. यामध्ये शहरात कंपनीच्या चमूच्या वतीने घरोघरी जाऊन सर्वेक्षण कऱण्यात येत आहे. सायबरटेक या कंपनीच्या चमूच्या प्रतिनिधीसोबत कोणतेही आर्थिक व्यवहार करण्यात येऊ नये. चमूतील प्रतिनिधीनी पैशाची मागणी केल्यास संबंधित व्यक्तीची तातडीने झोन कार्यालय किंवा मनपा मुख्यालयात तक्रार करावी. शक्य असल्यास व्यक्तीचे छायाचित्रही मोबाईलमध्ये काढावे. यावर त्वरित कारवाई कऱण्यात येईल, असे आश्वासन यावेळी आयुक्तांनी केले.
 
प्रत्येक तीन महिन्यात आढावा
थकबाकीदारांकडून 70 टक्के किंवा 80 टक्के रक्कम वसूल केली असल्याचे कर निरीक्षकाने सांगितलेले खपवून घेण्यात येणार नसून 100 टक्के उद्दिष्ट प्रत्येकाला पूर्ण करायचे असल्याचेही यावेळी आय़ुक्तांनी सांगितले.
 

 

औद्योगिक विकासासाठी भूखंडधारकांना मिळणार प्रीमियममध्ये सूट : संजय बंगाले

नगररचना विभागाच्या प्रस्तावात अंशत: बदल करून स्थापत्य समितीने दिली मंजुरी
 
नागपूर, ता. १२ : विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत नगरविकासाने औद्योगिक जागेच्या वापरासंदर्भात बदलासह दिलेल्या प्रस्तावात अंशत: बदल करीत निवासी वापराकरिता १० टक्के आणि वाणिज्यिक वापराकरिता २० टक्के प्रीमियम करण्यात यावा. हा बदल करून नव्याने प्रस्ताव सभागृहासमोर ठेवण्याचे निर्देश स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती संजय बंगाले यांनी दिले.
 
मनपाच्या सर्वसाधारण सभेने दिलेल्या निर्देशनानुसार औद्योगिक विभागातील जागेसंदर्भात नगररचना विभागाने दिलेल्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी मनपाच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत श्री. बंगाले यांनी सदर निर्देश दिले. बैठकीला समितीचे उपसभापती संजय बंगाले, उपसभापती अभय गोटेकर, समिती सदस्य विद्या कन्हेरे, पल्लवी श्यामकुळे, रश्मी धुर्वे, शेख मोहम्मद जमाल मोहम्मद इब्राहीम, नगररचना विभागाच्या सहायक संचालक सुप्रिया थूल, नगररचनाकार प्र.प्र. सोनारे, उपअभियंता प्र. प्र. धनकर, शाखा अभियंता आर. एम. निमजे, एम. जे. देशपांडे, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक सी. एम. गुरुमुळे, आर.बी. गौतम उपस्थित होते.
 
नागपूर शहराची विकास नियंत्रण नियमावली ३१ मार्च २००१ अन्वये मंजूर झाली असून ती ९ एप्रिल २००१ पासून अंमलात आली आहे. नागपूर शहराच्या मंजूर नियंत्रण नियमावली-२००० मधील नियम क्र. १४.२.१ मध्ये महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम ३७ अन्वये फेरबदल करण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यासाठी नगर रचना विभागाने तो महासभेपुढे ठेवला होता. औद्योगिक विभागातील कोणतीही मोकळी जमीन किंवा जमिनी किंवा बंद औद्योगिक युनीट/युनीट्‌सच्या जमिनीवर वाणिज्य विभागातील सर्व अनुज्ञेय वापर वाणिज्य वापरातील अनुज्ञेय चटई क्षेत्र निर्देशांसह वापरता येईल. परंतु निवासी आणि किंवा गैरवाणिज्य वापराकरिता दरवर्षी प्रसिद्ध होणाऱ्या वार्षिक शीघ्र सिद्ध गणकातील विकसित जमिनीच्या दराच्या २० टक्के प्रीमियमच्या भरणा करावा लागेल आणि पूर्णपणे वाणिज्य वापराकरिता ४० टक्के प्रीमियमचा भरणा करावा लागेल, असा बदलाचा प्रस्ताव नगररचना विभागाने दिला होता. यासंदर्भात योग्य निर्णय घेण्यासाठी महासभेने हा विषय स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीकडे सोपविला होता. बुधवारी झालेल्या बैठकीत समितीने यामध्ये बदल सुचविला आहे. निवासी वापराकरिता २० ऐवजी १० टक्के तर वाणिज्य वापराकरिता ४० ऐवजी २० टक्के प्रीमियम भरणा करावा लागेल, असे बदल करून नव्याने प्रस्ताव महासभेपुढे ठेवण्याचे निर्देश नगररचना विभागाला दिले. १२ मीटर किंवा त्यापेक्षा अधिक रुंदीच्या रस्त्यासंमुख भूखंडावर वाणिज्यिक बांधकामे अनुज्ञेय राहतील तर ९ मीटर मार्गावरील सर्व बांधकामे हे निवासी वापराकरिता अनुज्ञेय राहील, असेही प्रस्तावात नमूद आहे.

 

 

अभय योजनेच्या यशस्वीतेसाठी स्थायी समिती सभापती आणि आयुक्तांचा बुधवारपासून झोननिहाय आढावा

नागपूर, ता. ११ : पाणी व मालमत्ता कर थकीत असलेल्या ग्राहकांसाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने १७ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत ‘अभय योजना’ राबविण्यात येत आहे. ह्या योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी आणि नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, यासाठी तयारीचा पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने स्थायी समिती सभापती संदीप जाधव आणि आयुक्त अश्विन मुदगल बुधवार १२ जुलैपासून झोननिहाय आढावा घेणार आहेत.
 
मालमत्ता कर व जलप्रदाय विभागाच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने केलेल्या उपाययोजना व नियोजन याचा आढावा या दौऱ्यात ते घेतील. १२ जुलै रोजी दुपारी ३ वाजता हनुमाननगर आणि ४.३० वाजता धंतोली झोन, १३ जुलै रोजी दुपारी ३ वाजता गांधी-महाल झोन, ४.३० वाजता सतरंजीपुरा झोन, १४ जुलै रोजी दुपारी ३ वाजता लक्ष्मीनगर झोन, ४.३० वाजता धरमपेठ झोन, १५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता नेहरूनगर झोन, ४.३० वाजता लकडगंज झोन तर १७ जुलै रोजी दुपारी ३ वाजता आसीनगर झोन आणि ४.३० वाजता मंगळवारी झोनला ते भेट देतील.

 

 

विविध मार्गावरील बस सेवेला प्रारंभ

आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, परिवहन सभापती बंटी कुकडे यांनी दाखविली हिरवी झेंडी
 
नागपूर,ता. ११ : नागपूर महानगरपालिका परिवहन समितीद्वारे नागपूर शहरात विविध मार्गावर नव्या बस सेवेला सुरुवात करण्यात आली.  पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे, परिवहन सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी हिरवी झेंडी दाखवून बस सेवेला प्रारंभ केला.
यावेळी परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप प्रामुख्याने उपस्थित होते. बर्डी ते श्रीकृष्णनगर (मार्गे कॉटन मार्केट, एस.टी.स्टँड, टिळक पुतळा, आयचित मंदिर मार्गे), बर्डी ते भांडेवाडी (मार्गे एस.टी. स्टँड, आयचित मंदिर, जगनाडे चौक, भीम चौक, धरतीमाता नगर), बर्डी ते गिडोबा मंदिर (मार्गे आकाशवाणी चौक, कॉटन मार्केट, एस.टी.स्टँड, क्रीडा चौक, सक्करदरा चौक, मोठा ताजबाग, खरबी चौक), बर्डी ते मुदलीयार चौक मार्गे (मार्गे रेल्वे स्टेशन, गांधीबाग, डागा हॉस्पीटल, इतवारी स्टेशन), बर्डी ते दाभा (गणेशनगर) (मार्गे रविनगर, वाडी नाका, टोल नाका, दाभा नाका, ठाकरे ले-आऊट) असे नव्या बसेसचे मार्ग आहेत.
          
या मार्गावरील बसेसची मागणी सातत्याने नागरिकांकडून होत असल्याने परिवहन समिती सभपाती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी पुढाकार घेऊन या बसेस सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. या बससेवेचा शुभारंभ श्रीकृष्ण नगर मंदिराजवळ, भांडेवाडी (बिडगाव फाटा), दाभा, गणेशनगर व गोळीबार चौक येथे संपन्न झाला. या प्रमुख मार्गावर बससेवा सुरू झाल्याबद्दल नागरिकांनी आनंद व्यक्त केला. 

 

 

विविध माध्यमातून नागरिकांपर्यंत योजनेची माहिती पोहचविण्याचे नियोजन करा : संदीप जाधव

१७ जुलैपासून थकीत मालमत्ता व पाणी कर भरण्यासाठी ‘अभय योजना’
 
स्थायी समिती सभापती संदीप जाधव, आयुक्त अश्विन मुदगल यांनी घेतला आढावा
 
नागपूर, ता. ११ : पाणी व मालमत्ता कर थकीत असलेल्या ग्राहकांसाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने १७ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत ‘अभय योजना’ राबविण्यात येत आहे. ही योजना अधिकाधिक नागरिकांना माहिती व्हावी ह्या उद्देशाने विविध माध्यमातून योजनेचा प्रचार, प्रसार करण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. जनजागृतीच्या तयारीचा आढावा मंगळवारी (ता. ११) स्थायी समिती सभापती संदीप जाधव आणि आयुक्त अश्विन मुदगल यांनी घेतला.
 
मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला स्थायी समिती सभापती संदीप जाधव, आयुक्त अश्विन मुदगल, जलप्रदाय समितीचे सभापती राजेश घोडपागे यांच्‍यासह सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड व ओसीडब्ल्यूचे संचालक के.एन.पी. सिंग, कार्यकारी अधिकारी संजय रॉय, राहुल कुळकर्णी यावेळी उपस्थित होते.
ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी अभय योजनेच्या जनजागृतीसाठी केलेल्या तयारीची माहिती दिली. बॅनर्स, पोस्टर्स, होर्डींग शहरातील विविध भागांत, वस्त्यांमध्ये लावण्यात येणार आहेत. स्थानिक केबल, थिएटर्स तसेच वर्तमानपत्रात जाहिरातींच्या माध्यमातून ‘अभय योजने’ची माहिती नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. योजनेची माहिती देणारे एक पत्रक पाणी बिलासह सुमारे सव्वा लाख ग्राहकांपर्यंत पोहचविण्यास सुरुवात झाल्याची माहितीही ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी दिली.
 
शहर परिवहन सेवेच्या बसेस, शहरातील ऑटो रिक्शावर फ्लेक्स लावण्यात येतील तसेच दवंडी देऊन लोकांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी दिली.
 
नागपूर शहरातील लोकांसाठी ‘अभय योजना’ म्हणजे आपली पाटी कोरी करण्याची अखेरची संधी असल्याचे स्थायी समिती सभापती संदीप जाधव म्हणाले. सर्व आमदारांना व नगरसेवकांना यासाठी विश्वासात घेऊन त्यांच्या माध्यमातून जनजागृती करून प्रभागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत प्रत्येक घरापर्यंत पोहचण्याचे उद्दिष्ट गाठा, असे निर्देश श्री. संदीप जाधव यांनी अधिकाऱ्यांना दिले. योजनेची माहिती देणारे पत्रक संबंधित मतदारसंघांतील आमदार महोदयांच्या कार्यालयात आणि नगरसेवकांच्या कार्यालयात अभ्यागतांसाठी ठेवण्याच्या सूचनाही श्री. जाधव यांनी केल्या.
 
आयुक्त अश्विन मुदगल म्हणाले, ‘अभय योजने’अंतर्गत पाणी कर थकीत असलेल्या ग्राहकांना बिलावरील दंडाची रक्कम १०० टक्के माफ केली जाईल. मालमत्ता करावरील दंडाची रक्कम ९० टक्के माफ केली जाईल. सदर योजना १७ जुलै ते ७ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार असून ज्यांच्याकडे रक्कम थकीत आहे अशा प्रत्येक ग्राहकांपर्यंत योजनेची माहिती पोहोचण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिले.
सुटीच्या दिवशीही स्वीकारली जाईल रक्कम
 
पाणी कर स्वीकारण्यासाठी दहाही झोनअंतर्गत २१ संकलन केंद्र उघडण्यात येतील. तर मालमत्ता कर केवळ झोन कार्यालयातच स्वीकारला जाईल. ही केंद्र सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजतापर्यंत सुरू राहील. विशेष म्हणजे रविवारीसुद्धा ही कर संकलन केंद्र सुरू राहतील. ग्राहकांना त्यांची देय रक्कम www.ocwindia.com किंवा www.nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावर लॉग इन करून जाणून घेता येईल.

 

 

नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आवश्यकता असलेल्या बाबींचा अहवाल सादर करा : महापौर नंदा जिचकार

महापौरांनी घेतला आरोग्य सेवा व इमारतीच्या सुव्यवस्थेचा आढावा
 
नागपूर, ता. १० : नागपूर महानगरपालिकेद्वारा संचालित दवाखाने व डिस्पेन्सरीमध्ये शहरवासीयांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी मनपा प्रयत्न करीत असून मनपा रुग्णालय, डिस्पेन्सरीमध्ये आरोग्य सेवा व इमारतीच्या सुव्यवस्थेसाठी लागणाऱ्या बाबींचा आरोग्य केंद्रनिहाय अहवाल केंद्र प्रमुखांनी आरोग्य समितीकडे सादर करावा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
 
नागपूर महानगरपालिकेद्वारा संचालित दवाखाने व डिस्पेन्सरीमार्फत पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा व इमारतीच्या सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी सोमवारी (ता. १० जुलै) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात बैठकीचे आय़ोजन करण्यात आले होते. यावेळी प्रामुख्याने उपमहापौर दीपराज पार्डीकर, भाजपच्या प्रतोद दिव्या धुऱडे, माजी महापौर प्रवीण दटके, वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती सभापती मनोज चापले, अपर आय़ुक्त डॉ. आर. झेड. सिद्दीकी, आरोग्य अधिकारी (एम) अनिल चिव्हाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, साथरोग अधिकारी डॉ. सुनील घुरडे, नोडल ऑफिसर (मातामृत्यू) डॉ. बकुल पांडे, डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. स्नेहल पंडीत, डॉ. भावना सोनकुसरे, डॉ. शिलू चिमूरकर, डॉ. शिल्पा जिचकार, डॉ. संगीता खंडाईत, डॉ. श्यामसुंदर शिंदे, डॉ. सुलभा शेंडे यांची उपस्थिती होती.
 
याप्रसंगी बोलताना महापौर नंदा जिचकार पुढे म्हणाल्या, शहरातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, तसेच आरोग्य केंद्रावर कार्यरत डॉक्टर व कर्मचारी यांना आरोग्य सेवा देत असताना येणाऱ्या अडचणी किंवा आरोग्य केंद्रात आवश्यक असलेली यंत्र सामुग्री, मनुष्यबळ आदी गरजेच्या बाबींचा केंद्रनिहाय सविस्तर अहवाल आरोग्य समितीपुढे सादर करावा. आरोग्य केंद्रांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तातडीने योग्य निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासनही यावेळी महापौरांनी दिलेत. बैठकीत आरोग्य अधिकारी (एम) डॉ. अनिल चिव्हाणे यांनी मनपाद्वारा संचालित आरोग्य केंद्रांच्या स्थापनेची आणि सध्या उपलब्ध सुविधांची माहिती दिली. यावेळी उपस्थित डॉक्टरांनी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामुग्रीची गरज असल्याचे महापौरांना लक्षात आणून दिले. आरोग्य सुविधा याविषयावर चर्चा करण्यापेक्षा प्रत्येक केंद्राकडून त्यांना आवश्यक बाबींचा सविस्तर अहवाल मागवून प्रत्येक विषयावर स्वतंत्र बैठक घेतल्यानंतर आरोग्य केंद्रांचे प्रश्न सुटतील. त्यामुळे केंद्र प्रमुखांनी आपला अहवाल आरोग्य समिती समोर सादर करणे योग्य राहणार असल्याचे माजी महापौर प्रवीण दटके यांनी सुचविले.

 

 

गोळीबार चौक ते शांतीनगर ‘मिडी बस’ सुरू

उपमहापौर दीपराज पार्डीकर व सभापती बंटी कुकडे यांनी दाखविली हिरवी झेंडी
 
नागपूर,ता. १० : नागपूर महानगरपालिका परिवहन समितीमार्फत ‘आपली बस’अंतर्गत गोळीबार चौक ते शांतीनगर या मार्गावर आजपासून (ता. १०) नव्याने ‘मिडी बस’चे सुरू करण्यात आली. उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी हिरवी झेंडी दाखवून या बसचा शुभारंभ केला.
 
याप्रसंगी परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे, नगरसेवक रमेश पुणेकर, माजी महापौर देवराव उमरेडकर, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप उपस्थित होते. गोळीबार चौक पासून शांतीनगर येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवेंसदिवस वाढत असल्याने तेथे बस सुरू करावी अशी मागणी वारंवार नागरिक करीत होते. त्यामुळे सभापती बंटी कुकडे यांनी पुढाकार घेऊन ही बस सुरू केली, अशी माहिती उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी दिली. या बसचा मार्ग गोळीबार चौक, प्रेमनगर मार्गे शांतीनगर असा असून ही बस नागरिकांना सोयीची ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
 
कार्यक्रमाला संजय वऱ्हाडे, भूषण दडवे, रामभाऊ अंबुलकर, आरमोरकर, चंद्रशेखर डोर्लीकर, तसेच परिसरातील नागरिक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

ऊर्जाबचत ही काळाची गरज – प्रा. अनिल सोले

मनपाद्वारे पोर्णिमा दिन साजरा
 
नागपूर, ता ८ : ऊर्जाबचत ही काळाची गरज आहे. 'पौर्णिमा दिवस' हा उपक्रम ऊर्जाबचतीच्या दिशेने टाकलेले सकारात्मक पाऊल आहे. नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन माजी महापौर आमदार अनिल सोले यांनी केले. 
 
नागपूर महानगरपालिका व ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या वतीने सीए रोड येथील आंबेडकर चौक येथे शनिवारी (ता.८) पोर्णिमा दिना साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी महापौर प्रवीण दटके, माजी परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, ग्रीन व्हिजीलचे संयोजक कौस्तव चॅटर्जी आदी उपस्थित होते.
 
यावेळी चौक परिसरातील पथदिवे, तसेच दुकांनातील बाहेरील अतिरिक्त दिवे रात्री ८ ते ९ या वेळेत अर्थात एक तास  बंद करण्यात आले होते. कार्यक्रमाला लकडगंज झोनचे कनिष्ठ अभियंता राजेश भाजीपाले, मिलिंद साकोले, राहुल कुबडे, रवींद्र निंबोलकर, जगन राऊत, सुरभी जयस्वाल, शीतल चौधरी, पूजा लोखंडे, दिगंबर नागपुरे,  अभय पौनीकर, मेहूल कोसरकर आदी उपस्थित होते.

 

 

मनपाच्या हागणदारी मुक्त शहर साकारण्याच्या प्रयत्नांना यश

हागणदारी स्थळांचा आयुक्तांनी केला आकस्मिक दौरा
 
नागपूर, ता. ८ :  शहरात उघड्यावर शौचास बसणाऱ्यांसाठी सामुदायिक आणि सार्वजनिक शौचालय उभारुन शहराला हागणदारीमुक्त करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने केलेल्या प्रयत्नांना यश आले असल्याचे शनिवारी (ता. ८ जुलै) दिसून आले. मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांनी अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर यांच्यासह शहरातील धरमपेठ, धंतोली, नेहरुनगर, हनुमाननगर झोन अंतर्गत येणाऱ्या हागणदारी स्थळांची आकस्मिक पाहणी केली. 
धरमपेठ झोनच्या पाहणी दौऱ्यादरम्यान सहायक आयुक्त महेश मोरोणे यांची उपस्थिती होती. पाहणी दौऱ्यात स्मार्ट अॅन्ड  सस्टेनेबल सिटी या संस्थेच्या लिना बुधे, शुभांगी पडोळे होत्या.
 
झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या नागरिकांकडे शौचालय नसल्याने त्यांना उघड्यावर शौचास जावे लागत होते. मात्र मनपाने शहरातील विविध भागात सामुदायिक आणि सार्वजनिक शौचालयांची व्यवस्था करुन दिली. विशेष म्हणजे तेथे पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. मनपाच्या या पुढाकाराला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला. 
 
शनिवारी आय़ुक्तांनी केलेल्या दौऱ्यादरम्यान एकही व्यक्ती उघड्यावर शौचास जाताना आढळला नाही, हे विशेष. आय़ुक्तांनी सकाळी साडेसात वाजता सुदामनगरी, अंबाझरी येथील शौचालय आणि खुल्या मैदानाची पाहणी केली. नागरिक शौचालयाचा वापर करीत आहे का ? य़ाबद्दलची विचारपूसही यावेळी आयुक्तांनी स्वतः पुढाकार घेऊन केली. यावेळी मनपाने केलेल्या सोयीबद्दल नागरिकांनी मनपाचे आभार मानले. त्याची देखभालही आम्ही करणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी आयुक्तांनी सुदामगरी येथील खुल्या मैदानाच्या सुशोभीकऱणाचे निर्देश सहायक आय़ुक्त महेश मोरोणे यांना दिले.
 
यानंतर आयुक्तांनी फुटाळा येथील स्वच्छतेची पाहणी केली. हजारी पहाड येथील मनपाच्या शाळेतील शौचालयाची पाहणी केली. शाळेच्या मुख्याध्यापिकांनी शाळा परिसरात सायंकाळी असामाजिक तत्वांमुळे शाळेचे नुकसान होत असून सुरक्षा भिंत बांधून देण्याची विनंती केली. यावर आयुक्तांनी तातडीने शाळेकरिता सुरक्षा भिंत बांधण्याचे निर्देश दिले. 
 
यानंतर हजारी पहाड, वायुसेना जवळ असलेल्या झोपडपट्टीतील नागरिकांसाठी शौचालय नसल्याने उघड्यावर शौचास जावे लागत होते. मात्र मनपाच्या पुढाकाराने नागरिकांना सामुदायिक शौचालय देण्यात आल्याने आपली शौचालयाची समस्या सुटली असल्याचे यावेळी नागरिकांनी आय़ुक्तांना सांगितले. भीवसेनखोरी येथील नागरिकांच्या समस्यादेखिल शौचालयामुळे सुटल्य़ा असल्याचे दौऱ्यादरम्यान निदर्शनास आले.
 
यानंतर आय़ुक्तांनी मोक्षधाम घाट येथील सार्वजनिक शौचालयातील स्वच्छता आणि सुविधांची पाहणी केली. नागरिक शौचालयाचा वापर करतात का, तसेच किती वेळपर्यंत शौचालय सुरु असते आदी माहिती शौचालय व्यवस्थापकाकडून जाणून घेतली. जाटतरोडी येथील हागणदारी स्थळाची पाहणीही यावेळी आयुक्तांनी केली. परिसरातील लहान मुलांना आपण शौचास कुठे जाता, परिसरात कोणी उघड्यावर शौचास जातो का अशी विचारणा केली. स्वयंसेवी संस्थेच्या लिना बुधे आणि शुभांगी पडोळे यांनीही नागरिकांकडून शौचालयांची स्थिती आणि नागरिक वापरतात का, य़ाबद्दल माहिती जाणून घेतली. यानंतर आय़ुक्तांनी सिद्धेश्वरी येथील हागणदारी स्थळाची पाहणी केली. नेहरुनगर झोन अंतर्गत येणाऱ्या गिडोबा नगर येथील हागणदारी स्थळाच्या पाहणीदरम्यान मनपाच्या वतीने उभारण्यात आलेल्या सामुदायिक शौचालयामुळे कोणी उघड्यावर जात नसल्याचे नागरिकांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी उघड्यावर शौच करणाऱ्यांवर होणाऱ्या कारवाईचा धसका नागरिकांनी घेतला असल्याचे यावेळी स्वच्छाग्रहीने आयुक्तांना सांगितले.
 
अतिक्रमण आणि स्वच्छतेवर आयुक्तांची करडी नजर
हागणदारी स्थळांच्या आकस्मिक पाहणी दौऱ्यादरम्यान हजारी पहाड येथील मनपाच्या जागेवर पानठेला होता. या ठेल्याला तातडीने हटविण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. कारवाई टाळण्यासाठी स्वतः अतिक्रमण काढा, असे आयुक्तांनी अतिक्रमणधारकाला खडसावले. यासोबतच मेडिकल परिसरातून जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्यावर आयुक्तांचे लक्ष गेले. यावेळी आय़ुक्तांनी अधिका-याला कचरा तातडीने हटवा असे निर्देश दिले.
 
आयुक्तांनी व्यक्त केली नाराजी
शहरातील हागणदारी स्थळांवर शौचालय नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात आले. मात्र काही ठिकाणी नागरिकांनी संख्या अधिक असल्याने मोबाईल टॉयलेट देखिल उपलब्ध करुन देण्यात आले होते. मात्र या टॉयलेटच्या दाराच्या कड्या आणि नळाच्या तोट्या गायब आढळल्या. यावर आय़ुक्तांनी नाराजी व्यक्त केली. आपल्या आरोग्यसाठीच आपल्याला शौचालय उपलब्ध करुन देण्यात आले असून मनपाने याचा वापर करणे आणि याची देखभाल करणे नागरिकांचे कर्तव्य असल्याचे आय़ुक्तांनी परिसरातील नागरिकांना सांगितले. तसेच शौचालयात पाण्याचा उपयोग करणे, वापर झाल्यावर कडी लावणे, गुटखा आणि तंबाखु शौचालयाच्या दारावर न थुंकणे आदींची काळजी घ्यावी असेही सांगितले.

 

 

विकासकामांसाठी खोदलेल्या जागांचे पुनर्भरण १५ दिवसांत पूर्ववत करा : संजय बंगाले

स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीची बैठक
 
नागपूर, ता. ७ :  स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरातील मार्गावर रस्ते खोदलेले आहे. पावसाळ्यात या खोदलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. जे कार्य पूर्ण झाले आहे त्या ठिकाणचे रस्त्यांचे पुनर्भरण करून १५ दिवसांत पूर्ववत करा, असे निर्देश स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती संजय बंगाले यांनी अधिकाऱ्यांना दिले.
 
विकासकामांसाठी खोदलेल्या रस्त्यांचा दौरा मंगळवारी (ता. ११ जुलै) समिती सभापती आणि अधिकारी करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. मनपा मुख्यालयात शुक्रवारी (ता. ७ जुलै) झालेल्या स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीच्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले. यावेळी प्रामुख्याने सभापती संजय बंगाले, उपसभापती अभय गोटेकर, समिती सदस्या सुषमा चौधरी, रश्मी धुर्वे, शेख मोहम्मद जमाल मोहम्मद इब्राहीम, सहायक आयुक्त (स्थानिक संस्था कर, कर आकारणी) मिलिंद मेश्राम, कार्यकारी अभियंता (हॉटमिक्स) राजेश भूतकर, कार्यकारी अभियंता (लोककर्म) दीपक सोनटक्के, कार्यकारी अभियंता (पेंच प्रकल्प) अनिरुद्ध चौगंजकर, कार्यकारी अभियंता के. एल. सोनकुसरे, उपअभियंता राजेश दुपारे (पेंच प्रकल्प) यांची उपस्थिती होती.
 
विकासकामांसाठी शहरात खोदण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना त्रास होत आहे. आगामी पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून अपघात होण्याची शक्यता असते, असे समिती सदस्यांनी सांगितले. बैठकीत शहरातील विविध भागातील नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील समस्या मांडल्या. यावर, ज्या मार्गातील कामे पूर्ण झाली आहेत, त्या खोदलेल्या जागा, रस्ते १५ दिवसांत पूर्ववत करावे, असे निर्देश सभापतींनी दिले. सीसीटिव्ही कॅमेरे, व्हायफाय आदी विकासकामांसाठी चौकात लावलेल्या जंक्शन बॉक्सच्या जागांची पाहणीदेखिल करण्यात यावी, ज्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.

 

 

मोकळ्या प्लॉटवरील कचरा उचला अन्यथा जप्तीची कारवाई

महापौरांचा इशारा : स्वच्छतेसाठी मनपा उचलणार कडक पावले
 
नागपूर, ता. ७ : नागपूर शहरात असंख्य रिक्त भूखंड आहेत. या भूखंडाकडे मालकांचे लक्ष नाही. अशा भूखंडावर साचलेल्या कचऱ्यामुळे, झुडुपांमुळे पावसाचे पाणी साचून राहते. यामुळे डासांची उत्पत्ती होऊन रोगराई पसरते. भूखंड स्वच्छ ठेवणे ही भूखंड मालकाची जबाबदारी आहे. पुढील सात दिवसांत असे भूखंड स्वच्छ करण्यात आले नाही तर संबंधित भूखंडधारकांना नोटीस बजावून जप्तीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापौर नंदा जिचकार यांनी दिला.
ओला आणि सुका कचरा वर्गीकरणासंदर्भातील आढावा बैठकीत त्यांनी सदर इशारा दिला. बैठकीला उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त अश्विन मुदगल, प्रतोद दिव्या धुरडे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, वैद्यकीय व आरोग्य सेवा समितीचे उपसभापती प्रमोद कौरती यांच्यासह अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, मुख्य अभियंता विजय बनगीरवार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, स्वच्छ भारत मिशनमधील सल्लागार डॉ. अशोक उरकुडे आणि दहाही झोनचे सहायक आयुक्त उपस्थित होते.
 
सदर आढावा बैठकीत पावसाळ्यातील स्वच्छतेचा आढावा घेण्यात आला. यावेळी खुल्या तसेच रिक्त भूखंडाचा विषय प्रामुख्याने चर्चेला आला. यासंदर्भात उपस्थित पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. अशा भूखंडांच्या मालकांचा पत्ता नसतो. वर्षोनुवर्षे असे भूखंडा मालकांच्या देखरेखीविना पडून आहेत. तेथे कचरा जमा होतो. या भूखंडावर पाणी साचते. त्या पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे डासांची उत्पत्ती होते. यातून डेंगू, मलेरिया, फायलेरिया आणि अन्य साथीचे रोग पसरण्याची शक्यता असते. नव्हे, असे भूखंडच हे साथीचे रोग पसरविण्यात कारणीभूत असतात. प्रत्येक झोनमधील असे भूखंड कर आकारणी विभागाच्या मदतीने शोधण्याचे आदेश महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अश्विन मुदगल यांनी सहायक आयुक्तांना दिले. त्यांना तातडीने नोटीस बजावून सात दिवसांच्या आत त्यावरील साफसफाई करण्यात यावी. जे भूखंडमालक साफसफाई करवून घेणार नाही त्या भूखंडावरील साफसफाई मनपा करेल. तो खर्च भूखंडमालकाकडून वसूल करण्यात येईल आणि त्या भूखंडांवर जप्तीची कारवाई करण्याचे निर्देशही महापौरांनी दिले.
 
नाग नदी स्वच्छतेनंतर उपसा झालेला गाळ आणि पावसामुळे वाहून जमा झालेला गाळ अशा जागा तातडीने निश्चित करण्यात याव्यात आणि सात दिवस या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची मोहीम राबविण्याचे निर्देशही महापौर नंदा जिचकार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. 
 
ओला आणि सुका कचरा निर्मितीस्थळावरून वेगळा करण्यासाठी मागील आढावा बैठकीत ठरल्यानुसार झोनस्तरावर ३० टक्के परिसर निश्चित करण्यात आला आहे. या परिसरातील कुटुंबांना कचरापेटी वाटपाचे काम प्रगतीपथावर आहे. १० झोनला प्रत्येकी एक हजार कचरापेट्या पुरविण्यात आल्या होत्या. त्यापैकी आतापर्यंत ७२०० म्हणजे ७२ टक्के कचरापेट्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर यांनी दिली.
 
ऑनलाईन नोंदणीची अट रद्द
महानगरपालिकेकडून कचरा पेट्या मिळविण्यासाठी ऑनलाईन नोंदणी गरजेची होती. मात्र यामुळे मोहिमेचा वेग मंदावला होता. ३१ जुलैपर्यंत शहरातील ३० टक्के भागातून जर ओला आणि सुका कचरा विलग करणे सुरू करायचे असेल तर तातडीने कचरापेट्या नागरिकांपर्यंत पोहचायला हव्या, अशी सूचना समोर आली होती. त्यामुळे मागील आढावा बैठकीत कचरापेटीसाठी ऑनलाईन नोंदणीची अट रद्द करण्यात आली. आता सहायक आयुक्तांनी संबंधित झोनमध्ये जो ३० टक्के परिसर निवडला आहे त्या परिसरात ३१ जुलैपर्यंत कचरा पेट्या वाटप होतील आणि ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे मनपा यंत्रणेकडे सोपविण्याचे कार्य सुरू होईल, असा विश्वास सर्व सहायक आयुक्तांनी महापौर आणि आयुक्तांना दिला.
 
‘कनक’ने वेग वाढविण्याचे आदेश
ओला आणि सुका कचरा निर्मितीस्थळापासून नागरिक वेगळा देत असेल तर तो प्राथमिक कचरा संकलन केंद्र आणि पुढे भांडेवाडी डम्पिंग यार्डपर्यंत वेगवेगळ्या स्वरूपातच जायला हवा. ही जबाबदारी कचरा संकलन करणाऱ्या कनक रिर्सोसेसची असून त्यांनी वेगवेगळ्या स्वरूपात कचरा संकलन करण्यासाठी असलेल्या गाड्यांची संख्या तातडीने वाढविण्याचे निर्देश आयुक्त अश्विन मुदगल यांनी ‘कनक’च्या अधिकाऱ्यांना दिले.
 

 

नागपूर शहराला ‘ग्रीन सिटी’ पुरस्कार

महापौर, आयुक्तांनी केला ‘ग्रीन व्हिजील’ सदस्यांचा सत्कार
 
नागपूर, ता. ७ : जगात पर्यावरण क्षेत्रात कार्य करणाऱ्या ‘अर्थ डे नेटवर्क’द्वारे आयोजित ‘शहर ग्रीन करो ४७ सिटीज कॉन्टेस्ट’ मध्ये देशातील १२ शहरांना पुरस्कृत करण्यात आले असून नागपूरचा त्यात समावेश आहे. महानगरपालिकेच्या खांद्याला खांदा लावून पर्यावरणपूरक उपक्रम राबविणाऱ्या आणि या पुरस्कारात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या ग्रीन व्हिजील फाऊंडेशन या पर्यावरण विषयक कार्य करणाऱ्या संस्थेच्या सदस्यांचा शुक्रवार ७ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय सभागृहात आयोजित कार्यक्रमात महापौर नंदा जिचकार, आयुक्त अश्विन मुदगल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 
यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त अश्विन मुदगल, प्रतोद दिव्या धुरडे, वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीचे उपसभापती प्रमोद कौरती, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, मुख्य अभियंता विजय बनगीरवार, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी. जांभूळकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, कार्यकारी अभियंता राजेश भूतकर, कार्यकारी अभियंता दिलीप जामगडे, शहर अभियंता एम. एच. तालेवार आदी उपस्थित होते.
 
उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव यांनीही पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कौस्तव चॅटर्जी यांनी उपस्थितांना पुरस्काराबद्दल माहिती दिली. अर्थ नेटवर्क ही संस्था जगातील सर्वात मोठी पर्यावरणविषयक काम करणारी संस्था असून भारतातील ४७ शहरांसाठी त्यांनी ‘शहर ग्रीन करो ४७ सिटीज’ ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पर्यावरण रक्षणात ग्रीन व्हिजील काय करते, मनपा काय करते, शहरातील माध्यमे किती जागरूक आहेत आणि सामान्य नागरिक किती जागरूक आहे, या निकषांवर ही स्पर्धा होती. इतर शहरांना मागे टाकत नागपूर शहर हे निकषांवर उतरले आणि पुरस्कार पटकाविल्याचे कौस्तव चॅटर्जी यांनी सांगितले.
 
संस्थेच्या संस्थापक डॉ. कविता रतन आणि संस्थापक कौस्तव चॅटर्जी यांच्या मार्गदर्शनात संस्थेचे कार्य सुरू असून ‘अर्थ अवर’ हा उपक्रम नागपुरात गेल्या काही वर्षापासून राबविण्यात येत आहे. पर्यावरण संवर्धनाच्या इतर कार्यातही ग्रीन व्हिजीलचा सहभाग असून जनजागृतीचे कार्य करीत आहे. या संस्थेचे कौस्तव चॅटर्जी यांच्यासह सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, कल्याण वैद्य आणि विष्णूदेव यादव यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. 

 

 

एकच वृक्ष लावा आणि ते कायम जगवा

महापौरांनी दिली वृक्ष संवर्धनाची शपथ
 
नागपूर,ता. ७: ‘मी एक वृक्ष लावीन व ते जगवीन’, अशी वृक्ष संवर्धनाची शपथ महापौर नंदा जिचकार यांनी दिली. नागपूर महानगरपालिकेद्वारे सुरू करण्य़ात आलेल्या ‘एक पाऊल हरितक्रांतीकडे’ या अभियानाअंतर्गत खामलामधील शास्त्री ले-आऊटमध्ये वृक्षारोपण करण्यात आले.
याप्रसंगी शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, झोनल अधिकारी महेश बोकारे उपस्थित होते. किमान एकच वृक्ष लावा पण ते कायम जगवा, असे आवाहन यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी केले. झाडांचे संवर्धन करणे ही काळाजी गरज असून त्यादृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे असेही त्या यावेळी म्हणाल्या. कार्यक्रमाला विशाल कावरे, श्रीमती श्रीरसागर, सुफले, खटी, संदीप कुळकर्णी, अनिरूद्ध कडुस्कर, ताराचंद मून, डोंगरे आदी उपस्थित होते.
 
दीक्षाभूमी परिसरात वृक्षारोपण
लक्ष्मीनगर झोनअंतर्गत दीक्षाभूमी परिसरात महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी लक्ष्मीनगर झोनच्या सहायक आयुक्त सुवर्णा दखने, उद्यान अधीक्षक सुधीर माटे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे विश्वस्त विलास गजघाटे, लक्ष्मीनगर झोनचे उपअभियंता रवींद्र मुळे, विभागीय आरोग्य निरीक्षक प्रकाश वाकलकर, सुनिती देव, अर्चना देशपांडे आदी उपस्थित होते.
 
महापौरांनी केले ‘डस्ट बीन’चे वाटप
नागपूर महानगरपालिकेतर्फे सुरू करण्यात आलेल्या ओला, सुका कचरा वर्गीकरण मोहिमेअंतर्गत प्रभागातील नागरिकांना हिरवा व निळा कचऱ्याचे डबे घरी जाऊऩ भेट दिले.  ओला व सुका कचरा निर्मितीस्थळापासून विलग करा, असे आवाहन यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी केले.

 

 

पावसानंतर दिलेल्या निर्देशांचा महापौर, आयुक्तांनी घेतला आढावा

कामे पूर्ण झाल्याची सहायक आयुक्तांची माहिती : पुन्हा करणार दौरा
 
नागपूर, ता. ७ : जून महिन्यातील २७ तारखेला झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. पाण्याचा निचरा न झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास झाला. महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अश्विन मुदगल व पदाधिकाऱ्यांनी शहरातील अशा भागांचा दौरा करून पाहणी केली. नागरिकांशी चर्चा केली. यापुढे होणाऱ्या पावसात अशी परिस्थिती उद्‌भवणार नाही यादृष्टीने काही उपाययोजना करण्याचे निर्देश महापौर आणि आयुक्तांनी दिले होते. ती कामे झालीत की नाही याचा आढावा घेण्यासाठी शुक्रवार ७ जुलै रोजी छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
 
बैठकीला महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त अश्विन मुदगल, भा.ज.पा. प्रतोद दिव्या धुरडे, वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीचे उपसभापती प्रमोद कौरती, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, मुख्य अभियंता विजय बनगीरवार, सर्व कार्यकारी अभियंता, प्रमुख अग्निशमन अधिकारी, सर्व सहायक आयुक्त व सर्व झोनल अधिकारी उपस्थित होते.
 
यावेळी महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अश्विन मुदगल यांनी झोन निहाय सांगितलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. प्रत्येक झोनअंतर्गत येणाऱ्या परिस रामध्ये २७ जून रोजी झालेल्या पावसात ज्या-ज्या ठिकाणी पाणी साचले त्या ठिकाणी भविष्यात अशी परिस्थिती उद्‌भवणार नाही यासाठी काय-काय उपाययोजना केल्या, याची माहिती सहायक आयुक्त आणि संबंधित झोनच्या अभियंत्यांनी दिली. नरेंद्र नगर पुलाखाली दरवर्षी पाणी साचून मार्ग बंद होतो. या पुलाला असलेले आऊटलेट नाल्याला समांतर असल्याने अशी परिस्थिती तेथे उद्‌भवते. आता हा आऊटलेट दोन फूट उंच केला असल्याची माहिती मुख्य अभियंता विजय बनगीरवार यांनी दिली. यापुढे ५० मिमीच्या वर पाऊस आला तर तेथे साचलेल्या पाण्याचा एक ते दीड तासात निचरा होईल, असे कार्यकारी अभियंता डी.डी. जांभूळकर यांनी सांगितले.
 
झोन क्र. ३ (तीन) मधील ज्या भागात पाणी निचरा होण्याची व्यवस्था नाही त्या भागात हायड्रॉलिक टेस्टींग करून सर्व्हे करण्याचे निर्देश आयुक्त अश्विन मुदगल यांनी झोनच्या अभियंत्यांना दिले. ज्या ठिकाणी अतिक्रमणाचा अडथळा येत आहे तेथे तातडीने कायदेशीर कारवाई करून नाले-नाल्या मोकळे करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. हुडकेश्वर पुलाची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी, त्यातील अडथळे, आपत्ती व्यवस्थापन याविषयी अभ्यास करुन तातडीने त्यावर उपाययोजना करण्याचे निर्देशही दिले. ओंकारनगर मध्ये उद्‌भवलेल्या परिस्थितीबाबत नासुप्रला गटारव्यवस्थेसंदर्भात पत्र देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. झोन क्र. ५ (पाच) अंतर्गत येणाऱ्या अब्बूमियाँ नगर, तुलसीनगर येथील भागात आजही पाणी आहे. यासंदर्भातही नासुप्रला पत्र देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
 
झोन क्र. ७ (सात), ८ (आठ), ९ (नऊ) या भागात सेप्टिक टँक संदर्भात नागरिकांच्या अनेकांच्या तक्रारी आहेत. हा प्रश्न गंभीर आहे. तातडीने मनपाकडे उपलब्ध असलेल्या गाड्या पुरवून वेळ पडली तर खासगी गाड्या किरायाने घेऊन त्याची सफाई करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले. नाईक तलाव, लेंडी तलावाचे पाणी ज्या माध्यमातून चांभार नाल्यात जाते तो भाग भूमिगत आहे. यासंदर्भात नासुप्रसोबत बैठक घेऊन ते स्वच्छ करण्यासंदर्भात तोडगा काढावा, असेही आयुक्त मुदगल यांनी सांगितले.
 
खड्डे तातडीने बुजवा : महापौर
पावसामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. ते तातडीने बुजविण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. २७ जून नंतर पाहिजे तसा पाऊस आला नाही. या काळात या खड्ड्यांना बुजविणे आवश्यक होते. याची कारणेही त्यांनी विचारली. यापुढे कुठलेही कारणे न देता खड्ड्यांची विल्हेवाट तातडीने लावण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
 
वसंतनगरला आयुक्त देणार भेट
२७ जूनच्या पावसात निरी कॉलनी आणि वसंतनगर भागातील सात ते आठ घरात पाणी शिरले. ते पाणी आजही तसेच आहे. अखेर त्या नागरिकांना इतरत्र बस्तान मांडावे लागले. त्या परिसरात सुरू असलेल्या सीमेंट रस्ता कामाच्या ठेकेदारामुळे ही परिस्थिती उद्‌भवल्याची बाब सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी लक्षात आणून दिली. तेथे असलेल्या चेंबरची झाकणे चेंबरमध्ये पाडल्या गेली. यामुळे पाणी थांबले. २२ फूट खोल चेंबरमध्ये अशा परिस्थितीत सफाई कर्मचाऱ्यांना उतरविणेही कठीण झाले होते, अशी माहिती संबंधित अभियंत्यांनी दिली. ही परिस्थिती निर्माण करणाऱ्या ठेकेदाराकडून नुकसान भरपाई घ्यावी, अशी सूचना सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी केली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्त अश्विन मुदगल शनिवारी या भागाला भेट देणार आहेत.
 
ओसीडब्ल्यूच्या कामाचे होईल निरीक्षण
उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी ओसीडब्ल्यूतर्फे रस्ते खोदण्यात आले. मात्र, आता कामे सुरू नसतानाही ते पूर्वीसारखे केले नाहीत, ही बाब उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव आणि नगरसेविका दिव्या धुरडे यांनी महापौर आणि आयुक्तांच्या लक्षात आणून दिली. ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक नसल्यामुळे आयुक्तांनी सदर कामांची पाहणी मनपा यंत्रणेकडून करण्याचे निर्देश कार्यकारी अभियंता संजय गायकवाड यांना दिले.

 

 

पावसाळी आजारांपासून बचावासाठी आवश्यक उपाययोजना करा : मनोज चापले

आरोग्य विशेष समिती सभापतींचे आरोग्य विभागाला निर्देश
 
नागपूर, ता. ६ :  पावसाळ्यात पाणी साचल्याने डेंगी, मलेरिया, फायलेरिया आदी संसर्गजन्य रोगराईचे प्रमाण वाढते. नागरिकांच्या आरोग्याकडे लक्ष देऊन पावसाळी आजारांपासून बचावासाठी आवश्यक उपाययोजना करा, असे निर्देश आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना आरोग्य विशेष समिती सभापती मनोज चापले यांनी दिले.
 
गुरुवारी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती, स्थायी समिती सभागृहात वैद्यकीय सेवा व आरोग्य समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. प्रामुख्याने उपसभापती प्रमोद कौरती, नगरसेवक लखन येरवार, विजय चुटेले, विशाखा बान्ते, भावना लोणारे, आशा उईके, वंदना चांदेकर, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, मुख्य अभियंता विजय बनगीरवार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल चिव्हाणे, डॉ. विजय जोशी, यांत्रिक अभियंता राजेश गुरमुळे, उद्यान अधीक्षक सुधीर माटे, कनक रिसोर्सचे कुशल विजय यांची उपस्थिती होती.
 
बैठकीत मनपाच्या सर्व दहनघाटांचे सौंदर्यीकरण, त्यांची देखभाल दुरुस्ती आणि आवश्यक मुलभूत सुविधांसंबंधित आढावा घेण्यासाठी लवकरच अधिकाऱ्यांसोबत दौरा करण्यात येणार आहे. त्यानंतर सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला.
 
नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्याच्या उद्देशाने मनपाद्वारे संचालित सर्व दवाखान्यातील रंगरंगोटी, आरोग्य सेवेवर देखरेख व नियंत्रण आरोग्य समिती करणार असल्याचेही ठरविण्यात आले. कंत्राटदाराने केलेल्या कामाची पडताळी झाल्याशिवाय त्याची देयके मंजूर करण्यात येणार नसल्याचे यावेळी सभापतींनी सांगितले. कारखाना विभागाला आवश्यक यंत्रसामुग्री आणि वाहनांबाबतचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला असून लवकरच कारखाना विभाग हायटेक होणार असल्याची माहितीही यावेळी सभापतींनी दिली. नव्याने जेसीबी वाहन मनपाच्या ताफ्यात दाखल होणार असल्याने नागरिकांच्या समस्या तत्काळ सुटतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
 
ड्रेनेज संबंधित कामासाठी स्वतंत्र विभाग
 
शहरातील सिवरलाईन जुनी झाली असल्याने ड्रेनेज संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यामध्येच झोनल अधिकारी आणि आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांचा वेळ जातो. नगरसेवकांकडे येणाऱ्या दहा पैकी आठ समस्या ड्रेनेज आणि सिवरलाईन संबंधित असतात. याच समस्या सोडविण्यासाठी मुंबई, पुणेसारख्या मोठ्या शहरात ड्रेनेज व्यवस्थापनासाठी स्वतंत्र विभागाची निर्मिती करण्यात येते. परिणामी नागरिकांच्या समस्या वेळेत सुटतात. तसेच इतर कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत नाही. त्यामुळे मनपामध्येही स्वतंत्र रचना करण्यात यावी, यासाठी आवश्यक प्रस्ताव तयार करुन सादर कऱण्याच्या सूचना यावेळी सभापतींनी अधिकाऱ्यांना केल्या.

 

 

तेलंगणा राज्याच्या शिष्टमंडळांची मनपाला भेट

नागपूर,ता. ६ : तेलंगणा राज्याच्या विविध शहरांतील महापौर, नगराध्यक्ष, आयुक्त, कार्यकारी अभियंता, उपअभियंता आदींनी गुरूवारी (ता. ६) नागपूर महानगरपालिकेला भेट दिली. नागपुरात महानगरपालिकेतर्फे स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची पाहणी करून त्याची प्रशंसा केली.
शिष्टमंडळाने महापौर नंदा जिचकार यांची भेट घेतली. अतिरिक्त आयुक्त आर.झेड सिद्दीकी, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, कार्यकारी अभियंता संजय गायकवाड, अनिरूद्ध चौंगजकर आदी उपस्थित होते.
 
तेलंगणा राज्य शासनाच्या आर.सी.व्ही.ई.एस. या कार्यक्रमाअंतर्गत तेलंगणा राज्यातील आदिलाबाद, निजामाबाद, खंबम्, करीमनगर, मेहबूबनगर, सूर्यपेठ, रामगुंडम्‌, सिद्धीपेठ या शहाराचे महापौर रवींद्र संग, गोगुलाल पापालाल, ए. सुजाता नगराध्यक्ष मनीषा, राधा, के.व्ही. रामना, नागेश्वर राव, बी.श्रीनवास, जॉन सॅमसंग यांच्यासह आर.सी.व्ही.ई.एस.चे समन्वयक ईसंट लेसली, डॉ.श्रीनवासन यांचा शिष्टमंडळात समावेश होता.
          
यावेळी शिष्टमंडळातील सदस्यांनी नागपूरच्या स्वच्छतेची, हिरवळ, २४ बाय ७ पाणी पुरवठा प्रकल्पाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. दोन दिवसांपासून नागपूर मुक्कामी असलेल्या शिष्टमंडळांने भांडेवाडी येथील सांडपाणी प्रकल्पाची पाहणी केली व त्याची प्रशंसादेखील महापौरांकडे केली. प्रारंभी महापौर नंदा जिचकार यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले.     

 

 

‘एक पाऊल हरितक्रांतीकडे’अंतर्गत विविध ठिकाणी वृक्षारोपण

उपमहापौर, परिवहन सभापतींसह नगरसेवकांनी दिला वृक्षसंवर्धनाचा संदेश
 
नागपूर, ता. ६ : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी वृक्षलागवड अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेतर्फे १ ते ७ जुलैदरम्यान ‘एक पाऊल हरितक्रांतीकडे’ उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत गुरुवारी उपमहापौर दीपराज पार्डीकर, परिवहन सभापती बंटी कुकडे यांच्यासह झोन सभापती, नगरसेवक आणि नागरिकांनी शहरातील निरनिराळ्या भागात वृक्षारोपण करून वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला.
 
आशीनगर झोनअंतर्गत यादवनगर येथील ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ मैदानात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला उपमहापौर दीपराज पार्डीकर, आसीनगर झोन सभापती भाग्यश्री कानतोडे, नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार, नगरसेविका वंदना चांदेकर, नगरसेविका वैशाली नारनवरे, नगरसेवक इब्राहिम टेलर, प्रमोद शेंडे, हर्षवर्धन डोंगरे, राहूल बोरकर, नरेंद्र बावनगडे, सहायक आयुक्त विजय हुमने उपस्थित होते. उपमहापौरांसह सर्व मान्यवरांनी वृक्षारोपण केले. प्रत्येक नागरिकाने किमान एक वृक्ष लावावे, असे आवाहन उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी केले.
 
मंगळवारी झोनअंतर्गत शिलानगर उद्यान येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नगरसेविका गार्गी चोप्रा, सहायक आयुक्त हरिश राऊत, उद्यान अधीक्षक सुधीर माटे, माजी नगरसेविका शिला मोहोड, उद्यान निरीक्षक अनंत नागमोते, राजीव वाधवा, जमिला बी, चेतना शर्मा, नंदा बिरे, सीमा गुप्ता आदी उपस्थित होते. यावेळी उद्यान परिसरात उपस्थित मान्यवरांनी वृक्षारोपण केले.
 
नेहरूनगर झोन अंतर्गत जिव्हाळा फाउंडेशनच्या सहकार्याने पाचव्या दिवशी ईश्वर नगर, रमना मारोती रोड, शिव मंदिर येथे वृक्षारोपण करून शहरातील विविध भागात वृक्ष लागवडीचा संकल्प पूर्ण करण्यात आला. यावेळी परिवहन समिती सभापती बंटी कुकडे उपस्थित होते. नेहरूनगर झोनच्या सभापती रेखा साकोरे, नगरसेवक पिंटू झलके, राज्य महिला आयोग सदस्य नीता ठाकरे, डॉ. गादेवार, विजय आसोले, किशोर पेठे, महेन्द्र फरकाडे, किरण दातीर, अमर टिचकुले, विकास बाबरे  आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी वृक्षारोपण केले. यावेळी जिव्हाळा फाऊंडेशनचे अध्यक्ष मनीष मेश्राम, उपाध्यक्ष राजू तितरे,चंद्रकांत धांडे, चंद्रशेखर देहनकर, सचिव तुषार महाजन, सहसचिव विनोद कोटांगले, चेतन मुटकुरे, मंगेश पगारे, कोषाध्यक्ष अक्षय ठाकरे, कार्यालयप्रमुख निखिल दुपारे, राहुल नाक्षिणे,विकास ठवकर, अक्षय झाडे, गौरव चौधरी, दीपक कारेमोरे, आशीष येळणे आदी उपस्थित होते. नेहरूनगर झोनच्या सभापती रेखा साकोरे यांनी आपल्या निधीतून ट्रीगार्ड उपलब्ध करुन दिले.
 
मनपा आणि कामगार कल्याण मंडळ चिटणीस नगरच्या वतीने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमाला  नगरसेवक विजय (पिंटु) झलके, कामगार कल्याण अधिकारी प्रतिभा भाकरे, मुकुंद मुळे, मोहाडीकर, मेश्राम, गायकवाड व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

झाडांचे संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य : उपमहापौर दीपराज पार्डीकर

गांधीबाग झोनअंतर्गत राम मनोहर लोहिया शाळेत वृक्षारोपण
 
नागपूर,ता. ५ : वृक्षलागवड हे जसे महत्त्वाचे आहे तसेच लावलेल्या झाडांचे संवर्धन करणे महत्त्वाचे असून ते प्रत्येक नागरिकाचे कर्तव्यच आहे, असे प्रतिपादन उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी केले.
       
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी वृक्षारोपण अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे १ जुलै ते ७ जुलै दरम्यान शहरात सुरू असलेल्या ‘एक पाऊल हरितक्रांतीकडे’ या वृक्षलागवड अभियानाअंतर्गत गांधीबाग झोनमधील राम मनोहर लोहिया शाळेच्या परिसरात झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
 
यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, गांधीबाग झोन सभापती सुमेधा देशपांडे, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले, जलप्रदाय समिती सभापती राजेश घोडपागे, नगरसेविका श्रद्धा पाठक, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, गांधीबाग झोन सहायक आयुक्त अशोक पाटील आदी उपस्थित होते.  
 
पुढे बोलाताना दीपराज पार्डीकर म्हणाले, नागपूर शहर हे हिरवेगार कसे करता येईल यादृष्टीने आपण प्रयत्न करायला हवा. झाडे लावून त्याचे संवर्धनही फार महत्त्वाचे असून प्रत्येकाने झाडांची काळजी घ्यावी. यावेळी शाळेतील विद्यार्थांना अंबाझरी येथील विवेकांनद स्मारक, गोरेवाडा येथील वॉटर प्लान्ट दाखविण्यात यावे, असेही आदेश श्री. पार्डीकर यांनी दिले.  
 
प्रारंभी मान्यवरांचे स्वागत शाळेच्या मुख्याधापिका नलिनी मांडवे यांनी केले. संचालन व आभारप्रदर्शन सौ. दांडेकर यांनी केले.
कार्यक्रमाला उद्यान निरीक्षक अनंत नागमोते, विभागीय आरोग्य अधिकारी बांबुर्डे, बुंदाडे, विकास अपराजित, संजय नंदनकर, हितेश झाडे आदी उपस्थित होते.
 
पुनापूर रोड घटाटे नगर येथे वृक्षारोपण
 
लकडगंज झोनअंतर्गत पुनापूर रोड घटाटे नगर स्थित नासुप्र मैदानावर उपमहापौर दीपराज पार्डीकर व लकडगंज झोन सभापती दीपक वाडीभस्मे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी नगरसेविका वैशाली रोहनकर, जयश्री रारोकर, लकडगंज झोन सहायक आयुक्त सुभाष जयदेव, माजी नगरसेविका मंदाताई लेंडे, चंदाताई मानवटकर, छाया दानी, उपअभियंता राजेश भाजीपाले, उद्यान निरीक्षक अनंत नागमोते, प्रभाकर जुमडे, गौरव देशमुख आदी उपस्थित होते.

 

 

वृक्ष संवर्धन ही काळाची गरज : महापौर नंदा जिचकार

हनुमाननगर झोनमध्ये वृक्षारोपण : विद्यार्थ्यांचा सहभाग
 
नागपूर,ता. ३ : निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड अत्यंत आवश्यक आहे. तसेच वृक्षांचे संवर्धन ही काळाची गरज असून प्रत्येकाने किमान एक झाड तरी लावावे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
 
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी वृक्षारोपण अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे १ जुलै ते ७ जुलै दरम्यान शहरात सुरू असलेल्या ‘एक पाऊल हरितक्रांतीकडे’ या अभियानाअंतर्गत हनुमाननगर झोनमधील लाल बहादूर हिंदी माध्यामिक शाळेत मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.
 
यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, हनुमाननगर झोन सभापती भगवान मेंढे, लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, माजी उपमहापौर व नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर, राजेंद्र सोनकुसरे, नगरसेविका शीतल कामडे, उषा पायलट, देवेंद्र दस्तुरे, हनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त राजु भिवगडे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, उद्यान अधीक्षक सुधीर माटे, क्रीडाधिकारी नरेश चौधरी, ग्रीन अर्थचे सचिव प्रशांत कामडे आदी उपस्थित होते.
 
पुढे बोलताना नंदा जिचकार म्हणाल्या, नागपूर शहर हे हिरवेगार कसे करता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न करायला हवा. झाडे आपल्याला प्राणवायू देतात. म्हणूनच वृक्षाचे संवर्धन करणे हे आपले कर्तव्य असून प्रत्येकाने एक झाड लावावे व ते जगवावे असे आवाहन त्यांनी विद्यार्थांना केले.
प्रारंभी मान्यवरांचे स्वागत शाळेचे मुख्याधापक संजय पुंड यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन मधुलिका तिवारी यांनी केले. आभारप्रदर्शन लता कनाटे यांनी मानले.
 
पोलिस क्वार्टर येथे वृक्षारोपण
 
हनुमाननगर झोनअंतर्गत पोलिस क्वार्टर येथे महापौर नंदा जिचकार व दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी हनुमाननगर झोन सभापती भगवान मेंढे, माजी उपमहापौर व नगरसेवक सतीश होले, माजी उपमहापौर व नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर, नगरसेविका उषा पायलट, शीतल कामडे, ग्रीन अर्थचे सचिव प्रशांत कामडे, रवींद्र  अंबाडकर, रमेश कोलारकर, राजू क्षिरसागर, सारंग गोडबोले, वंदना मेश्राम, कुसूम हटवार आदी उपस्थित होते. 

 

 

 

विवेकानंदांचे तेजस्वी विचार आचरणात आणल्यास भविष्यकाळ उज्ज्वल होईल – महापौर नंदा जिचकार

स्वामी विवेकानंद पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन
 
नागपूर, ता. ४ :  स्वामी विवेकानंदांचे तेजस्वी जीवन अन् उद्‌बोधक विचार मानवी जीवनाची दिशा बदलून टाकतात व आदर्शाच्या ठिकाणी पोहोचवतात, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.  
 
स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त अंबाझरी येथील विवेकानंद स्मारक येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे माजी सभापती व ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, धरमपेठ झोन सभापती रुपा राय, महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, नगरसेविका परिणिता फुके, रुतिका मेश्राम, नगरसेवक अमर बागडे यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.
 
यावेळी बोलताना महापौर नंदा जिचकार पुढे म्हणाल्या, जीवनात उच्च आदर्शाची स्थापना व त्यासाठी मनाची जडणघडण ही लहान वयातच व्हावी लागते. त्यासाठी स्वामी विवेकानंदांचे विचार उपयुक्त असून,  पाल्यांना हे विचार लहान वयातच समजले पाहिजेत. स्वामी विवेकानंद यांचे प्रेरक व तेजस्वी विचार आचरणात आणल्यास आपला भविष्यकाळ निश्चितच उज्ज्वल होईल, असा विश्वास  त्यांनी व्यक्त केला.
अन्य मान्यवरांनीही यावेळी विवेकानंदांच्या आदर्शावर चालण्याचे आवाहन केले. यावेळी अनेक गणमान्य नागरिक उपस्थित होते. स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून मान्यवरांनी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले.

 

 

नव्या विद्युत रचनेचा एका वॉर्डात पथदर्शी प्रकल्प तयार करा : महापौर नंदा जिचकार

पावसाळा विद्युत व्यवस्थेचा घेतला आढावा : बंद पथदिवे सुरू करण्याचे निर्देश
 
नागपूर, ता. ३ : शहरातील पारंपरिक पथदिवे बदलविण्यात येत असून त्या जागी एलईडी पथदिवे लावण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. अशा प्रकारची विद्युत रचना करणारे नागपूर हे देशातील पहिले शहर आहे. शहरात सर्वत्र जरी हे काम एकाचवेळी सुरू असले तरी एखादा वॉर्ड यासाठी ‘मॉडेल’ म्हणून तयार करावा. जेणेकरून हे काम इतरांना दाखविता येईल. त्याचे योग्य मार्केटिंग करता येईल, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
 
पावसाळ्यातील विद्युत व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी नागपूर महानगरपालिका केंद्रीय कार्यालयातील महापौर कक्षात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत त्यांनी सदर निर्देश दिले. बैठकीला उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती संजय बंगाले, प्रतोद दिव्या धुरडे, माजी महापौर प्रवीण दटके, नगरसेवक जगदीश ग्वालबंशी, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, सहायक अभियंता सलीम इकबाल, अजय मानकर, उपअभियंता दीपक चिटणीस, कल्पना मेश्राम उपस्थित होते.
 
यावेळी महापौरांनी सुचविलेल्या पथदर्शी प्रकल्पासाठी महापौरांच्या वॉर्डाची निवड करून पुढील पाच महिन्यात तेथे हा पथदर्शी प्रकल्प तयार करण्यात यावा, असे माजी महापौर प्रवीण दटके यांनी सुचविले.
 
प्रारंभी कार्यकारी अभियंता संजय जैस्वाल यांनी नव्या विद्युत रचनेबद्दल आणि पथदिवे बदलविण्याच्या प्रगतीकार्याबद्दल तसेच ट्राफिक सिग्नल्स व सौर ऊर्जा प्रकल्पासंबंधी माहिती दिली. त्यानंतर महापौर नंदा जिचकार यांनी सद्यस्थितीत बंद असलेल्या पथदिव्यांचा आढावा घेतला. पथदिवे बंद असल्याची कारणे विचारत पुढील १० दिवसांत सद्यस्थितीत बंद असलेल्या पथदिव्यांची संख्या ५० टक्क्यांवर आणावी, असे निर्देश महापौरांनी दिले. विद्युत व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सध्या असलेली चेकरची संख्या अल्प आहे. प्रत्येक प्रभागात किमान दोन चेकर असावे, यादृष्टीने नियोजन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. ट्राफिक सिग्नल आणि सौर ऊर्जा प्रकल्पाबाबतची माहितीही महापौरांनी घेतली. एकूण १९ ठिकाणी जुन्या प्रकारचे ट्राफिक कंट्रोलर्स एलईडी दिव्यांसह बसविण्यात येणार असून नवीन आठ ठिकाणी ट्राफिक सिग्नल्स बसविण्यात येणार आहेत.  सोलर वॉटर हिटरचा नागरिकांना लाभ देण्यासाठी सर्व नगरसेवकांना पत्र पाठविण्याचे निर्देशही महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
 
बैठकीला झोनमधील कनिष्ठ अभियंता बेग, रुद्रकार, मरस्कोल्हे, ढगे आदी उपस्थित होते.

 

 

 

सच्चिदानंद नगर येथे झोन सभापतींच्या हस्ते वृक्षारोपण

नागपूर,ता. ३ : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी वृक्षारोपण अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे १ जुलै ते ७ जुलै दरम्यान शहरात सुरू असलेल्या ‘एक पाऊल हरितक्रांतीकडे’ या अभियानाअंतर्गत हनुमाननगर झोन मधील सच्चिदानंद नगर येथे वृक्षारोपण करण्यात आले.
 
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून हनुमाननगर झोन सभापती भगवान मेंढे, नगरसेवक दीपक चौधरी, नगरसेविका कल्पना कुंभलकर, नगरसेविका रूपाली ठाकूर, झोन सहायक आयुक्त राजू भिवगडे, उद्यान अधीक्षक सुधीर माटे आदी उपस्थित होते. याप्रसंगी झोन सभापती भगवान मेंढे यांनी झोन अंतर्गत जास्तीत जास्त झाडे लावण्याचा संकल्प केला. नागरिकांनी या अभियानात जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाला वसुंधरा कोलते, पुष्पा राऊत, हनुमाननगर झोनचे उपअभियंता (लोककर्म) कृष्णकुमार हेडाऊ, आरोग्य विभागाचे झोनल अधिकारी दिनेश कलोडे आदी उपस्थित होते.
 
राजेंद्र नगर येथे वृक्षारोपण
लक्ष्मीनगर झोनअंतर्गत येणाऱ्या राजेंद्रनगर येथील खुल्या जागेत नगरसेविका उज्ज्वला बनकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी वसंतराव बनकर, श्रीकांत आंबुलकर, राहुल मेश्राम, उद्यान निरीक्षक अमोल चोरपगार व परिसरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितांनी वृक्षारोपण केले.
 
वाल्मिकीनगर शाळेत आमदार देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण
गांधीनगर येथील वाल्मिकीनगर हिंदी माध्यमिक शाळा येथे आमदार सुधाकर देशमुख यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले. यावेळी शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे, महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, धरमपेठ झोन सभापती रूपा रॉय, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार उपस्थित होते. या सर्व मान्यवरांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनीही वृक्षारोपण केले. वृक्ष लागवड आणि वृक्षसंवर्धन ही काळाची गरज आहे. या मोहिमेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर संस्कार घडत असल्याचे प्रतिपादन आ. सुधाकर देशमुख यांनी केले.

 

 

 

 

पर्यावरणाचे संतुलन राखण्यास वृक्षारोपण काळाची गरज : महापौर नंदा जिचकार

‘एक पाऊल हरितक्रांतीकडे’ अभियानाला प्रारंभ
 
नागपूर, ता. १ : ‘हिरवे नागपूर, सुंदर नागपूर’ हे ब्रीद घेऊन नागपूर शहर हिरवे करण्याचे स्वप्न आहे. वाढत्या तापमानावर पर्याय आणि पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी वृक्षारोपण अभियानांतर्गत १ जुलै ते ७ जुलै दरम्यान नागपुरात ‘एक पाऊल हरितक्रांतीकडे’ या अभियानाचा शुभारंभ महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते वृक्षारोपणाने झाला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. प्रतापनगर परिसरात आयोजित या वृक्षारोपण कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. या अभियानांतर्गत ४५ हजार वृक्ष नागपूर शहरात लावण्याचे उद्दिष्ट असून अनेक स्वयंसेवी संस्था, शिक्षण संस्था, कार्पोरेट क्षेत्र यात सहभागी होत आहे. नागरिकांनीही आपल्या घरासमोर एक वृक्ष लावून ते जगवण्याची जबाबदारी स्वीकारावी, असेही महापौर नंदा जिचकार यांनी केले.
 
उपमहापौर व आयुक्तांनी सुदामनगरी अंबाझरीत केले वृक्षारोपण
 
अभियानाच्या पहिल्या दिवशी चार झोनअंतर्गत चार ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. धरमपेठ झोनअंतर्गत अंबाझरी सुदामनगरी येथे आयोजित कार्यक्रमाला उपमहापौर दीपराज पार्डीकर, आयुक्त अश्विन मुदगल, धरमपेठ झोन सभापती रूपा रॉय, स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती संजय बंगाले, महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, वैद्यकीय व आरोग्य विशेष समितीचे उपसभापती प्रमोद कौरती, नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेविका परिणिता फुके, शिल्पा धोटे, दर्शनी धवड, रुतिका मसराम, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे, उद्यान अधीक्षक सुधीर माटे यांच्यासह गोपाल बावनकुळे उपस्थित होते. उपमहापौर दीपराज पार्डीकर आणि आयुक्त अश्विन मुदगल यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांनी गुलमोहर, कडूनिंब, करंजी, कदम आदी वृक्षांचे रोपण केले. नागपूर शहर स्वच्छ, सुंदर आणि हिरवे करण्यासाठी प्रत्येकाने वृक्षारोपण करून शहराप्रती असलेली आपली जबाबदारी पार पाडावी, असे प्रतिपादन आयुक्त अश्विन मुदगल यांनी केले.
 
स्थायी समिती सभापती व उपमहापौरद्वारा गोरेवाडा बगीचा व तलाव परिसरात वृक्षारोपण
 
नागपूर महानगरपालिकेच्या ‘एक पाऊल हरितक्रांतीकडे’ या अभियानाला विविध स्तरातून उत्तम प्रतिसाद लाभत आहे. मंगळवारी झोनअंतर्गत येणाऱ्या गोरेवाडा तलावाजवळ ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या सहकार्याने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, नासुप्रचे विश्वस्त व ज्येष्ठ नगरसेवक भूषण शिंगणे, मंगळवारी झोन सभापती सुषमा चौधरी यांनी वृक्षारोपण केले. यावेळी मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त हरिश राऊत, नगरसेविका गार्गी चोपडा, प्रीतम मथरानी, उद्यान अधीक्षक सुधीर माटे, उद्यान निरीक्षक अनंता नागमोते यांच्यासह ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तव चॅटर्जी, सुरभी जैस्वाल, स्मिताली उके व अन्य स्वयंसेवकांची उपस्थिती होती. उपस्थित सर्व मान्यवरांनी यावेळी वृक्षारोपण केले. यावेळी दीपक गिऱ्हे, नगरसेविका संगीता गिऱ्हे, अर्चना पाठक, रश्मी उईके, साक्षी राऊत, रेखा देणे, नितीन पाठक, शशिकांत हरडे, अश्विन खेवले, उपअभियंता गिरीश वासनिक, फरहा वसीम, ज्ञानेश्वर ससनकर यांच्यासह बहुसंख्य गणमान्य नागरिक उपस्थित होते.
 
उपमहापौर व विरोधी पक्ष नेत्यांच्या हस्ते दर्शन कॉलनी उद्यान परिसरात वृक्षारोपण
 
नेहरूनगर झोनअंतर्गत येणाऱ्या दर्शन कॉलनीतील प्रस्तावित उद्यानात उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे आणि झोन सभापती रेखा साकोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. माजी नगरसेविका मालू वनवे, नेहरूनगर झोनचे सहायक आयुक्त राजेश कराडे, उद्यान अधीक्षक सुधीर माटे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यावेळी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी यावेळी वृक्षारोपण करत ‘एक व्यक्ती एक झाड’ लावण्याचा संदेश दिला.
 
सुर्वे लेआऊट उद्यानमध्ये वृक्षारोपण
 
लक्ष्मीनगर झोनअंतर्गत येणाऱ्या सुर्वे लेआऊट उद्यानात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी झोन सभापती प्रकाश भोयर, नगरसेविका वनिता दांडेकर, तारा(लक्ष्मी) यादव, पल्लवी श्यामकुळे, मिनाक्षी तेलगोटे, सोनाली कडू, उज्ज्वला बनकर, प्रणिता शहाणे, नगरसेवक लखन येरावार, लहुकुमार बेहेते, प्रमोद तभाने, सहायक आयुक्त सुवर्णा दखने, उद्यान अधीक्षक सुधीर माटे, उपअभियंता रवींद्र मुळे, झोनचे कर्मचारी उपस्थित होते.

       

       

 

 

नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवा : महापौर

महापौर, उपमहापौर, आयुक्त यांनी सतरंजीपुरा व लकडगंज झोनचा केला संयुक्त दौरा
 
नुकसानग्रस्त भागाचे निरीक्षण : नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या
 
नागपूर, ता. २८ : पावसाच्या पाण्यामुळे नागपुरातील अनेक भाग प्रभावित झाले असून नागरिकांच्या घरात पाणी शिरले आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी दक्षता घेऊन नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
 
मंगळवार २७ जून रोजी झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक वस्त्या जलमय झाल्या. अनेक ठिकाणी नुकसान झाले. सतरंजीपुरा झोनअंतर्गत झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, आयुक्त अश्विन मुदगल, स्थायी समितीचे माजी सभापती प्रवीण भिसीकर यांनी सतरंजीपुरा झोन भागात संयुक्त दौरा करून तेथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्यासमवेत सतरंजीपुरा झोन सभापती संजय चावरे, नगरसेवक महेश महाजन, नगरसेविका दुर्गा हत्तीठेले, माजी नगरसेवक विलास पराते, गुणवंत झाडे, मुख्य अभियंता विजय बनगीरवार, अधीक्षक अभियंता दीपक सोनटक्के, कार्यकारी अभियंता राजेश भूतकर, झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वराडे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
 
यावेळी दहीबाजार उड्डाणपुलासमोरील रस्ता उंच झाल्याने पावसाचे पाणी सरळ उतारभागाने परिसरातील वस्त्यांमध्ये शिरल्याने नागरिकांची गैरसोय झाल्याचे प्रभागाचे नगरसेवक व उपमहापौर दीपराज पार्डीकर, ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण भिसीकर यांनी महापौर व आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या भागात बऱ्याच ठिकाणी चेंबर फुटले व चेंबरवर कव्हर नाहीत. ते त्वरित दुरुस्त करून कव्हर लावण्याचे निर्देश महापौर व आयुक्तांनी दिले. पावसाचे पाणी कुणाच्या घरात जाणार नाही त्यादृष्टीने पाईपलाईन टाका व पाणी अडणार नाही त्यादृष्टीने त्वरित उपाययोजना करा, असे निर्देश दिले.
 
झाडे चौक लालगंज शेजारी मनपाच्या बस्तरवारी माध्यमिक शाळेत मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने विद्यार्थांची गैरसोय झाल्याने तेथील चेंबर त्वरित स्वच्छ करा व पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्याचे निर्देश यावेळी महापौर व आयुक्तांनी दिले. तसेच या परिसरातील आर.डी.पी. अंतर्गत बांधण्यात आलेल्या नाल्यातील गाळ त्वरित काढण्याचे निर्देश दिलेत. या परिसरात कचऱ्याचे ढीग व साफसफाई नियमित करून परिसर स्वच्छ करून औषध फवारणी करा, असेही निर्देशित केले.
 
लकडगंज झोनमध्ये घेतली आयुक्तांनी आढावा बैठक
 
यानंतर आयुक्त अश्विन मुदगल व उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी लकडगंज झोनअंतर्गत येणाऱ्या प्रभागातील नगरसेवकांची व झोनअंतर्गत येणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलाविली. यावेळी आयुक्तांनी संबंधित सर्व प्रभागातील नगरसेवकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी लकडगंज झोनचे सभापती दीपक वाडीभस्मे, स्थायी समितीचे माजी सभापती व ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र (बाल्या) बोरकर, प्रदीप पोहाणे, अनिल गेंडरे, शेषराव गोतमारे, राजकुमार साहू, नगरसेविका सरीता कावरे, मनिषा अतकरे, जयश्री रारोकर, निरंजना पाटील, मुख्य अभियंता विजय बनगीरवार, अधीक्षक अभियंता दीपक सोनटक्के, कार्यकारी अभियंता सी.जी. धकाते, कार्यकारी अभियंता राजेश भूतकर, सहायक आयुक्त सुभाष जयदेव तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मा. निगम आयुक्तांनी पाणी साचण्याचे नेमके कारण त्यांनी जाणून घेतले. पहिल्याच पावसात जर या वस्त्यांमध्ये पाणी शिरले असेल तर भविष्यात अशी परिस्थिती उद्‌भवणार नाही यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पावसाचे पाणी नाल्यामध्ये सोडण्याची व्यवस्था सदोष असेल तर ती तातडीने दुरुस्त करा. गडर लाईन स्वच्छ करा, असे निर्देशही त्यांनी दिले.  पाण्य़ाचा निचरा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा असे निर्देश त्यांनी झोनच्या अधिकाऱ्यांना दिले. लकडगंज झोनमध्ये गडर लाईन लहान असल्याने मोठ्या आकाराची गडर लाईन टाकण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही याची विशेष दखल घेण्यात यावी, अशी सूचना यावेळी आयुक्तांनी केली.
 
दौऱ्याप्रसंगी परिसरातील नागरिकांच्याही त्यांनी भेटी घेतल्या. त्यांच्याशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. महानगरपालिका आपल्या समस्या सोडविण्यासाठी आणि येणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी सदैव तत्पर आहे याबाबत महापौर आणि आयुक्तांनी नागरिकांना आश्वस्त केले.

      

 

 

एलईडी लावताना नगरसेवकांना विश्वासात घ्या

विद्युत विशेष समिती सभापतींचे निर्देश : पथदिवे बदलविण्याचे कार्य प्रगतीपथावर
 
नागपूर, ता. २९ : शहरात सध्या पथदिवे एलईडीमध्ये मध्ये परावर्तीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र हे करीत असताना प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांना विश्वात घ्या. ठेकेदारांकडून प्रत्येक कार्याचा आढावा घ्या आणि नगरसेवकांच्या तसेच नागरिकांच्या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष द्या, असे निर्देश विद्युत विशेष समितीचे सभापती ॲड. संजयकुमार बालपांडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
 
मनपाच्या विद्युत विशेष समितीची पहिली बैठक मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात पार पडली. बैठकीला सभापती ॲड. संजयकुमार बालपांडे यांच्यासह उपसभापती प्रमोद चिखले, समितीचे सदस्य सर्वश्री लहुकुमार बेहते, राजकुमार साहू, श्रीमती वनिता दांडेकर, सय्यदा बेगम मो. निजामुद्दीन अंसारी, श्रीमती ममता सहारे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, मनपा विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता संजय जैस्वाल उपस्थित होते.
 
यावेळी कार्यकारी अभियंता संजय जैस्वाल यांनी शहरात युद्धपातळीवर सुरू असलेल्या एलईडी पथदिवे लावण्याच्या कार्याबद्दल सादरीकरणाद्वारे माहिती दिली. प्रकाश विभागाच्या कामासंदर्भात हाती घेण्यात आलेल्या विविध प्रकल्पांच्या माहितीच्या सादरीकरणात समावेश होता. शहरातील १,३१,७४० पारंपरिक पथदिवे बदलवून ऊर्जा कार्यक्षम एलईडी दिव्यांमध्ये ते परावर्तीत करण्यात येत आहेत. प्रथम टप्प्यात दोन हजार पथदिवे बदलविण्याचे कार्य हाती घेतले असून आतापर्यंत १५६९ पथदिवे बदलविण्यात आले आहेत. यानंतर दरमहा १० हजार पथदिवे लावण्यात येणार असून मे २०१८ पर्यंत सुमारे १,२६,००० पथदिवे बदलविण्याचे काम पूर्ण होईल. ३८.२ कि.मी. मेट्रो रेल मार्गावरील पथदिवे स्थानांतरीत करण्याच्या कामाचाही यात समावेश आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुरू असलेल्या रिंग रोड सीमेंटीकरण प्रकल्पातील पथदिव्यांच्या नवीनीकरणाचे कार्यही यात समाविष्ट आहे. एलईडी पथदिवे लावल्यानंतर सुमारे ७१ टक्के ऊर्जा बचत होणार असल्याची माहितीही श्री. जैस्वाल यांनी यावेळी दिली. मनपाच्या सर्व कार्यालयीन इमारतींमध्येही एलईडी दिवे लावून ऊर्जा बचत करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या मदतीने नागपूरला मॉडेल सोलर सिटी करण्याची योजना असून याअंतर्गत विविध ठिकाणांवर सौर ऊर्जा निर्मिती संयंत्र बसविण्याचे कार्यही प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी दिली.
 
विद्युत समितीचे सभापती ॲड. संजयकुमार बालपांडे यांनी प्रत्येक प्रभागातील विद्युत तपासणीस कोण आहे त्याची यादी समितीला देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. पथदिव्यांच्या देखरेखीकरिता नेमण्यात आलेल्या संस्था, कंत्राटदारांच्या कामगिरीबद्दल आढाव घेण्याच्या सूचनाही सभापती श्री. बालपांडे यांनी केल्या.
 
बैठकीला सर्व झोनचे सहायक अभियंता (विद्युत) आणि कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.

      

 

 

 

योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहचवा : चेतना टांक

गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी समितीची बैठक
 
नागपूर, ता. २९ : झोपडपट्टी भागातील नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजना आहेत. महानगरपालिकेच्या माध्यमातूनही विविध योजना राबविल्या जातात. या सर्व योजनांची माहिती अखेरच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य प्रशासनाने प्रामाणिकपणे करावे. जेणेकरून लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळेल, असे निर्देश गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी समितीच्या सभापती श्रीमती चेतना टांक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
 
गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी विशेष समितीची बैठक गुरुवार २९ जून रोजी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात पार पडली. बैठकीला सभापती चेतना टांक यांच्यासह उपसभापती वंदना यंगटवार, समितीचे सदस्य रुतिका मसराम, मंगला खेकरे, स्नेहा निकोसे, सुनील हिरणवार, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त रवींद्र देवतळे, कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी. जांभूळकर, सहायक आयुक्त राजेश कराडे, हरिश राऊत, प्रकाश वऱ्हाडे, उपविभागीय (एसआरए) अभियंता राहाटे उपस्थित होते.
 
बैठकीत सर्वप्रथम मागील बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाचा आढावा घेण्यात आला. शासनातर्फे आणि मनपातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दर्शविणारे फलक प्रत्येक झोनस्तरावर, नगरसेवकांच्या घरासमोर आणि काही महत्त्वाच्या ठिकाणी लावण्याच्या सूचना सभापती चेतना टांक यांनी केल्या. गलिच्छ वस्ती निर्मूलन समितीअंतर्गत काय-काय योजना किंवा उपक्रम राबविले जातात याची माहिती समिती सदस्य सुनील हिरणवार यांनी अधिकाऱ्यांना मागितली तर उपसभापती वंदना यंगटवार यांनी घरकुल योजनेबद्दलची माहिती अधिकाऱ्यांना मागितली.
 
कार्यकारी अभियंता डी.डी. जांभुळकर यांनी रमाई आवास योजनेची तर श्री. राहाटे यांनी पंतप्रधान आवाज योजनेची माहिती समिती सदस्यांना दिली. गलिच्छ वस्ती समितीअंतर्गत लाभार्थ्यांना लाभ पोहचविण्यासाठी आणि अन्य काही चांगले उपक्रम राबविण्यासाठी प्रशासनाकडून चांगल्या सूचना अपेक्षित आहेत. प्रशासनाचे सहकार्यही अपेक्षित असल्याची अपेक्षा सभापती चेतना टांक यांनी व्यक्त केली. पुढील बैठकीत संपूर्ण तयारीसह आणि चांगल्या सूचनांसह अधिकाऱ्यांनी उपस्थित राहण्याचे निर्देश श्रीमती चेतना टांक यांनी दिले.

      

 

 

मनपा साजरी करणार कस्तुरचंद डागा यांची जन्मशताब्दी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार
 
नागपूर, ता. २९ : प्रसिद्ध उद्योगपती कस्तुरचंद डागा यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्याप्रीत्यर्थ नागपूर महानगरपालिकेद्वारे १६ डिसेंबर २०१७ रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन कस्तुरचंद पार्क येथे करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी दिली.
 
डागा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, माजी महापौर प्रवीण दटके, माजी सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, धरमपेठ झोन सभापती रूपा रॉय, नगरसेविका दिव्या धुरडे, अतिरिक्त आयुक्त आर.झेड.सिद्धीकी, धरमपेठ झोन सहायक आयुक्त महेश मोरोणे प्रामुख्याने उपस्थित होते.
      
कार्यक्रमात त्यांच्या जीवनावर आधारित एक लघुचित्रफीतदेखिल दाखविण्यात येणार असून या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी एक समिती गठीत केली आहे. समितीचे अध्यक्षपदी महापौर स्वत: राहणार असून अन्य सदस्यांमध्ये माजी महापौर, सत्तापक्षनेते, विरोधीपक्ष नेते, पश्चिम नागपूरचे आमदार तसेच डागा परिवारातील दोन सदस्य राहणार असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी दिली.
      
या कार्यक्रमाच्या निमित्ताने कस्तुरचंद पार्कचे नाव बदलून कस्तुरचंद डागा पार्क असे देण्यात यावे, त्याचप्रमाणे नागपुरातील एका रस्त्यालादेखिल त्यांचे नाव देण्याची त्यांच्या कुटुंबीयांनी केलेली मागणी मनपाने मान्य केल्याची माहितीही महापौरांनी यावेळी दिली. कस्तुरचंद पार्क येथील त्यांच्या पुतळ्याचे नूतनीकरणदेखील करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

      

 

 

 

‘आपली बस’मध्ये आता ज्येष्ठ  नागरिकांनाही सवलत

परिवहन समितीच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी
 
नागपूर, ता. २९ जून : नागपूर महानगरपालिकेच्या  ‘आपली बस’मध्ये आता ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत मिळणार आहे. या प्रस्वाताला परिवहन समितीच्या गुरुवारी (ता. २९ जून) झालेल्या बैठकीत समिती सदस्यांच्या सहमतीने मंजुरी देण्यात आली.
बैठकीला परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे, उपाध्यक्ष प्रवीण भिसीकर, सदस्य नितीन साठवणे, नरेंद्र वालदे, वैशाली रोहणकर, अर्चना पाठक, मनिषा धावडे, उज्ज्वला शर्मा, अभिरुची राजगिरे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, निगम सचिव हरिश दुबे, कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी. जांभूळकर उपस्थित होते.
 
‘आपली बस‘मध्ये सध्या  विद्यार्थी, अंध, अपंग, स्वातंत्र्य संग्राम सैनिक यांना सवलत देण्यात येते. आता त्यांसोबतच शहरातील ज्येष्ठ नागरिकांनाही या सवलतीचा लाभ मिळावा, असा प्रस्ताव बैठकीत ठेवण्यात आला. प्रस्तावाला सर्वसंमतीने मान्यता देण्यात आली. परिवहन विभागाच्या कामामध्ये वाढ झालेली असून विभागाकडे पुरेसा अधिकारी वर्ग नसल्याने सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना ‘तज्ज्ञसेवा करार’पद्धतीने विवक्षित कामासाठी घेण्याच्या निर्णयालाही मंजुरी देण्यात आली. नागरिकांना दर्जेदार सेवा देत असताना त्यांच्यावर कुठलाही आर्थिक भुर्दड न लावता उत्पन्न वाढ करण्याबाबत करण्याच्या उपाययोजनांवर बैठकीत चर्चा झाली.
 
लवकरच ४५ नवीन मिनी बस
नागरिकांच्या मागणीनुसार शहरात विविध ठिकाणी  ‘आपली बस’  सेवा सुरू करणे आणि आवश्यकतेनुसार बसेसच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने नवीन ४५ बसेस आपली बस सेवेत सुरु होणार आहे. या प्रस्तावालाही परिवहन समिती सभापती जितेंद्र कुकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

      

 

 

 

वृक्ष लागवड अभियानासाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य मोलाचे : महापौर नंदा जिचकार

‘एक पाऊल हरितक्रांतीकडे’ उपक्रमांतर्गत स्वयंसेवी संस्थांची बैठक
 
नागपूर,ता. २९ : वृक्ष लागवडीसाठी व त्यांच्या संवर्धनासाठी मनपा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करेल. त्यासाठी नागपुरातील स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य मोलाचे आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
 
राज्य शासनाने जाहीर केलेला वृक्ष लागवड व संवर्धन अभियानाचा एक भाग म्हणून नागपूर महानगर पालिकेद्वारे घेण्यात येणाऱ्या ‘एक पाऊल हरितक्रांतीकडे’ हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवार २८ जून रोजी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आली.
 
बैठकीला स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, माजी महापौर प्रवीण दटके, माजी सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, धरमपेठ झोन सभापती रूपा रॉय, गांधीबाग झोन सभापती सुमेधा देशपांडे, धंतोली झोन सभापती प्रमोद चिखले, सतरंजीपुरा झोन सभापती संजय चावरे, लकडगंज झोन सभापती दीपक वाडीभस्मे, हनुमाननगर झोन सभापती भगवान मेंढे, नेहरूनगर झोन सभापती रेखा साकोरे, मंगळवारी झोन सभापती सुषमा चौधरी, नगरसेवक पिंटू झलके, अतिरिक्त आयुक्त आर.झेड.सिद्धीकी, उद्यान अधीक्षक सुधीर माटे,  प्रामुख्याने उपस्थित होते.
 
पुढे बोलताना महापौर म्हणाल्या, आपण प्रत्येकांनी एक झाडे लावावे व त्याचे संवर्धन करावे. त्याची आठवण कायम स्मरणात राहील. झाडांचे संवर्धन ही काळाची गरज आहे. कमीत कमी झाडे लावा परंतु ते जगवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले
 
नागपूर महानगरपालिकेद्वारे सन २०१७-१८ या वर्षात लोकसहभागातून ४५ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याअनुषंगाने वृक्षलागवड पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. महापौर नंदा जिचकार यांच्या मार्गदर्शनाखाली झोन सभापतींमार्फत विविध झोन अंतर्गत मोकळी मैदाने, इमारती, शाळा, परिसर, घाट, पाण्याची टाकी परिसर, सीमेंट रस्ते या ठिकाणी वृक्षलागवड करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. वृक्षलागवड कार्यक्रमात विविध समाजिक संस्था, कार्पोरेट ऑफिस यांचा सहभाग राहणार आहे.  नागपूर महानगरपालिकेद्वारे इच्छुक संस्था, नागरिक यांना मोफत वृक्ष पुरविण्यात येणार आहे. नागपूर महानगरपालिकेच्या नर्सरीत ४९ हजार नग विविध २१ प्रजातींच्या रोपांची उपलब्धता आहे. विविध ५८ जागा निश्चित करण्यात आल्या असून त्या अनुषंगाने वृक्षलागवडीची पूर्व तयारी सुरू करण्यात आली आहे.
 
झोननिहाय वृक्षलागवड कार्यक्रमाकरिता मार्गदर्शन व जनजागृती तसेच लोकसहभागातून वृक्षलागवड व त्या वृक्षांचे पालकत्व याकरिता स्वयंसेवी संस्था यांना जबाबदारी देण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्था, कॉर्पोरेट ऑफिस यांनी मनपाला ट्रीगार्डस देण्याचे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.
बैठकीला सर्व झोन सहायक आयुक्त सर्वश्री विजय हुमने, महेश मोरोणे, अशोक पाटील, राजू भिवगडे, राजेश कराडे, सुभाष जयदेव, हरिश राऊत, सुवर्णा दखने, प्रकाश वऱ्हाडे, कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल (विद्युत), नागपुरातील स्वयंसेवी संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.

      

 

 

कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे महापौर, आयुक्तांचे निर्देश

महापौर, आयुक्त व सत्तापक्ष नेते यांनी केले संयुक्त निरीक्षण
 
पावसामुळे नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा : नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या
 
नागपूर, ता. २८ : पहिल्या पावसात ज्या घरांमध्ये पावसाचे पाणी साचले तेथे यापुढे पाणी साचणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिले.
 
मंगळवार २७ जून रोजी झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील अनेक वस्त्या जलमय झाल्या. अनेक ठिकाणी नुकसान झाले. शहरात झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी महापौर नंदा जिचकार, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त अश्विन मुदगल यांनी ज्या भागात सर्वाधिक नुकसान झाले, ज्या भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले त्या भागाचा संयुक्तपणे दौरा केला. यावेळी त्यांच्यासह हनुमाननगर झोन सभापती भगवान मेंढे, कर आकारणी समितीचे सभापती अविनाश ठाकरे, नेहरूनगर झोन सभापती रेखा साकोरे, नगरसेविका विशाखा बांते, नगरसेवक मनोज गावंडे, नगरसेविका विशाखा मोहोड, मुख्य अभियंता विजय बनगीरवार, अधीक्षक अभियंता दिलीप सोनटक्के, कार्यकारी अभियंता नरेश बोरकर, धंतोली झोनचे सहायक आयुक्त जी.एम. राठोड, हनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त आर.पी. भिवगडे, नेहरूनगर झोनचे सहायक आयुक्त राजेश कराडे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, माजी नगरसेवक शरद बांते आदी उपस्थित होते.
 
प्रारंभी मा. महापौर, सत्तापक्ष नेते व आयुक्त यांनी नंदनवन, केडीके महाविद्यालयाजवळील राजेंद्र नगर चौकात पाणी साचलेल्या भागाचे निरीक्षण केले. हसनबाग मार्ग, नंतर पोहरा नदी वाहत असलेल्या हुडकेश्वर नाला परिसरातील आदर्श संस्कार व सेंट जॉन पॉल शाळा परिसरातील श्याम नगर येथील शिकस्त पुलाचे निरीक्षण केले. याठिकाणी पूल छोटा असल्यामुळे पाण्याचा प्रवाहात अडथळा निर्माण होतो. त्यामुळे परिसरातील वस्त्यांमध्ये पाणी शिरले. हा पूल शिकस्त झाल्याने नव्याने बांधण्यासंदर्भात तांत्रिक सल्लागाराची मदत घेऊन प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मा. महापौर व मा. निगम आयुक्त यांनी मुख्य अभियंता यांना दिले. नंतर मा. निगम आयुक्तांनी रिंग रोड रामेश्वरी भागातील धाडीवाल ले-आऊट येथील परिसराची पाहणी केली. रामेश्वरी, पार्वतीनगर या भागात सीमेंट रोड उंच झाल्यामुळे परिसरातील खोलगट भागात पाणी जमा झाल्याने ते परिसरातील घरात शिरले. या भागाचे त्यांनी निरीक्षण केले असता आयआरडीपी अंतर्गत तयार झालेल्या नाल्यातील गाळ काढून तो उंच करण्यची सूचना दिली.
 
सुयोगनगर येथील घरांमध्ये पाणी साचण्याचे नेमके कारण त्यांनी जाणून घेतले. पहिल्याच पावसात जर या वस्त्यांमध्ये पाणी शिरले असेल तर भविष्यात अशी परिस्थिती उद्‌भवणार नाही यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पावसाचे पाणी नाल्यामध्ये सोडण्याची व्यवस्था सदोष असेल तर ती तातडीने दुरुस्त करा. गडर लाईन स्वच्छ करा, गरज असेल तेथे चेंबर तयार करा, असे निर्देशही त्यांनी दिले. पाऊस पाण्यामुळे कोणतीही वित्त व जीवहानी होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देशही मा. महापौर व आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.  
 
दौऱ्याप्रसंगी परिसरातील नागरिकांच्याही त्यांनी भेटी घेतल्या. त्यांच्याशी संवाद साधत समस्या जाणून घेतल्या. महानगरपालिका आपल्या समस्या सोडविण्यासाठी आणि येणाऱ्या आपत्तीचा सामना करण्यासाठी सदैव तत्पर आहे याबाबत महापौर आणि आयुक्तांनी नागरिकांना आश्वस्त केले. कुठली समस्या किंवा आपत्ती आल्यास आपल्या प्रभागातील नगरसेवक, झोनचे सहायक आयुक्त यांच्यासह झोन कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

      

      

 

 

ऊर्जा कार्यक्षमता वाढविण्यात नागपूर अग्रेसर राहील : महापौर नंदा जिचकार

‘सिडबी’तर्फे कार्यशाळेचे आयोजन : विविध विषयांवर चर्चा
 
नागपूर, ता. २८ : भविष्यात स्मार्ट सिटीकडे वाटचाल करताना नागपुरातील ऊर्जा कार्यक्षमता वाढणेही गरजेचे आहे. ऊर्जा बचतीसाठी नव्या तंत्रज्ञानाची नवनवी उपकरणे वापरून ऊर्जा खर्च निम्म्यावर आणण्यात आणि आपारंपरिक ऊर्जा वापरून आदर्श निर्माण करण्यात नागपूर अग्रेसर राहील, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
 
स्मॉल इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (सिडबी) यांच्या वतीने ‘महानगरपालिका क्षेत्रात ऊर्जा कार्यक्षमतेत सुधारणा करणे’ (Energy Efficiency Improvement in Municipalities) या विषयावर आयोजित कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर मनपा आयुक्त अश्विन मुदगल, सिडबीच्या एनर्जी इफिसियन्सी सेंटरचे लीड टेक्निकल एक्स्पर्ट शंकर हलधर आणि ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे विभागीय संचालक जयंत पाठक उपस्थित होते.
 
महापौर नंदा जिचकार पुढे म्हणाल्या, ऊर्जाबचत आणि ऊर्जानिर्मितीसाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर ही आता काळाची गरज आहे. नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पात प्राधान्याने ऊर्जा बचत करणारी नवी उपकरणे लावण्यावर भर आहे. सध्याचे स्ट्रीट लाईट बदलवून ऊर्जा बचत करणारे नवे स्ट्रीट लाईट लावण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. सिडबीने आयोजित केलेली ही कार्यशाळा नागपुरातील ऊर्जा कार्यक्षमता वाढविण्याच्या दिशेने महत्त्वाची ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
आयुक्त अश्विन मुदगल म्हणाले, नागपुरात ऊर्जा कार्यक्षमता वाढविण्यासाठी विविध प्रयोग सुरू आहेत. नागपुरातील वाहतूक सुद्धा ऊर्जा कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने बदलत आहेत. भविष्यात संपूर्ण शहर बस सेवा ही इलेक्ट्रीक तत्त्वावर राहील या दिशेने कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. नागपूर या क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सिडबीच्या एनर्जी इफिसियन्सी सेंटरचे लीड टेक्निकल एक्स्पर्ट शंकर हलधर यांनी कार्यशाळेमागील भूमिका विषद केली. ऑल इंडिया लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे विभागीय संचालक जयंत पाठक यांनी स्वागत भाषण केले.
 
तत्पूर्वी महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अश्विन मुदगल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यशाळेचे उद्‌घाटन करण्यात आले. उद्‌घाटन कार्यक्रमानंतर वक्त्यांनी विविध विषयांवर प्रकाश टाकला. ‘ऊर्जा कार्यक्षमतेसाठी आंशिक जोखीम सामायिकरण सुविधा’ (Partial Sharing Facility for Energy Efficiency) या विषयावर सिडबीचे लीड टेक्निकल एक्स्पर्ट शंकर हलधर यांनी सादरीकरण केले. ‘केस स्टडीसह इस्कोचा ऊर्जा दक्षता व कार्यप्रणाली परिचय‘ (Introduction to Energy Efficiency and Functioning of ESCOs with case studies) या विषयावर एआयआयएलएसजीचे एनर्जी इफिशिएन्सी हेड कनगराज गणेशन यांनी, आयएफसी अनुभव : शेअर्ड सेव्हींग ॲण्ड डिमांड सेव्हींग मॉडेलचे ट्रान्झॅक्शन स्ट्रक्चर’ (IFC Experience : Transaction Structure of the Shared Saving and Deemand Saving Model) या विषयावर आयएफसीचे इन्व्हेस्टमेंट ऑफिसर सुमित शुक्ला यांनी तर ‘नागपूर महानगरपालिकेत ऊर्जा कार्यक्षमतेत व आपारंपरिक ऊर्जास्त्रोताचा वापर करण्यासाठी केलेली उपाययोजना’ (Measures taken for Improvement of Energy Efficiency and Use of Renewable Energy in NMC) या विषयावर नागपूर महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता संजय जैस्वाल यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून माहिती दिली. 
 
कार्यक्रमाचे संचालन एआयआयएलएसजीच्या कार्यक्रम प्रमुख अनुराधा दास यांनी केले. आभार विभागीय संचालक जयंत पाठक यांनी मानले. कार्यक्रमाला विदर्भातील महानगरपालिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.         

        

        

 

 

आयसोलेशन हॉस्पीटल कात टाकणार!

मनपा आरोग्य सभापतींचे ‘व्हिजन’ : तातडीने काम करण्याचे निर्देश
 
नागपूर, ता. २२ : कधी काळी खासगी रुग्णालयांना मागे टाकणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या इमामवाडा स्थित आयसोलेशन हॉस्पीटलची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. आयसोलेशन इस्पितळाला पूर्वीचे दिवस दाखविण्याचा संकल्प मनपाचे आरोग्य सभापती मनोज चापले यांनी केला असून त्यादृष्टीने त्यांनी पावले उचलली आहेत. शुक्रवार २३ जून रोजी आकस्मिक दौरा करून ‘आयसोलेशन’चे रूप पूर्णत: बदलविण्याचे निर्देश दिले.
 
आरोग्य सभापतीचा पदभार स्वीकारल्यानंतर सभापती मनोज चापले यांनी नागपूर महानगरपालिकेच्या प्रत्येक रुग्णालयाची अवस्था बदलविण्याचे ‘व्हिजन’ ठेवले आहे. रुग्णालयात आल्यानंतर रुग्णांना खासगी रुग्णालयात आल्याचा भास व्हावा, असे ‘लुक’ रया रुग्णालयांना देण्याचा त्यांचा मानस आहे. आपले ‘व्हिजन’ सत्यात उतरविण्यासाठी श्री. चापले यांनी शुक्रवारी ‘आयसोलेशन’ला भेट दिली. त्यांच्यासोबत आरोग्य समितीचे सदस्य तथा नगरसेवक विजय चुटेले होते. ‘आयसोलेशन’चे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. एस. शिंदे, फार्मासिस्ट राजेंद्र कोरडे यांनी त्यांनी इस्पितळाच्या कारभाराची माहिती दिली. 
रुग्णालयातील समस्याही सांगितल्या. रुग्णालयाच्या रंगरंगोटीचे आणि नूतनीकरणाचे कार्य तीन महिन्यांपासून सुरू आहे. मात्र कंत्राटदार निष्काळजीपणा करीत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. या संपूर्ण कार्याची पाहणी केल्यानंतर त्यांनी संबंधित झोनच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नूतनीकरणाच्या कामाचा जो प्रस्ताव आहे त्यात अनेक बदल करून नव्याने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी धंतोली झोनचे सहायक अभियंता सुनील गजभिये आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहायक धर्ममाळी यांना दिले. इस्पितळातील संपूर्ण दारे, खिडक्या बदलवून आधुनिक पद्धतीचे दरवाजे लावण्याचे निर्देश सभापती चापले यांनी दिले.
 
रुग्णालयाचाच एक भाग असलेल्या मोठ्या खोलीत टाकाऊ वस्तू पडलेल्या होत्या. त्या तातडीने काढून तेथे नवीन अद्ययावत खोली बांधण्याचीही सूचना दिली. स्वच्छतागृहे, वॉर्ड आदी ठिकाणच्या टाईल्स बदलविण्याच्या सूचना दिल्या. ‘आयसोलेशन’ची ओळख देणारा फलकही मुख्य द्वारावर तातडीने लावण्याच्या सूचना दिल्या.
 
‘डिजीटल’ माहिती फलक लागणार
आयसोलेशन इस्पितळ हे रुग्णांना २४ तास सेवा देण्यासाठी आहे. इस्पितळात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला ड्युटीवर असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची माहिती जाणून घेण्याचा अधिकार आहे. ही माहिती देणारा डिजीटल डिस्प्ले बोर्डसुद्धा आता यापुढे आयसोलेशन रुग्णालयात लागणार आहे. शिफ्टनुसार ड्युटीची माहिती या बोर्डवर झळकणार आहे.
 
मुलभूत सोयी मिळणे हा रुग्णांचा हक्क
मनपा ही शहरातील लोकांना मुलभूत सोयी पुरविणारी संस्था आहे. मनपाच्या रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला किमान सोयी मिळणे हा त्यांचा हक्क आहे. रुग्णाला कोंडवाड्यात आलो, असा भास होणे हे आमचे अपयश राहील. त्यामुळे यापुढे मनपाची सर्व रुग्णालये सोयी-सुविधांनी सुसज्ज करण्याचा संकल्प आहे. ‘आयसोलेशन’ला पूर्वीचे वैभव प्राप्त करून देण्याचा माझा प्रयत्न राहील.
-मनोज चापले, सभापती, आरोग्य समिती (मनपा)

        

        

 

 

‘एक पाऊल हरितक्रांती’कडे अंतर्गत मनपा लावणार ४५ हजार वृक्ष

१ ते ७ जुलैपर्यंत उपक्रम : लोकसहभागाचे आवाहन
 
नागपूर, ता. २२ : ‘एक पाऊल हरितक्रांती’कडे या महाराष्ट्र शासनाच्या विशेष उपक्रमांतर्गत नागपूर महानगरपालिका लोकसहभागातून नागपूर शहरात १ जुलै ते ७ जुलै दरम्यान सुमारे ४५ हजार वृक्षांची लागवड करणार आहे. वृक्षारोपणासाठी मनपाकडे रोपटे उपलब्ध असून नागरिकांनी, संस्थांनी तातडीने मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांकडे मागणी नोंदवावी, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
 
वृक्ष लागवड मोहिमेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके, कर आकारणी व कर संकलन सभापती अविनाश ठाकरे, शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, धरमपेठ झोन सभापती रूपा रॉय, लकडगंज झोन सभापती दीपक वाडीभस्मे, आसीनगर झोन सभापती श्रीमती भाग्यश्री कानतोडे, मंगळवारी झोन सभपाती श्रीमती सुषमा चौधरी, अपर आयुक्त आर. झेड. सिद्दीकी, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, उद्यान अधीक्षक संजय माटे, सहायक आयुक्त महेश मोरोणे, गणेश राठोड, प्रकाश वराडे, सुभाषचंद्र जयदेव, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर उपस्थित होते.
महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी ४५ हजार वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टाची माहिती दिली. फ्लॅट, सोसायटी, वॉर्ड, मोहल्ला, सार्वजनिक ठिकाणी १५ हजार, शाळा, महाविद्यालये आदी ठिकाणी ७५००, सीमेंट रस्ते, मुख्य रस्त्यांच्या बाजूला ७५००, कार्पोरेट कंपन्या, संस्था, क्रेडाईसारख्या संस्था १५ हजार झाडे शहरात 
 
विविध ठिकाणी लावतील.
झाडांची नोंदणी करण्यासाठी झोन स्तरावर व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांनी आपली नोंदणी तातडीने करावी, असे आवाहनही महापौर नंदा जिचकार यांनी केले. वृक्षारोपणासाठी झोन कार्यालयांनी निवडलेल्या जागांवर खड्डे खोदून देण्याचे निर्देशही यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
यानंतर प्रत्येक झोनच्या सहायक आयुक्त आणि त्यांच्या प्रतिनिधींकडून महापौरांनी वृक्ष लागवड तयारीचा आढावा घेतला. शिक्षण विभागातर्फे विद्यार्थी जे-जे झाडे लावणार आहेत ती लावल्यानंतर त्यांचा संपूर्ण रेकॉर्ड ऑनलाईन ठेवण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी दिली. महापौर नंदा जिचकार यांनी शिक्षण विभागाच्या या उपक्रमाचे स्वागत केले. महापालिकेतर्फे लावण्यात येणाऱ्या संपूर्ण ४५ हजार वृक्षांचा रेकॉर्ड असा ऑनलाईन करता येईल का, याबाबत विचार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
 
आगळ्यावेगळ्या ‘ट्री गार्ड’चे प्रात्यक्षिक
सदर बैठकीत रेनबो ग्रीनर्स प्रा. लि. या कंपनीने आगळ्यावेगळ्या ट्री गार्डचे प्रात्यक्षिक दाखविले. सदर ट्री गार्ड हे सुमारे ६ फूट उंच असून त्यात तेवढ्याच उंचीची झाडे लावता येतील. त्यात डीप सिस्टीम असून एकदा पाणी दिल्यानंतर १५ दिवस पाणी देण्याची गरज पडणार नाही. या ट्री गार्डला चोरांची आणि जनावरांचीही भीती नाही आणि केवळ दोन वर्षात त्या ट्री गार्डमधील झाड पूर्णपणे आकार घेईल. या ट्री गार्डची मदत घेतली तर झाडे जगण्याची संख्या अधिक राहील आणि पुढील तीन ते पाच वर्षात शहर पूर्णत: हिरवेगार होईल. या ट्री गार्डसंदर्भात चर्चा झाल्यानंतर महापौर नंदा जिचकार, सत्तापक्ष नेते संदीप जोशी आणि माजी महापौर प्रवीण दटके यांनी तातडीने अधिकाऱ्यांना सदर ट्री गार्ड संदर्भातील प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले.
 
           
           
 
 

 

नागपूर ठरणार इंडो-फ्रेंच द्विसंबंधाचा ‘प्लॅटफॉर्म’ : पॉल अर्मलीन

फ्रेंच व्यवसाय प्रतिनिधी मंडळाची स्मार्ट सिटी-मेट्रो रेल प्रकल्पांना भेट
 
नागपूर, ता. २२ : नागपुरातील स्मार्ट सिटी आणि नागपूर मेट्रो प्रकल्पात फ्रान्समधील विविध कंपन्यांची गुंतवणूक आहे. भविष्यात इंडो-फ्रेंच द्विसंबंध अधिक दृढ होण्यासाठी नागपूर प्लॅटफॉर्म ठरेल, असे प्रतिपादन फ्रान्स सरकारच्या द्विपक्षीय आर्थिक संबंधाचे विशेष प्रतिनिधी पॉल अर्मलीन यांनी केले.  
 
नागपूर स्मार्ट सिटी आणि मेट्रो प्रकल्पात गुंतवणुकीच्या दृष्टीने माहिती घेण्यासाठी नागपुरात आलेल्या फ्रेंच व्यवसाय प्रतिनिधी मंडळाने नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पाची माहिती जाणून घेतल्यानंतर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. याप्रसंगी महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, मनपा आयुक्त अश्विन मुदगल, साऊथ एशिया रिजनल इकॉनॉमिक डिपार्टमेंटचे प्रमुख जॉन मार्क फेनेट, फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सीचे डेप्युटी डायरेक्टर हर्व डुब्रेल, मनपाचे अतिरिक्त आयुक्त आणि स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे चर्चासत्रात सहभागी झाले होते.
स्मार्ट सिटी आणि नागपूर रेल प्रकल्पात फ्रान्सच्या सहभागाची माहिती देताना पॉल अर्मलीन पुढे म्हणाले, नागपूर हे जागतिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. इंडो-फ्रेंच संबंधाचे नागपूर एक उदाहरण आहे. भविष्यात जगातील इतर शहरे नागपूरपासून प्रेरणा घेतील. नागपुरात इलेक्ट्रीक वाहतुकीसाठी फ्रान्सने ३.५ मिलियन युरो अर्थसहाय्य केले होते. नागपूरच्या विकासासाठी फ्रान्सचे सहकार्य यापुढेही सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
जॉन मार्क फेनेट यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून नागपूर स्मार्ट सिटी आणि नागपूर मेट्रो विकासात फ्रान्स सरकार आणि फ्रेंच कंपनीचे काय योगदान आहे, याबाबत माहिती दिली. स्मार्ट सिटी प्रकल्पात काम करणाऱ्या ६९ कंपनींनी फ्रेंच स्मार्ट सिटी क्लबचे सदस्यत्व स्वीकारले असून नागरी वाहतूक, ऊर्जास्त्रोत बळकटीकरण, सांडपाणी व्यवस्थापन, माहिती आणि संवाद, घरबांधणी नियोजन आणि पर्यटन या विविध क्षेत्रात सदर कंपनी कार्यरत असल्याची माहिती दिली.
 
फ्रेंच डेव्हलपमेंट एजंसीचे उपसंचालक हर्व डुब्रेल यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी सहायक असलेल्या विविध नव्या उपकरणांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
महापौर नंदा जिचकार यांनी, नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पात योगदान देणाऱ्या फ्रान्स सरकार आणि फ्रान्स कंपऱ्यांचे आभार मानले. नागपूर स्मार्ट आणि सुरक्षित बनविण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. फ्रान्समधील तंत्रज्ञान आणि अर्थसहाय्याच्या जोरावर पॅरीससारखे शहर होण्यास नागपूर कुठेही कमी पडणार नाही, असा विश्वास त्यांन व्यक्त केला.
 
मनपा आयुक्त अश्विन मुदगल म्हणाले, कुठल्याही प्रकल्पासाठी तांत्रिक मदत आवश्यक असते. कारण अशा मदतीने विचारांचे आदानप्रदान होते. फ्रान्स सरकारने नागपूरला अशी मदत केल्याबद्दल नागपूरच्या वतीने आम्ही आभारी आहोत, असेही ते म्हणाले.
 
फ्रेंच प्रतिनिधी मंडळात सहभागी असलेल्या फ्रान्समधील टॉप कंपन्यांच्या प्रमुखांनी त्यांच्या कार्याबाबत सादरीकरणाच्या माध्यमातून माहिती दिली.
तत्पूर्वी महापौर नंदा जिचकार यांनी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने पॉल अर्मलीन यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर फ्रेंच शिष्टमंडळाच्या वतीने हर्व डुब्रेल यांनी महापौर नंदा जिचकार यांचे स्वागत केले. स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाची संपूर्ण माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून दिली. त्यानंतर स्मार्ट सिटी प्रकल्पात कार्यरत असलेल्या एन.जे.एस. इंजिनिअर्स प्रा.लि.च्या सोनाली कतरे यांनी नाग नदी पुनर्जीविकरण प्रकल्पाची, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर यांनी नाग नदी विकास प्रकल्पाची तर अहमदाबाद येथील एचसीपी डिझाईन, प्लानिंग ॲण्ड मॅनेजमेंट प्रा.लि. चे प्रकल्प व्यवस्थापक गणेश अहिरे यांनी क्षेत्राधिष्ठीत विकास प्रकल्पाची माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून दिली. फ्रेंच शिष्टमंडळाच्या वतीने पॉल अर्मलीन यांनी तर नागपूर महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या वतीने अपर आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे यांनी आभार मानले.
 
नागपुरातील विविध प्रकल्पांना भेट
फ्रान्स सरकारच्या द्विपक्षीय आर्थिक संबंधाचे विशेष प्रतिनिधी पॉल अर्मलीन यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांना भेट दिली. ३० सदस्यीय प्रतिनिधीमंडळांनी तीन गटात तीन विविध प्रकल्पांची पाहणी केली. एका चमून स्मार्ट सिटी उपक्रमाच्या क्षेत्राधिष्ठीत विकास प्रकल्पांतर्गत कार्य सुरू असलेल्या पारडी-भरतवाडा-पुनापूर येथील कार्याची पाहणी केली. पारडीतील भवानी मंदिराला भेट दिल्यानंतर क्षेत्राधिष्ठीत विकास कार्याची माहिती जाणून घेतली. दुसऱ्या चमूतील सदस्यांनी नाग नदी विकास प्रकल्पाला भेट दिली. नाग नदीचा उगम असलेल्या अंबाझरी तलाव ते वर्धमान नगर येथील सेंट झेविअर्सपर्यंतच्या नाग नदीचा दौरा करीत विकास कार्याची माहिती घेतली. तिसऱ्या चमूने नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या कार्याची माहिती घेतली. मेट्रो हाऊस येथे प्रारंभी नागपूर मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. सादरीकरणाच्या माध्यमातून मेट्रोच्या प्रगतीकार्याची माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी दिली. यावेळी महामेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम, महामेट्रोचे महाव्यवस्थापक (प्रशासन) अनिलकुमार कोकाटे उपस्थित होते. त्यानंतर शिष्टमंडळाने सेंट्रल मॉल येथील आणि एअरपोर्ट साऊथ मेट्रो स्थानकाची तसेच साई मंदिर येथील वायाडक्टची पाहणी केली.
 
फ्रेंच व्यवसाय प्रतिनिधी मंडळात टॅक्टबिल इंजिनिअरिंग प्रा.लि.चे व्यवसाय विकास प्रमुख ए. एस. भसीन, बिजनेस फ्रान्सचे जेरोम जुलियंड, फ्रेंच डेव्हलपमेंट एजंसीचे ॲन्टोनी बुज, फ्रान्स दूतावासाचे रूज क्लेमेंट, कौन्सिलर जनरल ऑफ फ्रान्स जॉन मार्क मिगनॉन, फ्रान्स दूतावासाचे अमित ओझा, ॲकॉर हॉटेलचे उपाध्यक्ष श्वेतांक सिंग, ॲकॉर हॉटेलचे उपमुख्य महाव्यवस्थापक मनोज अग्रवाल, अल्टोस्टेपचे डेमियन कॅरियर, वेस्ट इगिसचे विभागीय संचालक सिद्धार्थ देब, वेवोलिया इंडियाचे प्रकल्प प्रमुख नीरज नारंग, व्यवस्थापक धीरज कोचे, हर्व डुब्रेल, उमेश जाधव, रुषित पडालिया, गिरीश पिल्लई, विनोद जोशी, डेविड मॉस्रेकोविज, अशोक काटे, रणवीर साही, जितेन गुलराजानी, फ्रान्स दूतावासाच्या कौन्सीलर इलिका खन्ना-मान आदी प्रतिनिधींचा समावेश होता. सदर चमूसोबत मनपाच्या वतीने कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, नद्या-सरोवरे प्रकल्प प्रमुख मो. इसराईल, सहायक आयुक्त सुभाषचंद्र जयदेव होते.

       

       

       

 

 

फ्रेंच शिष्टमंडळाची दीक्षाभूमीला भेट

नागपूर, ता. २२ : स्मार्ट सिटी प्रकल्प आणि नागपूर मेट्रो प्रकल्पाला भेट देण्याकरिता आलेल्या फ्रेंच व्यवसाय शिष्टमंडळाने गुरुवार २२ जून रोजी दीक्षाभूमीला भेट देत नतमस्तक होत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेतले.
 
यावेळी फ्रान्स सरकारच्या द्विपक्षीय आर्थिक संबंधाचे विशेष प्रतिनिधी पॉल अर्मलीन यांच्यासह असलेल्या शिष्टमंडळातील सर्व सदस्यांचे दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शिष्टमंडळासोबत असेलेले नागपूर महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी दीक्षाभूमीबाबत शिष्टमंडळाला माहिती दिली.
 
प्रारंभी शिष्टमंडळाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला व भगवान बुद्धाच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून व नतमस्तक होऊन अभिवादन केले. यावेळी फ्रान्स सरकारचे प्रतिनिधी पॉल अर्मलीन यांनी भारतातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाबाबत मी ऐकले होते. पण मी आज डॉ. बाबासाहेबांच्या या धम्मभूमीत येऊन व त्यांच्या स्तूपाचे दर्शन घेतल्याने अत्यंत आनंद होत असल्याचे मनोगत व्यक्त केले. भगवान गौतम बुद्धाचा शांतीचा संदेश या स्मारकातून जगभर जातो. मला या पवित्र स्थळी भेट दिल्याचा आनंद असल्याचे म्हटले.
 
त्यांनी संपूर्ण स्तूप परिसराचे बारकाईने निरीक्षण केले. ते पुढे म्हणाले, १५ व्या शतकात युरोपमध्ये असा भव्य स्तूप निर्माण केलेला आहे. हे जागतिक किर्तीचे स्मारक असून प्रेरणास्थळ असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी फ्रान्सचे हर्व डुब्रेल, बिजनेस फ्रान्सचे जेरोम जुलियंड, फ्रेंच डेव्हलपमेंट एजंसीचे अन्टोनी बुज, फ्रान्स दूतावासाचे रुज क्रेमेंट, मार्क मिगलॅन, अमित ओझा, सिद्धार्थ म्हैसकर, सतिश रामेटेके, नरेंद्र मून, भूषण दखने, कपिल फुलझेले, दिलीप तांदळे आदी उपस्थित होते.

        

        

 

 

 

३० सदस्यीय फ्रेंच शिष्टमंडळ गुरुवारी नागपुरात

‘स्मार्ट सिटी’ उपक्रमाची घेणार माहिती : महामेट्रो आणि नाग नदी स्वच्छता अभियानाची करणार पाहणी
 
नागपूर, ता. २१ : ‘स्मार्ट सिटी’ उपक्रमांतर्गत ३० सदस्यीय फ्रेंच शिष्टमंडळ गुरुवार २२ जून रोजी नागपुरात येत आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमासोबतच विविध प्रकल्पांची माहिती घेणार आहे.
 
विशेष म्हणजे सदर शिष्टमंडळ देशातील केवळ तीन शहरांना भेटी देणार असून नागपूर त्यातील एक आहे. चंदीगड आणि पुद्दुचेरी ही अन्य दोन शहरे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २०१५ मध्ये फ्रान्सला दिलेल्या भेटीदरम्यान भारतातील तीन शहरात स्मार्ट सिटीअंतर्गत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. याअंतर्गत फ्रेंच सरकारची आर्थिक संस्था असलेली फ्रेंच डेव्हलमेंट एजंसी (AFD) जगभरातील सार्वजनिक वित्तीय आस्थापनांना कर्जपुरवठा करीत असते. याच एजंसीने नागपूर मेट्रो प्रकल्प आणि नागपूर स्मार्ट सिटी उपक्रमाला अंशत: कर्जपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. हीच एजंसी केवळ नागपुरातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील शाश्वत विकासाच्या संकल्पेनला बळ देत आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्समधील दौऱ्यादरम्यान फ्रेंच डेव्हलमेंट एजंसीच्या माध्यमातून एक बिलीयन युरो स्मार्ट सिटी प्रकल्पाला देण्याचा निर्णय फ्रेंच अध्यक्षांनी घेतला होता.
 
स्मार्ट सिटी उपक्रमातील सहयोग पुढे सुरू ठेवण्याच्या दृष्टीने फ्रान्स सरकारच्या द्विपक्षीय आर्थिक संबंधाचे विशेष प्रतिनिधी पॉल अर्मलीन फ्रान्समधील टॉप कंपनीच्या प्रमुखांचा सहभाग असलेल्या ३० सदस्यीय प्रतिनिधी मंडळासह भारतात येत आहेत. गुरुवार, २२ जून रोजी ते नागपूर भेटीवर असून स्मार्ट सिटी, नागरी विकास आणि अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत या क्षेत्रात इंडो-फ्रेन्च संबंध अधिक दृढ करण्याचा त्यांचा उद्देश आहे.
 
या भेटीदरम्यान पॉल अर्मलीन हे महापौर आणि आयुक्तांचीही भेट घेतील. दिवसभरात सदर शिष्टमंडळ महामेट्रो अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या इलेक्ट्रीक कार सुविधा, नाग नदी स्वच्छता अभियानांतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमाच्या जागेला प्रत्यक्ष भेट देतील. त्यानंतर स्मार्ट सिटी उपक्रमाचे सादरीकरण नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येईल.

 

 

हजारो साधकांनी केली एकसाथ‘योगसाधना’

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मनपाचे आयोजन : चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी वेधले लक्ष, स्वच्छतेची घेतली शपथ
 
नागपूर, ता. २१ : ‘करू या नियमित योगासन....’ अशा मंगलध्वनीच्या स्वरात हजारो योगसाधकांनी एक साथ योगासन करीत सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी नियमित योगासन करण्याचा संदेश दिला. नागपूर महानगरपालिकाच्या वतीने शहरातील विविध योगाभ्यास मंडळाच्या सहकार्याने बुधवारी (ता.२१) येथील यशवंत स्टेडियमवर विश्व योग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 
कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, विशेष अतिथी म्हणून ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते.अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार होत्या. मंचावर खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे,आमदार गिरीश व्यास, आमदार सुधाकर देशमुख, आ. विकास कुंभारे, कार्यक्रमाचे संयोजक उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, मनपा आयुक्त अश्विन मुदगल, नागपूर सुधार प्रन्यास सभापती डॉ. दिपक म्हैसेकर, माजी महापौर प्रवीण दटके, माजी सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, सहसंयोजक व क्रीडा समिती सभापती नागेश सहारे,सहसंयोजक व शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, धरमपेठ झोन सभापती रूपा रॉय, महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, प्रभागाचे नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेविका उज्वला शर्मा, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाचे रामभाऊ खांडवे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, माजी स्थायी समिती अध्यक्ष सुधीर राऊत, नगरसेविका पल्लवी शामकुळे, सीमा कडू, प्रजापती ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या रजनी दिदी, एनसीसीचे ग्रुप कमांडर राणा, उपायुक्त रविंद्र देवतळे, जयंत दांडेगावकर, डॉ. रंजना लाडे यांचेसह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार माजी सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी यांनी केले.
 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून योग दिन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. सर्वप्रथम ना. नितीन गडकरी आणि ना. चंद्रशेखर बावनकुळे यांचा शाल,श्रीफळ, तुळशीचे रोपटे व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी योगवंदना झाली.यानंतर जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या चमूने आंतरराष्ट्रीय योगा दिनासाठी ठरवून देण्यात आलेल्या प्रोटोकॉलनुसार योगासनांची प्रात्यक्षिके केली. मंचावर असलेली युवक-युवतींची चमू आणि मंचासमोर असलेला हजारोंचा जनसमुदाय एकामागून एक योगासने करीत होता. प्रार्थनेनंतर शिथिलीकरण अभ्यास आणि त्यानंतर योगासने झाली. उभ्या आसनांमध्ये ताडासन, वृक्षासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोणासन आणि बसलेल्या आसनांमध्ये भद्रासन, वज्रासन/वीरासन, अर्ध उष्ट्रासन, उष्ट्रासन, उत्तानमंडूकासन,मरीच्यासन/वक्रासन, पोटाच्या आधारावर केल्या जाणारी आसने मकरासन, भुजंगासन,शलभासन, प्राणायाम आदींचे प्रात्यक्षिक करण्यात आले. त्यानंतर ध्यान, संकल्प आणि शांतीपाठ योगसाधकांनी केला.
 
गल्लोगल्ली योगाचा प्रसार करा : गडकरी
 
योग ही साधना आहे. समाजस्वास्थ सुदृढ ठेवण्यासाठी योग उपयुक्त आहे. या कार्यक्रमातून प्रेरणा घेऊन वर्षभर आपल्या वॉर्डात, मोहल्ल्यात, घरोघरी योगाचा प्रसार करा. यामुळे सामान्य लोकांचे स्वास्थ चांगले राहील. ही आता एक चळवळ बनली असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
 
योगसाधकांनी घेतली स्वच्छतेची शपथ
 
योग दिनाच्या निमित्ताने यशवंत स्टेडियम येथे एकत्रित येणाऱ्या नागपूरकरांसमोर ‘स्वच्छ भारत अभियाना’मधील उपक्रमाची माहिती देण्यात आली. ओला आणि सुका कचरा वर्गीकृत करूनच मनपाच्या स्वच्छता यंत्रणेकडे सोपविण्यात यावा, यासाठी मनपाने जनजागृती सुरू केली. याचाच एक भाग म्हणून नागरिकांना यासंदर्भातील ‘स्वच्छतेची शपथ’ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी योगसाधकांना दिली.
 
चित्तथरारक प्रात्यक्षिके
 
विश्व योग दिनाच्या आयोजनात जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, आर्ट ऑफ लिव्हिंग, मैत्री परिवार संस्था, क्रीडा भारती, भारतीय वायुसेना (एनसीसी), रामचंद्र मिशन, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, नागपूर जिल्हा योग असोशिएशन, नागपूर जिल्हा क्रीडा असोसिएशन, गायत्री परिवार, इशा फाऊंडेशन, सहजयोग ध्यान केंद्र, यांच्यासह विविध संस्थांचा सहभाग होता. जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या चमूने योग दिनानिमित्त करावयाची योगासनांची प्रात्यक्षिके करून दाखविली. नागपूर जिल्हा योग असोशिएशन,युनीटी स्पोर्टस्‌च्या बालकांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली.यानंतर आर्ट ऑफ लिवींग, सहजयोग ध्यान केंद्र आदींच्या पदाधिकाऱ्यांनी योग, ध्यान आदींची प्रात्यक्षिके सादर केली.
 
पांढऱ्या रंगाने व्यापले स्टेडियम
 
विश्व योग दिनाच्या निमित्ताने स्टेडियममध्ये एकत्रित होणाऱ्या साधकांना धवल वस्त्र परिधान करून येण्याचे आवाहन नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आले होते. त्यानुसार हजारोंच्या संख्येत धवल वस्त्र परिधान करून आलेल्या साधकांमुळे स्टेडियम पांढऱ्या रंगाने व्यापले होते. पांढऱ्या परिधानावर भगव्या रंगाचा दुपट्टा यामुळे वेगळीच शोभा स्टेडियमला आली होती. 

 

 

*गांभीर्याने करा ‘स्वच्छ भारत’ची अंमलबजावणी*

*आयुक्तांनी सहायक आयुक्तांना खडसावले*
 
*नागपूर, ता. २०* : ‘स्वच्छ भारत’ अभियान हे केंद्र शासनाचे महत्त्वाकांक्षी अभियान आहे. नागपूर शहर यात मागे पडले याचाच अर्थ अधिकारी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडत नाही, हे स्पष्ट आहे. ‘स्वच्छ भारत’ अभियानांतर्गत असलेल्या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत गांभीर्य बाळगा अन्यथा शिस्तभंगाच्या कारवाईला तयार राहा, अशा शब्दात आयुक्तांनी आज सहायक आयुक्तांना खडसावले.
 
मनपाच्या सर्वसाधारण सभेनंतर आयुक्तांनी राजे रघुजी नगर भवन येथेच सहायक आयुक्तांची तातडीची बैठक घेतली. ‘स्वच्छ भारत अभियानातील मनपाचे कार्य’ हाच या बैठकीचा विषय होता. या अभियानाच्या पहिल्या टप्प्यात शहरात उघड्यावर शौच करणाऱ्यांवर कारवाई करून शहराला स्वच्छ करण्याच्या दृष्टीने पाऊल टाकायचे होते. यात सहायक आयुक्तांच्या नेतृत्वात झोननिहाय ‘गुड मॉर्निंग पथक’ तयार करण्यात आले. या पथकाद्वारे शहरात अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आली. नंतर अशा व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही आयुक्तांनी दिले. त्यानुसार काही गुन्हेही दाखल करण्यात आले. मात्र, या मोहिमेतील कारवाई ही दखल घेण्याजोगी नव्हती, असे दिसून आल्याचे आयुक्तांनी म्हटले.
 
दुसऱ्या टप्प्यात ५ जून २०१७ पासून ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण निर्मितीस्थळापासूनच करण्याची मोहीम सुरू करण्यात आली. यात जनजागृतीचे कार्यक्रमही घेण्यात आले. ओला कचऱ्यासाठी हिरवी कचरापेटी आणि सुका कचऱ्यासाठी निळी कचरापेटीचे वाटप करणे सुरू झाले. मनपातर्फे नागपूरकरांना ज्यांना शक्य असेल त्यांनी स्वखर्चाने कचरापेटी खरेदी करण्याचे आवाहनही करण्यात आले. मात्र, या मोहिमेतदेखिल अधिकाऱ्यांचा सहभाग पाहिजे तसा दिसत नसल्याचे निदर्शनास आले, असेही आयुक्त अश्विन मुदगल यांनी म्हटले. जर असेच सुरू राहिले तर अभियानाच्या उद्देशाला हरताळ फासला जाईल, असे म्हणत आता तरी ‘स्वच्छ भारत अभियाना’ला गांभीर्याने घ्या, अन्यथा शिस्तभंगाच्या कारवाईसाठी तयार राहा, असा इशाराचा आयुक्त मुदगल यांनी दिला.
 
नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक
 
ओला आणि सुका कचरा वर्गीकरणाची मोहिमेचा उद्देश अत्यंत चांगला आहे. ज्या-ज्या ठिकाणी मनपाचे अधिकारी-कर्मचारी पोहोचले तेथे नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावत नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे आयुक्तांनी सांगितले. कारण कुठलीही मोहीम ही लोकसहभागाशिवाय शक्य नाही. मात्र, त्याच्या जोडीला अधिकाऱ्यांची सकारात्मक मानसिकताही आवश्यक असल्याचे ते म्हणाले.   

 

 

 

योग दिनाची तयारी अंतिम टप्प्यात

महापौरांसह मनपा पदाधिकाऱ्यांनी केली कार्यक्रमस्थळाची पाहणी
 
नागपूर, ता. २० : विश्व योग दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे २१ जून रोजी यशवंत स्टेडियम येथे सकाळी ५.४५ वाजता आयोजित कार्यक्रमाच्या अंतिम तयारीचा आढावा घेण्यासाठी महापौर नंदा जिचकार यांनी कार्यक्रमस्थळाला भेट दिली आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.
यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, महिला व बालकल्याण सभापती वर्षा ठाकरे, स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, धरमपेठ झोन सभापती रूपा रॉय, लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, नगरसेवक प्रमोद तभाने, नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेवक प्रमोद कौरती, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर आदी उपस्थित होते.
 
यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी सर्व पदाधिकाऱ्यांसह संपूर्ण व्यवस्थेची पाहणी केली. मोबाईल शौचालय, पार्किंगची व्यवस्था, व्यासपीठाची व्यवस्था, योगा करण्यासाठी क्रीडांगणावर टाकलेल्या मॅटची व्यवस्था त्यांनी बघितली. स्टेडियममध्ये प्रवेशासाठी असलेल्या प्रवेशद्वारासंदर्भातील माहिती घेतली आणि आवश्यक ते निर्देश अधिकाऱ्यांना दिले. योगदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात नागपूरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले आहे.
 
स्टेडियममधील प्रवेशाची व्यवस्था
योग दिनाकरिता हजारोंच्या संख्येने नागरिक यशवंत स्टेडियम येथे एकत्रित येणार आहेत. यासाठी त्यांच्या प्रवेशाची व्यवस्था पुढीलप्रमाणे राहील. स्टेडियमच्या गेट क्र. ६,७, १० आणि ११ मधून सर्व नागरिकांना प्रवेश राहील. गेट क्र. १४ आणि १५ मधून सर्व नगरसेवकांना प्रवेश राहील. मेन गेट १ व २ मधून योगाभ्यासी मंडळ आणि योग संस्थांच्या पदाधिकारी आणि सदस्यांना प्रवेश तर विशिष्ट आणि अतिविशिष्ट व्यक्तींच्या प्रवेशासाठी गेट क्र. १२ राखीव राहील.
ना. गडकरी, ना. बावनकुळे यांची उपस्थिती
 
२१ जून रोजी सकाळी ५.४५ वाजता आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तर विशेष अतिथी म्हणून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार राहतील. खासदार सर्वश्री अजय संचेती, डॉ. विकास महात्मे, जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, आमदार अनिल सोले, आ. नागो गाणार, आ. जोगेंद्र कवाडे, आ. गिरीश व्यास, आ. प्रकाश गजभिये, आ. सुधाकर देशमुख, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. सुधाकर कोहळे, आ. डॉ. मिलिंद माने, मनपा सत्तापक्ष नेता संदीप जोशी, विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, बसपा पक्ष नेता मो. जमाल, राकाँचे पक्षनेते दुनेश्वर पेठे, विभागीय आयुक्त अनुपकुमार, पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, मनपा आयुक्त अश्विन मुदगल, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, नासुप्रचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी कादंबरी भगत यांच्यासह मनपाचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित राहतील.

   

  

 

 

ना-हरकत प्रमाणपत्र घेणे आता बंधनकारक : सभापती संजय बालपांडे

अग्निशमन विभागाच्या बैठकीत दिले निर्देश
 
नागपूर,१६ : शहरातील १५० चौ. मीटरपेक्षा अधिक बांधकाम असलेल्या व्यवसायिक प्रतिष्ठान, संस्थांना आता अग्निशमन विभागाचे ना-हरकरत, परिपूर्णता प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असेल. दोन्ही प्रमाणपत्र नसल्यास संबंधित संस्था किंवा प्रतिष्ठानांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अग्निशमन समिती सभापती संजय बालपांडे यांनी दिला आहे.
 
अग्निशमन समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, उपसभापती प्रमोद चिखले,   समिती सदस्य विरेंद्र (विक्की कुकरेजा), लहूकुमार बेहते, राजकुमार साहू, वनिता दांडेकर, सहायक आय़ुक्त महेश धामेचा, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, सहायक विभागीय अग्निशमन अधिकारी बी.पी.चंदनखेडे प्रामुख्याने उपस्थित होते.
          
व्यवसायिक हेतुसाठी १५० चौ. मीटरच्यावर बांधकाम असेल आणि रहिवासी इमारत जर १५ मीटरपेक्षा उंच असेल तर अग्निशमन विभागाचे ना-हरकरत प्रमाणपत्र, परिपूर्णता प्रमाणपत्र, सूचना पत्र या प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. ज्या संस्थांनी, व्यवसायिकांनी रहिवासी इमारतीचे ना-हरकत प्रमाणपत्र घेतले आहे मात्र, त्याचा वापर व्यवसायाकरिता करण्यात येत आहे अशा सर्व व्यावसायिकांना नोटीस पाठवून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश सभापतींनी दिले. अग्निशमनचे प्रशिक्षण घेणाऱ्यांना त्यांच्या पात्रतेनुसारच भरती करण्यात यावी, त्याचप्रमाणे मान्यताप्राप्त संस्थेचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थांनाच भरती करण्यात यावे, असा ठराव समितीने पारित केला. प्रशासनाने हा ठराव शासनाकडे पाठवावा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
          
यानंतर नाहरकत प्रमाणपत्र, सूचनापत्र, परिपूर्णता प्रमाणपत्र निर्गमित करण्यापूर्वी समितीला विचारात घ्यावे, कोणत्याही प्रमाणपत्रावर कार्यवाही झाल्यास त्याचा अहवाल समितीला सादर करावा, असेही आदेश त्यांनी यावेळी दिले. ज्या इमारतीला अग्निशमन प्रतिबंधात्मक योजना लावण्यात आली नाही त्याची यादी तयार करून स्टेशन अधिकाऱ्यामार्फत समितीला सादर करावी असे आदेश त्यांनी दिले.
          
बैठकीला अग्निशमन सर्व स्थानकाचे स्थानाधिकारी उपस्थित होते.   

 

 

 

विश्व योग दिन कार्यक्रमात योगप्रेमी संस्थांनी जास्तीत-जास्त संख्येत सहभागी व्हावे – महापौर नंदा जिचकार

विश्व योग दिवस कार्यक्रमाची आढावा बैठक
 
नागपूर, ता. 15 जूनः जगभरात 21 जून विश्व योग दिवस म्हणून साजरा करण्यात येतो, ही प्रत्येक भारतीयासाठी गर्वाची बाब आहे. या विश्व योग दिवसानिमित्त नागपूरात आयोजित कार्यक्रमाला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला होता. मनपातर्फे यंदाही यशवंत स्डेयिम धंतोली येथे सकाळी 6 वाजता कार्यक्रमाचे आय़ोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शहरात योगाचा प्रचार प्रसार करणा-या विविध संस्थांनी आपल्या स्वयंसेवकांसोबत मोठ्या संख्येत सहभाग नोंदवावा असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले. गुरुवारी मनपा मुख्यालय सिव्हील लाईन्स येथे विश्व योग दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी योग संस्थांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीत उपमहापौर व योग दिवस निमित्त आयोजित कार्यक्रमाचे संयोजक दीपराज पार्डीकर, प्रतोद दिव्या धुरडे, माजी महापौर प्रवीण दटके, ज्येष्ठ सदस्य दयाशंकर तिवारी, जेष्ठ सदस्य सुनिल अग्रवाल, आरोग्य विशेष समिती सभापती मनोज चापले, स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती संजय बंगाले, क्रीडा विशेष समिती सभापती व कार्यक्रमाचे सहसंयोजक नागेश सहारे, शिक्षण समिती सभापती व कार्यक्रमाचे सहसंयोजक दिलीप दिवे, महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे,  धरमपेठ झोन सभापती रुपा राय, नगरसेविका उज्वला शर्मा, नगरसेवक सुनिल हिरणवार, नगरसेविका जीसन मुमताज, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, सहायक आयुक्त महेश मोरोने, सहायक आय़ुक्त महेश धमेचा यांच्यासह विविध योग प्रेमी संस्थांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.
 
यावेळी माजी सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी म्हणाले, “योगाच्या प्रचार प्रसारासाठी शहरात कार्यरत योग प्रेमी संस्थांनी सहभागी व्हावे, शहरातील प्रत्येक नागरिकाने या उपक्रमात भाग घ्यावा यासाठी प्रयत्न करावे” तसेच योगप्रेमींनी कार्यक्रमाला येताना शुभ्र रंगांचे कपडे नेसावे असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. बैठकीत जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, आर्ट ऑफ लिव्हिंग, ब्रम्हकुमारीज, नागपूर जिल्हा योग संघटना, रामचंद्र मिशन, श्रीयोग साधना केंद्र, सहज योग ध्यान केंद्र, इशा फाऊंडेशन यांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.
 
नागरिकांसाठी बसेसची सुविधा
 
जागतिक योग दिनानिमित्त यशवंत स्डेयिम येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी होणा-या नागरिकांसाठी बसेसची व्यवस्था करण्यात येणार असून नागरिकांना सशुल्क या सेवेचा लाभ घेता येईल. तसेच विविध संस्थांना त्यांच्या स्वयंसेवकांसाठी विशेष बसेसची गरज असल्यास ती देखिल मनपातर्फे पुरविण्यात येणार असून संस्थांनी 9423679081, 9422834520 या परिवहन विभागाच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून यादी दिल्यास बसेसची व्यवस्था करण्यात येणार आहे.

 

 

कच-यावर प्रक्रीया ही काळाची गरज – महापौर नंदा जिचकार

महिला व बालकल्याण समितीतर्फे “जैविक खत निर्मिती” कार्यशाळेचे आयोजन
 
नागपूर, ता. 15 जूनः कचरा ही राष्ट्रीय संपत्ती आहे, कच-यावर प्रक्रीया केल्यास त्याचे संपत्तीत रुपांतर होऊ शकते. याचे वर्गीकरण करुन योग्य विल्हेवाट लावल्यास ओल्या कच-यापासून जैविक खत निर्मिती आणि सुका कच-याचे पूनर्वापर करता येऊ शकतो. फक्त याबद्दलची माहिती जाणून घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले. महिला व बालकल्याण समितीतर्फे गुरुवारी (ता. 15 जून) महिला बचतगटांसाठी आयोजित “जैविक खत कसे तयार करतात या विषयावर आयोजित कार्यशाळेत त्या बोलत होत्या. कार्यशाळेत प्रामुख्याने समिती सभापती वर्षा ठाकरे, उपसभापती श्रद्धा पाठक, नगरसेविका व समिती सदस्या दिव्या धुरडे, वंदना भगत, साक्षी राऊत, जिशान मुमताज. वैशाली नारनवरे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उद्यान अधिक्षक सुधिर माटे यांची उपस्थिती होती. कार्यशाळेत कल्पतरु महिला औद्योगिक सह. संस्था आणि व्हीबीएल ऍग्रीकल्चर रिसर्च ऍन्ड हेल्थ ऑर्गनाएझेशनच्या संगीता सवालाखे यांनी सादरीकरणाद्वारे विघटनशील कचरा जाळून टाकण्यापेक्षा बायोडायनॅमिक पद्धत वापरुन त्यापासून चांगल्या प्रतिचे कंपोस्ट खत तयार करता येऊ शकते. याबाबत बचतगटाच्या महिलांना मार्गदर्शन केले.  कार्यशाळेची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रावर माल्यार्पण करुन झाली. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्रस्ताविक भाषण सभापती वर्षा ठाकरे म्हणाल्या, “सध्यास्थितीमध्ये होत असलेले वातावरण बदल आणि दिवसेंदिवस वाढते तापमान ही अतिशय चिंतेची बाब आहे. तसेच कचरा ही देखिल शहरापुढे मोठी समस्या आहे. मात्र ओल्या कच-यापासून जैविक खत निर्मिती करणे हा उद्योग अत्यंत कमी खर्चात सुरु करता येतो. याचा लाभ बचत गटांनी घेऊन कच-याची समस्या ही सोडविता येईल, तसेच एक उद्योग निर्मिती सुद्धा करता येईल ” असे सांगितले. यावेळी व्हीबीएल ऍग्रीकल्चर रिसर्च ऍन्ड हेल्थ ऑर्गनाएझेशनच्या प्रशिक्षीकांनी महिलांना प्रात्याक्षिकाद्वारे सविस्तर प्रशिक्षण दिले. यावेळी जैविक खत निर्मितीच्या प्रक्रियेबद्दलची माहिती देणारी पत्रकेही वाटण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन उपसभापती श्रद्धा पाठक यांनी केले.

 

 

महापौरांनी घेतला योग दिन तयारीचा आढावा

यशवंत स्टेडियमची केली पाहणी : तयारीवर लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश
 
नागपूर, ता. ७ : जागतिक योग दिनानिमित्त २१ जून रोजी यशवंत स्टेडियम येथे आयोजित कार्यक्रमाची तयारी वेळेच्या आत पूर्ण करा. कुठलीही कमतरता भासणार नाही याची काळजी घ्या. आयोजन संस्मरणीय ठरावे यादृष्टीने सर्व संबंधितांनी आपल्या जबाबदाऱ्या योग्यरितीने पार पाडा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
 
जागतिक योग दिनाच्या तयारीचा आढावा घेण्याच्या दृष्टीने महापौर नंदा जिचकार यांनी बुधवार ता. १४ जून रोजी सकाळी यशवंत स्टेडियमची पाहणी केली. याप्रसंगी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करीत त्यांनी सदर निर्देश दिले. यावेळी स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती संजय बंगाले, धरमपेठ झोन सभापती रूपा रॉय, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, ज्येष्ठ नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी. जांभुळकर, उद्यान अधीक्षक सुधीर माटे, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ. विजय जोशी, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे, क्रीडा विभागाचे नरेश चौधरी, पोलिस विभागातर्फे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सरोदे आदी उपस्थित होते.
 
महापौर नंदा जिचकार यांनी कार्यक्रम आयोजनातील सर्व व्यवस्थांचा आढावा स्टेडियमवर घेतला. व्यासपीठ कसे राहील, पाण्याची व्यवस्था, मोबाईल टॉयलेटची व्यवस्था, विद्युत व्यवस्था, योग दिनाकरिता येणाऱ्या नागरिकांना ज्या द्वारातून प्रवेश देण्यात येणार आहे, त्या द्वारांची पाहणी केली. कार्यक्रमाच्या आधी संपूर्ण स्टेडियमच्या आतील आणि बाहेरील परिसरातील स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले. कार्यक्रमानंतर स्टेडियम तातडीने स्वच्छ करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. योगदिनाची माहिती नागपुरातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी माध्यमांची मदत कशा प्रकारे घेता येईल, इतर माध्यमांना यात कशा प्रकारे सामावून घेता येईल, याबाबतही त्यांनी चर्चा केली.  
 
योगदिनाच्या निमित्ताने कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था कशी राहील, याबाबत सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सरोदे यांनी माहिती दिली. एकंदरच संपूर्ण कार्यक्रमादरम्यान कुठलीही अव्यवस्था होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश महापौरांनी दिले. नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित योग दिन कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही महापौर नंदा जिचकार यांनी केले.

 

 

योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणा-या संस्थेंची बैठक आज

नागपूर,१४. जागितक योग दिनानिमित्त २१ जुन रोजी यशवंत स्टेडियम येथे आयोजित कार्यक्रमात सहभागी होणा-या स्वयंसेवी संस्थेची बैठक गुरूवारी दिनांक १५ ला नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात होणार आहे. या बैठकीला महापौर नंदा जिचकार या प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.
          
नागपूर महानगरपालिकेद्वारे योग दिनानिमित्त घेण्यात येणा-या कार्यक्रमात शहरातील स्वयंसेवी संघटनांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.

 

 

योगदिनासाठी मनपातर्फे जय्यत तयारी

महापौरांनी घेतला तयारीचा आढावा : आयोजन समितीचे गठन
 
नागपूर, ता. १३ : जागतिक योग दिनाच्या निमित्ताने शहरातील योगाभ्यासी मंडळ व विविध संस्थांच्या सहकार्याने नागपूर महानगरपालिकेतर्फे २१ जून रोजी योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आयोजनाची जय्यत तयारी मनपातर्फे सुरू आहे. तयारीचा आढावा घेण्यासाठी महापौर नंदा जिचकार आणि आयुक्त अश्विन मुदगल यांनी नुकतीच एक बैठक घेतली. या बैठकीत यशस्वी आयोजनाच्या दृष्टीने जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. सामूहिक प्रयत्नातून योग दिनाचे आयोजन अविस्मरणीय करण्याचे आवाहन महापौरांनी यावेळी केले.
 
बैठकीला महापौर आणि आयुक्तांसह ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, शिक्षण सभापती दिलीप दिवे, महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, धरमपेठ झोन सभापती रूपा रॉय, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, नगरसेवक सुनील हिरणवार, अतिरिक्त आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे, उपायुक्त रवींद्र देवतळे, डॉ. रंजना लाडे, निगम सचिव हरिश दुबे, प्रमुख लेखा व वित्त अधिकारी मदन गाडगे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, डॉ. विजय जोशी, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांच्यासह सर्व झोनचे सहायक आयुक्त उपस्थित होते.
 
प्रारंभी महापौर नंदा जिचकार यांनी योग दिन आयोजनासंदर्भातील माहिती दिली. त्या म्हणाल्या, नागपूर शहरातील विविध योगाभ्यासी मंडळाचे आयोजनात सहकार्य लाभत आहे. परंतु आयोजक म्हणून मनपाची जबाबदारी मोठी आहे. मनपातील पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्यानेच आयोजनाची यशस्वीता शक्य आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने आपआपली जबाबदारी योग्यरीत्या आणि प्रामाणिकपणे पार पाडावी, असे आवाहनही यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी केले.
 
आयुक्त अश्विन मुदगल यांनी कार्यक्रमाच्या अगोदर आणि नंतरच्या स्वच्छतेवर भर दिला. त्यासंदर्भातील निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. योग दिनाच्या निमित्ताने नागपूर शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात एकत्रित येणार आहेत. हे निमित्त साधून मनपातर्फे सुरू असलेल्या योजनांची जनजागृती करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
 
आयोजन समितीचे गठन
जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी व्हावे यासाठी पदाधिकारी व अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक समन्वय समिती तयार करण्यात आली असून महापौर नंदा जिचकार यांनी समितीची घोषणा केली. समितीचे संयोजक उपमहापौर दीपराज पार्डीकर असून क्रीडा सभापती नागेश सहारे आणि शिक्षण सभापती दिलीप दिवे सहसंयोजक आहेत. इतर सदस्यांमध्ये स्थापत्य सभापती संजय बंगाले, महिला व बालकल्याण सभापती वर्षा ठाकरे, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, सुनील अग्रवाल, रूपा रॉय, उज्ज्वला शर्मा, सुनील हिरणवार, उपायुक्त रवींद्र देवतळे आणि डॉ. रंजना लाडे यांच्यासह सहभागी योग मंडळांतील प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे.
 
स्वच्छतेची सामूहिक शपथ
योग दिनाच्या निमित्ताने हजारो नागपूरकर यशवंत स्टेडियम येथे २१ जून रोजी एकत्रित येणार आहेत. यानिमित्ताने स्वच्छ भारत अभियानांतर्गत ५ जूनपासून सुरू करण्यात आलेल्या ओला आणि सुका कचरा वर्गीकरणासंदर्भातील माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने यावेळी माहिती देण्यात येईल. उपस्थित जनसमुदायाला मनपातर्फे स्वच्छतेची शपथ देण्यात येईल.
 
मुख्यमंत्री फडणवीस, ना. गडकरी यांची उपस्थिती
जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मनपातर्फे विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.
 
योग मंडळांचा सहभाग
सदर आयोजनात सहजयोग ध्यान केंद्र, स्वाभिमान ट्रस्ट, रामचंद्र मिशन, क्रीडा भारती, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, आर्ट ऑफ लिव्हिंग, पतंजली, एनसीसी, भारतीय वायुसेना, आरपीटीसी, गायत्री परिवार, प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, मैत्री परिवार यांच्यासह विविध संस्थांचे सहकार्य लाभत आहे.
 
‘व्हाईट’ ड्रेस कोड
योग दिनाच्या निमित्ताने यशवंत स्टेडियम येथे आयोजित कार्यक्रमात ‘व्हाईट’ ड्रेस कोड राहणार आहे. सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने श्वेत रंगाचे वस्त्र परिधान करावे, असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

फ्लाय ॲशच्या पुनर्वापरासाठी मनपाचे सर्वतोपरी सहकार्य : डॉ. रामनाथ सोनवणे

फ्लाय ॲश पुनर्वापर प्रक्रियेवर कार्यशाळा
 
नागपूर,ता. १३ : फ्लाय ॲशच्या पुनर्वापर प्रक्रियेसाठी नागपूर महानगरपालिका सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन डॉ. रामनाथ सोनवणे यांनी दिले. महाजेम्स आणि नागपूर महानगरपालिकेच्या वतीने उद्योग भवनातील एमआयडीसीच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये फ्लाय ॲश पुनर्वापर प्रक्रिया या विषयावर आयोजित कार्यशाळेच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते.
व्यासपीठावर महाजेम्सचे संचालक सुधीर पालीवाल, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी राहुल वानखेडे, डीआयसीचे संयुक्त संचालक ए.पी.धर्माधिकारी, ऊर्जामंत्री यांचे तांत्रिकी सल्लागार शेखर अमीन आदी उपस्थित होते.
          
पुढे बोलताना सोनवणे म्हणाले, नागपूर महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या सर्व सीमेंट रस्त्यांच्या कामात यानंतर फ्लाय ॲशचा वापर करण्यात येईल. मनपाच्या नगररचना विभागाद्वारा शहरातील कोणत्याही बांधकामाला मंजुरी देताना फ्लाय ॲशचा वापर हा बंधनकारक असेल. सन ९१-९२ च्या काळात ‘पॉवर कट’चा सामना करावा लागला होता. त्यानंतर ऊर्जानिर्मितीच्या दृष्टिकोनातून कार्य करताना धोरणात्मक निर्णय शासनाला घ्यावे लागले. ऊर्जानिर्मितीवर कार्य करणाऱ्या संस्था पुढे आल्या होत्या. कोळशापासून ऊर्जानिर्मिती करताना त्यातून ४० टक्के फ्लाय ॲश तयार होते. २००५ मध्ये या ॲशचा वापर करण्यात यावा, असा शासनाने विचार केला होता. त्यावर अंमलबजावणी करत सन २००७-०८ मध्ये महाराष्ट्र सरकारने बांधकामासाठी फ्लॉय ॲशचा वापर बंधनकारक केला. या फ्लाय ॲशपासून ऊर्जानिर्मितीसोबतच वाळू तयार करण्याचेही धोरण शासनाने आखले असून यामुळे नद्यांमधून वाळूचा उपसा कमी होईल आणि वाळुचे दर कमी होतील. वाळूच्या दरापाठोपाठ बांधकामाचे जे दर वाढले आहे, तेसुद्धा कमी होतील. फ्लाय ॲश पुनर्वापर प्रक्रियेत नागपूर शहर हे देशातील प्रथम क्रमांकावर आहे, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
 
यावेळी बोलताना प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी राहुल वानखेडे म्हणाले, मागील दोन वर्षांपासून फ्लाय ॲश संदर्भातील तक्रारी सातत्याने येत होत्या. आता फ्लाय ॲश पुनर्वापरासाठी जणू स्पर्धाच लागली आहे. या ॲशपासून विटा बनविण्यात येत असून हायवेवरील सीमेंटच्या रस्त्यांसाठीही ॲशचा वापर करता येतो. यापुढेही फ्लाय ॲशपासून विविध वस्तू तयार करण्यासाठी तसेच पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने लागेल ती मदत करण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
डीआयसीचे संयुक्त संचालक ए.पी. धर्माधिकारी यांनी केंद्र शासनाच्या योजनेअतंर्गत फ्लाय ॲशच्या पुनर्वापरासाठी काय सखोल प्रयत्न करता येईल याचा विचार सुरू असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे विदर्भ आणि मराठवाडा येथील उद्योगधंद्यांना चालना मिळावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. सद्यस्थितीत महाराष्ट्रात वर्षाकाठी ८० लाख टन फ्लाय ॲश तयार होत आहे. या कार्यशाळेतून ॲशच्या पुनर्वापराबद्दल त्यापुढे जाऊन विचार केला जाईल, असेही ते म्हणाले.
          
नागपूर महानगरपालिका आणि महाजनको ॲश मॅनेजमेंट सर्विसेस लिमिटेड यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार आता या दोन्ही संस्था फ्लाय ॲश वापरासंदर्भात सोबत काम करणार आहे. त्याच्या प्रसारासाठी सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
          
या कार्यशाळेत ‘महाराष्ट्र स्टेट ॲश पॉलिसी’ याविषयावर सुधीर पालीवाल, ‘प्रॅक्टीकल ॲप्लीकेशन ऑफ युटीलॉझेन्स ऑफ फ्लाय ॲश इन रोड कन्सट्रक्शन ॲण्ड सॉईल स्टॅबीलॉयझेशन’ या विषयावर ए.एम सिंगारे, ‘यूज ऑफ जियोसिंथेटिक क्ले लायनर्स इन लायनिंग ॲप्लिकेशन्स इन सिव्हील कन्स्ट्रक्शन’ या विषयावर अमित बारटक्के यांचे व्याखाने झालीत.
 
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. प्रास्ताविक महाजेम्सचे संचालक सुधीर पालीवाल यांनी केले. संचालन व आभारप्रदर्शन मिलिंद रहाटगावकर यांनी केले.
          
कार्यक्रमाला नागपूर महानगरपालिकेचे अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, दिलीप जामगडे, कार्यकारी अभियंता प्रशांत देशपांडे, नगररचना विभागाचे अधिकारी, महाजेम्स आणि महाजनकोचे अधिकारी उपस्थित होते.

 

 

विधी विशेष समितीच्या बैठकीत घेतला कार्याचा आढावा

नागपूर, ता. १२ : महानगरपालिकेशी संबंधित न्यायालयात असलेली प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर कशी मार्गी लागतील याकडे विशेष लक्ष देत समिती सदस्य आणि अधिकारी यांच्या समन्वयातून कामाला गती देऊ, असे प्रतिपादन मनपा विधी विशेष समितीच्या सभापती ॲड. मिनाक्षी तेलगोटे यांनी केले.
विधी विशेष समितीच्या पहिल्या आढावा बैठकीचे आयोजन सोमवार १२ जून रोजी मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात करण्यात आले होते. त्यात त्या बोलत होत्या. बैठकीला समितीच्या उपसभापती विशाखा मोहोड, समिती सदस्य महेश महाजन, अमर बागडे, श्रीमती अभिरुची राजगिरे, समिता चकोले, हर्षला साबळे, जितेंद्र घोडेस्वार यांच्यासह सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा, व्यवहार व न्याअभियोक्ता व्यंकटेश कपले, प्रकाश बरडे, सहायक अधिकारी श्री. पाचोरे उपस्थित होते.
 
यावेळी न्यायअभियोक्ता व्यंकटेश कपले यांनी विधी समितीच्या कामकाजाविषयीची सविस्तर माहिती दिली. सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयात, जिल्हा न्यायालयात महापालिकेशी संबंधित किती प्रकरणे प्रलंबित आहेत, विधी विभागाच्या पॅनलवर कोण-कोण आहेत याबाबत सविस्तर सांगितले. सहायक आयुक्त महेश धामेचा यांनी विधी समितीवर नियुक्त नवनिर्वाचित सदस्यांचे अभिनंदन केले. विधी समितीअंतर्गत चालणाऱ्या कामाकाजाची माहिती त्यांनी करवून दिली. यावर सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली.
 
सभापती ॲड. मिनाक्षी तेलगोटे यांनी समितीच्या कामकाजाची माहिती जाणून घेतल्यानंतर प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर कशी मार्गी लावता येतील, याबाबत चर्चा करून त्या दिशेने कार्य करू, असे सांगितले.

 

 

‘फ्लाय ॲश वापरा’वर आज कार्यशाळा

नागपूर, ता. १२ : महाराष्ट्र शासनाने फ्लाय ॲश संदर्भात तयार केलेल्या पॉलिसीची परिणामकारकरीत्या अंमलबजावणी आणि त्याच्या प्रचार-प्रसारासाठी नागपूर महानगरपालिका, महाजनको ॲश मॅनेजमेंट सर्विसेस लिमिटेड, सेटको (CETCO) आणि जिओ-टेक यांच्या वतीने उद्या १३ जून रोजी दुपारी ३ वाजता सिव्हील लाईन उद्योग भवनातील पहिल्या माळ्यावरील एमआयडीसीच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
 
नागपूर महानगरपालिका आणि महाजनको ॲश मॅनेजमेंट सर्विसेस लिमिटेड यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार आता या दोन्ही संस्था फ्लाय ॲश वापरासंदर्भात सोबत काम करणार आहे. त्याच्या प्रसारासाठी सदर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. मनपा आयुक्त अश्विन मुदगल, अतिरिक्त आयुक्त डॉ. रामनाथ सोनवणे कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. संयुक्त संचालक (उद्योग) जिल्हा उद्योग केंद्र ए.पी. धर्माधिकारी यांची विशेष उपस्थिती राहील. एमआयडीसीचे विभागीय अधिकारी जगदीश संगीतराव, एमआयडीसीचे मुख्य अभियंता एस. आर. वाघ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण नमंडळाचे विभागीय अधिकारी राहूल वानखेडे यांचीही यावेळी उपस्थिती राहील. कार्यशाळेत मनपा, नासुप्र, एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ व क्रेडाईचे प्रतिनिधी सहभागी होतील. महाराष्ट्र राज्य ॲश पॉलिसी डिसेंबर २०१६, रस्ता बांधकामात फ्लाय ॲशचा वापर आदी विषयांवर तज्ज्ञ्र मार्गदर्शन करतील. 

 

 

मनपा तर्फे साने गुरुजी यांना अभिवादन 

नागपूर,ता. ११ : नागपूर महानगरपालिकेद्वारे साने गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.
 
यावेळी धंतोली झोनचे सभापती प्रमोद चिखले, गांधीबाग झोनच्या सभापती सुमेधा देशपांडे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर उपस्थित होते.
शुक्रवारी तलाव येथील चाचा नेहरू बालोद्यानातील साने गुरुजींच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.
याप्रसंगी नरेंद्र घाटे, मोहमद अन्सारी,जितेंद्र वाघ,अतुल माने, प्रकाश जाधव उपस्थित होते.

 

AllVideoShare

अद्ययावत केल्याची दिनांक

मंगलवार 20 फरवरी 2018

अभिप्राय (मत)

म.न.पा. वेब पोर्टल बाबत आपले अभिप्राय?
 

वेब पोर्टलला भेट देणायां बाबत

mod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_countermod_vvisit_counter
mod_vvisit_counterआज3194
mod_vvisit_counterया महिन्यात57653
mod_vvisit_counterआतापर्यंत7536302

आज : फरव 20, 2018
RizVN Login
प्रकाशनाधिकार © 2018 Nagpur Municipal Corporation. सर्वाधिकार सुरक्षित , Designed by eGovernments Foundation.
Find us on Facebook
Follow Us