Nagpur Municipal Corporation

जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर

 

कौशल्य अद्ययावत करणे काळाची गरज : अश्विन मुदगल

युथ एम्पॉवरमेंट समीटच्या चर्चासत्रात मार्गदर्शन
 
नागपूर,ता.२२ : अर्थव्यवस्थेतील बदलांमुळे नवनव्या क्षेत्रात रोजगार निर्मितीच्या क्षमता वाढत आहे. मात्र, आपली कौशल्ये त्या अनुषंगाने अद्ययावत नाहीत. शिवाय येणार्‍या नवनवीन गोष्टींशी आपण जुळवून घेऊ शकत नाही. त्यामुळे रोजगाराच्या संधींना मुकतो. त्यामुळे आपली कौशल्ये अद्ययावत करीत त्याला आजच्या काळाशी जुळवून घेणे आवश्यक असल्याचे मत मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांनी व्यक्त केले.
 
नागपूर महानगरपालिका समाजकल्याण विभाग आणि फॉर्च्यून फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित ‘युथ एम्पावरमेंट समीट’च्या पहिल्या सत्रात ‘शासकीय योजनांच्या माध्यमातून महापालिकेचे रोजगार निर्मितीमध्ये योगदान’ या विषयावर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, भारत सरकारच्या क्रीडा मंत्रालयाच्या सदस्या राणी दिवेदी उपस्थित होत्या. 
 
पुढे बोलताना श्री. मुदगल म्हणाले, सरकारचे कार्य थेट नोकरी देण्याचे आहे, अशी भावना वाढत आहे. कारण ८०-९० च्या दशकामध्ये पब्लिक सेक्टरद्वारे सर्वाधिक रोजगार उपलब्ध व्हायचा. रेल्वेद्वारे मोठ्या प्रमाणात भरती व्हायची. पण अर्थव्यवस्थेतून नवनवीन सेक्टर निर्माण झाले आणि ते आज खुले झाले आहेत. त्यांचा विचार करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करीत कौशल्य असेल तर रोजगार उपलब्ध होणारच, असेही ते म्हणाले.
 
मेट्रो रेल्वेद्वारे निर्माण होणारे रोजगार याविषयावर बोलताना ब्रिजेश दीक्षित म्हणाले, नागपूर मेट्रोच्या तांत्रिक पदभरतीमध्ये आम्ही स्थानिक भाषेची सक्ती केली आहे. शिवाय मेट्रो रेल्वेला अप्रत्यक्षपणे अनेक गोष्टींची आवश्यकता पडेल. अर्थात ते स्थानिक नागरिकांद्वारेच निर्मित केलेले असेल. त्यामुळे नागपूर मेट्रो प्रकल्पातून स्थानिकांना मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुढे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की मेट्रोच्या परिक्षा दर सहा ते आठ महिन्यात होतीलच. पण नागपूर मेट्रोच्या परिक्षेचा पॅटर्न अभ्यासून मेट्रोला आवश्यक असलेले कौशल्य व त्याच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.  सेवा क्षेत्रातही संधी मिळणार असून नॉन टेक्निकल लोकांनाही बरीच संधी मिळेल, असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी युवकांना यशस्वी जीवनाचे सात मूलमंत्र शिकवले. कार्यक्रमाला नगरसेवक व महानगरपालिकेतील अधिकारी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

 

मनपातील भंगार वस्तूंचा अहवाल सात दिवसात सादर करा

महापौर नंदा जिचकार यांचे निर्देश : विभागनिहाय घेतला आढावा
 
नागपूर,ता.२२. नागपूर महानगरपालिकेतील सर्वच विभागातून निघालेल्या भंगाराचा अहवाल सात दिवसात प्रशासनाकडे सादर करावा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. गुरूवार (ता.२२) मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील सभागृहात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.
 
बैठकीला आयुक्त अश्विन मुदगल, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन विभाग ) महेश धामेचा, स्मिता काळे, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजीव जैस्वाल, उद्यान अधीक्षक धनंजय मेंडूलकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, हिवताप व हत्तीरोग प्रमुख जयश्री थोटे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
यावेळी महापौरांनी मनपातील विविध विभागाच्या भंगाराबद्दल माहिती जाणून घेतली. विद्युत विभागाकडे भंगारात असलेले विद्युत खांब, लाईट्स, स्टार्टर आणि इतर उपकरणे विकण्यात येत असून त्यातून उत्पन्न प्राप्त होते. जे भंगारातील सामान कामात येईल, त्याचा पुनर्वापर देखील करण्यात येत असल्याची माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता संजीव जैस्वाल यांनी दिली. यानंतर उद्यान विभागाची माहिती महापौरांनी घेतली. अंबाझरी उद्यानातील भंगाराची तातडीने विल्हेवाट लावण्यात यावी, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिली.
 
अतिक्रमण विभागाद्वारे जप्त करण्यात आलेल्या भंगाराचा आढावा महापौर व आयुक्तांनी घेतला. जप्त करण्यात आलेल्या भंगाराच्या सामानाची यादी करण्यात आली की नाही, याची पडताळणी करा व त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश आयुक्त अश्विन मुदगल यांनी सहायक आयुक्त महेश धामेचा यांना दिले. झोननिहाय भंगाराचा आढावा घेण्यात आला. जलप्रदाय विभागाचे भंगार इतर सर्वत्र आहे. त्यांनी त्याची यादी करून त्यातून किती उत्पन्न प्राप्त होऊ शकते, याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. मनपाच्या कारखाना विभागाचा, अग्निशमन, शिक्षण विभागातून निघाणाऱ्या भंगाराचा आढावा घेण्यात आला.
 
बैठकीला यावेळी लक्ष्मीनगर झोनच्या सहायक आयुक्त सुवर्णा दखने, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे, हनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे, नेहरूनगर झोनचे सहायक आयुक्त राजेश कराडे, सतरंजीपुरा झोनचे सहायक आय़ुक्त प्रकाश वराडे, लकडगंज झोनचे सहायक आयुक्त सुभाष जयदेव, मंगळवारी झोनचे सहायक आय़ुक्त हरिश राऊत उपस्थित होते.

 

 

विदर्भात रोजगाराची संधी, संधीपर्यंत पोहचा : ना. निलंगेकर

‘युथ एम्पॉवरमेंट समीट’चे उद्‌घाटन : हजारो युवकांची नोंदणी
 
नागपूर,ता.१७ : पूर्वी रोजगाराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबई, पुणे किंवा पश्चिम महाराष्ट्रात जावे लागत होते. रस्ते आणि साधन पूर्वी नसल्याने मराठवाडा, विदर्भात उद्योग नव्हते. आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दळणवळणाच्या सोयी उपलब्ध करून दिल्यात तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’च्या माध्यमातून मोठमोठ्या उद्योगांची गुंतवणूक विदर्भात आणली. संधी चालून आली आहे. फक्त संधीपर्यंत पोहचण्याचे काम युवकांना करायचे आहे. वेळेला महत्त्व द्या आणि थोडा स्वभाव बदला. यश तुमच्या पायाशी लोळण घालेल, असे प्रतिपादन राज्याचे कौशल्य विकास व कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केले.
 
नागपूर महानगरपालिका, जिल्हाधिकारी चंद्रपूर आणि फॉर्च्यून फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात २२ ते २४ फेब्रुवारीदरम्यान ‘युथ एम्पॉवरमेंट समीट’चे आयोजन करण्यात आल आहे. या मेळाव्याच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार अजय संचेती होते. मंचावर खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार सुधाकर देशमुख, आमदार प्रा. अनिल सोले, महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निशा सावरकर, मनपाच्या स्थायी समितीचे सभापती संदीप जाधव, मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जोशी, मनपा आयुक्त अश्विन मुदगल, माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी, राणी द्विवेदी, कौशल्य विकास विभागाचे कुणाल पडोळे, भाजपचे नागपूर ग्रामीण अध्यक्ष राजीव पोतदार, आशीष वांदिले, शुभांगी गायधने उपस्थित होते.
 
पुढे बोलताना ना. संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, पूर्वी सरकारी नोकरी म्हणजेच रोजगार, असे चित्र उभे केले गेले होते. परंतु आता सरकारने स्वयंरोजगाराच्या मोठ्या संधी, त्यासाठी विविध योजना आणि बँक कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे रोजगाराची व्याख्याची बदलली आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीवर शासनाचा भर आहे. तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता मुंबई, दिल्लीला जाण्याची गरज नाही. विकास आणि रोजगार आपल्या पुढ्यात आहे. फक्त आपला स्वभाव बदलवून या संधीपर्यंत पोहचण्याची गरज असल्याचे सांगतानाच, आपली स्वप्न मुलांवर लादू नका, असा सल्ला ना. निलंगेकर यांनी पालकांना दिला.
 
आ. सुधाकर देशमुख म्हणाले, विविध योजनांचे एकत्रीकरण करून युवकांना दिशा देण्याचे कार्य नागपूर महानगरपालिका आणि फॉर्च्यून फाऊंडेशनच्या माध्यमातून अविरत सुरू आहे. युथ एम्पॉवरमेंट समीटच्या माध्यमातून तरुणांना स्वत:च्या पायावर उभे करण्याचे कार्य सुरू असल्याचा गौरवोल्लेख त्यांनी केला.
 
महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, प्रत्येकात काही ना काही कौशल्य आहे. ते फक्त आपल्याला ओळखता आले पाहिजे. ज्यात कौशल्य नाही त्याच्या मागे रोजगारासाठी धावण्यात अर्थ नाही. जे कौशल्य आहे, त्यात करिअर बनविण्याचा विचार करा. त्यासाठी मेहनत करा, हे सांगताना त्यांनी शेफ विष्णू मनोहरसारख्या काही व्यक्तींचे उदाहरण सांगून ही मंडळी आपल्या कौशल्याच्या बळावरच आज आकाशाला गवसणी घालत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
अध्यक्षीय भाषणात खासदार अजय संचेती यांनी युथ एम्पॉवरमेंट समीटचे महत्त्व सांगत अशा समीटच्या माध्यमातून आमदार अनिल सोले यांच्यासारखे व्यक्ती युवा पिढीला दिशा देण्याचे कार्य करीत असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
 
प्रारंभी प्रास्ताविकातून फॉर्च्यून फाऊंडेशनचे अध्यक्ष आमदार प्रा. अनिल सोले यांनी संपूर्ण आयोजनामागची भूमिका विषद केली. मागील चार वर्षांपासून रोजगार देण्याचा हा यज्ञ अविरत सुरू आहे. मागील वर्षी ९०० च्या वर युवकांना विविध कंपन्यांची नियुक्ती पत्रे याच ठिकाणी देण्यात आली. यावर्षी हा आकडा पाच हजारांवर जाण्याचे उद्दिष्ट आपण ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले.
 
तत्पूर्वी सर्व मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून ‘युथ एम्पॉवरमेंट समीट’चे औपचारिक उद्‌घाटन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत कामडे यांनी केले. आभार स्थायी समितीचे सभापती संदीप जाधव यांनी मानले. कार्यक्रमाला युवा वर्गाची मोठ्या संख्येत उपस्थिती होती.
 
‘स्पर्श’ला राज्यस्तरीय सन्मान
 
कार्यक्रमात स्पर्श जनहिताय बहुउद्देशीय संस्थेला राज्यस्तरीय उत्कृष्ठ स्वयंसेवी संस्थेचा पुरस्कार सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. एक लाख रुपये रोख व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. कपिलकुमार आदमने आणि संस्थेच्या सदस्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. नेहरू युवा केंद्र संघटनच्या राज्य संचालक संध्या देवतळे यासुद्धा यावेळी मंचावर उपस्थित होत्या.
 
ना. गडकरींचेही मार्गदर्शन
 
‘युथ एम्पॉवरमेंट समीट’च्या उद्‌घाटन कार्यक्रमाला ना. नितीन गडकरी उपस्थित राहू शकले नाही. मात्र त्यांचा व्हिडीओ संदेश यावेळी उपस्थितांना दाखविण्यात आला. कौशल्य विकासाशिवाय पर्याय नाही. माणूस कोणीही असो, क्षेत्र कुठलेही असो, आकाश गाठायचे असेल तर गुणवत्ता आवश्यक आहे, असा संदेश त्यांनी दिला.

 

 

भंगारातील २३० बसेसचा होणार लिलाव

परिवहन उपसमितीच्या बैठकीत निर्णय : मनपा-व्हीएनआयएलची संयुक्त समिती करणार कार्यवाही
 
नागपूर,ता.२१ : नागपूर महानगरपालिकेच्या शहर बस वाहतूक सेवेअंतर्गत वंश निमय लि.ने चालविलेल्या १० वर्षांपूर्वी आलेल्या २३० स्टार बसेस सध्या भंगारात पडल्या आहेत. त्याची किंमत पुन्हा कमी होण्याच्या अगोदर त्याचा लिलाव करण्यात येईल, असा निर्णय नगरसेवक प्रवीण भिसीकर यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या परिवहन उपसमितीने घेतला.
 
यासंदर्भात मंगळवारी (ता. २१) डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात बैठक पार पडली. बैठकीला उपसमितीचे अध्यक्ष प्रवीण भिसीकर, सदस्य अर्चना पाठक, नितीन साठवणे परिवहन विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक शिवाजी जगताप, परिवहन विभागाचे रवींद्र पागे, वंश निमयचे प्रतिनिधी अजिंक्य पारोळकर, श्री. अलोणे उपस्थित होते.
 
बैठकीत उपसमितीने प्रारंभी भंगारात असलेल्या बसविषयी माहिती घेतली. २३० बसेस असून त्यापैकी १२४ ऑरेंज सिटी स्ट्रीट येथे तर १०६ बसेस टेका नाका येथे आहेत. या बसेचा कालावधी १० वर्षांपेक्षा अधिक झाल्यामुळे त्या भंगार झाल्या आहेत. त्याची किंमत कमी होण्याअगोदर त्याचा लिलाव करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. न्यायालय आणि शासनाच्या नियम व अटी-शर्तींच्या अधीन राहून लिलाव प्रक्रिया करण्याचे निर्देश उपसमितीचे अध्यक्ष प्रवीण भिसीकर यांनी दिले. यासाठी मनपा आणि व्हीएनअसायएलच्या सदस्यांची संयुक्त समिती गठित करण्यात आली असून या समितीद्वारे ही संपूर्ण प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती श्री. भिसीकर यांनी दिली.

 

 

मनपाच्या विशेष समित्यांची निवड

नागपूर,ता.२० : नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीसह विविध विशेष समित्यांच्या कार्यकाळ मार्च महिन्यात संपुष्टात येत आहे. यामुळे मंगळवारी (ता. २०) राजे रघुजी भोसले नेताजी नगर भवन येथे झालेल्या मनपाच्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीसह विशेष समित्यांच्या सदस्यांची निवड करण्यात आले. यासंदर्भातील अधिकृत घोषणा महापौर नंदा जिचकार यांनी केली.
 
घोषणा करण्यात आलेल्या विविध समित्यांच्या सदस्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत...
 
स्थायी समिती : नगरसेवक सर्वश्री विक्की कुकरेजा, सुनील हिरणवार, संजय महाजन, शेषराव गोतमारे, सोनाली कडू, मंगला खेकरे, मनिषा अतकरे (सर्व भाजप), नगरसेविका हर्षला साबळे (काँग्रेस).
 
स्थापत्य, विद्युत व प्रकल्प विशेष समिती : नगरसेवक सर्वश्री संजय बंगाले, भगवान मेंढे, किशोर वानखेडे, राजकुमार शाहू, नगरसेविका पल्लवी शामकुळे, सरिता कावरे (सर्व भाजप), नगरसेविक कमलेश चौधरी, पुरुषोत्तम हजारे (काँग्रेस), नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार (बसपा).
 
वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समिती : नगरसेवक सर्वश्री मनोज चापले, प्रमोद कौरती, लखन येरावार, विजय चुटेले, नगरसेविका विशाखा बांते, ज्योती भिसीकर (सर्व भाजप), नगरसेविका गार्गी चोपडा, नगरसेवक दिनेश यादव (सर्व काँग्रेस), नगरसेविका वंदना चांदेकर (बसपा).
 
विधी विशेष समिती : नगरसेवक सर्वश्री धर्मपाल मेश्राम, नगरसेविका संगीता गिऱ्हे, जयश्री वाडीभस्मे, नगरसेवक अमर बागडे, नगरसेवक गोपीचंद कुमरे, नगरसेवक समिता चकोले (सर्व भाजप), नगरसेवक सर्वश्री संदीप सहारे, जुल्फेकार अहमद भुट्टो (सर्व काँग्रेस), मो. जमाल मो. इब्राहिम (बसपा).
 
शिक्षण विशेष समिती : नगरसेवक सर्वश्री प्रा. दिलीप दिवे, नगरसेविका भारती बुंडे, रिता मुळे, स्वाती आखतकर, नगरसेवक राजेंद्र सोनकुसरे, नगरसेविका प्रमिला मंथरानी (सर्व भाजप), नगरसेवक मनोज गावंडे, नितीन साठवणे (सर्व काँग्रेस), मो. इब्राहिम तौफिक अहमद (बसपा).
 
गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी विशेष समिती : नगरसेवक सर्वश्री अभय गोटेकर,नगरसेवक उषा पॅलेट, निरंजना पाटील, लता काडगाये, रुतिका मेश्राम, दुर्गा हत्तीठेले (सर्व भाजप), नगरसेविका नेहा निकोसे, नगरसेवक परसराम मानवटकर (सर्व काँग्रेस), नगरसेवक नरेंद्र वालदे (बसपा).
 
क्रीडा विशेष समिती : नगरसेवक सर्वश्री नागेश सहारे, प्रमोद तभाने, नगरसेवका सरला नायक, कांता रारोकर, नगरसेवक संजय चावरे, नगरसेविका नेहा वाघमारे (सर्व भाजप), नगरसेविका दर्शनी धवड, साक्षी राऊत (सर्व काँग्रेस), नगरसेविका विरंका भिवगडे (बसपा).
 
महिला व बालकल्याण समिती : नगरसेविका प्रगती पाटील, विशाखा मोहोड, दिव्या धुरडे, सरिता कावरे, मनिषा अतकरे, नसीम बानो (सर्व भाजप), नगरसेविका जिशान मुमताज मो. इरफान, रश्मी धुर्वे (सर्व काँग्रेस), वैशाली नारनवरे (बसपा).
 
जलप्रदाय विशेष समिती : नगरसेवक सर्वश्री विजय उर्फ पिंटू झलके, प्रदीप पोहाणे, दीपक चौधरी, गोपीचंद कुमरे, श्रद्धा पाठक, जयश्री रारोकर (सर्व भाजप), नगरसेवक हरिश ग्वालबंशी, नगरसेविका प्रणिता शहाणे (सर्व काँग्रेस), नगरसेवक संजय बुर्रेवार (बसपा).
 
कर आकारणी व कर संकलन विशेष समिती : नगरसेवक सर्वश्री संदीप जाधव, नगरसेविका यशश्री नंदनवार, नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेविका मिनाक्षी तेलगोटे, माधुरी ठाकरे, नगरसेवक संजय बालपांडे (सर्व भाजप), नगरसेवक नितीश ग्वालबंशी, नगरसेविका भावना लोणारे (सर्व काँग्रेस), नगरसेविका मंगला लांजेवार (बसपा).

अग्निशमन विशेष समिती : नगरसेवक सर्वश्री लहुकुमार बेहते, नगरसेविका वर्षा ठाकरे, नगरसेवक निशांत गांधी, नगरसेविका वंदना भुरे, वनिता दांडेकर, अनिल गेंडरे (सर्व भाजप), नगरसेवक ऋषिकेश उर्फ बंटी शेळके, नगरसेवक आशा उईके (सर्व काँग्रेस), नगरसेविका ममता सहारे (बसपा).

 

 

मनपाद्वारे शिवाजी महाराजांना अभिवादन

नागपूर,ता.१९. नागपूर महानगरपालिकेच्यावतीने शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. महापौर नंदा जिचकार यांनी गांधी गेट महालस्थित शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून त्यांना अभिवादन केले. याप्रसंगी दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, माजी महापौर प्रवीण दटके प्रामुख्याने उपस्थित होते.
 
यावेळी गांधीबाग झोन सभापती सुमेधा देशपांडे, नगरसेविका नेहा वाघमारे, श्रद्धा पाठक, हर्षदा साबळे, बंटी शेळके, माजी स्थायी समिती सभापती बंडू राऊत, माजी नगरसेवक प्रमोद पेंडके, मनोज साबळे, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डनवीस प्रामुख्याने उपस्थित होते.
 
यानंतर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील महापौर कक्षातही मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांना अभिवादन केले.
 
शिवाजी नगर येथील सिंहासनारूढ पुतळ्याला माल्यार्पण
 
शिवाजी नगर येथील उद्यानात नव्याने बसविण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याला महापौर नंदा जिचकार यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी स्थापत्य व समिती सभापती संजय बंगाले, धरमपेठ झोन सभापती रूपा राय, रा.स्व.संघाचे बापू भागवत, भारतीय जनता पार्टीचे श्रीकांत देशपांडे प्रामुख्याने उपस्थित होते.  

 

 

नागपूर मेट्रोच्या वर्धापन दिन सोहळ्यात मनपाच्या विद्यार्थ्यांचा सन्मान

-निबंध स्पर्धेत शामा मिश्रा तर चित्रकला स्पर्धेत नयना निमसाडे प्रथम
 
नागपूर, ता. 17 फेब्रुवारीः महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पाच्या तिस-या वर्धापन दिनानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मनपाच्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. 14 व 15 फेब्रुवारी रोजी मनपाच्या शाळांमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावणा-या विजेत्यांना सेंटर पॉईंट हॉटेल, रामदासपेठ येथे आयोजित नागपूर मेट्रोच्या वर्धापन दिन सोहळ्यात महापौर नंदा जिचकार व महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेत दिक्षीत यांच्या हस्ते सायकल देऊन गौरविण्यात आले तर तृतीय क्रमांक पटकावणा-या विजेत्यांना गिफ्ट व्हाऊचर देऊन सन्मानित करण्यात आले.
 
निबंध स्पर्धेत सुरेंद्रगढ हायस्कूल येथील 9 व्या वर्गातील विद्यार्थिनी शामा मिश्रा प्रथम, विवेकानंद हिंदी विकास शाळेतील 9 व्या वर्गातील प्रियंका शुक्ला द्वितीय तर दुर्गानगर शाळेतील 9 व्या वर्गातील गौरी शेंडे हिने तृतीय क्रमांग पटकावला. यासोबतच आयोजित चित्रकला स्पर्धेत जयताळा हायस्कूल येथील 7 व्या वर्गातील विद्यार्थीनी नयना सुरेश निमसाडे हिने प्रथम, विल्मिकीनगर हिंदी हायस्कूल मधील 7 व्या वर्गातील विद्यार्थीनी काजल अमलेश शर्मा द्वितीय तर बॅ. शेषराव वानखेडे विद्यानिकेतन मधील 9 व्य़ा वर्गातील विद्यार्थी अभिषेक पराडे याने तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेच्या आयोजनासाठी उपायुक्त डॉ. रंजना लाडे यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच आयोजनाच्या यशस्वीतेसाठी शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी मोलाची भूमिका पार पाडली. शालेय स्तरावर आयोजित स्पर्धेत शिक्षकांनी परीश्रम घेतले. यावेळी विद्यार्थी आपल्या पालकांसोबत उपस्थित होते.

 

 

कुंभारटोली येथील डांबरी रस्ता कामाचे भूमीपूजन

नागपूर,ता.१६. नागपूर महानगरपालिकेच्यावतीने शहरात सध्या विविध रस्त्यांचे काम सुरू आहे. त्यांच अंतर्गत कुंभारटोली वस्तीतील अंतर्गत रस्त्यांच्या कामाचे भूमीपूजन शुक्रवार (ता.१६) पश्चिम नागपूरचे आमदार सुधाकर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सत्तापक्ष नेते संदीप जोशी, स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले प्रामुख्याने उपस्थित होते.
 
प्रभाग विकास निधीतून हा रस्ता तयार करण्यात येणार असून कुंभार टोली, कलार गल्ली, गवळीपुरा या वस्त्यांच्या रस्त्यांचे काम त्यात अंतर्भूत आहेत. यासाठी नगरसेवक मुन्ना पोकुलवार आणि संजय बंगाले यांनी पुढाकार घेतला आहे. या वस्तीच्या आतील रस्ता तयार करण्यात यावा, याकरीता स्थानिक नागरिकांनी वारंवार मागणी केली होती. आता रस्ता कामाचे भूमीपूजन झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. या रस्ता बांधकामाचे कंत्राट ओ.जी.बजाज यांच्याकडे देण्यात आले असल्याची माहिती संजय बंगाले यांनी दिली.
 
यावेळी धरमपेठ झोन सभापती रूपा राय, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, नगरसेवक सुनील हिरणवार, मुन्ना पोकुलवार, किसन गावंडे, अभय दीक्षित, अमर पारधी, गजानन राऊत, सुनील राऊत प्रामुख्याने उपस्थित होते.

 

 

रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमस्थळाचे भूमिपूजन

नागपूर,ता.१५ : नागपूर महानगरपालिका समाजकल्याण विभाग आणि फॉर्च्यून फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २२ फेब्रुवारीपासून आयोजित युथ एम्पॉवरमेंट समीट-२०१८ रोजगार मेळाव्याच्या कार्यक्रमस्थळाचे भूमिपूजन गुरूवार (ता.१५) देशपांडे सभागृहाच्या मैदानावर नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार प्रा.अनिल सोले व महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आले.
 
यावेळी स्थायी समिती सभापती संदीप जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, फॉर्च्यून फाऊंडेशनचे कुणाल पडोळे प्रामुख्याने उपस्थित होते,
 
नागपूर महानगरपालिका समाजकल्याण विभाग दीनदयाल अंत्योदय योजना - राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान व जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता विभाग  आणि फॉर्च्यून फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २२ ते २४ फेब्रुवारी २०१८ या दरम्यान रोजगार मेळाव्याचे आयोजन देशपांडे सभागृहात करण्यात आले आहे. या मेळाव्यात विविध कंपन्या बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी सहभागी होतील. भूमिपूजन कार्यक्रमाला धरमपेठ झोन सभापती रूपा राय, नगरसेवक दीपक चौधरी, भाजपाचे संघटन मंत्री भोजराज डुंबे, कीर्तीदा अजमेरा, प्रशांत कामडे, गणेश चार्लेवार उपस्थित होते.

 

 

महाशिवरात्री निमित्त उपमहापौरांनी घेतले शंकराचे दर्शन

नागपूर,ता.१५. महाशिवरात्री निमित्त उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी मोक्षधाम घाटावरील अर्धनारीनटेश्वर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून विधीवत पुजा केली. यावेळी त्यांच्यासमवेत धंतोली झोन सभापती प्रमोद चिखले प्रामुख्याने उपस्थित होते.
 
उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी प्रतिमेची पुजा करून मोक्षधाम घाटाची पाहणी केली. नागरिकांच्या आणि तेथील कर्मचा-यांच्या समस्या जाणून घेतल्या. व परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घेण्याचे सांगितले.
 
यावेळी झोनचे सहायक आयुक्त स्मीता काळे, आरोग्य विभागाचे विभागीय अधिकारी राजेश गायकवाड, शंकर टेकाम, राजेश वासनिक आदी उपस्थित होते.

 

 

कर्मचाऱ्यांचे नुकसान होणार नाही याची विशेष काळजी : संदीप जाधव

कर्मचारी संघटनेचे विविध मागण्यांचे निवेदन
 
नागपूर,ता.१४ : नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे नुकसान होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात येईल, असे प्रतिपादन स्थायी समिती सभापती संदीप जाधव यांनी केले आहे. बुधवार (ता.१४) ला नागपूर महानगरपालिका कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळाने कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात चर्चा केली. त्याप्रसंगी ते बोलत होते.
 
बैठकीला सहायक आयुक्त प्रकाश वराडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मोना ठाकूर, जीपीएफचे दत्तात्रय डहाके, कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष राजेश हाथीबेड, महासचिव डोमाजी भडंग, सुनील तांबे, किशोर तिडके, धनराज मेंढेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
 
यावेळी कर्माचाऱ्यांच्या विविध प्रश्नांचे निवेदन शिष्टमंडळाने सभापतींना दिले. यामध्ये सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळण्याबाबत, ६९ महिन्यांच्या महागाई भत्त्याची थकबाकी मिळण्याबाबत आदी मागण्यांचा समावेश होता. सभापती संदीप जाधव यांनी महानगरपालिकेच्या संबंधित वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्याबाबतीत नवे धोरण ठरविण्याचे निर्देश सभापतींनी दिले.
 
अग्निशमन विभागाच्या आस्थापनेच्या संवर्गातील रिक्त जागेवर मनपाच्या सेवेत असणाऱ्या कर्माचाऱ्यांना प्राधान्य मिळण्याबाबत यावेळी बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यातील नियमावली शिथील करण्याचे निर्देश सभापती संदीप जाधव यांनी दिले.
 
गट विम्याची राशी मिळणेबाबत चर्चा केली असता गट विम्याची रक्कम कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर देण्याचे निर्देश सभापती संदीप जाधव यांनी दिले. त्यांना देण्यात येणाऱ्या देयकाची पावतीदेखील कर्मचाऱ्यांना देण्याचे निर्देश जाधव यांनी दिले.
 
सन २००५ नंतर मनपामध्ये रूजू झालेल्या कर्मचाऱ्यांना डीसीपीएसची माहिती अवगत नाही. त्याबाबतीत त्यांना त्याबाबत अवगत करणे ही मागणी कर्मचाऱ्यांनी केली असता, राज्य शासनाच्या आदेशानुसार २०१० पासून डीसीपीएस लागू झाला असल्याची माहिती मुख्य लेखा व वित्त अधिकारी मोना ठाकूर यांनी दिली. कर्मचाऱ्यांच्या २०१६-१७ जीपीएफ रिटर्न्सची पावती पुढील दोन महिन्यात कर्मचाऱ्यांना देण्याचे निर्देश सभापती संदीप जाधव यांनी दिले.  
 
बैठकीला कर्मचारी संघटनेचे कोषाध्यक्ष ओंकार लाखे, सदस्य मिना नकवाल, पुष्पा बुट्टे, मालती जांभूळकर, नाना काकडे, यशोदा शिंदे, अंकुर जैन, पियुष खापेकर प्रामुख्याने उपस्थित होते.

 

 

‘विशेष बालकां’सह महापौरांचा असाही ‘व्हॅलेंटाईन डे’

झुंबा डान्स करणाऱ्या बालकांचा वाढविला उत्साह
 
नागपूर,ता.१४ : ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं. तुमचं आमचं सेम असतं’, या प्रेम काव्याच्या ओळी खूप काही सांगून जातात. व्हॅलेंटाईन डे अर्थात प्रेम दिवस. हा दिवस प्रत्येक जण आपआपल्या परीने साजरा करीत असतो. महापौर नंदा जिचकार यांनी आजचा दिवस असाच ‘विशेष बालकां’सोबत घालवून नवा आदर्श घालून दिला. कीर्तिमान स्थापित करण्यासाठी सामूहिक झुंबा डान्स करणाऱ्या ‘विशेष बालकां’ना गुलाब फूल देऊन त्यांच्याप्रति आपली कृतज्ञता व्यक्त केली.
 
निमित्त होते रोटरी क्लब ऑफ नागपूर आणि लता मंगेशकर हॉस्पीटलतर्फे आयोजित कार्यक्रमाचे. मानकापूर येथील इनडोअर विभागीय क्रीडा संकुलामध्ये विक्रमासाठी सुमारे ६०० विशेष मुलांच्या एक तास झुंबा डान्सचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर नंदा जिचकार यांना आमंत्रित करण्यात आले होते. सुमारे ६०० मुले एकत्र येऊन विक्रमाला गवसणी घालणार, ह्या विचाराने सारेच उत्साहित होते. विक्रमासाठी झुंबा डान्सला सुरुवात झाली. आता नॉन स्टॉप एक तास विद्यार्थ्यांनी डान्स करून उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
 
महापौर नंदा जिचकार यांनी न राहवून मंचावरून उतरून सरळ मुलांना गाठले. गळाभेट घेत प्रातिनिधिक स्वरूपात काही मुलांना गुलाबपुष्प भेट दिले. त्यांचे तोंडभरून कौतुक केले. महापौरांनी केलेल्या या कौतुकाने विद्यार्थीही भारावून गेले. उत्साह वाढवून प्रोत्साहन दिल्याबद्दल चिमुकल्यांनीही महापौरांचे आभार मानले. हा सोहळा, आजचा व्हॅलेंटाईन डे कायमचा लक्षात राहील, असे गौरवोद्‌गार महापौर नंदा जिचकार यांनी काढले.

 

 

कस्तुरचंद पार्कच्या देखभाल दुरुस्तीसाठी ‘मेट्रो’ देणार मनपाला मोबदला

हेरिटेज समितीने दिली प्रस्तावाला मान्यता : अंबाझरीजवळील मेट्रो बांधकामालाही दिली हिरवी झेंडी
 
नागपूर,ता.१४ : कस्तुरचंद पार्क येथील ४०८.४५९ चौ.मी. जागा मेट्रो रेल स्टेशनला देताना मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने कस्तुरचंद पार्कची देखभाल दुरुस्ती करावी, अशी अट ठेवण्यात आली होती. मात्र, यासंदर्भात मेट्रो रेल कार्पोरेशन असमर्थ असून ती जबाबदारी नागपूर महानगरपालिकेने सांभाळावी. त्या मोबदल्यात त्याला लागणारा खर्च ‘मेट्रो’ मनपाला देईल, या ‘मेट्रो’च्या प्रस्तावाला नागपूर हेरिटेज संवर्धन समितीने मंजुरी दिली. यासोबतच तेथे बनणाऱ्या मेट्रो स्टेशनच्या कस्तुरचंद पार्ककडील दर्शनी भागावर १५ मी लांबी आणि ६ मी. रुंदी असलेली प्रोजेक्शन स्क्रीन लावण्यात येणार असून त्यावर हेरिटेजबाबतची जनजागृती करण्यात येणार आहे.
 
नागपूर हेरिटेज संवर्धन समितीच्या बैठकीचे आयोजन बुधवारी (ता. १४) छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात करण्यात आले होते. सदर बैठकीत ही मान्यता देण्यात आली. बैठकीला समितीचे सदस्य तथा नीरीचे संचालक डॉ. तपन चक्रवर्ती, नागपूर विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या प्रपाठक डॉ. श्रीमती शुभा जोहरी, सहायक संचालक नगर रचना शाखा नागपूर सुप्रिया थूल, नगर रचना विभागाचे सहायक संचालक प्रमोद गावंडे, नागपूर सुधार प्रन्यासचे अधीक्षक अभियंता श्री. गुज्जलवार, वास्तुविशारद अशोक मोखा उपस्थित होते.
 
मेट्रो रेलच्या अंबाझरी तलावालगतच्या बांधकामावर विधानपरिषदेचे आमदार प्रकाश गजभिये यांनी घेतलेल्या आक्षेपानंतर मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेडने सुरक्षिततेच्या बाबतीत तांत्रिक अहवाल व सुरक्षितता प्रमाणपत्र समितीला सादर केले. त्याचा अभ्यास करून समितीचे सदस्य स्ट्रक्चरल इंजिनिअर पी. एस. पाटणकर आणि वास्तुविशारद अशोक मोखा यांनी समितीला अहवाल सादर केला. त्यात काही अटी व शर्ती ठेवण्यात आल्या. त्याची पूर्तताही मेट्रो रेल कार्पोरेशनने केल्यामुळे नागपूर हेरिटेज संवर्धन समितीने सदर बांधकामालाही हिरवी झेंडी दाखविली आहे. हेरिटेज संवर्धन समितीने सुचविल्याप्रमाणे डीएसओ द्वारा निर्देशित शिफारशी व उपायांचे अनुपालन करण्यात येईल आणि जागेवरील बांधकामाचा तिमाही देखरेख अहवाल सादर करण्यात येईल, असे आश्वासन मेट्रो रेल कार्पोरेशनने समितीला दिले.
 
नागपूर हेरिटेज संवर्धन समितीच्या बैठकीत एकूण नऊ विषय चर्चेला आले होते. त्यापैकी दोन विषय परवानगीसंदर्भातील होते. २० ऑगस्ट रोजी सद्‌भावना दिवसानिमित्त होणाऱ्या सद्‌भावना दौड आयोजनाच्या परवानगीसंदर्भात होता. ज्याला समितीने मंजुरी दिली. १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रम आयोजनालाही समितीने सशर्त परवानगी दिली.
 
स्वच्छतादूत विनोद दहेकार यांनी विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील अस्वच्छता आणि पार्किंगचा विषय मांडला. आयुक्त कार्यालय अर्थात जुने सचिवालय ही इमारत पुरातन वास्तू असून ती बघण्यासाठी अनेक पर्यटक तेथे येतात. मात्र, इमारतीच्या परिसरात नादुरुस्त वाहने आणि इतर शासकीय वाहने उभी असल्याने इमारत विद्रूप दिसते. इतकेच नव्हे तर रात्री असामाजिक तत्त्व इमारत परिसरात मद्य प्राशन करीत असल्याचे त्यांनी समितीच्या लक्षात आणून दिले. यासंदर्भात समितीने गंभीर दखल घेत रात्रीच्या वेळी इमारत परिसरात असामाजिक तत्त्वांना प्रवेश बंदी करण्यासंदर्भात कठोर पावले उचलण्याचे निर्देश प्रशासनाला देणेसंदर्भात सुचविले. पार्किंगसंदर्भातही प्रशासनाशी चर्चा करून तातडीने तोडगा काढण्यात येईल, असे सांगितले.
 
पोलिस लाईन टाकळी, तेलंगखेडी येथील नमूद खसरा क्रमांकाची क्रीडांगणाकरिता अनुदानीत जागेच्या वापरात बदल करून शैक्षणिक संकुल प्रयोजनासाठी वापर मंजूर करण्याच्या दृष्टीने समितीच्या परवानगीसाठी बैठकीत चर्चेला आले. या विषयावर चर्चा झाली. संबंधित जागेचा विकास आराखड्यात काय वापर नमूद केला आहे, ते बघूनू आणि प्रत्यक्ष जागा बघून त्यावर निर्णय घेण्यात येईल, असे ठरवून सदर विषय समितीने प्रलंबित ठेवला.
 
विषय मांडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने जनार्दन भानुसे, मेट्रोच्या वतीने माणिक पाटील, राजीव यलकावार, अन्य विषयांसाठी विनोद दहेकार, संजय दुधे उपस्थित होते.

 

 

महापौर चषक राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचे थाटात उद्घाटन

नागपूर,ता.१३. नागपूर महानगरपालिका, नागपूर अम्युचर स्पोर्ट्स असोसिएशन, नागपूर जिल्हा बास्केटबॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरेंद्रनगर येथील बॉस्केटबॉल मैदानावर महापौर चषक राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून डॉ.विलास डांगरे, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार होत्या.
 
यावेळी मंचावर सत्तापक्ष नेते संदीप जोशी, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेवक लखन येरावार, नगरसेविका वनिता दांडेकर, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, नागपूर अम्युचर स्पोर्ट्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष शंशाक दाभोळकर, उपाध्यक्ष श्री.देव प्रामुख्याने उपस्थित होते.
 
यावेळी महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, महापौर चषकामुळे अनेक खेळाडूंना खेळण्यास व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. हार पराजय हा खेळाचा एक भाग आहे. अपयश पचविण्याची ताकद ही खेळाडूतच असते, त्यामुळे तो खेळाडू हा पुढे जात असतो. तो सातत्याने प्रयत्नरत असल्याने तो विजयी ठरतो, असे म्हणत आयोजकांचे अभिनंदन केले व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
 
यावेळी उद्धाटन म्हणून डॉ.विलास डांगरे बोलताना म्हणाले, अशा प्रकारच्या स्पर्धेमुळे खेळाडू उत्साही राहतो. त्याचे उस्ताहीपण ही त्याच्या खेळण्यासाठी चांगला आहे.
 
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांनी आयोजनामागील भूमिका विशद केली. यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी बॉल बास्केटमध्ये टाकून कार्यक्रमाचे  उद्घाटन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रणय घाटे यांनी केले. आभार निलेश जुमडे यांनी मानले.

 

महिला उद्योजिका भविष्यात होणार ‘बिझनेस लीडर’  – अमृता फडणवीस

-     महिला उद्योजिका मेळाव्याचा  समारोप
 
-     लाडली लक्ष्मी योजनेअंतर्गत पॉलिसीजचे वितरण
 
-      १० उत्कृष्ट स्टॉलधारकांचा सत्कार
 
नागपूर,ता. ११ :  महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे येत आहेत. आता छोटे छोटे उद्योग करणा-या महिला उद्योजिका भविष्यात ‘ बिझनेस लीडर’ म्हणून ओळखल्या जातील, असे प्रतिपादन अक्सिस बॅंकेच्या उपाध्यक्षा श्रीमती अमृता फडणवीस यांनी केले.
 
नागपूर महानगरपालिका, समाजकल्याण विभाग, महिला व बालकल्याण विभाग तर्फे रेशीमबाग मैदानावर आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याच्या समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार होत्या. पुढे बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, जी महिला घरी राहते, मुला बाळांना सांभाळते तिने बाहेर पडावे. आपल्यात कौशल्य समोर आणावे, तिची प्रगती नक्कीच होईल. उद्योग करताना महिलांना मार्केटिंग, सामाजिक यासारख्या अनेक समस्या समोर येतात. मात्र महिलांनी या सर्व समस्यांवर मात करून उद्योग क्षेत्रात  भरारी घेतली. यामुळे देशाचा जीडीपी वाढतो आहे. स्त्री आणि पुरूष ही दोन्ही चाके सुदृढ नसेल तर देशाची प्रगती होऊ शकत नाही, असे म्हणत महिला उद्योजिकांना बाजार उपलब्ध करून दिल्याबद्गल नागपूर महानगरपालिकेचे कौतुक केले.
 
समारोपीय कार्यक्रमाला व्यासपीठावर सत्तापक्ष नेता संदीप जोशी, माजी महापौर प्रवीण दटके, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, हनुमाननगर झोन सभापती भगवान मेंढे, नगरसेविक पिंटू झलके, महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, समिती सदस्या दिव्या धुरडे, वंदना भगत, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, हनुमाननगर झोन सहायक आयुक्त राजू भिवगडे उपस्थित होते.
 
प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वर्षा ठाकरे यांनी प्रास्ताविकातून महिला उद्योजिका मेळाव्यामागील भूमिका विषद केली. कार्यक्रमाचे संचालन किशोर गलांडे यांनी केले. आभार उपायुक्त डॉ.रंजना लाडे यांनी मानले.  
 
लाडली लक्ष्मी योजनेच्या पॉलिसीजचे वाटप
 
नागपूर महानगरपालिका समाजकल्याण विभागाच्यावतीने लाडली लक्ष्मी योजनेअंतर्गत आतापर्यंत शुन्य ते एक  वर्षा वयोगटातील ६९० मुलींची पॉलिसी काढण्यात आली आहे. मुलींच्या उच्च शिक्षणाच्या दृष्टीने काढण्यात आलेल्या या पॉलिसीजचे प्रीमिअम मुलीच्या २० वर्षापर्यंत मनपा भरणार आहे. यातील ११ मुलीच्या पालकांना पॉलिसजचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले.  यामध्ये निक्षिता सोनकुसरे, नसिका नितनवरे, आराध्या बारापात्रे, शर्वरी दुधलकर, शीतल सिडाम, रूही ठवकर, प्रत्यक्षी लाहूलकर, अंजली खंडाळे, युक्ती खैरकर, प्रार्थना निनावे, नमिता माटे यांचा समावेश आहे.
 
उत्कृष्ट स्टॉलधारकांचा सत्कार
 
महिला उद्योजिका मेळाव्यातील उत्कृष्ट १० स्टॉलधारकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये अलिबाग प्रगती महिला बचत गट, माजी सैनिक महिला बचत गट, सुषमा कांबळे, पूजा बचत गट, सुनिता महिला बचत गट, प्रियंका सतपाल, जयधनलक्ष्मी बचत गट, वैष्णवी जेठे आणि विदर्भ पशू उन्नती गट यांचा समावेश होता.
 
‘आरोही’तून मराठी हिंदी गीतांची मेजवानी
 
समारोपीय कार्यक्रमानंतर रसिक श्रोत्यांसाठी आरोही या मराठी हिंदी गीत संगीताच्या कार्यक्रमाची मेजवानी ठेवण्यात आली. गणेश स्तवन आणि इतनी शक्ती हमे दे ना दाता या गीतांने सुरूवात झालेला कार्यक्रम जुनी हिंदी आणि मराठी गीते, गझल असा उत्तरोत्तर रंगत गेला.
 

 

‘वेलकम जिंदगी’ने खेचली तूफान गर्दी

महिला उद्योजिका मेळाव्याच्या सातव्या दिवशी मराठी नाटकाची मेजवानी
 
नागपूर,ता.१०.  एकशे दोन वर्षाचा स्वच्छंदी आयुष्य जगणारा बाप आणि वयाची सत्तरी गाठल्यानंतर वृद्धाचे जीवन जगणारा  ७५ वर्षाचा मुलगा या दोघांमधील आयुष्याच्या तत्त्वांची जुगलबंदी याचे विनोदी सादरीकरण करीत ‘वेलकम जिंदगी’ या नाटकाने रसिकांचे चांगलेच मनोरंजन केले.
 
नागपूर महानगरपालिका, महिला व बालकल्याण विभाग, समाजकल्याण विभागच्या वतीने रेशीमबाग मैदानावर आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याच्या सातव्या दिवशी सिनेकलावंत भरत जाधव, डॉ. गिरिश ओक, शिवानी रांगोळे यांची भूमिका असलेल्या वेलकम जिंदगी या नाटकाने रंग भरला.
 
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, नगरसेविका मनीषा कोठे, भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा किर्तीदा अजमेरा, उपायुक्त रवींद्र देवतळे, सतरंजीपुरा झोन सहायक आयुक्त प्रकाश वराडे प्रामुख्याने उपस्थित होते. महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, सदस्या दिव्या धुरडे, वंदना भगत, हनुमाननगर झोन सहायक आयुक्त राजू भिवगडे यांचीही यावेळी उपस्थिती होती.
 
१०२ वर्षाच्या वडीलांनी स्वतःचे आयुष्य आपल्या ७५ वर्षाच्या निरस मुलासोबत राहून कंटाळवाणे आणि निरस होऊ नये यासाठी मुलाला वृद्धाश्रमात पाठविण्याचा निर्णय घेतात. वृद्धाश्रमात जाणे टाळण्यासाठी वडीलांची विनवणी, ती मान्य करूंन वेगवेगळ्या अटी मुलाच्या पुढ्यात ठेवणे आणि त्यातून आपसूकच निर्माण होणारे विनोद अशा अफलातून संकल्पनेने साकारलेले वेलकम जिंदगी हे नाटक जगण्याचा अर्थ सांगून गेले. या सुंदर सादरीकरणाला रसिकांच्या गर्दीने उत्स्फूर्त दाद दिली.
 
रविवारी मेळाव्याचा समारोप
 
चार फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या महिला उद्योजिका मेळाव्याचा समारोप उद्या  रविवार (ता.११) ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. समारोपीय कार्यक्रमानंतर आरोही या मराठी- हिंदी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला श्रीमती अमृता फडणवीस यांची विशेष उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे यांनी केले आहे.

 

 

बाल कलावंतांच्या सांस्कृतिक रजनीने गाजलेला सहावा दिवस

महिला उद्योजिका मेळावा – बचत गटांचे स्टॉल गर्दीने फुलले
 
नागपूर,ता.९. नागपूर महानगरपालिका, महिला व बालकल्याण समिती, समाज कल्याण विभाग यांच्यावतीने आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याचा सहावा दिवशी बाल कलावंतांच्या सांस्कृतिक रजनीने गाजला.
 
यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले, हनुमाननगर झोन सभापती भगवान मेंढे, नगरसेविका दिव्या धुरडे, वंदना भगत, विशाखा मोहोड, जयश्री वाडीभस्मे, नगरसेवक सुनील हिरणवार, पिंटू झलके, विजय चुटेले, उपायुक्त डॉ.रंजना लाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
चिमुकल्यांचा आगळा वेगळा बॅण्ड
 
कार्यक्रमाची सुरूवात वर्धा रोडवरील टाईनी टॉट मदर्सपेट किंडरगार्टनच्या चिमुकल्यांच्या आगळ्यावेगळ्या बॅण्डने झाली. केजी वनच्या विद्यार्थ्यांनी घरगुती वापराच्या वस्तुतून संगीत निर्माण करत उपस्थितांच्या टाळ्या घेतल्या. त्यांच्या या कलेने रसिक प्रेक्षकांमध्ये जोश संचारला.
 
नृत्यांची मेजवानी
 
आजच्या सांस्कृतिक रजनीत चिमुकल्यांनी सादर केलेल्या क्लासिकल, हिपहॉप, राजस्थानी आदी नृत्यप्रकारांनी रंग चढविला. अपूर्वा काकडे हिने सादर केलेल्या शास्त्रीय नृत्याने रसिक मनावर मोहिनी घातली. डिंपल बैसने सादर केलेल्या हिपहॉप प्रकारातील नृत्याने रसिकांनाही थिरकायला भाग पाडले. चाहत शेख हिच्या मॉडर्न नृत्याने रसिकांचा वन्स मोअर मिळवला. लक्ष्मी गोतमारे आणि शशांक गोतमारे यांनी गायलेल्या भजनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.
 
स्टॉलवर नागरिकांची गर्दी वाढली.
 
महिला उद्योजिका मेळाव्याच्या आजच्या सहाव्या दिवशी नागरिकांनी गर्दी केली. मेळाव्यात लागलेल्या ३०० स्टॉलवरील विविध वस्तूंची खरेदी केली. दरम्यान बिंझाणी महाविद्यालयाच्या गृह अर्थशास्त्र विभागाच्या प्रा. अंजली पाजनकर यांनी मेळाव्याला भेट दिली. दुपारच्या सत्रात दीनदयाल अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजिविका केंद्रातर्फे महिलांना विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.

 

 

दीनदयालनगरमध्ये पहिल्या ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे भूमिपूजन

महापौर निधीतून दहाही झोन मध्ये प्रस्तावित
 
नागपूर,ता. ९ : ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा म्हणून विविध सोयी-सुविधा असलेले ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र दहाही झोनमध्ये प्रत्येकी एक करण्याचे प्रस्तावित आहे. महापौर नंदा जिचकार यांच्या संकल्पनेतून साकारणार असलेल्या पहिल्यावहिल्या केंद्राच्या बांधकामाचे भूमिपूजन लक्ष्मीनगर झोनअंतर्गत येणाऱ्या दीनदयाल नगर येथील आजी-आजोबा उद्यानात महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते पार पडले.
 
यावेळी मनपाचे शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेविका सोनाली कडू, प्रा. राजीव हडप उपस्थित होते. ज्येष्ठ विरंगुळा केंद्र प्रस्तावित असलेल्या जागेवर महापौर नंदा जिचकार यांनी भूमिपूजन केले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, आजी-आजोबा उद्यान हे दीनदयाल नगर परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत उपयोगाचे आहे. परिसरातील शेकडो नागरिक या उद्यानात येत असतात. या उद्यानात यापूर्वी ग्रीन जीम लावण्यात आली आहे. कंपोस्ट खत प्रकल्पही या उद्यानात होत आहे. परिसरातील ज्येष्ठ नागरिकांची मागणी लक्षात घेऊन याच उद्यानाची निवड या भागातील नगरसेवकांनी केली. त्यानुसार आज केंद्राचे भूमिपूजन करताना अत्याधिक आनंद होतोय. या केंद्राचा उपयोग परिसरातील ज्येष्ठांनी आपले हक्काचे केंद्र म्हणून करावा. त्याची देखभाल योग्यप्रकारे करावी, असे आवाहनही त्यांनी केले.
 
सदर कार्यक्रमाला परिसरातील ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत सोनोले, रमेश दारव्हेकर, रवींद्र गिरडकर, प्रभाकर चौबे, मनोहर दाबक, दीपक डेहाडराय, प्रमोद जोशी, दीपक मथुरे, चंद्रकांत देशमुख, विनोद बोरकुटे, श्री. तानोडे, अविनाश देशमुख, स्मिता पुजारी, प्रतिभा गिरडकर, लता दारव्हेकर, शीतल सोनोले, विंदा दाबक, शोभा चौबे, विना मथुरे, ज्योती शेंबेकर उपस्थित होते. 

 

 

ओपो आणि व्हिवो कंपनीवर पेनॉल्टीसह दंड आकारण्यात यावा : संजय बंगाले

नवीन जाहिरात धोरण सभागृहासमोर आणण्याचे प्रशासनाला निर्देश
 
नागपूर,ता.९. ओपो आणि व्हिवो कंपनीने नागपूर महानगरापालिकेच्या जाहिरातीसंदर्भातील परवानगीचे उल्लंघन केले असल्याने त्यांच्यावर पेनॉल्टीसह दंडात्मक कारवाई करण्यात यावी, असे निर्देश स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले यांनी दिले.
 
शुक्रवारी (ता.९) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित स्थापत्य व प्रकल्प समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी समिती सदस्य सुषमा चौधरी, पल्लवी श्यामकुळे,विद्या कन्हेरे, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त (जाहिरात) स्मिता काळे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
चालू वर्षाच्या अर्थसंकल्पातील उत्पन्नाचा आढावा समिती सभापती बंगाले यांनी यावेळी घेतला. जाहिरात परवाना शुल्क,  शो टॅक्स याद्वारे उत्पन्न प्राप्त होत असल्याची माहिती सहायक आयुक्त स्मिता काळे यांनी दिली. दहा कोटीचे वार्षिक उत्पन्न जाहिरात विभागाद्वारे मनपाला प्राप्त होत असते. जानेवारी ३१ पर्यंत सुमारे सात कोटी उत्पन्न प्राप्त झाले असल्याची माहिती स्मिता काळे यांनी दिली.
 
जाहिरात विभागाच्या विविध योजना व काही नवीन प्रस्ताव याबाबत बैठकीत चर्चा झाली. जाहिरातीसंदर्भात मनपा प्रशासनाने काही नवीन धोरण ठरवले का, असा सवाल विचारला असता, दरवाढीसंदर्भात प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती काळे यांनी दिली.
 
जाहिरात विभागाद्वारे जाहिरात एजंसीला देण्यात येणारे विविध क्षेत्र व त्याद्वारे उत्पन्नाचा आढावा सभापती बंगाले घेतला. मनपाच्या मालमत्तांवर अनधिकृतपणे जाहिराती लावणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश सभापती बंगाले यांनी दिले. जाहिरातींपासून मिळाणाऱ्या उत्पन्नांचा झोननिहाय आढावा यावेळी घेण्यात आला. न्यायप्रविष्ठ असलेल्या प्रकरणांवरही बैठकीत चर्चा करण्यात आली.
 
मागील वर्षात शहरात नवीन जाहिरात धोरणाअंतर्गत ४०० नवीन जागा शोधण्यात आल्या. त्यांच्या मंजुरीचा प्रस्ताव प्रशासन स्तरावर अडकला असल्याची माहिती सहायक आयुक्त स्मिता काळे यांनी दिली. सदर प्रस्ताव तातडीने मंजूर करून सभागृहापुढे सादर करावा, असे निर्देश सभापती बंगाले यांनी दिले. नवीन वर्षात जाहिरात विभागाने २० कोटीचे उद्दिष्ट ठेवावे व त्याकरिता अतिरिक्त उपायुक्त व सर्व झोन सहायक आयुक्त यांनी झोन स्तरावरील छोटी जाहिरात लावणाऱ्या सर्व प्रतिष्ठांन आणि व्यक्तींकडून जाहिरात शुल्क धोरण ठरवावे, असे सूचित केले.
 
नागपूर शहरातील वस्तीक्षेत्रातील वाढीसाठी अनेक नवीन प्रस्ताव अनेक खासगी विकासकांनी दिलेले आहेत. त्यासंदर्भात १० वर्षाचे धोरण तयार करून नवीन उत्पन्नाचे स्त्रोत तयार करावे व ते मंजुरीकरिता आयुक्तांकडे पाठविण्यात यावे, असे निर्देश सभापती बंगाले यांनी दिले. ३१ मार्चपर्यंत विभागाने १० कोटींचे उद्दीष्ट पूर्ण करावे, असे देखिल निर्देशित केले.

 

 

मनपा शाळेच्या विद्यार्थ्यांनी बघितला ‘पॅडमॅन’

मनपा आणि जेसीआयचा उपक्रम
 
नागपूर,ता.९ : महिला आरोग्याशी संबंधित आणि सामाजिक संदेश देणारा अक्षयकुमार यांचा बहुचर्चित ‘पॅडमॅन’ चित्रपट शुक्रवारी (ता. ९) नागपुरात प्रसारित झाला. हा चित्रपट नागपूर महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना लिबर्टी सिनेमागृहात दाखविण्यात आला.
 
नागपूर महानरपालिका आणि जेसीआयच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  चित्रपट सुरू होण्यापूर्वी आयोजित छोटेखानी कार्यक्रमात आमदार गिरिश व्यास आणि महापौर नंदा जिचकार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
 
महिलांच्या व्यथा, सामान्य स्त्रियांच्या व्यथा ह्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपुढे मांडण्यात आलेल्या आहेत. म्हणून हा चित्रपट विद्यार्थिनींना दाखविण्यात येत असल्याची माहिती या प्रकल्पाचे संचालक सनी फ्रांकोसिस यांनी दिली. मनपाच्या शाळेतील विद्यार्थी सामान्यवर्गातील, गरीब असल्यामुळे स्त्रियांविषयीच्या समस्यांबाबत ते जागृत नसतात. त्यांनी हा सिनेमा बघावा आणि आई-वडिलांनाही हा सिनेमा बघण्यास प्रवृत्त करायला हवे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले. यावेळी मनपाच्या शाळेतील ३०० विद्यार्थ्यांनी या चित्रपटाचा आनंद घेतला. यावेळी आयोजकांच्या वतीने उपस्थित विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकीन वाटण्यात आले.
 
मनपाच्या सर्व शाळेत सॅनिटरी नॅपकीन मशीन्स लावण्यात आलेल्या आहेत. पाच रूपयात सॅनिटरी नॅपकीन मनपाच्या शाळेत उपलब्ध करण्यात आले आहे. ८ ते १० शाळांमध्ये मशीन्स लावण्यात आलेले आहे. बाकी सर्व शाळांमध्ये लवकरच लावण्यात येईल, अशी ग्वाही महापौर नंदा जिचकार यांनी दिली.
 
यावेळी जेसीआयचे मधू नायडू, प्राची भदे, साक्षी बेदी, नवीन मिश्रा, मनपा शाळेतील शिक्षिका सुषमा फुलारी व अन्य शिक्षिका उपस्थित होत्या.
 
मनपातील तीन विद्यार्थी प्रथमच सिनेमागृहात
 
मनपा आणि जेसीआयने केलेल्या आयोजनाच्या निमित्ताने मनपाचे विद्यार्थी सिनेमागृहात गेले. यापैकी तीन विद्यार्थी प्रथमच सिनेमागृहात आले होते. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे त्यांना कधीच चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघण्याची संधी मिळाली नाही. परंतु, या कार्यक्रमाच्या आयोजनामुळे त्यांनी पहिल्यांदा चित्रपटगृहात बसून सिनेमाचा आनंद घेतला.

 

 

“आयुष्यावर बोलू काही”ने जिंकली रसिकांची मने 

महिला उद्योजिका मेळाव्याचा पाचवा दिवस : दुपारच्या सत्रात ई– रिक्षा वर कार्यशाळा
 
नागपूर,ता.८ : जरा  चुकीचे, जरा बरोबर बोलू काही, नसतेस घरी तु जेव्हा, अगं बाई ढगं बाई, दमलेल्या बापाची कहानी यापेक्षा सरस गीतांनी उपस्थित जमलेल्या रसिकांची मने जिंकली. निमित्त होते संदीप खरे आणि सलील कुळकर्णी प्रस्तुत आयुष्यावर बोलू काही कार्यक्रमाचे.
 
नागपूर महानगरपालिका, महिला व बालकल्याण समिती, समाजकल्याण विभाग अंतर्गत आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याच्या पाचव्या दिवशी संदीप खरे आणि सलील कुळकर्णी यांच्या आयुष्यावर बोलू काही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 
यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून सत्तापक्ष नेते संदीप जोशी, धरमपेठ झोनच्या सभापती, गांधीबाग झोनच्या सभापती सुमेधा देशपांडे, कारागृह उपमहानिरिक्षक योगेश देसाई, नगरसेविका शिल्पा धोटे, लता काटगाये, उज्ज्वला शर्मा, प्रगती पाटील, माजी स्थायी समिती सभापती सुधीर (बंडु) राऊत, वैशाली सुधाकर कोहळे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
कार्यक्रमाचे प्रारंभी सलील कुळकर्णी व संदीप खरे यांचे स्वागत सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह भेट देऊन केले.
 
त्यानंतर संदीप खरे यांच्या कविता आणि सलील कुळकर्णी यांचे गायन यांनी उपस्थित रसिकांची मने जिंकली. त्यांच्या प्रत्येक गाण्यांवर रसिकांनी भरभरून दाद दिली.
 
पावसाचे गाणे दूर दूर डोंगराच्या माथ्यावर या गाण्यापासून सुरू झालेली मैफल बात निकले दुर तक जायेंगे, कसे सरतील माझ्याविन दिस तुझे, दुर देशी गेला बाबा अशा एकापेक्षा एक सरस गीतांनी उत्तरोत्तर रंगत गेली. विरह गीत, प्रेम गीत, निसर्ग गीत या सोबतच सलील कुळकर्णी आणि संदीप खरे यांनी गायलेल्या बालगीतांनाही रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. आदित्य आठल्ये यांनी तबल्यावर, अमेय गाडगीळ यांनी किबोर्ड वर साथ दिली.
 
ई- रिक्षा वर कार्यशाळा
 
महिला उद्योजिका मेळाव्याच्या पाचव्या दिवशी खास दिव्यांगांसाठी ई-रिक्षाचे प्रात्याक्षिक राजेश स्टील आणि एस.एस.इंटरप्राईजेसच्यावतीने दाखविण्यात आला. यावेळी ५८ दिव्यांग लाभार्थी उपस्थित होते.
 

 

वेळेत न येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांची दवाखान्याला आकस्मिक भेट
 
नागपूर,ता.८ : दवाखान्याची वेळ उलटून गेल्यावरदेखील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी वर्ग उपस्थित न राहिल्याने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आला आहे. एनयुएचएमच्या साहाय्याने मनपातर्फे शहरात चालविण्यात येणाऱ्या दवाखान्यांना वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती यांनी गुरूवार (ता.८) आकस्मिकपणे भेट दिली. त्यावेळी सदर नोटीस बजावण्यात आले.
 
नागपूर महानगरपालिका टाटा ट्रस्टच्या साहाय्याने शहरातील दवाखान्यांना अत्याधुनिक करण्यात येणार आहे. त्यासंबंधीचा सामंजस्य करारदेखील झाला आहे. त्यादृष्टीने आढावा घेण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी दवाखान्याची स्थिती, कर्मचाऱ्यांचे कामांवरील दुर्लक्ष बघून नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासमवेत वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी, आरोग्य विभागातील नीलेश बांबरे उपस्थित होते.
 
सर्वप्रथम सभापती चापले यांनी इंदोरा चौकातील बेझनबाग येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. तेथील वैद्यकीय अधिकारी व इतर चार कर्मचारी अनुपस्थित असल्याने त्यांच्या उपस्थित पटावर अनुपस्थित हा शेरा लावण्याचे, याचसोबतच त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे निर्देश सभापती मनोज चापले यांनी दिले. यानंतर असा प्रकार आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा सभापती चापले यांनी दिला.
 
त्यानंतर जयताळा येथील एनयुएचएमच्या दवाखान्याला मान्यवरांनी भेट दिली. तेथे देखील असाच प्रकार आढळला. तेथील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी अनुपस्थित असल्याने सभापती चापले यांनी संताप व्यक्त केला. या दवाखान्याची दुरूस्ती करण्यासंदर्भातील आढावा सभापती मनोज चापले यांनी घेतला. फुटाळा येथील दवाखान्याला मान्यवरांनी भेट दिली.

 

 

स्मार्ट सिटी घडविण्यात नागरिकांचे योगदान महत्त्वाचे : आयुक्त अश्विन मुदगल

भरतवाडा, पुनापूर परिसरातील नागरिकांना दिली नगर विकास आराखड्याची माहिती : नागरिकांनीही केल्या सूचना
 
नागपूर, ता. ८ : नागपूर शहराचा ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांतर्गत विकास करण्यासाठी निवड झाल्यानंतर पूर्व नागपुरातील भरतवाडा, पुनापूर, पारडी, भांडेवाडी अंतर्गत येणाऱ्या १७३० एकर क्षेत्रात नगर रचना परियोजना राबविण्याचे कार्य नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यासाठी या संपूर्ण प्रकल्पात नागरिकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अश्विन मुदगल यांनी केले.
 
क्षेत्राधिष्ठीत नियोजनबद्ध व शाश्वत विकासासाठी निवड करण्यात आलेल्या भरतवाडा, पुनापूर, पारडी, भांडेवाडी येथे नगर रचना परियोजना राबविण्यात येत आहे. अहमदाबाद येथील एचसीपी कंपनीने सदर परियोजना तयार केली असून त्याबद्दल परिसरातील नागरिकांना माहिती देण्यासाठी पुनापूर येथील भवानी मंदिर सभागृहात नगर रचना परियोजनेतील प्रस्तावित तरतुदींबाबत जमीन मालकांसोबत विचारविनीमय सभेचे आयोजन गुरुवारी (ता. ८) करण्यात आले होते. या सभेत ते बोलत होते. यावेळी मंचावर पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, लकडगंज झोनचे सभापती दीपक वाडीभस्मे, परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे, आरोग्य समितीचे सभापती मनोज चापले, नगरसेवक बाल्या बोरकर, धम्मपाल मेश्राम, प्रदीप पोहाणे स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, एचसीपीचे गणेश अहिरे उपस्थित होते.
 
आयुक्त अश्विन मुदगल पुढे म्हणाले, शहराचा नियोजनबद्ध विकास नसल्यामुळे प्रत्येकाला अडचण सहन करावी लागते. नागरी सुविधांचा अभाव असतो. मग अशा शहराचा शाश्वत आणि नियोजनबद्ध विकास करायचा असेल तर लोकसहभाग महत्त्वाचा असतो. लोकांचा सहभाग, शासनाचा निधी आणि प्रशासनाचे कार्य यातून ‘स्मार्ट सिटी’ संकल्पना साकार होईल. यासाठी निवड करण्यात आलेल्या १७३० एकर जागेचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी नगर विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी नागरिकांच्या सूचना आमंत्रित असून आपल्या सहभागानेच या आराखड्याला अंतिम रूप द्यायचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
 
आमदार कृष्णा खोपडे यांनी पूर्व नागपुरात सुरू असलेल्या विकास कामांची माहिती आपल्या मार्गदर्शनातून दिली. ते म्हणाले, सध्या सर्वाधिक विकास कामे पूर्व नागपुरात सुरू आहे. सिम्बॉयसिस सारखे विद्यापीठ, आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल पूर्व नागपुरात येत आहे. उड्डाण पुलाची कामे प्रगतीपथावर आहेत. आता एरिया बेस्ड डेव्हलपमेंटच्या माध्यमातून भरतवाडा, पुनापूर, पारडी भागाचा नियोजनबद्ध विकास प्रस्तावित आहे. पुढील टप्प्यात वाठोडा, भांडेवाडी हे क्षेत्रही या प्रकल्पात आणण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
 
लकडगंज झोनचे सभापती यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. पूर्व नागपूरमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत होत असलेल्या नियोजनबद्ध विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे त्यांनी आभार मानले. विकासाच्या प्रत्येक योजनेत या भागातील नागरिक सहकार्य करतील, असे आश्वासन दिले.
 
तत्पूर्वी स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांनी सभा आयोजनामागील भूमिका विषद केली. एरिया बेस्ड डेव्हलपमेंटबाबत उपस्थित नागरिकांना माहिती दिली. त्यानंतर नगर विकास आराखड्याचे प्रारूप तयार करणाऱ्या एचसीपी कंपनीचे गणेश अहिरे यांनी पारडी, भरतवाडा, पुनापूरसाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याबाबत माहिती दिली. सभेला नगरसेविका मनिषा कोठे, अभिरूची राजगिरे, समिता चकोले, वैशाली वैश्य, वंदना भुरे, मनिषा धावडे, जयश्री रारोकर, मनिषा अतकरे, सरीता कावरे, अनिल गेंडरे उपस्थित होते. भवानी देवस्थानच्या विश्वस्त मेहर यांच्या आई चंद्रभागाबाई मेहर यांच्या निधनानिमित्त सभेत शोक व्यक्त करून त्यांना मौन श्रद्धांजली यावेळी वाहण्यात आली.
 
नागरिकांनी केल्या सूचना
 
नगर विकास आराखड्याबाबत माहिती जाणून घेतल्यानंतर सभेला उपस्थित जमीन मालकांनी आपल्या सूचना अधिकाऱ्यांसमोर ठेवल्या. सूचना करणाऱ्या नागरिकांमध्ये सुदाम सहारे, ईश्वर जयस्वाल, रामप्रसाद रहांगडाले, राजेश्वर दिवटे, श्यामसुंदर शमार, जयंतीभाई पटेल, भागवतराव गुरव, हर्षवर्धन नागपुरे, ज्ञानेश्वर काळे, अशोक शिवारे, रमेश भारती, आशीष आष्टनकर, कृष्णा कामडी, अनिल कोडापे, अनिता खोरगडे, चक्रधर अतकरे आदींनी सूचना मांडल्या तर काहींनी विकास आराखड्याबाबत असलेले प्रश्न विचारले. डॉ. रामनाथ सोनवणे यांनी नागरिकांच्या शंकांचे निरसन केले. नियोजनबद्ध आणि शाश्वत विकासाचा प्रकल्प परिसरात राबवित असल्याबद्दल नागरिकांनी आमदार आणि अधिकाऱ्यांचे आभार मानले.

 

 

मनपाच्या मालकीच्या मालमत्तांचा अहवाल तयार करा

महापौर नंदा जिचकार यांचे निर्देश : मालमत्तांमधून उत्पन्नवाढीसंदर्भात घेतला झोननिहाय आढावा
 
नागपूर,ता.८. नागपूर महानगरपालिकेचे उत्पन्न फार कमी आहे. ते उत्पन्न वाढण्यासाठी पदाधिकारी व प्रशासन प्रयत्नरत आहेत. शहरात अनेक ठिकाणी मनपाच्या मालकीच्या मालमत्ता आहे. त्यापासून मनपाला उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे मनपाच्या मालकीच्या मालमत्तांचा अहवाल तयार करून सादर करा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी प्रशासनला दिले.
 
नागपूर महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास यांच्या अख्यतारीत येणाऱ्या समाजभवन, शाळा, उद्याने, ग्रंथालय, वाचनालय, व्यायामशाळा, बाजार आदीसंदर्भातील आढावा घेण्यासाठी गुरूवारी (ता.८) महापौर कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला उपमहापौर दीपराज पार्डीकर, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, मुख्य अभियंता विजय बनगीरवार, कार्यकारी अभियंता संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता अनिरूद्ध चौंगजकर, सी.जी.धकाते, डी.डी.जांभूळकर, नासुप्रचे कार्यकारी अभियंता संजय चिमोटे, प्रमोद धनकर प्रामुख्याने उपस्थित होते.
 
यावेळी महापौरांनी झोननिहाय असलेल्या मनपाच्या मालकीच्या मालमत्तांचा आढावा घेतला. यापासून कसे उत्पन्न वाढेल यावर बैठकीत चर्चा करण्यात आली. शहरातील मनपाच्या पुरातन वास्तूंना मी स्वत: लवकरच भेट देईन, असे महापौर नंदा जिचकार यांनी सांगितले. मनपाच्या वास्तूंचा अहवाल मला सादर करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी सर्व झोन सहायक आयुक्तांना दिले. बैठकीला मनपाच्या लक्ष्मीनगर झोनचे सहायक आयुक्त सुवर्णा दखणे, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे, हनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे, धंतोली झोनच्या सहायक आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) स्मिता काळे, नेहरूनगर झोनचे सहायक आयुक्त राजेश कराडे, सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त प्रकाश वऱ्हाडे, आसीनगर झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड प्रामुख्याने उपस्थित होते.

 

 

शासकीय मालमत्ता, विवादित मालमत्तांच्या थकीत कराबाबत ठोस निर्णय घ्या : अविनाश ठाकरे

कर आकारणी समितीच्या बैठकीत निर्देश
 
नागपूर, ता. ८ : प्रत्येक झोनअंतर्गत येणाऱ्या शासकीय आणि विवादित मालमत्तांकडे असलेल्या थकीत करासंदर्भात तातडीने कार्यवाही करा. ठोस निर्णय घ्या आणि मार्चपूर्वी वसुली करा, असे निर्देश कर आकारणी समितीचे सभापती अविनाश ठाकरे यांनी संबंधित झोनच्या सहायक आयुक्तांना दिले.
 
मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात गुरुवारी (ता. ८) कर आकारणी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत त्यांनी सदर निर्देश दिले. बैठकीला समितीच्या उपसभापती यशश्री नंदनवार, सदस्य सोनाली कडू, वंदना भुरे, परसराम मानवटकर, तानाजी वनवे, कर व कर आकारणी विभागाचे सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम, सहायक आयुक्त सर्वश्री महेश मोरोणे, गणेश राठोड, प्रकाश वऱ्हाडे, अशोक पाटील, राजेश कराडे, राजू भिवगडे, हरिश राऊत, सुभाष जयदेव, सुवर्णा दखने, स्मिता काळे उपस्थित होत्या.
 
सभापती अविनाश ठाकरे यांनी झोननिहाय शासकीय मालमत्ता, विवादित मालमत्ता आणि न्यायालयात प्रविष्ठ असलेल्या प्रकरणासंदर्भात आढावा घेतला. या मालमत्तांच्या वसुलीचा आकडा मोठा असून त्या वसुलीवर लक्ष केंद्रीत करा, असे निर्देश त्यांनी दिलेत. यापूर्वी झोननिहाय घेतलेल्या बैठकीत ठरविल्याप्रमाणे झोन कार्यालयातून किती मालमत्तांना पेशी नोटीस गेली, कितींवर सुनावणी झाली आणि त्यातून किती वसुली झाली याबाबतचाही आढावा सभापती ठाकरे यांनी घेतला.
 
कर निर्धारण झालेल्या मालमत्तांचे
 
१८ पर्यंत डिमांड पाठविण्याचे निर्देश
 
बैठकीत प्रारंभी मालमत्ताचे सर्वेक्षण करणारी कंपनी सायबरटेकच्या अधिकाऱ्यांकडून सर्वेबाबतचा आढावा घेण्यात आला. सायबरटेकच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत २,४३,१३६ मालमत्तांची माहिती एकत्रित झाली असून १,७३,६८३ मालमत्तांना कराची डिमांड पाठविण्यात आली आहे. कर निर्धाण झालेल्या उर्वरीत मालमत्तांच्या डिमांड १८ फेब्रुवारीपर्यंत पाठविण्याचे निर्देश सभापती ठाकरे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
 
मोबाईल ॲपचे सादरीकरण
 
यापुढे नागरिकांना त्यांच्या मालमत्तांच्या करासंदर्भातील माहिती ॲपद्वारे मिळणार आहे. याबाबतचे सादरीकरण बैठकीत करण्यात आले. आपला मालमत्ता कर कशाप्रकारे लागला आहे, तो जर आपल्याला कमी अथवा जास्त वाटत असेल तर त्यासंदर्भातील सूचना मनपाला ॲपद्वारेच देता येईल. आपल्या कर या ॲपद्वारेच भरता येईल. असे सर्वपयोगी ॲप लवकरच जनतेच्या सेवेत येणार असल्याची माहिती सभापती अविनाश ठाकरे यांनी दिली.

 

 

भजनसंध्येने रसिक भक्तिरसात झाले चिंब

प्रसन्न जोशी यांची भजनसंध्या व गजल : उद्योग मेळाव्यातील गर्दी वाढली
 
नागपूर, ता. ७ :  एकापेक्षा एक भक्तिरसाने ओतप्रोत भजनांनी आज रसिकांना भक्तिरसात चिंब भिजविले. रेशीमबाग मैदानावर नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित महिला उद्योजिका मेळाव्यात प्रसन्न जोशी यांनी सादर केलेल्या भजनसंध्येने मेळाव्याचा चौथा दिवस गाजविला.
 
मनपाच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वर्षा ठाकरे यांनी  गायक कलावंत प्रसन्न जोशी यांचे शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि तुळशीचे रोपटे देऊन स्वागत केले. यावेळी मंचावर महिला व बालकल्याण समितीच्या सदस्या दिव्या धुरडे, वंदना भगत, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी सर्व कलावंतांचे स्वागत केले. यानंतर भजनसंध्या आणि गजल कार्यक्रमाला सुरुवात झाली. गणेश स्तवनाने  गायक कलावंत प्रसन्न जोशी यांनी सुरुवात केल्यानंतर एकापेक्षा एक सरस भजन आणि गझल त्यांनी सादर केल्या. झुकी झुकी सी नजर , रंजीशे सही, छुपके छुपके रात दिन, हम तेरे शहर में आये है  अशा एका पेक्षा एक सरस गजलांवर रसिक श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. प्रसन्न जोशी यांच्या गजलांना डॉ.देवेंद्र यादव यांनी तबल्यावर, उस्ताद नासीर खान यांनी सतारवर, राहूल मानेकर यांनी हार्मोनियमवर, सौरभ किल्लेदार यांनी की बोर्डवर, अरविंद उपाध्याय यांनी बासरीवर यांनी साथ दिली.
 
स्टॉल्सवरील गर्दी वाढली
 
नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याच्या चौथ्या दिवशी नागपूरकरांनी चांगलीच गर्दी केली. मेळाव्यात विदर्भातील विविध बचत गटांच्या उत्पादनांचे सुमारे ३०० स्टॉल्स लागले आहेत. या सर्व स्टॉल्सवर दुपारपासूनच चांगली गर्दी होती. मेळाव्यात आलेल्या महिलांनी उत्कृष्ट आयोजनाबद्दल गौरवोद्‌गार काढले. सर्व स्टॉल्स दुपारी १२ वाजतापासून रात्री १० पर्यंत नागपूरकरांकरिता खुले असल्याची माहिती महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वर्षा ठाकरे यांनी दिली.
 
पाककृती कार्यशाळा
 
महिला उद्योजिका मेळाव्याच्या चौथ्या दिवशी दुपारच्या सत्रात पाककृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जयम त्रिवेदी यांनी विना अंड्याचा केक, सॅंडविच, समोसे आदींच्या पाककृती सादर केल्या.

 

 

नगर रचना परियोजनेची माहिती देण्यासाठी ८ फेब्रुवारीला पुनापूर येथे बैठक
 
स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे आयोजन
 
नागपूर,ता. ७ : लोकांच्या जीवनमानाचा दर्जा सुधारण्यासाठी स्वच्छ, शाश्वत व पर्यावरणपूरक शहरे तयार करण्यासाठी केंद्र शासनातर्फे ‘स्मार्ट सिटी अभियान’ या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा करण्यात आली आहे. नागपूर शहरात भरतवाडा, पुनापूर, पारडी, भांडेवाडी अंतर्गत १७३० एकर क्षेत्रात नगर रचना परियोजना राबविण्याचे आणि तयार करण्याचे कार्य नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनतर्फे करण्यात येत आहे. या योजनेविषयी माहिती देण्यासाठी गुरुवार ८ फेब्रुवारी रोजी पुनापूर येथील भवानी माता मंदिर सभागृहात दुपारी १२.३० वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सदर बैठकीला प्रस्तावित नगर रचना परियोजना क्षेत्रातील सर्व जमीन मालक, भोगवटदार, मिळकतीमधील हितसंबंधी आदींनी स्वत: किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अश्विन मुदगल यांनी केले आहे.
 

 

महिला उद्योजिका मेळाव्यात स्त्री शक्तीचा जागर

फॅशन शो मुळे महिला उद्योजिका मेळाव्यात रंगत
 
नागपूर,ता.६. गणेश वंदना, अलताफ बॅण्ड, फॅशन शो ने कार्यक्रमात रंगत आणली. निमित्त होते ते नागपूर महानगरपालिका, महिला व बालकल्याण समिती, समाजकल्याण विभागातर्फे आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याचे. रेशीमबाग मैदान येथे सुरू असलेल्या महिला उद्योजिका मेळाव्यात तिस-या दिवशी “जागर स्त्री शक्तीचा” युनिक कल्चरल सोशल फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते.
 
कार्यक्रमला प्रमुख अतिथी म्हणून क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, दिल्ली भाजपाच्या सीमा निगम, सरिता नांदुरकर, माजी महिला व बालकल्याण समिती सभापती रश्मी फडणवीस, कल्पना बाजारे, हर्षला भोसले, महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, समिती सदस्या दिव्या धुरडे, वंदना भगत, उपायुक्त डॉ.रंजना लाडे यावेळी मंचावर उपस्थित होते.
 
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचे सत्कार महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरूवात झाली. देवा श्री गणेशा या गाण्यावर  नृत्य सादर केले. अलताफ बॅंड ने गणेश स्तवन, हिंदी, मराठी गाणी सादर केली. बॅंड, गिटार, बासरी यांच्या तालावर गणनायका, लग जा गले, छुकर मेरे मन को यांच्यासह अनेक चित्रपट गीतांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. अप्सरा आली या लावणीच्या ठेक्यावर फॅशन शो व नृत्य सादर करण्यात आले.
 
उद्या बुधवार (ता.७) कार्यक्रमाच्या मालिकेत प्रसन्न जोशी व सहायक कलाकार यांचा भजनसंध्या व गजल कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे यांनी केले आहे.

 

 

सभापती मनोज चापले यांनी घेतला स्वच्छतेसंदर्भात आढावा

नागपूर,ता.६. पुढील आठवड्यात शहरात स्वच्छ सर्वेक्षण सुरू होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छतेसंदर्भातील आढावा नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांनी मंगळवारी (ता.६) ला मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित बैठकीत घेतला.
 
बैठकीला समिती सदस्य लखन येरावार, विजय चुटेले, विशाखा बांते, भावना लोणारे, आशा नेहरू उईके, वंदना चांदेकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी, हत्तीरोग व हिवताप विभाग प्रमुख जयश्री थोटे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
यावेळी मागील जानेवारी महिन्याच्या सभेत ठरलेल्या कार्यवाहीला मंजूरी देण्यात आली. आरोग्य विभागाद्वारे स्वच्छतेसंदर्भातील केलेल्या कामाचा सभापतींनी झोननिहाय आढावा घेतला. 
 
मनपाच्या ठरावानुसार ओपीडी क्लिनिक व्यवसायिक नामांकनासाठी सर्वंसमावेशक धोरण ठरविण्याबाबत चर्चा करण्यात आली. सभेत ठरल्याप्रमाणे नामांकनासाठी शुल्क आकरण्यात येत आहे. हे शुल्क एप्रिल २०१८ पासून आकरण्यात यावे, असे निर्देश सभापती चापले यांनी दिले. तसेच क्लिनिक नामांकनासाठीची एक नवीन समिती गठीत करण्यात यावी, ज्यात सभापती अध्यक्ष असतील. त्या समितीमध्ये उपायुक्त, स्वच्छता अधिकारी, एक नगररचना विभागाचा प्रतिनिधी, एक आयएमएचा प्रतिनीधीचा समावेश असेल, असे निर्देश सभापती चापले यांनी दिले. ही संयुक्त समिती गठीत झाल्यावर निर्णय घेऊऩ मनपाच्या सर्व साधारण सभेपुढे मंजूरीकरीता पाठविण्यात यावी, असे आदेश चापले यांनी दिले. यानंतर सभापतींनी स्वच्छ भारत अंतर्गत केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. हत्तीरोग व हिवताप विभागाची माहिती जयश्री थोटे यांनी दिली. कनक संदर्भात नगरसेविकांनी केलेल्या तक्रारींचा निपटारा दोन दिवसात करण्याचे निर्देशदेखील सभापती चापले यांनी दिले.

 

 

घटकाभर बसा आणि पोटभर हसा

राजेश चिटणवीस यांच्या नकला, स्टॅंड अप कॉमेडीने वाढविली रंगत
 
नागपूर,ता.५. बोली भाषेचा लहजा, त्यातून निर्माण झालेले विनोद, नकलांची बरसात आणि या सर्व कॉमेडीवर पोटधरून हसणारे रसिक असे चित्र आज (ता.५) रेशीमबाग मैदानावर अनुभवायला मिळाले.
 
निमित्त होते नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित विदर्भस्तरीय महिला उद्योजिका मेळाव्यात दुस-या दिवशी सादर झालेल्या “घटकाभर बसा आणि पोटभर हसा” या कार्यक्रमाचे. महिला उद्योजिका मेळाव्याच्या आजच्या दुस-या दिवशी राजेश चिटणवीस प्रस्तुत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 
प्रारंभी कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली. उपमहापौर दीपराज पार्डीकर हे आजच्या कार्यक्रमाचे विशेष अतिथी होते. महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, सदस्या दिव्या धुरडे, वंदना भगत, उपायुक्त डॉ. रंजना लाडे यावेळी मंचावर उपस्थित होते. सभापती वर्षा ठाकरे यांनी शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन उपमहापौर पार्डीकर यांचे स्वागत केले. नकलाकार राजेश चिटणवीस यांचा सत्कार उपमहापौर दीपराज पार्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर विनोदाच्या दणक्यात कार्यक्रमाला सुरूवात झाली. राजेश चिटणवीस यांनी आपल्या अफलातून नकलांनी रसिकांना पोटभर हसवले. अमोल एदलाबादकर यांनी स्टॅंड अप कॉमेडीने रसिकांना खिळवून ठेवले. गाण्यातून, दैनंदिन बोलण्यातून निर्माण होणारे विनोद, मिमिक्री आदीवर रसिकांनी भरभरून दाद दिली.
 
वैभव नदाने, आकाश दुधनकर यांनीही कार्यक्रमात रंगत आणली. संपूर्ण कार्यक्रमाला सीमा गोडबोले यांनी आपल्या निवेदनातून एकसूत्रात बांधले.

 

 

त्रिमूर्तीनगर अग्निशमन केंद्र बांधकामातील अडथळे तातडीने दूर करा : संजय बालपांडे

अग्निशमन व विद्युत समितीची आढावा बैठक
 
नागपूर,ता.५ : त्रिमूर्ती नगर येथे निर्माणाधीन असलेल्या अग्निशमन स्थानकाच्या बांधकामात विलंब होत आहे. बांधकामात येणारे अडथळे तातडीने दूर करण्यात यावे, असे निर्देश अग्निशमन व विद्युत समिती सभापती संजय बालपांडे यांनी दिले. सोमवारी (ता.५) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
 
यावेळी उपसभापती प्रमोद चिखले, विरेंद्र (विक्की) कुकरेजा, लहुकुमार बेहते, राजकुमार साहू, हरीश ग्वालबंशी, सदस्या वनिता दांडेकर, ममता सहारे, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजीव जैस्वाल, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, विद्युत विभागाचे सलीम इकबाल, ए.एस.मानकर प्रामुख्याने उपस्थित होते.
 
त्रिमूर्ती नगर येथील स्थानकाच्या बांधकामाजवळ महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे ट्रान्सफार्मर आहे. त्यामुळे कामात सातत्याने अडथळा येत आहे. त्यासंदर्भात वीज कंपनीशी चर्चा केली असता त्यांनी आठ लाख रूपये भरणा करण्यास सांगितल्याची माहिती कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर यांनी दिली. यावर, आठ लाखाचा भरणा वीज कंपनीकडे तातडीने करण्याचे निर्देश सभापती बालपांडे यांनी दिले. त्याचप्रमाणे लकडगंज, वाठोडा येथील स्थानक बांधकामाचा आढावा सभापतींनी घेतला. वाठोडा येथे सुरू असलेल्या स्थानकाचे नकाशे कार्यकारी अभियंता नरेश बोरकर यांनी समितीपुढे सादर केले. वाठोडा येथील बांधकामासाठी नगररचना विभाग, अग्निशमन विभागाची मंजुरी मिळाली असल्याची माहिती बोरकर यांनी दिली.
 
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम अंतर्गत अग्निशमन शुल्क आकारणी व्यतिरिक्त इतर कार्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क वाढीसंदर्भात समितीपुढे विभागाने प्रस्ताव सादर करण्यात आला. त्या प्रस्तावावर चर्चा करून त्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली.
 
नागपूर महानगरपालिकेद्वारे सुरू करण्यात आलेल्या सोलर वॉटर हिटर व इतर योजनांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. सोलर वॉटर हिटर योजनेकरिता केंद्र सरकारने ५० टक्के अनुदान दिले होते. परंतु नागरिकांचा प्रतिसाद अल्प होता. आतापर्यंत ३४५० पैकी २७५५ नागरिकांना सोलर वॉटर हिटर वाटप करण्यात आले असून उर्वरित प्रक्रिया सुरू असल्याची माहिती कार्यकारी अभियंता संजीव जैस्वाल यांनी दिले.  बैठकीला सर्व स्थानक अधिकारी उपस्थित होते.

 

 

नागपुरातील नव्या बाजारांत बचत गटांना २५० दुकाने – नितीन गडकरी

महिला उद्योजिका मेळाव्याचे थाटात उद्घाटन : पहिल्याच दिवशी लोककलांची मेजवानी
 
नागपूर,४. नागपूर शहरात उत्तम उद्याने, खेळ मैदाने, स्मशानभूमी आणि बाजार तयार व्हावे हे आपले स्वप्न आहे. महानगरपालिकेच्या मालकीच्या बाजारांच्या जागेवर लवकरच सर्व सोयींनीयुक्त अत्याधुनिक बाजार तयार होतील, त्याची प्रक्रिया सुरू आहे. या बाजारांमध्ये महिला बचतगटांच्या सुमारे २५० दुकाने महापौरांनी उपलब्ध करून द्यावेत. यासाठी आवश्यक ते सहकार्य आम्ही करू असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
 
नागपूर महानगरपालिका, महिला व बालकल्याण समिती, समाजकल्याण विभाग, दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजिविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने रेशीमबाग मैदानावर आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार होत्या. विशेष अतिथी म्हणून खासदार रूपा गांगुली उपस्थित होत्या. व्यासपीठावर पश्चिम नागपूरचे आमदार सुधाकर देशमुख, दक्षिण नागपूरचे आमदार सुधाकर कोहळे, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, आयुक्त अश्विन मुदगल, महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, उपसभापती श्रद्धा पाठक, समिती सदस्या दिव्या धुरडे, वंदना भगत, हनुमानगर झोन सभापती भगवान मेंढे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, सुनील हिरणवार, नगरसेविका चेतना टांक, शीतल कामडे, उषा पॅलट, नगरसेवक सतीश होले, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, हनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
पुढे बोलताना ना.नितीन गडकरी म्हणाले, महिला बचत गटांच्या उत्पादनांना मार्केट मिळवून देण्याच्या दृष्टीने असे कार्यक्रम उपयुक्त ठरतात. उद्योगासाठी प्रेरणा देतात. या क्षेत्रात काम करताना महिलांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. चांगले काम, खरे बोलणे आणि उत्पादनाची गुणवत्ता हे कुठल्याही व्यवसायासाठी आवश्यक असतात, असे म्हणत त्यांनी मेळाव्यासाठी आयोजक आणि सहभागी बचतगटांच्या शुभेच्छा दिल्या.
 
खासदार रूपा गांगुली म्हणाल्या, महिला आणि नागरिकांना सामाजिक सन्मान मिळायलाच हवा. घरोघरी शौचालय बांधण्याचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मांडला. त्याला मूर्तस्वरूप दिले आणि पहिल्यांदा महिलांना सामाजिक सन्मान प्राप्त झाला. उद्योग क्षेत्रातच नव्हेतर आता प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर होत आहेत. ही समाजासाठी अभिमानाची बाब आहे. नागपूर शहरात नितीन गडकरी यांच्यासारखे भातृतुल्य नेतृत्व लाभणे हा नागपूरचा सन्मान आहे, या शब्दात त्यांनी गडकरी यांचा गौरव केला.
 
अध्यक्षस्थानावरून बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, महिला उद्योजिका राष्ट्रनिर्माणासाठी मदत करते. घरात जर उद्योजिका असली तर घरातील बालकांवर आपसूकच चांगले संस्कार घडतात. नागपूर महानगरपालिकेने आयोजित केलेले त्या मेळाव्यासाठी सात दिवस पुरेसे नाही. महिला बचत गटांच्या महिलांना प्रशिक्षण मिळावे यासाठी कायमस्वरूपी प्रशिक्षण केंद्र आणि बाजरपेठ मिळावे यासाठी कायमस्वरूपी बाजार व्हावा, यासाठी आमचे प्रयत्न आहे आणि त्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. यासाठी राज्य शासनाची मदत घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
तत्त्पूर्वी दीपप्रज्वलन करून उपस्थित मान्यवरांनी मेळाव्याचे उद्घाटन केले. प्रास्ताविकातून महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे यांनी मेळाव्याच्या आयोजनामागची भूमिका विशद केली. नागपूर महानगरपालिकेतर्फे प्रथमच विदर्भस्तरावर उद्योजिका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून विविध उत्पादनांचे ३०० स्टॉलस लागले आहेत. यावेळी खासदार रूपा गांगुली यांचा आयोजकांच्यावतीने सभापती वर्षा ठाकरे यांनी साडीचोळी व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला. नामदार नितीन गडकरी व अन्य मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन रेणूका देशकर यांनी केले. आभार समिती सदस्या दिव्या धुरडे यांनी मानले. कार्यक्रमाला मनपाचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
 
कर्तृत्ववान महिला व खेळाडूंचा गौरव
 
नागपूर महानगरपालिकेतर्फे आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याच्या इतिहासात प्रथमच कर्तृत्ववाने महिलांचा व शहरातील खेळाडूंचा नामदार नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महिला सत्कारमूर्तींमध्ये सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा वाघमारे, महिला क्रिकेट संघातील खेळाडू मोना मेश्राम, कृषी कीटकतज्ज्ञ संगिता सव्वालाखे, बॅंकिग क्षेत्रातील नीलिमा बावणे, राज्य महिला आयोगाच्या सदस्या नीता ठाकरे, स्कूल व्हॅन चालक तनुजा अरबाज खान, अनसूया बचत गटाच्या रेखा कामडे, लता धकाते, तारा बावणे, पाककला विशारद अपर्णा कोलारकर, वैद्यकीय साहित्य तयार करणा-या शिल्पा गणवीर, मुलांना घडवणारी आई चंद्रकला चिकाणे, मूक बधीर शाळेच्या आदर्श शिक्षिका मीनल सांगोळे यांचा समावेश होता. तर सत्कारमूर्ती खेळाडूंमध्ये बुद्धीबळपटू दिव्या देशमुख, रौनक साधवानी, मृदूल डेहनकर, बॅडमिंटनपटू ऋतिका ठक्कर, खो-खो पटू राहुल सहारे, कराटेपटू साक्षी साहू, रेजू कुशवाह, देशज वैष्णव, दिलीप कावरे, सायकलपटू रजनी राऊत, रामायण स्पर्धेत अव्वल येणार अरबाज पप्पू कुरेशी, हॉकीपटू तौफिक अहमद, शहनाज खान, अथलेट अहफाज खान, बॅडमिंटनपटू सौरभ ईन्हानकर आणि आगीतून एकाचे प्राण वाचविणारा अविनाश शेंडे यांचा समावेश होता.
 
महाराष्ट्रीय लोककलेची सांस्कृतिक मेजवानी
 
उद्घाटनसमारंभानंतर महाराष्ट्राच्या लोककलेची ओळख करून देणा-या सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी रसिकांनी देण्यात आली. नांदी आणि गणेशस्तवनाने सुरूवात झालेल्या कार्यक्रमात ओवी, भूपाळी, जोगवा, गोंधळ, लावणी, कोळीनृत्य, गवळण आदी लोककलांच्या सादरीकरणाने रंगत आणली. सोमवारी ५ फेब्रुवारी सांयकाळी ६.३० वाजता राजेश चिटणवीस प्रस्तुत “घटकाभर बसा आणि पोटभर हसा” या विनोदी स्कीटचे सादरीकरण आहे.

 

 

विदर्भातील महिला बचत गटांचा सहभाग असलेला ‘उद्योजिका मेळावा’ ४ पासून

नागपूर महानगरपालिकेचे आयोजन : ३०० स्टॉल्स, सांस्कृतिक कार्यक्रमांचे मेजवानी
 
नागपूर,ता. ३ : नागपूर महानगरपालिका समाजकल्याण विभाग, महिला व बालकल्याण समिती, दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजीविका केंद्राच्या वतीने विदर्भातील महिला बचत गटांच्या उत्पादनांची प्रदर्शनी व विक्री अंतर्भूत असलेला महिला उद्योजिका मेळावा रविवार (ता. ४) पासून सुरू होत आहे. रेशीमबाग मैदानावर आयोजित या मेळाव्यात सुमारे ३०० स्टॉल्स राहणार असून दररोज सायंकाळी प्रख्यात कलावंतांचा समावेश असलेल्या मनोरंजनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वर्षा ठाकरे यांनी राजे रघुजी भोसले नेताजी नगर भवन येथे आयोजित पत्रपरिषदेत दिली.
 
पत्रपरिषदेला स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, स्थापत्य समितीचे सभापती संजय बंगाले, माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, महिला व बालकल्याण समितीच्या सदस्या दिव्या धुरडे, वंदना भगत उपस्थित होते.
 
मेळाव्याच्या आयोजनासंदर्भात माहिती देताना सभापती वर्षा ठाकरे पुढे म्हणाल्या, मेळाव्याचे उद्‌घाटन ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील. विशेष अतिथी म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रूपा गांगुली उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार राहतील. खासदार अजय संचेती, खासदार डॉ. विकास महात्मे, आ. नागो गाणार, आ. प्रकाश गजभिये, आ. जोगेंद्र कवाडे, आ. प्रा. अनिल सोले, आ. गिरीश व्यास, आ. सुधाकर देशमुख, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. सुधाकर कोहळे, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, आयुक्त अश्विन मुदगल, जि.प.च्या सीईओ कादंबरी बलकवडे, वर्धेच्या सीईओ नयना गुंडे, बसपा पक्षनेता शेख मोहम्मद जमाल, राकाँ पक्षनेता दुनेश्वर पेठे, शिवसेना पक्षनेता किशोर कुमेरिया, हनुमाननगर झोन सभापती भगवान मेंढे, माजी महापौर प्रवीण दटके, नगरसेविका उषा पॅलट, नगरसेवक सतीश होले, डॉ. रवींद्र भोयर, शीतल कामडी, अपर आयुक्त डॉ. आर. झेड. सिद्दीकी, अपर आयुक्त रवींद्र कुंभारे यांची उपस्थिती राहील.
 
समारोप ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता होईल. दररोज सायंकाळी ६.३० वाजता सांस्कृतिक व मनोरंजनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ४ फेब्रुवारी रोजी उद्‌घाटन सोहळ्यानंतर महाराष्ट्रीयन लोककलेवर आधारीत कार्यक्रम राहील. ५ फेब्रुवारीला राजेश चिटणवीस प्रस्तुत घटकाभर बसा आणि पोटभर हसा, ६ फेब्रुवारी रोजी जागर स्त्रीशक्तीचा, ७ फेब्रुवारी रोजी प्रसन्न जोशी प्रस्तुत भजनसंध्या आणि गजल, ८ फेब्रुवारी रोजी संदीप खरे आणि सलील कुलकर्णी प्रस्तुत ‘आयुष्यावर बोलू काही’, ९ फेब्रुवारी रोजी उमंग, १० फेब्रुवारी रोजी भरत जाधव, गिरीश ओक, शिवाणी रांगोळे प्रस्तुत ‘वेलकम जिंदगी’ आणि समारोपीय कार्यक्रमानंतर ११ फेब्रुवारी रोजी मराठी-हिंदी सिने गीतांचा कार्यक्रम ‘आरोही’ सादर करण्यात येईल. या सर्व कार्यक्रमाला नागपूरकर जनतेने हजेरी लावावी, असे आवाहन महिला बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे आणि हनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे यांनी केले आहे. 
 

 

२०० चौ.मी.पर्यंतच्या क्षेत्रफळाच्या भूखंडांच्या मंजुरीचे अधिकार आर्किटेक्टकडे सुपूर्द करा : संजय बंगाले

नगररचना विभागाला निर्देश : स्थापत्य व प्रकल्पांचा घेतला आढावा
 
नागपूर,ता.२. नागपूर महानगरपालिकेच्या अखत्यारीत असणाऱ्या २०० चौ.मी. पर्यंत क्षेत्रफळ असणाऱ्या मोकळ्या भूखंडांच्या मंजुरीचे अधिकार आर्किटेक्टकडे सुपूर्द करण्याचे निर्देश स्थापत्य समिती सभापती संजय बंगाले यांनी दिले. बुधवार (ता.३१) ला मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित स्थापत्य व प्रकल्प समितीच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते.
 
यावेळी बैठकीत समिती उपसभापती अभय गोटेकर, सदस्या सुषमा चौधरी, रश्मी धुर्वे, शेख मो.जमाल मो. इब्राहीम, स्मार्ट सिटी, हॉटमिक्स विभागाचे अधिकारी, नगररचना विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
 
नगररचना विभागात या आर्थिक वर्षात मंजूर केलेल्या इमारतीच्या मंजूर नकाशाची संख्या व त्यापासून मिळालेले उत्पन्न याचा आढावा घेण्यात आला. ८३० प्रकरणातून २३० प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. आतापर्यंत ७२ कोटी ८२ लक्ष उत्पन्न आहे. मार्च २०१८ पर्यंत ९० कोटी उत्पन्न अपेक्षित आहे. सन २०१७-१८ ची मिळकत १०५ कोटी इतकी असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
 
या चालू वर्षात देण्यात आलेल्या टीडीआर संख्येचा आढावा यावेळी सभापतींनी घेतला. आतापर्यंत सन २०१७-१८ या वर्षात १० भूखंडांना टीडीआर देण्यात आलेला आहे. नागरिकांना चांगली, पारदर्शक आणि जलद विकास परवानगी सेवा देण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासंदर्भात बैठकीत आढावा घेण्यात आला.
 
सर्व रस्त्यांवरील खोदकामाच्या जागी संबंधित संस्थेकडून काम किती दिवसात पूर्ण होईल याचे सूचना फलक लावण्यात यावे, असे निर्देश संजय बंगाले यांनी दिले.       
 

 

बर्डी ते बीडगाव फाटा बससेवेचा शुभारंभ

पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दाखविली हिरवी झेंडी
 
नागपूर,ता.२ :  नागपूर महानगरपालिका परिवहन विभागाद्वारे बर्डी ते बीडगाव फाटा शहर बसचा शुभारंभ पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते बुधवार (ता.१) ला तरोडी येथे झाला. यावेळी परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
बर्डी ते बीडगाव शहर बस सुरू करण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून सातत्याने मागणी होत होती. परिवहन समिती सभापती बंटी कुकडे व परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी पुढाकार घेऊन ही बस सेवा सुरू केली. ही बस सेवा सुरू झाल्यामुळे स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
 
बर्डी ते शिवनी ही बससेवा बीडगाव मार्गे बिडगाव फाटा, तरोडी गाव, खेडी, तितूर फाटा मार्गे बर्डी अशी धावणार आहे. या बसचे प्रवासी भाडे पूर्ण ३० रूपये, अर्धे तिकीट १५ रूपये इतके आहे. बर्डीवरून पहिली बस सकाळी ९.३० वाजता तर शेवटची बस दुपारी ३.३० वाजता सुटणार आहे. बीडगाव फाटावरून ही बस सकाळी ११.०० वाजता तर शेवटची बस संध्याकाळी ५.२० वाजता सुटणार असल्याची माहिती परिवहन विभागाचे रामराव मातकर यांनी दिली.
 
कार्यक्रमाला रमेश चिकटे, विनोद पाटील, अनिता चिकटे, अरविंद फुलझेले, बंडु ठाकरे, रमेश चांभारे, मंदाताई मुब्बा, लिलाताई काळे, निशाताई सावरकर, मनोहर चिकटे प्रामुख्याने उपस्थित होते.     
 

 

ऊर्जा बचत ही काळाची गरज – प्रा. अनिल सोले

मनपा व ग्रीन व्हिजील फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोर्णिमा दिवस साजरा
 
नागपूर,ता.1. पर्यावरण संवर्धन आणि येणा-या पिढीसाठी ऊर्जाबचत करणे गरजेचे आहे. ऊर्जा बचत ही काळाची गरज आहे. ऊर्जाबचतीसाठी नागपूर महानगरपालिका व ग्रीन व्हिजील फाऊंडेशन ऊर्जा बचतीसाठी पोर्णिमा दिनानिमित्त अनावश्यक दिवे बंद ठेवण्यासाठी नागरिकांना आवाहन करत आहे, तसेच शहरात विविध ठिकाणी पोर्णिमा दिवस साजरा करण्यात येत असल्याने ऊर्जेची बचत होत असल्याची नोंद मनपा विद्युत विभागाकडे आहे. ऊर्जा बचतीच्या या यज्ञात प्रत्येकाची आहुती गरजेची असल्याचे मत आमदार व माजी महापौर प्रा. अनिल सोले यांनी व्यक्त केले.
 
पोर्णिमा दिनानिमित्त गरोबा मैदान दीघोरीकर चौक येथे नागपूर महानगरपालिका व ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या वतीने आयोजित पौर्णिमा दिवसाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी माजी महापौर प्रवीण दटके, वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती मनोज चापले, मनपातील विद्युत विभागाचे अजय मानकर, ग्रीन व्हिजीलचे कौस्तभ चॅटर्जी प्रामुख्याने उपस्थित होते.
 
परिसरातील प्रतिष्ठाने, चौकातील दिवे आदी विद्युत उपकरणे बंद ठेवून पोर्णिमा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी स्वयंसेवकांनी सिग्नलवर उभ्या राहणा-या वाहन चालकांनाही या दिनानिमित्त आयोजित उपक्रमाची माहिती देऊन सहभागी होण्यासाठी आवाहन केले. नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी सुरभी जैस्वाल, बिष्णू यादव, संजीवनी गोंदोडे, अभय पौनीकर, स्मिताली उके प्रामुख्याने उपस्थित होते.

 

 

प्रदूषणावर आळा घालण्यासाठी मनपाचा ॲक्शन प्लॅन

मनपा, नीरी, प्रादेशिक परिवहन विभागाचा संयुक्त उपक्रम
 
नागपूर,ता.१ : शहरातील वाढत्या प्रदूषणावर आळा घालण्यासाठी नागपूर महानगरपालिकेतर्फे ‘ॲक्शन प्लॅन’ तयार करण्यात येणार आहे. महानगरपालिका, नीरी, प्रादेशिक परिवहन विभागाचा संयुक्त विद्यमाने कृती आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती नागपूर महानगरपालिकेचे मुख्य अभियंता विजय बनगिरवार यांनी दिली.
 
यावेळी अधीक्षक अभियंता दीपक सोनटक्के, शहर अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता अनिरूद्ध चौगंजकर, प्रादेशिक परिवहन विभागाचे सुबोध देशपांडे, वायू प्रदूषण नियत्रंण मंडळाचे मुख्य अधिकारी पद्मा राव, ज्येष्ठ वैज्ञानिक संगीता गोयल, उपअभियंता आर.डब्ल्यू.राऊत, उपअभियंता (वाहतूक) ए.जी.बोधले, उपअभियंता राजेश दुफारे, उद्यान अधीक्षक डी.डी. मेंडूलकर, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते.
 
सदर बैठकीत हवेतील प्रदूषणाचा स्तर सुधारण्यावर चर्चा करण्यात आली. अतिरिक्त प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर स्मार्ट सिटीअंतर्गत लावण्यात येणाऱ्या कॅमेऱ्यांद्वारे नियंत्रण ठेवण्यात येईल. दोषी वाहनचालकांवर कारवाई करण्यात येईल. प्रदूषण कमी करण्यासंदर्भातील जनजागृती करण्यासाठीच्या करावयाच्या उपाययोजना यावर बैठकीत चर्चा झाली. जनजागृतीपर जाहिरात स्मार्ट सिटीच्या एलईडी स्क्रीनवर लावण्यात यावे, असे निर्देश मुख्य अभियंता विजय बनगीरवार यांनी दिले.
 
पेट्रोलमध्ये केरोसीन व इतर इंधन मिळवल्याने प्रदूषण मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. त्यावर आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे या बैठकीत ठरले. रस्त्याच्या बांधकामामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे प्रदूषणही वाढत आहे. रस्त्याच्या बांधकामाचा अहवाल त्वरित मागवण्याचे निर्देश मुख्य अभियंता विजय बनगिरवार यांनी दिले.
 
बॅटरीवर चालणाऱ्या गाडी, ई-रिक्षा, ई-कार चा वापर करण्यात यावा, तसेत इथेनॉलवर चालणाऱ्या बसेसचा वापर करण्यात यावा, तसेच सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यात यावा, अशी सूचना पद्मा राव यांनी केली. १५ दिवसानंतर या विषयांचा परत पाठपुरावा करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
 

 

१५ दिवसाच्या आत लाभार्थ्यांना हक्काच्या घराचा ताबा द्या : संजय बंगाले

नारी निवासी संकुलाची केली पाहणी
 
नागपूर,ता.१ : नागपूर महानगरपालिकेद्वारे घरकुल योजनेअंतर्गत मौजा नारी येथे तयार करण्यात आलेल्या निवासी संकुलच्या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या घराचा ताबा १५ फेब्रुवारीपर्यंत देण्याचे निर्देश स्थापत्य समितीचे सभापती संजय बंगाले यांनी दिले. एस.आर.ए. अंतर्गत बांधकाम झालेल्या निवासी संकुलाच्या पाहणीप्रसंगी ते बोलत होते.
 
यावेळी त्यांच्यासमवेत माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, उपसभापती अभय गोटेकर, नगरसेवक पिंटू झलके, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी.जांभूळकर, आर्किटेक वीरेंद्र खरे, राजू रहाटे, एसएनडीएलचे आल्हाद बिंदू, जयंत सांबरे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
शासनाच्या गृहनिर्माण विभागाच्या निर्णयानुसार, नागपूर शहरातील गरिबांना मुलभूत पायाभूत सुविधा देण्यासाठी पीपीपी सहभागातून बीएसयूपी योजना राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहरातील विविध आरक्षणाच्या जागांवर वसलेल्या ३३ झोपडपट्ट्यांमधील नागरिक या योजनेचे लाभार्थी म्हणून निवडण्यात आले आहेत. मौजा नारी येथे तयार करण्यात आलेल्या निवासी संकुलात ५४४ निवासी संकुल तयार करण्यात आलेले आहेत. ५४४ घरकुलांकरीता १६७ लाभर्थ्याची निवड करण्यात आली आहे. उर्वरित ३७७ लाभार्थी निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता डी.डी. जांभूळकर यांनी दिली.
 
या संकुलामध्ये मल्टीपर्पज हॉल, शाळा, आरोग्य केंद्र, ११ दुकाने, खेळाचे मैदान, बगीचा आदी सुविधा देण्यात आलेल्या आहेत. केलेल्या कामांबद्दल माजी महापौर प्रवीण दटके यांनी कौतुक केले. १५ दिवसांच्या आत लाभार्थ्यांना ताबा देण्याचे निर्देश दिले. यावेळी लाभार्थ्यांनी मान्यवरांचे आभार मानले.
 

 

स्वच्छता ॲप जनजागृतीसाठी उल्लेखनीय कामगिरी बजावणा-यांचे कौतुक

आय़ुक्तांचा   दहा आरोग्य निरीक्षकांना सुखद धक्का  :  कार्याचा केला गौरव
 
नागपूर, ता. १ :  स्वच्छता सर्वेक्षण २०१८ च्या “टॉप स्वच्छ” शहरांच्या  यादीत स्थान मिळवून देण्यासाठी तसेच स्वच्छताॲपबद्दल नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी गठीत विशेष ‘मास्टर ट्रेनर’  आरोग्य निरीक्षकांना मनपा आय़ुक्त अश्विन मुदगल यांनी गुरुवारी (ता. १ फेब्रुवारी) सुखद  धक्का दिला. मनपा आय़ुक्तांनी स्वतःच्या दालनात निरीक्षकांना गुलाबपुष्प व मिठाई देऊन सन्मानित केले. आय़ुक्तांच्या या सुखद धक्क्याने सर्व आरोग्य निरीक्षकही गहिवरले. यावेळी नागरिक, नगरसेवक,स्वयंसेवी संस्था व प्रसार माध्यमांबरोबरच स्वच्छता ऍप जनजागृतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणा-या आरोग्य निरीक्षकांचे मनपा आयुक्तांनी कौतुक केले.
 
स्वच्छ सर्वेक्षण २०१८  मध्ये विविध निकषांवर शहराचे  मूल्यांकन केले जात आहे. यामध्ये  ४८११३  स्वच्छता ॲप डाऊनलोडिंगचे उद्दिष्ट मनपाला मिळाले होते. हे उद्दिष्ट मनपाने  ३०  जानेवारी रोजीच पूर्ण केले. यामुळे नागपूर मनपाला ॲप डाऊनलोडमध्ये  १५०  गुण आणि याॲपवर मिळालेल्या ९० टक्के तक्रारी  १२  तासांत सोडविल्याबद्दलचे  १५०  गुण मिळाले. स्वच्छ सर्वेक्षणात  ‘टॉप २०’  स्वच्छ शहरांच्या यादीत येणाऱ्या  शहराला अधिक  १००  गुण मिळणार होते. हे उद्दिष्टदेखिल सर्व कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमाने मनपाने  १९  डिसेंबर  २०१७ रोजीच गाठले होते. या यादीत मनपाने  १६  व्या क्रमांकापर्यंतदेखिल मजल मारली होती,   हे उल्लेखनीय.
 
नागरिकांना  ॲप डाऊनलोड कऱण्यासाठी प्रोत्साहित करणे,  तसेच आलेल्या तक्रारी स्वच्छता कर्मचारी यांच्या माध्यमातून सोडविणे आणि इतर कर्मचा-यांना ॲपबद्दल मार्गदर्शन करणे, अशी महत्त्वपूर्ण जबाबदारी स्वच्छता निरीक्षकांनी पार पाडली. फलस्वरुप स्वच्छ सर्वेक्षणात मागील वर्षाच्या तुलनेत चांगली कामगिरी केली असल्याचे यावेळी आयुक्त म्हणाले.
 
स्वच्छ सर्वेक्षणासाठी सर्व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रोत्साहित करणे, त्यांना आलेल्या तक्रारी तातडीने सोडविणे अशा  अनेक जबाबदाऱ्या पेलणाऱ्या  आणि मोलाची कामगिरी बजावल्याबद्ल  अतिरिक्त  उपायुक्त जयंत दांडेगावकर  यांचाही गौरव मनपा आयुक्तांनी केला. दिवसभर झालेल्या  ॲप डाऊनलोड उपक्रमांवर आधारीत गुणांकन दररोज रात्री  १२  वाजता संकेतस्थळावर अपग्रेड केले जात असल्याने पूर्ण उपक्रमाची उत्तम पद्धतीने ट्रॅकिंग केल्याबद्दल अनित कोल्हे यांचाही सत्कार करण्यात आला. सन्मानित करण्यात आलेल्या स्वच्छता निरीक्षकांमध्ये ऋषिकेश इंगळे, संदीप खोब्रागडे, दुर्गेश बक्सरे, अनुप तांबे, कपिल खोब्रागडे, करणसिंग बेहुनिया, मनोज खरे, आनंद बोरकर, रोशन जांभुळकर, विपीन समुद्रे यांचा समावेश आहे.
 
अन् गहिवरले स्वच्छता निरीक्षक
 
शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी पार पाडत असताना  १५  वर्षांच्या नोकरीदरम्यान आपल्या कार्याची दखल घेत प्रथमच आपले कौतुक झाल्याबद्दल स्वच्छता निरीक्षकही गहिवरले.  त्यांनी आयुक्तांचे आभार मानले. स्वच्छ सर्वेक्षणादरम्यान किती ऍप डाऊनलोड झाल्यात ,  प्राप्त  तक्रारी सोडविण्यात आल्यात का ,  तसेच काम करत असताना येणाऱ्या  अडचणी आदींबद्दलची विचारपूस स्वतः आय़ुक्त प्रत्येक स्वच्छता निरीक्षकांना  करत होते. वेळोवेळी त्यांना प्रोत्साहित करण्याची भूमिका आयुक्तांची होती, त्यामुळे काम करत असताना आपल्याला  ऊर्जा मिळत असल्याचेही स्वच्छता निरीक्षक म्हणाले.

 

 

नि:शुल्क आरोग्य शिबिराचा हजारो नागरिकांनी घेतला लाभ

महापौर नंदा जिचकार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन
 
नागपूर, ता. १ : महापौर नंदा जिचकार यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी दक्षिण-पश्चिम मंडळ प्रभाग क्र. ३७ च्या वतीने गुरुवारी (ता. १) प्रताप नगर विद्यालय येथे नि:शुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला प्रभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
 
आरोग्य शिबिराचे आयोजन दक्षिण-पश्चिम मंडळ प्रभाग ३७ चे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून करण्यात आले. सकाळी ८ वाजता सुरू झालेल्या आरोग्य शिबिरात विविध तपासणी करून घेण्यासाठी नागरिकांची रीघ लागली होती. यावेळी बालरोग चिकित्सा, स्त्री रोग चिकित्सा, हृदय रोग चिकित्सा, दंत तपासणी, नेत्र तपासणी, जनरल चेकअप, स्तन कर्करोग निदान, शल्य चिकित्सा, अस्थिरोग चिकित्सा, मोफत औषधी सुविधा आदींचा समावेश होता.
 
शिबिराला राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले. दीपप्रज्वलन करून त्यांनी शिबिराचे विधीवत उद्‌घाटन केले. वाढदिवशी कुठलाही बडेजाव न करता सामाजिक जाणीवेतून कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून आयोजित केलेले आरोग्य शिबिर अभिनंदनीय उपक्रम असल्याचे ते म्हणाले.
 
दरम्यान शिबिराला भाजपचे शहर अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, सत्तापक्ष नेता संदीप जोशी, भाजपचे विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा उपसभापती प्रमोद तभाने, लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, नगरसेविका सोनाली कडू, भाजपा दक्षिण-पश्चिम मंडळाचे पालक प्राचार्य राजीव हडप, भाजप नागपूर शहर महामंत्री भोजराज डुंबे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट दिली.
 
आरोग्य शिबिरासाठी नागपूर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेडिकल) अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्या मार्गदर्शनात डॉ. उदय नारलावार, डॉ. अविनाश गावंडे यांच्या नेतृत्वात संपूर्ण तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत होती. या शिबिरात असलेली दंत चिकित्सा व्हॅन ही पहिल्यांदाच कुठल्या शिबिरात आणण्यात आली होती.
 
वाढदिवसाचे औचित्य साधून जेसीआय नागपूर ओरियन्टतर्फे महापौर नंदा जिचकार यांच्या घरासमोर स्वच्छतेकडून समृद्धीकडे या संकल्पनेवर आधारीत पेंटिग तयार केली.
 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता भारतीय जनता पार्टी दक्षिण-पश्चिम मंडळ प्रभाग क्र. ३७ च्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

 

 

अर्थसंकल्पावरील महापौर नंदा जिचकार यांची प्रतिक्रिया

सर्वसमावेशक अर्थसंकल्प
 
केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्प बळीराजा, सर्वसामान्य नागरिक आणि युवकांच्या दृष्टीने आशादायक चित्र दाखविणारा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पामुळे मुद्रा योजनेचा युवकांना फायदा होणार आहे. समाजातील सर्वच घटकांचा विचार करून मांडलेला हा अर्थसंकल्प आतापर्यंतच्या सर्वोत्तम अर्थसंकल्पापैकी एक आहे.
 
-नंदा जिचकार, महापौर, नागपूर.

 

 

‘एक शाम शहीदों के नाम’ मुशायरा व कवी संमेलनाला रसिकांची उत्स्फूर्त दाद

नागपूर महानगरपालिकेचे आयोजन
 
नागपूर, ता. १ : नागपूर महानगरपालिकेतर्फे महाल येथे आयोजित ‘एक शाम शहीदों के नाम’ या शीर्षकांतर्गत झालेल्या मुशायलरा आणि कवी संमेलनाला श्रोत्यांनी उत्स्फूर्त दाद दिली. यामध्ये देशातील नामवंत शायर आणि कवी सहभागी झाले होते.
 
यानिमित्त आयोजित उद्‌घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजे वीरेंद्र शाह होते. प्रमुख पाहुणे म्हणून स्थायी समितीचे सभापती संदीप जाधव, गांधीबाग झोन सभापती सुमेधा देशपांडे, माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, नगरसेविका नेहा वाघमारे, राजेश मुधोजी भोसले, ज्येष्ठ समाजसेवक उमेश चौबे, भाजपा मध्य नागपूरचे अध्यक्ष बंडू राऊत, गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त अशोक पाटील, अधिकारी संजय चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजक रज्जाक कुरेश यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.
 
कार्यक्रमाची सुरुवात उर्दू साहित्यातील विख्यात शायर अब्दुल वाहीद अंसारी द्वारा ‘नात-ए-पाक’ या रचनेच्या सादरीकरणाने झाले. संपूर्ण कवी संमेलानात शायर इरशाद अंजुम यांनी आपल्या बहादरदार संचालनाने रंगत आणली. मंजर भोपाली, मिशम गोपालपुरी, परवाज इलाहबादी, अलताफ जिया, वाहीद अंसारी, कवयित्री मधु गुप्ता, शायर वारिस वारसी, जमील साहिर, कमर एजाज, इश्तेयाक कामिल, इरशाद अंजुम, डॉ. खालिद नैयर, इमरान फैज, जमील असमद जमील मुशायरा आणि कविसंमेलनात सहभागी झाले होते.

 

 

महापौर नंदा जिचकार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर

नागपूर,ता.३१. महापौर नंदा जिचकार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन गुरूवार दिनांक १ फेब्रुवारी २०१८ रोजी प्रतापनगर विद्यालय, प्रतापनगर चौक येथे सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.
 
या शिबिरामध्ये बालरोग चिकिस्ता, स्त्री रोग चिकिस्ता, हद्यरोग चिकिस्ता, दंत तपासणी, नेत्र तपासणी, नियमिती तपासणी, स्तन कर्करोग निदान, शल्य चिकिस्ता, अस्थिरोग चिकिस्ताचे उपचार व निशुल्क तपासणी होणार आहे.
 
या शिबिराला नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी राहावे, असे आवाहन शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेविका सोनाली कडु यांनी केले आहे.

 

 

रेशींमबाग मैदान येथे महिला उद्योजिका मेळाव्याचे उद्घाटन

नागपूर,ता.३१. नागपूर महानगरपालिका महिला व बालकल्याण समिती, समाजकल्याण विभाग, दीनदयाल अंतोदय राष्ट्रीय उपजिविका योजनेअंतर्गत दिनांक ४ फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी दरम्यान आयोजित महिला उद्योजिका मेळाव्याचे भूमिपूजन बुधवार (ता.३१) ला उपमहापौर दीपराज पार्डीकर यांच्याहस्ते रेशींमबाग मैदान येथे करण्यात आले. यावेळी महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, समिती सदस्य दिव्या धुरडे, उपायुक्त डॉ.रंजना लाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
विदर्भातील महिला बचत गटांना उद्योगासाठी चालना मिळण्यासाठी या मेळाव्याचे नागपूर महानगरपालिकेद्वारे आयोजन करण्यात येत असते. या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमदेखील आयोजित करण्यात आले आहे.
 
या कार्यक्रमाला समिती उपसभापती श्रद्धा पाठक, सदस्य रिता मुळे, क्रिडा समिती सभापती नागेश सहारे, हनुमाननगर झोन सभापती भगवान मेंढे, नगरसेविका स्नेहल बिहारे, हनुमाननगर झोन सहायक आयुक्त राजेश भिवगडे, कार्यकारी अभियंता कृष्णकुमार हेडाऊ, संजय पडोळे, समाजकल्याण विभागाचे पाचोडे, बागडे, शारदा गडकर, ज्योत्सना देशमुख, निमा गोमगाटे, विनय त्रिकोलवार, नूतन मोरे उपस्थित होते.

 

 

पंतप्रधान आवास योजनेची अंमलबजावणी तीव्र गतीने करा

गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी समिती सभापती चेतना टांक यांचे निर्देश
 
नागपूर, ता. ३० : नागपूर महानगरपालिकेतर्फे राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेची अंमलबजावणी तीव्र गतीने करा, असे निर्देश गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी समितीच्या सभापती चेतना टांक यांनी अधिकाऱ्यांना दिले.
 
नागपूर महानगरपालिकेच्या सिव्हील लाईन मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला समितीच्या उपसभापती वंदना यंगटवार, सदस्य सुनील हिरणवार, मंगला खेकरे, स्नेहा निकोसे, मनोज सांगोळे, नरेंद्र वालदे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, कार्यकारी अभियंता डी.डी. जांभूळकर उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सुरू असलेल्या प्रक्रियेची माहिती दिली. सदर योजनेच्या लाभासाठी ७२ हजार ऑनलाईन तर ८२ हजार ऑफलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. ४१,४१८ अर्ज अंतिमरीत्या वैध ठरले आहेत. यातून लकी ड्रॉ काढण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
 
योजनेचे महत्त्व लक्षात घेता या प्रक्रियेला वेग द्या, असे निर्देश सभापती चेतना टांक यांनी दिले. लाभार्थी यासंदर्भात नगरसेवकांना जाब विचारत असतात. त्यामुळे नगरसेवकांना वेळोवेळी या योजनेसंदर्भातील अद्ययावत माहिती पुरविण्यात यावी, असेही निर्देश त्यांनी दिले. एसआरए अंतर्गत ४०६४ घरांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ३५५० घरकुलाचा ताबा लाभार्थ्यांना देण्यात आला आहे. उर्वरीत घरकुलाचे वाटप पुढील एक महिन्यात देण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत.

 

 

मनपा-एसबीबीएम फाऊंडेशनतर्फे आयोजित महापौर चषक ऑल इंडिया इन्विटेशनल कराटे चॅम्पियनशीपमध्ये नागपूरचा वॉरिअर्स कराटे क्लब ‘चॅम्पियन’

नागपूर, ता. २९ : नागपूर महानगरपालिका व एसबीबीएम सोशल फाऊंडेशनच्या वतीने मानकापूर येथील डिविजनल स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्स येथे आयोजित ऑल इंडिया इन्विटेशनल कराटे चॅम्पियनशीप अंतर्गत आयोजित कराटे स्पर्धेतील महापौर चषकावर नागपूरच्या वॉरिअर्स कराटे क्लबने १२५ गुणांसह आपले नाव कोरले. या संघाला सर्वसाधारण विजेता म्हणून घोषित करण्यात आले.
 
वॉरिअर्स कराटे क्लबला १२ सुवर्ण, ११ रौप्य तर २२ कांस्य पदक प्राप्त झाले. नागपूरच्या अनुक्रमे डायनॉमोस कराटे अकादमीने १२४ गुणांसह उपविजेतेपद तर चॅम्पियन कराटे क्लबने १२३ गुणांसह दुसरे उपविजेतपद प्राप्त केले. डायनॉमोस कराटे अकादमीने १० सुवर्ण, १२ रौप्य आणि १९ कांस्य तर चॅम्पियन कराटे क्लबने १४ सुवर्ण, पाच रौप्य आणि १९ कांस्य पदक प्राप्त केले.
 
स्पर्धेचे बक्षीस वितरण महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर दीपराज पार्डीकर, मनपाचे क्रीडा सभापती नागेश सहारे, नगरसेवक राजेंद्र सोनकुसरे, जुल्फेकार अहमद भुट्टो, उपायुक्त रवींद्र देवतळे, नाथे पब्लिकेशनचे संजय नाथे, आर्यमन बिल्डर्सचे संचालक संदीप देशमुख, रोटरीचे उपाध्यक्ष निशिकांत काशीकर, वीर बजरंग संस्थेचे संस्थापक श्रीकांत आगलावे, मानवाधिकार व सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष धर्मेंद्र देशमुख, विनय बोधे, नरेंद्र कटारे, एसबीबीएम फाऊंडेशनचे संस्थापक अश्विन अंजीकर, डायनॉमोस कराटे अकादमीचे देविश कटारे उपस्थित होते.
 
बक्षीस वितरण समारंभापूर्वी प्रमुख पाहुण्यांसाठी खास प्रदर्शनी सामना खेळविण्यात आला. वारिअर्स-डायनॉमोस विरुद्ध ईस्टर्न कराटे क्लब मध्ये झालेल्या या सामन्यात वॉरिअर्स-डायनॉमोसने ३ विरुद्ध २ गुणांनी बाजी मारली.
 
बक्षीस वितरण समारंभात बोलताना महापौर नंदा जिचकार यांनी सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन केले. नागपूर महानगरपालिकेने आयोजित केलेल्या या स्पर्धेला खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल खेळाडूंचे त्यांनी आभार मानले. क्रीडा सभापती नागेश सहारे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
 
यावेळी विविध वजन गटात विजेत्या ठरलेल्या खेळाडूंना वैयक्तिक पुरस्कार व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या स्पर्धेत १२ राज्यातील ७०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी नागपूर महानगरपालिकेचे क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी यांच्या नेतृत्वात क्रीडा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तसेच एसबीबीएम सोशल फाऊंडेशन, डायनॉमोस कराटे अकादमीच्या प्रतिनिधींनी सहकार्य केले.
 
फोटो कॅप्शन : कराटे चॅम्पियनशीपमध्ये महापौर चषकाचा मानकरी ठरलेल्या वॉरिअर्स कराटे क्लबला चषक प्रदान करताना महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, क्रीडा सभापती नागेश सहारे व अन्य मान्यवर.

 

 

७३.२१ टक्के बालकांना पोलिओ डोज

दटके रोगनिदान केंद्रात महापौरांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ
 
नागपूर,ता. २८ :  राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत रविवारी (ता. २८) महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते महाल येथील प्रभाकरराव दटके रोग निदान केंद्रात बालकाला पोलिओ डोज पाजून पहिल्या टप्प्यातील मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यात ७३.२१ टक्के बालकांना पोलिओ डोज पाजण्यात आला.
 
यावेळी मनपाच्या आरोग्य समितीचे सभापती मनोज चापले, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, आरोग्य सहसंचालक डॉ. शिशिकांत जाधव, नागपूर मंडळाचे उपसंचालक डॉ. संजीव जयस्वाल, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल चिव्हाणे, प्रभाकरराव दटके रोगनिदान केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, पल्स पोलिओ मोहिमेचे नोडल अधिकी डॉ. सुनील धुरडे, डॉ. विजय जोशी, डॉ. विजय तिवारी, झोनल अधिकारी डी. एस. पडोळे उपस्थित होते.
 
नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे रेल्वे स्थानक, बस स्थानक, विमानतळ, मंदिर, मस्जिद, मॉल व अन्य सार्वजनिक ठिकाणी ० ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओ डोज पाजण्यासाठी बुथ लावण्यात आले होते. तीन कर्मचारी असलेले ९४७ आणि दोन कर्मचारी असलेले ३४३ असे एकूण १२९० बुथ शहरात लावण्यात आले होते.
 
७३.२१ टक्के बालकांना पोलिओ डोज
 
पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत पहिल्या टप्प्यात शहरातील दोन लाख ७० हजार ८७१ बालकांना पोलिओ डोज पाजण्याचे उद्दिष्ट होते. रविवारी त्यापैकी मनपाच्या आरोग्य विभागातर्फे लावण्यात आलेल्या विविध बुथवर एक लाख ९८ हजार ३०३ बालकांना पोलिओ डोज पाजण्यात आला. ही टक्केवारी ७३.२१ इतकी आहे. यानंतर ३० जानेवारी ते ३ फेब्रुवारीदरम्यान दहाही झोनअंतर्गत असलेल्या परिसरात आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन पोलिओ डोज देऊन १०० टक्के उद्दिष्ट गाठतील, असे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल चिव्हाणे यांनी सांगितले.

 

 

मनपामध्ये चार स्वातंत्र्य संग्रामातील योद्ध्यांच्या तैलचित्रांचे अनावरण

नागपूर, ता. २७  : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात जीवाची बाजी लावून इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या चार योद्ध्यांच्या तैलचित्राचे अनावरण नागपूर महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीच्या दालनात महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आले.
 
देशासाठी बलिदान देणारे क्रांतिवीर मदनलाल धिंग्रा, विष्णू गणेश पिंगळे, राजगुरू आणि नेताजी सुभाषचंद्र बोस या चार महापुरुषांच्या तैलचित्राचा यात समावेश आहे. यावेळी महापौर नंदा जिचकार यांच्यासह नगरसेवक सुनील अग्रवाल अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त आयुक्त डॉ. आर. झेड. सिद्दीकी, उपायुक्त रवींद्र देवतळे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, मुख्य अभियंता विजय बनगीरवार, कार्यकारी अभियंता नरेश बोरकर, मनोज तालेवार, हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे, सहायक आयुक्त सुभाष जयदेव, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर आदी उपस्थित होते. महापौर नंदा जिचकार यांनी सर्व महापुरुषांच्या तैलचित्राला माल्यार्पण करून नमन केले. स्वातंत्र्यसंग्रामातील या चार महापुरुषांचे शौर्य नेहमीच आम्हाला प्रेरणा देत राहतील, असे उद्‌गार महापौर नंदा जिचकार यांनी काढले.

 

 

स्वच्छता ॲम्बेसेडर आणि स्वच्छ सर्वेक्षणात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा गणराज्यदिनी सत्कार

नागपूर, ता. २७ : स्वच्छ सर्वेक्षणासंदर्भात जनजागृती करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने नेमलेल्या स्वच्छता ॲम्बेसेडरचा आणि स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत झोननिहाय विविध गटात प्रथम क्रमांक प्राप्त करणाऱ्यांचा सत्कार गणराज्य दिनानिमित्त मनपा मुख्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने करण्यात आला.
 
स्वच्छता ॲम्बेसेडर डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. अमित समर्थ, कवी मधुप पांडेय, पर्यावरण क्षेत्रात कार्य करणारे कौस्तभ चॅटजी आणि आरजे निकेता साने हे आपआपल्या क्षेत्रात स्वच्छताविषयक जनजागृती करीत आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि तुळशीचे रोपटे देऊन महापौर नंदा जिचकार यांनी केला.
 
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत विविध गटातील झोननिहाय व्यक्ती, संस्थांनी स्वच्छतेसंदर्भात केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. हॉटेल्स गटात झोन क्र. १ ते १० अंतर्गत अनुक्रमे हॉटेल एअरपोर्ट सेंटरपॉईंट, हॉटेल हेरिटेज, आर. आर. बार ॲण्ड रेस्टॉरंट, हॉटेल द्वारकामाई, युफोरिया रेस्टॉरंट, हॉटेल अल-झम-झम, डे टू डे रेस्टॉरंट, काश्मीर रेस्टारंट, अशोका रेस्टॉरंट, शाळा गटात सोमलवार हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, सी.पी. ॲण्ड बेरार हायस्कूल, साऊथ प्वॉईंट स्कूल, नारायण विद्यालयम, स्वराज पब्लिक स्कूल, जे.एन. टाटा पारसी गर्ल्स हायस्कूल, झुलेका कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, श्रेयस विद्यालय, एसएससी गर्ल्स हायस्कूल, पेन्शन नगर उर्दू शाळा, रुग्णालये गटात ऑरेंज सिटी हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटर, आयकॉन हॉस्पीटल, आदीशक्ती हॉस्पीटल, पूर्वी हॉस्पीटल, वंजारी हॉस्पीटल, न्यू ईरा हॉस्पीटल, खिदमत हॉस्पीटल, श्री रामदेवबाबा रुखमिणीदेवी मेमोरियल मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटर, हर्षल मॅटरनिटी होम, ॲलेक्सीस मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल प्रा.लि., गृहनिर्माण संस्था गटात अमल एन्कल्युसीव, म्हाडा कॉलनी, आनंद मेलिनियम टॉवर, टाटा कॅपिटल हाईटस्‌, एन.आय,टी. कॉम्प्लेक्स, भोसले विहार कॉलनी, मेहंदीबाग कॉलनी, व्यंकटेश कॉलनी, निलगिरी अपार्टमेंट, कुकरेजा नगर तर व्यापारी संघटना गटात गोकुलपेठ व्यापारी संघटना, नॅशनल गांधी मार्केट असोशिएशन, महात्मा फुले मार्केट, गांधी गेट व्यापारी सेवा मंडल, दि नागपूर जनरल मर्चंट असोशिएशन, कमाल बाजार, जरीपटका दुकानदार संघ यांच्या प्रतिनिधींचा महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, तुळशीचे रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, आयुक्त अश्विन मुदगल, धरमपेठ झोन सभापती रूपा राय, नगरसेवक प्रमोद कौरती, जितेंद्र घोडेस्वार उपस्थित होते.
 
नागपूर शहर स्वच्छ ठेवण्यात मोलाची भूमिका निभावणाऱ्या विविध गटातील सत्कारमूर्तींचे महापौर नंदा जिचकार यांनी कौतुक केले. नागपूर शहरातील प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून शहर स्वच्छ ठेवण्यात योगदान द्यावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे यांनी केले.

 

 

७३ आणि ७४ व्या घटनादुरूस्तीमुळे स्थानिक स्वराज संस्थेला बळकटी मिळाली - महापौर नंदा जिचकार

६९ वा प्रजासत्ताक दिन मनपात उत्साहात साजरा
 
नागपूर,२७. स्थानिक स्वराज्य संस्थेला स्वायत्त दर्जा ७३ आणि ७४ व्या घटनादुरूस्तीमुळे मिळाला, यामुळेच स्थानिक स्वराज्य संस्थेला बळकटी मिळाली, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले. ६९ व्या प्रजासत्ताक दिनी पार पडलेल्या मनपा मुख्यालयातील कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या.
 
यावेळी व्यासपीठावर उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे, आयुक्त अश्विन मुदगल, धरमपेठ झोन सभापती रूपा राय, नगरसेवक प्रमोद कौरती, जितेंद्र घोडेस्वार, स्वच्छता ॲम्बेसेडर डॉ. चंद्रशेखर मेश्राम, कवी मधुप पांडेय, डॉ. अमित समर्थ, कौस्तभ चॅटर्जी, आरजे निकेता साने प्रामुख्याने उपस्थित होते.
 
पुढे बोलताना मुख्य भाषणात महापौर नंदा जितकार म्हणाल्या, ४ एप्रिल १९९३ या दिवासापासून ७३ व ७४ वी घटना दुरूस्ती अंमलात आली. यामुळे सर्व राज्यात गावपातळी, जिल्हापातळी आणि या दोन्हीमधील तालुका विकास गट पातळी अशी त्रिरिस्तरीय पंचायत राज्यपद्धती सुरू झाली. स्थानिक स्वराज्य संस्थाना आपल्या क्षेत्रात सामाजिक न्याय आणि आर्थिक अधिकार या घटना दुरूस्तीने दिले. देशाच्या शासन व्यवस्थेमध्ये हा महत्त्वाचा टप्पा असून त्यामळे स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला. गावाच्या विकासाची दिशा व विचार केंद्र सरकारातील तसेच राज्य सरकारातील राज्यकर्त्यांपेक्षा गावातील स्थानिक गावकरी,स्त्री पुरूष अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतात यावर या कायद्याने शिक्कामोर्तब केले.
 
नागपूर शहराच्या वाढत्या विकासाबाबत बोलताना महापौर म्हणाल्या, नागपूर शहराची विकासाची कल्पना वेगळी आहे. हे शहर आता आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करीत आहे. नागपूरचा मानसन्मान देशपातळीवरच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्माण करणाऱ्या अशा महापालिकेद्वारे राबविण्यात येणा-या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती यावेळी महापौरांनी दिली.
 
प्रारंभी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या परेडचे महापौर व आयुक्त यांनी निरिक्षण केले व मानवंदना स्वीकारली. यावेळी महानगरपालिकेने नियुक्त केलेल्या स्वच्छता अँम्बेसेडरचा महापौर नंदा जिचकार यांनी शाल, श्रीफळ, तुळशीचे रोपटे देऊन सत्कार केला. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ अंतर्गत झोन निहाय विविध गटात प्रथम क्रमांक प्राप्तांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
 
कार्यक्रमाचे संचालन धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे, तर आभारप्रदर्शन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले. कार्यक्रमाला मनपातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
 
चित्ररथाचा शुभारंभ
 
सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत प्रगत शैक्षणिक लोकजागृती उपक्रमाअंतर्गत तयार करण्यात आलेल्या चित्ररथाचा आणि २८ जानेवारी व ११ मार्च रोजी होणाऱ्या पल्स-पोलिओ लसीकरण मोहिमेच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या रथाचा शुभारंभ महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आला.

 

 

स्थायी समिती सभापतींनी दिले करवसुलीचे उद्दिष्ट

धरमपेठ, लक्ष्मीनगर झोनमध्ये घेतली आढावा बैठक
 
नागपूर,ता.२२ : मार्चअखेर पर्यंत करवसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी स्थायी समिती सभापती संदीप जाधव घेत असलेल्या झोननिहाय बैठकीअंतर्गत गुरुवारी (ता. २५) धरमपेठ आणि लक्ष्मीनगर झोनमध्ये आढावा बैठक घेतली. यावेळी करवसुली निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांना त्यांनी शतप्रतिशत वसुलीचे उद्दिष्ट दिले.
 
स्थायी समिती सभापती संदीप जाधव, कर व कर आकारणी समितीचे सभापती अविनाश ठाकरे यांच्यासह धरमपेठ झोनमधील बैठकीत झोन सभापती रूपा रॉय, सहायक आयुक्त महेश मोरोणे, दिनकर उमरेडकर, प्रफुल्ल फरकासे तर लक्ष्मीनगर झोनच्या आढावा बैठकीत झोन सभापती प्रकाशभोयर, सहायक आयुक्त सुवर्णा दखने, प्रकाश गायधने उपस्थित होते.
 
यावेळी कर वसुली निरीक्षकांनी सभापतींसमोर आतापर्यंत झालेल्या वसुलीचा, लिलाव आणि जप्तीचा गोषवारा मांडला. आतापर्यंतचे उद्दिष्ट न गाठणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याची कारणे सभापती संदीप जाधव यांनी विचारली. समाधानकारक उत्तरे न देणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांनी तंबी दिली. यापुढे संथगतीने काम चालणार नाही. मार्च अखेरपर्यंत संपूर्ण उद्दिष्ट गाठायचे, असे निर्देश त्यांनी दिले. कर वसुलीत कुठलीही कुचराई खपवून घेतली जाणार नाही, असे कर आकारणी समितीचे सभापती अविनाश ठाकरे यांनी म्हटले.

 

 

स्थायी समिती सभापतींनी घेतला धंतोली, हनुमानगर झोनमधील करवसुलीचा आढावा

नागपूर,ता.२२ : मार्च महिन्यापर्यंत करवसुलीचे उद्दिष्ट गाठता यावे. १०० टक्के वसुली व्हावी यासाठी स्थायी समिती सभापती संदीप जाधव आणि कर व कर आकारणी समितीचे सभापती अविनाश ठाकरे हे मागील तीन दिवसांपासून झोननिहाय आढावा बैठक घेत आहेत. याअंतर्गत बुधवारी (ता. २४) धंतोली आणि हनुमाननगर झोन येथे आढावा बैठक घेण्यात आली.
 
स्थायी समितीचे सभापती संदीप जाधव आणि कर व कर आकारणी समितीचे सभापती अविनाश ठाकरे, बाजार अधीक्षक दिनकर उमरेडकर, प्रफुल्ल फरकासे यांच्यासह धंतोली झोन बैठकीला झोन सभापती प्रमोद चिखले, नगरसेविका लता काडगाये, सहायक आयुक्त गणेश राठोड तर हनुमानगर झोन येथील बैठकीत झोन सभापती भगवान मेंढे, नगरसेविका शीतल कामडी, नगरसेवक राजेंद्र सोनकुसरे, सहायक आयुक्त राजू भिवगडे उपस्थित होते.
 
सभापती संदीप जाधव यांनी यावेळी करवसुलीचा आढावा घेतला. झोन स्तरावरील अडचणी समजून घेतल्या. सर्व अडचणींवर मात करून यावेळी करवसुलीचे उद्दिष्ट पूर्णपणे गाठायचे आहे. त्यासाठी पुढील दोन महिने बाकीचे सर्व बाजूला ठेवून करवसुलीवर भर द्या, असे ते म्हणाले.
 
यावेळी कर वसुली निरीक्षकांनी सभापतींसमोर आतापर्यंत झालेल्या वसुलीचा, लिलाव आणि जप्तीचा गोषवारा मांडला. आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत करवसुलीचे उद्दिष्ट आपण गाठणार असल्याचे आश्वासन झोनस्तरावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिले. 

 

 

१२ विधी सहायक नियुक्त प्रस्तावाला मंजुरी

विधी समितीच्या आढावा बैठकीत निर्णय
 
नागपूर,ता. २४ : नागपूर महानगरपालिकेच्या दहाही झोनमध्ये कायदेशीर बाबींमध्ये सल्ला देण्यासाठी विधी सहायकांच्या मानधनावर कंत्राटी पद्धतीने नियुक्ती प्रस्तावाला विधी समितीने मंजुरी दिली.
 
विधी समितीच्या सभापती ॲड. मिनाक्षी तेलगोटे यांच्या अध्यक्षतेखाली मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात झालेल्या बैठकीला समिती सदस्य महेश महाजन, अमर बागडे, हर्षला साबळे, समिता चकोले, व्यंकटेश कपले, सहायक अभियोक्ता सूरज पारोचे व संबंधित विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. सदर बैठकीत माजी महापौर व नगरसेवक प्रवीण दटके यांनी सर्वसाधारण सभेत मांडलेल्या प्रश्नाबाबत अनुकंपा तत्त्वावर विवाहित मुलींच्या संदर्भात नियमात झालेल्या सुधारणांची त्याचप्रमाणे इतरही अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीसंबंधीच्या धोरणातील तरतुदीसंदर्भात चर्चा करण्यात आली. नगरसेवक बंटी शेळके यांनी महानगरपालिकेतील व खासगी कंत्राटदारांकडून नियुक्ती करण्यामध्ये झालेल्या अनियमिततेबद्दल  मनपाच्या सर्वसाधारण सभेत प्रश्न विचारण्यात आला होता. या विषयावरही विधी समितीच्या अभिप्रायासाठी चर्चा करण्यात आली. या दोन्ही विषयावर सामान्य प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्तांनी आठ दिवसांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश सभापती ॲड. मिनाक्षी तेलगोटे यांनी दिले. महानगरपालिकेच्या अधिनियमातील तरतुदीसंबंधात नागपुरातील नामवंत कायदे तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन व्हावे या हेतूने नगरसेवकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्याचे निर्देशही सभापती ॲड. तेलगोटे यांनी दिले. 

 

 

सीमेंट रस्त्यांचे समतलीकरण  १५ दिवसांत करण्यात यावे : संजय बंगाले

शहरातील सीमेंट रस्त्याच्या बांधकामाचा घेतला आढावा
 
नागपूर,ता.२३ : नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरात विविध ठिकाणी सीमेंट रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो आहे. बांधकाम पूर्ण झालेले रस्ते वाहतुकीस मोकळे करण्यात यावे, तसेच सीमेंट रस्त्यांवरील वाहतुकीचा प्रश्न तातडीने सोडविण्यात यावा, चौकातील जंक्शनचे समतलीकरण १५ दिवसात करण्यात यावे, असे निर्देश स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले यांनी दिले.
 
मंगळवार (ता.२३) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात स्थापत्य व प्रकल्प समितीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत शहरात सुरू असलेल्या सीमेंट रस्त्याच्या तीनही टप्प्याच्या बांधकामाचा आढावा घेतला.
 
यावेळी त्यांच्यासमवेत समिती उपसभापती अभय गोटेकर, सदस्या विद्या कन्हेरे, रश्मी धुर्वे, मुख्य अभियंता विजय बनगीरवार, अधीक्षक अभियंता दीपक सोनटक्के, शहर अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता अनिरूद्ध चौगंजकर, डी.डी.जांभूळकर, मोती कुकरेजा, शकील नियाजी, उपअभियंता श्री. माटे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
यावेळी समितीने शहरात सुरू असलेल्या सीमेंटच्या रस्त्यांचा टप्प्यानुसार आढावा घेतला. पहिल्या टप्प्यात ३० कामांपैकी १४ रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. कंत्राटदारांचे देयके नियमित नसल्याने त्यांनी कामे थांबविल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सभापतींना दिली. पहिल्या टप्प्यातील बांधकाम समाधानकारक आहे की नाही याची सुद्धा माहिती बंगाले यांनी घेतली. घाट रोड मार्गावरील रस्त्याला भेगा पडल्याने त्या कामात चौकशी करण्याचे आदेश सभापती संजय बंगाले यांनी दिले. चौकशीअंती जो दोषी आढळेल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असे निर्देशसुद्धा त्यांनी दिले. हे प्रकरण शहरातील अग्रकमांकावरील संस्थेला सर्वेक्षणासाठी पाठविण्यात आलेले आहे. त्यांचा अहवाल समोर आल्यानंतरच निर्णय घेण्यात यईल, अशी माहिती मुख्य अभियंता विजय बनगीरवार यांनी दिली.
 
पहिल्या टप्प्यातील रस्ते बांधकामाची मुदत संपत आहे. तरीही ५० टक्के काम अपूर्ण का आहे,  असा सवाल सभापती संजय बंगाले यांनी केला असता निर्माणाधीन असलेल्या रस्त्यांवर अतिक्रमण असल्याने बांधकामास अडथळा होत आहे. ज्या रस्त्यांचा बांधकामास अडथळा होत आहे, अशा रस्त्यांबाबत पुनर्विचार करा, असे निर्देश बंगाले यांनी दिले.
 
दुसऱ्या टप्प्यातील रस्ते बांधकामाची माहिती शहर अभियंता मनोज तालेवार यांनी दिली. दुसऱ्या टप्प्यात ५९ रस्त्यापैकी ४८ रस्त्यांचे बांधकाम सुरू असून त्यापैकी १९ रस्त्यांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. एका रस्त्याच्या बांधकामास अडथळा येत असल्याने तो रस्ता रद्द करण्यात आला, त्याऐवजी स्थायी समिती द्वारे प्रस्तावित करून दुसरा रस्ता निवडण्यात येणार असल्याची माहिती तालेवार यांनी दिली. दोन रस्त्यांमधील भाग समतल करणे अत्यावश्यक आहे, गाडी त्यावरून गेली असता उसळते, त्यामुळे तो भाग समतल करण्यात यावा, असे आदेश संजय बंगाले यांनी दिले. १० रस्त्यांचे बांधकाम अद्याप सुरूच झाले नसल्याने त्याचे कारण सभापतींनी विचारले असता, पोलिस परवानगी मिळत नसल्याने बांधकाम थांबविले असल्याची माहिती तालेवार यांनी दिली.
 
तिसऱ्या टप्प्यातील सीमेंट रस्त्याच्या कामाची माहिती कार्यकारी अभियंता मोती कुकरेजा यांनी दिली. तिसऱ्या टप्प्यातील कामांमध्ये ४१ किमी रस्ते अंतर्भूत आहेत. यासंबंधीच्या निविदा दोनदा काढण्यात आलेल्या आहेत. काही रस्त्यांसाठी शासनाने व नासुप्रने निधी मंजूर केलेला आहे. योग्य तो निर्णय घेऊन त्यासंबंधीच्या कामाचे कार्यादेश वितरीत करावे, असे आदेश संजय बंगाले यांनी दिले.
 
वरील रस्त्यांच्या कामांमध्ये सुरक्षा रक्षक नसल्यांने अपघाताचे प्रमाण वाढत आहेत. उपरोक्त कंपनीनी नियमानुसार त्या ठिकाणी सुरक्षा गार्ड ठेवणे बंधनकाराक आहे. वरील सुरक्षा रक्षक तातडीने प्रत्यक्षकामाच्या ठिकाणी नेमावे व त्याठिकाणी कार्यकारी अभियंत्यांनी तपासावे असे निर्देश, श्री. बंगाले यांनी दिले.
 
यानंतर जियोटेक या यंत्रणेमार्फत सीमेंट रस्त्यांच्या सर्वेक्षणाचा आढावा सभापतींनी घेतला. बैठकीला उपअभियंता, बांधकाम विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.    

 

 

कामात दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई

स्थायी समिती सभापती संदीप जाधव यांचा इशारा : करवसुलीसंदर्भात तीन झोनचा घेतला आढावा
 
नागपूर,ता.२२: मनपाचे बहुतांश उत्पन्न हे मालमत्ता करावर अवलंबून असते. त्यामुळे करवसुली हे कर्मचाऱ्यांचे सर्वप्रथम उद्दिष्ट असायला हवे. या कार्यात जो कर्मचारी कुचराई करेल, त्या कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराच स्थायी समिती सभापती संदीप जाधव यांनी दिला.
 
मार्च २०१८ पूर्वी करवसुलीचे १०० टक्के उद्दिष्ट गाठता यावे यासाठी स्थायी समिती सभापती संदीप जाधव आणि कर व कर आकारणी समितीचे सभापती अविनाश ठाकरे हे करवसुलीचा झोननिहाय आढावा घेत आहेत. मंगळवारी (ता. २३) सतरंजीपुरा, गांधीबाग, नेहरूनगर झोनचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत मनपाचे बाजार अधीक्षक डी.एन.उमरेडकर, कर अधीक्षक गौतम पाटील, प्रफुल्ल फरकासे प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी झोनच्या सर्व कर निरिक्षकाकडून त्यांची डिमांड व कर वसुली किती झाली, थकीत करबाकी किती आहे, याबाबत माहिती घेतली. संथगतीने काम करणाऱ्या करनिरीक्षकांना त्यांनी उद्दिष्ट लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी सतरंजीपुरा झोनचे सभापती संजय चावरे, सहायक आयुक्त प्रकाश वराडे उपस्थित होते. झोनचे क्षेत्रफळ मोठे असेल तर जवळच्या ठिकाणी कर वसूली केंद्र उघडण्यात यावे, व त्याची जाहीरात करण्यात यावी, असे निर्देश जाधव यांनी दिले. गांधीबाग झोनमध्ये घेतलेल्या बैठकीत सभापती सुमेधा देशपांडे, नगरसेवक संजय बालपांडे, नगरसेविका सरला नायक, सहायक आयुक्त अशोक पाटील तर नेहरूनगर झोनच्या आढावा बैठकीत झोन सभापती रेखा साकोरे, सहायक आयुक्त राजेश कराडे उपस्थित होते.

 

 

शतप्रतिशत कर वसुली हेच मनपाचे ध्येय : संदीप जाधव

करवसुली संदर्भात घेतला झोननिहाय आढावा
 
नागपूर,ता.२२ : मनपाचे उत्पन्न हे करावरच अबलंबून आहे. त्यामुळे शतप्रतिशत करवसुली हेच मनपाचे ध्येय आहे. मार्चअखेरपर्यंत सर्व थकीत कर वसुली करा, असे निर्देश स्थायी समिती सभापती संदीप जाधव यांनी दिले.
 
सोमवार (ता.२२) मंगळवारी, आसीनगर, लकडगंज झोन येथील कर वसुलीचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत कर व कर आकारणी समिती सभापती अविनाश ठाकरे, मनपाचे बाजार अधीक्षक डी.एन.उमरेडकर, कर अधीक्षक गौतम पाटील, प्रफुल्ल फरकासे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
नागपूर महानगरपालिकेच्या २०१७-१८ च्या अर्थसंकल्पात मालमत्ता कराच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट दिले होते. उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी सोमवार (ता. २२) पासून झोननिहाय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आज तीन झोनमध्ये आढावा घेण्यात आला. मंगळवारी झोनच्या आढाव्यादरम्यान झोनच्या सर्व कर निरिक्षकाकडून त्यांची डिमांड किती आणि कर वसुली किती झाली, थकीत करबाकी किती आहे, याची माहिती घेतली. ज्या कर निरिक्षकांनी कामे संथगतीने केली त्यांना खडेबोल सुनावले. यावेळी सायबरटेक कंपनी मार्फत झालेल्या सर्वेक्षणाची माहिती घेण्यात आली. ज्यांची कर वसुली मार्चपर्यंत कमीत कमी असेल त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी सभापती जाधव यांनी दिली. यावेळी मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त हरिश राऊत उपस्थित होते. झोनचे क्षेत्रफळ मोठे असल्याने जवळच्या ठिकाणी कर वसुली केंद्र उघडण्यात यावे व त्याची जाहिरात करण्यात यावी, असे निर्देश जाधव यांनी दिले.
 
आसीनगर झोनच्या आढावा बैठकीत सहायक आयुक्त (अतिरिक्त पदभार) प्रकाश वराडे, नगरसेवक मनोज सांगोळे, जीतेंद्र घोडेस्वार उपस्थित होते. आसीनगर झोनमध्ये केलेल्या कामांवर मान्यवरांनी नाराजी व्यक्त करत पुढील दोन महिन्यात कर वसूली व्हायलाच पाहिजे, नाही तर कारवाई सक्तीने करण्यात येईल, अशी तंबी दिली. लकडगंज झोनमधील आढावा बैठकीतही मार्च अखेरपर्यंत सर्व वसुली करण्याचे निर्देश सभापती श्री. जाधव यांनी दिले. यावेळी सहायक आयुक्त सुभाष जयदेव उपस्थित होते.

 

 

स्वीडन तंत्रज्ञानाने होईल १० टक्के डिझेलची बचत

प्रायोगिक तत्त्वावर मनपाच्या तीन ‘आपली बस’मध्ये प्रयोग
 
नागपूर, ता. २२ : जगभरासमोर प्रदूषण ही मोठी समस्या आहे. इंधनाच्या वापराने होणाऱ्या प्रदूषणाचेही प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यावर पर्याय म्हणून केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आणि मनपाचे परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांच्या प्रयत्नातून नागपूर महानगरपालिकेद्वारे संचालित ‘आपली बस’च्या तीन बसेसमध्ये प्रयोगिक तत्त्वावर स्वीडन तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे १० ते १५ टक्के इंधनाची बचत होणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
 
सोमवारी (ता. २२) स्वीडनच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व परिवहन सभापती बंटी कुकडे यांची भेट घेऊन सादरीकरण केले. यामध्ये स्वीडन कंपनी (ईपीएस)चे व्यवस्थापकीय संचालक डेनिस अब्राहम, मार्केटिंग ॲनालिस्ट ॲना काई आणि बिझनेस डेव्ह्लपमेंट विभागाच्या दिव्याणी अशोक कुबडे यांची उपस्थिती होती. मनपातर्फे परिवहन समिती सभापती बंटी कुकडे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी सादरीकरणाद्वारे तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली.
 
शुद्ध पाण्यासाठी आता ‘वॉटर एटीएम’
 
शहरातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या उद्देशाने जोसेब इकोलॉजिकल कंपनीतर्फे शहरातील ज्या भागात पाण्याचे नेटवर्क नाही अशा भागासाठी वॉटर एटीएमचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामध्ये प्रायोगिक तत्त्वावर वाठोडा येथे ‘वॉटर एटीएम’ लावण्यात येईल. यामध्ये नैसर्गिक पद्धतीने पाणी शुद्धीकरण केल्या जाईल, हे विशेष. या एटीएमला पाच हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी राहणार असून दर तास एक हजार लिटर पाणी वापरता येणार आहे.

 

 

मनपा शाळांतील विद्यार्थीसंख्या वाढविण्यासाठी ‘डिजीटल’ची कास धरा

सभापती दिलीप दिवे यांचे आवाहन : डिजीटल प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्‌घाटन
 
नागपूर,ता. २२ : संपूर्ण जग ‘ऑनलाईन’ झाले आहे. बदलत्या जगाप्रमाणे मनपा शाळांतील शिक्षण पद्धती बदलणे आवश्यक आहे. मनपा शाळेचा दर्जा आणि विद्यार्थीसंख्या वाढविण्यासाठी ‘डिजीटल’ची कास धरा, असे आवाहन मनपाचे शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी केले.
 
नागपूर महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या शाळांतील शिक्षकांना डिजीटल प्रशिक्षण देण्यासाठी राहतेकरवाडी येथील साने गुरुजी उर्दू माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित डिजीटल प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, शाळा निरीक्षक श्री. कासीम, विषयतज्ज्ञ मिलिंद खेकाडे, कार्यशाळा समन्वयक मन्साराम डहाके यावेळी उपस्थित होते.
 
पुढे बोलताना सभापती प्रा. दिलीप दिवे म्हणाले, मनपाच्या ३४ शाळा डिजीटल झाल्या आहेत. मागील वर्षी १८ शाळा डिजीटल करण्यात आल्या. या डिजीटल शाळांमधून विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळावे यासाठी सर्वप्रथम शिक्षक प्रशिक्षित होणे गरजेचे आहे. म्हणूनच आता सहा टप्प्यात मनपा शाळांतील शिक्षकांना डिजीटल प्रशिक्षण देण्यात येत आहे. केवळ मनपाचा शिक्षण विभाग सांगतोय म्हणून शिक्षकांनी हे प्रशिक्षण घेऊ नये तर स्वत:ला बदलण्यासाठी, काळानुरूप बदलणाऱ्या पद्धती आत्मसात करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणपद्धतीचे धडे देण्यासाठी हे प्रशिक्षण घ्यावे, असेही ते म्हणाले.
 
शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी डिजीटल शिक्षणपद्धतीचे महत्त्व विषद करीत मनपाच्या शाळांना बदलण्यात डिजीटल प्रशिक्षण घेणाऱ्या शिक्षकांचा मोठा वाटा राहील, असे सांगितले.
 
विषयतज्ज्ञ मिलिंद खेकाडे यांनी यावेळी प्रात्यक्षिकाद्वारे डिजीटल प्रशिक्षणाची माहिती दिली. तत्पूर्वी दीपप्रज्वलन करून आणि डिजीटल बोर्डवर श्री गणेश रेखाटून सभापती दिवे यांनी कार्यशाळेचे उद्‌घाटन केले.
 
सदर कार्यशाळा सहा टप्प्यात होणार असून प्रत्येक कार्यशाळा सहा दिवसांची राहील, अशी माहिती कार्यशाळेचे समन्वयक मन्साराम डहाके यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन संजय तलमले यांनी केले.
 
 

 

१ फेब्रुवारीपासून नागपुरात ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन्‌, संगीतकार राम-लक्ष्मण यांचा होणार गौरव
 
नागपूर, ता. २०   :  नागपूर महानगरपालिका, नागपूर, ऑरेंज सिटी कल्चरल फाऊंडेशन आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने, महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र पर्यटन विभाग, सप्तक आणि विदर्भ साहित्य संघ यांच्या सहकार्याने १ फेब्रुवारीपासून नागपुरात दुसऱ्या ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार, ऑरेंज सिटी फिल्म फेस्टीवल आयोजन समितीचे सचिव डॉ. चंद्रशेखर मेश्राम आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पूरण मेश्राम यांनी दिली. 
 
१ ते ४ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या महोत्सवाचे उद्‌घाटन १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता पर्सिस्टंट सभागृहात होईल. यावेळी जागतिक पातळीवर भारतीय चित्रपटांना विशेष स्थान प्राप्त करून देणारे सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन्‌ आणि मूळचे विदर्भातील असलेले संगीतकार राम-लक्ष्मण यांचा आयोजकांच्या वतीने विशेष गौरव करण्यात येणार आहे.
 
३१ अप्रदर्शित चित्रपट आणि २९ लघुपटांची मेजवानी
 
ऑरेंज सिटी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देशविदेशातील ३१ अप्रदर्शित चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. यामध्ये काही भारतीय चित्रपटही असून पाच मराठी चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने काही चित्रपटांच्या दिग्दर्शक आणि कलावंतांची चमूही उपस्थित राहणार आहे. प्रेक्षकांना त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
 
अदूर गोपालकृष्णन आणि रोहिणी हट्टंगडी यांची प्रकट मुलाखत
 
चित्रपट दिग्दर्शक आणि सत्कारमूर्ती अदूर गोपालकृष्णन्‌ आणि कलावंत रोहिणी हट्टंगडी यांची प्रकट मुलाखत हे या महोत्सवाचे विशेष आकर्षण राहणार आहे. प्रख्यात दिग्दर्शक जब्बार पटेल हे अदूर गोपालकृष्णन्‌ यांची मुलाखत पीव्हीआर सिनेमागृहात घेतील तर आयोजन समितीतील अजेय गंपावार हे पर्सिस्टंटच्या कालिदास ऑडीटोरियमध्ये रोहिणी हट्टंगडी यांची मुलाखत घेतील.
 
निळू फुले संवादमाला
 
महोत्सवादरम्यान निळू फुले स्मृति संवादमालेत प्रसाद लॅबचे मोहन कृष्णन हे फिल्म पोस्ट प्रॉडक्शनवर संवाद साधतील. नागपूर व विदर्भातील चित्रपट, शॉर्टफिल्म, डॉक्युमेंट्रीज, दिग्दर्शक, निर्मात्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी ही कार्यशाळा राहणार आहे. ‘नदी वाहते’ या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आणि त्यानंतर चित्रपटाच्या संपूर्ण टीम सोबत प्रेक्षकांचा संवाद हा कार्यक्रमही उत्सवांतर्गत राहणार आहे. या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. चंद्रशेखर मेश्राम यांनी केले आहे. पत्रपरिषदेला मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. आर. झेड. सिद्दिकी, उपायुक्त रवींद्र देवतळे, विद्यापीठाचे उपकुलसचिव श्री. हिरेखण, धर्मेश धवनकर, सप्तकचे उदय गुप्ते, रवींद्र डोंगरे, अजेय गंपावार आदी उपस्थित होते.

 

 

जैविक विविधतेच्या व्यवस्थापनाकरिता स्वतंत्र समन्वयक नेमावा : दिव्या धुरडे

जैविक विविधता व्यवस्थापन समिती आढावा बैठक
 
नागपूर,ता.१८ : महराष्ट्र शासनाने निर्धारित केलेल्या जैविक विविधता व्यवस्थापन समितीचे कामकाज बघण्याकरिता मनपा व समिती यामधील दुवा म्हणून स्वतंत्र समन्वयक नेमण्यात यावा, असे निर्देश नागपूर महानगरपालिकेच्या जैविक विविधता व्यवस्थापन समितीच्या सभापती दिव्या धुरडे यांनी केले.
 
गुरूवार (ता.१८) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांच्यासमवेत समिती सदस्य सोनाली कडू, सदस्य निशांत गांधी, मनपाचे उद्यान अधीक्षक धनंजय मेंडुलकर, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, जैविक विविधता विभागाच्या विभागीय वन अधिकारी प्रीती तलमले, महाराष्ट्र मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष आणि पर्यावरण तज्ज्ञ प्रकाश लोणारे, राजू चरडे, व्ही.एम.इलोरकर, उद्यान निरिक्षक अनंत नागमोते प्रामुख्याने उपस्थित होते.
 
महाराष्ट्र शासनाने प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेत जैविक विविधता व्यवस्थापन समिती नेमणे बंधनकारक केले. जैविक विविधता व्यवस्थापन समितीच्या लोक जैविक विविधता नोंदवही व दैनंदिन कामे बघण्याकरिता वनस्पती शास्त्रज्ञ नेमण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. या समितीच्या कामाकाजाकरिता वनस्पती शास्त्रज्ञ नेमणे बंधनकारक आहे. याशिवाय महानगरपालिका व व्यवस्थापन समितीमध्ये समन्वय ठेवण्यासाठी स्वतंत्र समन्वयक नेमणे गरजेचे आहे. तो लवकरात लवकर नेमावा, असे निर्देश समितीच्या अध्यक्षा दिव्या धुरडे यांनी दिले.
 
जैविक विविधता व्यवस्थापन समितीचे स्वतंत्र बँक खाते तयार करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्यात यावा, असे निर्देश दिव्या धुरडे यांनी दिले.
 
प्रारंभी समितीच्या सदस्यांचे स्वागत उद्यान अधीक्षक धनंजय मेंडुलकर आणि उद्यान निरिक्षक अऩंत नागमोते यांनी केले. विभागीय वन अधिकारी तलमले यांनी शासनाच्या योजनांचे सादरीकरण केले. 

 

 

भाजप प्रवक्त्या साजिया इलमी यांनी केली विकास प्रकल्पांची प्रशंसा

नागपूर महानगरपालिकेला भेट : महापौरांनी केले स्नेहील स्वागत
 
नागपूर, ता.१८   :  भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या साजिया इलमी यांनी गुरुवारी (ता. १८) नागपूर महानगरपालिकेला भेट देऊन मनपा अंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती घेतली. या प्रकल्पांनी प्रभावित झालेल्या साजिया इलमी यांनी या प्रकल्पांची प्रशंसा केली.
 
नागपूर महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात आयोजित बैठकीत प्रारंभी महापौर नंदा जिचकार यांनी श्रीमती साजिया इलमी यांचे शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, तुळशीचे रोप व शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी ग्रंथ देऊन स्वागत केले. बैठकीला नगरसेवक विक्की कुकरेजा, नगरसेविका दिव्या धुरडे, सोनाली कडू, अतिरिक्त आयुक्त डॉ. आर. झेड. सिद्दिकी, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, मुख्य अभियंता विजय बनगीरवार, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, मनोज तालेवार, संजय गायकवाड, परिवहन व्यवस्थापक जी. एम. जगताप, उपअभियंता राजेश दुफारे उपस्थित होते.
 
यावेळी प्रवक्त्या साजिया इलमी यांच्यासमोर ग्रीन बस, नागपूर ऑरेंज स्ट्रीट सिटी, नाग रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट, सांडपाणी प्रक्रिया, पुनर्चक्रीकरण व पुनर्वापर प्रकल्प (एसटीपी) आदींविषयी संबंधित अधिकाऱ्यांनी सादरीकरण केले. हे सर्व प्रकल्प पर्यावरण संवर्धन आणि प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने हितकारक असल्याचे मत श्रीमती साजिया इलमी यांनी व्यक्त केले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पांविषयी माहिती दिली होती. परंतु आज प्रत्यक्ष येथे सुरू असलेले कार्य पाहून प्रभावित झाल्याचे त्या म्हणाल्या.
 
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले.

 

 

अंबाझरी ‘वॉकिंग ट्रॅक’च्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन

नागपूर, ता. १८ : अंबाझरी तलावालगत असलेल्या ‘वॉकिंग ट्रॅक’च्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन गुरुवारी (ता. १८) सकाळी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आले.
 
यावेळी महापौर नंदा जिचकार यांच्यासह धरमपेठ झोन सभापती रूपा रॉय, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेविका डॉ. परिणिता फुके, नगरसेवक अमर बागडे, भाजपचे दक्षिण-पश्चिम क्षेत्राचे महामंत्री श्रीपाद (छोटू) बोरीकर, प्रभाग अध्यक्ष विजय होले आदी उपस्थित होते.
 
महापौर नंदा जिचकार यांच्याकडे अंबाझरी वॉकिंग ट्रॅकसंदर्भात अनेक तक्रारी येतो होत्या. सकाळी फिरणाऱ्या नागरिकांना तेथे धुळीचा सामना करावा लागतो. या तक्रारींची दखल घेत महापौर नंदा जिचकार यांनी महापौर निधीतून तीन लक्ष रुपये देऊन ट्रॅकचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. याबद्दल अंबाझरी परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले.
 
यावेळी भाजपचे कार्यकर्ते मनीष गेडाम, विकास वाके, प्रकाश राजहंस, मनोज पोद्दार, राजू मोघे, प्रीतम ढोके, सुबोत, आनंद गुप्ता, कुणाल तायवाडे, मुकुंद मस्के, धीरज मेश्राम, किशोर हाढाव, मनोज देशपांडे आदी उपस्थित होते.

 

 

सुदामनगरी ते मोरभवन बससेवेचा शुभारंभ

नागपूर, ता. १८ : नागपूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागाअंतर्गत सुदामनगरी ते मोरभवन बससेवेचा शुभारंभ गुरूवारी (ता.१८) सुदामनगरी स्थानकावरून करण्यात आला. नगरसेवक पिंटू झलके, नगरसेविका स्वाती आखतकर, विद्या मडावी यांनी यावेळी नव्याने सुरू झालेल्या बसला हिरवी झेंडी दाखविली.
 
यावेळी अजय बढारे, लिलाताई हाथीबेड, शुभांगी गायधने, नरेंद्र नांदूरकर, पुष्पा पांडे, भोलाभाऊ कुरडकर, योगेश मडावी, चंद्रकात आखतकर, योगेश मडावी, अजय हाथीबेड, परिवहन विभागाचे रामराव मातकर, सिद्धार्थ गजभिये प्रामुख्याने उपस्थित होते.
 
सुदामनगरी परिसरात बससेवा सुरू करण्यासाठी वारंवार मागणी होत होती. परिवहन समिती सभापती बंटी कुकडे आणि नगरसेविका विद्या मडावी यांनी पुढाकार घेऊन ही बस सेवा सुरू केली. ही बस नागरिकांसाठी नक्कीच फायदेशीर ठरणार असल्याची ग्वाही नगरसेविका विद्या मडावी यांनी दिली. ही बस सेवा सुरू झाल्यामुळे परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
 
ही बस सुदामनगरी मार्गे टेलिफोन नगर, पंचवटी, सक्करदरा चौक, मेडिकल चौक, मोक्षधाम चौक, मानस चौक, महाराजबाग चौक या मार्गे धावेल. या बसचे प्रवास भाडे पूर्ण तिकीट १९ रूपये तर अर्धे तिकीट १० रुपये असे राहील, अशी माहिती परिवहन विभागाद्वारे देण्यात आली आहे.

 

 

वर्धिनी वस्तू विक्री केंद्राला

महापौर नंदा जिचकार भेट
 
नागपूर, ता.१६ : नागपूर महानगरपालिका अंतर्गत महिला व बाल कल्याण समिती, समाजकल्याण विभाग व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान अंतर्गत उमेद डॉट नागपूर वर्धिनी वस्तू विक्री केंद्राला मंगळवारी (ता. १६) महापौर नंदा जिचकार यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, धरमपेठ झोन सभापती रूपा राय, नगरसेवक सुनील हिरणवार प्रामुख्याने उपस्थित होते.
 
प्रारंभी वस्तू विक्री केंद्राला भेट दिल्यानंतर तेथील वस्तूंची पाहणी केली. बचत गटांच्या माध्यमांतून महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टीने स्तुत्य उपक्रम आहे असे म्हणत त्यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. यावेळी समाज कल्याण विभागाचे विनय त्रिकोलवार, नूतन मोरे हे उपस्थित होते.

 

 

दवाखान्याची दुरूस्ती प्राधान्याने करा

आरोग्य समिती सभापती चापले यांचे निर्देश : मनपा दवाखान्यांची केली पाहणी
 
नागपूर,ता.१७ : नागपूर महानगरपालिकेच्या दवाखान्याची अवस्था देखरेखीअभावी वाईट आहे. दवाखान्याची दुरूस्ती प्राधान्याने करावी, असे निर्देश वैद्यकीय सेवा व आरोग्य सेवा समिती सभापती मनोज चापले यांनी दिले.
 
बुधवार (ता.१७) ला मनपाच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या दवाखान्याची पाहणी प्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी त्यांचा समवेत वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी, कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष राजेश होथीबेड, जीवन पराते प्रामुख्याने उपस्थित होते.
 
सभापती मनोज चापले यांनी शहीद चौकातील दाजी हॉस्पीटल, गोळीबार चौक येथील नेताजी हॉस्पीटल, महाल येथील दटके हॉस्पीटल, टेलिफोन एक्सचेंज येथील चकोले हॉस्पीटलची पाहणी केली. मनपाच्या दवाखान्याची दुरूस्ती व देखभाल ही समितीच्या वतीने करण्यात येत आहे. सभापती चापले यांनी सर्वप्रथम शहीद चौकातील दाजी दवाखान्याला भेट दिली व तेथील समस्या जाणून घेतल्या. विद्युत पुरवठा वारंवार खंडित असल्याने अंधाराचे साम्राज्य तेथे असते. ते तातडीने दुरूस्त करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. महिलांसाठी शौचालयाची व्यवस्था त्याठिकाणी करण्यात यावी, असे आदेश चापले यांनी दिले. दवाखान्याच्या प्रवेशद्वाराजवळ दवाखान्याच्या नावाचे फलक लावण्याचे अधिकाऱ्यांना सूचित केले. यावेळी दाजी हॉस्पीटलच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.मंजुषा मठपती उपस्थित होत्या.
 
यानंतर सभापतींनी नेताजी हॉस्पीटलची पाहणी केली. नेताजी हॉस्पीटलमध्ये भिंतीवर रंगरंगोटी करण्याचे निर्देशित केले. त्या ठिकाणी मोठ्या डस्टबिनची व्यवस्था तातडीने करण्यात यावी, असे आदेश दिले. शौचालयदेखील खूप खराब असल्याचे आढळून आले. याबाबत सभापतींनी नाराजी व्यक्त करीत ते लवकरात लवकर दुरूस्त करण्याचे निर्देश दिले. चकोले हॉस्पीटलमधील टी.बी. रूग्णांची रूम स्वच्छ नसल्याने सभापती चापले यांनी संताप व्यक्त केला व ती तातडीने दुरूस्त करण्याचे अधिकाऱ्यांना निर्देशित केले.
 
महाल येथील दटके रोग निदान केंद्राची पाहणी सभापती चापले यांनी केली. तेथील व्यायाम कक्ष, बाह्यरूग्ण कक्ष, डेंग्यूसारख्या रोगावर होणारा अंतिम उपचार याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. नव्याने तयार झालेल्या आय सेंटरलासुद्धा त्यांनी यावेळी भेट दिली. त्यांच्यासमवेत मंगेश धार्मिक, कार्तिक रोकडे प्रामुख्याने उपस्थित होते.

 

 

मनपातील विशेष समितीची बैठक

पुढील सभागृहात अहवाल सादर करणार
 
नागपूर,ता. १६ : सभागृहात उपस्थित राहणाऱ्या प्रश्नांबाबत सर्वसमावेशक धोरण ठरविण्याकरिता नागपूर महानगरपालिकेने गठित केलेल्या विशेष समितीची बैठक मंगळवारी (ता.१६) मनपा मुख्यालायतील महापौर कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. याबैठकीत अध्यक्ष दयाशंकर तिवारी, सदस्य माजी महापौर प्रवीण दटके, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, प्रफुल्ल गुडधे पाटील, निगम सचिव हरिश दुबे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
मनपातील सर्वसाधारण सभेत सदस्यांचा मानस लक्षात घेता महाराष्ट्र अधिनियमातील कलम ४४ अंतर्गत उपस्थित होत असलेले प्रश्न, कलम १(ज) अन्वये नोटीस बजावणे, कलम १(ट)अन्वये स्थगन प्रस्ताव, कलम १ (एक्स) अन्वये लक्षवेधी प्रस्ताव देणे याविषयाबाबत सर्वसमावेशक धोरण तयार करण्यासाठी ही समिती गठित करण्यात आली. या सर्व विषयांवर महानगरपालिका अधिनियमात काही तरतुदी आहे का, यावर यावेळी बैठकीत चर्चा झाली. बैठकीत झालेल्या चर्चेचा अहवाल फेब्रुवारी महिन्याच्या सर्वसाधारण सभेपुढे मांडण्यात येईल, अशी माहिती दयाशंकर तिवारी यांनी दिली.

 

 

महाराजबागमध्ये २०० नागरिकांनी केले ‘स्वच्छता ॲप’ डाऊनलोड

मनपा आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचा उपक्रम
 
नागपूर,ता.१७ : ‘स्वच्छ सर्वेक्षण २०१८’ मध्ये अग्रस्थानावर येण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेतर्फे विविध स्तरावर जनजागृती अभियान सुरू आहे. रविवारी (ता. १५) महाराजबाग येथे मनपाने ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या सहकार्याने नागरिकांमध्ये ‘स्वच्छता ॲप’ विषयी जनजागृती करीत नागपूर स्वच्छ आणि सुंदर बनविण्याचे आवाहन केले. यावेळी सुमारे २०० नागरिकांनी स्वच्छता ॲप डाऊनलोड केले.
 
यावेळी नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे, नागपूर महानगरपालिकेचे ‘स्वच्छता ॲम्बेसेडर’ तथा ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी उपस्थित होते. स्वच्छता ॲम्बेसेडर कौस्तभ चॅटर्जी यांच्यासह ग्रीन व्हिजीलच्या सुमारे १५ स्वयंसेवकांनी महाराजबागमध्ये येणाऱ्या पर्यटकांना ‘स्वच्छता ॲप’ आणि ‘स्वच्छता सर्वेक्षण २०१८’ याविषयी माहिती दिली. नागपूर शहर स्वच्छ आणि सुंदर करणे आता एका ‘क्लिक’वर शक्य आहे. आपल्या स्मार्ट फोनवर स्वच्छता ॲप डाऊनलोड करा. अस्वच्छतेविषयीच्या तक्रारी त्या कुठल्या भागातील आहे अशा माहितीसह अपलोड करा. १२ तासांच्या आत तक्रारींचे निराकरण होईल, अशी माहिती स्वयंसेवकांनी प्रत्येक नागरिकाला दिली. यावेळी सुमारे २०० नागरिकांनी ॲप डाऊनलोड केले तर सुमारे १०० नागरिकांना त्यावर फीडबॅक दिला.
 
या जनजागृती मोहिमेत ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या सुरभी जैस्वाल, कल्याणी वैद्य, शीतल चौधरी, विष्णूदेव यादव, संजीवनी गोंदोडे, प्रिया यादव, अभय पौनिकर, सारंग मोरे, दादाराव मोहोड आदी स्वयंसेवकांचा समावेश होता.

 

 

महिला बचत गटांच्या उत्पादनांना मनपाने उपलब्ध करून दिली बाजारपेठ

वर्धिनी वस्तू विक्री केंद्राचे ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्‌घाटन
 
नागपूर,ता.१५ : राज्यभरातील ग्रामीण व शहरी भागातील स्वयंसहायता बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उदात्त हेतूने नागपूर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीने पुढाकार घेतला आहे. उत्पादनांच्या विक्रीसाठी मधुमाधव टॉवर, गोकुळपेठ येथे वर्धिनी वस्तू विक्री केंद्राला सोमवार १५ जानेवारीपासून सुरुवात झाली.
 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या आगळ्यावेगळ्या वर्धिनी वस्तू विक्री केंद्राचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी आ. प्रा. अनिल सोले, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती वर्षा ठाकरे, स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती संजय बंगाले, धरमपेठ झोन सभापती रूपा रॉय, महिला व बालकल्याण समितीच्या सदस्य वंदना भगत,नगरसेविका दिव्या धुरडे, नगरसेवक सुनील हिरणवार, निशांत गांधी, मनपाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. रिजवान सिद्दीकी, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय उपजीविका अभियानाचे नॅशनल मिशन मॅनेजर मयंकमोहन मिश्रा, जयंत पाठक, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे उपस्थित होते.
 
नागपूर महानगरपालिका अंतर्गत महिला व बालकल्याण समिती समाजकल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान आणि जिल्हा ग्रामीण विकास  यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने संचालित ‘उमेद डॉट कॉम’ वर्धिनी वस्तू विक्री केंद्राचे उद्‌घाटन ना. नितीन गडकरी यांनी फीत कापून व दीप प्रज्वलन करून केले. त्यानंतर ना. गडकरी यांनी वस्तू विक्री केंद्राची पाहणी करून महिला बचत गटाच्या सदस्यांकडून माहिती घेतली. ना. नितीन गडकरी यांनी ही संकल्पना राबविणाऱ्या सर्व विभागाच्या पदाधिकाऱ्यांचे, अधिकाऱ्यांचे आणि महिला बचत गट सदस्यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. यावेळी ना. नितीन गडकरी व सर्व मान्यवरांना महिला बचत गटातर्फे तयार करण्यात आलेले कागदी बुके आणि भेट वस्तू देण्यात आला. महिला व बालकल्याण सभापती वर्षा ठाकरे यांनी शाल, श्रीफळ देऊन ना. गडकरी यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन आनंद आंबेकर यांनी केले. आभार जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी मानले. समाजकल्याण विभागाचे स्कील व्यवस्थापक विनय त्रिकोलवार, एमआयएस व्यवस्थापक नूतन मोरे, ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या जिल्हा व्यवस्थापक सोनाली भोकरे, अमोल भगत, शारदा गडकर, प्रमोद खोब्रागडे, वर्षा कोहळे, चंद्रशेखर पाचोरे आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
 
पर्यावरणपूरक ‘वर्धिनी वस्तू विक्री केंद्र’
 
ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आलेल्या वर्धिनी वस्तू विक्री केंद्र पर्यावरणपूरक आहे. या विक्री केंद्रात प्लास्टिकचा उपयोग केल्या जात नाही. प्लास्टिक डिस्पोजल साहित्याला पर्याय म्हणून सुपारीच्या सालापासून बनविण्यात आलेल्या प्लेटस्‌सुद्धा येथे विक्रीस उपलब्ध आहेत. खादी बॅग, टेराकोटा ज्वेलरी, इंडियन पास्ता अर्थात सरगुंडे, वायगावची हळद, घरगुती मसाले, बांबूपासून तयार करण्यात आलेल्या नित्यपयोगी वस्तू, कागदी बुके, हॅण्डमेड शर्ट आदी वस्तू येथे विक्रीस आहेत. वर्धा, गोंदिया, गडचिरोली, रत्नागिरी, सोलापूर, यवतमाळ, नागपूर आदी शहरातील बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांचा समावेश विक्री केंद्रात आहे.
 
#nmcnagpur #smartcitynagpur #nitingadkari #cmomaharashtra
 
नंदा जिचकार यांनी महापौरपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी (ता. १४) पहिल्यांदाच नागपूर महानगरपालिकेला भेट दिली. यावेळी महापौर कक्षात महापौर नंदा जिचकार यांनी त्यांचा शाल, श्रीफळ, तुळशीचे रोप देऊन सत्कार केला. मकरसंक्रांतीचे औचित्य साधून महापौर जिचकार यांनी त्यांना तीळगूळही दिले. 
 

 

खर्चात कपात करा आणि उत्पन्न वाढवा

ना. नितीन गडकरी यांचे मनपाला निर्देश : आर्थिक स्थितीचा घेतला आढावा
 
नागपूर, ता. १४ : नागपूर महानगरपालिका नागरिकांना दर्जेदार सुविधा देत असते. त्यावर परिणाम पडू नये यासाठी मनपाची आर्थिक स्थिती चांगली राहायला हवी. यासाठी विविधखर्चात कपात करण्यात यावी आणि नवनवे उत्पन्नाचे स्त्रोत शोधून उत्पन्न वाढविण्यात यावे. पदाधिकारी आणि अधिकारी यांनी संयुक्त प्रयत्न करून प्रगतीपथावर असलेले सर्व प्रकल्पतातडीने पूर्ण करावे, असे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मनपा मुख्यालयात आयोजित बैठकीत उपस्थितांना दिले.
 
नागपूर महानगरपालिकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते.बैठकीला राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन गडकरी, महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, आ.सुधाकर कोहळे, आ. कृष्णा खोपडे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. विकास कुंभारे, आ. मल्लिकार्जुन रेड्डी, आ. नागो गाणार, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मनपा आयुक्त अश्विन मुदगल,नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. दीपक म्हैसकर, माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, दिव्या धुरडे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे,उपायुक्त रवींद्र देवतळे, उपायुक्त राजेश मोहिते, मुख्य अभियंता विजय बनगीरवार, नगररचना सहायक संचालक गावंडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मोना ठाकूर उपस्थित होते.
 
आयुक्त अश्विन मुदगल यांनी मनपाच्या आर्थिक स्थितीचा अहवाल सादर केला. उत्पन्नाचे नवे स्त्रोत काय, याविषयीही सादरीकरण्याच्या माध्यमातून माहिती दिली.
 
ना. नितीन गडकरी यांनी यावेळी मनपाची आर्थिक स्थिती समजून घेतली. परिवहन विभागाच्या माध्यमातून सुरु असलेल्या शहर परिवहन बसेस डिझेलऐवजी सीएनजीवर चालविता येतीलका, त्यामुळे उत्पन्नात वाढ करून परिवहन विभागाला होणारा तोटा कमी करता येईल का, विद्युत विभागाद्वारे अधिकाधिक सौर ऊर्जेचा वापर करून सध्या होणारा विजेवरचा खर्च कमीकरता येईल का, याबाबत विस्तृत चर्चा केली. राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाच्या योजनेच्या माध्यमातून युनीटमागे मोजल्या जाणारी रक्कम कमी कशी करता येईल, याविषयी ऊर्जामंत्रीचंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केली. मनपा अधिकाऱ्यांनी त्यांना प्रस्ताव देऊन योजनेचा लाभ घेण्याचे निर्देश दिले.
 
नागपूर सुधार प्रन्यासद्वारे मनपाकडे हस्तांतरित होत असलेल्या मालमत्तेच्या प्रक्रियेचा आढावाही त्यांनी घेतला. नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती आणि मनपा आयुक्तांनी तातडीने हाविषय मार्गी लावण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत. नागपूर मनपाने उभारलेल्या एसटीपीच्या माध्यमातून सध्या किती पाणी महाजनकोला जातेय, त्यातून उत्पन्न किती, याविषयीही ना. गडकरीयांनी चर्चा केली. पुढील वर्षापर्यंत यातून मिळणारे उत्पन्न ५० कोटींच्या वर कसे नेता येईल, याबाबत पावले उचला, असेही निर्देश त्यांनी दिले.
 
मालमत्ता सर्वेक्षणाचे कार्य मार्च अखेरीपर्यंत पूर्ण करण्यात यावे. जीपीएस प्रणाली अथवा अत्याधुनिक प्रणालीचा वापर करण्यात यावा. यासाठी आवश्यक असल्यास अतिरिक्त एजंसीची नियुक्ती करण्यात यावी, असेही निर्देश ना. गडकरी यांनी दिले.
 
नगर रचना विभागाच्या माध्यमातून नकाशे मंजूर करण्याच्या प्रक्रियेत बऱ्याच अडचणी येतात. यामुळे यामाध्यमातून येणाऱ्या उत्पन्नावरही परिणाम पडतो. ही प्रक्रिया जर किचकट असेलतर यासंदर्भात लवकरच शहरातील आर्किटेक्ट व तज्ज्ञ व्यक्तींची एक बैठक बोलावून त्यावर मते घेण्यात यावी. आपण स्वत: यामध्ये लक्ष देऊ. त्यामाध्यमातून सोपी आणि सुधारीत नवीपॉलिसी तयार करता येईल का, याबाबतही तातडीने विचार करण्यात यावा, असेही ना. नितीन गडकरी यांनी सांगितले. २४ बाय सात या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेचे उर्वरीत कामतातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही ना. गडकरी यांनी मनपा आयुक्तांना दिले.  वित्तीय विभागाने मनपाची आर्थिक स्थिती नियमित करण्यासाठी दीर्घ व अल्प मुदतीच्या कर्जाचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही ना. गडकरी यांनी दिले.
 
बैठकीला मनापच्या संबंधित विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
 
कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटरला भेट
 
बैठकीनंतर ना. नितीन गडकरी यांनी मनपाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत नागपूर सेफ ॲण्ड स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत तयार करण्यात आलेल्या कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटरला भेटदिली. या सेंटरच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती त्यांनी जाणून घेतली.
 
महापौरांनी दिले तीळगूळ
 
बैठकीपूर्वी ना. नितीन गडकरी यांनी महापौर कार्यालयाला भेट दिली. महापौर नंदा जिचकार यांनी शाल, श्रीफळ, तुळशीचे रोपटे देऊन त्यांचे महापौर कक्षात स्वागत केले.मकरसंक्रांतीचे औचित्य साधून त्यांना तीळगूळही दिला. 
 

 

 

शौचालयांच्या अस्वच्छतेबाबत हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही

- मनपा आयुक्तांनी एजन्सीला खडसावले
 
नागपूर, ता. 13 जानेवारीः सार्वजनिक शौचालय नियमित स्वच्छ राहत नसल्याने नागरिक त्याचा उपयोग करणे टाळतात. ज्या एजन्सीकडे शौचालयाच्या स्वच्छतेची जबाबदारी आहे त्यांच्याकडून यापुढे हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही. कामात हलगर्जीपणा केल्यास यापुढे काम करता येणार नाही असे खडेबोल मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांनी शौचालयांच्या स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या एजन्सीच्या प्रतिनीधींना सुनावले.
 
शनिवारी (ता. 13 जानेवारी) मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांनी मोरभवन आणि गणेशपेठ येथील शौचालय आणि परिसराच्या स्वच्छतेचा आढावा घेतला. तसेच आवश्यक मुलभूत सुविधांबाबतचे निर्णय तत्काळ घेऊन कार्याला प्रारंभ करण्यात यावे असे निर्देश संबंधित अधिका-यांना दिले. यावेळी प्रामुख्याने अतिरिक्त आय़ुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, एसटी महामंडळ विभाग नियंत्रक सुधीर पंचभाई, धरमपेठ झोनचे सहायक आय़ुक्त महेश मोरोणे, धंतोली झोनचे सहायक आय़ुक्त गणेश राठोड, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जय़स्वाल, महामंडळाचे विभागीय अभियंता सतीश कटरे, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, उपअभियंता केदार मिश्रा यांची उपस्थिती होती.
 
आगामी स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये सार्वजनिक वाहतुकीच्या ठिकाणी स्वच्छता असणे अत्यंत गरजेचे आहे. प्रशासनानेही स्वच्छता एजन्सीची नियुक्ती केली आहे. मात्र त्यांच्या कामाचा आढावा घेणे आणि एजन्सी आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडत आहे की नाही. य़ावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी अधिका-यांची प्रामाणिकपणे पार पाडावी तसेच काही अडचण असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधा मात्र कामात हलगर्जीपणा खपवून घेऊ नका असे स्वष्ट़ निर्देश आयुक्तांनी दिले.
 
...अन कचरा बघून आयुक्त संतापले
 
गणेशपेठ येथील सार्वजनिक शौचालयांच्या स्वच्छतेची जबाबदारी एजन्सीकडे देण्यात आली आहे. मात्र त्यांच्याकडून काम केले जात नसल्याचे आढळून आहे. एजन्सी काम करत नसल्याने मनपाच्या यंत्रणेला गेल्या 8 दिवसांपासून स्वच्छता करावी लागली. त्यात रोज ढिगभर कचरा निघत असल्याचे दिसून आले. हे दिसताच आयुक्तांनी एजन्सीच्या प्रतिनीधीला फटकारले. जबाबदारी प्रमाणिकपणे पार पाडली नाही तर काम करु देणार नसल्याचे स्पष्ट शब्दात आयुक्तांनी सांगितले.

 

 

मनपाच्या शाळेत व्यावसायिक शिक्षण कार्यशाळेचे भूमिपूजन

नागपूर,ता.१२. नागपूर महानगरपालिकेच्या ताजाबाद उर्दू माध्यामिक शाळा व ज्युनियर कॉलेजमध्ये राष्ट्रीय माध्यामिक शिक्षा अभियानअंतर्गत ब्युटी ॲण्ड वेलनेस आणि टुरिझम ॲण्ड हॉस्पिटॅलिटी हे व्यवसायिक शिक्षण सुरू करण्यात आले आहे. त्यासाठीच्या शासनाच्यावतीने बांधण्यात येणार असलेल्या बांधकामाचे भूमीपूजन गुरूवार (ता.११) ला क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी नगरसेविका रिता मुळे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
 
व्यावसायिक शिक्षण ही काळाची गरज आहे. अशा प्रकारच्या शिक्षण अभ्यासक्रमातून मनपाच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत आहे. यातूनच मनपाचे विद्यार्थी प्रगल्भ होतील, असा विश्वास सभापती नागेश सहारे यांनी व्यक्त केला. मुलांमधील खेळवृत्ती जागृत करण्यासाठी मनपाद्वारे विविध स्पर्धेचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती सभापती नागेश सहारे यांनी दिली.

 

 

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच मनपाच्या शिक्षण विभागाचे ध्येय : दीपराज पार्डीकर

मनपाच्या शिक्षण सप्ताहांतर्गत क्रीडा स्पर्धांचा समारोप
 
नागपूर,ता.१३ : नागपूर महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांना क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात मोठे करावे, हेच आमचे ध्येय आहे, असे प्रतिपादन उपमहापौर दीपराज पार्डकर यांनी केले. शनिवार (ता.१३) यशवंत स्टेडियम येथे आयोजित शिक्षण सप्ताहाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते.
 
यावेळी व्यासपीठावर शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, धरमपेठ झोनच्या सभापती रूपा राय, उपायुक्त रवींद्र देवतळे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार प्रामुख्याने उपस्थित होते.
 
पुढे बोलताना पार्डीकर म्हणाले, मनपाच्या शाळेतील विद्यार्थी हे गरीब घरातील असून, त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने आणलेल्या नवीन योजना ह्या मनपाच्यावतीने राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळामध्ये अथवा सांस्कृतिक स्पर्धेमध्ये उतरविण्याच्या दृष्टीने प्रयत्न शिक्षण विभागाद्वारे करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमधील गुण हेरून त्यांना त्यापद्धतीने प्रशिक्षण देण्यासाठी महानगरपालिका कटीबद्ध आहे. शिक्षण विभागाला व क्रीडा विभागाला कोणतीही मदत लागली तर मी सदैव त्यांच्या पाठिशी आहे, असे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले.
 
शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी शिक्षण सप्ताहांतर्गत आयोजित क्रीडा स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत त्यांना राज्यस्तरीय, राष्ट्रीयस्तरीय स्पर्धेच्या दृष्टीने प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सांगितले.  त्या प्रशिक्षणासाठी लागेल तो खर्च महानगरपालिका करेल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. मनपाच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान हे लक्षणीय असून त्या सर्व विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो, असेही ते म्हणाले.
 
क्रीडा समिती सभापती नागेश सहारे म्हणाले, विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धेकरिता कसे तयार करता येईल याकडे शिक्षकांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांना राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय स्पर्धेकरीता तयार करण्यासाठी मनपा विशेष प्रयत्न करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
 
प्रारंभी मान्यवरांचे स्वागत शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी केले. स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. पारडी उच्च मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी कोळी नृत्य सादर केले. सुरेंद्रगड हिंदी माध्यामिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी लावणी नृत्य सादर केले.
 
विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक व क्रीडा या क्षेत्राची आवड निर्माण व्हावी याकरिता शिक्षण सप्ताहाचे आयोजन मनपाद्वारे दरवर्षी करण्यात येते. त्यात मैदानी खेळाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती शिक्षणाधिकारी मेडपल्लीवार यांनी प्रास्ताविकातून दिली. यावेळी विविध स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.
 
कार्यक्रमाला क्रीडा निरीक्षक नरेश चौधऱी, क्रीडा विभाग प्रमुख नरेश सवाईथूल, जितेंद्र गायकवाड,  मुख्याधापक संजय पुंड, सर्व शाळा निरिक्षक , मनपा शाळेच्या शिक्षिका व शिक्षक उपस्थित होते.

 

 

झोनअंतर्गत येणाऱ्या सर्व तक्रारी प्राधान्याने सोडवा : मनोज चापले

वैद्यकीय सेवा व आरोग्य समितीची आढावा बैठक
 
नागपूर,ता.११ : महानगरपालिकेच्या झोनअंतर्गत विविध तक्रारी येत असतात. त्या सर्व तक्रारी प्राधान्याने सोडवा, असे निर्देश वैद्यकीय सेवा व आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांनी दिले. गुरूवार (ता.११) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते.
 
यावेळी उपसभापती प्रमोद कौरती, समिती सदस्य लखन येरावार, विजय चुटेले, सदस्या विशाखा बांते, भावना लोणारे, आशा नेहरू उईके, वंदना चांदेकर, उपायुक्त डॉ.रंजना लाडे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, हत्तीरोग व हिवताप अधिकारी जयश्री थोटे, पशुचिकित्सक अधिकारी डॉ.गजेंद्र महल्ले, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी, अतिक खान प्रामुख्याने उपस्थित होते.
 
यावेळी मागील आढावा बैठकीत झालेल्या कार्यवाहीला मंजुरी देण्यात आली. जन्म व मृत्यू विभागाच्या कामकाजाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. जन्म-मत्यू प्रमाणपत्र विभागाद्वारे सातत्याने तक्रारी येत आहे. त्यासंदर्भातील आढावा घेण्यात आला. जन्म मृत्यू प्रक्रिया ही आता ऑनलाईनद्वारे होत आहे. ही प्रक्रिया केंद्र शासनाद्वारे राबविण्यात येत आहे. बाळाचा जन्म झाल्यावर किंवा मृत्यू झाल्यावर लगेच सहा तासाच्या आत त्याची नोंद मनपाच्या रेकॉर्डमध्ये समाविष्ट केली जाते, अशी माहिती उपायुक्त लाडे यांनी दिली. नवीन प्रक्रिया वर्तमानपत्राद्वारे जाहिरातीच्या माध्यमातून देण्यात यावी, असे आदेश सभापती श्री. चापले यांनी दिले.
 
मनपा दवाखान्याच्या कामकाजाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. हिवताप व हत्तीरोग विभागाचा आढावा यावेळी घेण्यात आला. यासंदर्भात ज्या ठिकाणी रोग सदृश्य लाव्ही आढळल्या त्या ठिकाणी नोटीस देण्यात यावी आणि त्यानंतरही आढळून आल्यास कारवाई करण्यात यावी, असे आदेश सभापती चापले यांनी दिले. त्यासंदर्भात माहिती देताना जयश्री थोटे यांनी यासाठी करण्यात येणाऱ्या दंडात्मक कारवाईविषयी माहिती दिली. घरी जर लाव्ही आढळली तर ५० रूपये दंड, आणि दर दिवसाला २० रूपये दंड आकारण्यात येतो. व्यावसायिक ठिकाणी ५०० रूपये दंड आणि प्रति दिवशी २०० रूपये दंड आकारण्यात येत असल्याची माहिती दिली.
 
स्वच्छ भारत अभियानाच्या कामकाजाचा आढावा यावेळी घेण्यात आला. अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर यांनी शहरात सुरू असलेल्या स्वच्छ सर्वेक्षणाबाबत बैठकीत माहिती दिली. स्वच्छतेसंदर्भात आवश्यक त्या वस्तूंची अर्थसंकल्पात तरतूद करा, असे निर्देश सभापतींनी दिले. यापुढे कचरा गाडीवर लाऊडस्पीकर लावण्यात यावे, असेही ते म्हणाले. बैठकीला सर्व झोनचे झोनल अधिकारी उपस्थित होते.

 

 

पंतप्रधान आवास योजनेच्या प्रक्रियेला वेग द्या!

सभापती चेतना टांक यांचे निर्देश
 
नागपूर, ता. १० :  पंतप्रधान आवास योजना ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे. अनेक नागरिकांनी यासाठी अर्ज केले आहे. त्यासंदर्भात नेमके काय सुरू आहे, याची माहिती वेळोवेळी समितीला देण्यात यावी आणि प्रक्रियेला वेग देण्यात यावा, असे निर्देश गलिच्छ वस्ती निर्मूलन व घरबांधणी विशेष समितीच्या सभापती चेतना टांक यांनी दिले.
 
मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात बुधवारी (ता. १०) आयोजित समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला सभापती चेतना टांक यांच्यासह उपसभापती वंदना यंगटवार, सदस्य सुनील हिरणवार, मनोज सांगोळे, स्नेहा निकोसे उपस्थित होते.
 
बैठकीत डी.पी. रस्ते व अन्य प्रकल्पांतर्गत महानगरपालिकेद्वारे सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकास कामांमुळे किती घोषित झोपडपट्टीतील झोपडपट्टीवासीय बाधीत होत आहेत, याचा आढावा बैठकीत घेण्यात आला. पंतप्रधान आवास योजना आणि घरकुल योजनांचाही यावेळी आढावा घेण्यात आला. या योजनेअंतर्गत ज्या लोकांनी अर्ज केले आहे, त्यांना प्रकल्पाच्या प्रगतीची माहिती हवी असते. यासाठी ते नगरसेवकांशी संपर्क साधतात. मात्र, अपुऱ्या माहितीमुळे लोकांना योग्य माहिती नगरसेवकही देऊ शकत नाही. त्यामुळे यापुढे अधिकाऱ्यांनी प्रत्येक आठवड्याला प्रकल्पाच्या प्रगतीचा अहवाल समितीला द्यावा, असे निर्देश देत समिती सदस्य प्रत्येक आठवड्याला प्रकल्पस्थळाची पाहणी करतील, अशी माहिती दिली.
 
बैठकीला अधिकारी किंवा संबंधित कर्मचारी गैरहजर असल्यास समिती सदस्यांना योग्य माहिती मिळत नाही. त्यामुळे पुढील बैठकीपासून प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी न चुकता उपस्थित राहावे, अशा सूचना त्यांनी केल्या.

 

 

मोरभवन बसस्थानकावर महिला प्रसाधनगृहाची निर्मिती करा – बंटी कुकडे

परिवहन सभापतींनी जाणून घेतल्या प्रवाशांच्या समस्या
 
नागपूर, ता. ९ : मोरभवन येथे दररोज ५० हजारांवर प्रवासी आणि १२५ पेक्षा अधिक ‘आपली बस’च्या फेऱ्या होत असतात. या स्थानकावर मुलभूत सुविधा नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत म्हणून प्राधान्याने महिलांसाठी प्रसाधनगृह, स्वच्छ पिण्याचे पाणी आणि प्रवासी निवारा आदी सोयी सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात असे निर्देश परिवहन समिती सभापतींनी दिले. 
 
शहराच्या ह्द्यस्थानी असलेल्या मोरभवन बस स्थानकावर मुलभूत सुविधा नाही. महिलांसाठी शौचालय नाही, शुद्ध पिण्याचे पाणी नाही, अशा अनेक तक्रारी परिवहन विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. याची दखल घेत स्वतः परिवहन सभापतींनी मोरभवन येथील प्रत्यक्ष पाहणी करुन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थिनी आदींशी चर्चा केली. यावेळी काही विद्यार्थ्यांनी सकाळी मार्गावर गर्दी होत असल्याने बस फेऱ्यावाढविण्याची मागणी केली. तर काही प्रवाशांनी त्यांच्या परिसरात बस थांबा देण्याची मागणी केली. यावेळी सर्व मागण्यांची नोंद परिवहन विभागातील कर्मचा-यांनी केली, तसेच सर्व समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील, असे आश्वासन यावेळी परिवहन सभापतींनी प्रवाशांना दिले.याप्रसंगी परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, परिवहन विभागाचे उपअभियंता के.आर.मिश्रा, उप अभियंता मनोज सिंग यांच्यासह आदी अधिका-यांची उपस्थिती होती.
 
‘आपली बस’ डेपोच्या स्वच्छतेला प्राधान्य
 
‘आपली बस’ने दररोज सुमारे दोन लाख प्रवासी प्रवास करतात. आपल्या प्रवाशांना स्वच्छ बसचा प्रवास आणि स्वच्छ बस स्थानक देणे परिवहन विभागाची जबाबदारी असल्याने विभागाने बस स्थानकांच्या स्वच्छतेबाबत विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचे यावेळी परिवहन सभापतींनी सांगितले. आगामी स्वच्छ सर्वेक्षणासाठीही मनपा परिवहन विभाग सज्ज असून स्वच्छ शहर साकारण्यात बस चालक, वाहकांसह प्रत्येक कर्मचारी आणि परिवहन समिती सदस्य आपले योगदान देणार असल्याची माहिती यावेळी सभापतींनी दिली.

 

 

‘शिक्षण सप्ताहा’चे थाटात उद्‌घाटन

मनपा आंतरशालेय क्रीडा स्पर्धा : १३ जानेवारीला समारोप
 
नागपूर, ता. ९ : नागपूर महानगरपालिकेद्वारा संचालित शाळांच्या आंतरशालेय स्पर्धांना ‘शिक्षण सप्ताहां’तर्गत मंगळवारी (ता. ९) सुरुवात झाली. झोनस्तरावर सुरू झालेल्या स्पर्धेचे उद्‌घाटन कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांच्या हस्ते झाले.
 
मंगळवारी झोनअंतर्गत येणाऱ्या आर.बी.जी.जी. हिंदी माध्यमिक शाळेच्या पटांगणावर आयोजित उद्‌घाटन समारंभाला कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, सदस्य राजेंद्र सोनकुसरे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी, आर.बी.जी.जी. हिंदी माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कांता वावटे, शाळा निरीक्षक माया इवनाते उपस्थित होते.
 
कबड्डी मैदानाचे पूजन करून कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी शिक्षण सप्ताहाचे उद्‌घाटन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, शिक्षणासोबतच खेळ हे शारीरिक वाढीसाठी आवश्यक असतात. मनपा शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये खेळभावना वृद्धींगत व्हावी, या उद्देशाने मनपाच्या शिक्षण विभागाने यंदा प्रथमच अशा सप्ताहाचे आयोजन केले आहे. अशा स्पर्धांमधून उत्तम खेळाडू समोर येतील, असा विश्वास श्री. पार्डीकर यांनी व्यक्त केला.
 
शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी शिक्षण सप्ताहांतर्गत सुरू झालेल्या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. सर्व खेळ खिलाडूवृत्तीने खेळा, असे आवाहनही त्यांनी केले.
 
उद्‌घाटन समारंभानंतर आर.बी.जी.जी. हिंदी माध्यमिक शाळा आणि मकरधोकडा उच्च प्राथमिक शाळा यांच्यामध्ये कबड्डीचा सामना रंगला. या सामन्यात मकरधोकडा उच्च प्राथमिक शाळेने आर.बी.जी.जी.वर मात करीत सामन्यात २२-११ गुणांनी विजय संपादन केला.
 
कार्यक्रमाचे संचालन डॉ. बाळासाहेब बन्सोड यांनी केले. शिक्षण सप्ताहांर्गत सुरू झालेल्या स्पर्धांचे झोननिहाय उद्‌घाटन संबंधित प्रभागातील नगरसेवकांच्या हस्ते झाले. ९ ते ११ जानेवारी दरम्यान झोन स्तरावर आणि १२ व १३ जानेवारी रोजी यशवंत स्टेडियम येथे झोनअंतर्गत स्पर्धांनी शिक्षण सप्ताहाचा समारोप होईल. क्रीडा स्पर्धांमध्ये कबड्डी, लंगडी, रस्साखेच, फुटबॉल, धावणे, गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी, तिहेरी उडी आदी स्पर्धांचा समावेश असल्याची माहिती क्रीडा विभाग प्रमुख नरेश सवाईतूल यांनी दिली.
 

 

साथ रोग नियंत्रणासाठी तत्पर राहा : दीपराज पार्डीकर

नागपूर, ता. ९ : डेंग्यू, मलेरिया, हत्तीरोगाचे रुग्ण आढळल्यास तातडीने कार्यवाही सुरू करा. साथ रोग नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा आणि नेहमी तत्पर राहा, अशा सूचना कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या.
 
साथ रोग उपाययोजनासंदर्भात मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीला वैद्यकीय सेवा व आरोग्य समितीचे सभापती मनोज चापले, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, मनपातील भाजपच्या प्रतोद दिव्या धुरडे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे उपस्थित होते.
 
यावेळी कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी बैठकीत उपस्थित झोन स्वास्थ निरीक्षकांकडून झोननिहाय आढावा घेतला. कर्मचाऱ्यांची संख्या, साथरोग नियंत्रणासाठी सुरू असलेल्या उपाययोजना, फवारणी करण्यात येणाऱ्या अडचणी, मागील वर्षात साथरोगाचे किती रुग्ण आढळले, याबाबत संपूर्ण माहिती घेतली.
 
प्रभागात फवारणी करताना आणि इतर उपाययोजना करताना संपूर्ण माहितील संबंधित प्रभागातील नगरसेवकांना देण्याची सूचनाही कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी केली. रुग्ण आढळताच तातडीने त्याच्यावर उपचार करा आणि जेथून रुग्ण आढळला त्या परिसरात तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
 

 

पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी दिला अपघातमुक्त शहराचा संदेश

मनपा आणि अपघातमुक्त नागपूर समितीद्वारे आंतरशालेय पथनाट्य स्पर्धा
 
नागपूर,ता.८ : अपघातमुक्त नागपूर शहराचे स्वप्न साकार करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या अपघातमुक्त नागपूर समिती आणि नागपूर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशालेय पथनाट्य स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अपघातमुक्त शहराचा संदेश दिला.
 
मंगळवारी (ता. ८) कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित स्पर्धेचे उद्‌घाटन कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, अपघातमुक्त नागपूर समितीचे कार्याध्यक्ष राजू वाघ, महासचिव अजय डबीर प्रामुख्याने उपस्थित होते.
 
यावेळी बोलताना कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर म्हणाले, अपघातमुक्त नागपूर करणे आमचे उद्दिष्ट आहे. नियमाचे पालन करणे हे आपले कर्तव्यच आहे. समाजघटकातील सर्वांना वाहतुकीच्या नियमाबाबत जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. अपघाताला कारणीभूत असलेला किंवा अपघातात बळी पडलेला हा आपल्याच परिसरातील असतो. वाहतुकीचे नियम सर्वांनी काटेकोरपणे पाळावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केली. 
 
शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे बोलताना म्हणाले, देशात दरवर्षी पाच लाख अपघात होतात. दीड लाख नागरिक दरवर्षी बळी पडतात. यामुळे परिवाराचे नुकसान होते. शाळा, महाविद्यालयांमार्फत याची जनजागृती करण्यात येणार आहे, अशी माहिती सभापती दिलीप दिवे यांनी दिली.
 
स्पर्धेदरम्यान पथनाट्याद्वारे विविध शाळांनी अपघातमुक्त शहराचा संदेश दिला. मनपा व खाजगी अशा १४ शाळांनी या पथनाट्य स्पर्धेत सहभाग घेतला. या पथनाट्याचे परिक्षक म्हणून मंगेश बावसे, गौरव चाटी, सारंग मास्टे यांनी काम पाहिले.
 
मनपा व अपघातमुक्त नागपूर समितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी पथनाट्यातून, वादविवाद स्पर्धेच्या माध्यमातून जनजागृती करणे, अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी शहर अपघातमुक्त ॲप तयार करणे असा समितीचा मानस आहे. अशा उपक्रमाच्या माध्यमातून सुमारे एक लाख नागरिकांपर्यंत अपघातमुक्त नागपूरसंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे. त्यापैकी २५ हजार नागरिकांना यशवंत स्टेडियम येथे अपघातमुक्त शहराची शपथ देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित राहतील, अशी माहिती समितीचे कार्याध्यक्ष राजू वाघ यांनी प्रास्ताविकातून दिली.
 
कार्यक्रमाला क्रीडा विभागाचे निरीक्षक नरेश चौधरी, समन्वयक मोहन करणकर, सागर घोडमारे, मुख्याधापक संजय पुंड उपस्थित होते.

 

 

‘रस्त्यावरील अपघात’ विषयावर ९ ला पथनाट्य स्पर्धा

मनपा व अपघातमुक्त नागपूर समितीचे आयोजन
 
नागपूर,ता. ८ : नागपूर शहर सुंदर व अपघात मुक्त शहर करण्याकरिता विविध उपक्रमांद्वारे जनजागृती सुरू आहे. या अंतर्गत नागपूर महानगरपालिका आणि अपघातमुक्त नागपूर समितीच्या संयुक्त विद्यमाने ‘मानवी चुकांमुळे होणारे रस्त्यांवरील अपघात’ या विषयावर ९ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता स्थानिक कविवर्य सुरेश भट सभागृहात पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
 
स्पर्धा उद्‌घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून स्थायी समितीचे सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी राहतील. विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, मनपा आयुक्त अश्विन मुदगल, शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा व सांस्कृतिक समितीचे सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने नगरसेविका उषा पायलट, शीतल कामडे, नगरसेवक डॉ. रवींद्र भोयर, सतीश होले विशेष यावेळी उपस्थित राहतील. गोयल गंगा ग्रुपचे अनुप खंडेलवाल विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहतील. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन उपायुक्त डॉ. रंजना लाडे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, अपघातमुक्त नागपूर समितीचे कार्याध्यक्ष राजू वाघ यांनी केले आहे.
 

 

४ फेब्रुवारीपासून महिला उद्योजिका मेळावा

महिला व बाल कल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे यांनी दिली माहिती
 
नागपूर,ता. ८ : नागपूर महानगरपालिकेच्या समाजकल्याण विभाग व महिला व बाल कल्याण समितीद्वारे घेण्यात येणारा महिला उद्योजिका मेळावा ४ ते ११ फेब्रुवारी दरम्यान रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती वर्षा ठाकरे यांनी दिली.
 
सोमवार (ता.८) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या समितीच्या आढावा बैठकीप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी उपसभापती श्रद्धा पाठक, सदस्या दिव्या धुरडे, वंदना भगत, साक्षी राऊत, श्रीमती जिशान मुमताज मो.इरफान अंसारी, वैशाली नारनवरे, उपायुक्त रंजना लाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
पुढे बोलताना ठाकरे म्हणाल्या, महिला उद्योजिका मेळावा वैदर्भीय स्तरावर घेण्याचा विचार करण्यात आलेला आहे. विदर्भातील महिला बचत गट यामध्ये सहभागी होतील. तसेच विदर्भातील अनेक बचत गट भेट देण्यासाठी येणार आहे. महिला उद्योजिका मेळाव्यात सामजिक, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्याचा समितीचा मानस आहे. या आढावा बैठकीत नागपूर महानगरपालिकेद्वारे सफाई कर्मचाऱ्यांकरिता आरोग्य शिबिर राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. याबाबत बोलताना ठाकरे म्हणाल्या, आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांना स्मार्ट कार्ड देण्यात यावे, त्यात त्यांची सर्व वैद्यकीय माहिती असेल. ते त्यांच्याजवळ कायमस्वरूपी असेल, असे निर्देश दिले.
 
सॅनिटरी नॅपकीन वेण्डींग मशीन्स आणि सॅनिटरी नॅपकीन नष्ट करण्याची मशीन मनपाच्या शाळेत लावण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. स्लम घोषित शाळांमधील मुला-मुलींकरीता मेडिकल पॉलिसी देण्याचा निर्णय झालेला आहे. त्याबाबत शिक्षण विभागाद्वारे इओआय काढण्याचा प्रस्ताव देण्याचे निर्देश सभापती ठाकरे यांनी दिले. गरजू महिलांना पिको-फॉल वाटप करण्याबाबत चर्चा करण्यात आली. शिवणयंत्र वाटपाबाबतचे निकष ठरवून देण्यात आलेले आहे. त्यावरही यावेळी बैठकीत चर्चा करण्यात आली.

 

 

मनपा स्वच्छता ऍम्बॅसिडर्सद्वारे “स्वच्छता ऍप” जनजागृती अभियान

-    स्वच्छ सर्वेक्षण २०१८: आयुक्तांनी केली नागरिकांशी चर्चा
 
नागपूर, ता. ७ जानेवारीः स्वच्छ सर्वेक्षण २०१८ बद्दल नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने नागपूर महानगरपालिका, मनपाद्वारा नियुक्त स्वच्छता ऍम्बेसिडर आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशन यांनी रविवारी (ता. ७ जानेवारी) दुपारी ४ पासून जनजागृती अभियान राबविला. या अभियानात प्रामुख्याने मनपा आय़ुक्त अश्विन मुदगल, उपायुक्त जयंत दांडेगावकर यांनी नागरिकांशी थेट संवाद साधून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या हे विशेष. य़ावेळी सुमारे 250 पेक्षा अधिक नागरिकांनी अॅप डाऊनलोड केली. स्वतः आयुक्तांनी आपले स्वच्छते संदर्भातील समस्या जाणून घेतल्या याबाबत नागरिकांनाही समाधान वाटले.
 
यावेळी मनपाद्वारे नियुक्त स्वच्छता ऍम्बेसिडर डॉ. उदय बोधनकर, डॉ. चंद्रशेखर मेश्राम, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तुभ चॅटर्जी, माय एफएमची आर जे निकेता साने, धरमपेठ झोनचे सहायक आय़ुक्त महेश मोरोणे, विभागीय अधिकारी स्वच्छता डी पी टेंभेकर, स्वच्छता निरीक्षक मनीष शुक्ला, राजेंद्र शेट्टी, साजन डागोर यांच्यासह ग्रीन व्हिजील संस्थेचे स्वयंसेवक सुरभी जयस्वाल, बिश्णूदेव यादव, कल्याणी वैद्य, शितल चैधरी, विकास यादव, अभय पौनिकर, दादाराव मोहोड यांच्यासह आदींनी सक्रीय सहभागाद्वारे नागरिकांकडून स्वच्छता ऍप डाऊनलोड करुन घेतली. यावेळी नागरिकांनीही सर्वांना सकारात्मक प्रतिसाद देत ऍप डाऊनलोड केली.
 
शहर स्वच्छ ठेवण्यासाठी तसेच स्वच्छ सर्वेक्षणात शहराला गुण मिळवून देण्यासाठी ऍप डाऊनलोड करणे, त्यावर तक्रार करणे आणि आपला अनुभव ऍपवरच शेअर करणे यावर वेगवेगळे गुण आपल्या शहराला मिळणार आहे. तरी नागरिकांनी स्वच्छ, सुंदर नागपूर ठेवण्यात तसेच स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये शहराला गुण मिळवून आपले योगदान द्यावे असे आवाहन यावेळी मनपा आय़ुक्तांनी केले.
 
...अन ट्रॅफिक पार्क बनले रेडीयो स्टेशन
 
नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी धरमपेठ झोनच्या ई-रिक्षाद्वारे साऊंडसिस्टीमची व्यवस्था होती. यामध्ये  मनपाद्वारे स्वच्छता ऍम्बेसिडर म्हणून नियुक्त माय एफएमची आर जे निकीता हिने नागरिकांना ऍप डाऊनलोड कऱण्यासाठी आपल्या रेडिओच्या वेगळ्याच शैलीत आवाहन केले. यावेळी उपस्थितांनी निकीताला बघण्यासाठी एकच गर्दी केली. नागरिकांनी थेट तिला गाठून ऍप डाऊनलोड करत तिच्यासोबत सेल्फीही काढून घेतली.

 

 

नागपूर सांस्कृतिक राजधानी व्हावी : नितीन गडकरी

शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठीत पुतळ्याचे अनावरण
 
नागपूर, ता. ७ : नागपूर शहराने नेहमीच इतिहास जतन करण्याचा प्रयत्न केला. नागपुरात चांगले रस्ते, चांगले पूल, चांगल्या शैक्षणिक सोयी आहेत. आता भविष्यात नागपूर ही पुण्यासारखीच राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून उदयास यावी, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
 
शिवाजी नगरातील शिवाजी उद्यानात नागपूर महानगरपालिकेतर्फे तयार करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठीत पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर राज्याचे ऊर्जामंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर, खा. अजय संचेती, आ. सुधाकर देशमुख, आ. सुधाकर कोहळे, आ. डॉ. मिलिंद माने, आ. प्रा. अनिल सोले, प्रभाकरराव मुंडले, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त अश्विन मुदगल, मनपाच्या स्थापत्य समितीचे सभापती संजय बंगाले, नगरसेवक सुनील हिरणवार, उज्ज्वला शर्मा, बच्चू मुंडले, शिवाजीनगर नागरिक मंडळाचे निखिल मुंडले उपस्थित होते.
 
पुढे बोलताना ना. नितीन गडकरी म्हणाले, नागपूर महानगरपालिका खऱ्या अर्थाने नागपूरच्या सांस्कृतिक वैभवात भर घालत आहे. विवेकानंद स्मारक, नामांतर लढ्यातील शहीदांचे स्मारक, कविवर्य सुरेश भट सभागृह नागपूरसाठी सांस्कृतिक वैभव ठरत आहेत. आता नागपुरात राष्ट्रीय स्तरावर कुठलीही कॉन्फरन्स होऊ शकेल अशा सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आहेत. लवकरच नागपूरचा सांस्कृतिक राजधानी म्हणून उदय होईल.
 
शिवाजीनगरात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्याने खऱ्या अर्थाने आता नगराचे नाव सार्थक झाले आहे. आता या उद्यानात एखादे स्क्रीन लावून सायंकाळी खेळायला येणाऱ्या मुलांना थोर-महात्म्यांचे चरित्र दाखविल्यास बालमनावर चांगले संस्कार पडतील, असेही ते म्हणाले.
 
आ. सुधाकर देशमुख यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. प्रास्ताविकातून सभापती संजय बंगाले यांनी कार्यक्रमागची पार्श्वभूमी विषद केली.
 
तत्पूर्वी ना. नितीन गडकरी, ना. चंद्रशेखर बावनकुळे व उपस्थित अन्य मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठीत पुतळ्याचे रिमोटची कळ दाबून अनावरण केले. त्यानंतर बांबू वाचनालयात रमेश सातपुते यांनी लावलेल्या चित्रप्रदर्शनीचे उद्‌घाटन केले.
 
यावेळी चित्रकार रमेश सातपुते, मूर्तीकार संजय गारजलवार आणि शाखा अभियंता शिरीष तारे यांचा ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 
कार्यक्रमाला महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, नगरसेवक निशांत गांधी, किशोर जिचकार, जगदीश ग्वालबंशी, माजी आमदार डॉ. मधुकर वासनिक, माजी आमदार यादवराव देवगडे, महानगर संघचालक राजेश लोया, डॉ. राजाभाऊ शिलेदार, जयप्रकाश गुप्ता, रवी अग्रवाल, रमेश मंत्री, कपिल चांडक, अनिल हस्तक, मीनाताई जोशी, गणेश कुल्हार, श्रीकांत देशपांडे, प्रदीप डहाके, सुरेश कुळकर्णी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे यांनी केले. आभार नगरसेवक सुनील हिरणवार यांनी मानले.
 
‘शिवमुद्रा’ने आणली रंगत
 
कार्यक्रमस्थळी शिवमुद्रा ढोल, ताशा व ध्वज पथकाने प्रमुख पाहुण्यांच्या आगमनाप्रसंगी ढोल, ताशा वाजवून रंगत आणली. त्यांच्या पथकाच्या संचलनने स्फुरण चढविले.

 

 

नागपूर महानगरपालिकेत पत्रकार दिवस साजरा

नागपूर, ता.6 जानेवारीः नागपूर महानगरपालिका व मनपा पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी वृत्तपत्राचे जनक “दर्पण”कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार कक्षात साजरी करण्यात आली. आचार्ययांच्या तैलचित्रावर मनपा पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश चरपे यांनी माल्यार्पण केले. यावेळी मनपा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष महेंद्र भुसारी, ज्येष्ठ पत्रकार प्रोशुन चक्रवर्ती, ज्येष्ठ पत्रकार गणेश हुड, ज्येष्ठ पत्रकार राजीव सिंह, विजय ऋषी, मनपा जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनविस, दिलीप तांदळे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. छोटेखानी कार्यक्रमात सर्व वृत्तपत्राच्या माननीय पत्रकारांचे पुष्पदेऊन सत्कार करण्यात आले.

 

 

पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी करा

अपर आयुक्त रवींद्र कुंभारे : टास्क फोर्स समितीची बैठक
 
नागपूर,ता.६ : शहरातील प्रत्येक बालकाला पल्स पोलिओचे लसीकरण व्हावे यासाठी प्रचार, प्रसिद्धीसोबतच नियोजनही महत्त्वाचे आहे. यासाठी मायक्रोप्लानिंग करून १०० टक्के उद्दिष्ट गाठा, असे प्रतिपादन नागपूर महानगरपालिकेचे अपर आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी केले.
 
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत लसीकरणाचा पहिला टप्पा २८ जानेवारी रोजी तर दुसरा टप्पा ११ मार्च रोजी आहे. नागपूर महानगरपालिका क्षेत्रात ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मनपा आयुक्त यांच्या अधिपत्याखाली टास्क फोर्स समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीची बैठक शनिवारी (ता. ६) मनपा मुख्यालयाच्या डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीला सर्वेलस वैद्यकीय अधिकारी डॉ. साजीद खान, पल्स पोलिओ नोडल अधिकारी डॉ. सुनील घुरडे, पल्स पोलिओ अधिकारी तथा समन्वयक डॉ. विजय तिवारी, मनपाचे वैद्यकीय अधिकारी (मुख्यालय) डॉ. विजय जोशी, डॉ. बाहिरवार, सीडीपीओ अपर्णा कोल्हे उपस्थित होते.
 
यावेळी सर्वेलस वैद्यकीय अधिकारी डॉ. साजीद खान यांनी आतापर्यंत  झालेल्या पल्स पोलिओ अभियानाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. यंदा १०० टक्के उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रचार, प्रसारासोबतच काय-काय काळजी घ्यावी लागेल, काय प्रयत्न करावे लागतील, याबाबत सूचना केल्या. अपर आयुक्त रवींद्र कुंभारे यांनी मोहिमेसाठी समितीने केलेल्या नियोजनाची माहिती घेतली. कुठे अडचण असल्यास त्यावर तातडीने उपाय शोधा. वेळेपूर्वीच संपूर्ण तयारी करा, असे निर्देश दिलेत. यावर्षी दोन्ही टप्प्यात प्रत्येकी १२९१ बुथवरून २,७०,००० बालकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती समिती सदस्यांनी दिली.
 
बैठकीला दहाही झोनचे झोनल वैद्यकीय अधिकारी, लसटोचक व अन्य संबंधित विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

 

 

वुशू स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर पदक विजेत्यांचा सत्कार

महापौर, क्रीडा सभापतींनी केला गौरव
 
नागपूर,ता. ६ : स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडियातर्फे अनुक्रमे जम्मू आणि गुवाहाटी येथे आयोजित ६३ व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेअंतर्गत झालेल्या १७ वर्षाखालील मुलांच्या आणि १९ वर्षाखालील मुलींच्या वुशू स्पर्धेत अनुक्रमे प्रथम आणि तृतीय विजेतेपद पटकाविणाऱ्या नागपुरातील दोन खेळाडूंचा महापौर नंदा जिचकार आणि क्रीडा सभापती नागेश सहारे यांच्या हस्ते मनपा मुख्यालयात सत्कार करण्यात आला.
 
१७ वर्षाखालील ८५ किलो वजनगटात मुंडले पब्लिक स्कूल गवसी मानापूरचा नवव्या वर्गातील विद्यार्थी यश जयेश कांबळे याने जम्मू येथे झालेल्या स्पर्धेत विजेतेपद मिळवित सुवर्णपदक प्राप्त केले. उपांत्यपूर्व फेरीत त्याने मध्यप्रदेशच्या खेळाडूचा, उपांत्य फेरीत पंजाबच्या खेळाडूचा तर अंतिम सामन्यात सीबीएससीच्या खेळाडूवर मात करीत विजय मिळविला. या स्पर्धेत १५ राज्यांचा सहभाग होता.
 
१९ वर्षाखालील ३६ किलो वजनगटात विदर्भ बुनियादी कनिष्ठ महाविद्यालयाची १२ वीची विद्यार्थिनी आचल सूरचंद भोयर हिने तृतीय स्थान मिळवित कांस्य पदक पटकाविले. या स्पर्धेत १३ राज्यांचा सहभाग होता.
 
दोन्ही खेळाडूंनी मिळविलेल्या या यशाबद्दल महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते महापौर कक्षात त्यांचा सत्कार करण्यात आला. क्रीडा सभापती नागेश सहारे यांनीही त्यांचा सत्कार करीत भविष्यातील वाटचालीबद्दल शुभेच्छा दिल्या. सत्कारप्रसंगी मनपाच्या क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, क्रीडा अधिकारी महेश पडोळे, प्रशिक्षक प्रफुल्ल गजभिये, मुंडले पब्लिक स्कूलचे क्रीडा शिक्षक अरुण भांदककर, विदर्भ बुनियादी कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक पी.डी. रंगारी उपस्थित होते.

 

मनपा शाळांतील गरजू विद्यार्थ्यांना लवकरच मिळेल ‘सायकल बँक’ योजनेचा लाभ

शिक्षण समिती आढावा बैठकीत सभापतींची माहिती
 
नागपूर,ता.५ : मनपातील पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकांच्या सहकार्याने लवकरच महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ‘सायकल बँक’ सुरू होणार आहे. मनपा शाळांतील गरजू विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत अगदी मोफत सायकलचा लाभ घेता येईल, अशी माहिती मनपाच्या शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी दिली.
 
मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात आयोजित शिक्षण विशेष समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला समितीच्या उपसभापती स्नेहल बिहारे, सदस्य विजय उर्फ पिंटू झलके, राजेंद्र सोनकुसरे, प्रमिला मंथरानी,उज्ज्वला बनकर, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार उपस्थित होत्या.
 
सायकल बँक योजना ही मनपा शाळांतील गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी आहे. दूरवरून पायी शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. ३० ऑक्टोबर २०१७ रोजी झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत यासंदर्भातील ठराव पारीत झाला असून त्यावरील कार्यवाही प्रगतीपथावर असल्याचेही सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी सांगितले.
 
मनपा शाळांतील माध्यमिक शिक्षकांची सेवाज्येष्ठता यादी तातडीने तयार करण्यात यावी, डुप्लीकेट टी.सी. देण्याकरिता जुने रेकॉर्ड स्कॅनिंग करण्याच्या प्रक्रियेला वेग देण्यात यावा, मनपाच्या बंद असलेल्या शाळा ज्या संस्थांना देण्यात आलेल्या आहेत त्यांचे भाडे निर्धाण व फेरमूल्यांकनाबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी, माध्यमिक शाळेकरिता बेंच खरेदी करण्याच्या प्रक्रियेला वेग देऊन १५ दिवसांत त्यासंदर्भात निविदा काढण्यात यावी, असे निर्देश सभापती प्रा. दिवे यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
 
शाळा निरीक्षकांनी मागील बैठकीपासून आतापर्यंत शाळांना दिलेल्या भेटीचा अहवाल दहाही झोनच्या शाळा निरीक्षकांकडून घेण्यात आला. मनपाच्या शिक्षण विभागातर्फे ९ जानेवारीपासून शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी दिली. सुरक्षा रक्षक नियुक्तीसंदर्भातील सुधारीत प्रस्ताव प्रशासनाकडे पाठविण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
 
बैठकीला दहाही झोनचे शाळा निरीक्षक, शिक्षण विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

 

 

नागपुरात सुरू होणार मनपाचे सात केंद्रीय विद्यालय

त्रीसदस्यीय समितीला ना. प्रकाश जावडेकरांनी दिले आश्वासन
 
नागपूर, ता. ५ : नागपूर महानगरपालिका आणि केंद्र सरकार संचालित सात केंद्रीय विद्यालय नागपुरात सुरू होणार आहेत. मनपाच्या त्रीसदस्यीय समितीने केंद्रीय मानव संसाधन व मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी केंद्रीय विद्यालय सुरू करण्यासंदर्भात आश्वासन दिले.
 
नागपूर महानगरपालिका शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, शिक्षण समितीचे सदस्य तथा नगरसेवक पिंटू झलके, राजेंद्र सोनकुसरे यांचा या  त्रीसदस्यीय समितीत समावेश होता. समिती सदस्यांनी २ जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन सदर प्रस्तावासंदर्भात चर्चा केली. ना. गडकरी यांनी तातडीने यासंदर्भात ना. प्रकाश जावडेकर यांच्याशी चर्चा केली.
 
यानंतर मनपाच्या त्रीसदस्यीय समितीने संसद भवनात ना. प्रकाश जावडेकर यांची भेट घेऊन नागपुरात सात केंद्रीय विद्यालय सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली. यासंदर्भातील निवेदनही त्यांनी दिले. त्यावर त्यांनी येत्या शैक्षणिक सत्रापासून केंद्रीय विद्यालय सुरू करण्याचे आश्वासन समितीला दिल्याची माहिती शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी दिली.

 

 

सावित्रीबाई फुले जयंती निमित्त मनपा शाळेतील शिक्षीकांचा सत्कार

-    विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
 
नागपूर, ता. 5 जानेवारीः क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 187 व्या जयंती निमित्त मनपा महिला व बालकल्याण समितीतर्फे वाल्मिकीनगर हिंदी माध्यमिक शाळा, गांधीनगर येथे मनपा शाळेतील 10 झोन मधील उत्कृष्ट दहा शिक्षिकांचा सत्कार करण्यात आले.
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनपा शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार होत्या. प्रामुख्याने मनपाच्या महिला व बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, सदस्या दिव्या धुरडे, वंदना भगत, श्रद्धा पाठक, साक्षी राऊत, वैशाली नारनवरे आदींची उपस्थिती होती. यांच्यासह वंदना शर्मा, संगीता अग्रवाल, श्वेता निगम, मीरा कुल्लर, निर्धारच्या कांता ढेपे, सुनंदा सोनवले, जया पानतावणे यांची उपस्थीती होती.
 
कार्यक्रमात मनपाच्या दहा प्रत्येक झोनमधील एका शिक्षिकेचा सत्कार कऱण्यात आला. तसेच वाल्मिकीनगर हिंदी माध्यमिक शाळेतील विद्यार्थीनींना शालेय साहित्याचे वितरण कऱण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्षा ठाकरे यांनी केले. संचालन घिमे मॅडम यांनी तर आभार परिहार मॅडम यांनी मानले.
 
सत्कार करण्यात आलेल्या शिक्षिकांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक शाळेच्या वंदना दांडेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक शाळेच्या सुरेखा सावरबांधे, संजयनगर माध्यमिक शाळेच्या ज्योती काकडे, कपीलनगर माध्यमिक शाळेच्या पंचलता नागदिवे, हाजी अब्दुललीडर शाळेच्या रुख्मा कौसर, एम.के.आझाद माध्यमिक शाळेच्या शाहीन अख्तर, वाल्मिकी नगर हिंदी माध्यमिक शाळेच्या रंजनी परिघर, नेताजी मार्केट प्राथमिक शाळेच्या शारदा मिश्रा, एकात्मता प्राथमिक शाळेच्या रोशनी जंजाल, जी.एम. बनायितवाला शाळेच्या रजिया शाहीन, मनपा शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि तुळशीचे रोपटे देऊन देऊन सत्कार कऱण्यात आला.

 

 

“आपली बस” तिकीटांसाठीही कॅशलेस कार्ड सुविधा

-परिवहन सभापतींनी घेतला सुविधेचा आढावा
 
नागपूर, ता. ४ जानेवारीः नागपूर महानगरपालिकेच्या “आपली बस”ने दररोज सुमारे २ लाख प्रवासी प्रवास करत असतात. प्रवाश्यांच्य सुविधेसाठी आपली बस तिकीटासाठी कॅशलेस कार्ड सुविधा सुरु करण्यात आली असून याद्वारे नागरिकांना थेट कार्डनेच तिकीट खरेदी करता येणार आहे. नागरिकांना याची माहिती देण्यासाठी तसेच आपली बसमधील सोयीसुविधांचा आढावा घेण्यासाठी परिवहन समिती सभापती बंटी (जितेंद्र) कुकडे व उपसभापती प्रविण भिसीकर यांनी आकस्मिक पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांशीही संवाद साधला. प्रामुख्याने परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांचीही उपस्थिती होती.
 
दररोजच्या प्रवासात चिल्लर नसल्यामुळे अनेकवेळा प्रवासी आणि वाहक यांच्यात वाद होत असल्याच्या अनेक तक्रारी होत्या. शिवाय प्रत्येक प्रवाश्याला सुटे पैसे देणेही शक्य नाही. यामध्ये वाहक आणि प्रवासी यांच्यातील ही समस्या कायमची सोडविण्यासाठी या कॅशलेस कार्डचा पर्याय आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा आणि कॅशलेड व्हावे असे आवाहन परिवहन समिती सभापती बंटी (जितेंद्र) कुकडे यांनी केले. कॅशलेस कार्ड आपली बस स्थानकावरील कार्यालयात उपलब्ध आहेत अशी माहिती परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी दिली.

 

 

अग्नीशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन प्रशासनास सहकार्य करा : ॲड.संजय बालपांडे

हॉटेल व बार व्यावसायिकांसाठी महापालिकेद्वारे कार्यशाळा
 
नागपूर,ता.२. अग्नीशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र घेऊन प्रशासनास सहकार्य करा. घटना सांगून घडत नसतात. त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींची सिद्धता ठेवण्यात यावी, असे प्रतिपादन अग्नीशमन विभागाचे सभापती ॲड. संजय बालपांडे यांनी केले.
 
मुंबईमध्ये पब,रेस्टॉरेंटमध्ये लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिका अग्नीशमन विभागाद्वारे शहरातील रेस्टॉरेंट, हॉटेल मालकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन मंगळवारी (ता.२) अमरावती मार्गावरील साईश्रद्धा लॉन येथे करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
 
याप्रसंगी व्यासपीठावर अग्नीशमन समितीचे उपसभापती प्रमोद चिखले, सदस्य राजकुमार शाहू, मुख्य अग्नीशमन अधिकारी राजेंद्र उचके, हॉटेल ॲण्ड बार असोसिएशनचे अध्यक्ष राजू जयस्वाल, तेजींदरसिंग रेणू, रामू मोटघरे, प्रशांत अहिरकर, रामू वर्धने प्रामुख्याने उपस्थित होते.
 
पुढे बोलताना बालपांडे म्हणाले, मुंबईत झालेली घटना दुर्दैवी होती. निष्काळजीपणामुळे व हॉटेल व्यावसायिकाच्या चुकीमुळे ती घटना घडली. भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी आपण खबरदारी घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली. आपल्या दुकानांमध्ये, हॉटेल इमारतीमध्ये अग्नीशमन उपकरणे तातडीने बसविण्यात यावीत. महापालिकेच्या अग्नीशमन विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र सर्वांना बंधनकारक आहे. ते प्रमाणपत्र घेऊन प्रशासनास सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी केले. कायद्याची अंमलबजावणी स्वःतापासून सुरू करण्यात यावी, आपल्या सुरक्षेसाठी व येणाऱ्या ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ते महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले.
 
कार्यशाळेत बोलताना राजेंद्र उचके म्हणाले, अग्नीशमन अधिनियमानुसार ज्या व्यावसायिक इमारतींची उंची १५ मीटरपेक्षा जास्त आहे व बांधकाम १५० चौ.मी. पेक्षा जास्त आहे, अशा सर्व इमारतींना वा वास्तुला अग्नीशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे कायद्याने बंधनकारक आहे. हॉटेलमधील अग्निशमन उपकरणे ही सहज सापडेल अशा ठिकाणी ठेवण्यात यावी. हॉटेलमधील डीप फ्रिजर, ओव्हन, विद्युत यंत्रे ही तपासून घ्यावी, त्यावर सातत्याने लक्ष द्यावे, ज्वलनशील पदार्थाचा वापर हॉटेलमध्ये टाळावा, अशा सूचना राजेंद्र उचके यांनी केल्या. हॉटेलमध्ये धुम्रपान करू देऊ नये, स्मोकिंग झोन स्वतंत्र असावे, अग्नीशमन विभागाद्वारे जनजागृती सप्ताह करण्यात येतो. आपणही हे प्रशिक्षण आपल्या कर्मचाऱ्यांना द्यावे, असे सूचित केले.
 
यावेळी वेगवेगळ्या प्रकारच्या आगीवर कसे नियंत्रण करण्यात येते याचे प्रत्यक्ष सादरीकरण करण्यात आले. अग्निशमन विभागाचे स्थानाधिकारी राजेंद्र दुबे, आपत्ती व्यवस्थापन सुनील राऊत, कार्यकारी स्थानाधिकारी के.आर.कोठे, पी.एन.कावळे, सुनील डोकरे, अजय लोखंडे प्रामुख्याने उपस्थित होते.

 

 

अयाचित मंदिर परिसरात केली वीजबचतीविषयी जनजागृती

पोर्णिमा दिवसानिमित्त मनपा व ग्रीन व्हिजीलचा उपक्रम : एक तास ठेवले पथदिवे बंद
 
नागपूर, ता. २   :  ऊर्जा बचतीसाठी नागपूर महानगरपालिकेने तत्कालिन महापौर आमदार प्रा. अनिल सोले ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या सहकार्याने काही वर्षांपूर्वी सुरू केलेला ‘पोर्णिमा दिवस’ उपक्रम आता नागपुरात चळवळीचे रूप घेत आहे. पोर्णिमा दिवसाचे आवाहन होताच ज्या परिसरात स्वयंसेवक जातात त्या परिसरातील व्यापारी आणि नागरिक स्वत: रात्री ८ ते ९ दरम्यान अनावश्यक विद्युत उपकरणे बंद करतात. असाच काहीसा अनुभव सोमवारी (ता. १) पोर्णिमा दिवसाच्या निमित्ताने आला.
 
नागपूर महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे स्वयंसेवक १ जानेवारी रोजी महाल परिसरातील लाकडी पूल, अयाचित मंदिर येथे पूर्वी केलेल्या आवाहनाप्रमाणे रात्री ८ वाजता पोहचले. नेहमीप्रमाणे जनजागृतीसाठी आणि पोर्णिमा दिवस उपक्रम तसेच ऊर्जा बचतीचे सांगण्यासाठी जेव्हा ग्रीन व्हिजीलचे स्वयंसेवक व्यापारी प्रतिष्ठानात जाऊ लागले तेव्हा त्यांनी या उपक्रमाविषयी कल्पना असल्याचे सांगितले. आम्ही स्वयंप्रेरणेने अनावश्यक वीज उपकरणे बंद केल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे प्रत्येक पोर्णिमा दिवसाला आम्ही किमान एक तास वीज उपकरणे बंद ठेवू, असे आश्वासन स्वयंसेवकांना दिले.
 
विशेष म्हणजे, यावेळी पोर्णिमा दिवसाला नागपूर महानगरपालिकेच्या विद्युत विभागाने परिसरातील पथदिवेही एक तासाकरिता बंद केले होते. सोमवारच्या या उपक्रमामुळे २६४५.४९ युनीट विजेची बचत झाल्याची माहिती ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांनी दिली.
 
यावेळी गांधीमहाल झोनच्या सभापती सुमेधा देशपांडे, जलप्रदाय समितीचे सभापती राजेश घोडपागे, दशरथ मस्के, जयंत पाध्ये, प्रकाश धमनीकर, योगेश कोथेले, हरिभाऊ ढोरे, ललित जिभकाटे, आशीष भुते, मनपा विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता संजय जैस्वाल, सहायस अभियंता सलीम इकबाल, उपअभियंता एम.एम. बेग, कनिष्ठ अभियंता दिलीप वंजारी, प्रशांत काळबांडे, सुनील नवघरे उपस्थित होते.
 
ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांच्या नेतृत्वात ग्रीन व्हिजीलचे स्वयंसेवक सुरभी जैस्वाल, कल्याणी वैद्य, बिष्णूदेव यादव, संजीवनी गोंदोडे, अमोल भलमे, स्मिताली उके, कार्तिकी कावळे, सौरभ अंबाडे, हेमंत अमेसार, सारंग मोरे आदींनी ऊर्जाबचतीविषयी जनजागृती करीत पोर्णिमा दिवस उपक्रमाविषयी माहिती परिसरातील नागरिकांना दिली.

 

 

कर थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करा

महापौर नंदा जिचकार यांचे निर्देश : हनुमाननगर झोनमध्ये घेतली तातडीची बैठक
 
नागपूर,ता. १ : वारंवार डिमांड पाठवूनही जर कोणी कर भरत नसेल तर आता महानगरपालिकेचे अधिकार वापरा. वारंट बजावून तातडीने जप्तीची कारवाई करा आणि १०० टक्के करवसुलीचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कार्य करा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
 
हनुमान नगर झोन कार्यालयात कर वसुलीसंदर्भात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. महापौर नंदा जिचकार यांनी बोलाविलेल्या बैठकीत उपमहापौर दीपराज पार्डीकर, झोन सभापती भगवान मेंढे, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम, हनुमाननगर झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे, नगरसेविका उषा पायलट, स्वाती आखतकर, लिला हाथीबेड, मंगला खेकरे, विद्या मडावी, श्रीमती ठाकरे, कल्पना कुंभलकर, उपस्थित होते.
 
महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी सर्व कर निरिक्षकांच्या आतापर्यंतच्या कामगिरीचा आढावा घेतला. ज्या कर निरीक्षकाने त्यांच्याकडे असलेल्या उद्दिष्टापेक्षा कमी वसुली केली असेल तर त्याची कारणे काय, याबाबत विचारणा केली. पुढील सात दिवसांत वसुलीचे आणि जप्तीचे उद्दिष्ट त्यांच्यासमोर ठेवण्यात आले. सात दिवसानंतर पुन्हा बैठक घेण्यात येईल. त्यावेळी जर समाधानकारक वसुली आणि जप्ती झालेली नसेल तर प्रशासनाला संबंधित कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
 

 

गणतंत्रदिनाच्या परेडसाठी मनपाच्या शाळेतील २१ विद्यार्थ्यांची निवड

विद्यार्थांना महापौर नंदा जिचकार व आयुक्त अश्विन मुदगल यांच्या हस्ते आवश्यक साहित्याचे वाटप
 
नागपूर,ता.१ : नवी दिल्ली येथे होणाऱ्या गणतंत्र दिवस परेडसाठी नागपूर महानगरपालिकेच्या चार शाळांतून २१ विद्यार्थी व एका शिक्षकाची निवड झाली आहे. निवड झालेल्या सर्व विद्यार्थी व शिक्षकांना आवश्यक साहित्य महापौर नंदा जिचकार व आयुक्त अश्विन मुदगल यांच्या हस्ते सोमवारी (ता.१) वितरित करण्यात आले.
 
यावेळी शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, क्रीडा समिती सदस्य शरद यादव, नगरसेवक पिंटू झलके, अतिरिक्त आयुक्त आर. झेड. सिद्दिकी, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, क्रीडा निरिक्षक नरेश चौधरी, मुख्याधापक संजय पुंड प्रामुख्याने उपस्थित होते.
 
दक्षिण-मध्य सांस्कृतिक विभागामार्फत नागपुरातील २७ शाळांमधून १७४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यात मनपाच्या चार शाळांमधून २१ विद्यार्थी व एक शिक्षकाची निवड करण्यात आली. सर्व विद्यार्थी २ जानेवारीला दुपारी १२.४५ ला गोंडवाना एक्सप्रेसने दिल्लीला रवाना होणार आहे. गणराज्य दिनाची परेड आटोपून २८ जानेवारी रोजी परत येणार असल्याची माहिती नरेश चौधरी यांनी दिली.
 
निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सुहानी पाल, काजल गुप्ता, दीपक पाल, वाल्मिकी नगर शाळेची माधवी पांडे, काजल झा, खुशबू ठाकूर, बॅरिस्टर शेषराव वानखेडे शाळेची शुभांगी बोकडे, प्रथम सायम, गौरव सहारे, वैष्णवी केकारवाडे, शिवकुमार नेवारे, आस्था खंडारे, लालबहादूर शास्त्री शाळेचे आरती यादव, आयुषी शर्मा, अमिषा सिंग, रितेश शर्मा, श्रीकृष्णा लोढी, विनय रक्षक, इंद्रा मारवाडी, रितिक बिऱ्हा हे सर्व विद्यार्थी नवव्या वर्गात आहे. तर कार्तिक कोहली हा वर्ग आठव्या वर्गात आहे. लालबहादूर शास्त्री शाळेतील श्रीमती लता राजकुमार कनाथे या शिक्षिकेची निवड झाली आहे.
 
मनपाद्वारे विद्यार्थ्यांना यावेळी सुटकेस, एअर बॅग, लॅपटॉप बॅग, ट्रॅकसूट, कॅनवॉज जोडे, मोजे, ब्लेझर आदी आवश्यक वस्तु वितरित करण्यात आले. यावेळी महापौरांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. आपल्या प्रकृतीची काळजी घ्या, असा सल्लाही दिला. कार्यक्रमाला मनपातील सर्व शिक्षक व पालक उपस्थित होते.  

 

 

सोख्ता भवनमुळे मनपाची आर्थिक स्थिती सुधारणार : महापौर नंदा जिचकार

प्रकल्प निविदा प्रकाशित : प्रवीण दटके समितीची बैठक
 
नागपूर, ता. १ :  शहरातील वर्दळीचे ठिकाण असलेल्या सोख्ता भवन येथे नवीन व्यावसायिक इमारत नागपूर महानगरपालिका बीओटी तत्त्वावर निर्माण करीत आहे. या प्रकल्पामुळे मनपाच्या तिजोरीत भर पडणार असून नागरिक आणि व्यावसायिकांच्या सोयीचेदेखिल होणार असल्याचा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला. माजी महापौर ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीच्या बैठकीत प्रकल्पाचा आढावा घेताना त्या बोलत होत्या.
 
यावेळई प्रामुख्याने माजी महापौर ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती संजय बंगाले, नगरसेवक पिंटू झलके, प्रतोद दिव्या धुरडे, मनपा आयुक्त अश्विन मुदगल, अतिरिक्त आयुक्त आर.झेड. सिद्दीकी,मुख्य अभियंता विजय बनगीरवार, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, कार्यकारी अभियंता (ज.प्र) संजय गायकवाड, विकास अभियंता सतीश नेरळ, कार्यकारी अभियंता (पेंच प्रकल्प) अनिरुद्ध चौगंजकर, स्थावर अधिकारी आर.एस.भुते, एडीटीपीचे पी.बी.गावंडे यांची उपस्थिती होती.
 
महानगरपालिकेच्या प्रस्तावित बीओटी, पीपीपी, केंद्र व राज्य सरकारकडे प्रलंबित प्रकल्पांना गती देण्यासाठी माजी महापौर प्रवीण दटके यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना करण्यात आली. बैठकीत ऑरेंज सिटी प्रकल्प, सोख्ता भवन, महाल बाजार, बुधवार बाजार, सक्करदरा बाजार, बाळासाहेब ठाकरे स्मारक, चिटणीसपुरा, साई प्रकल्प (स्पोर्टस अथॉरिटी ऑफ इंडिया), नागनदी प्रकल्प, मोक्षधाम पुलाचे बांधकाम आदी विषयांवर चर्चा झाली.
 
बैठकीत विविध प्रकल्पांची गती वाढविण्यासाठी आवश्यक सर्व पूर्तता अधिका-यांनी कराव्यात, असे निर्देश समितीचे अध्यक्ष प्रवीण दटके यांनी दिले. यावेळी कार्यालयीन प्रक्रिया पूर्ण कऱण्यात दिरंगाई खपवून घेतली जाणार नसून काही अडचण असल्यास थेट आपल्याशी संपर्क साधा,असे मनपा आय़ुक्तांनी सांगितले.
 
सोख्ता भवन प्रकल्पाची निविदा प्रक्रिया सुरू असून जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये गुंतवणूकदारांना निमंत्रित करुन त्यांनाप्रकल्पाची माहिती द्यावी असे ठरविण्यात आले. नागरिकांना याद्वारे उपलब्ध होणा-या सुविधांची माहिती देणारे बॅनर लावण्याचेही निर्देश विभागाला देण्यात आले. सोख्ता भवन प्रकल्पाच्या नवीन वास्तूचे नावही ‘सोख्ता’ राहणार असून यामध्ये मनपाच्या मालकीचे एक भव्य सभागृह असणार आहे. या इमारतीसाठी तसेच परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी भव्य पार्किंगची सोय आहे. यामध्ये सोख्ता भवनच नव्हे तर परिसरातील नागरिकांसाठीही पार्किंगची सोय होईल अशी व्यवस्था आहे. याद्वारे अग्रेसन चौक, सीए रोड येथील नागरिकांची पार्किंगची समस्या सुटणार आहे.

 

 

मनपाच्या १८ निवृत्त कर्मचा-यांचा सत्कार

नागपूर,ता.३०. नागपूर महानगरपालिकेच्या १८ सेवानिवृत्त कर्मचा-यांचा सत्कार शनिवार (ता.३०) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आज (ता. 30 डिसेंबर) आयोजित करण्यात आला. प्रामुख्याने निगम अधीक्षक राजन काळे, सामान्य प्रशासन विभागाचे श्री.कर्णिक, मोटघरे, कर्मचारी संघटनेचे महासचिव डोमाजी भडंग यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
 
याप्रसंगी मनपाच्या निवृत्त झालेल्या कर्मचा-यांना शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. यामध्ये लोककर्म विभागाचे उपअभियंता एस.आर.वाटपाडे, शिक्षण विभागाच्या सहायक शिक्षिका अनुराधा मोहबे, साधना गर्ग, शशीकला बागडे, सहायक शिक्षक विजय ईमाने, आरोग्य विभागाचे कनिष्ठ लिपीक ए.सी.पाटील, कर विभागाचे मोहरीर श्री.आर.खापेकर, आरोग्य विभागाचे एस.टी.देवगडे, सफाई मजदूर गोविंदा वासनिक, देवीदास हरी गडपायले, प्रकाश मंदारे, ममता अमरसिंग बक्सरे, रमेश फुलझेले, भागिरथी तांबे, लोककर्म विभागाचे चपराशी श्रीराम पेंदाम, शहरी व कुटुंब कल्याण विभागाचे सुमीता गुप्ता, तुळसाबाई दुब्बलवार, ललीता चौधरी यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे संचालन डोमाजी भडंग तर आभारप्रदर्शन श्री.मोटघरे यांनी केले. यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी व अधिका-यांचे नातेवाईक प्रामुख्याने उपस्थित होते.

 

 

‘स्वच्छता ॲम्बेसेडर’ने केली महापौरांसमवेत जनजागृती

रेल्वे स्टेशन परिसरातील हॉटेल व्यवसायिकांच्या समस्या जाणून घेतल्या
 
नागपूर,ता.२९ : ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत जानेवारी महिन्यात होणाऱ्या ‘स्वच्छ सर्वेक्षणा’बाबत लोकांना माहिती व्हावी यासाठी महानगरपालिकेद्वारे नियुक्त केलेल्या स्वच्छता ॲम्बेसेडरनी शहरात फिरून जनजागृती केली. महापौर नंदा जिचकार यांनीही त्यांच्यासोबत रॅलीमध्ये सहभागी होऊन उत्साह वाढविला.
 
स्वच्छता ॲम्बेसेडर आणि महापौर नंदा जिचकार यांनी संयुक्तरित्या रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छतेविषयक जनजागृती केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, स्वच्छता ॲम्बेसेडर सर्वश्री डॉ.चंद्रशेखर मेश्राम, डॉ.उदय बोधनकर, कौस्तभ चॅटर्जी, मॅरेथॉनपटू डॉ. अमित समर्थ, कवी मधुप पांडेय, आर.जे. निकेता, मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त हरिश राऊत, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर प्रामुख्याने उपस्थित होते.
 
मनपा मुख्यालयातून या रॅलीला शुभारंभ झाला. यावेळी रेल्वे स्टेशनच्या परिसरातील दुकानदांराच्या स्वच्छतेबाबत समस्या जाणून घेतल्या. स्वच्छ सर्वेक्षणाबाबत महापौर नंदा जिचकार यांनी माहिती दिली. आपली दुकाने स्वच्छ ठेवण्यासाठी आपण स्वत: पुढाकार घ्यावा, जेणेकरून आपले शहर स्वच्छ शहराच्या यादीत अग्रक्रमांकावर येईल, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी दुकानदारांना केले.
 
यावेळी ग्रीन व्हिजीलच्या कार्यकर्त्यांनी दुकानदारांच्या व नागरिकांच्या स्मार्टफोनवर ‘स्वच्छता ॲप’ डाऊनलोड करून दिली. नागरिकांनी या रॅलीला चांगला प्रतिसाद दिला. शहरातील स्वच्छतेत नागपूर आता सुधारतेय, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. स्वच्छ सर्वेक्षणासाठी केंद्रातून एक चमू येणार आहे. त्यांच्या प्रश्नांची योग्य उत्तरे द्या. त्यांना सहकार्य करा. आपल्या शहराला स्वच्छ शहर म्हणून लौकिक मिळवून द्या, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी केले.   
 
कार्यक्रमाला मनपातील पशुचिकित्सक डॉ.गजेंद्र महल्ले, स्वास्थ निरीक्षक रोहीदास राठोड, दहाही झोनचे झोनल अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
 
कर्तव्यदक्ष वाहनचालकांचा सत्कार
 
मनपाद्वारे सुरू करण्यात आलेल्या डम्पिंग यार्डमध्ये रोजचा १२० मॅट्रिक टन कचरा डम्प केला जातो. हा कचरा व्यवस्थितरीत्या वाहून नेणाऱ्या तीन वाहनचालकांचा सत्कार महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी . अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, लक्ष्मीनगर झोन सहायक आयुक्त सुवर्णा दखणे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, स्वच्छता ॲम्बेसेडर सर्वश्री डॉ.चंद्रशेखर मेश्राम, डॉ.उदय बोधनकर, कौस्तभ चॅटर्जी, डॉ. अमित समर्थ, मधुप पांडे आर.जे. निकेता प्रामुख्याने उपस्थित होते.

 

 

बुद्धीबळ स्पर्धेत दीपेश,मैथिली, संस्कार, कृपाल,मृणाल, हिमांशु, हर्ष, रोहन यांना विजेतेपद

नागपूर महानगरपालिका व ब्रिलियंट्स चेस अकादमी तर्फे आयोजित स्व.देविदास देशमुख स्मृती बुद्धीबळ स्पर्धा
 
नागपूर, ता. २८ : नागपूर महानगरपालिका आणि ब्रिलियंट्स चेस अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्व.देविदास देशमुख स्मृती बुद्धीबळ आंतरशालेय स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ नंदनवन येथील अक्षय भवन येथे आयोजित करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमहापौर दीपराज पार्डीकर, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, नगरसेवक किशोर कुमेरिया, दिव्या धुरडे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
विविध वयोगटात दीपेश कोहाड, मैथिली, संस्कार, गायगोर, वृतिका गये, कृपाल वंजारी, मृणाल कोकाटे, हिमांशु जेठवानी, दिव्या शेळके, हर्ष जेठवानी, श्रावणी शिरपूरवार, रोहन सिंग विजेते ठरले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले.
 
उपमहापौर दीपराज पार्डीकर बोलताना म्हणाले, अशाप्रकारच्या स्पर्धेमुळेच खेळाडू तयार होत असतो. यातूनच राज्यस्तरावरील, राष्ट्रीयस्तरावरील खेळाडू तयार व्हावे यासाठीच अशा प्रकारच्या सर्व स्पर्धेचे आयोजन महानगरपालिकेद्वारे करण्यात येत आहे.
 
कार्यक्रमाचे संचालन श्री.कुंभलकर यांनी तर आभारप्रदर्शन सौ.कोकाटे यांनी केले. कार्यक्रमाला डॉ. नीरज सव्वालाखे, सोनिया चांगले, डॉ. सुशील वंजारी, आशिष देशमुख, सौ.सुवर्णाताई भुते, प्रवीण पानतावणे, नीलेश चन्नमवार, मनीष पागे, वैशाली वंजारी, आरती खंडेलवाल उपस्थित होते. 

 

 

स्वच्छता सर्वेक्षणासाठी नागपूर सज्ज

नगरसेवक आणि अधिकारीही जनजागृतीसाठी रस्त्यावर : नागरिकांचाही वाढता सहभाग
 
नागपूर, ता. २८ : ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत जानेवारी २०१८ मध्ये होणाऱ्या ‘स्वच्छ सर्वेक्षणा’साठी नागपूर सज्ज झाले आहे. जनजागृतीचे विविध साधनांचा उपयोग करतानाच नागपूर महानगरपालिका हायटेक मीडियाचा वापर प्रभावीपणे करीत आहे. या अभियानात नागपूरकरांचा सहभाग वाढावा यासाठी मनपातील पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी स्वत: रस्त्यावर उतरून स्वच्छतेसाठी जनजागृती करीत आहे.
 
‘स्वच्छ भारत’ अभियानाची सुरुवात झाल्यानंतर नागपूर महानगरपालिका प्रभावीपणे याचा प्रचार आणि प्रसार करताना दिसत आहे. विशेष म्हणजे स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत नेमके काय होते, याची माहिती प्रत्येक नागरिकाला व्हावी, यासाठी मनपा गांभीर्याने कार्य करीत आहे. महापौर नंदा जिचकार यांच्या नेतृत्वात मनपातील पदाधिकारी आणि नगरसेवक तर आयुक्त अश्विन मुदगल यांच्या नेतृत्वात अधिकारी आणि कर्मचारी जीव ओतून यासाठी कामाला लागले आहेत.
 
नगरसेवक-अधिकारी उतरले रस्त्यावर
 
‘स्वच्छ सर्वेक्षणां’तर्गत स्वच्छता ॲप डाऊनलोड करणे, त्यावरून तक्रारी पाठविणे यासोबतच लोकांचा सहभाग यात मिळविणे यावर अधिक गुणांकन आहे. नागपूर शहरात सुमारे ५५००० लोकांच्या स्मार्टफोनवर ॲप डाऊनलोड व्हावे, हे उद्दिष्ट आहे. यासाठी मनपाचे सर्व अधिकारी, कर्मचारीच नव्हे तर पदाधिकारी आणि नगरसेवक प्रत्यक्ष रस्त्यावर उतरले आहेत. आतापर्यंत ३८ हजारांचा आकडा पार करण्यात यामुळे यश आले असून ज्यांनी ॲप डाऊनलोड केले नसेल त्यांनी तातडीने SWACHHATA MoHUA हे ॲप प्ले स्टोअर मधून डाऊनलोड करावे आणि त्यावरून स्वच्छताविषयक तक्रारी पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
 
स्वयंसेवी संस्था सरसावल्या
 
मनपाच्या खांद्याला खांदा लावून स्वयंसेवी संस्था ॲप डाऊनलोडचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कार्यरत आहेत. शहरातील मॉल, बाजार यासारखी सार्वजनिक ठिकाणे, शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये, सार्वजनिक कार्यक्रमात पोहचून स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते ॲप डाऊनलोड करून देण्यासोबतच स्वच्छ सर्वेक्षणाविषयी जनजागृती करीत आहेत.
 
सोशल मीडिया ठरत आहे प्रभावी माध्यम
 
स्वच्छतेचा संदेश घराघरापर्यंत पोहोचावा, स्वच्छ सर्वेक्षण म्हणजे नेमके काय याबाबत लोकांना माहिती व्हावी यासाठी नागपूर महानगरपालिका फेसबुक, ट्विटर, वॉटस्‌ॲप या माध्यमांचा वापर पहिल्यांदाच प्रभावीपणे करीत आहे. सोशल मीडियाच्या वापरामुळे बहुतांश नागरिकांपर्यंत स्वच्छ सर्वेक्षणाचा संदेश पोहचत असल्याचे दिसून येत आहे.
 
नागरिकांचे वॉटस्‌ ॲप ग्रुप
 
‘स्वच्छ सर्वेक्षणा’दरम्यान केंद्रीय चमू लोकांना स्वच्छ सर्वेक्षणासंदर्भात प्रश्न विचारणार आहे. नागरिकांकडून जितकी सकारात्मक उत्तरे केंद्रीय परीक्षण चमूला जातील, तितके नागपूरचे गुणांकन वाढणार आहे. त्यामुळे लोकांना याबाबतची माहिती वॉटस्‌ ॲप ग्रुपच्या माध्यमातून नागपूर महानगरपालिकेतर्फे देण्यात येत आहे. आतापर्यंत सुमारे २५०० नागरिकांना ग्रुपमध्ये जोडण्यात आले असून प्रत्येक ग्रुपमध्ये स्वत: आयुक्त अश्विन मुदगल आणि अन्य अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. नागरिकांशी ते स्वत: वॉटस्‌ ॲप ग्रुपच्या माध्यमातून संवाद साधत आहेत.
 
स्वच्छता ॲम्बेसेडरचे कार्यही उल्लेखनीय
 
स्वच्छता अभियानाचा उद्देश आणि संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने नागपूर शहरात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सन्माननीय नागरिकांना ‘स्वच्छता ॲम्बेसेडर’ म्हणून नियुक्त केले आहे. प्रख्यात मेंदूरोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर मेश्राम, हास्य कवी मधुप पांडेय, डॉ. उदय बोधनकर, मॅरेथानपटू डॉ. अमित समर्थ, पर्यावरण तज्ज्ञ कौस्तभ चॅटजी, रेडिओ जॉकी निकेता यांचा यात समावेश आहे. हे सर्व व्यक्ती आपआपल्या क्षेत्रातील व्यक्तींशी संपर्क साधून जनजागृती करीत आहेत.

 

 

गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण लवकरच

महापौर नंदा जिचकार यांनी प्रशासनिक कामाचा घेतला आढावा
 
नागपूर,ता. २८ : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने गांधीसागर तलाव सौंदर्यीकरणाला लवकरच सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती महापौर नंदा जिचकार यांनी दिली. गांधीसागर तलाव सौंदर्यीकरणासंदर्भात गुरुवारी (ता. २८) मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात घेतलेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
 
बैठकीला माजी महापौर प्रवीण दटके, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, धंतोली झोन सभापती प्रमोद चिखले, मनपातील भाजपच्या प्रतोद दिव्या धुरडे, अतिरिक्त आयुक्त आर.झेड.सिद्दिकी, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, मुख्य अभियंता विजय बनगीरवार, अधीक्षक अभियंता दीपक सोनटक्के, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) अनिरूद्ध चौंगजकर, सतीश नेरळ, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजीव जैस्वाल, कार्यकारी अभियंता (स्लम) डी.डी.जांभूळकर प्रामुख्याने उपस्थित होते.
 
गांधीसागर तलावाकरिता महाराष्ट्र शासनाने २२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याचा वापर योग्यरीत्या करण्यात यावा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. यावेळी गांधीसागर तलावाच्या सद्यस्थितीचा आढावा महापौरांनी अधिकाऱ्यांकडून घेतला. महानगरपालिकेद्वारे तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावाला गळती लागल्याने त्याची दुर्गंधी पसरत आहे. यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार येत आहे. त्याची दुरूस्ती लवकरात लवकर करण्यात यावी, असे निर्देश प्रवीण दटके यांनी दिले. तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी तयार करण्यात आलेला प्रस्ताव नव्याने सुधारणा करून शासनाकडे पाठविण्यात यावा, असेही निर्देश महापौरांनी दिले. प्रस्ताव तयार झाल्यानंतर मुख्य अभियंता विजय बनगीरवार यांनी त्याठिकाणी विशेष लक्ष द्यावे, असे निर्देश प्रवीण दटके यांनी दिले.
 
गांधीसागर तलावाजवळील दुकाने अथवा मालमत्ता याची सर्व माहिती स्थावर विभागाकडून पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश दटके यांनी दिले. तलावात रासायनिक प्रक्रिया करण्यात आली आहे. ती पण तपासून मुख्य अभियंत्यांनी त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दटके यांनी दिले. तलावालगत असलेले बालभवन पाडण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्या प्रस्तावावर चर्चा करण्यात यावी, अशा सूचनाही दटके यांनी केल्या. भाऊजी पागे उद्यानाच्या दुरूस्तीचा प्रस्ताव तयार करण्यात यावा, असे आदेश दटके यांनी दिले. मासेमारीबाबत बोलताना मासोळ्यासंदर्भातील प्रश्न हा मनपाच्या उत्पन्नांचा स्त्रोत आहे. त्याबाबतच्या अंतिम निविदा तपासून मुख्य अभियंत्यांनी पुढाकार घेऊन प्रत्यक्ष जागेची पाहणी करावी, असे निर्देशित केले.

 

 

स्वच्छ सर्वेक्षणासाठी लोकप्रतिनिधींचा सहभाग आवश्यक : ना. चंद्रशेखर बावनकुळे

स्वच्छ सर्वेक्षणाकरिता प्रभागात विशेष संपर्क करण्याचे नगरसेवकांना निर्देश
 
नागपूर,ता.२६ : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्वच्छ सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शहराला अग्रक्रमांकात आणण्याकरिता स्थानिक लोकप्रतिनीधींचा सहभाग आवश्यक आहे. त्याशिवाय आपले शहर अग्रक्रमांकात येणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. मंगळवारी (ता.२६) रोजी महाल येथील राजे रघुजी भोसले नेताजी नगर भवन येथे आयोजित स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणाचा आढावाप्रसंगी ते बोलत होते.
 
यावेळी व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त अश्विन मुदगल प्रामुख्याने उपस्थित होते.
 
पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले, आपण जी संस्था मोठी करण्याकरिता, नावारूपास आणण्याकरिता निवडून आलो, त्या संस्थेला मोठे करण्याकरिता आपली मदत मोलाची आहे. प्रत्येक नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील प्रत्येक घरी किमान दोन स्मार्टफोन असतात. अशा १०० घरी म्हणजेच २०० स्मार्टफोनवर ॲप डाऊनलोड करून घ्यावी, ज्या नागरिकांच्या स्मार्टफोनमध्ये ही ॲप डाऊनलोड केली आहे, त्या नागरिकांची यादी मला सादर करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी नगरसेवकांना दिले. स्वच्छ सर्वेक्षणांतर्गत कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात, याबाबत नागरिकांना अवगत करावे, अशा सूचना दिल्या. यानिमित्ताने तुमचा घरोघरी संपर्कही होईल, असेही ते म्हणाले. शेवटचे सात दिवस नगरसेवकांनी झोकून कार्य करावे. आपले सहकार्य शहराला नावरूपास आणण्यासाठी नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहे, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
 
महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, स्वच्छ सर्वेक्षणाच्या माध्यमातून नागपूरचे रँकींग ठरणार आहे. स्वच्छता ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी दिलेल्या निर्देशाचे सर्व नगरसेवकांनी पालन करावे. यामुळे स्वच्छ सर्वेक्षणात नागपूर टॉप यादीत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
स्वच्छ भारत अभियानाच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या सद्यस्थितीबद्दल आयुक्त अश्विन मुदगल यांनी पीपीटीद्वारे सादरीकरण केले. स्वच्छता सर्वेक्षणासाठी नागपूर तयार असून जनजागृतीचे कार्य मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत देण्यात येणाऱ्या गुणांकनामध्ये नागपूरची सद्यस्थिती काय, याबाबत त्यांनी सादरीकरणातून माहिती दिली. स्वच्छता ॲप कसे डाऊनलोड करायचे, याबाबतही त्यांनी माहिती दिली. कार्यक्रमाचे संचालन अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते यांनी केले. कार्यक्रमाला सर्व नगरसेवक, मनपातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

 

 

बासुरी बजाने से कोई मुरारी नही होता और शादी न रचाने से कोई अटलबिहारी नही होता

मनपा द्वारा आयोजित हास्य कवि सम्मेलन में उडी हास्य की फुहार
 
नागपुर: गांधीबाग उद्यान के नुतनीकरण के प्रसंग पर भारत के पूर्व प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी, महामना पंडित मदनमोहन मालवीय, गुरू गोविंदसिंहजी की जयंती के त्रिवेणी संगम पर एवं क्रिस्मस के पावन प्रसंग पर गांधीबाग उद्यान के हरियाली मे चांद की रोैशनी के निचे शीतल मंद मंद हवाओ के बीच सरस वातावरण मे अखिल भारतीय हास्य व्यंग्य कवि सम्मेलन उल्ल्हास पुर्ण वातावरण मे पुर्ण हुआ। कवि सम्मेलन का उदघाटन महापौर, श्रीमती नंदा जिचकार के हस्ते हुआ। इस अवसर पर निगम आयुक्त, श्री अश्विन मुदगल, विधायक, श्री सुधाकरराव देशमुख, श्री कृश्णाजी खोपडे, श्री विकासजी कुंभारे, श्री अनिलजी सोले, श्री गिरीशजी व्यास, स्थायी समिती के अध्यक्ष श्री संदिपजी जाधव, उपमहापौर श्री दिपराजजी पारडीकर व संयोजक श्री दयाशंकर तिवारी इनकी उपस्थिती मे संपन्न हुआ।
 
कवि सम्मेलन का आगाज दयाशंकर तिवारी ‘‘मौन’’ ने माॅं सरस्वती की वंदना से किया । काव्य रचना का श्रीगणेश झांसी से पधारे भाई देवेंद्र नटखट की हास्यव्यंग की फुलझडी के साथ वातावरण मे हास्यरस घुल गया उनकी यह पंक्तिया 
 
         मदारी को देखकर जमूरो पर यकीन मत करना
         जुल्फो को देखकर जुडे़ पर यकीन मत करना
         75 साल मेे जो काम किया बाबा ने भाई साहब
         बुढो पर भी यकिन मत करना
 
दुसरे कवी के रूप मे श्री दयाशंकर मौन ने एक श्रृंगार रस का गीत पढा जिसके बोल थे
 
         तेरे बदन की रंगत एैसी है। 
         जैसेकि गुलाब घुला पारा
         आॅंखो से छुलो तो षबनम है।
         हाथो से छुलो तो अंगारा ।
 
इसे साहित्यप्रेमीयो ने खूब सराहा।
 
तीसरे कवी के रूप मे रायबरेली से पधारी कवीयत्री शबीस्ता बृजेशने अपने ओजपुर्ण वानी से वातावरण मे गरमावट पैदा करदी। उनके हर शब्द पर दर्शको ने भरपूर तालीयाॅं पीटि उनकी यह पंक्तिया
 
         एक एक अक्षर दान यदी करेगा कवि
         भारत मे अक्षरो का ग्राम बन जायेगा।
         कहां तक विध्वंश करेगा वह मंदिरो का
         घर घर रघुनाथ का धाम बन जायेगा।
 
इसके पष्चात राजस्थान चित्तौड से पधारे शांती तूफान ने अपनी विशेष शैली मे हास्य का तूफान खड़ा कर दिया उनकी यह पंक्तिया
 
        फक्त पैदा होने से कोई पंसारी नही होता
        बासुरी बजाने से कोई मुरारी नही होता
        मशविरा मान जाओ मेरा तुम
        कर लो शादी कुंवारा रहने से कोई अटलबिहारी नही होता
 
इसके पश्चात मंच संचालन कर रहे भिलवाडा से पधारे राजेंद्र शर्मा ने एक व्यंग रचना पढी
 
        किसी मंदिर की दहीलीज पर कामसूत्र पढने से वह किताब कभी गीता नही हो सकती।
        अपनी अय्याशी के लिये की गयी शादी के ढोंग को स्वयंवर का नाम देने से राखी सावंत कभी सीता नही हो सकती।
 
कार्यक्रम के अंत मे इस कार्यक्रम को सबसे उंचाई पर लेकर गये मध्यप्रदेश के पोलिस अधिकारी श्री मदन मोहन समर की वीररस की रचनाओ ने उन्होने कहां कि
 
         यह वक्त बहोत ही नाजूक है
         हम पर हमले दर हमले है
         दुश्मन का दर्द यही तो है हम हर हमलो पर संभले है।
 
कार्यक्रम का प्रारंभिक संचालन संयोजक नगरसेवक दयाशंकर तिवारी ने किया। इस कार्यक्रम मे नगरसेवक, श्री संजय बालपांडे, सौ. विद्या कन्हेरे, वंदना यंगटवार, सौ.दिव्या धुरडे, सौ.स्नेहल वाघमारे, श्री.सुनिल हिरणवार व अनेक गणमान्य व्यक्ति उपस्थित थे। ठंडी हवाओ के बावजूद करीब दो हजार लोगो ने सतत पांच घंटो तक साहित्ययज्ञ मे अपनी उपस्थिती दर्ज करायी। कार्यक्रम का आभार दयाशंकर तिवारी ने माना।
 

 

तिबेटीयन युथ काँग्रेसच्या शिष्टमंडळाची मनपाला भेट

महापौर नंदा जिचकार यांच्याशी केली चर्चा
 
नागपूर, ता.२६ : तिबेटीयन युथ काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (ता.२६) नागपूर महानगरपालिकेला भेट दिली. महापौर नंदा जिचकार यांनी शिष्टमंडळाचे स्वागत केले. यावेळी त्यांच्या समवेत स्थायी समिती सभापती संदीप जाधव, माजी महापौर प्रवीण दटके, नगरसेवक धर्मपाल मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.
 
तिबेटमध्ये अंतर्गतवाद सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यासाठी तिबेटीयन निर्वासित हे स्थानिक लोकप्रतिनिधी, भारतातील नेतृत्व, तसेच सर्व स्तरातील सामाजिक संस्था यांचे समर्थन प्राप्त करण्याकरिता संबंधित लोक आणि संस्थांना भेटी देत आहेत. याअंतर्गतच तिबेटीयन युथ काँग्रेसच्या शिष्टमंडळाने ही भेट घेतली.
 
यामध्ये छेवांग डोलमा, पेनपा सेरिंग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर महानगर कार्यवाह अरविंद कुकडे, भारत तिब्बत सहयोग मंचाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अशोक मेंढे, लोबसांग टेम्पो भंते, विजय केवलरामानी, संदेश मेश्राम, लोबसांग सिरींग, गुणवंता सोमकुवर, अशोक गायकवाड, विक्की नागवंशी, गीता प्रजापती, नलिनी बंसाडे, सिरिंग नोरडू भ्यालसंग आदी उपस्थित होते.
 
शिष्टमंडळाच्या प्रतिनिधींनी महापौर नंदा जिचकार यांच्याशी चर्चा केली. यावेळी महापौरांनी प्रतिनिधींना मनपाचे स्मृतीचिन्ह, तुळशीचे रोप देऊन त्यांचा सत्कार केला. 

 

 

स्वच्छ सर्वेक्षणासाठी लोकप्रतिनिधींचा सहभाग आवश्यक : ना. चंद्रशेखर बावनकुळे

स्वच्छ सर्वेक्षणाकरिता प्रभागात विशेष संपर्क करण्याचे नगरसेवकांना निर्देश
 
नागपूर,ता.२६ : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्वच्छ सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शहराला अग्रक्रमांकात आणण्याकरिता स्थानिक लोकप्रतिनीधींचा सहभाग आवश्यक आहे. त्याशिवाय आपले शहर अग्रक्रमांकात येणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. मंगळवारी (ता.२६) रोजी महाल येथील राजे रघुजी भोसले नेताजी नगर भवन येथे आयोजित स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणाचा आढावाप्रसंगी ते बोलत होते.
 
यावेळी व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त अश्विन मुदगल प्रामुख्याने उपस्थित होते.
 
पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले, आपण जी संस्था मोठी करण्याकरिता, नावारूपास आणण्याकरिता निवडून आलो, त्या संस्थेला मोठे करण्याकरिता आपली मदत मोलाची आहे. प्रत्येक नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील १०० नागरिकांकडून स्वत: स्वच्छता ॲप डाऊनलोड करून घ्यावी, ज्या नागरिकांच्या स्मार्टफोनमध्ये ही ॲप डाऊनलोड केली आहे, त्या नागरिकांची यादी मला सादर करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी नगरसेवकांना दिले. शेवटचे सात दिवस नगरसेवकांनी झोकून कार्य करावे. आपले सहकार्य शहराला नावरूपास आणण्यासाठी नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहे, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
 
स्वच्छ भारत अभियानाच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या सद्यस्थितीबद्दल आयुक्त अश्विन मुदगल यांनी पीपीटीद्वारे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे संचालन अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते यांनी केले. आभार महापौर नंदा जिचकार यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व नगरसेवक, मनपातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

 

मनपाचा शिक्षण सप्ताह ८ जानेवारीपासून

वैयक्तिक व सांघिक स्पर्धेचे विशेष आयोजन
 
नागपूर, ता.२२ : शालेय विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक, मानसिक स्तर वाढविण्यासाठी महानगरपालिका दरवर्षी शिक्षण सप्ताहाचे आयोजन करीत असते. या वर्षीचा शिक्षण सप्ताह ८ जानेवारी ते १८ जानेवारी २०१८ या दरम्यान आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांनी दिली. शुक्रवार (ता.२२) मनपा मुख्यालयातील क्रीडा समितीच्या कार्यालयात आयोजित आलेल्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते.
 
यावेळी क्रीडा समिती उपसभापती प्रमोद तभाने, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, क्रीडा अधीक्षक नरेश चौधरी, क्रीडा विभागाचे नरेश सवाईथूल प्रामुख्याने उपस्थित होते.
 
यावर्षीच्या शिक्षण सप्ताहामध्ये ८ जानेवारीपासून वर्ग  १ ते ४ या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक स्पर्धेत १००, २०० मी. धावणे, लांब उडी, उंच उडी, शॉर्ट पूट, थाली फेक (१ किलो) तर सांघिक स्पर्धेत कबड्डी, फुटबॉल, लंगडी, टग ऑफ वॉर या स्पर्धांचा समावेश असेल. वर्ग ५ ते ८ या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक स्पर्धेत १००, २००, ४०० मी. धावणे, लांब उडी, ट्रिपल जंप, उंच उडी, शॉर्ट पूट, थाली फेक (१ किलो) आदी स्पर्धांचा समावेश असेल. या स्पर्धा प्रथमतः झोन स्तरावर आयोजित करण्यात येतील. झोन स्तरावरील वैयक्तिक १, २, ३ क्रमांकांना तसेच सांघिक खेळामध्ये विजयी व उपविजयी संघांना क्रेंद्रीय स्थळी सहभागी करण्यात येईल.
 
या स्पर्धांसोबतच निबंध स्पर्धा, वादविवाद स्पर्धेचे आयोजन विभागाद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती क्रीडा निरिक्षक नरेश सवाईथूल यांनी दिली.

 

 

कस्तुरचंद पार्कच्या पहिल्या टप्प्यातील सौंदर्यीकरणाला हेरिटेज समितीची मंजुरी

जीपीओ इमारत परिसरात सुरू असलेल्या बांधकामाला बजावणार नोटीस
 
नागपूर,ता.२१ : कस्तुरचंद पार्कच्या पहिल्या टप्प्यातील सौंदर्यीकरणाचा संपूर्ण आराखडा तयार झाला असून नागपूर हेरिटेज संवर्धन समितीच्या बैठकीत वास्तुविशारद आणि समिती सदस्य अशोक मोखा यांनी सादर केला. या आराखड्याला समितीने मंजुरी दिली. तर जीपीओ इमारत परिसरात सुरू असलेल्या बांधकामावर समितीने आक्षेप घेतला असून बांधकाम थांबविण्यासाठी नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले.
 
निरीचे माजी संचालक आणि समितीचे सदस्य डॉ. तपन चक्रवर्ती यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला समितीचे सदस्य वास्तुविशारद अशोक मोखा, मनपाचे उपायुक्त राजेश मोहिते, नासुप्रचे अधीक्षक अभियंता सुनील गुज्जलवार, स्ट्रक्चरल इंजिनिअर पी. एस. पाटणकर, नागपूर विद्यापीठाच्या प्रपाठक डॉ. शुभा जोहरी, वास्तुविशारद हबीब खान, नीता लांबे, नगररचना सहायक संचालक सुप्रिया थूल, नगररचनाकार प्र.प्र. सोनारे उपस्थित होते.
 
सदर बैठकीत कस्तुरचंद पार्कच्या पहिल्या टप्प्यातील सौंदर्यीकरणाचा आराखड्याचे वाचन समितीचे सदस्य अशोक मोखा यांनी केले. याअंतर्गत होणाऱ्या सौंदर्यीकरणामध्ये अंतर्भूत असलेल्या बाबींची माहिती त्यांनी दिली. या आराखड्याला समितीच्या सदस्यांनी सर्वानुमते मंजुरी दिली.
 
जीपीओ इमारत परिसरात सुरू असलेल्या बांधकामाची बाब समितीच्या लक्षात आल्यानंतर त्यावर समितीने तीव्र आक्षेप घेतला. हेरिटेज संवर्धन समितीची कुठलीही परवानगी न घेता बांधकाम सुरू असल्यामुळे तातडीने संबंधित प्रशासनाला नोटीस बजावण्याचे निर्देश बैठकीचे अध्यक्ष श्री. तपन चक्रवर्ती यांनी दिले.
 
समितीपुढे मंजुरीसाठी १७ प्रकरणे आलीत. संबंधित अधिकारी आणि प्रतिनिधींनी त्यासंदर्भात माहिती दिली. सोनेगाव तलाव सौंदर्यीकरणासंदर्भातील प्रस्ताव समितीपुढे आला. या प्रकरणामध्ये महानगरपालिकेतर्फे विकास योजना आराखड्यामध्ये कलम ३७ खालील फेरबदलाचा प्रस्ताव प्रस्तावित असल्याने त्याअनुषंगाने हरकती/सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर तो प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. राज्य शासनाच्या मंजुरीनंतर तलावाचे क्षेत्रफळ कमी न करता, कुठलेही प्रदूषण होणार नाही याची काळजी घेत राज्य शासनाच्या अटी व शर्तींना अधीन राहून सौंदर्यीकरण करण्यास हरकत नसल्याचे समितीने सूचित केले.
 
दोन विविध संस्थांतर्फे प्रस्तावित मॅरॉथॉन, नाताळनिमित्त ईसाई समाजातर्फे काढण्यात येणारी बाईक रॅली, मनपातर्फे घेण्यात येणाऱ्या महापौर चषक राष्ट्रीय सायकल पोलो स्पर्धेकरिता अटी व शर्तींच्या अधीन राहून समितीने मंजुरी दिली. प्रदर्शनीच्या प्रस्तावांवर मात्र असहमती दर्शविली. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या इमारतीमध्ये ज्येष्ठ व दिव्यांगांना सोयीचे व्हावे यासाठी सदर इमारतीमध्ये उद्‌वाहन बसविण्याचा प्रस्तावही हेरिटेज समितीसमोर ठेवण्यात आला. या प्रस्तावाला समितीने मंजुरी प्रदान केली.
 
नागपूर हेरिटेज संवर्धन समितीचे अध्यक्ष भा.प्र.सेवेतील निवृत्त अधिकारी अरुण पाटणकर यांचे २५ नोव्हेंबर रोजी निधन झाले. सभेच्या प्रारंभी त्यांना समिती सदस्याननी श्रद्धांजली अर्पण केली. 

 

 

स्वच्छता ही वैयक्तिक जबाबदारी समजा : डॉ. उदय बोधनकर

मनपातर्फे ‘स्वच्छता ॲम्बेसेडर’ म्हणून निवड : महापौरांनी केले कार्याचे कौतुक
 
नागपूर,ता. २१ : शहर स्वच्छ करायचे असेल तर त्यासाठी नागरिकांची मानसिकता महत्त्वाची असते. प्रत्येकाने स्वच्छता हा वैयक्तिक आणि कुटुंबाचा विषय समजावा. माझे घर जसे स्वच्छ ठेवणे ही जबाबदारी आहे तसेच शहर स्वच्छ ठेवणे, ही सुद्धा जबाबदारी आहे, ही मानसिकता जर प्रत्येक नागरिकाची झाली तर शहर स्वच्छ होण्यास मुळीच वेळ लागणार नाही, असे मत नागपूरच्या वैद्यकीय क्षेत्रातील प्रख्यात डॉ. उदय बोधनकर यांनी मांडले.
 
नागपूर महानगरपालिकेतर्फे डॉ. उदय बोधनकर यांची ‘स्वच्छता ॲम्बेसेडर’ म्हणून निवड करण्यात आली. महापौर नंदा जिचकार यांनी गुरुवारी (ता. २१) मनपाच्या मुख्यालयात त्यांचा शाल, स्मृतिचिन्ह व तुळशीचे रोपटे देऊन सत्कार केला. डॉ. बोधनकर यांनी स्वत: महापालिकेच्या स्वच्छता अभियानात सहभागी होण्याचा मानस व्यक्त केला. ही स्वागतार्ह बाब आहे. त्यांच्यासारख्या प्रख्यात व्यक्तींकडून स्वयंप्रेरणेने स्वच्छतेबाबत जनजागृती होणे ही शहरासाठी अभिमानाची बाब आहे, असे म्हणत महापौर नंदा जिचकार यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आणि महापालिकेचे स्वच्छतादूत बनल्याबद्दल अभिनंदन केले.
 
नागपूर महानगरपालिकेतर्फे देण्यात येत असलेला स्वच्छतेचा संदेश आपण शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचवू, अशी ग्वाही डॉ. उदय बोधनकर यांनी दिली. त्यांनी त्याचवेळी स्वच्छता ॲप मोबाईलवर डाऊनलोड करून नागरिकांनीही जास्तीत जास्त संख्येने ॲप डाऊनलोड करून तक्रारी पाठविण्याचे आवाहन केले.
 
यावेळी अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार उपस्थित होते. संचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले.
 

 

जुन्या व नव्या इमारतींसाठी नवी ‘फायर अलर्ट सिस्टीम’ लावणे आता बंधनकारक - संजय बालपांडे

अग्निशमन व विद्युत समितीच्या आढावा बैठकीत दिले निर्देश
 
नागपूर,ता. २१ : अग्निशमन विभागाकडे अस्तित्वात असलेली फायर अलर्ट हॉटलाईन सेक्युरिटी सिस्टीमसाठी नागरिकांना प्रवृत्त करावे, ज्या इमारतींची उंची १५ मीटरपेक्षा जास्त आहे अशा सर्व जुन्या व सर्व इमारतींना फायर अलर्ट सिस्टीम लावणे आता बंधनकारक करण्यात यावे, असे निर्देश अग्निशमन व विद्युत समिती सभापती संजय बालपांडे यांनी दिले.
 
गुरूवारी (ता.२१) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आयोजित बैठकीप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपसभापती प्रमोद चिखले, समिती सदस्य राजकुमार साहू, हरीश ग्वालबंशी, सदस्या ममता सहारे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्यासह प्रमुख अग्निशमन अधिकारी बी.पी.चंदनखेडे, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
 
फायर सेफ्टी ॲक्टच्या आदेशानुसार ज्या इमारतींची उंची १५ मीटर अथवा त्याच्यापेक्षा जास्त आहे आण ज्या व्यावसायिक प्रतिष्ठानाचे बांधकाम १५० चौ.मी. पेक्षा जास्त आहे अशा सर्व  इमारतींना अग्निशमन विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. नव्याने त्यात आलेल्या प्रणालीमध्ये फायर अलर्ट हॉटलाईन सेक्युरिटी सिस्टीम असणे आता गरजेचे आहे. या प्रणालीद्वारे त्या इमारतींची सर्व माहिती अग्निशमन विभागाकडे एका चीपद्वारे उपलब्ध असणार आहे. टाकीतील पाणी, अग्निशमन सेवा इत्यादींबाबत माहिती त्यात समाविष्ट राहणार असल्याची माहिती प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली.
 
अग्निशमन विभागामार्फत करण्यात येणारे विहीर सफाईचे कार्य आरोग्य विभागामार्फत करण्यात यावे, यावर चर्चा करण्यात आली. यावर बोलताना अग्निशमन विभागाला दररोज १७ व १८ विहिरी उपसा कराव्या लागतात. त्यामुळे त्याचा लाखो रूपयांचा भुर्दंड लागतो. यावर बोलताना सभापती बालपांडे म्हणाले की, सरकारी विहिरी या मोफत साफ करण्यात याव्यात. खासगी विहिरींकरिता नाममात्र शुल्क आकरण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले.
 
त्रिमूर्ती नगरातील नव्याने तयार करण्यात आलेल्या अग्निशमन स्थानकाच्या इमारतीच्या बांधकामाचा आढावा यावेळी घेण्यात आला. इमारतीचे बांधकाम मार्च २०१८ पर्यंत पूर्ण होईल, अशी ग्वाही कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर यांनी दिली. यासोबतच वाठोडा, गंजीपेठ येथील स्थानक इमारतीचे पुनर्निर्माण करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला असल्याची माहिती प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांनी दिली.
 
लकडगंज स्थानक इमारतीचे बांधकाम सुरू असल्याने स्थानक बगडगंज येथील मनपाच्या शाळेत स्थलांतरित करण्याच्यादृष्टीने शाळेची किरकोळ दुरूस्ती करण्यासंदर्भातील आढावा सभापती बालपांडे यांनी घेतला. त्याबाबत बोलताना उचके म्हणाले की, शाळेची रीतसर परवानगी मिळाली आहे. शाळेमध्ये गाडी ठेवण्याकरिता शेड उभारणीचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. पुढील आठ ते दहा दिवसात काम पूर्ण होईल अशी माहिती उचके यांनी दिली.
 
यानंतर शहरात बसविण्यात आलेल्या एल.ई.डी लाईट संदर्भात चर्चा करण्यात आली. यासंदर्भातील सविस्तर माहिती कार्यकारी अभियंता संजीव जैस्वाल यांनी दिली.
 
बैठकीला विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, अग्निशमन विभागाचे सर्व स्थानक अधिकारी उपस्थित होते.

 

 

आपलं शहर स्वच्छ असावं हे प्रत्येकाला वाटायला हवं : महापौर

पाच ‘स्वच्छता ॲम्बेसिडर’ करणार ‘स्वच्छते’बाबत जनजागृती
 
नागपूर, ता. १९ : शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या कर्मचा-य़ांनी कितीही प्रयत्न केले, तरीही नागरिकांच्या मनात स्वतः आपलं शहर स्वच्छ असावं असे ही भावना असायला हवी. प्रत्येकाला मनापासून ते वाटायला हवं. जो पर्यंत नागरिकांच्या मनात शहराच्या स्वच्छतेबद्दल आपुलकीचा विचार येत नाही तो पर्यंत स्वच्छ व सुंदर शहर साकारणे शक्य नाही. आपल्या व्यस्त दैनंदिनीमधून शहराच्या स्वच्छतेसाठी पुढे आलेल्या पाचही “ब्रॅण्ड ॲम्बेसिडर” चे कौतुक करत त्यांचे आभार महापौर नंदा जिचकार यांनी मानले.
 
‘स्वच्छ सर्वेक्षण-२०१८’ साठी नागपूर महानगरपालिकेतर्फे विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने नावलौकिक कमावणा-यांची नियुक्ती मनपातर्फे करण्यात आली. यामध्ये प्रसिद्ध मेंदुरोग तज्ज्ञ डॉ.चंद्रशेखर मेश्राम, प्रसिद्ध साहित्यकार, कवी मधूप पांडे, मॅरोथॉनपटू डॉ. अमित समर्थ, ग्रीन व्हीजील संस्थेचे कौस्तभ चॅटर्जी, रेडिओ जॉकी नीकिता साने यांचा समावेश आहे. यावेळी महापौर नंदा जिचकार, उपायुक्त जयंत दांडेगावकर, सहायक आयुक्त महेश मोरोणे, राजेश कराडे, गणेश राठोड, हरीष राऊत, अशोक पाटील, सुभाष जयदेव, विजय हुमणे, राजू भिवगडे, सुवर्णा दखणे आदींची उपस्थिती होती.
 
यावेळी उपायुक्त जयंत दांडेगावकर यांनी स्वच्छ सर्वेक्षण २०१८ मध्ये स्वच्छतेसंदर्भातील विविध निकषांवर असलेल्या गुणपद्धतीबद्दलची सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे दिली. मनपातर्फे या चांगल्या उपक्रमासाठी आपली निवड करण्यात आली असल्याने आपण स्वतःला भाग्यवान समजत असून आमच्या वतीने नागपूर स्वच्छ आणि सुंदर व्हावे, संपूर्ण देशात अव्वल क्रमांक स्वच्छतेच्या बाबतीत नागपूरचा असावा यासाठी ज्या पद्धतीने योगदान देता येईल, त्या पद्धतीने देऊ. आपआपल्या क्षेत्रात ज्या लोकांशी संबंध येतो, त्या लोकांना नागरिक म्हणून आपल्या जबाबदारीचे दायित्व समजावून सांगण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही निवड झालेल्या स्वच्छता ॲम्बेसिडर्सनी यावेळी दिली.
 
महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, स्वच्छता हा विषय आपल्या आरोग्याशी जुळलेला आहे. आपण आपले घर ज्याप्रकारे स्वच्छ ठेवतो, त्याचप्रकारे हे शहर आपले घर समजून या कार्यात हातभार लावायला हवा. जर नागरिकांनी ‘मी कचरा करणारच नाही’ असे ठरविले तर शहर असेच स्वच्छ राहील. आपल्या माध्यमातून महानगरपालिकेने आता ‘नागपूर स्वच्छ’चे स्वप्न बघितले आहे. सर्वांनी मोबाईलवर ‘स्वच्छता ॲप’ डाऊनलोड करा. अस्वच्छतेसंदर्भातील तक्रारी पाठवा आणि स्वच्छ आणि सुंदर शहर साकारण्यासाठी स्वच्छतादूत बना, असे आवाहन केले.
 
नागपूरची आगेकूच सुरूच; स्वच्छतेत २० वा क्रमांक
 
४३४ च्या वर शहरांच्या यादीत मागील वर्षी नागपूर ‘स्वच्छ शहर’ म्हणून १३७ व्या क्रमांकावर होते. नागरिकांच्या सहकार्याने मनपा प्रशासनाने प्रयत्नपूर्वक यामध्ये चांगली कामगिरी त्यानंतर बजावली आहे. आता या क्रमांकात सुधारणा झाली असून सद्यस्थितीत २० व्या क्रमांकावर झेप घेतली आहे, अशी माहिती देत जानेवारी महिन्यात ‘स्वच्छ सर्वेक्षण-२०१८’ आहे. यामध्ये टॉप स्वच्छ शहरांच्या यादीत नागपूर यावे, यासाठी संपूर्ण नागरिकांनी प्रयत्न करावे, असे आवाहनही महापौर नंदा जिचकार यांनी केले.

 

 

कस्तुरचंद पार्कच्या विकासासाठी पाच कोटी

सर कस्तुरचंद डागा पुण्यातिथी शताब्दी समारोहात मुख्यमंत्र्यांची घोषणा
 
नागपूर, ता. १६: सर कस्तुरचंद डागा यांनी नागपूरच्या विकासाला आपल्या दुरदृष्टीतून नवा आयाम दिला. त्यांची आठवण करुन देणारे कस्तुरचंद पार्क हे शहराच्या संस्कृतीची आणि विकासाची ओळख आहे. नागपूरच्या जीवनाला नवा आकार देणारे केंद्र आहे. नागपूरचे वैभव असलेल्या कस्तुरचंद पार्कच्या विकासासाठी राज्य शासनातर्फे पाच कोटी रुपये देण्यात येतील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
 
सर कस्तुरचंद डागा यांच्या पुण्यतिथी शताब्दी समारोहानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे कस्तुरचंद पार्क येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे उर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, खासदार अजय संचेती, आमदार सुधाकर देशमुख, आमदार जोगेंद्र कवाडे, राष्ट्रीय माहेश्वरी सभेचे अध्यक्ष श्याम सोनी, गोविंद डागा, विदर्भ इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष अतुल पांडे, वेदचे अध्यक्ष देवेंद्र पारेख, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्षनेते संदीप जोशी, एलीबर्न वार्णे व्यासपीठावर उपस्थित होते.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, “सर कस्तुरचंद डागा यांनी नागपूरच्या विकासाचा पाया रचला. नागपूर भारतातील व्यापाराचे केंद्र होऊ शकते. हे त्यांनी ओळखले आणि येथून देशांतर्गत नव्हे तर देशाबाहेरही व्यापाराची वृद्धी केली. हेच आपण जर आज ओळखले, सर कस्तुरचंद डागा यांचा आदर्श समोर ठेवला तर नागपरच्या विकासाला नवी दिशा मिळेल. सर कस्तुरचंद डागा यांनी आपल्या दातृत्वातून आपले कार्य अजरामर केले. अश्या व्यक्तीची आढवण या शहराने केली. याचा मला अभिमान आहे.”
 
सर कस्तुरचंद डागा यांच्या सन्मानार्थ बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, दानशुर व्यक्तीचा संबंध जात, भाषा याच्याशी नसतो. तो त्याच्या दानी वृत्ती आणि विकासाच्या दृष्टीशी असतो. सर कस्तुरचंद डागा यांनी आपल्यातील कुशल व्यवसायिकाचा परिचय दिला. ते व्यावसायिक असले तरी त्यांच्याजवळ विकासाची दृष्टी आणि व्हीजन होते.
 
प्रास्ताविकात नंदा जिचकार यांनी सर कस्तुरचंद डागा यांचा जीवन परिचय देत त्यांच्या स्वप्नातील स्वच्छ सुंदर नागपूर साकार करण्याचे आवाहन केले. यावेळी राष्ट्रीय माहेश्वरी सभेचे अध्यक्ष शाम सोनी, गोविंद डागा, व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे, वेदचे अध्यक्ष देवेंद्र पारेख, एलीसन वार्णे यांनीही सर कस्तुरचंद डागा यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. केंद्र शासनातर्फे सर कस्तुरचंद डागा यांच्यावर टपाल तिकीट प्रकाशित करण्याची विनंती यावेळी मान्यवरांनी केली.
 
यावेळी सर कस्तुरचंद डागा यांचा परिचय करुन देणारा लघुपट दाखविण्यात आला. तत्पूर्वी माहेश्वरी समाजातील भगिनींतर्फे राजस्थानच्या लोककलेची ओळख करुन देणा-या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन माजी सत्तापक्ष नेते व ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी केले. उपस्थितांचे आभार मनपाचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, मनपा आयुक्त अश्विन मुद्गल, सुवर्णा डागा, राम डागा, कौटिल्य डागा, आशा डागा, ध्रुव डागा यांच्यासह देशभरातील डागा परिवारातील सदस्य, विदर्भ इंडस्ट्रीयल असोसिएशनचे सदस्य, माहेश्वरी समाज बांधव, नगरसेवक नागरिकांची उपस्थिती होती.
 
डागा परिवारातर्फे आरोग्य व शिक्षणासाठी १ कोटीची देणगी
 
डागा रुग्णालयात येणा-या गरीबांवरील उपचारासाठी आणि भूमिहीन परिवारातील मुलांच्या अभियांत्रिकी शिक्षणासाठी डागा परिवाराने ट्रस्टच्या माध्यमातून एक कोटी रुपयांची देणगी जाहीर केली. गोविंद डागा यांनी या देणगीची घोषणा केली.

 

 

‘आपली बस’ ताफ्यात महिलांसाठी विशेष बस लवकरच

सर्वाधिक ‘स्वच्छ’ बस ठेवणाऱ्या चालक-वाहकांना ‘स्वच्छतादूत’ पुरस्कार
 
नागपूर, ता. १६ : विद्यार्थिनी, महिलांसाठी सुरक्षित आणि सर्व सोयीयुक्त वाहतुकीच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने नागपूर महानगरपालिकेच्या “आपली बस”ताफ्यात महिलांसाठी विशेष बस लवकरच धावणार आहे. याकरिता ३२ आसनी क्षमतेच्या बसची निवड करण्याच्या निर्णय नुकत्याच झालेल्या मनपा परिवहन समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
 
अध्यक्षस्थानी समिती सभापती बंटी कुकडे, सदस्य नरेंद्र वालदे, अर्चना पाठक, मनीषा धावडे, प्रवीण भिसीकर, नितीन साठवणे, उज्ज्वला शर्मा, वैशाली रोहणकर, निगम सचिव हरिष दुबे, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांची उपस्थिती होती. शासनाच्या वतीने महिलांसाठी विशेष बस सेवेसाठी ९.२५ कोटी रुपयांचा निधी मंजुर झाला आहे. या अंतर्गत २० आसनी, ३२ आसनी, ४० आसनी आणि ६५ आसनी बसेसपैकी आवश्यक बस बद्दल समितीच्या महिला सदस्यांना विचारणा करुन सर्वसंमतीने ३२ आसनी बसची निवड करण्यात आली.
 
 जानेवारी २०१८ मध्ये शहरात स्वच्छ सर्वेक्षण होणार आहे. त्यासाठी शहरातील सर्व ‘आपली बसेस’वर स्टीकर लावून जनजागृती करण्यात येत आहे. यासाठी परिवहन विभागाचे योगदान म्हणून तसेच कर्मचा-यांना प्रोत्साहित करण्यासाठी परिवहन समितीतर्फे आपली बस सर्वाधिक स्वच्छ ठेवणा-या वाहक आणि चालक यांना “स्वच्छतादूत” पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल, असा निर्णय यावेळी घेण्यात आला.
 
...तर वाहक किंवा चालकाचे निलंबनही करु
 
एकीकडे स्वच्छ सर्वेक्षणाचे स्टीकर बसवर लावून जनजागृती करण्यात येत असली तरी दुसरीकडे अनेक चालक आणि वाहक बस सिग्नलवर थांबली असताना खर्चा किंवा पान खाऊन रस्त्यावर थुकत असल्याच्या अनेक तक्रारी विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे परिवहन समितीतर्फे सर्व कर्मचा-यांनी स्वच्छतेचे काटेकोरपणे पालन करावे असे सक्त निर्देश यावेळी देण्यात आले. एखादाही परिवहन कर्मचारी अस्वच्छता करताना आढळ्यास त्यावर थेट निलंबनाची कारवाई करण्यात येईल, अशी तंबी यावेळी परिवहन समिती सभापतींनी दिली.

 

 

गंगानगर बाजार चौक- बर्डी बस सेवेचा शुभारंभ

आमदार सुधाकर देशमुख यांनी दाखविली हिरवी झेंडी
 
नागपूर,ता.१६ : नागपूर महानगरपालिकेअंतर्गत सुरू असलेल्या शहर बस सेवेअंतर्गत शनिवारी (ता.१६) गंगानगर बाजार चौक ते बर्डी आणि गौरखेडे ले-आऊट ते मेडिकल चौक या बससेवेचा शुभारंभ आ. पश्चिम नागपूरचे आमदार सुधाकर देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
 
यावेळी महिला व बाल कल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, नगरसेवक जगदीश ग्वालबंशी, हरीश ग्वालबंशी, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, परिवहन विभागाचे रामराव मातकर, योगेश नवघरे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
गौरखेडे ले- आऊट ते मेडिकल चौक ही बस विघ्नहर्ता मंदिर मार्गे उपासनी बंगला, सी.पी.डब्लू क्वॉर्टर, महाराजबाग, मानस चौक, बस स्थानक अशी धावणार आहे. गौरखेडे ले-आऊट वरून पहिली बस सकाळी ९.३० ला तर अखेरची बस संध्याकाळी ६.१० ला आहे. एकूण १४ फेऱ्या राहतील. प्रवास भाडे  २६ रूपये पूर्ण तर अर्धे १३ रूपये आकारण्यात येईल.
 
गंगानगर बाजार चौक ते बर्डी ही बस गौरखेडे ले-आऊट मार्गे एलएडी कॉलेज, डब्ल्यू.सी.एल.,रविनगर, शंकरनगर, अलंकार टॉकीज अशी धावेल. गंगानगरवरून पहिली बस सकाळी ९.०५ ला तर अखेरची बस संध्याकाळी ६.१० ला राहील, अशी माहिती परिवहन विभागाद्वारे देण्यात आली.
 
या भागातील नागरिकांची गैरसोय लक्षात घेता, या भागात बस सुरू करण्यात यावी, अशी मागणी वारंवार स्थानिक नागरिकांनी केली होती. त्यावर परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांनी पुढाकार घेऊन ही बस सेवा सुरू केली. कार्यक्रमाला स्थानिक नागरिक उपस्थित होते.  

 

 

बर्डी ते गुमथळा बस सेवेला सुरुवात

उपमहापौरांनी दाखविली हिरवी झेंडी:   दररोज आठ फेऱ्या
 
नागपूर, ता. १५ : ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुविधेसाठी शुक्रवारी (ता. १५ डिसेंबर) बर्डी ते गुमथळा मार्गे मानकापूर चौक, कोराडी नाका,बोखारा, लोणारा मनपाच्या “आपली बस” सेवेची सुरुवात करण्यात आली.
 
उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी बसला हिरवी झेंडी दाखविली. यावेळी प्रामुख्याने मनपा परिवहन समिती सभापती बंटी कुकडे, नगरसेविका संगीता गि-हे, पं.स. सभापती नम्रता राऊत, गुमथळा ग्रा.पं. सरपंच सौ. जामगडे, बैलवाडा ग्रा.पं. सरपंच सचिन शेटे यांची उपस्थिती होती. बससेवा सुरू झाल्याने दैनंदिन कामाकरिता शहरात येणारे नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आदींच्या सोयीचे होणार असल्याचे यावेळी उपमहापौरांनी सांगितले. बस दररोज आठ फेऱ्या करणार आहे. सकाळी ६.३०, ८.३०,  १०.५०, १२.५०, १४.५०, १६.५०, १९.०५ आणि रात्री २०.५५अशा वेळेत ये-जा करणार आहे. नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा परिवहन समितीतर्फे करण्यात आले. यावेळी सुकीर सोनटक्के, रामराव मातकर, सिद्धार्थ गजभिये यांची उपस्थिती होती.

 

 

मुख्यमंत्री फडणवीस आणि ना. गडकरी यांच्या उपस्थितीत सर कस्तुरचंद डागा पुण्यतिथी शताब्दी सोहळा १६ ला

स्थायी समिती सभापती संदीप जाधव यांनी दिली पत्रपरिषदेत माहिती
 
नागपूर,ता.१५ : : सर कस्तुरचंद डागा यांचे नागपूर शहराच्या विकासात मोठे योगदान आहे. त्यांच्या निर्वाणास २० जानेवारी २०१७ रोजी १०० वर्षे पूर्ण झाले असून त्यानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता कस्तुरचंद पार्क मैदान येथे पुण्यतिथी शताब्दी समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे. या समारोहाची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती संदीप जाधव यांनी पत्रपरिषदेत दिली.
 
माहिती देताना श्री. संदीप जाधव म्हणाले, सर कस्तुरचंद डागा यांचे नागपूर शहर आणि जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान आहे. त्यांचे कार्य केवळ नागपूर जिल्ह्यापुरते मर्यादित नव्हते तर देशात आणि देशाबाहेरही त्यांनी आपल्या कार्याने आणि दातृत्वाने ओळख निर्माण केली. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून नागपूर महानगरपालिकेने त्यांच्या पुण्यतिथीचा शताब्दी समारोह आयोजित केला आहे. कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार राहतील, अशी माहिती त्यांनी दिली. या समारोहात संपूर्ण नागपूरकरांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहावे, असे आवाहन श्री. जाधव यांनी केले.
 
कार्यक्रमादरम्यान सर कस्तुरचंद डागा यांच्या जीवनचरित्रावर आधारीत एक लघुपट बनविण्यात आला असून तो समारोहात दाखविण्यात येणार असल्याची माहिती श्रीमती आशा डागा यांनी दिली.
 
पत्रपरिषदेला स्थायी समिती सभापती संदीप जाधव यांच्यासह माजी सत्तापक्ष नेते तथा ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, प्रतोद दिव्या धुरडे, नगरसेवक निशांत गांधी, नासुप्रचे विश्वस्त भूषण शिंगणे, श्रीमती आशा डागा, अभिमन्यू डागा, ध्रुव डागा, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर उपस्थित होते.

 

 

कर वसुलीसंदर्भात कडक पावले उचला

महापौर नंदा जिचकार यांचे निर्देश : लक्ष्मीनगर झोनमध्ये घेतली तातडीची बैठक
 
नागपूर,ता. १४ : महानगरपालिकेच्या सेवा जर नागरिक घेत असेल तर कराचा भरणाही त्यांनी वेळेत करायलाच हवा. कर वसुल झाला नाही तर महानगरपालिका प्रशासन नागरिकांना सेवा पुरविणार कशा, असा सवाल करीत आता यापुढे कर वसुलीसंदर्भात कडक पावले उचला. जो व्यक्ती वर्षोनुवर्षे कर भरत नसेल अशा व्यक्तींच्या मालमत्ता जप्त करा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी लक्ष्मीनगर झोनमधील करवसुलीशी संबंधित सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना दिले.
 
लक्ष्मीनगर झोन कार्यालयात महापौर नंदा जिचकार यांनी बोलाविलेल्या तातडीच्या बैठकीत झोन सभापती प्रकाश भोयर, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, विधी समितीच्या सभापती ॲड. मिनाक्षी तेलगोटे, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेवक लहुकुमार बेहेते, किशोर वानखेडे, नगरसेविका पल्लवी श्यामकुळे, सोनाली कडू, उज्ज्वला बनकर, वनिता दांडेकर, सहायक आयुक्त सुवर्णा दखने, उपअभियंता मुळे उपस्थित होते.
 
महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी सर्व कर निरिक्षकांच्या आतापर्यंतच्या कामगिरीचा आढावा घेतला. ज्या कर निरीक्षकाने त्यांच्याकडे असलेल्या उद्दिष्टापेक्षा कमी वसुली केली असेल तर त्याची कारणे काय, याबाबत विचारणा केली. पुढील सात दिवसांत वसुलीचे आणि जप्तीचे उद्दिष्ट त्यांच्यासमोर ठेवण्यात आले. यासंदर्भातील आढावा शुक्रवारी (ता. २२) घेण्यात येईल. त्यावेळी जर समाधानकारक वसुली आणि जप्ती झालेली नसेल तर प्रशासनाला संबंधित कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
 
झोन सभापती प्रकाश भोयर यांनीही कर्मचाऱ्यांना प्रामाणिकपणे आणि निष्ठेने आपले कर्तव्य बजावण्याचे निर्देश दिलेत. बैठकीला लक्ष्मीनगर झोनमधील सर्व कर निरीक्षक व सहायक उपस्थित होते.

 

 

१६ ला सर कस्तुरचंद डागा पुण्यतिथी शताब्दी समारोह

मुख्यमंत्री फडणवीस व ना. नितीन गडकरी यांची उपस्थिती
 
नागपूर,ता. १४ : सर कस्तुरचंद डागा यांचे नागपूर शहराच्या विकासात मोठे योगदान आहे. त्यांच्या निर्वाणास २० जानेवारी २०१७ रोजी १०० वर्षे पूर्ण झाले असून त्यानिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता कस्तुरचंद पार्क मैदान येथे पुण्यतिथी शताब्दी समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रामुख्याने उपस्थित राहतील. अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार राहतील.
 
महापौरांनी केला दौरा
 
कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी महापौर नंदा जिचकार यांनी गुरुवारी (ता. १४) कार्यक्रमस्थळाचा दौरा केला. यावेळी त्यांच्यासोबत धरमपेठ झोन सभापती रूपा रॉय, माजी उपमहापौर व ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे, मंगळवारी झोनचे सहायक आयुक्त हरिश राऊत, माहेश्वरी समाजाचे सचिव दिनेश राठी, उद्यान निरीक्षक अमोल चोरपगार, अनंत नागमोते, शाखा अभियंता सुरेश नंदनवार, आरोग्य निरीक्षक राठोड व संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी अधिकाऱ्यांना आयोजनासंदर्भात काही सूचना दिल्या.
 

 

एका क्लिकवर पाठवा स्वच्छतेसंदर्भात तक्रार
 
नागपूर महानगरपालिका, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनतर्फे जनजागृती अभियान
 
नागपूर,ता. ९ : स्वच्छतेसंदर्भातील तक्रारी करण्यासाठी नागपूरकरांना आता मनपाच्या कार्यालयात जाण्याची गरज नाही. एका क्लिकवर कुणीही व्यक्ती छायाचित्र काढून स्वच्छतेसंदर्भातील तक्रार करू शकतो. नागपूर महानगरपालिकेतर्फे त्याची तातडीने दखल घेऊन ती सोडविण्यात येईल. त्यासाठी तुमच्या मोबाईलवर ‘स्वच्छता ॲप’ डाऊनलोड करणे आवश्यक आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी आणि ‘स्वच्छ नागपूर’च्या दिशेने अग्रेसर होण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनतर्फे आज व्हेरायटी चौकातील इटर्निटी मॉल येथे जनजागृती अभियान राबविण्यात आले.
 
ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी शनिवारी (ता. ९) सकाळी ११ वाजतापासून मॉलमध्ये प्रवेश घेण्याऱ्या प्रत्येक व्यक्तीला याबाबत माहिती दिली. स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘Swachhata MoHUA App’ लॉन्च करण्यात आले आहे. आपल्याजवळील मोबाईलवर हे ॲप डाऊनलोड करायचे. जेथे अस्वच्छता आहे त्या ठिकाणाचे छायाचित्र काढायचे. लोकेशन लिहायचे आणि अपलोड करायचे. ही तक्रार नागपूर मनपाला प्राप्त होईल. मनपाच्या स्वच्छता विभागातर्फे याची तातडीने दखल घेतली जाईल आणि ती अस्वच्छता दूर करण्यात येईल, असे या ॲपचे कार्य आहे. आपण स्वच्छतेबद्दल जागरूक व्हा आणि नागपूर शहराला स्वच्छ, सुंदर करण्यात मदत करा, असे आवाहन स्वयंसेवकांनी केले. नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या आवाहनाला प्रतिसाद देत दिवसभरात सुमारे ८०० नागरिकांनी स्वच्छता ॲप डाऊनलोड केले. ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या वतीने ४ डिसेंबरपासून जनजागृती अभियान हाती घेण्यात आले असून आतापर्यंत सुमारे २४०० नागरिकांनी ॲप डाऊनलोड केले असल्याची माहिती ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी यांनी दिली.
 
नागपूर महानगरपालिकेचे अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या अभियानाला यशस्वी करण्यासाठी ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक कौस्तभ चॅटर्जी, कल्याणी वैद्य, मेहुल कोसुरकर, शीतल चौधरी, लिपीशा कचोरे, पूजा लोखंडे, विष्णूदेव यादव, अभय पौनीकर, विकास यादव यांच्यासह सुमारे २० स्वयंसेवकांनी तसेच मनपाच्या स्वास्थ निरिक्षकांनी अभियानात सहभाग घेतला. इटर्निटी मॉलचे व्यवस्थापक आशीष बारई यांचे नागपूर मनपा व ग्रीन व्हिजीलतर्फे सहकार्याबद्दल आभार मानण्यात आले.  
 
शाळांमध्येही जनजागृती
 
नागपूर शहरातील शाळांमधूनही याबाबत जनजागृती सुरू आहे. शनिवारी नारायणा विद्यालय आणि परांजपे शाळेतील शिक्षक-पालक सभेत ॲप डाऊनलोड करण्यासंदर्भात माहिती देण्यात आली. झोनस्तरावरही विविध ठिकाणी अभियान राबविण्यात आले.

 

 

नागपूर महानगरपालिका व चीनचे जिनान शहर यांच्यात सामंजस्य करार

इंडिया चायना फ्रेन्डशीप असोसिएशनचा पुढाकार
 
नागपूर, ता. ८ डिसेंबर : माहिती तंत्रज्ञान आणि वैद्यकीय उपकरणांच्या उत्पादनासाठी चीनमधील अग्रक्रमांकावर असलेले जिनान शहर आणि नागपूर महानगरपालिका यांच्यात शुक्रवारी (ता. ८ डिसेंबर) मनपा मुख्यालयात सामंजस्य करार झाला.
 
याप्रसंगी कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर, अतिरिक्त आयुक्त आर.झेड. सिद्दीकी, इंडिया चायना फ्रेन्डशीप असोसिएशनचे (आयसीएफए) अध्यक्ष (आल इंडिया) डॉ. जी.एच.फर्नांडिस, आयसीएफए महाराष्ट्र सचिव विशाखा मोरे, नागपूर विभागीय अध्यक्ष सीए सुनील चोखारे, जिनान मुन्सिपल कमिटीच्या अध्यक्षा लि जेई, कार्यकारी सचिव जियांग लिन, जिनान इन्व्हेसमेंट प्रमोशन ब्युरोचे संचालक झांग जून, जिनान फारेन ऍन्ड ओव्हरसिस अफेअर आफिसचे उप संचालक लियु झ्युडांग, जिनान म्युनसिपल कमिटीच्या सेक्शन चिफ सिया फेंग, जिनान फारेन अफेअर भाषांतर केंद्राचे उप संचालक लि यावतिंग यांची उपस्थिती होती. इंडिया चायना फ्रेन्डशीप असोसिएशनतर्फे यासाठी पुढाकार घेण्यात आला होता. या सामंजस्य करारानुसार चीनमध्ये आयटी क्षेत्र, आयटी मॅन्युफॅक्चरिंगसाठी ओळखल्या जाणा-या जिनान शहरासोबत माहिती तंत्रज्ञान आणि आयटी उत्पादनाच्या तंत्रज्ञान, इन्फ्रा, संस्कृती आणि युथ एक्सचेंग कार्यक्रम राबविण्यात येईल.

 

 

उपद्रव शोध पथकाला द्या अतिक्रमण हटविण्याचा अधिकार

सभापती मनोज चापले यांची सूचना : आरोग्य समितीची आढावा बैठक
 
नागपूर,ता.७ : नागपूर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी शहरात कचरा करणाऱ्या उपद्रव मूल्यांवर वचक ठेवण्याच्या हेतूने उपद्रव शोध पथकाची स्थापना करण्यात आली. यामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना अतिक्रमण हटविण्याचाही अधिकार देण्यात यावा, अशी सूचना वैद्यकीय सेवा व आरोग्य समितीचे सभापती मनोज चापले यांनी केली.
 
नागपूर महानगरपालिकेच्या वैद्यकीय सेवा व आरोग्य समितीची बैठक गुरूवारी (ता.७) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात पार पडली. सदर बैठकीत ते बोलत होते.
 
यावेळी उपसभापती प्रमोद कौरती, सदस्य लखन येरावार, विजय चुटेले, सदस्या भावना लोणारे, वंदना चांदेकर, नगरसेवक मनोज सांगोळे, आरोग्य अधिकारी (दवाखाना) डॉ.अनिल चिव्हाने, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जोशी, हिवताप व हत्तीरोग विभाग प्रमुख जयश्री थोटे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
या बैठकीत मागील महिन्याच्या सभेच्या कार्यवाहीला मंजुरी देण्यात आली. कनक रिसोर्स मॅनेजमेंट कंपनीला दिलेल्या कंत्राटाबद्दल चर्चा करण्यात आली. कोणतीही प्रक्रिया करण्यापूर्वी समितीला सूचित करण्यात यावे, असे आदेश सभापती चापले यांनी दिले. नगरसेवक मनोज सांगोळे यांनी प्रभागातील स्वच्छता कर्मचारी वाढविण्याबाबत विचारले असता, आरोग्य अधिकारी डॉ.दासरवार यांनी कर्मचारी भरती प्रक्रिया ही प्रगतीपथावर असल्याची माहिती दिली. नगरसेवकांच्या सर्व तक्रारींचे निराकरण त्वरित करण्यात यावे, असे निर्देश सभापती चापले यांनी दिले.
 
मनपाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या दवाखानाच्या कामकाजाबद्दल चर्चा यावेळी करण्यात आली. डॉक्टर्सचे वेळापत्रक, दवाखान्याची वेळ दर्शनी भागात लावण्यात यावे, असे आदेश सभापती चापले यांनी दिले. हिवताप व हत्तीरोग विभाग प्रमुख जयश्री थोटे यांनी विभागाद्वारे करण्यात येणाऱ्या फवारणीची माहिती दिली. याबाबत बोलताना चापले म्हणाले, १५ दिवसाचे परिपत्रक काढण्यात यावे. प्रत्येक कार्यवाहीची सूचना स्थानिक नगरसेवकांना देण्यात यावी, असे आदेश चापले यांनी दिले.
 
मनपाद्वारे नियुक्ती करण्यात आलेल्या उपद्रव शोध पथकाबाबतही आढावा यावेळी घेण्यात आला. त्याबाबत माहिती देताना डॉ.दासरवार म्हणाले, एकूण ८७ पैकी ४७ कर्मचारी रूजू झाले आहेत. प्रत्येक झोनमध्ये प्रत्येकी चार असे कर्मचारी सद्यस्थितीत नेमण्यात आले आहे. त्यांच्याकडे पावतीपुस्तक देण्यात आले आहे. त्यामागे कुठल्याही उपद्रवासाठी किती दंड आकारण्यात आला ते देखील नमूद करण्यात आले आहे. पथकांना अतिक्रमण हटविण्याचे अधिकार देण्यात यावे, अशी सूचना सभापती मनोज चापले यांनी केले.
 
मनपाद्वारे नव्याने घेण्यात येणार असलेल्या मशीन्सबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. मनपाने टाटा ट्रस्ट सोबत केलेल्या सामंजस्य कराराची माहिती आरोग्य अधिकारी डॉ.अनिल चिव्हाने यांनी दिली. यावेळी दहाही झोनचे झोनल अधिकारी उपस्थित होते.

 

 

नागरिकांच्या पाण्यासंबधीच्या तक्रारी तातडीने सोडवा : राजेश घोडपागे

जलप्रदाय समितीची आढावा बैठक
 
नागपूर,ता.५ : नागरिकांच्या दूषित पाण्यासंबंधीच्या तक्रारी वारंवार येत आहेत. पाण्यासंबंधीच्या तक्रारी तातडीने सोडविण्याचे निर्देश जलप्रदाय समिती सभापती राजेश घोडपागे यांनी दिले. मंगळवारी (ता.५) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात जलप्रदाय समितीची आढावा बैठक पार पडली.
 
यावेळी समितीचे उपसभापती महेंद्र धनविजय, सदस्या रूपाली ठाकूर, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, जनरल मॅनेजर पी.एस.राजगिरे, डी.पी.टिपणीस, ओसीडब्लूचे के.एम.पी.सिंह, राहुल कुळकर्णी, अझीझ रहमान प्रामुख्याने उपस्थित होते.
 
यावेळी मान्यवरांनी दूषित पाण्यासंदर्भातील झोननिहाय आढावा जाणून घेतला. यामध्ये लक्ष्मीनगर झोनमध्ये एक तक्रार, धरमपेठ झोनमध्ये आठ, हनुमाननगर झोनमध्ये दोन, नेहरूनगर झोनमध्ये चार, गांधीबाग झोनमध्ये तीन, सतरंजीपुरा झोनमध्ये पाच, लकडगंज झोनमध्ये तीन, आसीनगरमध्ये पाच, मंगळवारी झोनमध्ये आठ तक्रारी आतापर्यंत आल्या असल्याची माहिती ओसीडब्लूच्या अधिकाऱ्यांनी दिली. या सर्व तक्रारी दोन महिन्यांच्या आत सोडविण्यात याव्या, असे आदेश सभापती राजेश घोडपागे यांनी दिले.
 
काही भागात रस्त्याचे काम सुरू आहे, अथवा पाईपलाईन दुरूस्तीचे काम सुरू असल्यामुळे पिण्याचे पाणी दूषित येत आहे. त्यावर बोलताना सभापती म्हणाले, संबंधित अधिकाऱ्याने जागेवर भेट देऊन पाहणी करावी. अडचणी असल्यास त्या तातडीने निकाली काढण्याचे आदेश सभापती घोडपागे यांनी दिले. यानंतर समितीने लो प्रेशर, थकीत पाणी बिलाची वसुली यासंदर्भातील आढावा घेतला. थकीत पाणी बिलाची वसुली तातडीने करण्यात यावी, असे आदेशही सभापती घोडपागे यांनी दिले. बैठकीमध्ये पाणी पुरवठा व वितरण व्यवस्थेचा आढावाही घेण्यात आला. बैठकीला ओसीडब्लूचे अधिकारी व डेलिगेटस्‌ उपस्थित होते.

 

 

ऊर्जा बचतीच्या यज्ञात प्रत्य़ेकाची आहुती गरजेची – आमदार प्रा. अनिल सोले

- मनपा व ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या वतीने पोर्णिमा दिवस साजरा
 
नागपूर, ता. 4: पर्यावरण संवर्धन आणि येणा-या पिढीसाठी ऊर्जाबचत करणे गरजेचे आहे. ऊर्जाबचतीसाठी नागपूर महानगरपालिका व ग्रीन व्हिजील फाऊंडेशन ऊर्जा बचतीसाठी पोर्णिमा दिनानिमित्त अनावश्यक दिवे बंद ठेवण्यासाठी नागरिकांना आवाहन करत आहे, तसेच शहरात विविध ठिकाणी पोर्णिमा दिवस साजरा करण्यात येत असल्याने ऊर्जेची बचत होत असल्याची नोंद मनपा विद्युत विभागाकडे आहे. ऊर्जा बचतीच्या या यज्ञात प्रत्येकाची आहुती गरजेची असल्याचे मत आमदार व माजी महापौर प्रा. अनिल सोले यांनी व्यक्त केले.
 
पोर्णिमा दिनानिमित्त सीताबर्डी येथील व्हेरायटी चौक येथे नागपूर महानगरपालिका व ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या वतीने परिसरातील प्रतिष्ठाने, चौकातील दिवे आदी विद्युत उपकरणे बंद ठेवून पोर्णिमा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी स्वयंसेवकांनी सिग्नलवर उभ्या राहणा-या वाहन चालकांनाही या दिनानिमित्त आयोजित उपक्रमाची माहिती देऊन सहभागी होण्यासाठी आवाहन केले. नागरिकांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रसंगी प्रामुख्याने भोलानाथ सहारे, विद्यूत विभागाचे ए.एस.मानकर, ग्रीन व्हिजील संस्थेचे कौस्तव चॅटर्जी, सुरभी जयस्वाल, कल्याणी वैद्य, मेहूल कोसुरकर, विकास यादव, स्मिताली उईके यांच्यासह अनिल झोडे, हर्षा जोशी, रुपेश तांदुरकर, प्रमोद जाधव, अब्दुल शेख, नितीन जोशी यांची उपस्थिती होती.

 

 

‘स्काय वॉचिंग’ने अपूर्व विज्ञान मेळाव्याचा समारोप

१२० प्रयोग : मनपा शाळेतील विद्यार्थ्यांनी उलगडले विज्ञान विश्व
 
नागपूर, ता. ४ : नागपूर महानगरपालिका आणि असोसिएशन फॉर रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २० व्या अपूर्व विज्ञान मेळाव्याचा समारोप पोर्णिमा दिनानिमित्त स्काय वॉचिंगद्वारे रविवारी (ता. ३) करण्यात आला. या पाच दिवसीय मेळाव्यात देशभरातून वैज्ञानिक, प्रोफेसर आणि शिक्षकांसह विविध राज्यातील प्रतिनिधींनी भेट दिली. मेळाव्याचा लाभ सुमारेएक लाखांवर विद्यार्थी आणि पालकांनी घेतला. रविवारी छत्तीसगढ येथील योजना आयोगाचे अध्यक्ष चंद्रशेखर ऱाहू यांनी भेट देऊन मनपा शाळेतील विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
 
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या विकासासाठी आणि बेसिक सायन्सची माहिती साध्या प्रयोगाद्वारे सर्वांना व्हावी या उद्देशाने १९वर्षांपूर्वी या मेळाव्याची सुरुवात झाली होती. यावर्षी मनपाच्या ३० माध्यमिक शाळांतील सुमारे २०० विद्यार्थ्यांनी १२० प्रयोगांचे सादरीकरण केले. विज्ञानासोबतच हायड्रोफोनिक्स वनस्पती, किडनी, ब्रेन आदींचे लाईव्ह डेमो बघण्याची संधी उपस्थितांना देण्यात आली. मेळाव्यात अमरावती, गोंदिया, भंडारा, सौंसर आदी भागातील शाळेतर्फे विद्यार्थ्यांसाठी ‘सायंटिफिक सहली’चे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यादरम्यान पथनाट्याद्वारे विज्ञानाबद्दल जनजागृती, तसेच पूर्ण वेळ प्रश्न मंजुषाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांसह पालकांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून विज्ञानाच्या प्रश्नांची उत्तरे देत शाळेतील दिवस आठवले. मेळाव्यात मनोरंजक पद्धतीने शरीरातील विविध अवयव, ज्वालामुखी आदींचे क्राफ्ट सादर करण्यात आले. शिबिराचे समन्वयक राजेंद्र पुसेकर होते. विज्ञान शिक्षिका ज्योती मेडपीलवार, पुष्पलता गावंडे, दीप्ती बिस्त, नीलिमा आढाऊ, नीता गडेकर, संगीता कुळकर्णी, मनिषा मोगलेवार, सुनीता झरबडे आदींनी परीश्रम घेतले. 

 

 

डॉ. राजेंद्र प्रसाद जयंतीनिमित्त मनपातर्फे अभिवादन

नागपूर, ता. ३   :  स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी सकाळी टेलिफोन एक्स्चेंज चौक स्थित डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या प्रतिमेला मनपातर्फे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी मनपाच्या वैद्यकीय सेवा व आरोग्य समितीचे सभापती मनोज चापले, नगरसेविका श्रद्धा पाठक, प्रदीप पलांदुरकर, किशोर शिरपूरकर उपस्थित होते. डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या वेशभूषेत असलेले सर्जेराव गळपट.सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

 

 

थकीत वसुली त्वरित करा : महापौर नंदा जिचकार

बाजार विभागाचा घेतला आढावा : अकार्यक्षमतेवर ओढले ताशेरे
 
नागपूर,ता. २ :  नागपूर महानगरपालिकेच्या विविध विभागांचा आढावा महापौरांद्वारे घेणे सध्या सुरू आहे. शनिवारी (ता.२) महापौर नंदा जिचकार यांनी बाजार विभागाचा आढावा मनपा मुख्यालयातील महापौर कक्षात घेतला. यावेळी स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते.
 
बैठकीत बोलताना महापौर म्हणाल्या, महापालिकेच्या बाजारच्या माध्यमातून करण्यात येणारी जी वसुली थकीत आहे ती तातडीने करा, असे निर्देश दिले. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी बकाया रक्कग लवकरात लवकर वसूल करण्यात यावी, असेही महापौर म्हणाल्या.
 
यानंतर महापौरांनी कर वसुली संदर्भातील आढावा अधिकाऱ्यांकडून घेतला. करप्रणालीतील अडथळे दूर करून त्यात सुधारणा करण्यात याव्या, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.
 
हॉकर्स संदर्भात महापौरांनी यावेळी आढावा घेतला. शहरात लवकर हॉकर्स झोन तयार करण्यात यावे, सर्वेक्षण करून जागा शोधण्यात याव्यात, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. रिंग रोड, हायवेवरील हॉकर्स हटवून त्यांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याबाबत विचार करण्यात यावा, अशी सूचनादेखिल केली. कामातील सर्व त्रुटी दूर करण्याचे निर्देशित केले. हॉकर्सचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्यात यावी, अशी सूचना केली. शहरातील पार्किंगसंदर्भातही मनपा लवकरच धोरण ठरवेल, असेही त्या बोलताना म्हणाल्या.
 
बैठकीला सहायक अधीक्षक नंदकिशोर भोवते, निरिक्षक रोडके यांच्यासह बाजार विभागाचे कर्मचारी व अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. 

 

 

महापौर नंदा जिचकार यांनी केले ‘हायटेक जिम’चे लोकार्पण

नागपूर, ता. २ : स्थानिक इंद्रप्रस्थ ले-‌आऊटमधील इंद्रधनू उद्यानातील नवनिर्मित ‘हायटेक जिम’चे लोकार्पण महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आले.
 
यावेळी मनपाचे शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, संस्थेचे अध्यक्ष प्रा. एम. यू. कडू उपस्थित होते. लोकार्पणानंतर बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, इंद्रधनू उद्यानात योग केंद्र, वॉकिंग ट्रॅक पूर्वीपासूनच आहेत. आता यामध्ये ‘हायटेक जिम’ची भर पडली आहे. अशा प्रकारचे कार्य हे लोकांच्या सहकार्याने होते. जनतेच्या सहकार्यातूनच विकास होतो याचे हे जिवंत उदाहरण आहे, असे म्हणत त्यांनी जिमसाठी परिश्रम घेणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.
 
तत्पूर्वी संस्थाध्यक्ष प्रा. एम. यू. कडू यांनी प्रास्ताविक केले. उद्यानात असलेले योग केंद्र, सांस्कृतिक भवन, वॉकिंग ट्रॅक यांची देखभाल करणे ही मोठी समस्या होती. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर ही समस्या मांडल्यावर त्यांनी ‘हायटेक जिम’ची संकल्पना मांडली. यातून येणाऱ्या मिळकतीतून इतर केंद्रांचा खर्च करण्याचे त्यांनी सांगितले. इतकेच नव्हे तर त्यांनी हायटेक जितसाठी आमदार निधीतून १५ लाख रुपये मंजूर करून दिले. नागपूर सुधार प्रन्यासच्या माध्यमातून जिमसाठी हॉल तयार झाला तर नागपूर महानगरपालिकेने विद्युतीकरणाचे कार्य करण्यास सहकार्य केल्याचे सांगितले. या विभागाच्या विकासासाठी महापौर ननदा जिचकार यांचे प्रारंभापासूनच सहकार्य आहे. नगरसेविका पल्लवी श्यामकुळे आणि प्रा. गिरीश देशमुख यांच्यासह हेमंत जवादे, गिरधर, डॉ. तिडके, श्री. भसीन, अजय बनसोड, श्री. मुंगये, श्री. मारोतकर यांनीही या निर्माणात बहुमूल्य सहकार्य केल्याचा उल्लेख त्यांनी केला. आभार संस्थेचे सचिव डॉ. अनिल भुते यांनी मानले.

 

 

फ्रान्सचे पत्रकार ग्युल्लाम डेलाक्रॉएक्स यांची मनपाला भेट

नागपूर,ता.२९ : फ्रान्स मधील अग्रक्रमांकावरील ले-मॉनडे या वृत्तपत्राचे पत्रकार ग्युल्लाम डेलाक्रॉएक्स यांनी बुधवार (ता.२९) नागपूर महानगरपालिकेला भेट दिली. महापौर नंदा जिचकार व स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रामनाथ सोनवणे यांच्याशी डेलाक्रॉएक्स यांची भेट घेऊन नागपूर स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या विविध प्रकल्पांबाबत चर्चा केली.
 
नागनदी स्वच्छता अभियान, बायोइथेनॉल बसेस, सोलर ऊर्जा याबाबत नागपुरात सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी त्यांना दिली. नागपुरात सुरू असलेल्या उपक्रमांचे डेलाक्रॉएक्स यांनी कौतुक केले. यावेळी महापौरांनी तुळशीचे रोप व मनपाचे स्मृतीचिन्ह भेट देऊन ग्युल्लाम डेलाक्रॉएक्सचा सत्कार केला.
 
यावेळी शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, राजीव बेहेल उपस्थित होते.
 

 

गरजू महिलांना मिळणार पिको फॉल मशीन
 
सभापती वर्षा ठाकरे : महिला व बाल कल्याण समितीची आढावा बैठक
 
नागपूर,ता.२९ : नागपूर महानगरपालिकेच्या महिला व बाल कल्याण विभागाद्वारे गरजू व गरीब महिलांना पिको-फॉल, काचबटन मशीन्स देण्याचा निर्णय महिला व बाल कल्याण समितीच्या आढावा बैठकीत घेण्यात आला.
 
बुधवारी (ता.२९) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात सदर बैठक पार पडली. यावेळी महिला व बाल कल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे, उपसभापती श्रद्धा पाठक, समितीच्या सदस्या वंदना भगत, जिशान मुमताज मो. इरफान अंसारी, वैशाली नारनवरे, उपायुक्त डॉ.रंजना लाडे प्रामुख्याने उपस्थित होत्या.
 
शहरातील गरीब व गरजू महिलांना काचबटन मशीन्स वाटण्याची मागणी होती. त्याप्रमाणे महिला व बाल कल्याण विभागाच्या बजेटमध्ये त्यासाठी प्रावधान करण्यात आलेले आहे. आतापर्यंत १४७ लाभार्थी महिलांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यापैकी ६८ लाभार्थी महिलांच्या खात्यात मशीन्सचे पैसे टाकण्यात आले आहे. मशीन वाटप हे प्रभागनिहाय करण्यात यावे व गरजू महिलांना प्राधन्याने मशीन वाटप करण्यात यावे, असे आदेश सभापती वर्षा ठाकरे यांनी दिले.
 
सामूहिक विवाह करण्याबाबतच्या विषयावर बैठकीत चर्चा करण्यात आली. यावर बोलताना ठाकरे म्हणाल्या, नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील गरजू व बीपीएल कुटुंबातील मुलींची नावे समितीला सुचवावी. महानगरपालिकेच्या शाळेत सॅनेटरी नॅपकीन मशीन लावण्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. महानगरपालिकेच्या २९ माध्यामिक शाळा आहेत. प्रत्येक शाळांमध्ये एक मशीन असे अपेक्षित आहे. आतापर्यंत प्रत्येक झोनअतंर्गत एक अशा दहा मशीन्स लावण्यात आलेल्या आहे, अशी माहिती शिक्षण विभागाद्वारे देण्यात आली.
 
महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थी दुर्बल घटकातील असून तो आजारी झाल्यास किंवा त्याच्या पालकाचा मृत्यू झाल्यास त्या विद्यार्थिनींना आरोग्यप्रतीपूर्ती (मेडीकल क्लेम) सुविधा देण्याच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. विद्यार्थांचे ग्रुप इंन्शुरन्स काढण्याबाबत नामांकित कंपन्यांशी बोलून ठरविण्यात यावे, असे आदेश ठाकरे यांनी दिले. बैठकीला समाज कल्याण विभागाचे चंद्रशेखर पाचोडे, विकास बागडे, शारदा गडेकर उपस्थित होते..

 

‘अपूर्व विज्ञान मेळाव्या’चे थाटात उद्‌घाटन
 
महापौर नंदा जिचकार यांनी केले विद्यार्थ्यांचे कौतुक : देशभरातील विज्ञानप्रेमींची उपस्थिती
 
नागपूर,ता. २९ : मागील २० वर्षांपासून अविरत आयोजित होत असलेला नागपुरातील विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांच्या आवडीच्या ‘अपूर्व विज्ञान मेळाव्या’चे उद्‌घाटन महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते झाले. नागपूर महानगरपालिका व असोसिएशन फॉर रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने उत्तर अंबाझरी मार्गावरील राष्ट्रभाषा प्रचार समिती येथे आयोजित या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सर्व प्रयोगांची माहिती घेत महापौरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
 
उद्‌घाटनप्रसंगी महापौर नंदा जिचकार यांच्यासह मनपा आयुक्त अश्विन मुदगल, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे, विधी समितीच्या सभापती ॲड. मिनाक्षी तेलगोटे, स्थापत्य व प्रकल्प समितीचे सभापती संजय बंगाले, धरमपेठ झोन सभापती रूपा राय, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक निशांत गांधी, नगरसेविका पल्लवी शामकुळे, सोनाली कडू, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांच्यासह असोसिएशन फॉर रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन, नागपूरचे सुरेश अग्रवाल, राजाराम शुक्ला, समर बागची, राजू मिश्रा, हरिश अड्याळकर, परमजित सिंग, राजू लाटा, अश्विन पांडे, प्रणिता खान, विज्ञान मेळाव्याचे समन्वयक कपिलनगर शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पुसेकर यांची उपस्थिती होती.
 
फीत कापून उद्‌घाटन केल्यानंतर महापौर नंदा जिचकार आणि अन्य मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सर्व प्रयोगांच्या स्टॉल्सला भेट दिली. कुतुहलाने त्यांनी सर्व प्रयोगांविषयी माहिती घेतली. विद्यार्थ्यांना शाबासकी देत त्यांच्यातील कुशाग्र बुद्धीचे कौतुक केले. मेळाव्याचे यशस्वीतेसाठी मनपा शिक्षण विभागाच्या ज्योती मेडपीलवार, पुष्पा गावंडे, नीलिमा अढाऊ, संगीता कुळकर्णी, नीता गडेकर, मनिषा मोगलेवार, सुनीता झरबडे आदी सहकार्य करीत आहेत.
 
बिहार, कलकत्ता, कर्नाटकचे सादरीकरण
विज्ञान विषयात रूची असणारे आणि या विषयाला हसत-खेळत विद्यार्थ्यांसमोर ठेवणाऱ्या बिहार, कलकत्ता, कर्नाटक येथील काही शिक्षकांनाही अपूर्व विज्ञान मेळाव्यात आमंत्रित करण्यात आले आहे. कलकत्ता येथून आलेले ऋषेंद्रु चक्रवर्ती हे अगदी रोजच्या वापरातील वस्तूंमधून ‘बल’ (force) कसे तयार होते, याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देत आहेत. कर्नाटक येथील चिकमट सी. एस. यांनी स्वत:च्या कल्पकतेतून भौतिकीय खेळ तयार केले असून विद्यार्थ्यांना सहज समजेल, असे ते आहेत. मध्यप्रदेशातील ग्वालियर येथून आलेले राजनारायण राजोरिया प्रतिमांच्या माध्यमातून गणितीय प्रमेय विद्यार्थ्यांना समजावून सांगत आहेत. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते ‘जादूटोण्यामागील विज्ञान’ सांगत शासनाने अंधश्रद्धेविरोधात केलेल्या कायद्याची माहिती देत आहेत. नेचर क्लब ऑफ पटनाच्या स्टॉलवरून ओला आणि सुखा कचरा कसा विभक्त करायचा, याबाबत माहिती दिली जात आहे.
 
पथनाट्यातून जनजागृती
राष्ट्रभाषा प्रचार समिती परिवारातील सांस्कृतिक विंगच्या कलावंतांनी ‘खेल कूद का विज्ञान’ हे पथनाट्य सादर करीत विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांनीही या पथनाट्याला भरभरून दाद दिली. अगदी आपल्या रोजच्या कार्यात विज्ञान कसे असते याबाबत हसत खेळत विद्यार्थ्यांना माहिती दिली.
 
१ डिसेंबरपासून प्रश्नमंजुषा
२९ ते ३ डिसदेंबर दरम्यान चालणाऱ्या अपूर्व विज्ञान मेळाव्यात सहभागी सर्वांसाठी प्रश्नमंजुषा राहणार आहे. दिल्ली येथील विज्ञान प्रसार केंद्राचे सहकारी मेळाव्यात सहभागी होत असून १ ते ३ डिसेंबरदरम्यान ही प्रश्नमंजुषा राहील.
 
राज्याबाहेरील विद्यार्थीही देणार भेट
सन १९९८ पासून दरवर्षी अविरत सुरू असलेल्या अपूर्व विज्ञान मेळाव्याची ख्याती देशभरात झाली आहे. विविध राज्यातील शिक्षक मनपा शाळेतील विद्यार्थ्यांसोबत आपल्या प्रयोगासह यात सहभागी होत असतात. यावर्षी परराज्यातील विद्यार्थीही मेळाव्यातील प्रयोग बघण्यासाठी सहभागी होणार आहेत. छत्तीसगड राज्यातील राजनांदगाव येथील विद्यार्थी मेळाव्याला भेट देणार आहेत. अमरावतीमधील सुमारे ४० शिक्षकही भेट देणार आहेत. सदर मेळाव्यात मनपा शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रयोगाचे सादरीकरण बघण्यासाठी आणि जाणून घेण्यासाठी नागपूर शहरातील सर्वच शाळांतील विद्यार्थी भेट देणार आहेत. रविवार ३ डिसेंबर रोजी पालकांसाठीही मेळावा खुला राहील, अशी माहिती मनपाच्या शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी दिली.

 

 

बुधवारी अपूर्व विज्ञान मेळाव्याचे उद्‌घाटन

नागपूर,ता.२८ : नागपूर महानगरपालिका आणि असोसिएशन फॉर रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर दरम्यान ‘अपूर्व विज्ञान मेळाव्या’चे आयोजन उत्तर अंबाझरी मार्गावरील राष्ट्रभाषा भवन येथे करण्यात आले आहे.
 
मेळाव्याचे उद्‌घाटन बुधवारी (ता. २९) दुपारी १२ वाजता महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते होईल. यावेळी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती संदीप जाधव, सत्ता पक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त अश्विन मुदगल, माजी महापौर प्रवीण दटके, माजी सत्तापक्ष नेते व ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे, धरमपेठ झोनच्या सभापती रूपा राय, स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती संजय बंगाले, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक सुनील हिरणवार, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, अतिरिक्त आयुक्त डॉ. आर. झेड. सिद्दिकी उपस्थित राहतील. मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन उपायुक्त डॉ. रंजना लाडे, एआरटीबीएसईचे सचिव सुरेश अग्रवाल, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी केले आहे.

 

नागरिकांशी सौजन्याने वागा..महापौरांनी दिल्या सूचना : ‘उपद्रव शोध पथक’ तैनात

नागपूर,ता.२७ : स्वच्छतादूत म्हणून तुमची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांशी सौजन्याने वागा. आपला संयम कायम ठेवत काम करावे, अशा सूचना महापौर नंदा जिचकार यांनी महानगरपालिकेत नव्याने रूजू झालेल्या स्वच्छतादूतांना दिल्या.
 
सोमवार (ता. २७.) महाल येथील राजे रघुजी भोसले नगर भवनात आयोजित उपद्रव शोध प्रतिबंधक कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त अश्विन मुदगल, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार प्रामुख्याने उपस्थित होते.
 
पुढे बोलताना महापौर म्हणाल्या, स्वच्छतादूत नेमण्याचा ठराव मनपा सभागृहात पारीत झाला होता. त्यावेळी या पदाकरिता सेनेतील व्यक्तींचीच भरती करण्यात यावी, असेही ठरविण्यात आले होते. ज्या पद्घतीने आपण सेनेत काम करीत होता त्याच पद्धतीने येथे कामे करायची आहेत. नागरिकांना शिस्त लागावी, यादृष्टीने कार्य करायचे आहे. काम करताना सकारात्मकता बाळगा, असा सल्ला महापौरांनी दिला. मनपा प्रशासनासोबत समन्वय साधत काम करा. या कार्याकरिता मनपाद्वारे गणवेश दिला जाईल, त्या गणवेशाचा दरारा व लौकिक कायम ठेवा, अशी अपेक्षाही व्यक्त करीत महापौरांनी त्यांना पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या
 
सत्तापक्ष नेते संदीप जोशी म्हणाले, सेनेतील सैनिकांचे काम हे चोख व शिस्तबद्ध असते हे समाजातील प्रत्येक नागरिकांना माहिती आहे. नागरिकांना शिस्त लागावी, यासाठी ही नियुक्ती असल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांवर कारवाई करण्यापूर्वी यासंदर्भातील जनजागृती करावी, पत्रके वाटून पूर्वसूचना देण्यात यावी, असा सल्लासुद्धा त्यांनी दिला. आपल्या वागणुकीवर महानगरपालिकेची पत अवलंबून असल्याचे त्यांनी सांगितले.
 
यावेळी बोलताना आयुक्त अश्विन मुदगल म्हणाले, २०१६ मध्ये स्वच्छ सर्वेक्षणात नागपूरची घसरण झाली, त्यानंतर यासंदर्भातील विषयावर मंथन झाले. विविध  विषयांवर चर्चा झाली. चर्चेअंती हा निर्णय घेण्यात आला. शहराच्या नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी शिस्त नाही आणि मनपाचे  स्वच्छतेबाबतचे धोरण अतिशय कडक आहे. याला शहराचे नागरिक छेद देताना दिसून येत असल्याचे आढळत आहे. यासर्वांवर आळा घालण्यासाठी ‘उपद्रव शोध पथक’ तैनात करण्याचा निर्णय मनपाने घेतला आहे. नागरिकांना शिस्त लावण्यात यावी. आपली विवेकबुद्धी जागृत ठेवून कामे करावी. या स्वच्छतादूतामुळे आपण शहर स्वच्छ ठेवण्यात यशस्वी होऊ शकतो, असा विश्वास आयुक्त अश्विन मुदगल यांनी व्यक्त केला.  
 
प्रास्ताविक अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर यांनी केले. उपद्रव शोध पथकामध्ये ८७ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरात दिसणाऱ्या विविध उपद्रवांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
 
कार्यक्रमाचे संचालन व आभार आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीप दासरवार यांनी केले. यावेळी दहाही झोनचे आरोग्य विभागाचे झोनल अधिकारी उपस्थित होते.

 

 

आमदारांनी जाणून घेतली ‘स्मार्ट सिटी प्रकल्पा’ ची माहिती

एबीडी आणि नाग नदी विकास प्रकल्पाचे सादरीकरण
 
नागपूर, ता. २७ : स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती सोमवारी (ता. २७) आमदारांनी जाणून घेतली तसेच प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती आणि भविष्यातील नियोजनावर यावेळी स्मार्ट सिटी प्रकल्पांच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
 
महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीला आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार गिरीश व्यास, आयुक्त अश्विन मुदगल, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, लकडगंज झोनचे सभापती दीपक वाडीभस्मे, नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्सचे सहसचिव फारूखभाई अकबानी, गैरशासकीय संस्थेच्या लिना बुधे यांची यावेळी उपस्थिती होती.
 
प्रारंभी आयुक्त अश्विन मुदगल यांनी आमदार महोदयांचे स्वागत करीत स्मार्ट सिटी प्रकल्पातील विविध कार्याची माहिती दिली. स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांनी आमदार महोदयांना स्मार्ट सिटी प्रकल्पात सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. एरिया बेस्ड डेव्हलपमेंट अंतर्गत सध्या पारडी, भरतवाडा, पुनापूर या क्षेत्रात सध्या नगररचना परियोजना तयार करण्याचे कार्य प्रगतीपथावर असून मार्च २०१८ ते जून २०१८ मध्ये प्रत्यक्ष कार्यास सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मार्च २०१९ पर्यंत मुख्य दोन प्रकल्पाचे कार्य पूर्ण होईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
 
यानंतर एबीडी प्रकल्प व नाग नदी विकास संदर्भात संबंधित एजन्सीच्या प्रतिनिधींनी सादरीकरण केले. महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेले प्रकल्प महत्त्वाकांक्षी असून सर्व प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर आहे. आपण स्वत: त्यावर लक्ष ठेवून असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विविध मुद्यांवर आमदार कृष्णा खोपडे आणि आ. प्रा. अनिल सोले यांनी चर्चा केली. स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेली कामे हा नागरिकांच्याही जिव्हाळ्याचा विषय असून नागरिकांना विश्वासात घेऊन सर्व कामे पूर्णत्वास न्यावी. जिथे अडचण येईल, तेथे आम्ही पूर्ण मदत करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
 
प्रारंभी महापौर नंदा जिचकार यांनी तुळशीचे रोपटे देऊन आमदार महोदयांचे स्वागत केले. डॉ. रामनाथ सोनवणे यांनी आभार मानले.

 

संविधान दिनानिमित्त डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून मनपातर्फे अभिवादन

नागपूर, ता. २६: भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानाची प्रत राष्ट्राला अर्पण केली. त्याप्रीत्यर्थ नागपूर महानगरपालिकेतर्फे स्थायी समिती सभापती संदीप जाधव, माजी महापौर व आमदार प्रा.अनिल सोले यांनी संविधान चौक स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचनही करण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय सफाई कामगार आयोगाचे सदस्य दिलीप हाथीबेड, नगरसेवक ॲड. धम्मपाल मेश्राम, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, नगर सेवक सर्वश्री सुनील हिरणवार, जितेंद्र घोडेस्वार, किशोर जिचकार, नरेंद्र वालदे, नगरसेविका पल्लवी श्यामकुळे, ॲड. मिनाक्षी तेलगोटे, मनपाचे जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, मनपा कर्मचारी संघाचे कार्याध्यक्ष राजेश हाथीबेड, अशोक मेंढे, सतीश सिरसवान, भोलानाथ सहारे, बबली मेश्राम, मो. जमील अन्सारी, सुनील शंकर, विजय भैसारे, अजय झंझोटे, सुभाष पारधी, अजय करोसिया आदी उपस्थित होते.

 

 

कर वसुलीसाठी महापौरांचा आक्रमक पवित्रा

स्थायी समिती सभापतींनी फटकारले : आयुक्तांनीही दिला अधिकारी-कर्मचाऱ्यांना अल्टीमेटम

नागपूर,ता. २५ :  कर वसुलीच्या संथ गतीमुळे डबघाईस आलेल्या मनपाच्या आर्थिक स्थितीला गांभीर्याने घेत महापौर नंदा जिचकार यांनी आज आक्रमक पवित्रा घेतला. शासकीय सुटीचा दिवस असतानाही पदाधिकारी आणि आयुक्तांसह संबंधित सर्व झोनमधील सहायक आयुक्त आणि अधिकाऱ्यांची मॅरॉथॉन बैठक घेतली. कर वसुलीत हयगय यापुढे खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा देत थकबाकी आणि चालू कर वसुली ३१ मार्च २०१८ पर्यंत करण्याचे निर्देश दिले.

या गाजलेल्या बैठकीत महापौर नंदा जिचकार यांच्यासह स्थायी समितीचे सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त अश्विन मुदगल, अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, अतिरिक्त आयुक्त डॉ. आर. झेड. सिद्दिकी, उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, स्थावर अधिकारी आणि दहाही झोनचे सहायक आयुक्त उपस्थित होते.

ज्या गतीने सध्या कर वसुली सुरू आहे त्या गतीने यापुढेही राहिली तर स्थायी समितीने दिलेले उद्दिष्ट गाठणे कठीण होईल. थकबाकीदारांकडून बकाया रक्कम वसूल करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने ‘अभय योजना’ राबविली. नागरिकांना संधी देण्यात आली. या योजनेअंतर्गत करावरील शास्तीला ९० टक्क्यांपर्यंत माफी देण्यात आली होती. या योजनेचाही ज्यांनी लाभ घेतला नाही अशा बकायाधारकांच्या स्थावर व जंगम मालमत्ता जप्ती करून त्याची विक्री करण्यात यावी आणि कराची रक्कम दंडासहीत वसूल करण्याचे निर्देशही महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

मायक्रोप्लानिंग करा, १३० दिवसांत वसुली करा
महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, आता कुठलीही हयगय चालणार नाही. आर्थिक वर्ष संपण्यासाठी १३० दिवस शिल्लक आहेत. मायक्रोप्लानिंग करून या १३० दिवसाचे नियोजन करा. सोमवारी २७ नोव्हेंबर रोजी ते पदाधिकारी आणि आयुक्तांसमोर ठेवा, असे निर्देश त्यांनी दिले.

प्रत्येक दिवसाच्या वसुलीवर ‘मॉनिटरींग’
मनपातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांपासून अखेरच्या व्यक्तीपर्यंत सर्वांना कामाला लावा. सोमवारपासून दररोज संबंधित विभागप्रमुख आणि उपायुक्त करवसुलीवर ‘मॉनिटरींग’ करेल. आणि प्रत्येक आठवड्याला कोअर कमिटी ‘मॉनिटरींग’ करेल.

थकबाकी आणि चालू करवसुलीचे ५६४ कोटींचे उद्दिष्ट
थकबाकीदारांकडे २३४ कोटी रुपये थकीत आहेत. ह्या वसुलीसोबतच चालू आर्थिक वर्षाची डिमांड तातडीने मालमत्ताधारकांना देण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. झोननिहाय, प्रभागनिहाय, वॉर्डनिहाय ही जबाबदारी विभागून देण्याचे निर्देश देत थकबाकीसोबतच चालू करवसुलीही समांतर करा आणि ३१ मार्च २०१८ पर्यंत एकूण ५६४ कोटींची वसुली करण्याचे कडक निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. यासोबतच नोंदणीकृत व्यावसायिकांच्या सन २०१३-१४ आणि सन २०१४-१५ च्या विवरणपत्राचे निर्धारण ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश एलबीटी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेत. सुमारे ८० हजार डिलर्सला निर्धारण करून डिमांड पाठविण्यात यावी आणि त्याची वसुलीही ३१ मार्च २०१८ पर्यंत करण्याचे निर्देश त्यांनी दिलेत.

बाजार व्यापार शुल्क थकबाकीदारांवरही करा कारवाई
शहरातील अनेक बाजारांमधील वापरकर्त्यांवर बाजार वापर शुल्क थकीत आहे. वेळोवेळी नोटीस देऊनही ते जर शुल्काचा भरणा करीत नसतील तर त्यांच्यावर तातडीने कार्यवाही करा. त्यांच्या ताब्यातील दुकाने मनपाच्या ताब्यात घेऊन ते नव्या दुकानदारांना सोपवा. ही ठोस पावले नाही उचलली तर अंदाजपत्रकात दिलेले उद्दिष्ट गाठणे कठीण होईल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. स्थायी समितीचे सभापती संदीप जाधव आणि सत्ता पक्ष नेते यांनीही अधिकाऱ्यांना कडक शब्दात थकीत कर वसुली संदर्भातील निर्देश दिलेत.

वसुली टक्केवारीच्या तुलनेत वेतन : आयुक्त
या सर्व विषयावर आयुक्त अश्विन मुदगल यांनीही अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. वसुली कर्मचाऱ्यांकडून काम करून घेणे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे काम आहे. ३१ मार्च पर्यंत वसुलीचे उद्दिष्ट साध्य करायचेच आहे. या कामात कुठलीही हयगय चालणार नाही. ज्या टक्केवारीत वसुली राहील यापुढे त्याच टक्केवारीत वेतन मिळेल, असा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
 

 

नेताजी मार्केटमधील समस्या तातडीने दूर करा

आयुक्तांनी दिले अधिकाऱ्यांना निर्देश

नागपूर, ता. २५ : नेताजी मार्केट येथील फूल व्यावसायिकांना ज्या-ज्या अडचणी आहेत, त्या तातडीने दूर करा. परिसरातील दुर्गंधीवर उपाय शोधा. कचऱ्याची विल्हेवाट नियमितपणे लावा, असे निर्देश नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अश्विन मुदगल यांनी दिले.

नेताजी मार्केट येथे शनिवारी (ता. २५) केलेल्या पाहणी दौऱ्यात त्यांनी सदर आदेश दिले. नेताजी मार्केट फूल व्यापारी असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच आयुक्त अश्विन मुदगल यांची भेट घेऊन फूल मार्केटमध्ये काही आवश्यक सोयी-सुविधा देण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी शनिवारी फूल मार्केटचा प्रत्यक्ष दौरा करून तेथील समस्या जाणून घेतल्या.

व्यापाऱ्यांनी फूल मार्केटमध्ये घाणीचे साम्राज्य असल्याचे सांगितले. एक किलोमीटर परिसरातील कचरा संकलन केंद्र या मार्केटमध्ये असल्याने गार्यीचा संचार आहे. त्या गार्यींचाही फूल व्यापाऱ्यांना त्रास होतो. कचरा संकलन केंद्राच्या ठिकाणी भिंत तुटली असल्याने तो इतरत्र पसरतो. पाण्याची व्यवस्था नसल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले.

यावर आयुक्तांनी कचऱ्याची विल्हेवाट रोज लावण्याचे निर्देश दिले. कचरा इतरत्र पसरू नये म्हणून कंटेनरची व्यवस्था करा. मात्र कंटेनर मध्ये कचरा टाकण्याची जबाबदारी व्यापाऱ्यांनी उचलावी, असे आवाहन त्यांनी केले. पाण्याची व्यवस्थाही करण्यात येईल. मात्र, असोशिएशनने त्याचे बिल भरण्याची आणि देखभालीची व्यवस्था करावी, असेही ते म्हणाले. कचऱ्याचे डम्पिंग इतरत्र करता येईल का, याबाबतही आयुक्त मुदगल यांनी चाचपणी केली. फूल बाजारात मुतारीची व्यवस्था करण्यात येईल आणि वीज सब मीटर साठी मनपा तर्फे ना-हरकत देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र कुंभारे, सहायक आयुक्त (कर) मिलिंद मेश्राम, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे, नेताजी मार्केट फूल व्यापारी असोशिएशनचे रामचंद्र पिलारे, दिनेश तितरमारे, नरेंद्र मिरे,भोला दातारकर, मनमीत पिलारे उपस्थित होते.

 

 

‘नाग नदी विकास’ अभ्यासासाठी फ्रान्सचे अर्थसहाय्य ‘इंडो-फ्रेंच अर्बन डेव्हलपमेंट ॲण्ड स्मार्ट सिटी’ कार्यशाळेचा समारोप

नागपूर, ता. २४ : नागपुरातील महत्त्वाकांक्षी ‘नाग नदी विकास’ प्रकल्पाचा अभ्यास करून आराखडा तयार करण्यासाठी फ्रान्स सरकारच्या अख्यत्यारीत असलेली फ्रेंच डेव्हलपमेंट एजंसी (एएफडी) अर्थसहाय्य करणार आहे. इंडो-फ्रेंच अर्बन डेव्हलपमेंड ॲण्ड स्मार्ट सिटी कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी उपसंचालक ऐरवे द्‌युब्रई (Herve Dubreuil) यांनी ही माहिती दिली.

नागपूर महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील सभागृहात कार्यशाळेचा समारोप झाला. महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या समारोपीय कार्यक्रमाला स्थायी समितीचे सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त अश्विन मुदगल, अतिरिक्त आयुक्त डॉ. आर. झेड. सिद्दीकी, स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त रवींद्र देवतळे, उपायुक्त राजेश मोहिते, मनपाचे कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, प्रमुख अधिकारी (सरोवरे आणि नद्या) मो. इसराईल, उपअभियंता (स्मार्ट सिटी प्रकल्प) राजेश दुपारे, निरीचे माजी संचालक तपन चक्रवर्ती, एनईएसएल चे एस. एस. हस्तक उपस्थित होते.

२० ते २४ नोव्हेंबरदरम्यान आयोजित कार्यशाळेत इंडो-फ्रेंचचे कन्सल्टंट सिग्नेस पेसेजेस, सुऐझ सेफेज आणि मे. पी.के. दास ॲण्ड असोशिएटस्‌ यांच्या प्रतिनिधींसह स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत एरिया बेस्ड डेव्हलपमेंटसाठी नगररचना परियोजना (Town Planning Scheme) तयार करणारी एचसीपी, अहमदाबादचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या प्रतिनिधींनी पाच दिवसांत एरिया बेस्ड डेव्हलपमेंट अंतर्गत निवडण्यात आलेल्या पारडी, भरतवाडा, पूनापूर या भागांचा आणि नाग नदीला भेट दिली. एचसीपी आणि एसपीव्ही प्रतिनिधींकडून प्रकल्पाबाबत माहिती जाणून घेतली. या कार्यशाळेदरम्यान सिग्नेस पेसेजेसच्या प्रतिनिधींनी ‘ग्रीन स्पेस डेव्हलपमेंट मेथॉडॉलॉजी’ संदर्भात सादरीकरण केले. प्रमुख अधिकारी (नद्या व सरोवरे) मो. इसराईल यांनी ‘नाग नदी प्रदूषण नियंत्रण प्रकल्पा’संदर्भातील सादरीकरण केले.

समारोपीय कार्यक्रमात नाग नदी विकास आणि एरिया बेस्ड्‌ डेव्हलमेंट (एबीडी) संदर्भातील सादरीकरण करण्यात आले. इंडो-फ्रेंच कंपन्यांच्या तांत्रिक आणि आर्थिक सहकार्यातून हे प्रकल्प राबविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.

महापौर नंदा जिचकार यांनी कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व प्रतिनिधींचे स्वागत केले. इंडो-फ्रेंच कंपन्यांच्या संयुक्त भागीदारीतून होत असलेला विकास कार्यक्रम नागपूर शहराला स्मार्ट सिटी बनविण्यास उपयुक्त ठरेल, असे सांगितले. आयुक्त अश्विन मुदगल यांनीही हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी असल्याचे सांगत एएफडीचे तांत्रिक व आर्थिक सहकार्य हे नागपूरच्या विकासाला नवी दिशा व गती देणारे ठरेल, असे सांगितले.

स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे यांनी कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्व प्रतिनिधींचे आभार मानले.

कार्यशाळेत डॉ. अरुणकुमार सिंग (एन्व्हॉरॉनिक्स, नवी दिल्ली), सिबिला जॅक्सिक (सिग्नेस, फ्रान्स), रमेश स्वराणकर (सेफगार्ड स्पेशालिस्ट, एएफडी), क्लेमेंट फोरकी (उपमहासंचालक, एस्पिलिया), एलेन कौसेरन (मुख्य संचालक, सिग्नेस), पॅट्रिस बर्गर, सिबॅस्टियन (अर्बालियन), पिअर रिगॉर्डियरा (हायड्रोलॉजिस्ट एक्स्पर्ट, सुऐझ सेफेज), एड्रियन हॉरिज (ट्रॉयसिम पेसेज) सहभागी झाले होते.

  

सर्व स्तरातील विद्यार्थ्यांपर्यंत प्राथमिक शिक्षण पोहचविण्यासाठी महानगरपालिका कटीबद्ध : दीपराज पार्डीकर

मुख्याध्यापकांची कार्यशाळा : मनपा व आरटीई ॲक्शन कमिटीचे आयोजन

नागपूर,ता. २२ : शिक्षण हा प्रत्येक नागरिकाचा मुलभूत अधिकार आहे. नागपूर शहरातील सर्व स्तरातील विद्यार्थ्यांपर्यंत प्राथमिक शिक्षण पोहचविण्यासाठी महानगरपालिका कटीबद्ध आहे, असा विश्वास उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी व्यक्त केला.

बुधवारी (ता.२२) कविवर्य सुरेश भट सभागृहात महानगरपालिका व आरटीई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शहरातील शाळेच्या मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, माजी उपमहापौर व शिवसेना पक्ष नेते किशोर कुमेरिया, शिक्षण समिती उपसभापती स्नेहल बिहारे, हनुमाननगर झोन सभापती भगवान मेंढे, नगरसेविका शीतल कामडे, नागपूर महानगरपालिकेच्या उपायुक्त डॉ. रंजना लाडे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, आरोग्य विभागाचे अधीक्षक मदन सुभेदार, जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी श्री. राऊत, आरटीई ॲक्शन कमिटीचे अध्यक्ष शाहीद शरीफ, पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका जिनद सैय्यद प्रामुख्याने उपस्थित होत्या.

पुढे बोलताना दीपराज पार्डीकर म्हणाले, भारत सरकारच्या निर्देशानुसार सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत शिक्षणाचा प्रसार सर्वत्र होत आहे. २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया व त्याबाबतीत पालकांना व शिक्षकांना वारंवार तक्रारी येतात. या कार्यशाळेच्या माध्यमातून त्या तक्रारींचे निवारण होईल यात शंका नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अशा प्रकारच्या कार्यशाळेचे आयोजन सातत्याने व्हावे, अशी सूचना देखील त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

याप्रसंगी बोलताना क्रीडा समिती सभापती नागेश सहारे म्हणाले, अशा प्रकारच्या कार्यशाळेचे आयोजन केल्याने शिक्षकांना व मुख्याध्यापकांना त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. गोरगरीबांना शिक्षण देण्यासाठी महानगरपालिका सक्षम आहे, असेही ते म्हणाले. माजी उपमहापौर व शिवसेना नेते किशोर कुमेरिया यांनी यावेळी कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे आभार मानले.

यावेळी अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर यांनी भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाबद्दल माहिती सांगितली तसेच ‘स्वच्छता सर्वेक्षण-२०१८’ बाबत आवश्यक ती जनजागृती करण्याचे आवाहन केले.

प्रारंभी मान्यवरांचे स्वागत शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त डॉ.रंजना लाडे यांनी केले. आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया संदर्भात तसेच शाळांना व पालकांना येणाऱ्या समस्यांचे निराकरण होण्याकरीता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत आरटीई ॲक्शन कमिटीचे अध्यक्ष मो.शाहीद शरीफ, महिला व बाल कल्याण अधिकारी विजयसिंग परदेशी, पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका जिनद सैय्यद यांनी आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन केले व उपस्थितांच्या प्रश्नांचे निराकरण केले.

 

  

राज्यस्तरीय सायकल स्पर्धेमुळे  नागपूरच्या शिरपेचात मानाचा तूरा – नंदा जिचकार

सांगलीचा दिलीप माने प्रथम तर शिवाजी बंडकर दुसरा
 
नागपूर,ता.१९.  राज्यस्तरीय सायकल स्पर्धेमुळे नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. अशा सायकल  स्पर्धेच्या माध्यमातून पर्यावरणपूरक शहराचा संदेश देण्यात येईल, असा विश्वास महापौर नंदा जिचकार यांनी व्यक्त केला. नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी सायकलिंग असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने भव्य राज्यस्तरीय सायकल स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभप्रसंगी त्या बोलत होत्या.
 
यावेळी व्यासपीठावर उपमहापौर दीपराज पार्डीकर, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, धरमपेठ झोन सभापती रूपा राय, नगरसेविका कृतिका मेश्राम, असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप उबाळे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, मोबिलिटीसाठी सायकल एक महत्वाचे साधन आहे. सायकल स्पर्धेमुळे पर्यावरणपूरक शहराचा एक संदेश दिला गेला. अश्याच प्रकारच्या सायकल स्पर्धेचे आयोजन शाळास्तर, महाविद्यालयस्तरावर करण्यात यावे, असेही त्या यावेळी म्हणाल्या. राज्यभरातून आलेल्या स्पर्धकाचे त्यांनी स्वागत केले व विजयी स्पर्धकांचे त्यांनी अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या. अश्या प्रकारच्या स्पर्धेची जनजागृती मोठ्या प्रमाणावर करण्यात यावी, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
 
नागपूर ते कोंढाळी – नागपूर अशी जलद सायकल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यात प्रथम पारितोषिक सांगलीचा दिलीप माने, दुसरे पारितोषिक सांगलीचा करण शिवाजी बंडकर, तिसरे पारितोषिक विठ्ठल भोसले (पुणे), चवथे पारितोषिक शुभम् दास (नागपूर), पाचवे पारितोषिक ए.राजकुमार (औरंगाबाद) यांनी प्राप्त केले.
 
उत्तेजनार्थ बक्षिस – प्रकाश ओलेकर, हर्षल शेंडे, स्वप्नील लाड, प्रवरा राकेश भैया, जाधव उत्कर्ष आत्राम यांना देण्यात आले.
 
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन कुलदीप लोहे यांनी केले तर आभार शंतनू मेश्राम यांनी मानले. 
ततपुर्वी सकाळी ६.३० वाजता संविधान चौकात जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवड़े यांनी हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात केली. यावेळी मनपाचे क्रीड़ा सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेवक मनोज सांगोळे उपस्थित होते. राज्यभरातील स्पर्धक सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजेश जांगडे, सुधीर चांदूरकर, दिलीप हनवते, प्रशील सहारे, हरिश खान यांनी प्रयत्न केले.

 

  

नागपूर महानगरपालिकेत इंदिरा गांधींना अभिवादन

उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी दिली ‘राष्ट्रीय एकात्मते’ची शपथ
 
नागपूर,ता.१९ : राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या राष्ट्रमाता माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंती व जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.
 
नागपूर महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीतील दालनात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपमहापौर दीपराज पार्डीकर यांच्यासह विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, मनपा आयुक्त अश्विन मुदगल यांनी भारतरत्न इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी नगरसेवक किशोर जिचकार, अपर आयुक्त रवींद्र कुंभारे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त रवींद्र देवतळे, उपायुक्त राजेश मोहिते, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, सहायक आयुक्त महेश धामेचा, मिलिंद मेश्राम, नगररचना उपसंचालक सुप्रिया थूल, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, कार्यकारी अभियंता संजय जैस्वाल, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, पशुचिकित्सक अधिकारी गजेंद्र महल्ले, प्रभारी स्थावर अधिकारी एच. के. आवारे, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, करनिर्धारण अधिकारी दिनकर उमरेडकर, कार्यकारी अभियंता सतीश नेरळ, सहायक आयुक्त राजू भिवगडे, सुभाष जयदेव, प्रकाश वऱ्हाडे, गणेश राठोड, सुवर्णा दखने, अशोक पाटील, निगम अधीक्षक राजन काळे, सहायक अधीक्षक गौतम पाटील,  उपस्थित होते. प्रास्ताविक, संचालन व आभार प्रदर्शन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले.
सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेत देशाची एकता व अखंडता राखण्याचा संकल्प केला.
 
शांतीनगरमधील पुतळ्याला माल्यार्पण
माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त शांतीनगर येथील त्यांच्या पुतळ्याला उपमहापौर दीपराज पार्डीकर आणि विरोधी पक्ष नेता तानाजी वनवे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नगरसेवक किशोर जिचकार, माजी नगरसेवक कुंभलकर, दीपक कापसे व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

 

  

राणीलक्ष्मीबाई जयंतीनिमित्त मनपातर्फे अभिवादन

नागपूर,ता.१९ : झाँशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याजयंती निमित्त उपमहापौर दीपराज पार्डीकर, झोन सभापती रूपा रॉय यांनी सीताबर्डी स्थित राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
 
याप्रसंगी नगरसेवक संजय बंगाले, नगरसेविका उज्ज्वला शर्मा, सर्वश्री दिनेश श्रीवास्तव, शैलेंद्र श्रीवास्तव, अशोक श्रीवास्तव, अश्वनीकुमार सिन्हा, नीलम भाटिया, नंदकिशोर व्यास आदी उपस्थित होते.
 
राजे रघुजीराव भोसले यांना मनपातर्फे जयंतीनिमित्त अभिवादन
राजे रघुजीराव भोसले यांच्या जयंतीनिमित्त उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी सक्करदरा चौक स्थित राजेरघुजीराव भोसले यांच्या पुतळ्याला नगरीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

 

  

मनपा-मेट्रो समन्वय समिती तयार करा : संजय बंगाले

स्थापत्य व प्रकल्प समितीची बैठक : मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी दिले निर्देश
 
नागपूर, ता. १८ : मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. परंतु या कामामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याच्या तक्रारी येत आहेत. काम झाल्यानंतर तातडीने खड्डे बुजवून रस्ते मोकळे करण्याची जबाबदारी कोणाची, नागरिकांना काय उत्तरे द्यायची, अशा प्रश्नांवर नियंत्रण कुणाचे, असे अनेक प्रश्न आहेत. यासाठी तातडीने मनपा आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांची एक समन्वय समिती तयार करा, असे निर्देश मनपाच्या स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती संजय बंगाले यांनी दिले.
 
मनपा सभागृहात नगरसेवकांनी विचारलेल्या आणि स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीशी संबंधित असलेल्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी शनिवारी (ता. १८) समितीची बैठक मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात पार पडली. बैठकीला सभापती संजय बंगाले यांच्यासह उपसभापती अभय गोटेकर, समितीच्या सदस्य पल्लवी श्यामकुळे, सुषमा चौधरी, शेख मोहम्मद जमाल मो. इब्राहीम, नगरसेवक किशोर जिचकार, मुख्य अभियंता विजय बनगीरवार, नगररचना सहायक संचालक सुप्रिया थूल, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, कुकरेजा, शहर अभियंता मनोज तालेवार, विकास अभियंता सतीश नेरळ, सहायक आयुक्त प्रकाश वऱ्हाडे उपस्थित होते.
 
नागपूर महानगरपालिका सीमा क्षेत्रातील मेट्रो रेल्वे कामामुळे रहदारीस अडथळा आणि सुरक्षेच्या संदर्भात काय उपाययोजना आहेत, यावर विचारलेल्या प्रश्नासंदर्भात झालेल्या चर्चेअंती सभापती संजय बंगाले यांनी समन्वय समिती निर्माण करण्याचे निर्देश दिले.
 
यासोबतच स्मार्ट सिटी अंतर्गत मनपा क्षेत्रात वेगवेगळ्या कंपनीअंतर्गत करण्यात आलेले खोदकाम, अपूर्ण कामे आणि त्यामुळे मनपाला होणारा आर्थिक भुर्दंड यासंदर्भात नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नावरही चर्चा करण्यात आली. स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामांची जी माहिती समितीला हवी आहे ती माहिती स्मार्ट सिटी प्रकल्पातील अधिकारीच देऊ शकतात. स्मार्ट सिटी प्रकल्पासंदर्भात मनपासोबत झालेला नेमका करार काय, ज्या प्रभागात कार्य सुरू आहे, त्या प्रभागातील नगरसेवकांना त्याबाबत माहिती दिली जाते का, या आणि अशा अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी स्मार्ट सिटी प्रकल्पातील आणि प्रकल्पाशी संबंधित व्यक्तींची पुढील दहा दिवसांत स्वतंत्र बैठक बोलविण्याचे निर्देशही सभापती संजय बंगाले यांनी दिले.
 
नगरसेवक किशोर जिचकार यांनी रहाटे कॉलनी चौकात मोकळ्या जागेवर राष्ट्रमाता इंदिरा गांधी यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्यासंदर्भात चर्चा घडवून आणली. चर्चेअंती जी जागा सुचविण्यात आली आहे, ती कोणाच्या मालकीची आहे, हे तपासून त्यांचेकडून नाहरकत घेण्यात यावी आणि पुढील बैठकीत यावर चर्चा करावी, असे निर्देश सभापती श्री. बंगाले यांनी दिले. मस्कासाथ येथील सिव्हर लाईनसंदर्भात उपस्थित झालेल्या प्रश्नावर प्रकल्प विभाग आणि झोन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी यावर एकत्र बसून आयुक्तांच्या निर्देशानुसार अभ्यास करावा आणि तातडीने उपाययोजना करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

  

१९ नोव्हेंबरला राज्यस्तरीय जलद सायकल स्पर्धा

मनपा-ऑरेंज सिटी सायकलिंग असोशिएशनचे आयोजन
 
नागपूर, ता. १६ : नागपूर महानगरपालिका आणि ऑरेंज सिटी सायकलिंग असोशिएशनच्या संयुक्त विद्यमाने १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० वाजता स्थानिक संविधान चौकात राज्यस्तरीय जलद सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
 
सदर स्पर्धा फक्त १८ वर्षावरील मुलांकरिता राहील. स्पर्धेचे उद्‌घाटन नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या हस्ते हील. यावेळी मनपा क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने उपस्थित राहतील. समारोपीय कार्यक्रम सकाळी ११ वाजता टिळकनगर बॉस्केटबॉल मैदान येथे होईल. यावेळी महापौर नंदा जिचकार, मनपातील सत्ता पक्ष नेते संदीप जोशी, नगरसेवक संदीप गवई, नगरसेविका प्रगती पाटील, शिल्पा धोटे, प्रमोद कौरती, कमलेश चौधरी, प्रदीप उबाळे, अमर बागडे उपस्थित राहतील.
 
सदर स्पर्धेचा प्रारंभ संविधान चौकातून होईल. संविधान चौक ते कोंढाळी आणि तेथून परतून विद्यापीठ कॅम्पस असा सुमारे १०० कि.मी.चा सायकलिंगचा मार्ग राहील. स्पर्धेतील विजेत्यास प्रथम पुरस्कार २० हजार रुपये, द्वितीय पुरस्कार १५ हजार रुपये, तृतीय पुरस्कार १० हजार रुपये, चतुर्थ पुरस्कार सात हजार रुपये तर पाचवा पुरस्कार पाच हजार रुपयांचा राहील. पाच उत्तेजनार्थ पुरस्कारही देणञयात येतील. स्पर्धा पूर्ण करणाऱ्या स्पर्धकास ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. बाहेर गावाहून येणाऱ्या स्पर्धकांच्या निवास व भोजनाची व्यवस्था राणा प्रताप हॉल, शंकर नगर येथे करण्यात आल्याची माहिती ऑरेंज सिटी सायकलिंग असोशिएशनचे सचिव शंतनु मेश्राम, अध्यक्ष अशोक मेहरे, राज जांगडे, कुलदीप लोहे, दिलीप हनवते, हरिष खान, प्रशील सहारे,मुरलीधर माहुलकर, नितीन बडवाईक, देवा वाडीचार यांनी दिली.

 

  

२९ नोव्हेंबरपासून ‘अपूर्व विज्ञान मेळावा’

नागपूर,ता.१८. नागपूर महानगरपालिका आणि सेंटर फॉर रिसर्च ॲण्ड ट्रेनिंग इन बेसिक सायन्स एज्युकेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २९ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर दरम्यान ‘अपूर्व विज्ञान मेळावा’ आयोजित करण्यात येणार आहे. शनिवारी (ता.१८) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात मेळावा आयोजनाच्या पूर्वतयारीसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली.
 
यावेळी माजी महापौर प्रवीण दटके, शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक राजकुमार साहू, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते.
 
अपूर्व विज्ञान मेळावा हा १९९८ पासून सुरू करण्यात आला. या मेळाव्यामुळे मनपाच्या शाळेतील विद्यार्थांना विज्ञान या विषयातील रुची वाढली आहे. या मेळाव्यात मनपाच्या २९ शाळांमधून २५० विद्यार्थी सहभागी होणार आहे. प्रत्येक पाच विद्यार्थांमागे एक शिक्षक त्यांच्यासमवेत राहणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी दिली. या मेळाव्याने महानगरपालिकेच्या शाळेकडे व विद्यार्थांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत चालला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
 
या मेळाव्याबद्दल माहिती देताना असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश अग्रवाल म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या अध्यादेशानुसार महानगरपालिकेच्या सर्व शाळास्तरावर विज्ञान मेळावे घेण्यात येणार आहे. यामुळे मनपाच्या शाळांची पत सुधारण्यात मदत नक्कीच होणार आहे. या मेळाव्याकरिता महाराष्ट्र, मध्यप्रदेश, झारखंड राज्याच्या शिक्षण मंत्र्यांना प्रत्र पाठविण्यात आलेले आहे. या मेळाव्यात बाहेरच्या गावातील महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थी भेट देणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
 
मेळाव्यादरम्यान विद्यार्थांसाठी बसेसची व्यवस्था करण्यात यावी, असे आदेश सुनील अग्रवाल यांनी दिले. त्याचप्रमाणे मेळाव्यादरम्यान स्वच्छतेकडे लक्ष देण्यात यावे, असेही सांगितले.
 
या मेळाव्याची जनजागृती मोठ्या प्रमाणात करण्यात यावी. मनपाच्या ज्या शिक्षकांनी राज्यस्तरीय व राष्ट्रीयस्तरावरील विज्ञान स्पर्धेत अथवा मेळाव्यात प्रतिनिधित्व केले आहे, त्यांचे छायाचित्र व त्यांची माहिती लावण्यात यावी, असे आदेश माजी महापौर प्रवीण दटके यांनी दिले.

 

  

संविधान प्रास्ताविकेचा स्तंभ संविधान चौकात उभारणार- महापौर नंदा जिचकार यांनी दिली माहिती

नागपूर,ता. १७ : संविधान चौकात संविधानाच्या प्रास्ताविकेचा स्तंभ, कोनशीला उभारण्यात येणार असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी दिली. शुक्रवार (ता.१७) मनपा मुख्यालयात संविधान फाऊंडेशन पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या.
 
याप्रसंगी उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक धर्मपाल मेश्राम, जितेंद्र घोडेस्वार, अतिरिक्त आयुक्त आर.झेड.सिद्दीकी, संविधान फाऊंडेशनचे अध्यक्ष ई. झेड. खोब्रागडे, विभागीय अध्यक्ष न्या. पी.पी. पाटील, सचिव शिवदास वासे, कोषाध्यक्ष विलास सुटे, विभागीय सचिव अशोक गेडाम, मनपाचे कार्यकारी अभियंता अनिरूद्ध चौगंजकर, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, प्रामुख्याने उपस्थित होते.
 
नागपुरात असलेला संविधान चौक हा अशाप्रकारचे नामकरण करण्यात आलेला देशातील पहिला चौक आहे. या चौकाबद्दल जनजागृती करण्यात यावी, चौकात संविधानाच्या प्रास्ताविकेचा स्तंभ व कोनशीला उभारण्यात यावी, संविधान चौकाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, तेथे पिण्याच्या पाण्याची सोय स्थायी स्वरूपात करण्यात यावी, संविधान चौक हे चळवळीचे केंद्र आहे. त्यामुळे तेथे उभारण्यात येणाऱ्या व्यासपीठासाठी महापालिकेद्वारे शुल्क आकारण्यात येऊ नये, २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून सर्वत्र साजरा करण्यात येतो. या दिवसाचे महत्त्व लक्षात घेता २५ व २६ नोव्हेंबरला संविधान चौकात विद्युत रोषणाई करण्यात यावी, अश्या मागण्या संविधान फाउंडेशनच्या वतीने करण्यात आल्या.
 
याबाबत माहिती देताना स्थायी समिती सभापती संदीप जाधव म्हणाले, महापालिकेने कोनशीला उभारण्यासाठी ३० लाखाची तरतूद केलेली आहे. २०१२ मध्ये १८ फूट कोनशीला उभारण्यासाठी वाहतूक पोलिस विभागाने परवानगी नाकारली होती. आता त्याऐवजी संभाव्य दुसऱ्या जागा ठरविण्यात आल्या आहेत. वाहतूक पोलिस विभाग व मनपा प्रशासन यांच्या संयुक्त बैठक घेऊन आणि जागांची पाहणी करून तातडीने निर्णय घेण्याची विनंती त्यांनी महापौर नंदा जिचकार यांना केली.
 
महापौर नंदा जिचकार यांनी, संविधान चौकात स्वच्छता ठेवण्यात यावी, तेथील स्वच्छतागृहाचे नूतनीकरण करावे, असे आदेश दिले. २५ व २६ नोव्हेंबरला चौकात विद्युत रोषणाई करण्याचेही निर्देशित केले. व्यासपीठावर आकारण्यात येणाऱ्या शुल्कासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. संविधान प्रास्ताविकेची कोनशीला उभारण्यासाठी निधीची तरतूद यापूर्वीच झालेली आहे. त्यातील अन्य अडचणी तातडीने दूर करून प्रत्यक्ष कार्य सुरूवात करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
 
महापौरांनी घेतलेल्या या पुढाकाराबद्दल संविधान फाऊंडेशनच्या वतीने ई.झेड. खोब्रागडे यांनी त्यांचे आभार मानले.

 

  

मनपातर्फे स्वर्गीय बाळासाहेबांना अनोखी श्रद्धांजली

- साकारणार अद्यावत स्मारकः कलावंतांसाठी हक्काचे व्यासपीठ
 
नागपूर, ता. 16: शिवसेनेचे संस्थापक स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे अनोखी श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. महाल मधील चिटणीसपुरा शाळेच्या जागेवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा आकर्षक असा विकास आराखडा नागपूर मनपाने तयार केला आहे. “राजकारणापलिकडील बाळासाहेब ठाकरे” या संकल्पनेवर या स्मारकाचे डिझाईन  साकारण्यात येत आहे.
  
कुशल राजकारणी या व्यतिरिक्त बाळासाहेब ठाकरे यांची अत्यंत प्रभावी व्यंगचित्रकार म्हणूनही ओळख होती. हाच धागा पकडून या स्मारकाला कला व सांस्कृतिक केंद्राचे स्वरुप देण्यात आले आहे. शहरातील विद्यार्थी व उद्योन्मुख कलाकारांना अत्यल्प दरांमध्ये विविध सुविधा व व्यासपीठ या स्मारकाच्या स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येईल. शाळेमागील उद्यानालासुद्धा एक नवीन स्वरुप देऊन या स्मारकामध्ये समाविष्ट कऱण्यात आले आहे. या मध्ये 300 जणांसाठीचे वातानुकुलित सभागृह, मल्टीपर्पज हॉल, छायाचित्रकार व चित्रकारांसाठी आर्ट गॅलरी, नाट्य व संगीताच्या तालमीसाठी सराव कक्ष, ओपन एअर ऍम्पी थिएटर तसेच बाळासाहेब ठाकरेंचा पुतळा व त्यांनी काढलेले व्यंग्यचित्र व जीवनपटाचे एक प्रदर्शन येथे राहील. ई-लायब्ररी व बुक लायब्ररीचा सुद्धा या प्रकल्पात समावेश आहे.
 
शाळा व गार्डनमधील मोठ्या झाडांचे जतन करुन आकर्षक लॅंडस्केपिंग केल्या जाईल. ईमारतीची डिझाईन व रचना “ग्रीन बिल्डींग” च्या धर्तीवर करण्यात आली असून नैसर्गिक साधने व ऊर्जा याचा वापर करण्यात आला आहे.
 
अशा प्रकारे सामाजिक कलागुणांना वाव देणारे हे कला व सांस्कृतिक केंद्र स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना अनोखी श्रद्धांजली ठरेल व नागपूरच्या कला व सांस्कृतिक क्षेत्रात अत्यल्प दराने सुविधा उपलब्ध करुन व आकर्षक डिझाईनद्वारे मोलाचे योगदान देईल.
 
वैशिष्ट्ये
-    बाळासाहेबांचा जीवनपट उलगडणारे चित्र प्रदर्शन
 
-    300 आसनक्षमता असलेले एसी हॉल
 
-    मल्टीपर्पज हॉल
 
-    कलावंत आणि छायाचित्रकारांसाठी आर्ट गॅलरी
 
-    नृत्य आणि नाट्य कलावंतांसाठी सराव कक्ष
 
-    ओपर एअर ऍम्पीथिएटर
 
-    पुस्तक व ई-लायब्ररी
 
-    पूर्ण परिसरात आकर्षक लॅंडस्केपिंग
 
-    ग्रीन बिल्डींग

 

  

कोलंबोतील ‘सिटी नेट काँग्रेस'  आणि जर्मनीतील सीओपी२३ परिषदेत महापौर नंदा जिचकार यांनी केले नागपूरचे प्रतिनिधित्व

नागपूर, ता. १६ : संयुक्त राष्ट्राच्या इकॉनॉमिक ॲण्ड सोशल कमिशन फॉर एशिया ॲण्ड द पॅसिफिक (यूएनईएससीएपी) तर्फे श्रीलंकेतील कोलंबो येथे आयोजित ‘सिटी नेट काँग्रेस’मध्ये तसेच जर्मनीतील बॉन येथे आयोजित यूएनएफसीसीसी सीओपी२३ परिषदेत रेक्सकॉमच्या सदस्य म्हणून महापौर नंदा जिचकार यांनी सहभागी होऊन नागपूरचे प्रतिनिधित्व केले.
 
इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ लोकल एनव्हिरॉन्मेंटल इनिशिएटिव्ह साऊथ एशिया (आयसीएलईआय) आणि प्रादेशिक जीआयझेड शहरी नेक्सससह २०१६ पासून नागपूरमध्ये ‘आशियायी शहरी नेटवर्क्समधील एकात्मिक संसाधन व्यवस्थापन’ या प्रकल्पाची अंमलबजावणी करीत आहे. ‘शहरी नेक्सस’ या प्रकल्पाचा उद्देश नागपूरमध्ये नागरी विकास नियोजन प्रक्रियेमध्ये एकीकृत दृष्टीकोन अवलंबिणे व प्रोत्साहन देणे हा आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून विशेषत: पाणी, ऊर्जा आणि घनकचरा व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रीत केले जात आहे. 
 
श्रीलंकेतील कोलंबो येथे ६ ते ८ नोव्हेंबर दरम्यान ‘सिटी नेट काँग्रेस’चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये देशातील शहरांमधील सदस्य, सहयोगी सदस्य आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे सुमारे ३०० प्रतिनिधी सहभागी झालेले होते. यात पीअर-टू-पीअर लर्निंग प्लॅटफॉर्मद्वारे शहरातील महापौर, नागरी नेते आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी एकत्र येऊन ऊर्जा, पाणी आणि अन्न या क्षेत्रातील योजना आणि व्यवस्थापन प्रक्रिया एकत्रित करण्यासाठी "नेक्सास" दृष्टिकोन कसा लागू केला जाऊ शकतो याबाबत चर्चा केली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागपूरच्या नागरी विकास प्रश्नांवर विविध उपक्रमांच्या माध्यमातून कसे सहकार्य करता येईल, याबाबत महापौर नंदा जिचकार यांनी माहिती घेतली. यामुळे आता नागरी विकासासंदर्भात असलेल्या संधींचा लाभ मिळविण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी एकात्मिक पद्धतीचा अवलंब करता येईल.
 
जर्मनीतील यूएनएफसीसीसी सीओपी२३ परिषदेत सहभाग
 
 जर्मनीतील बॉन येथे १० ते १४ नोव्हेंबर दरम्यान आयोजित यूएनएफसीसीसी सीओपी२३ परिषदेमध्येमध्ये आयसीएलईआयच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रादेशिक कार्यकारी कमिटी (REXcom)  सदस्य म्हणून महापौर नंदा जिचकार सहभागी झाल्या होत्या.
 
६० पेक्षा अधिक देशांतून सरकारच्या सर्व स्तरांमधील ३३० पेक्षा अधिक स्थानिक आणि प्रादेशिक नेते असे एकूण एक हजार प्रतिनिधी परिषदेत सहभागी झाले होते. यामध्ये १०० पेक्षा अधिक इव्हेंट, गोलमेज चर्चा, पत्रपरिषद आणि डिजिटल संवाद अशा विविध टप्प्यात परिषदेचे आयोजन होते. सीओपी परिषदेत हवामान समतोलात अग्रेसर असणाऱ्या शहरांतील प्रतिनिधी मानवी वसाहत समावेशक, सुरक्षित, लवचिक आणि शाश्वत करण्याच्या दृष्टीने संधी शोधत होते. हवामान समतोल राखण्याकरिता जागतिक उद्दिष्ट साध्य करण्याच्या दृष्टीने परिषदेने महत्त्वाची भूमिका निभावली. महापौर नंदा जिचकार यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाचा एक भाग म्हणून नागपूरमध्ये भविष्यासाठी नियोजित करण्यात येत असलेल्या विविध निम्न कार्बन उत्सर्जनाच्या प्रकल्पांवर विशेष निवेदन केले. सौर शहराच्या दृष्टीने पुढाकार घेण्यात आलेल्या नागपूरमधील योजना, ऊर्जा कार्यक्षम रस्त्यांवरील वीज आदींवर त्यांनी चर्चा केली. महापौर नंदा जिचकार यांच्या या परिषदेतील उपस्थितीने हवामान समतोल राखणाऱ्या शहरांच्या प्रतिनिधींनी नागपूरमध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. 
 
‘रेक्सकॉम’ (REXcom) सदस्य
 
नागपूरच्या महापौर नंदा जिचकार इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ लोकल एनव्हिरॉन्मेंटल इनिशिएटिव्ह (साऊथ एशिया) च्या विभागीय कार्यकारी समितीवर (REXcom) निवडून आल्या आहेत.
 
रेक्सकॉम (REXcom) हे दक्षिण आशिया मध्ये आयसीईएलआयचे प्रादेशिक प्रतिनिधित्व करते. दक्षिण आशियातील सर्व आयसीईएलआय सदस्यांनी संस्थेसाठी मार्गदर्शक शक्ती म्हणून काम करण्यासाठी आणि कृतीचा अग्रक्रम ठरविण्यासाठी मतदान केले आहे.
 
आयसीईएलई दक्षिण आशियाच्या रेक्सकॉमसाठी झालेल्या निवडणुकीत नागपूरच्या महापौर नंदा जिचकार उमेदवार होत्या. सन २०१८ ते २०२१ या कालावधीसाठी त्या निवडून आलेल्या आहेत. 
 
नागपूर गेल्या दहा वर्षांपासून नागपूर आयसीएलईआय सदस्य असून आयसीईएलई दक्षिण आशिया सोबत नवीनीकरणीय ऊर्जा आणि संसाधन कार्यक्षमता प्रकल्पांमध्ये कार्यरत आहे ज्यामध्ये शहरी नेटवर्कवरील एका चालू प्रकल्पाचाही समावेश आहे. या प्रकल्पात शहरातील खाद्यान्न, पाणी आणि ऊर्जेची आंतरजोडणी पाहत आहे.  
 
रेक्सकॉमकरिता ऑनलाईन मतदान करण्यात आले होते. यामध्ये दक्षिण आशियामधून ४१ सदस्यांनी मतदान केले. भारताला या निवडणुकीत दुसरे सर्वाधिक म्हणजेच २८ मते मिळाली. मतदानाची प्रक्रिया महिनाभर सुरू होती. ६ ऑक्टोबर रोजी मतदान बंद करण्यात आले. निकाल १३ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला.

 

  

मनपा शाळांच्या विद्यार्थ्यांनी केली कलांची मुक्त उधळण

चिटणीस पार्कवर बालोत्सव : वाल्मिकीनगर आणि संजयनगर शाळेने मारली बाजी
 
नागपूर, ता. १४ : पंडित जवाहरलाल नेहरू जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे स्थानिक रा.पै. समर्थ स्टेडियम, चिटणवीस पार्क येथे आयोजित बाल दिनाच्या कार्यक्रमात मनपा शाळांतील विद्यार्थ्यांनी कलांची मुक्त उधळण केली. आगळ्यावेगळ्या पद्धतीने आयोजित या कार्यक्रमात उपस्थित मनपा शाळांतील विद्यार्थ्यांच्या गर्दीने स्टेडियम फुलून गेले होते. सर्व शाळांमधून वाल्मिकीनगर हिंदी माध्यमिक शाळेच्या मुलींच्या संघाने तर संजयनगर हिंदी माध्यमिक शाळेच्या मुलांच्या संघाने पथसंचलन मध्ये बाजी मारत आपले वर्चस्व सिद्ध केले.
 
मुलींच्या गटात द्वितीय क्रमांक लाल बहादूर शास्त्री हिंदी माध्यमिक शाळेने पटकाविला तर दुर्गानगर माध्यमिक शाळा तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली. मुलांच्या गटात द्वितीय क्रमांक विवेकानंद नगर हिंदी माध्यमिक शाळेने तर तृतीय क्रमांक जयताळा माध्यमिक शाळेने पटकाविला. 
 
कार्यक्रमाचे उद्‌घाटन कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी मंचावर विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे, अग्निशमन व विद्युत समितीचे सभापती ॲड. संजयकुमार बालपांडे, गांधीबाग झोन सभापती सुमेधा देशपांडे, हनुमाननगर झोन सभापती भगवान मेंढे, धरमपेठ झोन सभापती रूपा रॉय, शिक्षण समितीच्या उपसभापती स्नेहल बिहारे, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, शिक्षण समितीचे सदस्य राजेंद्र सोनकुसरे, स्वाती आखतकर, विजय झलके, नगरसेविका विद्या कन्हेरे, ममता सहारे, सरला नायक, उपायुक्त रवींद्र देवतळे, शिक्षक संघाचे सचिव देवराव मांडवकर, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, सहायक शिक्षणाधिकारी कुसूम चाफलेकर, शिक्षक संघाच्या कोषाध्यक्षा मलविंदर कौर लांबा आदी उपस्थित होते.
कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर यांनी विद्यार्थ्यांना बाल दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, विद्यार्थ्यांचे वय हे खेळण्याबागडण्याचे असते. अभ्यासासोबत त्यांच्यातील कलागुणांना वाव देणे महत्त्वाचे असते. मनपाच्या शिक्षण विभागाने यावर्षी उत्कृष्ट कार्यक्रमाचे आयोजन करून विद्यार्थ्यांतील कलावंतांना वाव देण्याचा केलेला प्रयत्न वाखाणण्याजोगा आहे. याबद्दल त्यांनी शिक्षण विभागाचे अभिनंदन केले.
 
विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे यांनीही शिक्षण विभागाचे अभिनंदन करत यावर्षी सुरू झालेली ही परंपरा भविष्यातील विद्यार्थी घडविण्यात महत्त्वपूर्ण ठरेल, असे प्रतिपादन केले.
 
शिक्षण सभापती प्रा. दिलीप दिवे म्हणाले, आजकालचा विद्यार्थी हा मोबाईल, लॅपटॉपमध्ये हरविला आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात ते ज्ञान आवश्यक असले तरी खेळ, कला आणि मनोरंजन या बाबीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. यासाठी मनपाच्या शिक्षण विभागातील कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षकांनी घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे. बालदिनाच्या या भव्य आयोजनाची परंपरा मनपा पुढेही सुरू ठेवेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी केले. संचालन मंजुषा फुलंबरकर आणि अरुणा गावंडे यांनी केले. क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी यांनी समन्वयन केले. आभार संजय महाला यांनी मानले.
 
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
 
यावेळी दहावी व बारावीच्या परीक्षेत माध्यमनिहाय प्रथम येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कार्यकारी महापौर दीपराज पार्डीकर व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. दहावीत मराठी माध्यमात प्रथम बॅ. शेषराव वानखेडे विद्यानिकेतनची विद्यार्थिनी तन्वी मोटघरे (२५,०००/-), द्वितीय जयताळा माध्यमिक शाळेचा विद्यार्थी ऋतिक धोंगडे (१५,०००/-), तृतीय बॅ. शेषराव वानखेडे विद्यानिकेतनची विद्यार्थिनी मोनिका नेवारे आणि जयताळा माध्यमिक शाळेचा विद्यार्थी आशीष येडे (१०,०००/-), हिंदी माध्यमात प्रथम संजयनगर हिंदी माध्यमिक शाळेचा विद्यार्थी भूपेंद्र शाहू, (२५,०००/-), द्वितीय विवेकानंदनगर हिंदी माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी रोशनी शुक्ला (१५,०००/-), तृतीय लाल बहादूर शास्त्री हिंदी माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी जान्हवी सोनकुसरे (१०,०००/-), उर्दू माध्यमातील प्रथम साने गुरुजी उर्दू माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी सादिया परवीन अब्दुल कादीर (२५,०००/-), द्वितीय हुसैन खान सलीम खान (१५,०००/-) आणि तृतीय एम.ए.के. आझाद उर्दू माध्यमिक शाळेचा विद्यार्थी मो. रशीद रझा (१०,०००/-), दिव्यांग विद्यार्थ्यांमधून प्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी प्रीती ब्राह्मणकर (१०,०००/-) यांचा सत्कार करण्यात आला. बारावीत कला शाखेतील प्रथम एम.ए.के. आझाद उर्दू माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी आतीया बानो अब्दुल करीम कुरेशी, द्वितीय शाझिया कौसर मकबूल अहमद अंसारी आणि तृतीय साने गुरुजी उर्दू उच्च माध्यमिक शाळेचा निखात परवीन जिब्राईल खान यांना अनुक्रमे २५ हजार, १५ हजार आणि १० हजार रुपयांचे रोख बक्षीस देऊन सन्मानिकत करण्यात आले. वाणिज्य शाखेतून प्रथम आलेल्या एम. ए. के. आझाद उर्दू उच्च माध्यमिक शाळेची सिमरन शेख शकील हिला २५ हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ज्या विषयांचा निकाल शंभर टक्के निकाल लागला त्या विषय शिक्षकांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 
अनाथालयात साजरा केला बाल दिन साजरा
 
मनपाच्या महिला व बालकल्याण समितीतर्फे बाल दिनानिमित्त अनाथाश्रम येथे चिमुकल्यांना फळे आणि उपयुक्त साहित्य वितरण करण्यात आले. तसेच डॉ. अनुराधा रीधोरकर यांनी आरोग्याबद्दल व आहाराबद्दल चिमुकल्यांना मार्गदर्शन केले. यावेळी महिला बालकल्याण समिती सभापती वर्षा ठाकरे व अंजली निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत चिमकुल्यांना भेटवस्तु देण्यात आल्या. यावेळी उपसभापती श्रद्धा पाठक, नगरसेविका वंदना भगत, साक्षीराऊत, श्वेत निगम यांची उपस्थिती होती.
 
सांस्कृतिक कार्यक्रम
 
यावेळी मनपाच्या विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी समूह नृत्य सादर केले. पन्नालाल देवाडिया हिंदी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाचे महत्त्व सांगत नृत्याच्या माध्यमातून ‘शिक्षा मेरा अधिकार’ हा संदेश दिला. विवेकानंद नगर हिंदी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर करीत उपस्थितांची दाद मिळविली. शिवणगाव मराठी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी कोळी नृत्य सादर करीत उपस्थित विद्यार्थ्यांनाही ठेका धरायला लावला. वाल्मिकीनगर हिंदी माध्यमिक शाळेने केलेल्या घागरा नृत्यावर सारेच थिरकले. बॅ. शेषराव वानखेडे विद्यानिकेतनच्या विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिक तर लाल बहादूर शास्त्री हिंदी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी लेझीम सादर करून सर्वांची मने जिंकली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली.

 

  

मनपा पदाधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कॅशलेस विम्याचा प्रस्ताव सादर करा

आरोग्य समिती सभापती मनोज चापले यांचे निर्देश
 
नागपूर, ता. १४ :  आरोग्याचा प्रश्न कोणाला कधी उद्‌भवेल, हे सांगता येत नाही. विमा असला तरी वेळेवर त्याची रक्कम मिळत नाही. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेतील पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस विमा काढण्याचे विचाराधीन आहे. त्याचा प्रस्ताव पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश आरोग्य समितीचे सभापती मनोज चापले यांनी अधिकाऱ्यांना दिले.
 
मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृति सभागृहात आयोजित वैद्यकीय सेवा व आरोग्य समितीच्या बैठकीत ते बोलत होते. त्यांच्यासह बैठकीला उपसभापती प्रमोद कौरती, धरमपेठ झोन सभापती रूपा रॉय, समितीचे सदस्य लखन येरावार, विशाखा बांते, भावना लोणारे, आशा उईके, वंदना चांदेकर, नगरसेविका नसीब बानो इब्राहीम खान, आरोग्य अधिकारी (एम.) डॉ. अनिल चिव्हाणे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, यांत्रिकी अभियंता राजेश  गुरुमुले उपस्थित होते.
 
धरमपेठ झोन सभापती रूपा रॉय यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर झालेल्या ठरावानुसार पदाधिकारी, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कॅशलेस विम्याचा प्रस्ताव आजच्या बैठकीत चर्चेला आला. हा विषय महत्त्वाचा असून यावर सर्वसंमती असेल, असे मत रूपा रॉय यांनी मांडले. हा विमा काढताना प्रीमियमच्या रक्कमेमध्ये काही वाटा मनपाचा, काही वाटा पदाधिकाऱ्यांना मिळणाऱ्या मानधनाचा तर काही वाटा कर्मचाऱ्यांचा राहील, अशी सूचना सभापती मनोज चापले व अन्य सदस्यांनी मांडली. यासंदर्भात समाजकल्याण विभागाची मदत घेऊन त्यांच्या माध्यमातून ही योजना राबविता येईल, असे मत डॉ. अनिल चिव्हाणे यांनी मांडले. आलेल्या सूचनेसह कॅशलेस विम्याचा प्रस्ताव पुढील बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्याचे आदेश सभापती श्री. चापले यांनी दिले.
 
डेंग्यू आजारासंदर्भात मनपातर्फे सुरू असलेल्या उपाययोजनांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. डेंग्यू संदर्भात जनजागृतीचे कार्यक्रम सुरू असल्याची माहिती हत्तीरोग अधिकारी जयश्री थोटे यांनी दिली. दोन फॉगींग मशीनद्वारे नियमित फवारणी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. आवश्यक त्या सर्व उपाययोजनांसोबतच जनजागृतीवर विभाग भर देत असल्याची माहिती त्यांनी दिली.
 
आशीनगर झोनकडून आलेल्या तक्रारीवर झालेल्या ठरावानुसार नागपूर शहरातील सफाई कामात कामचुकार तसेच सफाई कामगारांच्या गैरहजरीबाबत चर्चा करण्यात आली. या तक्रारींची शहानिशा करून असा काही प्रकार होत नसल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार यांनी सांगितले. हजेरी घेणारे जमादार किंवा एस.आय. जर हजेरी घेताना उपस्थित राहात नसेल तर त्याची चौकशी करून पुढील बैठकीत अहवाल मांडण्यात येईल, असेही डॉ. दासरवार यांनी सांगितले. अन्य काही विषयांवरही बैठकीत चर्चा झाली. ड्रेनेज हा विषय नागपूर महानगरपालिकेत आरोग्य विभागाकडे असून तो लोककर्म विभागाकडे वर्ग करण्यात यावा, यासंदर्भात मनपा आयुक्तांकडे निवेदन देण्यात आले असून आयुक्त याबाबत सकारात्मक असल्याची माहिती सभापती मनोज चापले यांनी दिली.
 
बैठकीला दहाही झोनचे झोनल अधिकारी उपस्थित होते.

 

  

ईलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन विकसीत करण्यासाठी फिनलॅंडसोबत करार

-    नागपूरात साकारणार अद्यावत ई-व्हेईकल चार्जिंग स्टेशन
 
नागपूर, ता. १२ नोव्हेंबरः
प्रदूषणावर नियंत्रणासाठी तसेच ग्रीन आणि क्लिन उर्जा वापरणा-या वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नागपूरात अद्यावत ईलेक्ट्रीक व्हेईकल चार्जिंग स्टेशनच्या विकासासाठी फिनलॅंडसोबत (फोर्टम इंडिया प्रा लि.) नागपूर महानगरपालिकेने सामंजस्य करार केला आहे. रविवारी (ता. १२ नोव्हेंबर) रोजी रेशिमबाग येथील ऍग्रोव्हीजन कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत मनपा आय़ुक्त अश्विन मुदगल आणि फिनलॅंड परिवहन मंत्र्यांचे प्रतिनीधी निना लास्कूनलाठी यांनी सामंजस्य कराराव स्वाक्षरी केली.
 
प्रामुख्याने कार्यकारी महापौर दिपराज पार्डीकर, परिवहन समिती सभापती बंटी कुकडे, नासुप्र सभापती डा. दिपक म्हैसेकर, मनपा अतिरिक्त आय़ुक्त रविंद्र कुंभारे, फिनलॅंड कान्सिलचे क्षेयस जोशी, नितीन सोमकुवर, फारटम इंडियाचे उपाध्यक्ष अवदेश झा, कार्गोटेक इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक एमसी सुरेश कुमार, वार्टसिला इंडियाचे उपाध्यक्ष परवेज चुकटाए, त्रुतसाला ट्रेडिंगच्या मारिया पॅटिरोकर्नाकरी, मनपा परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल, संजय गायकवाड, नरेश बोरकर, उप अभियंता राजेश दुपारे यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या आधिका-यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
रविवारी दुपारी १२ वाजता कार्यकारी महापौर दिपराज पार्डीकर व परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांनी विमानतळावर फिनलॅंडच्या शिष्टमंडळाचे स्वागत केले. यानंतर शिष्टमंडळाने विमानतळ परिसरात असलेल्या व्हेईकल चार्जिंग स्टेशनला भेट दिली. ग्रीनबसने शिष्टमंडळाने रेशिमबाग मैदानात सुरु असलेल्या ऍग्रोव्हीजनला भेट दिली. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. यावेळी मा. गडकरी यांनी शिष्टमंडळाला मिहान येथे आपण प्रकल्प उभारावा तसेच येथील तरुणांना रोजगार द्यावा, आपल्याला आवश्यक सर्व मुलबूत सुविधा तातडीने उपलब्ध देण्यात येतील, अशी ग्वाही दिली.
 
ग्रीनबसची सफारी
 
नागपूरात आगमन होताच फिनलॅंड येथील शिष्टमंडळाने ई-व्हेकल चार्जिंग स्टेशन, ऍग्रोव्हिजन येथे ग्रीनबसद्वरे भेट दिली. यावेळी इथेनॅलवर चालणा-या बसची माहिती परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांनी शिष्टमंडळाला दिली. यावेळी वातानुकुलीत बसच्या आरामदायक बसमध्ये असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्ज्याच्या सोयी-सुविधा आदींचे कौतुक शिष्टमंडळाच्या पदाधिका-यांनी केले. रेडिसन ब्लू येथे विभागीय आयुक्त अनूपकुमार यांनी शिष्टमंडळासोबत चर्चा केली.

 

  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक 100 टक्के होणार – देवेंद्र फडणवीस

-    तीन महिन्यात आराखडा तयार करण्याचे मनपाला निर्देश
 
नागपूर, ता. 11 नोव्हेंबरः यशवंत स्टेडियम परिसर धंतोली येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबडेकर स्मारक 100 टक्के होणार असून नागपूर महानगरपालिकेने तीन महिन्यात आराखडा तयार करुन शासनाकडे सादर करावा असे निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मनपा स्थायी समिती अध्यक्ष संदीप जाधव यांच्या नेतृत्वात सत्तापक्ष नेते संदीप जोशी, माजी महापौर प्रविण दटके यांच्यासह बसपा पक्षनेता मो. जमाल, नगरसेवक जितेंद्र घोडेस्वार, नरेंद्र वालदे, मो. इब्राहीम, धर्मपाल मेश्राम आदी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
 
अनेक वर्षांपासून प्रलंबित डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारकाचे कार्य सुरु करावे अशी मागणी मागिल महिन्यात झालेल्या मनपाच्या आमसभेत नगरसेवकांनी केली. यावर सत्तापक्षनेते संदीप जोशी यांनी पुढील आमसभेपूर्वी मुख्यमंत्र्यांची या विषयावर नगरसेवकांची चर्चा घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते. हेच शब्द पाळून शनिवारी शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तसेच स्मारकाचे कार्य जलद गतीने करण्याची विनंती केली. यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक 100 टक्के होणार असून तीन महिन्यात मनपाचे याचा आराखडा तयार करुन शासनाकडे पाठवावा असे निर्देशही दिले. शिष्टमंडळात महेंद्र धनविजय, प्रमोद तभाने, नागेश सहारे, अभय गोटेकर, संदीप गवई, अमर बागडे, संजय बुर्रेवार, वंदना चांदेकर, ममता सहारे, वैशाली नारनवरे, मंगला लांजेवार, विरंका भिवगडे, मो. तौफिक अहेमद यांचा समावेश होता.
 

  

मनपातर्फे चिटणीस पार्क येथे बाल दिनाचे आयोजन

नागपूर, ता. १० : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने बालक दिनाचे औचित्य साधून १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता स्थानिक रा.पै. समर्थ स्टेडियम, चिटणवीस पार्क येथे बालक दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
महापौर नंदा जिचकार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती राहील. उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती संदीप जाधव, सत्ता पक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे, माजी सत्तापक्ष नेते व ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, बसपा पक्षनेता मो. जमाल, शिवसेना पक्ष नेता किशोर कुमेरिया, राकाँ पक्षनेता दुनेश्वर पेठे, गांधीबाग झोनच्या सभापती सुमेधा देशपांडे, नगरसेवक ॲड. संजय बालपांडे, नगरसेविका विद्या कन्हेरे, नगरसेविका सरला नायक यावेळी उपस्थित राहतील. यावेळी विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन उपायुक्त रवींद्र देवतळे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, शिक्षणाधिकी संध्या मेडपल्लीवार यांनी केले आहे.

 

  

१२ ला महापौर चषक शरीर सौष्ठव स्पर्धा

नागपूर महानगरपालिका आणि इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनचे आयोजन
 
नागपूर, ता. १० : नागपूर महानगरपालिका आणि इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने १२ नोव्हेंबर रोजी लकडगंज येथील सरदार वल्लभभाई पटेल मैदानावर सायंकाळी ६ वाजता शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
 
स्पर्धेचे उद्‌घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी प्रमुख मार्गदर्शक उपस्थित राहतील तर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थिती राहील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नंदा जिचकार राहतील. यावेळी खा. अजय संचेती, खा. डॉ. विकास महात्मे, आ. कृष्णा खोपडे, आ. वी.बी.बी.ए.चे अध्यक्ष चंद्रशेखर गाडगीळ, आय.बी.बी.एफ.चे महासचिव चेतन पठारे, आ. जोगेंद्र कवाडे, अ. अनिल सोले, आ. प्रकाश गजभिये, आ. गिरीश व्यास, आ. सुधाकर देशमुख, आ. नागो गाणार, आ.विकास कुंभारे, आ. सुधाकर कोहळे, आ. मिलिंद माने, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समितीचे सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त अश्विन मुदगल, बसपा पक्षनेता मो. जमाल, लकडगंज झोनचे सभापती दीपक वाडीभस्मे, राकाँ पक्ष नेता दुनेश्वर पेठे, शिवसेना पक्षनेता किशोर कुमेरिया, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेविका मनिषा धावडे, आय.बी.बी.एफ.चे अध्यक्ष प्रेमचंद डेगरा उपस्थित राहतील. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन स्पर्धेचे संयोजक नरेंद्र (बाल्या) बोरकर, क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, मनपाचे अपर आयुक्त आर. झेड. सिद्दीकी, उपायुक्त रवींद्र देवतळे यांनी केले आहे.
 

  

जर्मनी येथे होणाऱ्या यूएनएफसीसीसी सीओपी23 परिषदेत महापौर नंदा जिचकार होणार सहभागी

नागपूर, ता. ७ नोव्हेंबरः जर्मनीतील बॉन येथे होणा-या यूएनएफसीसीसी सीओपी२३ परिषदेमध्येमध्ये आयसीएलईआयच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रादेशिक कार्यकारी कमिटी सदस्य म्हणून सहभागी होणार आहेत. नागपूरच्या महापौर नंदा जिचकार इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ लोकल एनव्हिरॉन्मेंटल इनिशिएटिव्ह (साऊथ एशिया) च्या विभागीय कार्यकारी समितीवर (REXcom) निवडून आल्या आहेत.
 
गेल्या दहा वर्षांपासून नागपूर आयसीएलईआय सदस्य असून आयसीएईआय दक्षिण आशिया सोबत अक्षय ऊर्जा प्रकल्प आणि संसाधन कार्यक्षमता प्रकल्पांसाठी कार्यान्वित असून अर्बन नेक्ससच्या ऊर्जा, पाणी आणि अन्न यावर कार्य सुरू आहे.
 
आरईएक्सकॉमकरिता ऑनलाईन मतदान करण्यात आले होते. यामध्ये दक्षिण आशियामधून ४१ सदस्यांनी मतदान केले. भारताला या निवडणुकीत दुसरे सर्वाधिक म्हणजेच २८ मते मिळाली. मतदानाची प्रक्रिया महिनाभर सुरू होती. ६ ऑक्टोबर रोजी मतदान बंद करण्यात आले. निकाल १३ ऑक्टोबर रोजी जाहीर झाले. महापौर नंदा जिचकार ह्यांचा विषय संसाधन कार्यक्षमता हा असून या क्षेत्रातील कामांना नागपूर शहरातच नव्हे तर विभागात प्रोत्साहन देण्यासाठी त्या कार्य करतील.  आरईएक्सकॉमच्या सदस्या म्हणून जर्मनी बॉन येथे १० ते १४ नोव्हेंबर दरम्यान आयोजित परिषदेत त्या सहभागी होणार आहेत. यात त्या नागपूरमधील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती जागतिक पातळीवर सादर करणार आहे.

 

  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आजीवन विद्यार्थी होते : प्रा. दिलीप दिवे

मनपाच्या शाळांत साजरा झाला विद्यार्थी दिवस
 
विद्यार्थ्यांनी टाकला डॉ. बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश
 
नागपूर,ता. ७ : घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सन ७ नोव्हेंबर १९०० मध्ये शाळा प्रवेश घेतला होता. हा दिवस राज्य शासनाने ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून जाहीर केला. त्या अनुषंगाने नागपूर शहरातील मनपाच्या विविध शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करून हा दिवस साजरा करण्यात आला.
 
नेताजी मार्केट हिंदी माध्यमिक शाळेमध्ये आयोजित कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मनपाचे शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समितीचे सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, मनपाच्या शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, मुख्याध्यापिका साधना सयाम उपस्थित होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिपाली बनोदिया, दीपार राऊत, खुशी शाहू, अंजली शर्मा, जुही शाहू या विद्यार्थिनींनी प्रकाश टाकला. मुख्याध्यापिका साधना सयाम यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थी दिनाचे महत्त्व सांगितले. राज्यात प्रथमच विद्यार्थी दिवस साजरा होत असल्याची माहिती त्यांनी दिली. शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी विद्यार्थी दिवसाची महत्ता सांगताना या दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील अभ्यासू वृत्तीची प्रेरणा घ्यावी, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे पाऊल शाळेत पडल्यामुळे ते स्वत: सुशिक्षीत आणि प्रज्ञावंत झाले. दीन-दलितांचे, वंचितांचे उद्धारकर्ते झाले, असेही शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे म्हणाले. क्रीडा समिती सभापती नागेश सहारे यांनी विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यातील विद्यार्थ्याची माहिती देत शिक्षणाचा काय परिणाम होतो हे डॉ. बाबासाहेबांनी दाखवून दिल्याचे सांगितले. शिका आणि संघटित व्हा, हा मंत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला. त्यांच्या या मंत्राने प्रेरीत होऊन समाजातील प्रत्येक घटक शिकला आणि संघटित झाल्याचे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधानाचा सर्वात आदर्श संविधान म्हणून जगभर गौरव होतो, असेही त्यांनी सांगितले.
 
शिक्षण समितीचे उपसभापती प्रमोद तभाने म्हणाले, स्वातंत्र्य, समता, बंधुता व नञयाय ही मानवी मूल्ये रुजू शकली गेली म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा शाळा प्रवेश दिन ही अत्यंत क्रांतिकारी आणि महत्त्वाची घटना ठरते. शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. मनपाचे जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यावेळी आवर्जून उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन संजय म्हाला यांनी केले. आभार मनिषा फुलंबरकर यांनी मानले.
 
कपिलनगर हायस्कूल
मनपाच्या कपिलनगर हायस्कूलमध्येही आमदार डॉ. मिलिंद माने यांच्या उपस्थितीत विद्यार्थी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापक राजेंद्र पुसेकर, कपिलनगर उच्च प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका किर्ती गणवीर यांच्यासह शिक्षक श्रीमती दहिवले, श्रीमती नांदगावे, सीमा होतचंदानी, राजेंद्र मसराम, हेमलता अंबादे, भावना मेश्राम, ममता रंगारी उपस्थित होते. मनपाच्या इतर शाळांमध्येही विद्यार्थी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
 

  

पोर्णिमा दिनानिमित्त उर्जाबचतीचा संदेश-मनपा व ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे उपक्रम                                                          

नागपूर, ता.६: नागपूर महानगर पालिका व ग्रीन व्हिजील फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पोर्णिमा दिनानिमित्त उर्जाबचतीसाठी जनजागृती करण्यात आली. मानेवाडा चौक परिसरात स्वयंसवेकांनी नागरिकांमध्ये पोर्णिमादिनानिमित्त अनावश्यक विद्यूत दिवे बंद ठेवून उर्जाबचतीचे आवाहन केले. याला प्रतिसाद देत रात्री 8 ते 9 दरम्यान परिसरातील प्रतिष्ठांनामधील अनावश्यक दिवे बंद ठेवून उर्जाबचतीचा संदेश देण्यात आला. यावेळी आमदार प्रा. अनिल सोले, नगरसेविका विशाखा बांते, माजी स्थायी समिती सभापती रमेश सिंगारे, ग्रीन व्हिजीलचे कौस्तव चॅटर्जी यांच्यासह स्वयंसेवकांनी नागरिकांमध्ये तसेच सिग्नलवर थांबणा-या वाहनचालकांनाही पोर्णिमादिना दिनानिमित्त आयोजित उपक्रमाची माहिती दिली.
 
पारंपारिक पद्धतीने उर्जा निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक संपत्ती खर्च होते. उर्जेची बचत केल्यास नैसर्गिक खनिज संपत्तीचेही जतन करणे शक्य होईल. तसेच उर्जा बचत ही काळाजी गरज बनली असून प्रत्येकाने या अभियानात सहभागी होऊन उर्जा बचत करावी असे आवाहन यावेळी आमदार अनिल सोले यांनी केले. या अभियानामुळे २६९४.९३ किलोवॅट इतकी उर्जेची बचत करण्यात आली. प्रत्येकाने पोर्णिमेच्यादिवशी एक तास अनावश्यक विद्यूत उपकरणे बंद ठेवून अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन केले. स्वयंसेवकांच्या आवाहनाला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला. कार्यक्रमाला महानगरपालिकेच्या विद्युत विभागाचे अजय मानकर, सुनील नवघरे, भारती बुंदे, रमेश कानगो, संगीता फडणवीस, शरद बांते, प्रदीप सोनोले,लालचंद चौधरी, मधूकरराव पाठक, श्रीधर चौहान, दिनेश बुरकुडे, संगपाल काळे, नितीन कठाने, सुरभी जयस्वाल, मेहूल कोसरकर, कल्याणी वैद्य, कार्तिकी कावळे, विष्णूदेव यादव, हेमंत अमेसर, लिपीशा काचोरे, अमोल भलमे उपस्थित होते.

  

मनपाद्वारे महर्षी सुदर्शन महाराज यांना अभिवादन

नागपूर,ता.४. कार्तिक पोर्णिमेच्या पावन पर्वावर महर्षि सुदर्शन महाराज यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेद्वारे अभिवादन करण्यात आले. मनपा मुख्यालयातील महर्षी सुदर्शन यांच्या तैलचित्राला उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी पुष्पहार घालून त्यांना अभिवादन केले.
 
याप्रसंगी राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग सदस्य दिलीप हाथीबेड, नगरसेविका लिलाताई हाथीबेड, मनपा कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष राजेश हाथीबेड, मोती जनवारे, शशी सारवान, किशोर समुद्रे, उमेश पिंपरे, अजय हाथीबेड, अरूण तुर्केला, नरेश खरे, व सफाई कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  

वाहतुकीचे नियम पालन करण्यासाठी लोकजागृती आवश्यक : महापौर नंदा जिचकार

जानेवारीमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त हजारो नागपूरकर करणार अपघातमुक्तीचा संकल्प
 
नागपूर,ता.३. वाहतूक नियमांचे पालन करण्यासाठी लोकजागृती व लोकसहभाग आवश्यक आहे. ही लोकचळवळ व्हावी यासाठी अपघातमुक्त समिती विशेष प्रयत्न शहरात करीत आहे, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले. गुरूवार (ता.२) महापौर कार्यालयात आयोजित बैठकीप्रसंगी त्या बोलत होत्या.
 
बैठकीला शिक्षण समिती सभापती दिलीप दिवे, क्रीडा समिती उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेवक विजय चुटेले, अपघात मुक्त समितीचे कार्याध्यक्ष राजु वाघ, महासचिव अजय डबीर, संपर्कप्रमुख संजय चिंचोले, उपाध्यक्ष डॉ. प्रदीप येळणे, प्रा. गजानन पोटभरे, अनुसया गुप्ता, प्रा. नागेश इजमुलवार, बबनराव पडोळे, निशांत बिर्ला, प्रफुल्ल मोरे, सागर घोडमारे, प्रकाश खळतकर, बबन पटोले आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
 
पुढे बोलताना महापौर म्हणाल्या, अपघातमुक्त नागपूर ही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची संकल्पना आहे. त्यामुळे या संकल्पनेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. नागपूर शहराची ‘स्मार्ट सिटी’ कडे होणारी वाटचाल ही आपल्याकरिता एक अभिमानाची बाब आहे. त्याचबरोबर मानवी चुकांमुळे होणारे अपघात व अपघातामुळे होणारे कौंटुबिक आघात ही काळजीची व दु:खाची बाब आहे. याच अभियानाला लोकचळवळीचे स्वरूप देण्यासाठी आणि संकल्प करण्यासाठी संपूर्ण नागपूर शहरात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी केले. जानेवारी २०१८ मध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह पंधरवाड्यात यशवंत स्टेडियम येथे संकल्प घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
 
तत्पूर्वी बैठकीत सहभागी झालेल्या सदस्यांनी या अभियानात त्यांचे काय योगदान राहील, याविषयी माहिती दिली. कार्याध्यक्ष राजू वाघ यांनी अभियानाबद्दलची संपूर्ण माहिती सांगितली.

 

  

कोलंबोतील ‘सिटी नेट काँग्रेस’मध्ये महापौर नंदा जिचकार सहभागी होणार

नागपूर, ता. ३ : नागरी नेक्सस प्रकल्पाअंतर्गत नागपूर शहरात राबविलेल्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या इकॉनॉमिक ॲण्ड सोशल कमिशन फॉर एशिया ॲण्ड द पॅसिफिक (यूएनईएससीएपी) ने महापौर नंदा जिचकार यांना श्रीलंकेतील कोलंबो येथे आयोजित ‘सिटी नेट काँग्रेस’मध्ये आमंत्रित केले आहे. त्यासाठी त्या शुक्रवारी कोलंबोला रवाना होत आहेत.
 
इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ लोकल एनव्हिरॉन्मेंटल इनिशिएटिव्ह साऊथ एशिया (आयसीएलईआय) आणि प्रादेशिक जीआयझेड शहरी नेक्सससह २०१६ पासून नागपूरमध्ये ‘आशियायी शहरी नेटवर्क्समधील एकात्मिक संसाधन व्यवस्थापन’ या प्रकल्पाची अंमलबजावणी करीत आहे. ‘शहरी नेक्सस’ या प्रकल्पाचा उद्देश नागपूरमध्ये नागरी विकास नियोजन प्रक्रियेमध्ये एकीकृत दृष्टीकोन अंवलंबिणे व प्रोत्साहन देणे हा आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून विशेषत: पाणी, ऊर्जा आणि घनकचरा व्यवस्थापन यावर लक्ष केंद्रीत केले जात आहे. महापौर नंदा जिचकार ह्या कोलंबोतील ‘सिटी नेट काँग्रेस’मध्ये नागपूरचे प्रतिनिधित्व करणार असून शहराच्या भविष्यातील योजनांबद्दल बोलतील. 
 
‘सिटी नेट काँग्रेस’चे श्रीलंकेतील कोलंबो येथे ६ ते ८ नोव्हेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध देशातील शहरांमधील सदस्य, सहयोगी सदस्य आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे सुमारे ३०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या पीअर-टू-पीअर लर्निंग प्लॅटफॉर्मद्वारे शहरातील महापौर, नागरी नेते आणि आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ एकत्र येऊन हवामान बदल, आपत्ती जोखीम कमी कशी करता येईल आणि इतर शहरी विकास समस्यांवर चर्चा करतील. 
 

  

लाड समितीच्या शिफारसीअंतर्गत १०६ सफाई मजदूरांना नियुक्तीपत्राचे वितरण

नागपूर,ता.२ : लाड समितीच्या शिफारसी अतंर्गत सफाई कामगारांच्या १०६ वारसदारांना सफाई कर्मचारी म्हणून नियुक्तीचे आदेश वितरण महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते करण्यात आले.
 
यावेळी वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीचे सभापती मनोज चापले, स्थापत्य व प्रकल्प विशेष समितीचे सभापती संजय बंगाले, शिक्षण समितीचे सभापती दिलीप दिवे, आरोग्य समितीचे सदस्य लखन येरावार, विजय चुटेले, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, मनपा कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष राजेश हाथीबेड प्रामुख्याने उपस्थित होते.
 
शहर स्वच्छतेसाठी दिवसरात्र झटणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचे अभिनंदन यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला यशस्वी करण्यात सफाई कामगारांचा मोठा वाटा आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडल्यास स्वच्छ नागपूर साकारणे सहज शक्य असल्याचे सांगत महापौरांनी नवनियुक्त सफाई कामगारांचे स्वागत केले. कामाच्या वेळा पाळा, कामे चोखपणे बजावा आणि आरोग्याची काळजी घ्या असा सल्लाही महापौरांनी यावेळी बोलताना दिला.

 

  

फिनलॅण्डच्या कौन्सिलरची मनपाला भेट

महापौर, उपमहापौर, आयुक्तांसोबत गुंतवणुकीसंदर्भात चर्चा
 
नागपूर, ता. २ : विदर्भात गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने अभ्यास करण्यासाठी आलेले फिनलॅण्डचे कौन्सिलर मिक्को पोस्टेनन यांनी नागपूर महानगरपालिकेला भेट दिली. महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर आणि आयुक्त अश्विन मुदगल यांच्यासोबत विविध विषयांवर चर्चा केली.
 
प्रारंभी महापौर नंदा जिचकार यांनी मिक्को पोस्टेनन यांचे स्वागत केले. त्यानंतर राज्यात हायब्रीड व्हेईकल चार्जींग टेक्नॉलॉजी आदानप्रदान करण्याबाबत चर्चा झाली. आयुक्त अश्विन मुदगल यांनी त्यांना बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी संदर्भात सविस्तर माहिती दिली. भविष्यात एक हजार मेट्रिक टन कचरा विघटन करून ऊर्जा तयार करण्याबाबत प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
 
नागपूर शहर स्मार्ट करण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिका करीत असलेल्या कार्याबद्दल मिक्को पोस्टेनन यांनी समाधान व्यक्त केले. फिनलॅण्डच्या मुंबई येथील कन्सल्टंट प्रीती गोटेकर यांनी नागपूर शहराच्या वैशिष्ट्याबद्दलची माहिती मिक्को आणि त्यांचे सहकारी अवधेश झा यांना दिली. भविष्यात नागपूरसह विदर्भात वाहतूक आणि ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याच्या आश्वासन मिक्को यांनी महापौर नंदा जिचकार यांना दिले.

 

  

सामाजिक क्षेत्रात सेवा देऊन महापालिकेचा गौरव वाढवा : दीपराज पार्डीकर

मनपाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार
 
नागपूर, ता.३१ : नागपूर महानगरपालिकेला विविध माध्यमातून सेवा दिली, आता सामाजिक क्षेत्रात सेवा देऊन महानगरपालिकेचा लौकिक वाढवावा, असे प्रतिपादन उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी केले. महानगरपालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निरोप व सत्कारप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर सहायक आयुक्त महेश धामेचा, मनपा कर्मचारी सहकारी बँकेचे संचालक विजय ताथोटे, मनपा शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेश गवरे, मनपा कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष राजेश हाथीबेड, सचिव डोमाजी भडंग, नागपूर मनपा कर्मचारी सहकारी बँकेचे संचालक व सेवानिवृत्त झालेले सुरेंद्र टिंगणे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
पुढे बोलताना उपमहापौर दीपराज पार्डीकर म्हणाले, मनपाची अखंडित सेवा केली त्याबद्दल मी उपमहापौर या नात्याने सर्व सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी बांधवांचे आभार मानतो. संपूर्ण देशात नागपूर मनपाचे नाव आज गौरवाने घेतल्या जाते ते केवळ मनपाच्या कर्मचाऱ्यांमुळेच. स्वच्छता, शिक्षण, आरोग्य या सर्व स्तरावर जी जबाबदारी आपल्यावर दिली ती आपण समर्थपणे सांभाळली. मनपा म्हणजे आपला परिवार म्हणूनच पालिकेचा कर्मचारी काम करीत असतो. मनपाच्या सेवेतून जरी आपण निवृत्त झाला असला, तरीही समाजाचे ऋण फेडण्यासाठी सदैव तत्पर राहा. सामाजिक जबाबदारी ओळखून कार्य करीत रहा, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.
 
यावेळी सहायक आयुक्त महेश धामेचा म्हणाले, महापालिकेच्या सेवेतून कर्मचारी मुक्त झाला असला तरीही महापालिकेशी असलेले नाते कायम आहे. निवृत्तीच्या वेळी आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात संमिश्र भावना असते. शासकीय सेवेतून सुखरूप निवृत्त होणे हे महत्त्वाचे असते, असेही ते म्हणाले.
यावेळी नागपूर मनपा कर्मचारी सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक सुरेंद्र टिंगणे यांचा उपमहापौर दीपराज पार्डीकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मानपत्राचे वाचन राजेश हाथीबेड यांनी केले. यावेळी टिंगणे यांनी आपल्या मनोगतातून केलेल्या कार्याला उजाळा दिला. यावेळी मनपा सेवेतून निवृत्त झालेल्या उपअभियंता आर. ए. खानोरकर, सहायक शिक्षणाधिकारी मिना गुप्ता, ज्येष्ठ लिपिक आर. एस. गजभिये, ए.एम. कुबडे, राजस्व अधिकारी ए.आर. दराडे, कनिष्ठ निरीक्षक जे. एम. लाले, एमएसडब्ल्यू अब्दुल कादीर रहमान, विलास वाघ, युसूफ अली खान अली शेर खान, क्षेत्र कर्मचारी रामदास गजभिये, मजदूर शकुंतला कारेमोरे, लिला जांभुळकर, सहायक शिक्षिका रंजना चव्हाण, लक्ष्मी सोनकुसरे, रेणू मधोक, कनिजा बानो मूर्तजा खान, सुषमा देशमुख, भारती शर्मा, फूलचंद पाडे, मुख्याध्यापक सुनील खनगण, नलिनी शिरीष कोटागळे, सफाई मजदूर हरिश्चंद्र कलसे, लक्ष्मण गजभिये, मुख्याध्यापिका ज्योत्स्ना पांडे, सफाई मजदूर आशा हाथीबेड यांचाही शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि धनादेश देऊन सत्कार करण्यात आला.
 
कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले. आभार कार्याध्यक्ष राजेश हाथीबेड यांनी मानले. निगम अधीक्षक राजन काळे, सहायक अधीक्षक (पेन्शन) दत्तात्रय डहाके, सहायक अधीक्षक सुशील यादव, विशाल शिवाळे, मनपा बँकचे संचालक राजू कनाटे, दिलीप चौधरी, धनराज मेंढेकर, शिक्षक संघाच्या कोषाध्यक्षा मनविंदर कौर लांबा, सुषमा नायडू, किशोर तिडके यांच्यासह बहुसंख्य अधिकारी, कर्मचारी, मनपा कर्मचारी बँकेचे संचालक प्रामुख्याने उपस्थित होते. 

 

  

एकतेची ज्योत अखंड तेवत राहो : महापौर नंदा जिचकार

‘रन फॉर युनिटी’ : नागपूरकरांनी दिला एकता आणि स्वच्छतेचा संदेश
 
नागपूर, ता. ३१ : जेव्हा जेव्हा या देशावर संकट आले त्याकाळात देशवासीयांनी ‘एकते’चे दर्शन घडविले. नागपूरकरांनी वेळोवेळी एकतेचा परिचय करून दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आज नागपूरकरांनी एकतेचे दर्शन घडविले. ‘रन फॉर युनिटी’च्या माध्यमातून नागपूरकरांनी दिलेला ‘स्वच्छ भारत’चा संदेश लाख मोलाचा असल्याचे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.
 
दिवंगत सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने ३१ ऑक्टोबर रोजी संविधान चौकातून ‘एकता दौड’चे आयोजन करण्यात आले होते. दौडच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर आ. सुधाकर कोहळे, आ. सुधाकर देशमुख, आ. मिलिंद माने, उपमहापौर दीपराज पार्डीकर, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, आयुक्त अश्विन मुदगल, माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, प्रतोद दिव्या धुरडे, मनपाचे क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, स्थापत्य व प्रकल्प विशेष समिती सभापती संजय बंगाले, विधी समिती सभापती ॲड.मिनाक्षी तेलगोटे, दुर्बल घटक समितीचे सभापती महेंद्र धनविजय, धरमपेठ झोन सभापती रूपा रॉय, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, डॉ. उपेंद्र कोठेकर उपस्थित होते.
 
महापौर नंदा जिचकार पुढे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र विकासाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. गरीबांच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना शासनाने केवळ घोषित केल्या नाहीत तर त्या अंमलात आणल्या. देशातील आणि राज्यातील शासनाचा कारभार गेल्या तीन वर्षात पारदर्शक राहिला आहे. पुढील काळात तो अधिक पारदर्शक राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. देशावर कुठलेही संकट आले तर या देशाचा नागरिक प्राणार्पण करायला तयार आहे. अशा या देशात नागरिकांच्या मनात एकतेची ज्योत सतत तेवत राहो, असे प्रतिपादन त्यांनी केले. गेल्या काही वर्षांत नागपूरकरांमध्ये त्यांच्या जबाबदारीविषयी जागृती झाली आहे. नागपूर स्वच्छ आणि सुंदर करण्यात नागपूरकरांचा वाटा मोठा आहे. त्यांच्याशिवाय ते शक्य नाही. ‘रन फॉर युनिटी’च्या माध्यमातून ‘एकते’सोबतच ‘स्वच्छते’चाही संदेश नागपूरकर देत असून भविष्यात या देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून नागपूरची ओळख होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
तत्पूर्वी महापौर नंदा जिचकार यांनी घाटरोड चौकातील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. त्यानंतर संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. कार्यक्रमस्थळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. मार्गदर्शनानंतर दौडमध्ये सहभागी झालेल्यांना महापौर नंदा जिचकार यांनी ‘एकते’ची शपथ दिली. त्यानंतर ‘एकता दौड’ला त्यांनी हिरवी झेंडी दाखविली.
महापौर नंदा जिचकार, आ. सुधाकर कोहळे, आ. सुधाकर देशमुख, आ. डॉ. मिलिंद माने, आयुक्त अश्विन मुदगल यांच्यासह महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि विविध संस्थांचे प्रतिनिधी सदस्य ‘एकता दौड’मध्ये धावले. संविधान चौकातून सुरू झालेली ही दौड लिबर्टी टॉकीज, व्हीसीए मैदान, आकाशवाणी चौक मार्गे परत संविधान चौकात पोहोचली. तेथे दौडचे विसर्जन करण्यात आले. यावेळी माजी महापौर अर्चना डेहनकर, सतरंजीपुरा झोन सभापती संजय चावरे, हनुमान नगर झोन सभापती भगवान मेंढे, धंतोली झोन सभापती प्रमोद चिखले, वैद्यकीय सेवा व आरोग्य समितीचे उपसभापती प्रमोद कौरती, महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती श्रद्धा पाठक, नगरसेवक सुनील हिरणवार, निशांत गांधी, विजय झलके, अमर बागडे, मो. इब्राहीम टेलर, नगरसेविका पल्लवी श्यामकुळे, सोनाली कडू, वंदना भगत, लता काडगाये, मनिषा कोठे, प्रगती पाटील, बंडू राऊत, उपायुक्त रवींद्र देवतळे, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, अतिरिक्त उपायुक्त जयंत दांडेगावकर, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा, क्रीडा उपसंचालक रेवतकर, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार, स्थावर अधिकारी आर. एस. भुते, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार, सर्व झोनचे सहायक आयुक्त सर्वश्री महेश मोरोणे, आर. पी. भिवगडे, गणेश राठोड, राजेश कराडे, अशोक पाटील, पी.एल. वराडे, सुभाष जयदेव, विजय हुमने, हरिश राऊत, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा विभाग प्रमुख डॉ. माधुरी मार्डीकर, जिल्हा क्रीडा असोशिएशनचे अध्यक्ष शरद सूर्यवंशी, तालुका क्रीडा अधिकारी आशा मेश्राम, अविनाश पुंड, ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तव चॅटर्जी, देवेंद्र दस्तुरे आदी उपस्थित होते.
 
सहभागी संस्था
 
नागपूर महानगरपालिकेच्या आवाहनाला साद देत ‘एकता दौड’मध्ये नॅशनल फायर कॉलेज, वसंतराव नाईक शासकीय समाजविज्ञान संस्था, नागपूर जिल्हा ॲथॅलेटिक संघटना, ग्रीन व्हिजील फाऊंडेशन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ क्रीडा विभाग, प्री आय.ए.एस. कोचिंग सेंटर, नागपूर महानगरपालिकेचे क्रीडा शिक्षक, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, क्रीडा उपसंचालक कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आदींनी सहभाग नोंदविला होता.​

 

  

गोरेवाडा ते बर्डी बस सेवेचा शुभारंभ

परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांनी दाखवली हिरवी झेंडी
 
नागपूर,ता.३१ : नागपूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या वतीने ‘आपली बस’ या उपक्रमाअंतर्गत गोरेवाडा ते बर्डी या बस सेवेचा शुभारंभ मंगळवार (ता.३१) ला गोरेवाडा बस स्टॉप येथे करण्यात आला. यावेळी परिवहन समिती सभापती बंटी कुकडे, नगरसेविका अर्चना पाठक, संगीता गिऱ्हे प्रामुख्याने उपस्थित होते.
 
गोरेवाडा येथून सुटणारी बस नायडु बंगला, काटोल नाका, दाभा गाव चौक, मारोती सेवा शोरूम, विद्यापीठ परिसर, रवीनगर, धरमपेठ मार्गे बर्डी अशी धावणार आहे. गोरेवाडा येथून पहिली बस सकाळी ७ वाजता तर अखेरची बस रात्री ९.३५ ला निघेल. बर्डी येथून पहिली बस ६ वाजता सुटेल तर शेवटची बस रात्री ८.३० ला निघेल. तिकीटाचे दर गोरेवाडा ते बर्डी २३ रूपये, ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीटीचे दर १२ रूपये इतके राहील.
 
कार्यक्रमाला विनीत पाठक, विद्याधर मिश्रा, विनय कडु, दीपक सिंग, शिवप्रसाद, विक्की मिश्रा, रजनी पांडे, रेणू दास, परिवहन विभागाचे रामराव मातकर, एस.जी.सोनटक्के प्रामुख्याने उपस्थित होते.

 

 

AllVideoShare

Last Updated

Friday 23 February 2018

Poll

How do you rate the new NMC site?
 


Copyright © 2018 Nagpur Municipal Corporation, Designed by eGovernments Foundation.
Find us on Facebook
Follow Us