शपथ
मी, गांभीर्यपूर्वक शपथ घेतो/घेते की,
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत शासनाच्या सेवा पारदर्शक पद्धतीने, निर्धारित कालमर्यादेत व सुलभ रीतीने पात्र नागरिकांना प्रदान करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली आहे. ही जबाबदारी मी पूर्ण प्रामाणिकपणे, निष्ठेने, सचोटीने, संवेदनशीलतेने व तत्परतेने पार पाडण्यास कटिबद्ध राहीन.
मी, सेवा वितरण प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा विलंब, अडथळा किंवा भ्रष्टाचार होऊ देणार नाही व त्यास प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलीन.
मी, उक्त कायद्यानुसार नागरिकांना प्रदान करण्यात आलेल्या सेवांच्या हक्काचा आदर राखून, नागरिकांप्रती सेवाभाव ठेवून त्यांच्या हितासाठी व कल्याणासाठी कार्य करीन.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत शासनाच्या अधिसूचित सेवा कालमर्यादेत प्राप्त करा.
“आपले सरकार पोर्टल” आपल्या सेवेत:
https://aaplesarkar.mahaonline.gov.in